DEVKUND WATERFALL INFORMATION IN MARATHI : देवकुंड धबधबा माहिती मराठी

DEVKUND WATERFALL INFORMATION IN MARATHI : देवकुंड धबधबा माहिती मराठी – महाराष्ट्राचा निसर्ग अद्भुतरम्य आहे, तेथील अशी अनेक ठिकाणे अक्षरशः वेड लावतात. त्यातलाच एक, रायगड जिल्ह्यातला देवकुंड धबधबा. सोशल मीडियाच्या काळात अतिशय कमी वेळात प्रचंड प्रसिद्ध झालेला, धबधबा म्हणजे Devkund Waterfall. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा एक सर्वांग सुंदर धबधबा म्हणजे देवकुंड धबधबा.

प्रत्येकाला कमालीची उत्सुकता असते ती ह्या धबधब्याला भेट देण्याची. हा भारताच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भिरा जवळ असलेला विलोभनीय धबधबा आहे. जो खाली खडकाळ पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी ओततो. भारताच्या पश्चिम घाटावर असलेल्या या धबधब्याची खोली ८० फूट इतकी आहे.

Table of Contents

DEVKUND WATERFALL INFORMATION IN MARATHI : देवकुंड धबधबा माहिती मराठी

ठिकाण देवकुंड धबधबा
गाव भिरा, रायगड
ट्रेक अंतर ०७ किलोमीटर
ट्रेक कालावधी ०२ ते ०३ तास
ट्रेक पातळी मध्यम
जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव – ३० किलोमीटर
DEVKUND FALLS
देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा बद्दल माहिती

देवकुंड म्हणजेच पृथ्वीवरील देवांचे स्नान करण्याचे तलाव. कुंडलिका नदीपासून उगम पावणाऱ्या तीन धबधब्यांपैकी एक म्हणजेच देवकुंड. या धबधब्याला भेट देण्याकरिता ज्यावेळी आपण दगदगीच्या आयुष्यातून ट्रेकिंगसाठी देवकुंड धबधब्याला भेट देतो, त्यावेळी तिकडील नैसर्गिक सौंदर्यता बघून मन तृप्त होते. त्यामुळे हा निसर्ग प्रेमींसाठी एक योग्य व लोकप्रिय पिकनिक पॉईंट म्हणून ओळखला जातो.

परिवारासोबत किंवा मित्रमंडळींसोबत दगदगीच्या आयुष्यातून व जीवनशैलीमधून सुखाचा अनुभव घेण्यासाठी, मजा करण्यासाठी व परिवार व मित्रांसोबत एक सुखद वेळ घालवण्यासाठी देवकुंड धबधबा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही विविध प्रकारचे उत्तेजक सहासी ऍक्टिव्हिटीज अनुभवू शकता, ट्रेकिंगची मजा घेऊ शकता. मित्रहो तुम्ही देखील नक्कीच या देवकुंड धबधब्याला भेट द्या.

मुख्य शहर ते देवकुंड धबधबा अंतर

मुंबईपासून देवकुंड धबधबा हा १७५ किलोमीटर एवढ्या अंतरावर असून, पुण्यापासून साधारणतः ११५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच लोणावळापासून हा देवकुंड धबधबा ९० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

देवकुंड धबधब्याला कसे जावे?

देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील भीरा या गावी असून तुम्ही रस्त्याने जाऊ इच्छिता, तर जास्त ट्रॅफिक मुळे किंवा खराब रस्त्यांमुळे साधारणतः तुम्हाला मुंबईपासून देवकुंड धबधब्यापर्यंत पोहोचायला ६ ते ७ तास लागू शकतात, व जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला ३ ते ४ तास लागू शकतात.

धबधब्याला भेट देण्यासाठी तुमच्या वैयक्तिक गाडीने किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून किंवा भाड्याने गाडीचा वापर करून, भीरा गावापर्यंत पोहोचून, धबधब्याला भेट देऊ शकता.

सिंधुदुर्ग किल्ला : एक अभेद्य जलदुर्ग

मुंबई ते देवकुंड धबधबा

रस्ता मार्ग – मुंबईवरून देवकुंडला जायचे असल्यास रस्त्याने जाणे हा सर्वात सोपा आणि जलद जाण्याचा मार्ग ठरतो. देवकुंडला जाण्यासाठी सुरुवातीला कर्जत तिथून पाली आणि नंतर भीरा येथे पोहोचावे लागते.
भिरा येथे पार्किंगची समस्या असते. त्यामुळे पाली येथे जाऊन आपली गाडी पार्क करणे आणि नंतर भीरा येथे बसने जाणे हा पण पर्याय उपलब्ध आहे.

रेल्वे मार्ग – जर तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर मुंबई मधील रेल्वे स्थानकावरून गाडी करावी लागेल आणि पाली पर्यंत किंवा माणगाव पर्यन्त पोहोचावे लागेल. पाली वरून भीराला जाण्यासाठी वेगळी बस घ्यावी लागते. किंवा आपण खाजगी गाडी भाड्याने घेऊन देवकुंड धबधब्याशी पोहोचू शकता.

मुंबई सीएसटीवरून पालिपर्यंत रेल्वे मिळू शकतात. नंतर तिथून पाली आणि नंतर भीरा अशा बसेस घ्याव्या लागतात

पुणे ते देवकुंड धबधबा

रास्ता मार्ग – पुण्यावरून देवकुंडला जाण्याचा मार्ग हा जवळपास दीड तासाचा आहे. ह्या रस्त्याने जाताना जीपीएस वापरून किंवा विचारून जाणे. हा मार्ग सुरक्षित आणि आरामदायक आहे. धबधब्या जवळ पार्किंग व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी जाताना शक्यतो कॅब बुक करून जावे. देवकुंडला जाणाऱ्या बसेस या खोपोली ते पाली आणि पालीपासून भीरा या मार्गावरून जातात.

रेल्वे मार्ग – पुण्याहून इथे जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नाही. आपण खाजगी वाहन किंवा बस करून लवकर पोहोचू शकता.

विमान मार्ग – आपण जर महाराष्ट्राबाहेरून विमानाने येत असाल, तर मुंबई किंवा पुणे विमानतळ ही दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. इथून पुढे मात्र वर दिलेल्या पर्यायांचा वापर करावा लागेल. धबधब्या जवळील विमानतळ म्हणजे पुणे व मुंबई हे आहे. इथून तुम्ही धबधब्याला भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा किंवा गाड्यांचा कारचा वापर करू शकता.

देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.

वर्षा पर्यटन :- आपणास पावसात चिंब भिजून धबधब्याचा आनंद लुटायचा असेल तर जुलै ते सेप्टेंबर हा काळ सर्वोत्तम आहे.

कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करावयाचे असल्यास सप्टेंबरचा शेवट आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. या दिवसांत वातावरणात थंडी असून निसर्ग सुद्धा आल्हाददायक असतो.

देवकुंड धबधब्याजवळील करण्यासारख्या गोष्टी व प्रेक्षणीय स्थळे

१) देवकुंड ट्रेक

देवकुंड ट्रेक
Devkund Waterfall Trek

Devkund Waterfall महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील रायगड या जिल्ह्यातील जवळी भिरा गावामध्ये ताम्हिणी घाटाजवळ आहे. हा धबधबा जितका पर्यटनासाठी लोकप्रिय आहे, तितकाच ट्रेकिंग प्रेमीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या धबधब्याला भेट देण्यासाठी लांबचा पल्ला पार करून पर्यटक येतात. तसेच ट्रेकिंगचा सुद्धा मनसोक्त आनंद अनुभवतात. हा Devkund Waterfall Trek मुंबईपासून साधारणतः १७५ किलोमीटर तर पुण्यापासून साधारणतः ११० किलोमीटर अंतरावर आहे.

आंबोली : जैव विविधतेचे नंदनवन

२) भिरा धरण

भिरा धरण

धबधब्या बरोबरच पर्यटनासाठी दुसरे लोकप्रिय ठिकाण म्हणजे भिरा धरण. हे कुंडलिका नदीच्या पाण्याने तयार झालेले एक भव्य असे कृत्रिम तलाव आहे. या धरणाला टाटा पॉवर धरण असे देखील म्हणतात. भीरा गावाच्या जवळच देवकुंड धबधब्यापासून साधारणतः अर्ध्या एका तासावर हे भिरा धरण आहे.

धबधब्याचा ट्रेक केल्यानंतर धरणाच्या ठिकाणी नाईट कॅम्पिंग करण्यासाठी बरेच पर्यटक थांबतात. रात्रीच्या चंद्र प्रकाशातील अल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य दृश्य, धुंद चंद्रप्रकाश आणि थंडीच्या दिवसातली हिरवळ यामुळे ही जागा मनमोहून टाकते. इथे थांबणारे पर्यटक आपल्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आयोजित करतात. आपण पण त्यामध्ये भाग घेऊन एक चांगली संध्याकाळ घालवू शकतो.

३) घनगड किल्ला

ghangad fort

भीरा गावाजवळील देवकुंड धबधब्या च्या बाजूला असलेलं पर्यटनाचे अजून एक आकर्षण म्हणजे घनगड किल्ला. घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लोणावळा खंडाळ्यापासून ३० किलोमीटर आणि पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग सुद्धा करू शकता.

हा किल्ला देवकुंड धबधब्यापासून साधारणतः १० किलोमीटर इतके अंतरावर आहे.या किल्ल्याच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. या गावापासून ट्रेकिंगचा प्रारंभ केला जातो. इथली वाट जरी घनदाट जंगलाने वेढलेली असली तरी, अतिशय सुरक्षित आणि सोपी आहे. इथे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी नसल्या तरी ट्रेकिंगच्या एका चांगल्या अनुभवासाठी पर्यटक या ठिकाणी नक्की भेट देतात.

हा किल्ला जवळपास तीनशे वर्षे जुना आहे. या किल्ल्याला एकूण दोन प्रवेशद्वारे आहेत. किल्ल्याजवळ जाताना आपल्याला लोखंडी शिडी चढून जावे लागते. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात इथे छोटे छोटे तलाव, दऱ्या आणि खुली हिरवीगार मैदान दिसतात. यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो. डोंगर माथ्या वरच्या जागा ट्रेकिंग साठी अतिशय उत्तम आहेत.

त्याचबरोबर हायकिंग, कॅम्पिंग हे जर करायचं असेल, तर याचा चांगला अनुभव ही जागा देते. धबधबा आणि आजूबाजूचा परिसर हा साहसी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण केंद्र ठरला आहे.

४) ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट

हा महाराष्ट्रातील मुळशी आणि ताम्हिणी दरम्यान असलेला एक पर्वतीय मार्ग आहे. हा पश्चिम घाट पर्वत रांगांच्या शिखरावर आहे आणि हा घाट नयनरम्य परिसरासाठी लोकप्रिय आहे. ज्यात असंख्य धबधबे, तलाव आणि हिरवेगार जंगले यांचा समावेश आहे. मुळशी ते ताम्हिणीला जोडण्यासाठी ताम्हिणी रस्ता घाट सह्याद्रीच्या रांगा कापतो आणि पुण्याहून कोकणात जाणारा मार्ग बनवतो.

हा घाट जवळपास १५ किमीचा आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाळ्यात ताम्हिणी घाटातील धबधबे पाहण्यासारखे आहेत. ताम्हिणी घाटाच्या जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे. कोलाड, रायगडमधील ताम्हिणी धबधबा हे पावसाळ्यात भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी बरेच छोटे धबधबे आहेत.

५) कोरीगड किल्ला

कोरीगड किल्ला

याला कोराईगड, कोरीगड किंवा कुमवारीगड देखील म्हणतात. हा भारतातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे २० किमी अंतरावर, दक्षिणेस स्थित एक डोंगरी किल्ला आहे. त्याची बांधणीची साधारणतः १५०० पूर्वीची असावी. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ९२३ मीटर उंच आहे.

कोरीगड किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी साधारणतः ४५ मिनिटे लागतात. कोरीगड किल्ला ट्रेक हा मुंबई, ठाणे आणि पुणे जवळील सर्वोत्तम एकदिवसीय ट्रेक आहे. कोरीगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ असून तुम्ही या कालावधीत इथे भेट देऊ शकतात.

हा किल्ला मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५७ मध्ये बांधला. नंतर लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांसोबत आपल्या राज्यात समाविष्ट केला.

६) मुळशी धरण

मुळशी धरण

मुळशी हे महाराष्ट्रातील मुळा नदीवरील प्रमुख धरणाचे नाव आहे. हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका प्रशासकीय विभागात आहे. मुळशीचे पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जाते. हा महाराष्ट्रातील प्रमुख वीज प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. मुळशीपासून ६ किमी अंतरावर असलेल्या ‘वळणेवाडी’ येथून मुळशी तलावाचे सौंदर्य पाहता येते.

मुळा ही महाराष्ट्रातील पुण्यातील एक नदी आहे. मुळशी तलावाच्या निर्मितीच्या मुळशी धरणावर पश्चिम घाटाजवळ हे धरण बांधले आहे. पुण्यापासून ४० किमी अंतरावर असलेले मुळशी धरण हे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या भिरा जलविद्युत केंद्रासाठी साठवण धरण आहे.

७) कुंडलिका नदी

कुंडलिका नदी

कुंडलिका नदी ही रायगड जिल्ह्यातील रोहा या गावात असून महाराष्ट्रातील पश्चिम वाहणाऱ्या नद्यांपैकी कुंडलिका नदी ही एक नदी आहे. ही नदीचे उगमस्थान   भांबुर्डा गावाजवळील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. सुरुवातीला ही नदी दक्षिण-पश्चिम दिशेने पाटणस गावापर्यंत वाहते आणि नंतर वायव्येकडे वळते. जोपर्यंत नंतर जाऊन कोरलाई गावाजवळील अरबी समुद्राला मिळते.

कुंडलिका नदीच्या संगमातून धबधब्यांचा उगम होतो. त्यापैकी एक म्हणजे Devkund Waterfall.

०८) रिव्हर राफ्टिंग

रिव्हर राफ्टिंग

ऐन पावसाळ्याच्या दिवसांत कुंडलिका नदीच्या फेसलत्या पाण्याच्या प्रवाहात रिव्हर राफ्टिंग केले जाते. हौशी पर्यटक इथे या क्रीडा प्रकारचा आनंद लुटू शकतात. प्रतीव्यक्ती ३०० ते ५०० रुपये असे शुल्क आकरले जाते

सिंधुदुर्ग मधील १० अप्रतिम प्रेक्षणीय स्थळे

देवकुंड धबधबा ट्रेक | Devkund Waterfall Trek

या ट्रेकपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भिरा या गावातून जावे लागते. भिरा गावापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः मुंबईहून तुम्हाला ७ तासाचा प्रवास तर पुण्यापासून तुम्हाला साधारणतः ५ तासाचा प्रवास करावा लागतो. देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील दुर्मिळ धबधब्यांपैकी एक आहे. जो सोशल मीडियाच्या काळामध्ये कमी वेळातच लोकप्रिय झाला. हा धबधबा अलीकडच्या काळापर्यंत तरी ट्रेकर्सना फारसा माहीत नव्हता, पण या धबधब्यामुळे Devkund Waterfall Trek प्रसिद्धीस आला व बरेच लोक या ठिकाणी येऊन ट्रेकिंग करू लागले.

Devkund Waterfall Trek महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांच्या शिखरावर असलेला हा एक पर्वतीय मार्ग आहे. देवकुंड धबधब्याची उंची ही समुद्रपाटीपासून साधारणतः २७०० फूट इतकी आहे. हा ट्रेक चढाईसाठी तितकासा कठीण नसून, घनदाट जंगलातून सोप्या पद्धतीने ट्रेकिंग करून तुम्ही देवकुंड धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचू शकता.

देवकुंड ट्रेकिंगसाठी मार्गदर्शकाचे महत्व

Devkund Waterfall Trek योग्यरित्या करण्यासाठी मार्गदर्शक सोबत ठेवल्यास अति उत्तमच आहे. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक योग्य रीतीने तुम्हाला मार्गदर्शन करून, सुरक्षित ट्रेकिंगच्या सहाय्याने देवकुंड धबधब्याच्या पायथ्याशी घेऊन जातात.

देवकुंड ट्रेकिंगला येण्याअगोदर काही महत्त्वाचे मुद्दे

१) या ठिकाणी दुपारचे तसेच रात्रीचे जेवण हे भिरा गावामध्ये उपलब्ध आहे.
२) देवकुंड धबधब्याजवळ कॅम्पिंग करण्यासाठी परवानगी उपलब्ध नाही.
३) पर्यटकांची राहण्याची सोय ही देवकुंड धबधब्याच्या पायथ्याशी अर्थात भिरा या गावांमध्ये केली जाते.
४) स्थानिक लोकांनी ट्रेकिंगच्या पायथ्याशी नोंदणी कक्ष उभारला असून, या ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक नियुक्त करतात.
५) मार्गदर्शक प्रतिव्यक्ती ५० रुपये आकारतो.
६) या ठिकाणी पार्किंग शुल्क ५० रुपये आहे.

देवकुंड ट्रेक करण्यासाठी सुरक्षितेचे मुद्दे

  • १) ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग करण्यासाठी जात आहात त्या क्षेत्राच्या हवामान अंदाजाबद्दल तुम्ही अपडेट असणे गरजेचे आहे.
  • २) एकट्याने ट्रेक करणे तितकेसे सुरक्षित नसल्यामुळे मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत ट्रेकिंग करा.
  • ३) ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तुमच्यासोबत बाळगा जसे की ट्रेकिंग पोल, ट्रेकिंग करण्यासाठी योग्य बूट, इत्यादी.
  • ४) ट्रेकिंग साठी योग्य ते कपडे परिधान करा. जास्त वजनाच्या वस्तू सोबत ठेवू नका.
  • ५) ट्रेकिंग करण्यासाठी सोबत मार्गदर्शक ठेवा, जेणेकरून तुम्ही सुरक्षितरित्या ट्रेकिंग पूर्ण करू शकता.
  • ६) प्राण्यांच्या हल्ल्यापासून कसे वाचावे, याबद्दल पूर्व माहिती गोळा करा.
  • ७) First aid kit सोबत ठेवा.
  • ८) स्वतः सोबत बॅटरी ठेवा, जेणेकरून काळोखाच्या वेळी तुम्हाला योग्य तो प्रकाश मिळेल व तुम्ही तुमचा रस्ता चुकणार नाही.
  • ९) ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगसाठी जात आहात त्या ठिकाणचा नकाशा किंवा कंपास तुमच्यासोबत ठेवा.
  • १०) तुमच्यासोबत शिट्टी ठेवा. जर तुम्ही रस्ता भटकल्यास तुमच्या इतर ट्रेकिंग सदस्यांना मदतीसाठी बोलवण्यास मदत होईल.
  • ११) ट्रेकिंग करतेवेळी आवश्यक तेवढा अन्नसाठा व खाण्याचे पदार्थ सोबत ठेवा.
  • १२) मुबलक तेवढा पाणी पुरवठा ट्रेकिंगच्या वेळी सोबत ठेवा.

ट्रेक करतेवेळी तुम्ही हरवला तर काय करावे ?

ट्रेकिंग करतेवेळी योग्य त्या सुरक्षिततेचा वापर करून यशस्वीरित्या तुम्ही ट्रेकिंग पूर्ण करू शकता. पण तुमचा मार्ग चुकल्यास तुम्ही काय करावे ? त्यासाठी खालील मुद्द्यांचा तुम्ही वापर करू शकता.

१) स्वतःसाठी एक सुरक्षित जागा शोधा व त्या ठिकाणी रहा. जेणेकरून जंगली प्राणी तुमच्यावरती हल्ला करू शकणार नाही.
२) तुमच्यासोबत असलेली शिट्टी वाजवा, जेणेकरून तुमचे इतर ट्रेकिंग सदस्य तुम्हाला त्या शिट्टीच्या सहाय्याने शोधून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील.

ट्रेक करतेवेळी कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल काही मुद्दे

ट्रेकिंग करतेवेळी करावयाच्या गोष्टी

  • ट्रेकिंग करतेवेळी योग्य त्या गोष्टींची माहिती असणे व पूर्व नियोजन असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या ठिकानचा नकाशा, अन्न पाणी इत्यादी गोष्टी सोबत ठेवा.
  • ट्रेकिंग करतेवेळी योग्य तो मार्गदर्शक नियुक्त करा. जेणेकरून ट्रेकिंग तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकता.
  • ट्रेकिंग करतेवेळी योग्य हवामान असणे हे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करत असाल, व हवामानामध्ये बदल झाल्यास ट्रेकिंगचे नियोजन त्या वेळेसाठी तरी थांबवावे.
  • ट्रेकिंग करण्यासाठी जितका पाणीसाठा तुम्हाला आवश्यक आहे, तेवढा पाणीसाठा तुमच्यासोबत ठेवा.
  • ट्रेकिंग करतेवेळी तुमचे डोके योग्य त्या रीतीने झाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला सूर्याच्या अतिप्रखर उन्हाचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे सनस्क्रीन लावायला विसरू नका.
  • ट्रेकिंग करतेवेळी होणाऱ्या हवामानातील अचानक बदलासाठी पहिलेच सावध असणे गरजेचे आहे.
  • ट्रेकिंग करतेवेळी चांगले हायकिंग बूट घाला.
  • ट्रेकिंग करतेवेळी तुम्ही कुठल्या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी जात आहात याची पूर्वसूचना तुमच्या परिवारास किंवा मित्रमंडळीस देऊन ठेवा.
  • त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात त्या ठिकाणी रिसेप्शन सदस्यांना देखील त्याची पूर्व सूचना देऊन ठेवा.

Devkund Waterfall Trek करतेवेळी खालील गोष्टी करू नये

१) सिगारेट किंवा आगीच्या वस्तू कुठेही फेकू नका. निसर्ग ही एक देवताच आहे. त्यामुळे ट्रेकिंग करतेवेळी निसर्गाला कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
२) ट्रेकिंग करतेवेळी जंगलातील प्राण्यांचे शिकार करणे किंवा मासेमारी करणे हा एक गुन्हा आहे.
निसर्गाची स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी असून ट्रेकिंगच्या वेळी कोणत्याही प्रकारचा कचरा त्या ठिकाणी फेकू नका. नद्यांच्या प्रवाहामध्ये कोणतेही द्रव्य टाकू नका.

देवकुंड धबधबा ट्रेकिंगसाठी कठीण आहे का ?

रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा हा भारतातील अतिसुंदर धबधब्यांपैकी एक आहे या धबधब्याची उंची ही २७०० फूट एवढी आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी ट्रेकिंग करण्यासाठी याची अडचणीची पातळी ही मध्यम प्रकारची आहे.

ट्रेकिंगसाठी प्रो–टिप्स

  • १) पायवाट कितीही लहान असली तरी त्याची पूर्ण माहिती घ्यावी.
  • २) पाणी सोबत ठेवा.
  • ३) ट्रेल्सवर स्थिरतेसाठी ट्रेकिंग पोल वापरा.
  • ४) श्वास घेण्यायोग्य, हलके कपडे परिधान करा.
  • ५) चप्पलचा वापर टाळा, बूट वापरा.
  • ६) मार्गदर्शक सोबत ठेवावा.

देवकुंड येथील जेवणाची/राहण्याची सोय

धबधब्याच्या खालील भिरा गावात राहण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. भीरा येथे अतिशय चांगले रिसॉर्ट्स, हॉटेल्स, होम स्टेट तसेच नेचर स्टे सुद्धा आहेत. ट्रेकिंग झाल्यानंतर आपण जर कॅम्पिंग करत नसाल. तर हे पर्याय आपल्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात.

निसर्ग ऍग्रो रिसॉर्ट

मुख्य धबधब्यापासून अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर असलेले हे रिसॉर्ट धबधब्याजवळच्या रिसॉर्ट पैकी एक आहे. यात रेस्टॉरंट सुद्धा आहे, आणि हे पूर्णपणे वातानुकूलित आहे. या रिसॉर्टमध्ये पाळीव प्राण्यांना देखील परवानगी आहे.

सदर रिसॉर्ट निसर्गाच्या सानिध्यात असून तिथे बागबगीचा चांगल्या तऱ्हेने केलेला आहे. सर्व रूममध्ये फ्लॅट स्क्रीन, टीव्ही आणि कराओके हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. येथे भाड्याने सायकल दिली जाते. त्यामुळे आपण सायकलिंगसाठी सुद्धा बाहेर पडू शकतो


ठिकाण – कोलाड, भिरा रोड, कुडाळी गाव, रोहा शहर, जिल्हा रायगड ४०२३०४
टेरीफ – एका रात्रीच्या मुक्कामासाठी जवळपास २०००/-

Vinnca village at rockhill adventure and resort

धबधब्याजवळ आणखी एक आरामदायी रिसॉर्ट म्हणजे vinnca विलेज रिसॉर्ट. हे भिरा गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हे कुंडलिका नदीच्या अगदी समीप असल्याने डोंगरांमध्ये वसलेले शांत ठिकाण म्हणून या रिसॉर्टकडे पाहिले जाते. त्यांचे आदरातिथ्य आणि सेवा अतिशय छान आहे. लहान मुले तसेच मोठ्यांसाठी मनोरंजक ऍक्टिव्हिटी करण्यास हे योग्य ठिकाण आहे. या रिसॉर्ट जवळ एक सुंदर तलाव असून चांगली बाग देखील आहे.

त्याचबरोबर या रिसॉर्ट मध्ये वातानुकूलित तंबू निवास देखील आहेत.

  • ठिकाण – कुंडलिका रिव्हर राफ्टिंग जवळ कोलाड, सुतारवाडी, दगडवाडी, महाराष्ट्र रायगड.
  • किंमत – दोन लोकांसाठी सुमारे ५०००/-ते ६०००/-

Heritage village resort

धबधब्यापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेले रायगड जिल्ह्यातील हे रिसॉर्ट पर्यटकांच्या खास पसंतीचे आहे. या रिसॉर्टमध्ये वायफाय, गोल्फ कोर्स, बेबी सेटिंग या सेवा अगदी मोफत असून पार्किंग, पूल या सुद्धा सेवा उपलब्ध आहेत. हे रिसॉर्ट पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल आहे. तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. काही रूमना स्वतंत्र स्वयंपाक घर आणि रेफ्रिजरेटर सुद्धा आहे.

  • स्थळ – वाजेघर रोड, राजगड किल्ला, पुणे.
  • किंमत – एका रात्रीच्या मुक्कामासाठी जवळपास रु ६०००/-

KF RESIDENCY

हे रिसॉर्ट भीरा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. या रिसॉर्ट मध्ये रेस्टॉरंट, टीव्ही, लॉन्ड्री, वायफाय यासारख्या सुविधा असून हे रिसॉर्ट पूर्णतः वातानुकूलित आहे. या रिसॉर्ट मधली सेवा उत्कृष्ट असून येथे रेस्टॉरंटमधील जेवण सुद्धा चांगल्या प्रकारचे मिळते. बजेट फ्रेंडली राहायचे असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.

  • ठिकाण – कुर्ला कोर्टाच्या पुढे, एलबीएस मार्ग कुर्ला पश्चिम, मुंबई
  • किंमत – एका रात्रीसाठी सुमारे १५०० ते २००० रुपये

FAQ

देवकुंड धबधबा कुठे आहे?

देवकुंड धबधबा हा भारताच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ जवळ असलेला एक धबधबा आहे.

देवकुंड धबधबा ट्रेक किती लांब आहे?

भिरा गावातून सुरू होणार देवकुंड धबधबा ट्रेक हा साधारण एकमार्गी ६ किलोमीटरचा, मध्यम अडचण पातळीचा ट्रेक असून जवळपास जास्त ट्रेक साधाच आहे. शेवटच्या ५०० मिटरला चढाई आहे.

देवकुंड धबधब्याला भेट देण्याची योग्य वेळ आहे का ?

आपणास पावसात चिंब भिजून धबधब्याचा आनंद लुटायचा असेल तर जुलै ते सेप्टेंबर हा काळ सर्वोत्तम आहे.
कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करावयाचे असल्यास सप्टेंबरचा शेवट आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. या दिवसांत वातावरणात थंडी असून निसर्ग सुद्धा आल्हाददायक असतो.

देवकुंड धबधबा ट्रेक कसा करतात ?

भिरा धरणाच्या बॅकवॉटरच्या पायथ्याशी असलेल्या भिरा या गावापासून सुमारे ६ किलोमीटर जंगलातील पायवाटेने ट्रेकिंग करून (इथे तीन नाले ओलांडावे लागतात) देवकुंड धबधब्याच्या जागेवर पोहोचता येते. इथून ताम्हिणी घाटाचे पर्वतही पाहता येतात. देवकुंड धबधबा जिल्हा रायगड जिल्ह्यात आहे.

देवकुंड किती खोल आहे?

देवकुंड साधारणतः ८० फूट खोल आहे

देवकुंड धबधब्याची समुद्रपाटीपासून उंची किती आहे ?

धबधब्याची समुद्रपाटीपासून उंची २७०० फूट आहे.

निष्कर्ष

आम्ही देवकुंड धबधबा या बद्द्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा,आणि आम्हास कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment