ओल्या नारळाची बर्फी : या नारळी पौर्णिमेला बनवा खमंग नारळाच्या वड्या, सोपी रेसिपी आत्ताच वाचा …

भारतात मुख्यत्वे करून किनारपट्टीच्या भागात आणि दक्षिण भारतात नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळाच्या वड्या बनवल्या जातात. किसलेले खोबरे, दूध, साखर घालून बनवलेली नारळाची खुसखुशीत बर्फी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी बनवलेली स्पेशल मिठाईच. कोकण आणि समुद्रकिनाऱ्या लगतच्या भागात सर्वत्र या दिवशी नारळ बर्फी बनवली जाते.

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण नारळाची बर्फी म्हणजेच ओल्या खोबऱ्याच्या वड्या कशा बनवाव्या ते शिकून घेऊ.

ओल्या नारळाची बर्फी | ओल्या नारळाच्या वड्या

ओल्या नारळाची बर्फी

ओल्या नारळाची बर्फी किवा नारळाच्या वड्या झटपट बनवता येतात. नारळाच्या वड्या बनवण्यासाठी ताजे ओले खोबरे घ्यावे कारण यामुळे वड्या पांढऱ्या शुभ्र होतात. तसेच बर्फी बनवताना गाईचे दूध वापरावे त्यामुळे वड्या किवा बर्फी खूप टेस्टी होते व तोंडात टाकली की विरघळते. अश्या वड्या खुसखुशीत आणि मऊ होतात.

वाचा👉 नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती 

नारळ बर्फी रेसिपी तक्ता

नाव :नारळाच्या वड्या | नारळ बर्फी | खोबऱ्याच्या वड्या
तयारी वेळ : 01 तास
स्वयंपाक करण्याची वेळ :30 मिनिटे
व्यंजन प्रकार : भारतीय पारंपारिक
व्यंजन : शाकाहारी – मिष्टान्न

ओल्या नारळाच्या वड्या साहित्य

2 कप ओला नारळ (खोवलेला)
2 कप साखर
2 कप दूध (गाईचे)
7-8 केशर काड्या
1 टी स्पून वेलची व जायफळ पावडर
2 टे स्पून पिठीसाखर
1 टी स्पून साजूक तूप

वाचा👉 रक्षाबंधन संपूर्ण माहिती मराठी

ओल्या नारळाची बर्फी रेसिपी

ओल्या नारळाच्या वड्या
  • १) एक ओला आणि ताजा नारळ खोवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग न घेता पांढरे खोबरे घ्यावे.
  • २) खोबरे थोडेसे गाईच्या दुधात भिजवून घ्यावे. यामुळे वड्या खुसखुशीत होतील.
  • ३) मंद आचेवर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा. मंद आचेवर खोबरे थोडा वेळ परतून घ्यावे.
  • ४) २-३ मिनिटानंतर त्यातदोन कप साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत राहावे.
  • ५) या मिश्रणात छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागेल.
  • ६) एका परातीला तूप लावून घ्यावे आणि त्यावर हे मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या किंवा पेल्याच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान लेयर मध्ये पसरावे. अर्ध्या इंचाचा थर करावा.
  • ७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने त्याच्या वड्या पाडाव्यात. मिश्रण थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत.
  • ८) यावर केशर आणि ड्राय फ्रूटस लावावे. मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.

खोबऱ्याच्या वड्या तयार करण्यासाठी टिप्स

१. नारळाच्या वड्यांसाठी साखरेचा पाक तयार करताना त्यात जास्त पाणी घालू नये.

२. साखरेच्या पाकात लिंबाचा रस घालावा यामुळे वड्यांना छान पांढराशुभ्र रंग येतो.

३. साखरेच्या पाकात खोबर घातल्यावर त्यातील पाण्याचा अंश संपूर्णपणे काढून मिश्रण कोरडे करून घ्यावे यामुळे वड्या ओल्या राहणार नाहीत.

४. साखरेचा पाक व खोबऱ्याचे मिश्रण तयार करताना ते मंद आचेवर ठेवावे नाहीतर मिश्रणाचा रंग बदलून वड्या थोड्या लालसर होतात.

ओल्या नारळाच्या वड्या

नारळाच्या वड्या किवा बर्फी एकदम मस्त बनवण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स

  • नारळ व साखर ह्याचे माप घेतांना जेवढा नारळ घेणार तो कपामध्ये दाबून भरून घ्या व तेवढ्याच प्रमाणात साखर घ्या.
  • नारळ खोवताना फक्त वरचे वरचे पांढरे खोबरे घ्या. मिश्रण सतत हलवत रहा. म्हणजे बुडाला लागणार नाही.
  • गाईचे दूध घातल्यामुळे वड्या छान मऊ सूत होतात. तोंडात टाकल्या की विरघळतात.
  • नारळाचे मिश्रण घट्ट झालेकी पिठी साखर घाला म्हणजे वड्या छान खुटखुटीत होतात.
  • जर आपल्याला ह्या वड्या बनवतांना बदल करायचा असेल तर दुधा ऐवजी खवा किवा कंडेन्स मिल्क वापरू शकता.
  • केशर व वेलचीपूड ऐवजी गुलाबी रंग व रोझ इसेन्स वापरू शकता.

FAQ

नारळ बर्फी कशाची बनते?

नारळ बर्फी किंवा नारळाच्या वड्या हा एक लोकप्रिय भारतीय गोड पारंपरिक पदार्थ आहे. किसलेले खोबरे, दूध, साखर घालून बनवलेली नारळाची खुसखुशीत बर्फी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी बनवलेली स्पेशल मिठाईच.
याला दक्षिण भारतात नारियल बर्फी (हिंदीमध्ये), खोबरा बर्फी (मराठीत), किंवा ठेंगाई बर्फी असेही म्हणतात.

डेसिकेटेड नारळ म्हणजे काय?

डेसिकेटेड नारळ म्हणजे वाळलेल्या नारळाचे सुकविलेले खोबरे. हे खोबरे थोडे पाणी कीव दूध मिक्स केल्यावर आपण जेवणात वापरू शकतो. डेसिकेटेड खोबऱ्याची खोबरा लसूण चटणी सुद्धा छान बनते.

नारळाच्या वड्या किती काल टिकतात ?

नारळाच्या वड्या व्यवस्थित बनविल्या तर एक आठवड्या पर्यन्त टिकतात. जास्त काल टिकविण्यासाठी हवबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवाव्या.

निष्कर्ष

या नारळी पौर्णिमेला तुम्ही नारळाच्या वड्या नक्की बनवा आणि आपल्या कुटुंबीयांना खाऊ घाला.

संदर्भ :

Leave a comment