सिंधुदुर्गतील लोककला माहिती मराठी | Folk Culture Of Sindhudurg

Folk Culture Of Sindhudurg | सिंधुदुर्गतील लोककला कोकण म्हणजे स्वर्गच. कोकणामध्ये प्रवेश केल्यानंतर मन अगदी तृप्त होते. कोकणामधील संस्कृती, कोकणामध्ये असणारे सौंदर्य, कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा, कोकणामधील पर्यटन स्थळे, प्राचीन संस्कृती व प्राचीन देवालय यामुळे कोकण अगदी समृद्ध आहे. कोकणामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अनुभवता येतात. त्याचप्रमाणे आज देखील आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील असणाऱ्या काही लोकसंस्कृतीची ओळख तुम्हास करून देणार आहोत, तर चला तर मग पाहूया जिल्ह्यामधील लोकसंस्कृती व तेथील वारसा.

सिंधुदुर्गतील लोककला माहिती मराठी | Folk Culture Of Sindhudurg

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व महाराजांच्या या भूमीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गडांमुळे ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याच्या भूमीला सिंधुदुर्ग जिल्हा असे म्हटले. सिंधुदुर्ग जिल्हा हा जसा पर्यटनासाठी, त्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी व तिकडल्या असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणासाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच प्रसिद्ध हा तिकडे असणाऱ्या तेथील संस्कृतीसाठी सुद्धा आहे.

प्रस्तावना सिंधुदुर्गतील लोककला माहिती

वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृतींचे पालन व जतन येथे केले जाते. लोकसंस्कृतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा हा किती संपन्न आहे व पारंपारिक रित्या विकसित आहे हे प्रामुख्याने दिसून येते. तर या लेखाद्वारे आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध व लोकप्रिय असणारी ही संस्कृती हिची माहिती घेणार आहोत.

आपली ही भारतीय संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. ही संस्कृती अनेक प्रथा परंपरा सण उत्सव या सर्वांनी मिळून सामावलेली आहे. या लोकसंस्कृतीचे जतन करून शेकडो वर्षांपासून आपण अनेक प्रथा परंपरा या ठिकाणी साजऱ्या करतो. लोकसंस्कृतीमधून ग्रामीण जनजीवन आणि जीवनशैली व्यक्त होत असते. ग्रामीण भागातील लोकांना एकत्र ठेवण्याचे काम ही लोकसंस्कृती करत असते. या प्रथा परंपरा सण उत्सव साजरी करताना त्या ठिकाणच्या लोकांना परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आजही आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंस्कृतीची.

लोककला म्हणजे काय ?

लोककला ही परंपरा ऐतिहासिक सातत्य, स्थानिकांची भावना आणि आपलेपणा यांच्याशी संबंधित आहे. या लोकसंस्कृतीमध्ये पारंपारिक नृत्य, मौखिक लोकसाहित्य, मूर्ती पूजक, धर्म पारंपारिक हस्तकला, पारंपारिक कपडे आणि पोशाख, प्रादेशिक बोली यांचा समावेश असतो. कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले खरेखुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी इथला शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी / मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातल्या या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत.

लोक कलेची संकल्पना

लोककला ही मानववंशशास्त्रज्ञांशी सुसंगत बनवण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि आधुनिक प्रयत्न हायु .एस. मानववंशशास्त्रज्ञ “रॉबर्ट रेडफिल्ड” यांनी केला. पहिली संकल्पना सर्वप्रथम रॉबर्ट यांनी समाजापर्यंत पोहोचवली.

लोककलाचे महत्त्व

लोककला ही जमाती किंवा समुदायांमध्ये एकजिनसीपणा, आपुलकीची भावना वाढवण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी मदत करते.

लोककला वैशिष्ट्ये

 • १. लोककला ही प्राचीन ( अश्मयुगीन ) काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
 • २. लोककला या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात.
 • ३. लोककला या कोणत्याही नियमांनी बांधलेल्या नसतात.
 • ४. लोककला या लोकांच्या सहभागाने निर्माण होतात.
 • ५. लोककलांवर परिसर, परंपरा, पूजा पद्धती यांचा प्रभाव पडलेला असतो. वेगवेगळ्या लोकसमाजांत वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला आढळतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील लोककला कोणत्या आहेत ?

सिंधुदुर्ग जिल्हा हा त्याच्या वैविध्य रूपामुळे व त्याच्या प्रगतशील विकासामुळे प्रसिद्ध तर आहेच, त्याचप्रमाणे हा त्याच्या लोकसंस्कृतीमुळे सुद्धा पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे . देश, देशांमध्ये असणारे राज्य राज्यामध्ये असणारा जिल्हा व जिल्ह्यामध्ये असणारे तालुके तालुक्यांमध्ये असणारे गाव हे त्यांच्या वेगवेगळ्या लोकसंस्कृतीचे जतन करतात. आज आपण या लेखाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लोकसंस्कृतीची माहिती बघूया ती खालील प्रमाणे,

 • 1. दशावतार
 • 2. धनगरी नृत्य
 • 3. कळसुत्री बाहुल्या
 • 4. ढोल ताशा नृत्य
 • 5. गोंधळ
 • 6. नमन खेळे
 • 7. नंदीबैल
 • 8. फुगडी
 • 9. डबलबारी भजन
 • 10. कीर्तन
 • 11. वासुदेव

1. कोकण दशावतार

कोकण दशावतार

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध अशी लोकसंस्कृती असेल तर ती म्हणजे दशावतार. दशावतारची सुरुवात ही 2011 मध्ये झाली. दशावतार रात्री साधारणतः 12.00 PM ला चालू होऊन सकाळी साधारणतः 4.00 AM किंवा 5.00 AM ला संपते. साधारणतः हा दशावतार चार ते पाच तास चालतो.

या दशावतारामध्ये श्रीदेवी विष्णू यांच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे. ते खालील प्रमाणे :-

मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, नरसिंह अवतार, राम अवतार, परशुराम अवतार, कृष्ण अवतार, कल्की अवतार, बुद्ध अवतार, वामन अवतार,व  वराह अवतार.

दशावतारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पात्र ही भूमिका करतात जसं की राजा संकासूर ,विष्णू, महेश, ब्रम्हा त्याचप्रमाणे राक्षसांची भूमिका देखील दशावतारांमध्ये असते. त्याचप्रमाणे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रीपत्राची  देखील हा पुरुष भूमिका करतो. त्यामध्ये स्त्रीपात्राची हुबेहू असलेली रचना व त्याची हुबेहूब बोली सर्व काही मोहून  टाकणारे असते. दशावतारा मध्ये बिल्लीमाराची भूमिका देखील साकारली जाते, जो प्रेक्षकांमध्ये जाऊन तळीत पैसे जमा करतो व ही बिलीमारायची भूमिका देखील पुरुष साकारतो. जो स्त्रीपात्र मध्ये असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेच फेमस व प्रसिद्ध दशावतारी ग्रुप आहे त्यामध्ये वालावलकर दशावतार ग्रुप हा सगळ्यात प्रथम व नावाजलेला ग्रुप आहे.

2. धनगरी नृत्य – चपय नृत्य

धनगरी गजा हे महाराष्ट्रातील सर्वात रंगीत पारंपारिक लोकनृत्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेंढपाळ, गोपाळ, म्हैस पाळणारे आणि घोंगडी विणकर हे अप्रतिम नृत्य करतात. या नृत्यांमध्ये लोकांचे मनोरंजन करून ते या नृत्याद्वारे समाज प्रबोधन देखील करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये हे धनगरी गजा नृत्य साकारले जाते ते पाहण्यास अतिशय सुंदर असते.

धनगरी नृत्य - चपय नृत्य

3. कोकणातील कळसुत्री बाहुल्या

कळसुत्री हा नृत्य प्रकार महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळ आढळतो. यामध्ये जसे कठपुतलींचा खेळ हा एक प्रकार आहे, त्याचप्रमाणे कळसुत्री बाहुल्यांचा हा प्रकार केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज या कळसुत्री बाहुल्यांच्या खेळाचे जतन व जोपासन अजून देखील करत आहे. ठाकर आदिवासी कला आंगण आणि Thakarwadi Museum & Art Gallery ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी लोककला संग्रहालय आहेत.

ठाकर आदिवासी कला आंगण

शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम त्यांनी केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल, डोना वाद्य, गोंधळ, पोतराज अशा लोककलांची मांडणी केली आहे. लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम गंगावणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ व चेतन करीत आहेत. या लोककला जतन व संवर्धन करत असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे.

4. कोकणातील ढोल ताशा नृत्य

 कोकणातील ढोल ताशा नृत्य

ढोल ताशा नृत्य हे नृत्य ज्यावेळी वेगवेगळे सण म्हणा किंवा काही ऐतिहासिक कार्यक्रम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे किंवा आंबेडकरांची जयंती असू दे अशा वेगवेगळ्या जयंती व सणांच्या वेळी ढोल ताशा पथक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपली कला सादर करते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावांमध्ये असणारे ढोल ताशक जसे की वेतोरा ढोल ताशा पथक, कुडाळचे ढोल ताशा पथक अशे वेगवेगळे ढोल ताशा पथक हे कार्यक्रमांच्या वेळी त्यांच्या कलांचे सादरीकरण करतात.

5. कोकणातील देवीचा गोंधळ

गोंधळ ही लोक परंपरा श्री परशुराम यांनी माता जगदंबेला अर्पण केलेल्या भक्तिभावातून उगम झालेली आहे. या गोंधळामध्ये गोंधळी माताच्या समोर नृत्य करून माताला प्रसन्न करतात व त्यावेळी संबळ हा प्रमुख वाद्य प्रकार माताच्या समोर वाजवला जातो. यामध्ये माताच्या विविध नावांचा उल्लेख देखील या गोंधळामध्ये केला जातो जसे की महिषासुरमर्दिनी, भवानी, मा जगदंबा, मा रेणुकामा, महाकाली मा अशा विविध मातांच्या रूपांचे या ठिकाणी पूजन केले जाते.

कोकणातील गोंधळ

6. कोकणातील खेळे – शिमग्याची सोंगे

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खेळे हा प्रकार शिग्मोत्सवाला साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रकारची रूपे व सोंग गावकरी लोक दारोदारी जाऊन सादर करतात, राधा कृष्ण, हनुमंत, राक्षस, भटजी. वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ नाचवले जातात काही गावांमध्ये पाच दिवसांचा शिग्मोत्सव असतो, तर काही गावांमध्ये पंधरा दिवसांचा, आठ दिवसांचा, नऊ दिवसांचा, 21 दिवसांचा अशा प्रकारचे शिग्मोत्सव साजरे केले जातात. त्यावेळी त्या त्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळे सादर करून लोकांचे मनोरंजन करून ही लोकसंस्कृती जोपासली जाते.

कोकणातील खेळे - शिमग्याची सोंगे

7. नंदीबैल

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नंदीबैल ही देखील लोकसंस्कृती जोपासली जाते. यावेळी घरोघरी नंदीबैल घेऊन येतात, बायका त्यांचे पूजन करून त्यांच्या पायावरती पाणी घालून नंदीबैलाला हळद कुंकू लावून त्याची पूजा करतात. हा नंदीबैल शिवशंभू महादेवांचे वाहनच आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत येणारे हे आशीर्वाद देऊन नंदीबैलाला पूजा करणाऱ्याची मनोकामना पूर्ण करा असे सांगतात ही देखील एक लोकसंस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून देखील जोपासली जाते.

नंदीबैल

8. कोकणातील फुगडी

फुगडी हे एक लोकनृत्य आहे, जे  कोकणातील महिला सणांच्या वेळी आणि विशेष करून श्रावण महिन्यापासून गणेश चतुर्थीपर्यंत सादर केले जाते. हिंदू धार्मिक सणांमध्ये फुगडी घातली जाते. आधुनिक काळात आता या फुगडीच्या स्पर्धा भरवल्या जातात. फुगडी विविध धार्मिक आणि सामाजिक प्रसंगी केली जाते. फुगडी ही साधारणपणे भाद्रपद महिन्यात केली जाते, जेव्हा स्त्रियांना त्यांच्या सामान्य, नीरस दिनचर्येतून तात्पुरती विश्रांती घेण्याची संधी मिळते. नृत्याची सुरुवात हिंदू देवतांना आवाहन करून होते

काही ऐतिहासिक तथ्यांनुसार, ही नृत्यशैली काही प्राचीन गोव्यातील परंपरांमधून तयार केली गेली असे म्हटले जाते. स्त्रिया त्यांच्या दैनंदिन दिनचर्येच्या कंटाळ्यापासून मुक्त होण्यासाठी विश्रांती घेतात. शिवाय हे लोकनृत्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या वेळी देखील केले जाते. फुगडी गीतातून स्त्रिया आपल्या मनातील भावना मांडत असतात नर्तक “फू” सारख्या आवाजात तोंडातून हवा फुंकून ताल जुळवतात. त्यामुळेच याला फुगडी हे नाव पडले.

कोकणातील फुगडी

9. डबलबारी भजन

भजन करणाऱ्या भक्तांना भजनी मंडळी म्हणतात. ही मंडळी चैतन्य महाप्रभूंचे अभंग, चंडीदासाची भजने, गौडी संप्रदायाची भजने, तुलसीदासांची सगुण भजने, तसेच सुरदास, मिराबाई आणि कबीर यांची निर्गुण भजने म्हणतात. भजनाचे सोंगी भजन, दत्तपंथी भजन, नाथपंथी भजन, चक्री भजन, डबलबारीचे भजन असे विविध प्रकार आहेत. गणेश चतुर्थीच्या वेळी सिंधुदुर्गात भजनाचा कार्यक्रम ठेवला जातो. तसेच यावेळी डबलबारी भजनाच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

10. कीर्तन

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसणे पूर्ण असलेल्या कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात. कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे. 

11. वासुदेव

वासुदेव हा महाराष्ट्रातील विशेषकरून कोकणात गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग – गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. आपण चांगले काम करीत रहावे आणि आयुष्यात मिळणार-या चांगल्या वाईट अनुभवाची प्रक्रिया ईश्वरावर सोपवावी असे वासुदेव सांगतो.

डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेष असतो. समाज प्रबोधन करणारी एक संस्था म्हणून वासुदेवकडे पहिले जाते. 

प्रश्न

लोककला म्हणजे काय व्याख्या?

निसर्गाशी संवाद साधत जीवन जगणाऱ्या लोकसमूहांचे रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्टीचा संगीत, नृत्य, वादन यांच्यासमवेत सादर केला जाणारा कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखला जातो.

निष्कर्ष

या लेखाद्वारे आम्ही आपणास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलेची सफर करून देण्याचा प्रयत्न केला. हा लोकसंस्कृतीचा लेख लिहिण्यासाठी आम्ही इंटरनेट, पुस्तके यांचा वापर  केला आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा व तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.तुम्हाला यामध्ये अजून काही मुद्दे वाढवायचे असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ते सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू.

धन्यवाद.

Leave a comment