Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi Language | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी – भारत देशाचे महान सुपुत्र, सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते, जागतिक कीर्तीचे तत्ववेत्ते, प्रचंड बुद्धिमत्ता असणारे, समाजासाठी अनेक त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. गोलमेज परिषद गाजवणे, पुणेकरार, महिलांसाठी कार्य, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह अशी कितीतरी महान कार्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात केली. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.
शिक्षणासाठी संघर्ष करून १८ तास अभ्यास करून, त्यांनी अनेक मोठ्या पदव्या मिळवल्या. आणि आपल्या शिक्षणाचा व बुद्धिमत्तेचा उपयोग देशाच्या व समाजाच्या उद्धारासाठी केला. त्यांचे जीवन आणि त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्य अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थोर आदर्श व सर्वांना अनुकरणीय आहे.
आज या लेखाद्वारे आम्ही आपणास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनक्रम, त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi
मूळ नाव | डॉ. भिमराव रामजी आंबेडकर |
जन्मतारीख | १४ एप्रिल १८९१ |
जन्मस्थळ | महू, इंदौर मध्यप्रदेश |
आईचे नाव | भीमाबाई सकपाळ |
वडिलांचे नाव | रामजी मालोजी सकपाळ |
पहिली पत्नी | रमाबाई आंबेडकर |
दुसरी पत्नी | सविता आंबेडकर |
अपत्ये | यशवंत आंबेडकर |
राजनितीक विचारधारा | समानता |
धर्म | बौद्ध धर्म |
संघटना | भारतीय बौद्ध महासभा |
शिक्षण | एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय १९१५ एम.ए. (अर्थशास्त्र) १९१६ मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD १९२१ मधे मास्टर ऑफ सायन्स १९२३ मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स |
संघ | समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी, अनुसुचित जाति संघ |
मृत्यू | ६ डिसेंबर १९५६ |
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आणि बालपण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी आजच्या मध्यप्रदेश राज्यातील इंदोर मधील महू या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव किंवा भिवा असे होते. रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचे वडील, तर भिमाबाई रामजी सकपाळ या त्यांच्या आई होय. रामजी व भीमाबाई या सकपाळ दांपत्याचे भीमराव हे चौदावे आपत्य होते.
रामजी सकपाळ हे महू येथे ब्रिटिश लष्करामध्ये सुभेदार व नंतर तेथीलच नॉर्मल स्कूलवर मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यामुळे येथे कार्यरत असताना या महू या लष्करी तळावरच भीमरावांचा जन्म झाला. आज हे महू हे ठिकाण आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते, त्या महामानवाच्या जन्मभूमीमुळे. या ठिकाणी हे भव्य दिव्य स्मारक सुद्धा उभारण्यात आलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आणि शिक्षणाचा प्रवास
बाबासाहेब यांचा जन्म जरी मध्य प्रदेश मधील महू या ठिकाणी झाला असला तरी, या त्यांच्या सकपाळ कुटुंबीयांचे मूळ गाव हे आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील अंबडवे हे आहे. आपण या कोकणी गावातील हे स्मारकही येथे पाहू शकतो. १८९४ मध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे निवृत्त झाले. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे सर्व सकपाळ कुटुंब हे महू येथून त्यांच्या मूळ गावी परत आले, आणि या गावाजवळील दापोली कॅम्प वस्तीमध्ये राहू लागले. मात्र या दापोलीला मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय नसल्याने, रामजी आपल्या सर्व कुटुंबासह १८९६ मध्ये दापोली वस्ती सोडून सातारा येथे स्थलांतरित झाले.
बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण
या सातारा परिसरामध्येच, बाबासाहेबांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पार पडले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये सर्वप्रथम बाबासाहेबांचे मराठी शिक्षण पूर्ण झाले. आणि नंतर त्या साताऱ्यातीलच गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये १९०० ते १९०४ या काळामध्ये इंग्रजी पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण संपन्न झाले.
आजही शाळा छत्रपती प्रताप सिंह हायस्कूल या नावाने ओळखले जाते, आणि विशेष म्हणजे यात शाळेमध्ये बाबासाहेबांना सकपाळ या आडनावा ऐवजी आपल्या गावाच्या नावावरून “आंबेडकर” या आडनावाची प्राप्ती झाली. आजही या शाळेच्या विद्यार्थिनी नोंदवहीमध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आपल्याला पाहायला मिळते. याच प्रताप सिंह हायस्कूलमध्ये 1904 मध्ये छोटे भिवा इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणाच्या तयारीला लागले.
बाबासाहेब आंबेडकर यांचे माध्यमिक शिक्षण
१९०४ मध्ये आंबेडकर कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईला आले व लोअर परळ भागातील बदक चाळीत राहायला लागले. येथे आल्यानंतर रामजी आंबेडकर हे भिमासाठी दर्जेदार अभ्यासक्रम असलेल्या शाळेच्या शोधात होते, मुंबईच्या शासकीय एलफिस्टन हायस्कूलच्या रूपाने त्यांना अशी शाळा सापडली आणि त्यांनी छोट्या भावाचे पाचवीला ऍडमिशन या शाळेमध्ये केले, म्हणजेच बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण हे शासकीय एलफिस्टन हायस्कूलमध्ये पार पडले. बाबासाहेबांनी आपल्या माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात
१९०५ मध्ये १४ वर्षीय भीमरावांचे दापोलीच्या भिकू वलंगेकर, यांच्या कन्या रमाबाई यांच्याशी विवाह संपन्न झाला. रमाबाईने बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची साथ दिली. बाबासाहेबांनी रमाबाईंना लिहायला, वाचायला शिकवले. बाबासाहेब आणि रमाबाई या दांपत्याला एकूण पाच अपत्य झाली.
२ जानेवारी १९१२ मध्ये या दांपत्याला पहिला मुलगा झाला. तो म्हणजे यशवंत आंबेडकर आणि याशिवाय गंगाधर रमेश, इंदू ही मुलगी, आणि राजरत्न, ही चार अपत्ये झाली. मात्र दुर्दैवाने यशवंत खेरीज इतर चार अपत्य ही दोन वर्षाच्या आत मध्येच दगावली. त्यामुळे यशवंत आंबेडकर हेच बाबासाहेबांचे एकमेव वारस ठरतात.
बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले
वैवाहिक जीवनाची सुरुवात झाल्यानंतर, पुढे बाबासाहेबांनी आपला अभ्यास नेटाने चालू ठेवला आणि त्यामुळे १९०७ मध्ये त्यांनी मुंबईच्या एलफिस्टन हायस्कूल येथून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये बाबासाहेब ही मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे मुंबईच्या त्यांच्या वस्ती भागामध्ये, अतिशय मोठा समारंभ भरून बाबासाहेबांचा मोठा सत्कार करण्यात आला.
कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या, शैक्षणिक जीवनाला मोठे वळण लावले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभा भरविण्यात आली आणि त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. आणि याच सत्कार समारंभाप्रसंगी, केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या बुद्ध चरित्राची एक प्रत बाबासाहेबांना भेट दिली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांच्या जीवनाची संपूर्ण माहिती बाबासाहेबांना त्यानंतर झाली.

बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाडांकडून उच्च शिक्षणास मदत
मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यानंतर, बाबासाहेबांना पुढील उच्च शिक्षण घेण्याची दृढ इच्छा होती. मात्र आर्थिक चणचणीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास अडचण येत होती. अशावेळी केळुसकर गुरुजींनी त्यावर एक उपाय सुचवला आणि तो उपाय म्हणजेच बडोदा संस्थांचे “महाराज सयाजीराव गायकवाड” यांची भेट घेण्याचा तो उपाय होता.
त्याप्रमाणे केळुसकर गुरुजी आणि बाबासाहेब या दोघांनी सयाजीराव महाराजांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये बाबासाहेबांची हुशारी पाहून, महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी दरमहा २५ रुपयाची शिष्यवृत्ती देण्यास मान्यता दिली.
बाबासाहेबांचे उच्च शिक्षण बी.ए
०३ जानेवारी १९०८ रोजी मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी बी.ए ला प्रवेश घेतला. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण सुरू केल्यानंतर, त्यांनी आपला अभ्यास मोठ्या नेटाने चालू ठेवला, आणि त्यामुळेच इंग्रजी विषयाचे प्राध्यापक मुल्लर आणि परशियन भाषेचे प्राध्यापक के.बी. इराणी. या प्राध्यापकांचे ते अत्यंत आवडते विद्यार्थी बनले.
जवळपास चार वर्षे त्यांनी बी.ए या पदवीचा अभ्यास केला. १९१२ मध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन, त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली.
बाबासाहेब यांची बडोदा संस्थानात नोकरी व वडिलांचे निधन
पदवी प्राप्त केल्यानंतर, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीतून मुक्त व्हावे, म्हणून २३ जानेवारी १९१३ रोजी बाबासाहेबांनी संस्थेमध्ये नोकरी सुरू केली, मात्र नोकरीच्या नवव्या दिवशी त्यांचे वडील रामजी आजारी असल्याची तार त्यांना मिळाली, त्यामुळे त्यांना नोकरी सोडून मुंबईला परत यावे लागले. मुंबईला आल्यानंतर बाबासाहेब आणि त्यांचे वडील रामजी यांची शेवटची भेट झाली.
०३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचा दुःखद निधन झालं. ध्येयित, कर्मप्रेरक आणि सौजन्यशील सुभेदार रामजींच्या जीवनाची कृतार्थ समाप्ती भीमराव यांना जितकी दुखदायक होती, तितकीच ती त्यांना सदैव ध्येयपूर्तीसाठी कर्म प्रवृत्त राहण्याची प्रेरणा देणारी होती. खरोखर वडील सुभेदार रामजी आणि सुपुत्र भीमराव हे दोघेही भाग्यवंत होते. यशवंत होते.
बाबासाहेबांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी सयाजीराज महाराजांची मदत
बाबासाहेब आंबेडकर केवळ बी.ए.ची पदवी प्राप्त करून शांत बसले नाही, तर त्यांची ज्ञानाची भूक अजून-अजून वाढत होती. आणि त्यामुळे आता त्यांना अमेरिकेमध्ये जाऊन, शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. मात्र यासाठी पैशाची प्रचंड आवश्यकता होती आणि याच काळात त्यांना माहिती कळाली, की बडोदा संस्थान आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत आहेत.
बाबासाहेबांनी परत महाराजांची भेट घेतली. या भेटीतूनच सयाजीराव महाराजांनी साडेअकरा पौडांची शिष्यवृत्ती बाबासाहेबांसाठी मंजूर केली. या शिष्यवृत्तीची मुदत ही १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ अशी तीन वर्षापर्यंतची होती. या शिष्यवृत्ती प्राप्तीनंतर बाबासाहेब हे मुंबई बंदरातून एस एस अंकोणा, बोटीने प्रवास करून २१ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले. आणि आपल्या उच्च शिक्षणाच्या तयारीला लागले.
बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठातून एम.ए पदवी
अमेरिकेमध्ये आल्यानंतर, त्यांनी तेथील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्र शाखेला जुलै १९१३ ते जून १९१६ या काळामध्ये प्रवेश घेतला. आणि तीन वर्ष ते या विद्यापीठांमध्ये शिकत होते. त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय हा अर्थशास्त्र हा होता. येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन.आर.के सेलिकमन यांचे बाबासाहेब हे अत्यंत आवडते विद्यार्थी बनले.
या विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांनी अतिशय तन मन लावून मोठा अभ्यास केला. १८ तास त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. वेळप्रसंगी उपाशी राहिले, मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही. आणि शेवटी इंडियन कॉमर्स म्हणजेच प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला. आणि तो कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर ०२ जून १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाने या प्रबंधांच्या आधारे बाबासाहेबांना एम.ए पदवी प्रदान केली.
बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून एम.ए चा अभ्यास चालू असतानाच, बाबासाहेबांनी त्यासोबतच पीएचडीचाही अभ्यास चालू केला होता. एम.ए सुरू असताना त्यांनी पीएचडीचाही प्रबंध लिहून पूर्ण केला. म्हणजे एकाच वेळेस बाबासाहेबांचा किती मोठा अभ्यास चालू होता, हे आपल्याला यातून समजून येते.
या पीएचडी पदवीसाठी त्यांनी “नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया स्टडी” म्हणजेच “भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन” हा प्रबंध त्यांनी तयार केला. आणि १९१७ मध्ये हा प्रबंध स्वीकारून कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना पीएचडीची पदवी प्रदान केली. आता बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले होते.
बाबासाहेबांना शिष्यवृत्तीची वाढीव मुदत आणि लंडन विद्यापीठामध्ये प्रवेश
परदेशात शिक्षण करायचे तर अजून पैशाची आणि शिष्यवृत्तीची आवश्यकता होती. आणि त्यामुळे त्यांनी बडोदा संस्थानाला विनंती अर्ज करून, आपली शिष्यवृत्तीची मुदत वाढून घेतली. त्यामुळे त्यांना एका वर्षाचे शिष्यवृत्तीची मुदत वाढवून भेटली. या वेळेचा सदुपयोग करून, बाबासाहेबांनी ऑक्टोबर १९१६ नंतर लंडन विद्यापीठांमध्ये एम.ए आणि बॅरिस्टर या पदवीसाठी त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे बघा मित्रांनो आपण तीन वर्षांमध्ये एक पदवी प्राप्त करतो, मात्र बाबासाहेबांनी सुरुवातीला एम.ए, पीएचडी केल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी एम.ए. स.सी.डी.एस. आणि बॅरिस्टर असे अत्यंत सर्वोच्च पदव्यासाठी त्यांनी एकाच वेळेस प्रवेश घेतला.
त्यांची अथक मेहनत, अथक परिश्रम, अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. मात्र दुर्देवाने १९१७ मध्ये या दुसऱ्या वाढीव शिष्यवृत्तीची मुदत सुद्धा संपली, आणि त्यामुळे त्यांना लंडनमधील आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावे लागले. मात्र त्यांनी लंडन विद्यापीठाला एक विनंती केली, की चार वर्षांमध्ये म्हणजेच १९१७ ते १९२१ या काळामध्ये कधी परत येऊन अर्धवट राहिलेले शिक्षण तुम्ही पूर्ण करू शकता, ही विनंती लंडन विद्यापीठाने त्यांची मान्य केली. आणि त्यामुळे बाबासाहेब हे भारतामध्ये परत येऊ शकले.

बाबासाहेब सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्राध्यापक म्हणून
भारतात परत आल्यानंतर बाबासाहेबांनी काही काळ बडोदा संस्थानाचे महाराज यांच्याकडे नोकरी केली. महाराजांचे मिलिटरी शेतकरी म्हणून ते कार्यरत होते. मात्र या काळात त्यांना संस्थांमध्ये अस्पृश्याचे अनेक चटके सहन करावे लागले. जातिभेदाचा मोठा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर ती नोकरी सोडून दिली.
याच काळामध्ये मुंबईच्या कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापकाची जागा रिक्त झाली. आणि त्यामुळे १९१८ ते १९२० या काळात या सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बाबासाहेबांनी नोकरी केली. याच काळात त्यांनी जो पैशाचा संग्रह केला, तो प्रामुख्याने आपले जे अर्धवट राहिले होते ते शिक्षण होते लंडन येथील ते पूर्ण करण्याची सुरुवात करण्यासाठी, त्यांनी या पैशाचे माध्यमातून तयारी सुरू केली.
अर्धवट राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब लंडनला रवाना
१९२० च्या दरम्यान बाबासाहेबांचा सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते असे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्यासोबत त्यांनी काही सामाजिक कार्य सुद्धा या काळामध्ये केली. त्याच परिचयातून आता पुढील अर्धवट राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यासाठी, कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना १५००\- रुपयाची मदत त्या काळामध्ये केली.
पुढे ०५ जुलै १९२० रोजी सिटी ऑफ एस्कीटर या बोटीने बाबासाहेब परत लंडनला रवाना झाले. लंडनला गेल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आणि बॅरिस्टर या पदवीसाठी ग्रॅजिन या कायद्याविषयक संस्थेमध्ये पुनर्प्रवेश घेतला. आपले राहिलेले अर्धवट शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घ्यायला परत सुरुवात केली.
बाबासाहेबांना लंडन विद्यापीठातून एम.एस्सी
१९२१ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला एम.एस.सी साठी आपला शोध प्रबंध सादर केला. काय होता हा शोध प्रबंध ब्रिटिश भारतातील साम्राज्य अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण असा हा शोध प्रबंध, त्यांनी लंडन विद्यापीठाला सादर केला. त्या आधारावरच या विद्यापीठाने बाबासाहेबांना एम.एस्सी पदवी प्रदान केली पुढे बाबासाहेबांनी या पदवीसाठी द “प्रॉब्लेम ऑफ रुपी” म्हणजेच रुपयाचा प्रश्न हा प्रबंध लिहून पूर्ण केला.
बाबासाहेबांना लंडन विद्यापीठातून डी.एस्सी
डी.एस्सी चे बाबासाहेबांचे मुख्य मार्गदर्शक होते. प्राध्यापक आणि त्यांच्याच अनुमतीने हा प्रबंध ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठाला सादर करण्यात आला, आणि त्याच आधारावर नोव्हेंबर १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने बाबासाहेबांना बी.एस्सी ही पदवी प्रदान केली.
बाबासाहेबांना लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर-ॲट-लॉ
लंडन येथे ए.एस्सी आणि डी.एस्सी या पदव्यासोबतच बाबासाहेबांनी बॅरिस्टर पदवीचा सुद्धा अभ्यास सुरू केलेला होता. १९२२ मध्ये लंडनच्या कायदेविषयक संस्थेतून, त्यांनी बॅरिस्टर-ॲट-लॉ या विषयाची परीक्षा दिली. कायद्याची सर्वोच्च परीक्षा ते उत्तीर्ण झाले. आणि लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर पदवीची त्यांना प्राप्ती झाली. म्हणजेच आता डॉक्टर आंबेडकर हे आता बॅरिस्टर भीमराव आंबेडकर झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य – Dr Babasaheb Ambedkar Mahiti
आमचे हे लेख सुद्धा वाचा
अस्पृश्यता निर्मूलन च्या कार्यास सुरवात
डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा मूळ गाभा हा शोषित, वंचित, आणि अस्पृश्य समाजाचा उद्धार करणे हाच राहिलेला आहे. कारण बाबासाहेबांनी बालपणापासूनच अस्पृश्यतेचे, जातीभेदाचे चटके सहन केलेले होते. या शोषित, वंचित, अस्पृश्य, समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी अस्पृश्य उद्धाराचे कार्य हाती घेतले.
इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला सामाजिक राजकीय हक्क मिळावे, म्हणून १९१९ मध्ये त्यांनी साउथबरो कमिशन समोर साक्ष दिली. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक या वृत्तपत्राची सुरुवात केली. आणि या वृत्तपत्राच्या लेखातून शोषित, वंचित, समाजाच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. या काळात आता अस्पृश्य समाजाला जागृत करण्यासाठी, आणि सरकार दरबारी आपल्या मागण्या पोचविण्यासाठी अनेक सभा संमेलने अधिवेशने घेण्यात येऊ लागली.
माणगाव परिषद अध्यक्ष – १९२०
कोल्हापूर संस्थानातील माणगाव या ठिकाणी २४ आणि २५ मार्च १९२० रोजी अस्पृश्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजश्री शाहू महाराज यांची या अधिवेशनाला विशेष उपस्थिती होती. या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी सामाजिक आणि राजकीय हक्काचे समर्थन तर केलेच, पण त्यासोबतच शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचाही मोठा गौरव केला.
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना
अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी, बाबासाहेबांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली व ते स्वतः या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेची ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे प्रेरणादायी घोषवाक्य स्वीकारण्यात आले.
या संस्थेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी विविध शाळा, वस्तीग्रह व विविध ग्रंथालय सुरू करण्यात आली. बाबासाहेबांनी या बहिष्कृत हितकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली की, मुंबई विधिमंडळावर सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावे. त्यांची मागणी मान्य करून, डिसेंबर १९२६ मध्ये मुंबई विधिमंडळावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी या दोघांची नियुक्ती करण्यात आली.
चवदार तळे सत्याग्रह – १९२७
अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाला सार्वजनिक पान वाट्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे मुंबई विधिमंडळात सार्वजनिक शाळा, न्यायालय, कार्यालय आणि दवाखाने तसेच सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी, धर्मशाळा, याचा वापर करण्यास अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी. असा ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावानुसारच महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केल्याचे जाहीर केले. परंतु, सनात लोकांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरण्यास सक्त मनाई केली, त्यामुळे अस्पृश्यनात्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी आपल्या हजारो अनुयायांसह महाडच्या चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून, सत्याग्रह केला. त्यानंतर कायदेशीर लढाई लढून १९३७ मध्ये हे चवदार तळे सर्वांसाठी खुले झाले.
मनुस्मृती ग्रंथाचे दहन – १९२७ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी
बाबासाहेबांनी सामाजिक अनिष्ट रूढी परंपरांना छेद देणारे, अजून एक मोठे पाऊल उचलले. आणि ते पाऊल म्हणजेच त्यांनी मनुस्मृती ग्रंथाचे केलेले दहन होय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीने कनिष्ठ जातीवर अनेक अपात्रता, अन्याय, अत्याचार, लाभलेला होता. तर उच्च जातींना अनेक विशेष अधिकार दिलेले होते.
त्यामुळे मनुस्मृती ग्रंथ अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायाचे कृरतेचे, व विषमतेचे प्रतिक आहे. अशी बाबासाहेबांची धारणा होती. म्हणून विषमतेचे प्रतीक असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. महाडच्या सभेत बाबासाहेबांचे सहकारी गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांनी मनुस्मृतिदहनाचा ठराव मांडला, आणि तो पारित करण्यात आला.
त्यानुसार २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सार्वजनिक रित्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. या घटनेचा इतका परिणाम झाला की, या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरणे ख्रिश्चन धर्मगुरूच्या धर्म बहिष्कृत त्याच्या आत्म्याच्या धन अशी केला गेला.
समाज समता संघाची स्थापना – १९२७
असे सत्याग्रह सुरू असतानाच ४ सप्टेंबर १९२७ रोजी बाबासाहेबांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली, समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, अस्पृश्य लोकही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटी बंदी तोडण्याकरता मोठे कार्य केले. बाबासाहेबांनी २९ जून १९२८ रोजी या समाज समता संघाच्या प्रसारासाठी समता नावाचे वृत्तपत्र ही सुरू केले.
काळाराम मंदिर सत्याग्रह – १९३०
नाशिकच्या काळाराम मंदिराचाही सत्याग्रह घडून आणला. कारण या काळामध्ये अस्पृश्य समाजाला कोणत्याही हिंदू मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, फक्त हिंदूनच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलित शोषित वर्गाला मूलभूत अधिकार मिळावे. यासाठीचा तीव्र लढा होता. ०२ मार्च १९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला सुरुवात झाली. आणि पुढे पाच वर्ष हा लढा सुरू होता. मात्र धर्मांच्या काळात बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जावे लागले आणि त्यामुळे हे आंदोलन स्थगित करावे लागले.
गोलमेज परिषदेतील सहभाग
राजकीय हक्क मिळविण्यासाठी इंग्रज सरकारशी व काँग्रेसची लढत राहणे महत्त्वाचे होते. आणि त्याचाच भाग म्हणून १९३०,१९३१,१९३२, या तीन वर्षाच्या काळात लंडनमध्ये ज्या तीन गोलमेज परिषदा पार पडल्या, त्या परिषदांमध्ये अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रावबहादूर श्रीनिवासन हे उपस्थित होते.
अस्पृश्यांना राजकीय व सामाजिक अधिकार मिळावे, त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ असावे, अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजावा आणि भारताला स्वातंत्र्य मिळावे, अशा मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.
मित्रहो, या तीनही गोलमेज परिषदांमध्ये बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर, सर्व परिषदेतील सभासदांना इतके प्रभावित केले की, पुढील काळामध्ये डॉक्टर आंबेडकर यांना अस्पृश्यांचा नेता, कायदे पंडित व बुद्धिमान व्यक्ती म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.
राजकीय कार्य (डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध)

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
बाबासाहेबांनी या समाजाच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा तेवढेच मोलाचे कार्य केले. काँग्रेस पक्षाला पर्याय म्हणून, लोकशाहीच्या मूल्यावर आधारित स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अस्पृश्य वर्गाची स्वतंत्र राजकीय ओळख प्रस्थापित होण्यासाठी, १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजेच “इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना” त्यांनी केली.
१७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे साताऱ्यापैकी १५ उमेदवार विजयी झाले. पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होते.
शेड्युल कास्ट फेडरेशन स्थापना
बाबासाहेबांची सुद्धा मुंबई विधानसभेचे आमदार म्हणून निवड झाली व १९४२ पर्यंत ते मुंबई विधानसभेचे सदस्य आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत होते. पुढे आपल्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी, व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी, १९४२ मध्ये बाबासाहेबांनी ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन म्हणजेच अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची स्थापना केली.
शेड्युल कास्ट फेडरेशन ही एक सामाजिक राजकीय संघटना होती. या संस्थेचा प्रमुख उद्देश शोषित, वंचित, समाजाच्या हक्कांच्या मोहिमा राबवणे हाच होता.
स्वातंत्र भारताचे कामगार मंत्री बाबासाहेब
१९४२ ते १९४६ या काळात बाबासाहेब हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये म्हणजेच, ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार ऊर्जा आणि पाटबंधारे खात्याची जबाबदारी स्वप्नात आलेली होती. या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहत असताना, बाबासाहेबांनी आधुनिक भारताच्या उभारणीमध्येही तेवढेच मोलाचे योगदान दिले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
बाबासाहेबांची राजकीय वाटचाल सुरू असताना, त्यांनी अस्पृशान सहन निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण घेण्यासाठी, ०८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने १९४६ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय तर १९५० मध्ये औरंगाबाद म्हणजेच सध्याचे छत्रपती संभाजी नगर येथे मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात केली. सध्या देशभरात या संस्थेच्या ३० पेक्षा जास्त शाळा महाविद्यालय कार्यरत आहे.
घटना समितीची स्थापना
जुलै १९४६ मध्ये भारताचा घटनात्मक प्रश्न सोडविण्यासाठी घटना समितीची स्थापना झाली. तेव्हा या घटना समितीवर बाबासाहेब मंगल प्रांतातून निवडून आले. १९४६ ते १९५० या काळामध्ये ते घटना समितीचे सदस्य होते. या कार्यक्रमांमध्येच २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉक्टर आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आंबेडकर आणि त्यांच्या सात सदस्य मसुदा समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली.
संविधान निर्मितीतिल योगदान
बाबासाहेबाच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली. डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या अथक परिसरामानंतर घटनेचा अंतिम मसुदा तयार केला. आणि तो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला. बाबासाहेबांच्या समानार्थ सव्वीस नोव्हेंबर हा दिन भारतीय संविधान दिन त्यामुळे साजरा केला जातो.
पुढे २६ जानेवारी १९५० रोजी घटनेची भारतामध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. आणि एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताचा उदय झाला. घटना निर्मितीच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कायदे तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. आणि म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
स्वतंत्र भारताचे केंद्रीय कायदे व न्यायमंत्री
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळामध्ये भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शपथ घेतली. सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ पर्यंत ते या कायदेमंत्री पदावर कार्यरत होते. या काळात मसुदा समितीचे अध्यक्ष आणि कायदामंत्री अशा दुहेरी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
कायदेमंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये भारतीय स्त्रियांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे हिंदू कोड बिल सादर केले. मात्र त्याला विरोध झाल्याने ते बिल संसदेमध्ये फेटाळण्यात आले. त्यामुळे नाराज होऊन, बाबासाहेबांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
राज्यसभा सदस्य
डॉक्टर आंबेडकर यांनी १९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक उत्तर मुंबई मधून लढवली, त्यात त्यांचा पराभव झाल्याने, १९५२ मध्ये बाबासाहेब हे राज्यसभेचे सदस्य झाले. ०३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ हा त्यांचा पहिल्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालखंड होय, तर एप्रिल १९५६ ते एप्रिल १९६२ हा त्यांच्या दुसऱ्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालखंड होता.
मात्र या दुसऱ्या राज्यसभा सदस्यत्वाच्या काळात ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निधन झाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापना
शेड्युल कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून, बाबासाहेबांनी आरपीआय म्हणजेच “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची” स्थापना करण्याची घोषणा केली. मात्र अपक्ष स्थापन होण्यापूर्वीच बाबासाहेबांचे दिल्ली येथे दुःखद निधन झाले. त्यामुळे पुढील काळात त्यांचे अनवाई आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन ३ ऑक्टोबर १९५७ रोजी आरपीआयची स्थापना केली. आणि शिवराज यांना आरबीआय पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आरपीआय पक्षाचे नऊ सदस्य निवडून आले.
बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म
आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.
आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की – अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.
आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.
धर्मांतर घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी २१ वर्षानंतर म्हणजेच १९५६ मध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे, श्रीलंकेचे बौद्ध भिकू महास्तविक चंद्रमणी यांच्या हस्ते, त्यांनी आणि त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नागपूरला दीक्षाभूमीचा दर्जा मिळाला. जगातील सर्वात मोठे धर्मांतर करून बाबासाहेब हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक, आणि बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक म्हणून ओळखले जाऊ लागले.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही.

आंबेडकर यांचे वैयक्तिक जीवन
रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच मुले झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली.
यशवंत हा एकमेव त्यांचा वंशज होता. इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
१९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.
यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.
डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली.विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.
विवाहानंतर शारदा कबीरांनी ‘सविता’ हे नाव स्वीकारले. सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने ‘माई’ किंवा ‘माईसाहेब’ म्हणत असत.
मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.
भाषाज्ञान – आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती
संविधानाचे निर्माते, दलितांचे मसिहा आणि मानवी हक्क चळवळीचे महान अभ्यासक बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोककल्याणातील अभूतपूर्व योगदानाचे स्मरण केले जाते.
बाबासाहेब हे खालच्या वर्गातले होते. तो लहानपणापासूनच सामाजिक भेदभावाचे बळी ठरले होते. यामुळेच समाजसुधारक भीमराव आंबेडकर यांनी आयुष्यभर दुर्बलांच्या हक्कासाठी लढा दिला. महिलांना सक्षम केले. बाबा भीमराव आंबेडकर यांची 132 वी जयंती यंदा साजरी झाली आहे.
डॉ भीमराव आंबेडकरांचे योगदान
राजनितीक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक, साहित्यीक, औद्योगिक, संवैधानिक सह वेगवेगळया क्षेत्रात अनेक कामं करून राष्ट्राच्या निर्माणात अमुल्य योगदान दिले.
भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जातीपातीच्या भेदभावा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा सामना करावा लागला होता आपल्या जीवनात अतोनात कष्टाला सामोरे जावे लागले होते. आंबेडकरांनी बघीतले की कश्या तहेने अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव सर्वत्र पसरलाय, या मानसिकतेने अधिक उग्र रूप धारण केले होते. आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना देशाच्या बाहेर घालवण्याला आपले कर्तव्य समजले आणि या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला.
जातीपातीचा भेदभाव संपवण्याकरता, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याकरता, समाजात पसरलेली किड, मनोवृत्ती समजण्याकरता आंबेडकरांनी शोध सुरू केला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पृश्यतेला मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला. या संघटनेचा मुख्य उद्देश मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक, आर्थिक सुधारणा करण्याचा होता.
डॉक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश देशातील जातिपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे हा होता सोबतच सर्वाना समानतेचा अधिकार देणे हा होता.
भीमराव आंबेडकरांची पुस्तके
- ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी
- दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया
- द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन
- ॲन्हिलेशन ऑफ कास्ट व्हिच वे टू इमॉन्सिपेशन
- फेडरेशन वर्सेस फ्रिडम
- पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया
- रानडे, गांधी अँड जिन्नाह
- मीस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स
- व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स
- कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट
- व्हू वर द शुद्राज? हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्णा इन दि इन्डो-आर्यन सोसायटी
- अ क्रिटीक ऑप द प्रोपोझल्स ऑफ कॅबिनेट मिशन फॉर इंडियन कोन्स्टिट्युशनल चेन्जेस इन सो फार ॲस दे अफेक्ट द शेड्युल्ड कास्ट्स (अनटचेबल्स)
- द कॅबिनेट मिशन अँड दी अनटचेबल्स
- स्टेट्स अँड माइनॉरिटीज
- महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स महाराष्ट्र
- द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स
- थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स
- द बुद्धा अँड हिज धम्मा
- रिडल्स इन हिंदुइझम
- डिक्शनरी ऑफ द पाली लँग्वेज
- वेटिंग फॉर अ व्हिझा
- वेटिंग फॉर अ व्हिझा
- अ पिपल ॲट बाय
- कॅन आय बी अ हिंदू?
- व्हॉट द ब्राह्मिन्स हॅव डन टू द हिंदुज
- एसे ऑफ भगवद् गिता
- इंडिया अँड कम्युनिझम
- रिव्हॉल्युशन अँड काउंटर-रिव्हॉल्युशन इन एन्शण्ट इंडिया
- बुद्धा अँड कार्ल मार्क्स
- कोन्स्टिट्युशन अँड कोन्स्टिट्युशनालिझम संविधान आणि संविधानवाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास
- भीमराव आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते.
- ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते.
- भीमराव आंबेडकर यांचे पहिले आडनाव आंबवडेकर होते. तथापि, त्यांचे शिक्षक, महादेव आंबेडकर, ज्यांनी त्यांचे नाव बदलून शालेय रेकॉर्डमध्ये आंबवडेकर वरुन आंबेडकर असे केले.
- केंब्रिज युनिव्हर्सिटी, इंग्लंड 2011 नुसार, केवळ एक भारतीय जो जगातील अव्वल 1 ला प्रतिभावान व्यक्ती आहे .
- परदेशात अर्थशास्त्राची डॉक्टरेट पदवी घेणारे बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते .
- अर्थशास्त्रात DSc ची पदवी घेतलेला पहिला भारतीय.
- RBI ची संकल्पना 1 एप्रिल 1935 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या “रुपयाची समस्या: त्याचे मूळ आणि त्याचे निराकरण” या पुस्तकातील मार्गदर्शक तत्त्वांद्वारे करण्यात आली.
- अर्थशास्त्रात पहिली पीएच.डी आणि दक्षिण आशियातील अर्थशास्त्रात पहिली दुहेरी डॉक्टरेट.
- क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी व्हाईसरॉय कार्यकारी परिषदेत कामगार मंत्री म्हणून औद्योगिक कामगारांच्या बाबतीत “लिंगभेद न करता समान कामासाठी समान वेतन” आणले .
- डॉ. भीमराव आंबेडकर – १९०६ मध्ये, वयाच्या नऊव्या वर्षी, त्यांनी रमाबाईशी लग्न केले आणि १९०८ मध्ये, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेणारा ते पहिले दलित मुलगा बनले.
- दोन वर्षे बाबासाहेब मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
- डॉ भीमराव आंबेडकर यांनी एकूण ३२ डिग्री मिळवल्या. भारताबाहेर अर्थशास्त्रात पीएचडी करणारे ते पहिले भारतीय होते.
- बाबासाहेब आंबेडकर हे परदेशी विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय होते.
- डॉ. बी. आर. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० चे (जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे) विरोधक होते.
- हिंदू धर्माचा त्याग करताना भीमराव आंबेडकरांनी २२ वचने दिली होती, ज्यापैकी एक वचन दिले होते, “मी कधीच राम आणि कृष्ण यांची पूजा करणार नाही, ज्यांना देवाचे रूप मानले जाते.”
- भारतीयांना लिंग, जात, वर्ग किंवा साक्षरता किंवा धर्म यांच्यात पक्षपात न करता मतदान करण्याचा अधिकार आहे. साऊथबरो कमिशनसमोर ‘युनिव्हर्सल अॅडल्ट फ्रँचायझी’साठी भारतातील पहिले व्यक्ती म्हणून आवाज उठवणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते .
- हिंदू धर्माच्या प्रथा आणि जातिव्यवस्थेवर असमाधानी असल्याने आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला.
- त्यांच्या शेवटच्या वर्षात डॉ. आंबेडकरांना मधुमेहाने त्रस्त केले होते.
- डॉ भीमराव आंबेडकर दोनदा लोकसभेसाठी उभे राहिले आणि दोन्ही वेळा पराभूत झाले.
- कामगारांचे तारणहार, भारतात मजुरांसाठी 8 तास ड्युटी आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 नोव्हेंबर 1942 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या अधिवेशनात कामाची वेळ 12 तासांवरून 8 तासांवर बदलली. जी भारतातील कामगारांसाठी प्रकाशमान ठरली.
- डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचे पोर्ट्रेट कार्ल मार्क्सच्या बाजूने लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये टांगलेले आहे.
- व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे कामगार सदस्य बी आर आंबेडकर हे सदस्य होते आणि त्यांच्यामुळेच उद्योगांमध्ये किमान १२-१४ तास काम करण्याचा नियम बदलून केवळ 8 तास करण्यात आला.
- बाबासाहेबांनीच महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ, महिला कामगार कल्याण निधी, महिला व बालकामगार संरक्षण कायदा, महिला व बालकामगार संरक्षण कायदा असे कायदे केले.
- बाबासाहेब एक उत्कट वाचक होते आणि असे मानले जाते की त्यांचा वैयक्तिक संग्रह, ज्यामध्ये ५० हजारांहून अधिक पुस्तके आहेत, हा जगातील सर्वात मोठा संग्रह होता.
- अशोक चक्राचा भारतीय ध्वजावर समावेश होण्यासही डॉ.आंबेडकर जबाबदार आहेत.
- बाबासाहेबांनी १९५० च्या दशकातच मध्य प्रदेश आणि बिहारच्या विभाजनाची शिफारस केली होती आणि २००० मध्येच छत्तीसगड आणि झारखंडचे विभाजन करून त्यांची स्थापना झाली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान
- साहेबांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, क्षेत्रातील उत्तुंग कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. ते हयात असतानाच ०५ जून १९५२ रोजी कोलंबिया विद्यापीठाकडून त्यांना ही अत्यंत महत्त्वपूर्ण पदवी प्रदान करण्यात आली.
- तर पुढे १२ जानेवारी १९५३ रोजी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानस पदवी प्रदान करण्यात आली.
- भारत सरकारने सुद्धा १४ एप्रिल १९९० रोजी मरणोत्तर त्यांना “भारतरत्न” हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा मोठा गौरवच केला.
भीमराव आंबेडकरांवरील 20 ओळी
- 1) डॉ. भीमराव रामजी हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत.
- 2) डॉ. आंबेडकरांना बौद्ध धर्माची सर्वोच्च पदवी ‘बोधिसत्व’ होती आणि त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक लिहिले होते.
- 3) डॉ. आंबेडकर हे त्या काळातील काही सर्वोच्च शिक्षित भारतातील एक होते.
- 4) डॉ. आंबेडकरांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, हिंदी, मराठी, संस्कृत, पाली आणि पर्शियन अशा 11 भाषा अवगत होत्या.
- 5) बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांना ‘युगातील आधुनिक बुद्ध’ असेही संबोधण्यात आले.
- 6) हे बौद्ध भिक्षू ‘महंत वीर चंद्रमणी’ होते ज्याने आंबेडकरांना बौद्ध धर्माकडे वळायला लावले.
- 7) आंबेडकरांनी 1935-1936 मध्ये ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ हे आत्मचरित्र लिहिले.
- 8) जयंतीदिनी डॉ. बी.आर. आंबेडकर ही ‘आंबेडकर जयंती’ म्हणून साजरी केली जाते तर त्यांची पुण्यतिथी भारतात ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून पाळली जाते.
- 9) डॉ. आंबेडकर हे शिक्षणतज्ञ आणि अर्थतज्ज्ञही होते.
- 10) त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, जसे की, ‘जातीचे उच्चाटन’, ‘हू वेअर द शूद्र’, ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे त्यांचे काही काम आहेत.
- 11) भीमराव आंबेडकर यांचा पहिला पुतळा कोल्हापूर शहरात 1950 साली स्थापन झाला.
- 12) अस्पृश्य विभागातून मॅट्रिक पूर्ण करणारे ते त्यावेळचे पहिले व्यक्ती होते.
- 12) आंबेडकर हे एक घटनातज्ज्ञ होते ज्यांनी जगातील सुमारे 60 राज्यघटना पार केल्या ज्यामुळे त्यांना संविधान मसुदा समितीचे प्रमुख बनवले गेले.
- 14) त्यांची पहिली पत्नी रमाबाई यांच्या निधनानंतर आंबेडकरांनी डॉ. शारदा कबीर यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर त्यांनी आपले नाव बदलून सविता आंबेडकर ठेवले.
- 15) न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्राचा अभ्यास केला. 18 जून 1927 रोजी कोलंबिया विद्यापीठाने अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
- 16) ते जातिभेद आणि अस्पृश्यतेचे धर्मयुद्ध करणाऱ्यांपैकी एक होते.
- 17) 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या 5 लाख समर्थकांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
- 18) डॉ. राजकीय तसेच शारीरिक समस्यांमुळे आंबेडकरांची प्रकृती खालावली आणि 06 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- 19) त्यांच्या पश्चात त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे सक्रिय राजकारणी आणि वकील आहेत.
- 20) डॉ. भीमराव आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपले जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले आणि समाजातील जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन
साहेबांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतर, अवघ्या दोनच महिन्याच्या आत म्हणजे ०६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे, त्यांच्या निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव दिल्लीवरून, विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आले.
०७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई येथील दादर चौपाटीवरील स्मशानभूमीमध्ये म्हणजेच चैत्यभूमीवर लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महामानवाने जगाचा निरोप घेतला, पण त्यांचे लाख मोलाचे माननीय विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत.
मित्रहो बाबासाहेबांसारखा महामानव पुन्हा होणे नाही.
FAQ
डॉ.आंबेडकरांचे मूळ नाव काय आहे?
डॉ आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी अंबाडवेकर आहे. पण शाळेच्या कागदपत्रात त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव आंबेडकर दिले.
भारतात कामाचे तास 8 तासांवर कोणी बदलले?
भारतात ८ तास काम करण्याची प्रथा डॉ.आंबेडकरांनीच आणली. नोव्हेंबर 1942 मध्ये, नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या बैठकीत त्यांनी तास 12 वरून 8 केले.
बिहार आणि मध्य प्रदेशचे विभाजन पहिल्यांदा कोणी सुचवले?
डॉ. आंबेडकरांनी एमपीचे उत्तर आणि दक्षिणेकडील राज्य असे विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला. 1955 मध्ये त्यांनी बिहारचे दोन तुकडे करण्याचा आणि पाटणा आणि रांची या राज्यांच्या राजधानी करण्याचा प्रस्ताव मांडला.
आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आला?
त्यांच्या मृत्यूनंतर १९९० साली डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आला.
निष्कर्ष
मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवड्ल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.