वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीने परदेशी जाणारी पहिली भारतीय स्त्री, फक्त भारतातच नव्हे तर, परदेशातही कुचेष्ठा, अपमान सहन करीत, एकोणिसाव्या शतकात भारतात स्त्रियांचे प्राथमिक शिक्षण ही खडतर असतानाही हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजे आनंदीबाई जोशी.
अशा काळातही २००० मैलावर जाऊन डॉक्टर झालेली पहिली भारतीय स्त्री, जिच्या सन्मानार्थ शुक्रावरील विवराला तिचे नाव देण्यात आले आहे, ती भारतीय स्त्री, डॉक्टर आनंदीबाई जोशी.
धैर्य, दृढ निश्चय, बुद्धिमत्ता व अभ्यासूवृत्ती या गुणांच्या आधारे अमेरिकेत जाऊन, भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्याबद्दल माहिती दिली आहे, हि माहिती व लेख जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.
आनंदीबाई जोशी यांची माहिती Anandibai Joshi Information In Marathi
पूर्ण नाव | आनंदीबाई गोपाळराव जोशी |
आधीचे नाव | यमुना |
जन्म तारीख | दि. ३१ मार्च १८६५ रोजी |
जन्म स्थळ | पुणे |
ओळख | भारतातील पहिली महिला डॉक्टर |
शिक्षण | एम. डी |
व्यवसाय | डॉक्टर |
पतीचे नाव | गोपाळराव जोशी |
मृत्यू | दि. २६ फेब्रुवरी १८८७ |
मृत्यूचे कारण | क्षयरोग |
कोण होत्या आनंदीबाई गोपाळ जोशी ?
मित्रांनो, आपल्या भारत देशातली पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. ऐकून थोडा आश्चर्य वाटले असेल, पण हा मान एका मराठमोळ्या स्त्रीला मिळाला, जी की आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
हे सुद्धा वाचा –
- विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी
- राजगुरू यांची माहिती
- बिरसा मुंडा माहिती मराठी
- स्वामी दयानंद सरस्वती माहिती मराठी
आज सुद्धा गावामध्ये एका मुलीला दुसऱ्या गावात एकटीला पाठवत नाही, पण त्या काळात म्हणजे अंदाजे १५० वर्षांपूर्वी या स्त्रीने चक्क अमेरिकेत सात समुद्राच्या पार जाऊन, डॉक्टरची पदवी मिळवली आणि ती सुद्धा फक्त वयाच्या २१ व्या वर्षी.
त्या काळात सावित्रीबाईंनी जरी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली तरी सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे, स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात होते. फक्त चूल आणि मूल एवढेच त्यांचे काम अशी समजूत असताना, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाल्या.
डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म व २० वर्ष मोठ्या वयाच्या गोपाळराव जोशीं सोबत विवाह
आनंदीबाईंचा जन्म दि. ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे त्यांच्या आजोळी झाला. गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या जेष्ठ कन्या.
आनंदीबाईंचे आधीचे नाव यमुना होते. डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.
गोपाळ रावांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते, ते पोस्ट ऑफिस मध्ये कारकून होते. लग्नानंतर गोपाळ रावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून, आनंदीबाई असे ठेवले.
आनंदीबाईं वैद्यकीय शिक्षणाकडे का ओढल्या गेल्या ?
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या चौदाव्या वर्षी एका मुलीस जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने, ते केवळ दहाच दिवस जगू शकले. हीच खंत डॉक्टर आनंदी गोपाळ जोशीना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यासाठी कारणीभूत ठरली.
आनंदीबाई यांना मिळाली गोपाळरावांची साथ
आपल्या पत्नीस शिक्षणात रस आहे, हे गोपारावांनी जाणले. त्यांनी डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना इंग्रजी शिकवण्याच्या निश्चय केला. त्याकाळी पत्नीने घरकाम केले नाही, म्हणून तिला मारहाण होत असे, परंतु अभ्यासाऐवजी घर कामाला लक्ष घातले, म्हणून शिक्षा करणारे गोपाळराव हे पहिलेच असतील.
नोकरी निमित्त गोपाळ रावांची सतत बदली होत असे, त्यानुसार त्यांची कोल्हापूरला नेमणूक झाली होती. तिथे मिशनऱ्यांची ओळख झाल्यावर गोपाळ रावांच्या मनात आनंदी बाईंना अमेरिकेला पाठवून, तिचे शिक्षण करावे, असा विचार आला.
गोपाळ रावांनी या संदर्भात, अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु, हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती. धर्मांतर करणे या जोडप्यास मान्य नव्हते, मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
१८८० मध्ये गोपाळ रावांनी प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल वाइल्डर यांना पत्र पाठवले, त्या पत्रात त्यांनी आपल्या पत्नीची अमेरिकन औषधांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे, तिला काही मदत मिळू शकते का ? अशी विचारणा केली होती.
आनंदीबाई यांचा अमेरिकेला जाण्यासाठी खडतर प्रयत्न
डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना मदत मिळावी म्हणून, पत्राची बातमी एका लेखाद्वारे स्थानिक वर्तमानपत्रा छापली. न्यू जर्सी मधल्या रोशेल या गावातील, श्रीमती कार्पेटर यांना दंतचिकित्सकालयाच्या प्रतीक्षालयात मिशनरी नावाचे मासिक चाळताना, त्यात गोपाळराव जोशी व वाइल्डर यांची पत्रे दिसली.
याच कार्पेटरेटर बाईंनी पुढे पत्र व्यवहार करून, आनंदीबाईंशी आपलं नातं जोडलं. डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी त्यांना मावशी म्हणत, तर कार्पेटरेटर बाई आनंदीबाईंना आनंदाचा झरा म्हणत.
त्यांच्याच आधारावर आनंदीबाईंनी अमेरिकेत पाऊल टाकायचे नक्की केले. अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी पैशाची तरतूद होण्यास तसेच प्रवासात सोबत शोधण्यात, दोन-चार वर्ष गेले.
श्रीरामपूर बंगाल येथे गोपाळ रावांची नेमणूक असताना, आनंदीबाईंचे अमेरिकेला जायचे नक्की ठरले. तिथे जाऊन वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरले, या कालावधीत भारतात आनंदीबाईंना समाजाचे, शेजाऱ्यांचे, विपरीत अनुभव आले.
त्या गोपाळ रावांसोबत फिरायला जातात, इंग्रजी शिक्षण घेतात, याबद्दल कुतुहूल म्हणून त्या दोघांना पाहायला लोक गर्दी करायची. आनंदीबाईंना खूप अपमानास्पद शेरे ऐकवावे लागत, लोक त्यांच्या अंगावर थुंकत, परंतु तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या अभ्यासावर चित्त एकाग्र केले.
अमेरिकेला जाण्यापूर्वी श्रीरामपूर मधील कॉलेजच्या सभागृहात आनंद बाईंनी मी अमेरिकेस का जाते ? यावरती अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिल.
आनंदीबाई यांचा अमेरिकेचा प्रवास
१८८३ मध्ये दोन इंग्लिश स्त्रियांच्या सोबतीने कोलकत्ता ते न्यूयॉर्क दोन महिन्यांचा प्रवास जहाजणी करून, त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवले.
त्या शाहाकारी होत्या, त्यामुळे बोटीवर त्यांची उपासमार झाली. अमेरिकेतील वास्तव्यात पुढेही त्यांच्या प्रकृतीची फारशी हेळसांड झाली. परदेशी कपडे वापरायचे नाहीत, म्हणून त्या साडी नेसून, धाबळीचे जॅकेट घाली. त्यामुळे तेथील बर्फाळ थंडी त्यांचे शरीर चिरत राहिली.
आनंदीबाईंचे गुजराती पद्धतीने साडी नेसलेले, छायाचित्र प्रसिद्ध केले जाते. त्याबद्दल स्वतः आनंदीबाईंनी लिहिल आहे की, इथल्या अमेरिकेतील हवेत वारंवार फरक होत राहतो, नऊवारी साडी नेसल्याने, पाय थोडेसे उघडे पडतात. गुजराती पोशाख केल्याने डोक्याशिवाय सर्व शरीर झाकले जाते.
स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा, परक्या भूमीत परक्या लोकांसमवेत राहायचे, समाज नातलग यांनी दिलेली दुषणे सहन करायची, या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही आनंदीबाईंनी धीराने इच्छित कार्य करीत राहिल्या.
परंतु त्यांच्या मनावर तसेच शरीरावरही प्रतिकूल परिणाम होत होता, सतत अर्धपोटी राहिल्याने, त्यांच्या पाठीशी आजार पण लागली.
वयाच्या १९ व्या वर्षी आनंदीबाई यांनी मिळवली डॉक्टरेट पदवी
१९ व्या वर्षाच्या आनंदीबाईंनी पेनसिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण घेताना, आनंदीबाईंचे आरोग्य नेहमी बिघडायचे, पण त्यावर मात करत १८८६ मध्ये त्यांनी एम.डीची पदवी मिळवली.
प्राचीन हिंदू स्त्रियांच्या प्रस्तुती करणावर अभ्यास करून, आनंदीबाईंनी आपला प्रबंध पूर्ण केला. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरिया हिने अभिनंदनचा संदेश आनंदीबाईंना पाठवला होता. अमेरिकेतील समाज ही आनंदीबाईंशी दुष्टपणे वागत होता.
परंतु त्यांच्या कार्पेटरेटर बाईं आणि विद्यापीठाच्या अधिष्ठा श्रीमती रेचल बॉडले यांसारख्या यांसारख्या मदत करणाऱ्या स्त्रियांमुळे, त्यांना हा कालावधी थोडा सुसह्य झाला.
अमेरिकेच्या त्यांच्या मेडिकल कॉलेजने दि. ११ मार्च १९८६ रोजी फिलाडेल्फियाला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना वैद्यकीय विद्या पारंगत हा किताब दिला. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले.
आनंदीबाई यांची भारतात वापसी
दि १६ नोव्हेंबर १८८६ रोजी आनंदीबाई भारतात परतल्या. तेव्हा मुंबई बंदरावर लोकांनी गर्दी केली. त्यांचं पुष्प वृष्टीने स्वागत केलं.
नारायण पेठे काळी चंद्रकला खणाची चोळी, कपाळावर कुंकू, नाकात नथ, कानात कुडी, पायात बुत व स्कॉटिंग असा थाट होता, असे त्यावेळच्या त्यांच्या पोशाखाच वर्णन केलेल आहे.
आनंदीबाईंच्या संघर्षाची कथा
यमुनाचा, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी पर्यंतचा प्रवास हा फक्त सामाजिक, मानसिक, कौटुंबिक, आव्हानांचा नव्हता, तर तो समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा प्रमाणेच, आनंदीबाईंच्या आंतरिक शक्तीची परीक्षा पाहणारा हा त्यांचा लढा होता.
याची जाणीव अंजली कीर्तने यांच्या आनंदी जोशी ए टॉर्चबेअर या पुस्तकांमधून आपल्याला समजते. दोन शतका पूर्वीच शिक्षणाचे अत्यंत महत्त्व समजलेल्या मुलीचे स्वतंत्र अस्तित्व स्वीकारलेल्या, आनंदीबाईची कहाणी.
आनंदीबाईंच्या घरातील कर्ते म्हणजे तिचे वडील गणपत राव यांनी मुलीमध्ये ज्ञानार्जनाची आवड निर्माण करताना, त्यासाठीच्या संघर्षाचे लागणारे सामर्थ्यही त्यांनी तिच्यात पेरले व हे पेरलेले सामर्थ्य व ज्ञानाची वाढ ही आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांच्या सहकार्याने फुलले.
हे केवळ आनंदीबाईंचे चरित्र नाही, तर ब्रिटिशकालीन प्रथा, परंपरा, अनिष्ट चालीरीती, संस्कृती, समाज धारणा व पुरुष सत्ता समाजाचा आरसा आहे.
स्त्री ने शिक्षण घेऊन मोठे होणे व स्वतःचे नाव कमावणे, हे त्या काळच्या समाजामधील एक घोर अपराध समजण्याच्या कालावधीत, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा यमुना पासून डॉक्टर पर्यंतचा प्रवास हा अतिशय संघर्षमय लक्षवेधक व चित्त वेधक होता.
आनंदीबाई गोपाळराव जोशी मृत्यू
दुर्दैवाने डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांना क्षय झाला होता. बोटीवरही गोऱ्या डॉक्टरने, बिगर गौरवर्णीय म्हणून उपचार केला नाही. मायदेशी परतल्यावर, कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मध्ये, सध्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाताई राजे रुग्णालय मध्ये, आनंदीबाईची नेमणूक झाली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वीच, आनंदीबाई जोशींचे दि. २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले.
आनंदीबाईंच्या अस्थी अमेरिकेत श्रीमती कार्पेटर यांना देण्यात आल्या. कार्पेटर कुटुंबीयांनी आपल्या कुटुंबाच्या दफनभूमीत, त्यांचे लहानसे थडगे बांधले आहे. त्यांच्यावर आनंदीबाई जोशी एम.डी १८६५ ते १८८७ शिक्षण घेण्यासाठी, परदेशागमन करणारी पहिली भारतीय ब्राह्मण स्त्री, अशी अक्षरे कोरुन, आनंदीबाईंचे स्मारक बनवले आहे.
स्त्रियांसाठी भारतात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे, आनंदीबाईंचे स्वप्न त्यांच्या हयातीत भलेही साकार झाले नसेल, परंतु त्यांची जीवनगाथा प्रत्येक स्त्रीसाठी दीपस्तंभाचे काम करते आहे.
आनंदीबाई जोशी यांचा वारसा
- १८८८ मध्ये अमेरिकन स्त्रीवादी लेखिका कॅरोलीन वेल्स हीली यांनी आनंदबाईंचे चरित्र लिहिले.
- आनंदी गोपाळ या नावाची हिंदी मालिका दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली. या मालिकेचे दिग्दर्शन कमलाकर सारंग यांनी केले.
- तसेच श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांच्या आनंदी गोपाळ या मराठी कादंबरीमध्ये, आनंदीबाई जोशींची व गोपाळराव जोशी यांची जीवनकथा काल्पनिक रित्या रचली आहे. रामजी जोगळेकर यांनी त्यांच्या नाटकात आनंदी गोपाळ कादंबरीचे रूपांतर केले आहे.
- डॉक्टर अंजली किर्तन यांनी डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या जीवनावर आधारित, सखोल संशोधन केले व त्याचवेळी त्यांनी आनंदीबाईंच्या कर्तुत्वा विषयी डॉक्टर आनंदी जोशी काळ आणि कर्तृत्व हे मराठी पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकांमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत.
- लखनऊ मधील एका स्वयंसेवी संस्था रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन इन सोशल सायन्सेस, भारतातील वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी, तिच्या सुरुवातीच्या योगदानाची दखल घेऊन, आनंदीबाई जोशी यांच्या नावाने आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले होते.
- याव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या तरुणींसाठी, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या नावाने फेलोशिप स्थापन केली आहे.
- शुक्रावरील एका विवराला आनंदीबाई जोशी यांच्या नावाने जोशी असे नाव देण्यात आले आहे.
- २०१९ मध्ये आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित करण्यात आला आहे.
डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्याबद्दलची पुस्तके
- आनंदी गोपाळ – श्री.ज. जोशी यांनी लिहिलेली कादंबरी
- डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व (अंजली कीर्तने)
- आनंदी गोपाळ (मराठी नाटक, लेखक – राम जोगळेकर)
- कै.सौ. डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र – काशीबाई कानिटकर
डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्याबद्दल १० ओळी
- आनंदीबाई जोशी ह्या थोर विचारवंत, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
- आनंदीबाई जोशी यांचा जन्म दि. ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे झाला.
- आनंदीबाई यांचे पूर्वीचे नाव यमुना होते.
- त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव अमृतेश्वर जोशी असे होते.
- वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळ जोशी यांच्याशी झाला.
- आनंदीबाईंनी वैदिक शिक्षण घेण्यासाठी १८८३ मध्ये विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसील्व्हेया मध्ये प्रवेश मिळवला.
- आनंदीबाईंना या कार्यास समाजाकडून खूप विरोध झाला, पण तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे, पटवून दिले.
- अवघ्या अठराव्या वर्षाच्या असताना आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन कार्पेंटर पती-पत्नीच्या मदतीने, शिक्षणासाठी आपल्या पगारातून व काही वेळा खर्च काढून, जुना खस्ता खाऊन, शिक्षण पूर्ण केले.
- कष्टाच्या जोरावर आनंदीबाईंनी आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून, एम.डीची पदवी मिळवली.
- हिंदू आर्य लोकांमधील, प्रसुती शास्त्र या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला.
- डॉक्टर झाल्यावर राणी व्हिक्टोरिया हिने त्यांचे अभिनंदन केले.
- आनंदीबाईंना भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून ओळखतात.
- कोल्हापूर संस्थानांमध्ये त्यांना नोकरी मिळाली.
- दि २६ फेब्रुवारी १८८७ रोजी पुण्यामध्ये निधन झाले.
- त्यांचे अमेरिकेत कार्पेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात आनंदीबाईचे लहानसे थडगे बांधले.
- त्यावर आनंदी जोशी एक तरुण, हिंदू ब्राह्मण कन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री, अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक तयार केले.
आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल थोडक्यात सारांश
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. त्यांची पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते, जुन्या कल्याण परिसरातील पार नाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून वीस वर्षांनी मोठे असणाऱ्या, गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर येथील रहिवासी होते.
त्यांनी आपल्या पत्नीचे नाव आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे, मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर, तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.
गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसच कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नीला स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत,
गोपाळराव हे आपल्या पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल बडबड करीत असत. कारण आनंदीबाई यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे, असा त्यांचा आग्रह होता.
ते स्वतः लोकहितवादी शतपत्र आहे हे गोपाळ रावांना कळल्यावर, लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले.
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळ रावांनी अमेरिकेत काही पत्र व्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे ह्या जोडप्याला मान्य नव्हते.
पुढे गोपाळ रावांच्या चिकाटीमुळे, आनंदीबाईंच्या ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ इंडिया मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यावर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवास यामुळे आनंदीबाईची प्रकृती खूप डासाळली होती.
आनंदीबाईंनी कोलकाता येते एक भाषण केले, तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे, याचे प्रतिपादन केले आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर करण्याची काहीच गरज नाही.
मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापी त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर, भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.
आनंदीबाईचे भाषण लोकांना खूपच आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच, पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली.
भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला. कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षात पूर्ण करून, मार्च इसवी सन १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी ची पदवी मिळवली.
एम.डी साठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी झाल्यावर व्हिक्टोरिया राणी कडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळ रावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते.
पंडिता रमाबाई यांनी सुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी झाल्यावर आनंदीबाई भारतात आल्यावर, त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मधील स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला.
लहान वयातच त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे दि. २६ फेब्रुवारी इसवी सन १८८७ मध्ये त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.
FAQ
१. पहिली महिला डॉक्टर कोण होती?
आनंदीबाई जोशी ह्या थोर विचारवंत, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.१९ व्या वर्षाच्या आनंदीबाईंनी पेनसिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण घेताना, आनंदीबाईंचे आरोग्य नेहमी बिघडायचे, पण त्यावर मात करत १८८६ मध्ये त्यांनी एम.डीची पदवी मिळवली. प्राचीन हिंदू स्त्रियांच्या प्रस्तुती करणावर अभ्यास करून, आनंदीबाईंनी आपला प्रबंध पूर्ण केला.
२. आनंदीबाईंचे लग्न कधी झाले?
आनंदीबाई यांच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.
३. आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा मृत्यू कसा झाला?
आनंदीबाई यांना क्षय झाला होता. बोटीवरही गोऱ्या डॉक्टरने, बिगर गौरवर्णीय म्हणून उपचार केला नाही. मायदेशी परतल्यावर, कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मध्ये, सध्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाताई राजे रुग्णालय मध्ये, आनंदीबाईची नेमणूक झाली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वीच, आनंदीबाई जोशींचे दि. २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले.
४. आनंदीचा नवरा कोण होता?
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळ राव जोशी यांच्याशी झाला.
५. कोण आहेत आंनदीबाई जोशी ?
आनंदी बाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. अंदाजे १५० वर्षांपूर्वी या स्त्रीने चक्क अमेरिकेत सात समुद्राच्या पार जाऊन, डॉक्टरची पदवी मिळवली आणि ती सुद्धा फक्त वयाच्या २१ व्या वर्षी. त्या काळात सावित्रीबाईंनी जरी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली तरी सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे, स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात होते. फक्त चूल आणि मूल एवढेच त्यांचे काम अशी समजूत असताना, आनंदीबाई यांनी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाल्या.
६. आनंदीबाई यांनी डॉक्टर होण्याचे का ठरवले ?
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या चौदाव्या वर्षी एका मुलीस जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने, तो केवळ दहाच दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यासाठी कारणीभूत ठरली.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास भारतातीली पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ राव जोशी यांच्या बद्दल माहिती दिली आहे.
केवळ एकवीस वर्षाच्या जीवन यात्रेत, आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवन आदर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा उपयोग जनतेला होऊ शकला नाही, मात्र चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना, त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच, आनंदी गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी, झटत होते.
जिद्द आणि चिकाटी असेल तर, कोणतेही काम अशक्य नाही, हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले, असे म्हणता येऊ शकेल. समाजात राहून काम करायचे तर, अडथळे तर येणारच. आनंदीबाई यांनी चिकाटीने व कष्ट करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्या संपूर्ण भारतात पहिल्या महिला डॉक्टर बनल्या त्याच्या कार्याला व त्यांना कोटी कोटी नमन.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा, धन्यवाद.