गोपाळकाला संपूर्ण माहिती : Gopalkala Information In Marathi

गोपाळकाला 2023 संपूर्ण माहिती : Gopalkala Information In Marathi – “गोविंदा आला रे आला” या गाण्याने अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जाणारा सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गोपाळकाला आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा गोपाळकाला सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या गोपाळकालेचे महत्व, तसेच या दिवशी काय केले जाते?याबाबतची सगळी माहिती आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया गोपाळकाला सणाची माहिती.

Table of Contents

गोपाळकाला संपूर्ण माहिती : Gopalkala Information In Marathi

सणाचे नाव गोपाळकाला
समर्पित भगवान कृष्ण
दुसरे नाव दहीहंडी
मराठी महिनाश्रावण
इंग्रजी महिना ऑगस्ट / सप्टेंबर

गोपाळकाला 2023 म्हणजेच दहीहंडी कधी आहे ?

हिंद पंचांगनुसार, यावर्षी दहीहंडी शुक्रवार, 19 ऑगस्ट 2023 रोजी आहे. अष्टमी तिथी 18 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 09:20 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 10:59 वाजता संपेल,

Gopalkala Information In Marathi

गोपाळकाला याचा अर्थ – (Meaning Of Gopalkala)

कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे गोपाळकाला. गोपाळ हे एक कृष्णाचे नाव आहे.आणि काला म्हणजे एकमेकांमध्ये मिसळणे. कृष्णाला आवडणाऱ्या दूध, दही, लोणी, आणि इतर पदार्थांपासून बनवला जाणारा एक पदार्थ म्हणजे काला. म्हणून याला “गोपाळकाला” असे म्हणतात.

दहीहंडी का साजरी केली जाते?

भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण खूपच नटखट आणि खोडकर असा होता. राजपुत्र असूनही गावातील लोकांच्या घरातील लोणी चोरून खाणे, त्याला फार आवडायचे. त्याच्या या नटखट स्वभावामुळे गावातील गोप, गोपिका त्याची आई यशोदेकडे तक्रारी घेऊन यायचे. पण तरीही कधीही कृष्णाने त्यांच्याकडील लोणी खाल्ले नाही तर सर्वजण अस्वस्थ देखील व्हायचे. अनेकदा गावातील लोक लोणी लपवून एका मडक्यात बांधून वर ठेवीत. परंतु हे मडके फोडण्यासाठी कृष्ण आपल्या मित्रांची मदत घेत असे आणि त्यात ठेवलेले लोणी दही फस्त करीत असे. त्याच्या या बाललीलांचे प्रतीक म्हणून आपण गोपाळकाला / दहीहंडी हा सण साजरा करतो.

नक्की वाचा👉 श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण माहिती 

दहीहंडी कधी साजरी केली जाते?

गोपाळकाला हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण भगवान कृष्णाला समर्पित आहे. भारतातील अनेक भक्त समुदाय कृष्णाला आपल्या आराध्य दैवत म्हणतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर येणारा दुसरा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये गोपाळकालाच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. उत्सवासाठी लाखोंची बक्षीस हे देखील ठेवली जातात. या उत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी होत असतात. म्हणून या सणाला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे.

दहीहंडी उत्सव कसा साजरा केला जातो?

गोपाळकाला म्हटले की, आपल्याला आठवतात ते मोठ मोठे दहीहंडीचे थर. ही दहीहंडी साजरी करणारे तसेच विश्वविक्रम करणारी गोविंदा पथके देखील आपल्याकडे आहे. ज्यांची आतुरता संपूर्ण जगाला लागून राहिलेली असते. खासकरून मुंबईमध्ये या दहीहंडी उत्सवाला परदेशातून पाहुणे येत असतात. या दहीहंडी उत्सवासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात.

तसेच या उत्सवामध्ये अनेक सेलिब्रेटी कलाकार देखील सहभागी होत असतात. या दहीहंडीच्या आठ ते नऊ थरासाठी गोविंदा पथके क्रित्येक महिने आधी सराव करत असतात. सर्व जाती, धर्म, भाषा विसरून आपण या सणाच्या निमित्ताने एकत्र येतो आणि अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतो.

Gopalkala 2023

गोपाळकाला / दहीहंडीचे महत्त्व – (Importance Of Gopalkala 2023/ Dahi Handi)

या दिवशी दही, लोणी आणि इतर पदार्थ घालून भरलेली हंडी फोडून तो प्रसाद खाण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे. अनेक पथके जमलेली असतात. जास्तीत जास्त थरावर कमीत कमी वेळेत ही हंडी गोविंदा पथक फोडतो. त्याला योग्य बक्षीस दिली जातात. हा उत्सव संपूर्ण देशभर अतिशय मनोरंजक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा केला जातो. म्हणून या सणाला अतिशय महत्त्व आहे.

दहीहंडीचे सांस्कृतिक महत्त्व

धार्मिक रित्या जसे महत्व आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये हा सण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमच बनलेला आहे. विविध धर्मातील, जातीतील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामुळे सामाजिक एकोपा तयार होतो. गोविंदा पथकांमध्ये देखील विविध समुदायातील व्यक्तींचा या ठिकाणी समावेश दिसून येतो. हा सण केवळ सहभागी आणि प्रेक्षकांपुरता मर्यादित नसून यामध्ये अनेक व्यावसायिक तसेच सरकारी लोक देखील यामध्ये सहभागी होतात. आपल्या कंपन्यांमार्फत गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवून आपला सहभाग दर्शवतात.

दहीहंडी उत्सवाची पूजा

यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण ०६ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा केला जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबर या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे.

श्रीकृष्ण पूजा साहित्य

कृष्ण जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी कृष्णाची पुन्हा पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. या पूजेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे –

वाती, वस्त्र, फुले, ताम्हण, पळी, पंचपात्र, तेल, अबीर, तुळशी, चंदन, पंचामृत, विड्याची पाने, सुपारी, लाल वस्त्र, अक्षता, कापूर, धूप, अगरबत्ती, तुळशीची माळ, पुष्पहार, हळद, कुंकू, सुटे पैसे, तूप, दही, लाह्या, दूध, सुंठवडा इत्यादी वस्तूंचा पूजेत समावेश करावा.

हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी

श्रीकृष्ण पूजा विधि

 • जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
 • सर्वप्रथम देवाची पूजा करून घेणे.
 • त्यानंतर कृष्णाची पूजा करताना निर्माल्य बाजूला काढून ठेवावे.
 • त्यानंतर कृष्णाला हळद, कुंकू, अक्षता वाहावी. तसेच फुले घालावीत.
 • पुष्पहार, तुळशीची माळ घालावी. त्यानंतर निरांजनाने ओवाळावे.
 • अगरबत्ती दाखवावी. तसेच धुपारती करावी.
 • देवाला पंचामृताचा आणि सुंठवड्याचा नैवेद्य दाखवावा.
 • त्यानंतर आरती म्हणावी. तसेच प्रार्थना करावी. या पूजेमध्ये आपल्याकडून काही राहिले असल्यास त्यासाठी देवाची क्षमा मागावी.
 • यानंतर घरातील पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा.
 • संध्याकाळी पुन्हा उत्तर पूजा करून काल्याचा नैवेद्य दाखवून तो सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटून कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे.

श्रीकृष्ण आरती

आरती कुंजबिहारी की | श्री गिरिधर कृष्ण मुरारी की |
आरती कुंजबिहारी की | श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ||

गले में बैजंती माला , बजावै मुरली मधुर बाला |
श्रवण में कुण्डल झलकाला, नंद के आनंद नंदलाला ||
गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली |
लतन में ठाढ़े बनमाली, भ्रमर सी अलक कस्तूरी तिलक |
चंद्र सी झलक, ललित छवि श्यामा प्यारी की |
आरती कुंजबिहारी की | श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ||

कनकमय मोर मुकुट बिलसै, देवता दरसन को तरसैं
गगन सों सुमन रासि बरसै, बजे मुरचंग मधुर मिरदंग ग्वालिन संग |
अतुल रति गोप कुमारी की, श्री गिरिधर कृष्णमुरारी की |
आरती कुंजबिहारी की | श्री गिरिधर कृष्णमुरारी की ||

जहां ते प्रकट भई गंगा, सकल मन हारिणि श्री गंगा
स्मरन ते होत मोह भंगा, बसी शिव सीस जटा के बीच हरै अघ कीच |
चरन छवि श्रीबनवारी की, श्री गिरिधर कृष्णमुरारी की |
आरती कुंजबिहारी की | श्री गिरिधर कृष्णमुरारी की ||

चमकती उज्ज्वल तट रेनू, बज रही वृंदावन बेनू
चहुं दिसि गोपि ग्वाल धेनू, हंसत मृदु मंद चांदनी चंद
कटत भव फंद, टेर सुन दीन दुखारी की
आरती कुंजबिहारी की | श्री गिरिधर कृष्णमुरारी की ||

श्रीकृष्ण मंत्र

 • “ॐ देविकानन्दनाय विधमहे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण:प्रचोदयात”
 • “ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा”
 • ॐ देविकानन्दनाय विधमहे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण:प्रचोदयात

दहीहंडी गाणे – Dahi handi marathi Song

बोल बजरंग बली की जय
बोल बजरंग बली की जय
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा
तुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळा
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला

कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
तुझी माझी कशी जमल जोडी, मला ठाऊक हाय गो
तुझी माझी कशी जमल जोडी, मला ठाऊक हाय गो
तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रं,
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
पदर नाही खांद्यावर, हे तुझ्या पदर नाही खांद्यावर

दोन पैसे, दोन पैसे देतो तुला राधे देतो तुला
तुझ्या मडक्यातला लोणी दे गो या कृष्णाला
लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला
नाही कृष्णा ठाऊक तुला
फुकटचा ताप नको या राधेला
अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा

एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालरेपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालरेपुरेवाला
डोईवर भुजा म्हणजे मडक तुरा
राधेच्या वाटे नको जाऊ चोरा

अरं जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस
राजाला मिळतोय निवारा
ए निळू भाऊ, निळू भाऊ हो बाजूला
चल हो जा बाजूला
खुटाशी गोळी नाहीतर देईन तुला
अरे हट, अरे हट, नाही जमणार तुला
जमणार नाही तुला
फुकटचा ताप नको या बापाला,
जा, जा रं काका, फिरवू नको डोका
बघतोय या नाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा

एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमाल पुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमाल पुरेवाला
अरे बोल बजरंग बली की जय..

गोपाळकाला कथा – Gopalkala Story

कृष्ण त्याच्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत यमुना नदीच्या काठी गुरे, वासरे चरायला घेऊन जात असे. सकाळपासून ते अगदी दुपारपर्यंत गुरे वासरे चरल्यानंतर दुपारच्या वेळी कृष्ण आणि त्याचे सवंगडी काही खेळ खेळत असत. खेळ खेळून दमल्यावर एकत्र जमत असत. त्याचे सवंगडी हे सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या घरून येणारे जे पदार्थ होते ते अगदी साधी असायचे. कोणी नुसता भात आणायचे, तर कोणी नुसती चटणी, भाकरी आणत असे. तर कोणी ताक आणायचे.

कृष्णाचे मित्र हे कृष्णा पेक्षाही अतिशय गरीब होते. अशावेळी कृष्णाला वाटे की, माझे मित्र साधे जेवण जेवतात आणि त्यांच्यासमोर मी पक्वान्नाचे जेवण कसे जेवायचे? त्यामुळे श्रीकृष्ण सगळ्यांना एकत्र बोलावून मोठा घोळका करत. सर्वजण मिळून गोलाकार बसत. आणि त्यानंतर कृष्णाने आणलेले पदार्थ तो आपल्या पोतडीतून बाहेर काढीत असे. त्याचबरोबर मित्रांनी आणलेले जे काही इतर पदार्थ असतील ते काढून सर्व एकमेकांमध्ये मिसळत असत. हाच तो काला. म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा गोपाळकाला आपण भगवान श्रीकृष्णाच्या आठवणीने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

दहीहंडी कथा आणि व्हिडिओ

कृष्ण हा लहानपणी अतिशय खोडकर मस्तीखोर मुलगा होता. त्याला दही, दूध, लोणी हे पदार्थ खूप आवडायचे आणि तो राहायचा त्या गावात गाई, गुरे पाळणारा गवळी समाज होता. त्यामुळे संपूर्ण गावांमध्ये दूध, दही, लोणी यांची कमतरता भासत नव्हती. कृष्ण आपल्या घरी दूध, लोणी चोरून तर खायचाय, परंतु दुपारच्या वेळी गावातील लोक झोपलेले असताना किंवा शेतामध्ये कामाला गेलेले असताना तो कोणाच्याही घरी हळूच जाऊन दही, दूध, लोणी यापैकी जे मिळेल ते काढून खायचा. त्यामुळे त्या गावातील बायका दही, दुधा, लोण्याचे मडके वर बांधून ठेवत असत. त्यामुळे कृष्णा आणि त्याचे सवंगडी एक गोल करत आणि कोणाला तरी एकाला वरती उभे करून तो दह्या, दुधाचा माठ काढायला लावत असत.

कधी कधी तर माठाला हात पोहोचायचा, पण काढता येणे शक्य नसायचे. त्यामुळे सर्वांच्या खांद्यांवर चढलेला सर्वात वरचा सवंगडी तो मडके फोडायचा आणि त्यामुळे दही, लोणी यासारखे पदार्थ बाहेर पडायचे. ते दही कोणाच्या अंग खांद्यावर पडत असायचे आणि त्यानंतर हे अंगावर पडलेले दही ते हाताने खात असायचे. अशा प्रकारे मडके फोडून दही, दूध, लोण्याची चोरी करायचे याची आठवण म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो.

भारतात कुठे कुठे गोपाळकाला साजरा केला जातो?

 • वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तिने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलिलाचे सादरिकरण केले जाते.
 • ओरीसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहिभंगा जत्रा साजरी केली जाते.
 • गुजराथमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.
 • भारताच्या विविध प्रांतात विविध पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात दहिहंडी केली जाते. गोकुळ, मथुरा, वृदांवन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.
 • मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णीमान्त महिना असलेले पंचाग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृदांवनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा केला जातो.
 • या उत्सवाचे साधारण स्वरूप पुढील प्रमाणे – कृष्णजन्माच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळणा सजवून रांगत्या श्रीकृष्णाची साग्रसंगीत पूजा केली जाते, भजन, किर्तन आणि प्रसाद वाटून कृष्णजन्म साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, दहिहंडी साजरी करून उत्सव केला जातो.
 • विशेष गोष्ट ही की, भारताच्या बाहेरील काही देशही हा उत्सव साजरा करताना दिसतात.
 • बांग्लादेश येथेही हा उत्सव साजरा करण्यात येतो. या देशातील ढाकेश्वरी मंदिरापासून एक यात्रा काढली जात असे.
 • नेपाळ सारखे हिंदू राष्ट्र हा उत्सव साजरा करतो.रात्री पर्यंत उपवास करून जन्माष्टमी साजरी केली जाते. भक्त भगवत गीतेचा अध्याय वाचतात, पुजा करतात, भजनं म्हणतात. कृष्णाच्या मंदिराला सजवले जाते.
 • याशिवाय फिजी या देशातही कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाते.

दहीहंडी उत्सवासंबंधीत नियम

दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथक आठ ते नऊ थर लावून हंडी फोडतात सर्वात वरच्या थरावर लहान मुलांना ठेवले जाते. त्यामुळे या गोविंदा पथकातील अनेक गोविंदा जखमी होत असतात. काहींचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी ठराविक असे नियम केले आहे ते खालील प्रमाणे –

 • सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केले.
 • २०१७ मध्ये १४ वर्षाखालील मुलांना दहीहंडी मध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. असा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला.
 • त्यानंतर किमान १८ वर्षे वयाची अट घालून या दहीहंडीमध्ये मुलांना सहभागी करून घेतले.
 • ठराविक उंचीवर दहीहंडी बांधावी.

गोपाळकालाचे पदार्थ

काला

एक कप जाडे पोहे, एक कप चुरमुरे, अर्धा कप काकडीच्या बारीक फोडी, पाव कप भाजके डाळ, पाव कप तळलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, कोथिंबीर, लिंबू रस अर्धा चमचा, किसलेले आले, मीठ एक चमचा, साखर दोन चमचे, बेदाणे, पाव कप डाळिंबाचे दाणे आणि पाव कप दही सगळे एकत्र करणे आणि कृष्णाला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटणे.

गोपाळकालाचे पदार्थ

सुंठवडा

काजू, बदाम, पिस्ता आणि खोबरे यापासून बनवलेला पदार्थ म्हणजे सुंठवडा. स्वादिष्ट आणि गोड पदार्थ पौष्टिक असा आहे. गोकुळाष्टमीला मोठ्या प्रमाणात बनवला जातो आणि प्रसाद म्हणून वाटला जातो. यासाठी साधारणपणे २० मिनिटे लागतात. खोबरे, बदाम, काजू, खारीक, सुंठ पावडर, बडीशेप, खडीसाखर, मनुका, पिस्ता यापासून हा सुंठवडा तयार केला जातो. आणि तो गोपाळकाल्याच्या दिवशी सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

गोपाळकाला बद्दल 15 मनोरंजक तथ्ये

जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमी, सातम आथम, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्रीकृष्ण जयंती आणि श्रीजयंती असेही संबोधले जाते.

 • भारतात, उत्तर प्रदेशातील मथुरा या उत्तर भारतीय शहरात, जिथे कृष्णाचा जन्म झाला आणि गोकुळ, मथुरेच्या आग्नेय-पूर्वेस 15 किमी, जेथे भगवान वाढले होते तेथे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केलं जातो.
 • मथुरेत नंदगोपालांना समर्पित ४०० हून अधिक मंदिरे आहेत. मथुरेतील जुळे शहर वृंदावन येथेही मोठ्या प्रमाणावर उत्सव होत असतात.
 • गोकुळाष्टमी दक्षिण भारतात देखील साजरी केली जाते जेथे भक्त ‘प्रसाद’ म्हणून कृष्ण फळ देतात आणि भक्तिगीते गातात. बाल-गोपाल (बाळ कृष्ण) चे प्रतीक असलेल्या पिठापासून बनवलेल्या लहान पावलांच्या ठशांनी मजले सजवले जातात.
 • महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील राज्यात, सणाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘दही-हंडी’. जन्माष्टमीच्या दिवशी एकट्या मुंबईत 4000 हून अधिक “दही-हंडी” कार्यक्रम आयोजित केले जातात; त्यापैकी सर्वात लोकप्रिय गिरगाव, दादर, लोअर परळ, वरळी आणि लालबाग येथे आयोजित केले जातात. हा कार्यक्रम कृष्णा आणि त्याच्या मित्रांनी लोणी चोरल्याचे प्रतीक आहे.
 • कृष्णाचे राज्य मानले जाणारे गुजरात, विशेषत: द्वारकाधीश मंदिरात हा सण साजरा करतात.
 • पूर्वेकडील ओडिशा राज्यांमध्ये, विशेषत: पुरी आणि पश्चिम बंगालमध्ये, विशेषत: मायापूर आणि नबद्वीपमध्ये, भक्त मध्यरात्रीपर्यंत (कृष्णाच्या जन्मापर्यंत) उपवास करून, परमेश्वराची पूजा करून, भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण करून दिवस पाळतात. महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुनासोबत कृष्णाची युद्धभूमीवरील चर्चा), भक्तिगीते गाणे आणि “हरे कृष्ण” आणि “हरी बोल” चा जप करतात .
 • केवळ भारतातच नाही तर परदेशातही जन्माष्टमी साजरी केली जाते. खरं तर, सिंगापूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. लिटिल इंडिया ते कालांगपर्यंत पसरलेल्या सेरंगून रोडवर “हरे कृष्ण” घोषात धार्मिक मिरवणुका काढल्या जातात. लिटल इंडिया जिल्ह्यातील चंदर रोड येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरातही उत्साही उत्सव साजरा केला जाऊ शकतो.
 • कॅनडातील भारतीय समुदाय, विशेषत: टोरंटो येथे राहणारे, कृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने रिचमंड हिल मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.
 • पाकिस्तानी हिंदू देखील कराचीतील श्री स्वामीनारायण मंदिरात कृष्णावरील भजन आणि प्रवचनांसह सण साजरा करतात.
 • मुख्यत्वे मुस्लिम देश असूनही, मलेशियामध्ये, विशेषत: क्वालालंपूरमधील भगवान कृष्ण मंदिरात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
 • पॅरिस आणि फ्रान्सच्या इतर भागात राहणारे भारतीय, त्यांची घरे आणि मंदिरे सजवतात आणि मध्यरात्री घड्याळ वाजताच, गोपाल (बाळ कृष्ण) यांच्या मूर्तींना गंगाजलाने स्नान घालतात जे त्यांना विशेषतः भारतातून मिळते. मग मूर्तींना पाळणा घालून झुलवले जाते, तर शंख फुंकला जातो.
 • नेपाळमध्ये, पाटण दरबार स्क्वेअर येथे असलेल्या प्रसिद्ध कृष्ण मंदिरात उत्सव आयोजित केला जातो जेथे भक्त फुले, “प्रसाद” (अन्न) आणि नाणी देवाला अर्पण करतात.
 • लंडनमध्ये दोन दिवस हा उत्सव सुरू असतो. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (ISKCON) चे यूके मुख्यालय, भक्तिवेदांत मनोर येथे जन्माष्टमी उत्सवात 60,000 हून अधिक लोक उपस्थित होते.
 • जन्माष्टमी साजरी यूएस मध्ये देखील आयोजित केली जाते, विशेषतः न्यूयॉर्क, ऑर्लॅंडो, कॅलिफोर्निया आणि मॅसॅच्युसेट्स येथे.
 • जन्माष्टमी ही बांगलादेशातील राष्ट्रीय सुट्टी आहे. 1902 पासून, राजधानी ढाका येथे असलेल्या ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरातून धार्मिक मिरवणूक काढली जाते, जी जुन्या ढाका रस्त्यावरून जाते.

गोपाळकाला माहिती मराठी प्रश्न

गोपाळकाला कधी आहे?

०७ सप्टेंबर 2023 या दिवशी गोपाळकाला आहे.

दहीहंडी उत्सव का साजरा केला जातो?

कृष्णाला दही लोणी दूध हे पदार्थ खूप आवडायचे यासाठी तो गावातील घरांमध्ये चोरी करायचा या त्याच्या बाल वीलांची आठवण म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो.

दहीहंडीचे दुसरे नाव काय?

दहीहंडी चे दुसरे नाव गोपाळकाला असे आहे.

दहीहंडीला कोणते पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत?

दहीहंडीला काला आणि सुंठवडा हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

दहीहंडी माहिती मराठी निष्कर्ष

मित्रांनो, या लेखाद्वारे आम्ही गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी या सणाबाबत संपूर्ण माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला दहीहंडी माहिती मराठी हा लेख वाचून कसा वाटला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment