चंद्रशेखर आझाद माहिती मराठी | Chandrashekhar Azad Information In Marathi

Chandrashekhar Azad Information In Marathi | चंद्रशेखर आझाद माहिती मराठी – “शत्रूंच्या गोळ्यांचा सामना आम्ही करू. आम्ही आझाद आहोत, आणि आझादच राहू.” असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद हे एक महान व थोर क्रांतिकारक होते. यांचा स्वभाव हा अतिशय उग्र व रागिष्ट होता. लहानपणापासूनच आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून वाचवून, स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी प्रत्येक क्रांतिकारी कार्यामध्ये ते अभिमानाने सहभाग दर्शवत. आजीवनभर इंग्रजांना भारत देश देणार नाही, अशी त्यांनी शपथ घेतली होती.

अशा महान क्रांतिकारकाने शेवटच्या श्वासापर्यंत भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी, अतोनात प्रयत्न केले. परंतु अखेरच्या वेळी इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद यांना घेरून, त्यांच्यावरती गोळ्या झाल्या. अशा महान व थोर क्रांतिकारकाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या शूरवीर क्रांतिकारकाबद्दल माहिती सांगणार आहोत. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचावा.

Table of Contents

Chandrasekhar Azad Information In Marathi : चंद्रशेखर आझाद माहिती मराठी

चंद्रशेखर आझाद परिचय (chandrashekhar azad jivan parichay)

पूर्ण नाव पंडित चंद्रशेखर सिताराम तिवारी
ओळख चंद्रशेखर आझाद
जन्मतारीख २३ जुलै १९०६
जन्मस्थळ भाभरा
शिक्षणवाराणसी येथील संस्कृत पाठशाळा
आईचे नाव जागरानी देवी
वडिलांचे नाव पंडित सिताराम तिवारी
मृत्यू 27 फेब्रुवारी 1931
मृत्यू स्थळ अलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्क
स्मारकशेखर आझाद मेमोरियल (शहीद स्मारक),ओरछा, तिकमगढ, मध्यप्रदेश

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म आणि बालपण

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्यप्रदेश मधील सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. दिनांक २३ जुलै १९०६ रोजी या शूर क्रांतीकारकांचा जन्म भारत देशाच्या भूमीवर झाला. चंद्रशेखर आझाद यांचे संपूर्ण नाव चंद्रशेखर तिवारी असे होते. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. त्यांच्या वडिलांचे नाव हे पंडित सिताराम तिवारी असे होते. चंद्रशेखर आझाद यांचे वडील अलीराजपुर या ठिकाणी कामाला होते.

Chandrashekhar Azad Information In Marathi

आझादांचा वडिलांच्या पहिल्या दोन पत्नींचा मृत्यू झाला होता व आझाद यांची आई जागराणी देवी ही सिताराम तिवारी यांची तिसरी पत्नी होती. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृतच्या पाठशाळेत गेले. आझादच्या आईला चंद्रशेखर आझाद यांना संस्कृत पंडित बनवायचे होते. परंतु चंद्रशेखर आझाद यांचे बालपण हे भावरा गावातील भिल्ल समाजातील मुलांसोबत गेले व त्या ठिकाणी भिल्ल मुलांसोबत बाण चालवायला व निशाणा साधायला चंद्रशेखर आझाद अगदी तरबेज झाले.

डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव ‘आझाद’ असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात  

असे म्हटले जाते की, मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे मोठेपणी मुलगा काय करणार आहे त्याची प्रचिती त्याच्या लहानपणाच्या वागणुकीतूनच दिसून येते. चन्द्रशेखर आझाद या वाक्याला काही अपवाद नव्हते. चंद्रशेखर आझाद यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय त्यांच्या पालकांना लहानपणी बऱ्याच प्रसंगांतून आला होता. चंद्रशेखर आझाद यांना लहानपणापासूनच धाडसी खेळ जास्त आवडत असत. खेळण्यातील तोफेला त्यांनी तर गावठी दारुगोळा लावून खरोखरची बंदूक बनवली होती. ते नेहमी जोखमीने भरलेले खेळ खेळत. त्यामुळे त्यांना बऱ्याच जखमा होत.

त्या जखमांबद्दल आई रागावली कि ते म्हणत “ आई जखमांचे व्रण हे वीरांचे आभूषण असतात.” चंद्रशेखर आझादांच्या धाडसीपणाने तर एकदा कहरच केला होता. गावाकडे फिरणाऱ्या फेरीवाल्याकडून त्यांनी मुंबई शहराविषयी फार ऐकले होते. त्या भव्य शहराचे वर्णन ऐकून चंद्रशेखर आझादांना मुंबई विषयी भलतीच ओढ निर्माण झाली. एके दिवशी चंद्रशेखर आझादांनी त्या फेरीवाल्यासोबत गावातून पळ काढला. आणि थेट मुंबई गाठली.

मुंबई पाहिल्यावर त्यांना अगदी भारावल्यासारखे वाटू लागले. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तेथे काही काळ रंगाऱ्याचे  काम केले. मात्र लवकरच मुंबईच्या या यांत्रिक जीवनाचा वीट येऊन ते परत बनारसला आले. याच प्रकारचा त्यांच्या जीवनातील आणखी एक प्रसंग आहे. चंद्रशेखर आझाद यांचे मन शाळेत रमत नव्हते. म्हणून त्यांच्या वडीलानी त्याच्यासाठी वैयक्तिक शिक्षकाची नेमणूक केली होती. हे शिक्षक फारच शिस्तप्रिय होते.

छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते चंद्रशेखर यांना शिक्षा करीत. छड्या देत असत. एक दिवस मात्र भलतेच घडले. शिकवता शिकवता गुरुजींच्या हातून काहीतरी चूक घडली. ती लगेच चंद्रशेखर आझादांनी त्यांच्या लक्षात आणून दिलीच पण सोबतच त्यांनी गुरुजींनाहि शिक्षा व्हावी या हेतूने छडीचा शोधही चालू केला. चंद्रशेखर आझाद छडी का शोधताय ?याची जेव्हा त्या गुरुजींना कल्पना आली, त्यावेळी त्यांनी जी धूम ठोकली त्यानंतर ते परत कधीच शिकवणीसाठी आले नाहीत.  

Chandrashekhar Azad Information In Marathi

चंद्रशेखर आझाद यांचे शिक्षण

शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थी म्हणून ते सरासरी होते. पण, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी संस्कृतमध्ये पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. संस्कृतमधील उच्य शिक्षणासाठी वाराणसीला आल्यानंतर ते अनेक राष्ट्रवादी क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. “द फ्री मॅन” म्हणजेच “आझाद” अशी ओळख असणारे चंद्रशेखर लहानपणीपासून धाडसी होते. त्यांना चार भिंतींमध्ये राहणे आवडत नसे. त्यापेक्षा ते घराबाहेर राहणे जास्त पसंत करीत. देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्या विचारांतून, त्यांच्या ऐतिहासिक गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळते.

वेशभूषेत पारंगत असल्याने ब्रिटिश सरकारला त्यांना पकडणे म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे होते. ”दुश्मानो के गोलीओ का सामना हम करेंगे | हम आझाद है, और आझाद ही रहेंगे |”. ज्याचे मराठीत भाषांतर करायचे झाले तर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना आम्ही करू. आम्ही आझाद आहोत, आणि आझादच राहू असे होईल.

चंद्रशेखर आझाद यांचे बनारसचे वास्तव्य व उच्चशिक्षण | Chandrashekhar Azad Information In Marathi

मुंबई वरून आल्यावर त्यांनी बनारसमध्ये उच्च शिक्षण घ्यावयास सुरुवात केली. या काळात श्रीमंत अध्यापक आणि इतर मंडळी गरीब मुलांना अन्न,वस्त्र, निवारा इत्यादी गोष्टीची सोय करून देत असत. चंद्रशेखर आझाद यांच्या राहण्या-खाण्याचा प्रश्न त्यामुळे आपोआप मार्गी लागला होता. 

चंद्रशेखर आझाद एका धार्मिक संस्थेच्या आश्रयाने शिकू लागले. त्यांनी आपले एकाग्र मन संस्कृत वर केंद्रित केले. ‘लघुकौमुदिनी’ आणि ‘अमरकोश’ यांसारखे ग्रंथ त्यांनी कंठस्थ केले. त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचे वारे चहू दिशांना वाहत होते. अभ्यासासोबत स्वातंत्र्याचे विचारही आझादांच्या मनात दिवसरात्र घोळू लागले होते. 

आझाद नाव कसे पडले ?

चंद्रशेखर आझाद हे अवघ्या १५ वर्षाचे असताना, १९२१ रोजी महात्मा गांधींनी असहकार चळवळ आंदोलनाची घोषणा केली. या चळवळीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक नागरिक सहभागी झाला होता. चंद्रशेखर यांना सुद्धा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त व्हावे असे वाटत होते.

त्यामुळे त्यांनी सुद्धा महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. या आंदोलनाच्या वेळी चंद्रशेखर यांना सर्वप्रथम अटक झाली. व त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन, लॉकअप मध्ये बंद करण्यात आले. डिसेंबरच्या वेळी अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये चंद्रशेखर यांना लॉकअप मध्ये पांघरून घेण्यासाठी, व झोपायला बेडही उपलब्ध नव्हता. मध्यरात्री ज्यावेळी इन्स्पेक्टर चंद्रशेखरला जेलमध्ये भेटायला गेले, त्यावेळी त्यांना चंद्रशेखर यांना बघून फार आश्चर्य वाटले.

त्यांनी असे काही पाहिले की, त्यांच्यासाठी ते नवलच होते. चंद्रशेखर हा त्यांना मिळालेल्या शिक्षेची सभा घेत होता. व कडाक्याच्या थंडीमध्येही घामाने भिजला होता. दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर यांना न्यायदंड अधिकाऱ्यांसमोर नेण्यात आले.

Chandrashekhar Azad Information In Marathi

चंद्रशेखरला त्यांचे नाव विचारले चंद्रशेखर यांनी त्यांचे नाव “आझाद” आहे असे सांगितले. यानंतर अधिकाऱ्याने अगदी कणखर आवाजामध्ये चंद्रशेखर यांना त्यांच्या वडिलांचे नाव विचारले, त्यावेळी चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, माझ्या वडिलांचे नाव ‘स्वातंत्र्य” असे आहे. तर चंद्रशेखर यांना त्यांचा पत्ता विचारल्यावर त्यांनी अगदी ठामपणे उत्तर दिले की, “जेल” चंद्रशेखरांचे उत्तर ऐकून न्यायाधीश चंद्रशेखरांवर खूप चिडले व चंद्रशेखर यांना पंधरा चाबकाच्या फटक्यांची सुनावणी केली. चंद्रशेखर यांच्या या पराक्रमाची कहाणी बनारस मधील प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन पोहोचली. व त्या दिवसापासून चंद्रशेखर यांना चंद्रशेखर आझाद या नावाने ओळख मिळाली.

चंद्रशेखर आझाद यांचे क्रांतिकारी जीवन

घडलेल्या चौरी-चौरा घटनेचा गांधीजींना भयंकर राग आला होता. त्यामुळे गांधीजींनी सुरू केलेली असहकार चळवळ आंदोलन १९२२ मध्ये मागे घेतली. त्यामुळे रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, व अश्फाफाकुल्ला खान, खूप चवताळले व त्यांनी “आझाद हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन” त्या संघटनेचे सक्रिय सदस्य बनले.

ही संघटना पुढे नेण्यासाठी तसेच इंग्रजांविरुद्ध त्यांना लढण्यासाठी पैशाची गरज भासत होती. त्यामुळे आझाद व त्यांच्या साथीदारांनी ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी घटना घडवून आणून, सरकारचा खजिना लुटला.या प्रकरणांमध्ये सरकारने आझाद्च्या साथीदारांना पकडले, परंतु आझाद पोलिसांच्या हाती लागले नाही. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व इतर शूर क्रांतीकारकांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा इंग्रजानविरुद्ध बदला घेण्याचे ठरवले.

लाला लजपतरायांच्या मृत्यूचा बदला म्हणून, या देशभक्तांनी १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटिश पोलीस अधिकारी याला गोळ्या झाडून त्याला ठार केले.

चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या क्रांतिकारी जीवनाच्या वेळी त्यांचे जीवन हे झाशीमध्ये घालवले. ओरछा जंगल हे झाशीपासून साधारणतः १५ किलोमीटर अंतरावर होते. या जंगलात चंद्रशेखर आझाद त्यांच्या नेमबाजीचा सराव करत असत. त्यांच्या भिल्ल गटातील मित्रांनी चंद्रशेखर आझाद यांना नेमबाजी साधण्यास शिकवले.

विधानसभा बॉम्ब कांड

ब्रिटिश सरकारचा भारत देशामध्ये असणारा ताबा व त्यांची हुकूमशाही विरोधात भगतसिंग व त्यांचे साथीदार बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या ‘सेंट्रल असेंबली” मध्ये बॉम्बस्फोट केला. ब्रिटिश राजवटीने सुरू केलेल्या या काळ्या कायद्यांना निषेध करणे, हा या बॉम्बस्फोटाचा प्रमुख उद्देश होता. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेमध्ये बॉम्बस्फोट केला.

हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन

भारतीय क्रांतिकारी चळवळ ही  चंद्रशेखर आझाद आणि भगत  सिंग या दोन व्यक्तींशिवाय अर्धवट होऊन जाते. म्हणूनच य दोघांची वादळी भेट कशी झाली ते पाहणे येथे अगत्याचे ठरते. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटना चालवण्यासाठी, क्रांतिकारकांना पैशांची गरज भासत होती. त्यामुळे त्यांनी काकोरी घटना घडवून आणली, ज्यामध्ये त्यांनी खजिना लुटला होता.

त्या सर्वांचा परिणाम म्हणजे क्रांतिकारकांना शिक्षा देण्यात आले. त्यामुळे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन दीर्घकाळासाठी निष्क्रिय झाली होती. काकोरी कटानंतर चंद्रशेखर आझादांनी लपत छपत पुन्हा एकदा तयारीला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा माणसे जमवीत असतांना ते कानपुर मध्ये आले. कानपूरमध्ये काही विद्यार्थी ‘प्रताप’ नावाच्या भारतीय विचारसरणीच्या वर्तमान पत्राची छपाई करीत असत. 

भगत सिंग ‘प्रताप’ मध्ये ‘बळवंत’ या टोपण नावाने लिखाण करीत असत. चंद्रशेखर आझादांची आणि भगत सिंग यांची पहिली भेट येथेच झाली. दोघांनीही एकमेकांबद्दल फार ऐकलेले होते मात्र भेट झाली नव्हती त्यानंतर दोघेही घनिष्ट मित्र झाले. क्रांतीला नवीन धार मिळाली. त्यानंतर दिल्ली मधील फिरोजशहा कोटला मैदानावर, गुप्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भगतसिंग यांना प्रसिद्धीची जबाबदारी देण्यात आली होती.

भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद या दोघांच्या भेटीनंतर आझाद यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाचं संघटन उभं करण्यात आलं. या संघटनेत बरेच नामवंत क्रांतिकारक होते. या संघटनेने बॉम्ब व इतर हत्यार बनवण्याचे कारखाने सुरु केले. निकटचे साथीदार शाहिद होत होते तरी त्यांचा लढा सुरूच होता. आणि तेच क्रांतीचे  तत्वज्ञान होते की  ‘ श्वास थांबला तरी चालेल चळवळ थांबायला नको.’

या गुप्त बैठकीमध्ये सर्व क्रांतिकारी पक्षाचे संघटन करून, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची पुन्हा स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. व यानंतर क्रांतिकारकाने “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे” नाव बदलून “हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” असे ठेवले व चंद्रशेखर आझाद या संघटनेचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले.

चंद्रशेखर आझाद यांचे देशप्रेम

चंद्रशेखर आझादांनी अखेरच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांच्या होती न लागण्याचे वचन दिले होते. शेवटपर्यंत मातृभूमीला स्वतंत्र करण्याच्या त्यांच्या इच्याशक्तीने ब्रिटिश राजसत्तेची पाळेमुळे हलवली होती. स्वातंत्र्यलढ्यात तन-मन-धनाने संपूर्ण जीवन समर्पित करणारे ते आझाद.

त्यांचे कार्य हे त्यांच्या समकालीन आणि येणाऱ्या नवीन पिढयांसाठी नक्कीच प्रेरणादायक होते. ब्रिटिशांसमोर ते एक मोठी समस्या बनले होते. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या दडपशाहीतून मुक्त होण्याची इच्छा त्यांनी प्रत्येक देशवासीयांच्या हृदयात निर्माण केली.

चंद्रशेखर आझाद यांच्या स्वप्नातील भारत

गांधीजींची स्वराज्यनिर्मितीसाठी अहिंसक मार्गाची स्वीकृती आणि आझाद यांचा क्रांतिकारी मार्गाचा अवलंबाने देशवासियांमध्ये देशभक्तीच्या भावना पेटून दिल्या. समाजवादी आदर्शांवर आधारित स्वतंत्र भारताचे स्वप्न त्यांनी पहिले. आझाद यांना भारतीय क्रांतिकारकांमधील एक धाडसी आणि अद्वितीय क्रांतिकारक म्हणून आजही आठवले जाते.

स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वचनबद्ध केले होते. शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा खरा अर्थ आझाद यांनी आयुष्यभर मातृभूमीसाठी संघर्ष केला. त्यांच्या अमूल्य योगदानाने तत्काळ स्वातंत्र्य मिळू शकले नाही. परंतु, त्यांच्या बलिदानाने ब्रिटिशांचा तीव्र प्रतिकार करण्यासाठी भारतीय क्रांतिकारक पेटून उठले.

काकोरीची लूट    

१९२५ च्या दरम्यान चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सवंगड्यांना माहिती मिळाली होती की  जर्मनी वरून एक मालवाहू जहाज अनेक शस्त्रास्त्रे घेऊन भारतात दाखल होणार आहे. सशस्त्र क्रांतीसाठी लागणारी शस्त्रे या जहाजावरुन खरेदी करण्याच्या निर्णयावर त्यांच्या संघटनेचे शिक्कामोर्तब झाले. मात्र प्रश्न होता तो पैशाचा. शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी कुठून उभारायचा? 

हे शस्त्र सशस्त्र क्रांतीसाठी उपयोगी पडणार होते. आणि जहाज कलकत्याला येण्याअगोदर पैसे जमवणे हर देखील अतिशय गरजेचे होते. त्यासाठी मोठा दरोडा घालण्याशिवाय संघटनेकडे कुठलाही उपाय नव्हता. म्हणून मग सर्वांनी बहुमताने ठरवले की ट्रेन ने लखनौला पोचवला जात असलेला इंग्रजांचा खजाना लुटायचा. 

त्यानुसार योजना बनवण्यात आली. ७ ऑगस्ट १९२५ ला शहाजहांपूर ते लखनऊकडे जाणाऱ्या डाऊन ट्रेन मध्ये क्रांतिकारक चढले. ट्रेन काकोरीला पोहोचण्याआधी त्यांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. गार्डच्या डब्यातील तिजोरीतील पैसे आपल्या ताब्यात घेतले. आणि अंधाराचा फायदा घेत गोळीबार करत ते जंगलात पसार झाले. महत्वाचे म्हणजे या दरम्यान कुठल्याही प्रवाशाला काहीही त्रास दिल्या गेला नाही. कुठल्याही प्रवाशाला धक्का सुद्धा लागला नाही.

या कृतींवरून हे कृत्य क्रांतिकारकांनीच केले याची इंग्रजांना खात्री झाली. वर्तमानपत्रांनी या घटनेला अमाप प्रसिद्धी दिली. इंग्रज साम्राज्याचे मात्र धाबे दणाणले. या प्रकरणात पुढे ४० संशयितांना अटक झाली. या ४० जणांमध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हे सारे सापडले ते त्यातीलच काही फितुरांमुळे. या कटातील जवळ जवळ सगळेच इंग्रज सरकारला सापडले पण आझाद मात्र कुणाच्या हाती आले नाही. कारण ते जंगलांत लपत, वेष बदलत पुन्हा एकदा तयारीला लागले होते. 

आझाद वेषांतर करण्यात पटाईत होते. कधी ते साधू बनत तर कधी कामगार तर कधी त्यांचं रूप भलतच काही असायचं. त्यामुळे ते कुणाच्या हाती आले नाही. अश्फाकउल्ला खान यांना ज्यावेळी फाशीची शिक्षा झाली आणि त्यांचे पार्थिव ज्यावेळी दफन करण्यात येत होते त्यावेळी चंद्रशेखर आझाद तेथे एका इंग्रजांच्या वेशात पोहोचले होते. आजू बाजू पोलिसांचा पूर्ण गराडा असतांनासुद्धा त्यांना कोणी ओळखू शकले नव्हते. 

लाहोर कट प्रकरण

१९२९ मध्ये, आझाद आणि त्यांच्या देशबांधवांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजना आखली, ज्यांना पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये दुखापत झाली. राय यांच्या मृत्यूस जबाबदार असलेले ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स ए. स्कॉट यांची हत्या करण्याचा आझाद आणि त्यांच्या साथीदारांचा प्लॅन होता.

तथापि, योजना बिघडली आणि त्याऐवजी, सहाय्यक पोलीस अधीक्षक जॉन सॉंडर्सचा चुकून मृत्यू झाला. या घटनेमुळे कुप्रसिद्ध लाहोर षडयंत्र खटला सुरू झाला, ज्यात भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासह आझादच्या बाकीच्या साथीदारांना अटक करण्यात आली आणि अखेर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

सॉंडर्स ची हत्या आणि विधानसभेत बॉम्ब फेकण्याची योजना

देशात सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांच्यावर जबरदस्त लाठीचार्ज झाला, ज्यात त्यांची मृत्यू झाली. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा दोषी ब्रिटिश अधिकारी स्कॉट याला समजून भगतसिंग यांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. या कार्यात चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना समर्थन केले. परंतु चुकीने त्यांनी पोलिस अधिकारी जेम्स स्कॉट ऐवजी त्याचा सहाय्यक पोलीस सॉंडर्स याची गोळी मारून हत्या केली.

या घटनेनंतर फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी लाहोर सोडले. यानंतर इंग्रजांचे भारतीयांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. इंग्रजांना भारतीयांची शक्ती दाखवून देशातील लोकांना जागृत करण्यासाठी भगतसिंग यांनी विधानसभेच्या सत्रादरम्यान बॉम्ब फेकला. या घटनेत कोणीही ठार होऊ नये याचीही त्यांनी काळजी घेतली. या घटनांनंतर इंग्रजांनी क्रांतिकारकांना पकडण्यासाठी संपूर्ण शक्ती लावली. भगतसिंग व इतर क्रांतिकारी इंग्रजांच्या तावडीत सापडले होते. परंतु पुन्हा एकदा चंद्रशेखर आझाद वेशनतार करून तेथून निसटले.

भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर यांची भगतसिंग यांच्याबरोबर भेट झाली. त्यानंतर त्यांच्याबरोबर एक चांगले नाते तयार झाले. भगतसिंग यांनी नवजीवन सभा लाहोर स्थापित केली होती. त्यांना संघटना चालवण्यासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी सायमन कमिशन (१९२७) आले होते. त्या वेळेला लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. 8 एप्रिल 1929 रोजी यांनी दोन योजनांची घोषणा केली. पहिली योजना ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होती. तर दुसरी योजना ही व्यापार विवाद संदर्भात होती जी सर्व नागरिकांच्या विरोधात होती.

आझाद यांनी परिस्थितीचा फायदा घेतला आणि पोलिस अधिकारी सँडर्स याची १७ डिसेंबर १९२९ रोजी हत्या करून लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेतला. त्यांनी वेशांतर केल्यामुळे ते पळून सुटून गेले. पण तरीसुद्धा चंद्रशेखर आझाद यांनी धीर सोडला नव्हता. चंद्रशेखर आजाद आणि भगतसिंग यांच्या संघटनेने संसदेवर बॉम्ब फेकण्याचा निर्णय घेतला. चंद्रशेखर आजाद यांना भगतसिंग यांना गमवायचे नव्हते, म्हणून भगतसिंग यांनी या मोहिमेवर जाऊ नये असे त्यांचे मत होते. कारण त्यांना एका चांगल्या स्वातंत्र्यसेनानीला गमवायचे नव्हते.

६ एप्रिल १९२९ रोजी त्यांच्या संघटनेने संसदेवर बॉम्ब हल्ला केला ज्यामध्ये कोणती जीवित हानी झाली नाही. पण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अटक करण्यात आली. ब्रिटिश सरकारने या तिघांवर खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा दिली. चंद्रशेखर आजाद यांनी भगतसिंगयांच्या यांच्या सुटकेसाठी योजना आखली. त्यांनी एक बंगला भाडेतत्त्वावर घेतला आणि तेथे बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली. भगवती चरण वोहरा यांनी एक बॉम्ब हातात घेतला.

त्याची पिन होती सैल होती. त्यामुळे तो तेथेच फुटला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. वीरभद्र नावाच्या त्यांच्या संघटनेतील एका माणसाने चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. शेवटी आझाद यांनी पोलिसांबरोबर लढून स्वतःवर गोळी झाडून घेतली. पण ते स्वतःहून ब्रिटिशांना कधीच शरण नाही गेले.

चंद्रशेखर आझाद यांचे क्रांतिकार्य 

 • काही काळ आझाद यांनी झाशी मधून क्रांतिकार्य केले. जाते गावापासून 15 किलोमीटर असलेल्या जंगलात त्यांच्या संस्थेचे केंद्र होते इथे ते नेमबाजीचे प्रशिक्षण आपल्या सदस्यांना देत. नेमबाजीचा सराव करत. त्यांनी एका हनुमानाच्या मंदिराची देखील स्थापना केली होती.
 • प्रजासत्ताक भारत साकारण्यासाठी त्यांनी पैसे एकत्र करायला सुरुवात केली सरकारी तिजोरी लुटणे आणि त्यातून संस्थेच्या कामासाठी पैसा उभा करण्याचं काम क्रांतिकारकांच्या सहकार्याने त्यांनी सुरू केले.
 • हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची पुनर्बांधणी केली. यामधून क्रांतिकाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले. गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही अशी या क्रांतिकारकांची धारणा होती त्यामुळे सशस्त्र क्रांतीचा मार्ग यावेळच्या तरुणांनी उचलला.
 • लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अधिकारी स्कॉट च्या हत्येचा कट रचला पण नजरचुकीमुळे भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉंडर्स वर गोळ्या झाडल्या या हत्येच्या कटामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा सहभाग होता.
 • 1925 साली काकोरी रेल्वे स्टेशन लुटीच्या प्रकरणात त्यांचा सहभाग होता या लुटलेल्या खजिन्यांमधून मोठे क्रांतिकार्य उभे राहिले.
 • आझाद यांना भगतसिंग यांचे गुरू मानले जाते. 8 एप्रिल 1929 मध्ये आझाद यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय असेंम्बली मध्ये बॉम्ब फोडला आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.

चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू

दिनांक २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी आझाद यांना त्यांच्या मित्रांना भेटावयासे वाटले म्हणून, ते त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये गेले. काही माहिती सूत्रांनी ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांना आझाद अल्फ्रेड पार्कमध्ये, त्यांच्या साथीदारांना भेटायला गेला आहे असे सांगितले.

ही माहिती ब्रिटिश अधिकाऱ्यांना मिळतात त्यांनी आझाद व त्यांच्या साथीदार यांना चारी बाजूने घेरून घेतले. व त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. चंद्रशेखर आझाद यांना स्वतःला ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करायचे नव्हते, व त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाती न पडण्याची शपथ घेतली होती.

या कारणास्तव आझाद व त्यांच्या साथीदारांनी अल्फ्रेड पार्कमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध गोळीबार करण्यास सुरुवात केली, या गोळीबारानंतर चंद्रशेखर यांनी स्वतःला गोळीने ठार मारून घेतली. इंग्रजांनी कोणालाही त्यांच्या पार्थिवाबद्दल न सांगता त्यांचे मृत शरीर रसूलाबाद घाटावर पाठवून तिथे त्यांचे अंत्यसंस्कार केले.

सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती

चंद्रशेखर आझाद यांचे हौतात्म्य आणि वारसा

27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर यांना ब्रिटिश सैन्याने वेढले होते. शरणागती पत्करण्याऐवजी, त्याने शौर्याने लढा दिला आणि आपल्या स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेशी खरा राहून हौतात्म्य पत्करणे निवडले. त्यांच्या बलिदानाने भारतीय इतिहासाच्या इतिहासावर आपली छाप सोडली.

आझाद यांचा वारसा म्हणजे निर्भयता, त्याग आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतूट बांधिलकी. त्यांचे जीवन पिढ्यानपिढ्या भारतीयांना अत्याचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी प्रेरणा देत आहे. भारतातील असंख्य शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे आणि संस्था त्यांच्या या वीर कृत्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव धारण करतात.

चंद्रशेखर आझाद बद्दल मनोरंजक तथ्ये

 • चंद्रशेखर आझाद त्यांच्यासोबत कायम पिस्तूल घेऊन जात असत, हे पिस्तूल आजही अलाहाबादच्या संग्रहालयामध्ये आपणास पहावयास मिळते.
 • आझाद यांचे बालपण भिल्ल जातीच्या मुलांसमवेत गेले. त्यातच त्यांनी बाण चालविणे शिकले.
 • २३ जुलै, १९०६. रोजी मध्य प्रदेशातील भावरा गावात सीताराम तिवारी आणि जागरणी देवी यांच्या मुलाचा जन्म झाला. त्याचे चंद्रशेखर तिवारी असे नाव होते . त्यांचा जन्म करवून देणारी सुईण (दाई) मुस्लिम होती.
 • चंद्रशेखर यांच्या आई ची इच्छा होती कि त्यांचा मुलगा मोठा संस्कृत विद्वान व्हावा. परंतु मुलाचे स्वप्न होते की देश स्वतंत्र केले पाहिजे. वाराणसीच्या काशी विद्यापीठात मुलांना पाठविण्यासाठी आईने वडिलांनाही राजी केले होते.
 • आझाद यांचे वाक्य अजून सुद्धा प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, आम्ही शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करू, मुक्त झालो आहोत, आझाद राहतील.
 • आझाद यांनी केवळ तिसरी पर्यंत शिकले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आझाद यांनीही सरकारी नोकरी केली होती . ते तहसीलमध्ये मदतनीस होते, त्यानंतर 3-4. महिन्यांनी राजीनामा न देता त्यांनी ती नोकरी सोडली.
 • सिनेमासृष्टीमध्ये भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित बनलेल्या विविध सिनेमांमध्ये आझाद यांची भूमिका स्पष्ट सांगितली गेली आहे.

चंद्रशेखर आझाद यांच्यावरील चित्रपट

शहीद (१९६५)

द लिजेंड ऑफ भगतसिंग (२००२)

२००२ साली “द लिजेंड ऑफ भगतसिंग” या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा यांनी आझाद यांची भूमिका रेखाटली होती.

रंग दे बसंती

२००६ साचा सुपरहिट “रंग दे बसंती” या चित्रपटात चंद्रशेखर आझाद, पंडित रामप्रसाद बिस्मिल, आणि अश्फाक उल्ला यांचे पात्र करण्यात आले होते. अमीर खान या बोलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने या चित्रपटात चंद्रशेखर आझादांची व्यतिरेखा साकारली आहे.

प्रश्न

चंद्रशेखर आझाद यांचे योगदान काय?

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

चंद्रशेखर आजाद यांचे पूर्ण नाव काय?

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी असे होते

चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळी का झाडली?

27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली कारण त्यांनी शपथ घेतली होती की ते कधीही ब्रिटीशांना शरण जाणार नाहीत..

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment