भंडारदरा पर्यटन संपूर्ण माहिती : Bhandardara Information in Marathi – महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले भंडारदरा हे निसर्गसौंदर्याचे एक अप्रतिम ठिकाण आहे, जे तेथे जाणाऱ्या सर्वांना मोहित करते. येथील शांत परिसर, हिरवीगार जंगले, धबधबे आणि निर्मळ तलावांनी नटलेला निसर्ग पर्यटकांना नेहमीच साद घालतो. भंडारदराचा मुकुट रत्न म्हणजे आर्थर सरोवर, ज्याचे लखलखणारे पाणी आजूबाजूच्या हिरवाईला प्रतिबिंबित करते. शांत वातावरण आणि विस्मयकारक दृश्ये भंडारदरा निसर्गाच्या अमर्याद वैभवात निवंतपणा शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे.
भंडारदरा पर्यटन संपूर्ण माहिती : Bhandardara Information in Marathi
भंडारदरा, पश्चिम घाटामध्ये स्थित असलेला हा एक सुंदर गाव असून त्याला लाभलेल्या प्रेक्षणीय स्थळांमुळे प्रसिद्ध असून हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले या तालुक्यात, प्रवरा नदीच्या काठी वसलेले आदिवासी महादेव कोळी जमातींचे गाव आहे. या ठिकाणी आपल्याला डोंगरकडे, धबधबे आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. आम्ही आमच्या लेखातून आपणास भंडारदरा माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

भंडारदरा पर्यटन संपूर्ण माहिती
स्थान – | भंडारदरा |
जवळची नदी – | प्रवरा नदी |
तालुका – | अकोले |
जिल्हा – | अहमदनगर |
राज्य – | महाराष्ट्र |
वैशिष्ट्य – | पर्यटन स्थळ |
प्रेक्षणीय स्थळे – | ऑर्थर तलाव, अमृतेश्वर मंदिर, रतनगड किल्ला, अम्ब्रेला धबधबा, विल्सन धरण |
स्थानिक रहिवाशी | आदिवासी कोळी महादेव जमात |
भंडारदरा माहिती नकाशा
भंडारदरा जवळील प्रेक्षणीय स्थळे
अगस्ती ऋषी आश्रम (Agasti Rushi Mandir Bhandardara)

अमृतवाहीनी प्रवरा नदी किनारी श्री अगस्ती ऋषींचा अत्यंत पुरातन आश्रम आहे. अहमदनगर जिल्यातील अकोले या तालुक्याचे ठिकाणापासून नैऋत्य दिशेला २ किमी अंतरावर हे अत्यंत रमणीय व प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणी रात्री राहण्याचीही सोय आहे. येथून पश्चिमेला ५० किमी अंतरावर शिखर कळसूबाई, अलंग, मलंग, रतनगड, साम्रदची जगप्रसिध्द सांधनदरी, हरिश्चंद्रगड, फोफसंडी, विश्रामगड तर पूर्वेला ६५ किमी अंतरावर साईबाबांची शिर्डी आहे.
अगस्ती ऋषी आश्रम हे येथील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा आश्रम इतिहास प्रेमी व निसर्गप्रेमी यांना नेहमीच भुरळ घालत असतो. रावणाचा वध करणारा बाण रामाला भेट देणारे ऋषि अगस्ती मुनी हे होते. यांनी या ठिकाणी वर्षभर हवा व पाणी यावर राहून ध्यान केले असे म्हटले जाते. भंडारदरापासून अगस्ती ऋषी आश्रम हे ४० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
घाटघर आणि कोकणकडा

कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे “इंद्रव्रज” दिसल्याची नोंद आहे. इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. येथील निसर्गसौंदर्यावर लुब्ध होऊन एका तरुणाने या कड्यावरून उडी घेतली त्याच्या नावाची संगमरवरी पाटी येथे आहे.
घाटघर हे ठिकाण येथील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. शेंडी या गावापासून २२ किलोमीटर अंतरावर निसर्ग सौंदर्याने भरून गेलेले घाटघर हे गाव आहे. या ठिकाणी कोकणकडा हा प्रसिद्ध असून, कोकण व सह्याद्री पर्वतरांगेंचे विलोभनीय दृश्य ह्या कड्यावरून दिसते. त्याचप्रमाणे या ठिकाणी घाटनदेवीचे मंदिर आहे जी महादेव कोळी समाजाची कुलदैवत आहे.
हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा येथील भेट देणाऱ्या ठिकाणांपैकी एक आश्चर्यकारक ठिकाण आहे. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण व आकर्षक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. हा किल्ला मराठा शासकांच्या स्वाभिमानाचा गौरव आहे. हरिश्चंद्रगड ट्रेक हा एक कठीण ट्रेक म्हणून समजला जातो. जो साहासी पर्यटन प्रेमींना स्वतःकडे आकर्षित करतो. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची ही ४००० फुट इतकी आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक Harishchandragad Fort या ठिकाणी येतात.
रतनगड किल्ला

रतनगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला हा एक डोंगरी किल्ला आहे. हा प्राचीन व ऐतिहासिक किल्ला असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४२५० फुट इतकी आहे. हा किल्ला बराच प्रचंड असून अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. हा किल्ला सुमारे 400 वर्षे जुना आहे. नोव्हेंबरमध्ये हा किल्ला अनेकदा फुलांच्या झाडांनी झाकलेला असतो. रतनगडाला सह्याद्रीचे रत्न असेही म्हणतात. गडाच्या माथ्यावरून शेजारील अलंग, कुलंग, मदन गड, हरिश्चंद्रगड, पट्टा असे किल्ले सहज दिसतात.
रतनगड किल्ल्यावर एक नैसर्गिक शिलाशिखर आहे ज्यामध्ये वरच्या बाजूला पोकळी आहे ज्याला ‘नेधे’ किंवा ‘आय ऑफ द नीडल’ म्हणतात. गडाला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक असे चार दरवाजे आहेत. मुख्य गेटवर गणेश आणि हनुमानाची शिल्पे दिसतात. त्याच्या वरच्या बाजूला अनेक विहिरी देखील आहेत. महाराष्ट्रातील बरेच इतिहास प्रेमी, ट्रेकर व पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. रतनवाडी या गावापासून हा किल्ला ५ ते ६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे व रतनवाडी हे भंडारदरापासून साधारणतः १५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
गडावर अनेक दगडी पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी काही वर्षभर पिण्यायोग्य पाणी साठवतात. डोंगराच्या माथ्यावर एक नैसर्गिक छिद्र आहे बहुधा वाऱ्याच्या धूपामुळे. ते 10 फूट उंच आणि 60 फूट रुंद आहे. त्याच्या आकारामुळे त्याला नेधे (किंवा मराठीत सुईचा डोळा) म्हणतात.किल्ल्याच्या पूर्वेला दोन गुहा आहेत, ज्याचा वापर रात्रीच्या मुक्कामासाठी करता येतो. या किल्ल्याला वर्षाच्या कोणत्याही भागात भेट दिली जाऊ शकते,
अमृतेश्वर मंदिर

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला या तालुक्यातील रतनवाडी गावामध्ये अमृतेश्वर हे मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्य शैलीचे हे एक पुरातन मंदिर आहे. महाराष्ट्रातील शिलाहार घराण्याच्या राजवटीत हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रात बनवलेले सुंदर दगडी कोरीव शिवमंदिर इ.स. 900. झांज राजाने बांधलेल्या १२ शिवमंदिरांपैकी हे एक आहे. या मंदिरात वापरल्या गेलेल्या बहुतेक दगडी कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर प्रवरा नदीच्या काठावर आहे. Amruteshwar Temple Bhandardara हे मंदिर भगवान शिवशंभूंचे आहे. काळया दगडाचे हे मंदिर अतिशय सुंदर असून हे मंदिर भांडारदरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.
भैरवगड दुर्ग शिरपुंजे

महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी २ भैरवगड हे हरिश्चंद्रगड पर्वतरांगेत आहेत. कोथळ्याचा भैरवगड आणि शिरपुंज्याचा भैरवगड. भैरवनाथ/भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे येथे अश्विन महिन्यात यात्रा भरते. शिरपुंजे गावातून ५०० मीटर उंचीवर भैरववगडाचे मंदिर आहे आणि पुर्ण वाट खडी चढण आहे. वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्या आहेत. या पाय वाटेने एक ते सव्वा तासात भैरवगड आणि घनचक्कर डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो.
कातळात कोरलेल्या पायर्या चढुन आपण भैरवगड पठारावर येतो. गडावर मोठा पाणी साठा आहे. गडावर एकुण २३ टाके आहेत पण त्यातील २ ते ३ टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पावसाळ्यात सर्व पाणी टाके भरलेले असतात. काही टाक्याच्या बाजुला रांजण खळगे कोरलेत. Bhairavgad Fort वर काही ठिकणी विरगळी पाहायला मिळतात. कातळात खोदलेल्या पायर्या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या जोड गुहेत जाता येते. गुहेत भैवनाथाची अश्वारुढ मुर्ती आहे
ऑर्थर तलाव

प्रवरा नदीवर ब्रिटिश काळात ऑर्थर तलाव बांधले गेले असून आता ते एक पर्यटन स्थल म्हणून विकसित झाले आहे. मित्रांसमवेत व परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. ऑर्थर तलावावर आपल्याला कॅम्पिंग ,बोटिंग,व फोटोशूटचा मनमुराद आनंद घेता येईल. निसर्गाच्या कुशीत लपलेला या तलावावर आपल्याला स्थलांतरित पक्षांची झलक पाहायला मिळते. भंडारदरापासून हे Arthur Lake Bhandardara साधारणतः ४ किलोमीटर अंतरावर आहे.
वसुंधरा धबधबा, कोलटेंभे

रतनगड किल्ल्याजवळील वसुंधरा धबधबा हा सर्वात सुंदर धबधबा आहे यात शंका नाही. हे कोलटेंभे धबधब्याशेजारी कोलटेंभे गावात आहे. धबधब्याची उंची इतरांपेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे त्याचीही जोखीम आहे पण परिसर मोठा आहे त्यामुळे आपण धबधब्याचा कोणताही धोका न घेता आनंद घेऊ शकतो. नाशिकमधील एक मोठा धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांसाठी योग्य ठिकाण. थोडक्यात, मित्र आणि कुटुंबासह जाण्याचे सुंदर आणि आनंददायक ठिकाण म्हणजे Vasundhara Waterfall Bhandardara
अम्ब्रेला धबधबा

अम्ब्रेला धबधबा हा महाराष्ट्रातील सुंदर धबधब्यांपैकी एक समजला जातो. हा एक हंगामी धबधबा आहे. भंडारदरा धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.बाजूला असलेल्या पुलावरून आपल्याला या धबधब्याचे संपूर्ण दर्शन घडून येते. भंडारदरा या बस स्थानकापासून हा धबधबा फक्त ५०० मीटर इतक्या अंतरावर आहे.
कळसुबाई शिखर

कळसुबाई सह्याद्री पर्वत रांगेतील एक सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे याला महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट असे देखील म्हटले जाते. हे ठिकाण बऱ्याच निसर्गप्रेमींना आकर्षित करते. कळसुबाई शिखराचे ट्रेकिंग करतेवेळी आजूबाजूचे किल्ले, हिरवागार परिसर व विहंगम दृश्यांचा आनंद घेता येतो. कळसुबाई हे शिखर ५४०० फुट इतक्या उंचीवर आहे. भंडारदरापासून हे शिखर साधारणतः १५ इतक्या अंतरावर आहे.
कळसुबाई हे अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने आजूबाजूचा परिसर संरक्षित मानण्यात येतो. या टेकड्यांच्या चारही बाजूने असलेल्या जंगलामध्ये वेगवेगळ्या पशुपक्षी, कीटक आणि सांप वस्ती आहे. पावसाळ्यानंतर हा प्रदेश वेगवेगळ्या फुलांनी, पक्षांनी, फुलपाखरांनी ओसंडून वाहत असतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सरडे, साप, फुलपाखरे, कीटक, मॉथ यांचे निरीक्षण करण्यासाठी पर्यावरण प्रेमी या ठिकाणाला भेट देतात.
रंधा धबधबा

भंडारदर्यातील प्रेक्षणीय स्थळांमध्ये रंधा धबधबा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये हा धबधबा आहे. रंधा धबधबा हा महाराष्ट्राला मिळालेली एक देणगीच आहे. भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. Randha Waterfall Bhandardara म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत २० कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव अन त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू, तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते.
पावसाळ्याच्या वेळी हा धबधबा जोरात खाली झेपावत असतो. त्यावेळी ते दृश्य पाहणे म्हणजे मनाला शांती देऊन जाते. पावसाळ्यामध्ये या धबधब्याला पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी पाहायला मिळते. भंडारदरापासून हा धबधबा साधारणतः ७ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
भंडारदरा धरण

या जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. Bhandardara Dam हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले.
हे धरण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. आशिया खंडातील सर्वात जुने असलेले हे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे. भंडारदरा या धरणाला विल्सन धरण या नावाने देखील ओळखले जाते. या धरणाचे खरे सौंदर्य पावसाळ्यात व हिवाळ्याच्या सुरुवातीला पाहायला मिळते. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडारदरा धरणाला भेट द्यायला पर्यटक येत असतात. खरोखरच धरणाचा परिसर हा अतिशय स्वच्छ व नयनरम्य आहे.
पाबरगड दुर्ग

बसस्टँडवर जलाशयाच्या दिशेला तोंड करून उभं राहिल्यावर समोरचं क्षितीज आपल्या अजस्त्र कातळभिंतीने अडवणारा मोठा डोंगर दिसतो. हा डोंगर म्हणजेच दुर्ग पाबर. रंधा धबधब्याकडे जाताना पाबरच्या उत्तर शेपटाला वळसा मारुनच जावं लागतं. रतनगडाकडे जाण्याचा गाडीरस्तादेखील याच्या कुशीतूनच आहे. आपल्या चढाईच्या क्षमतेचा कस जोखायचा असेल तर पाबरच्या तिन छोट्या टप्प्यातल्या खड्या चढणीची मजा कधीतरी घ्यायलाच हवी. इथून पालिकडच्या भंडारदरा जलाशयाचं साम्राज्य दृष्टीपथात येतं. भंडारदरा धरणाचा आवाका नीट जवळून पहायचा असेल तर पाबरच्या चढाईशिवाय कुठल्याही डोंगराचा पर्याय नाही.
डोंगरधारेवर स्वार होऊन डोंगरटोकाकडे चढाई सुरू ठेवायची. नाकपुड्या फुलवणारा हा मुरमाड चढ १५ मिनीटांत उरकायचा. वर आल्यावर समोरच उभ्या ठाकलेल्या कातळभिंतीला डावीकडे ठेवत पुढे जाणारी छोटीशी पायवाट पाबरच्या दिशेने जाते आणि डावीकडे खाली जाणारी वाट तळात दिसणाऱ्या तेरुंगण गावात उतरते. आपण पाबरच्या दिशेने जाणाऱ्या सरळ वाटेने जात डावीकडच्या कातळभिंतीचा डोंगर आणि पाबर यांच्यामधील खिंड १५ मिनिटांत गाठायची. खिंडीतून सुरूवातीला एक सोपा कातळ टप्पा चढून वर येतांना खोदीव पायऱ्या आढळतात. इथून पुढे कारवीच्या झुडूपांतून जाणारा खड्या चढणीच्या वाटेचा टप्पा चढून १५-२० मिनिटात पाबर माथ्याच्या खाली आपण पोहोचतो.
इथून डावीकडे वर चढणारी वाट माथ्याकडे जाते. त्या वाटेने जाण्यापूवीर् उजवीकडची वाट पकडून थोडं पुढे गेलं की दोन गुहा लागतात. पैकी पहिली गुहा मुक्कामाला एकदम झकास आहे. समोर पसरलेला विस्तीर्ण विल्सन जलाशय, बॅकफूटला उभी असलेली कळसूबाई रांग आणि थंडगार वाऱ्याची पाबरबरोबर सुरू असलेली दंगामस्ती! अगदी रतनगडावरील गुहेतल्या मुक्कामाची आठवण करून देणारा हा स्पॉट आहे. शेजारच्या गुहेत पाणी आहे; पण शेवाळलेलं. काही खोदीव पायऱ्या चढून माथ्यावर येताना डावीकडील सपाटीवर एक लांबलचक मोठं पाण्याचं टाकं खोदलेलं दिसतं. यातलं पाणी पिण्यायोग्य आहे.
टाकं पाहून माथ्यावर आलं की आणखी एक छोटी टेकडी अजूनही माथा थोडा उंच आहे, हे दाखवत उभी दिसते. तिच्या दिशेने गेल्यावर पायथ्याशी भैरोबाचं छपराविना असलेलं मंदिर दिसतं. दोनेक फूट उंचीचं दगडी जोतं शिल्लक असलेल्या या मंदिरात भैरोबाचा शेंदूर लावलेला तांदळा व एक गणेशमुतीर् दिसते. मंदिराला लागूनच पाण्याची चार खोदीव टाकं आहेत. शेजारी आणखी एक कोरडं बुजलेलं टाकं दिसतं. इथून आता सवोर्च्च माथ्याकडे चढायला लागायचं. टेकडीच्या या लहानशा सपाटीवर आणखी एक देवाचं ठाणं आहे. या माथ्यावरून दिसणारा सभोवताल तर केवळ अप्रतिम आहे.
पश्चिमेला रतनगड, नैऋत्येला घनचक्कर, वायव्येला कळसूबाई रांग आणि जलाशय दिसतो. आता या माथ्यावरून दक्षिणेला खाली दिसणाऱ्या दोन टाक्यांच्या दिशेने पाच मिनिटांत उतरायचं. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. थोडं पुढे जोत्यांचे अवशेष दिसतात. मागे येऊन पश्चिमेकडे निघालं की आणखी दोन टाकं दिसतात. पश्चिमेला गडाचं आणखी एक शेपूट दिसतं. त्या भागावरील दोन खोदीव टाकं लांबूनही दिसतात. तिथे जायला थोडं खाली उतरायचं. गडाचा हा भाग व पाबर गड यांना जोडणाऱ्या ठिकाणी एक नैसगिर्क कातळखिंड तयार झाली आहे. पश्चिम टोकावरील टाकी आणि तिथून दिसणारा पाबरचा राकट पसारा न्याहाळून पुन्हा आपल्या वाटेला येऊन मिळायचं. ही वाट कड्याला उजवीकडे ठेवत लगटून पुढे जाते. वाटेत कड्यामध्ये खोदलेलं चांगल्या पाण्याचं आणखी एक टाकं दिसतं. या टाक्यावर मारुतीचं शिल्प कोरलेलं आहे.
या हनुमान टाक्यापासून पुढे सरकत आणखी एका कोरड्या टाक्याला भोज्या करत ही पायवाट आपल्याला भैरोबाच्या मंदिराजवळ आणून सोडते. इथे आपली गडफेरी पूर्ण होते. इतिहासात पाबर दुर्गाचा कुठेही उल्लेख सापडत नाही. मात्र खोदीव पायऱ्या, टाकी गडाचं प्राचीनत्व दाखवतात. माथ्यावरून परिसर निरखताना टेहळणीसाठी Pabargad Fort Bhandardaraचं स्थान महत्त्वाचं असेल हे पटतं.
भंडारदरा संपूर्ण माहिती व्हिडिओ
भंडारदरा मध्ये करण्यासारख्या गोष्टी (Things To Do At Bhandardara)
विल्सन धरणावर तुम्ही पिकनिक नियोजित करू शकता, कॅम्पिंग करू शकता, आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकता. त्याचप्रमाणे साईट सीइंग देखील करू शकता.
अम्ब्रेला धबधबा या धबधब्याजवळ तुम्ही साईटसीइंग, तसेच निसर्गातील सुंदर निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
रंधा धबधबा या ठिकाणी तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन कायाकिंग, कॅम्पिंग इत्यादींचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
ऑर्थर तलाव या ठिकाणी तुम्ही बोटिंग, कॅम्पिंग ,फोटोशूट, साईटसीइंग, व निसर्ग रम्य निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उच्च असणाऱ्या शिखराची ट्रेकिंग करणे, तसेच आजूबाजूचे किल्ले निसर्गरम्य वातावरण न्याहळणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
अगस्त ऋषी आश्रम मध्ये तुम्ही विविध प्रकारचे साईट सीइंग करु शकता.
रतनवाडी किल्ल्याची तुम्ही ट्रेकिंग करू शकता व आजूबाजूचा सुंदर निसर्गरम्य परिसर न्याहाळू शकता.
भंडारदरा काजवा महोत्सव (Bhandardara Fireflies Festival)

रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे हे सगळ्यांनाच आकर्षित करतात. या ठिकाणी काजवा महोत्सव साजरा केला जातो. तुम्ही पावसाळ्याच्या पूर्वी काजवा महोत्सव पाहण्यासाठी भंडारदरा या ठिकाणी भेट देऊ शकता. जर तुम्हाला शहराच्या प्रकाश आणि प्रदूषणापासून दगदगीच्या आयुष्यातून एक शांत अनुभव घ्यायचा असेल, काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल व काजवा महोत्सव या उत्सवामध्ये भाग घ्यायचा असल्यास तुम्ही देखील Bhandardara Fireflies Festival मध्ये सहभागी होऊ शकता.
भंडारदरा येथील नागझिरा वन्यजीव अभयारण्य (Nagzira Wildlife Sanctuary Bhandardara)
गोंदिया व भंडारदरा जिल्ह्याच्या दरम्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. हे एक विलोभनीय, सुंदर हिरवेगार अभयारण्य आहे. विविध वन्य प्राण्यांच्या जाती प्रजातींसाठी नागझिरा वन्यजीव अभयारण्य ओळखले जाते. हे अभयारण्य हल्लीच्या काळात प्रतिष्ठित टायगर उपक्रमाचा एक भाग बनले आहे. या ठिकाणी जंगलामध्ये जर तुम्हाला सैर करायची असेल तर जीप किंवा हत्तीच्या पाठीवर बसून तुम्ही Nagzira Wildlife Sanctuary ची सैर करू शकता.
या अभयारण्यामध्ये तुम्हाला वाघांव्यतिरिक्त पँथर, बायसन, सॉल्ट बेअर, नीलगाय, चितळ, रान डुक्कर, जंगली कुत्रा, पाम सिव्हेट, फ्लाईंग सक्वीरल इत्यादी प्रकारच्या जाती प्रजातींचे प्राणी आढळून येतात.
मुख्य शहर ते भंडारदरा अंतर व लागणारा कालावधी
मुंबई ते भंडारदरा अंतर व लागणारा कालावधी – मुंबई ते भंडारदरा हे अंतर अंदाजे १६६ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी ४ तास २४ मिनिटे लागू शकतात.
पुणे ते भंडारदरा अंतर व लागणारा कालावधी – पुणे ते भंडारदरा हे अंतर साधारणतः १६८ किलोमीटर असून, प्रवासासाठी ४ तास ३४ मिनिटे लागू शकतात.
कालावधी/दिवस – भंडारदरा एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला साधारणतः २ ते ३ दिवस लागू शकतात.
भंडारदरा येथील हवामान
या ठिकाणी वार्षिक सरासरी तापमान हे साधारणतः २४.१ डिग्री सेल्सियस आहे.
- हिवाळा – हिवाळ्याच्या काळामध्ये भंडारदरा मधील तापमान हे कमी असून साधारणतः १२ डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते.
- उन्हाळा – भंडारदरामध्ये उन्हाळ्याच्या वेळी तापमान हे अतिप्रकर व उष्ण असते. व तापमान हे साधारणतः ३० डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते.
- पावसाळा – भंडारदरा या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्यमाने साधारणतः ११३४ मिलिमीटरच्या आसपास असते.
भंडारदर्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी (Best Time To Visit Bhandardara)
भंडारदराला भेट देण्यासाठी पावसाळा हा उत्तम महिना आहे. या महिन्यांमध्ये तुम्ही आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. काजवा महोत्सव साजरा करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीचा काळ हा सर्वोत्तम असतो.
भंडारदरा या ठिकाणी कसे जाल ? (How To Reach Bhandardara)
भंडारदरा या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता – रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग.
रस्ते मार्ग – भंडारदराला जाण्यासाठी तुम्ही रस्ते मार्गाचा अवलंब करू शकता. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस सेवा देखील उपलब्ध आहे. या बसेसच्या माध्यमाद्वारे देखील तुम्ही भंडारदराला भेट देऊ शकता.
रेल्वे मार्ग – भंडारदराला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे अहमदनगर आहे. रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बसने किंवा ऑटो, कॅब बुक करून भंडारदरा या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊ शकता.
हवाई मार्ग – भंडारदरामध्ये कोणतेही विमानतळ नाही. परंतु औरंगाबाद, पुणे किंवा शिर्डी हे भंडारदरा पासून जवळचे असलेले विमानतळ आहेत.
भंडारदराजवळ राहण्याची सोय
भंडारदरामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्य ते रूम्स व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यापैकी काही हॉटेल्स खालील प्रमाणे –
- हॉटेल रत्नाई – भंडारदरा मधील हॉटेल रत्नाई हे एक प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवणाची तसेच राहण्याची उत्तम सोय केली जाते. विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग एरिया, नाश्त्याची सुविधा इत्यादी सोयी या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत.
- हॉटेल वसंतसुत – भंडारदरा मधील हॉटेल वसंतसुत हे एक प्रसिद्ध हॉटेल आहे. या ठिकाणी तुमची उत्तम जेवणाची तसेच राहण्याची सोय केली जाते. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला योग्यरीतीने रूम उपलब्ध करून दिले. विनामूल्य वायफाय,विनामूल्य पार्किंग एरिया, तसेच विनामूल्य नाश्त्याची सोय देखील केली जाते.
- भंडारदरा कॅम्पिंग व हॉटेल – या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंग करू शकता व आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर न्याहाळू शकता. त्याच प्रकारे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला विविध रूम उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग एरिया इत्यादी सोई सुविधा दिला जातात.
- हॉटेल चैतन्य – हॉटेल चैतन्य हे भंडारदरा मधील अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग एरिया इत्यादीची सोयी सुविधा दिली जाते.
- हॉटेल न्यू समाधान – हे उत्तम व बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता. तसेच तुमची जेवणाची व खाण्याची उत्तम सोय देखील केली जाते.
FAQ
भंडारदरा भेट देण्यासारखे आहे का?
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले भंडारदरा हे निसर्गसौंदर्याचे एक अप्रतिम ठिकाण आहे जे तेथे जाणाऱ्या सर्वांना मोहित करते. येथील शांत परिसर, हिरवीगार जंगले, धबधबे आणि निर्मळ तलावांनी नटलेला निसर्ग पर्यटकांना नेहमीच साद घालतो.
भंडारदरा किंवा महाबळेश्वर यापैकी काय निवडावे ?
भंडारदरा किंवा महाबळेश्वर यापैकी भंडारदरा हा चांगला पर्याय असू शकतो. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले भंडारदरा हे निसर्गसौंदर्याचे एक अप्रतिम ठिकाण आहे जे तेथे जाणाऱ्या सर्वांना मोहित करते. येथील शांत परिसर, हिरवीगार जंगले, धबधबे आणि निर्मळ तलावांनी नटलेला निसर्ग पर्यटकांना नेहमीच साद घालतो.
भंडारदरा धरण कोणी बांधले?
भंडारदरा धरण हे भारतातील पश्चिम घाट प्रदेशात प्रवरा नदीवर ब्रिटीश राजवटीत बांधले गेले. भंडारदरा या धरणाला विल्सन धरण या नावाने देखील ओळखले जाते. या धरणाचे खरे सौंदर्य पावसाळ्यात व हिवाळ्याच्या सुरुवातीला पाहायला मिळते.
भंडारदरा येथे कॅम्पिंगला परवानगी आहे का?
होय. विल्सन धरण अर्थात भंडारदरा धरणावर तुम्ही पिकनिक नियोजित करू शकता, कॅम्पिंग करू शकता, आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकता. त्याचप्रमाणे साईट सीइंग देखील करू शकता. भंडारदराच्या अम्ब्रेला धबधबा या धबधब्याजवळ तुम्ही साईटसीइंग, तसेच निसर्गातील सुंदर निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. रंधा धबधबा या ठिकाणी तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन कायाकिंग, कॅम्पिंग इत्यादींचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
भंडारदरा धरण कोणत्या प्रकारचे धरण आहे?
1910 मध्ये बांधलेले विल्सन धरण हे ब्रिटिश राजवटीत बांधले गेलेलेल भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. भंडारदरा या धरणाला विल्सन धरण या नावाने देखील ओळखले जाते. या धरणाचे खरे सौंदर्य पावसाळ्यात व हिवाळ्याच्या सुरुवातीला पाहायला मिळते.
नागझिरा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे ?
गोंदिया व भंडारदरा जिल्ह्याच्या दरम्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. हे एक विलोभनीय, सुंदर हिरवेगार अभयारण्य आहे. विविध वन्य प्राण्यांच्या जाती प्रजातींसाठी नागझिरा वन्यजीव अभयारण्य ओळखले जाते. हे अभयारण्य हल्लीच्या काळात प्रतिष्ठित टायगर उपक्रमाचा एक भाग बनले आहे. या ठिकाणी जंगलामध्ये जर तुम्हाला सैर करायची असलं तर जीप किंवा हत्तीच्या पाठीवर बसून तुम्ही सैर करू शकता.
भंडारदरा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ?
भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. भंडारदरा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे.
भंडारदराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना किंवा कालावधी कोणता?
भंडारदराला भेट देण्यासाठी पावसाळा हा उत्तम महिना आहे. या महिन्यांमध्ये तुम्ही आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. भंडारदरा मधील काजवा महोत्सव साजरा करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीचा काळ हा सर्वोत्तम असतो.
भंडारदर्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कोणते?
भंडारदराला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे अहमदनगर आहे. रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बसने किंवा ऑटो, कॅब बुक करून भंडारदरा या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊ शकता.
नागझिरा वन्यजीव अभयारण्य मध्ये आढळणाऱ्या वन्य प्राणी कोणते ?
या अभयारण्यामध्ये तुम्हाला वाघांव्यतिरिक्त पँथर, बायसन, सॉल्ट बेअर, नीलगाय, चितळ, रान डुक्कर, जंगली कुत्रा, पाम सिव्हेट, फ्लाईंग सक्वीरल इत्यादी प्रकारच्या जाती प्रजातींचे प्राणी आढळून येतात.
भंडारदरामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य किती होतो?
भंडारदरा या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्यमाने साधारणतः ११३४ मिलिमीटर च्या आसपास असते.
निष्कर्ष
आम्ही आमच्या Bhandardara in Marathi ह्या लेखाद्वारे भंडारदरा मधील प्रेक्षणीय स्थळे, कसे जायचे, काजवा महोत्सव, इत्यादींबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद.