जव्हार संपूर्ण माहिती मराठी : Jawhar Information In Marathi

जव्हार संपूर्ण माहिती मराठी : Jawhar Information In Marathi – जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील अप्रतीम हिल स्टेशन असून या ठिकाणी असलेल्या दऱ्या, घनदाट जंगले व विलोभनीय हवामान यामुळे महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला एक अलौकिक सौन्दर्य प्राप्त झाले आहे. निसर्ग सौन्दर्याप्रमाणेच जिवंत वारली चित्रांसाठी लोकप्रिय हे ठिकाण लोकप्रिय असून, महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रकला इथे याची देही यांची डोळा अनुभवता येते. हनुमान मंदिर, सनसेट पॉईंट, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, जय विलास पॅलेस इत्यादी इथली आकर्षणे असून, याला ठाणे जिल्ह्यातील प्रतिमहाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते.

Jawhar Information In Marathi
Jawhar

Table of Contents

जव्हार संपूर्ण माहिती मराठी : Jawhar Information In Marathi

ठिकाण –जव्हार
तालुका –पालघर
जिल्हा –ठाणे
ऊंची –१४६६ फूट
ओळख –थंड हवेचे ठिकाण
पिन –401 603

हे पर्यटन स्थळ मुंबई, नाशिक आणि गुजरात या राज्यांच्या जवळ असणारे हिल स्टेशन आहे. रोजच्या तणामुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवण्यासाठी जव्हार हे महाराष्ट्रातील अस्पर्शी हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.

वर्षभर या ठिकाणी निसर्गाने भारून गेलेले वातावरण असल्याने विकेंडला बरेच पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात हे गाव आहे. सह्याद्री पर्वत रांगेत असलेले हे पर्यटन स्थळ मुंबई पासून जवळ असून नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचा एक भाग आहे. जव्हार या हिल स्टेशनचे निसर्ग सौंदर्य महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशनशी तुल्यबळ आहे. या गावाला १४ व्या शतकातील सांस्कृतिक इतिहास देखील आहे.

जव्हार नकाशा

मुख्य शहर ते जव्हार अंतर

 • मुंबई ते जव्हार अंतर – मुंबईपासून अंतर साधारणतः १५० किलोमीटर इतके असून प्रवासासाठी साधारणतः दोन ते तीन तास लागू शकतात.
 • पुणे ते जव्हार अंतर – पुण्यापासून अंतर साधारणतः २५० किलोमीटर इतके असून यासाठी पाच ते सहा तास लागू शकतात.

जव्हार पर्यटनासाठी कालावधी/दिवस

या ठिकाणी असलेली प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः २ ते ३ दिवस लागू शकतात.

जव्हार पर्यटन माहिती व्हिडिओ

जव्हार का प्रसिद्ध आहे ?(Why Jawhar Is Famous)

हे ठिकाण मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैन्यांसाठी सुरतच्या मार्गावर कॅम्पिंग पॉईंट म्हणून काम करत होते. जव्हार हे ठिकाण वारली चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रशैलीमध्ये स्थानिक आदिवासी लोक त्यांच्या दैनंदिन जीवनातील दृश्ये चित्रित करतात. या चित्रांच्या वाढत्या व्यवसायिक लोकप्रियतेमुळे, वारली पेंटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग वापरतात. इथे ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. ज्यामध्ये जय विलास पॅलेस, दाभोसा धबधबा, भोपटगड किल्ला, हनुमान पॉईंट, काळमांडवी धबधबा, सनसेट पॉईंट अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

जव्हार मधली प्रेक्षणीय स्थळे (Places To Visit In Jawhar)

१. जयविलास पॅलेस (Jayvilas Palace Jawhar Or Jawhar Palace)

Jayvilas Palace Jawhar
Jayvilas Palace Jawhar

येथील जय विलास पॅलेस हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. हा अप्रतिम नावीन्यपूर्ण शैलीचा राजवाडा राजा यशवंत राव मुकणे यांनी बांधला होता. राजबारी असेही या राजवाड्याला म्हणतात आणि तो मुकणे राजघराण्याचा निवासी राजवाडा होता. गुलाबी दगडांमध्ये पाश्चात्य आणि भारतीय वास्तुकलेचे मिश्रण असलेला हा भव्य राजवाडा टेकडीच्या माथ्यावर बांधलेला असून वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मुकणे घराण्यातील आदिवासी राजांची समृद्ध संस्कृती आणि त्यांची जीवनशैली या वाड्याच्या आतील भागात दिसून येते. हा वाडा घनदाट जंगल असलेल्या बागेने वेढलेला आहे.

२.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिरपामाळ (Shirpamal Jawhar)

Shirpamal Jawhar
Shirpamal Jawhar

सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौषुद्ध द्वितीय ३१ डिसेंबर १६६४ रोजी जव्हार येथील शिरपामाळ येथे भेट दिली. तेव्हापासून हे ठिकाण एक ऐतिहासिक वास्तू बनले आहे. १ मे १९९५ रोजी मुकणे यांनी या ऐतिहासिक क्षणाची अविस्मरणीय स्मृती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी स्मारक उभारले.

३. दाभोसा धबधबा (Dabhosa Waterfall Jawhar)

Dabhosa Waterfall Jawhar
Dabhosa Waterfall Jawhar

या धबधब्याला महाराष्ट्राचा नायगरा धबधबा म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असलेल्या धबधब्यांपैकी दाभोसा धबधबा हा एक आहे. दाभोसा-दादरकोपारा-धबधबा हा जव्हार-तलासरी-सिल्वासा रोडवरून १८ किमी अंतरावर आहे. दाभोस हा धबधबा लेंडी नदीवर आहे आणि दादरकोपारा धबधबा सरसून नदीच्या पलीकडे आहे. उन्हाळ्यात दादरकोपारा फॉल कोरडा पडतो, म्हणून त्याला सुका धबधबा असेही म्हणतात. 

दाभोसा धबधबा सुमारे ३०० फूट उंच आहे. लेंडी नदीचे पाणी प्रथम छोट्या आकाराच्या खडकातून वाहते आणि तेथून ते खडकांपासून बन]लेल्या उघड्या नैसर्गिक पात्रात अतिशय उंचावरून खाली कोसळते. धबधबे दोन्ही बाजूंनी सरळ पर्वतांनी वेढलेले आहेत आणि या बाजूंना हिरवीगार वनराई आहे.

दाभोसा धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून हा बारमाही धबधब्यांपैकी एक आहे. उंचावरून कोसळणाऱ्या जलप्रपातामुळे तयार झालेला होड सुद्धा खरोखरच एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

४. काळमांडवी धबधबा (Kalmandavi Waterfall Jawhar)

Kalmandavi Waterfall Jawhar
Kalmandavi Waterfall Jawhar

हा एक रहस्यमही धबधबा असून याची चढण पातळी ही खूप कठीण आहे. काळमांडवी धबधबा जवळपास १०० मीटर उंचीचा आहे आणि हा सुद्धा बारमाही आहे. पावसाळ्यात या ठिकाणी भेट देणे एक अनोखी पर्वणीच आहे. जव्हार ते काळमांडवी- जव्हार-झाप रस्त्याने हा धबधबा अंदाजे ५-६ किमी अंतरावर आहे.

५. खडखड धरण (Khadkhad Dam)

Khadkhad Dam
Khadkhad Dam jawhar

हे धरण लोकप्रिय असून, एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. धरणाचे अतिरिक्त पाणी मोठ्या खडकांमधून वाहते आणि धबधब्याच्या रूपात दिसते.

६. जयसागर धरण (Jaysagar Dam)

Jaysagar Dam
Jaysagar Dam

जयसागर धरण हे कॅम्पिंग साठी व पिकनिक स्पॉटसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा फॅमिली सोबत या ठिकाणी तुमचा वेळ घालवू शकता. हे धरण १९५६ मध्ये रॉयल फॅमिली यांनी जव्हार शहराला पाणी पुरवठ्याच्या हेतूने स्वखर्चाने बांधले होते.

७. सनसेट पॉईंट (Sunset Point Jawhar)

Sunset Point Jawhar
फोटो क्रेडिट

निसर्गप्रेमींसाठी व उत्तम दर्जांच्या फोटोशूटसाठी जव्हारमधील सनसेट पॉईंट हे उत्तम ठिकाण आहे. शहराच्या मध्यापासून पश्चिमेकडे अर्धा किमी अंतरावर, सनसेट पॉइंट नावाचे ठिकाण आहे. सनसेट पॉईंटच्या सभोवतालच्या दरीचा आकार धनुष्यासारखा आहे, म्हणून पूर्वी ते धनुकमळ म्हणून ओळखले जात असे. 

८. हनुमान पॉईंट (Hanuman Point Jawhar)

Hanuman Point Jawhar

हे एक अतिप्राचीन हनुमान मंदिर आहे. यामुळे या जागेला हनुमान पॉईंट असे नाव पडले. हे मंदिर पर्वताच्या माथ्यावर असल्यामुळे, माथ्यावरून जव्हार शहराचे डोळ्यात टिपून घेण्यासारखे दृश्य दिसते. शहराच्या पूर्वेला, शहराच्या मध्यभागी दोन किमी अंतरावर, मारुतीचे जुने मंदिर आहे. इथे असलेल्या  निवडुंगाच्या गडद जंगलामुळे हे मंदिर कात्या मारुती मंदिर म्हणून ओळखले जाते. 

मंदिर तिन्ही बाजूंनी दऱ्यांनी वेढलेले आहे. या दरीची खोली जवळपास ५०० फूट आहे. इथे नूतनीकरणादरम्यान एक व्ह्यू पॉइंट तयार करण्यात आला, जो हनुमान पॉइंट म्हणून ओळखला जातो. दिवसा इथून शहापूर माहोलीचा ऐतिहासिक किल्ला पाहता येतो, तर रात्रीच्या वेळी कसारा घाटात रेल्वेचे दिवे पाहता येतात. या खोऱ्याला देवकोबाचा कडा असेही नाव आहे.

९. भूपतगड माहिती मराठी (Bhupatgad Jawhar)

Bhupatgad Jawhar
Bhupatgad Jawhar

जव्हार संस्थानातील राजधानी असलेला ऐतिहासिक भूपतगड. गडावर आजमितीस बुरुज, तटबंदी, जोते, वाड्याच्या भिंती, पाण्याची टाकी, तलाव, मारुती मंदिर आदी अवशेष आहेत. जव्हारच्या मुकणे राजांनी सुरत मोहीमेस जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वागत करुन मानाचा शिरपेच दिला होता.

जव्हार जवळ करण्यासारख्या गोष्टी (Things To Do At Jawhar)

 • फोटोशूट
 • दाभोस धबधबा ट्रेकिंग
 • जव्हार शॉपिंग
 • बोटिंग
 • भोपाटगड किल्ला ट्रेकिंग
 • वारली चित्रशैली पाहणे
Things To Do At Jawhar

जव्हारला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी (Best Time To Visit Jawhar)

पावसाळा – जर तुम्ही इथले धबधबे व पावसाळ्यातील आल्हाददायक क्षण एक्सप्लोर करू इच्छिता, तर त्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा सीझन सर्वोत्तम ठरू शकतो.

हिवाळा – जर तुम्ही हिवाळ्यामध्ये हे हिल स्टेशन एक्सप्लोर करू इच्छिता तर नोव्हेंबर ते जानेवारी हा कालावधी सर्वोत्तम आहे.

टिप – जव्हार एक्सप्लोर करण्यासाठी इथे तुरळक प्रमाणात बसच्या सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे  जव्हार एक्सप्लोर करण्यासाठी वैयक्तिक गाडी, फोर व्हीलर, बाइक किंवा कॅब ऑटो बुक करूनच तुम्हाला प्रवास करता येईल.

जव्हार मध्ये खरेदी काय कराल?

हे ठिकाण आदिवासी कला व संस्कृती यांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे, या ठिकाणी हस्तकलेपासून बनवलेल्या वस्तू, वारली चित्रे, लाकडाच्या वस्तू, बांबूची बासरी इत्यादी विविध वस्तूंची खरेदी करू शकता.

जव्हारमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा

 • मराठी
 • हिंदी
 • आदिवासी

जव्हार एक्सप्लोर करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

हे हिल स्टेशन एक्सप्लोर करण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे.

 • गरम व उबदार कपडे जसे की स्वेटर जॅकेट जर्किन इत्यादी.
 • पावसाळ्याच्या काळामध्ये रेनकोट छत्री देखील सोबत ठेवावी.
 • पावसाळ्याच्या काळामध्ये जव्हार धबधबे एक्सप्लोर करताना, चप्पलचा वापर करू नये. कारण चप्पल घसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे तुम्ही चांगल्या दर्जाचे बूट वापरणे सोयीचे ठरते.
 • जव्हार एक्सप्लोर करतेवेळी स्वतःसोबत काही खाण्याच्या गोष्टी जसे की बिस्कीट केक चॉकलेट व पाण्याच्या बॉटल्स ठेवाव्यात जेणेकरून गरजेच्या वेळी या गोष्टींचा वापर करू शकता.
 • मेडिकल किट्स अर्थात फर्स्ट एड बॉक्स सोबत ठेवावा जेणेकरून काही इजा झाल्यास तुम्ही प्रथमोपचार घेऊ शकता.
 • योग्य ते कपडे परिधान करावे व जादा कपड्यांचे व बुटांचे जोड सोबत ठेवावे.

जव्हार एक्सप्लोर करण्यासाठी कसे जाल?

जव्हारला जाण्यासाठी तुमच्याकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत. ते खालील प्रमाणे –

१. रेल्वे मार्ग

जव्हारला जाण्यासाठी इगतपुरी हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन असून, जव्हार पासून हे रेल्वे हे रेल्वे स्टेशन साधारणतः ७० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तसेच जव्हार जाण्यासाठी दुसरे जवळचे रेल्वे स्टेशन हे डहाणू रोड आहे. जे की साधारणतः ६५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांपासून तुम्हाला टॅक्सीची किंवा लोकल बसची सेवा उपलब्ध आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही टॅक्सी किंवा लोकल बसने जाऊ शकता.

२. हवाई मार्ग

जव्हार जर तुम्ही हवाई मार्गाने जात असाल, तर नाशिक हे सगळ्यात जवळचे विमानतळ जव्हारपासून साधारणतः ८० किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळाने जव्हार या हिल स्टेशनला भेट देत असाल, तर मुंबई विमानतळ हे जवळील विमानतळ आहे. जे की साधारणतः १५० किलोमीटर इतके अंतरावर आहे. या दोन्हीही एअरपोर्टवरून टॅक्सीच्या सोयी उपलब्ध आहे.

३. रस्ते मार्ग

जर तुम्ही रस्ते मार्गाने जव्हार या हिल स्टेशनला भेट देत असाल, तर जव्हार हे मुख्य शहरांना वेल कनेक्टेड आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक गाडीने किंवा बाईकने जव्हार हिल स्टेशनला जाऊ शकता.

जव्हार जवळ राहण्याची सोय

१. प्रकृती ऍग्रो फार्म

या हॉटेल्स मध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार कम्फर्टेबल व पारंपारिक पद्धतीच्या रूम्स मिळतील. या हॉटेलमध्ये एक आउटडोर स्विमिंग पूल सुद्धा आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी घरगुती बनवलेल्या खाद्यपदार्थांचा स्वाद चाखू शकता. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून जव्हार शहरातील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी हे हॉटेल एक उत्तम पर्याय आहे.

२. सनसेट पॉईंट रिसॉर्ट

सनसेट पॉईंट रिसॉर्ट हे एक उत्तम दर्जाचे रिसॉर्ट असून, शालेय सहल कॉलेज सहल व ऑफिशियल आउटिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. या रिसॉर्ट मध्ये तुम्हाला स्वादिष्ट जेवणासोबत उत्तम दर्जाच्या सुखसोयी सुद्धा उपलब्ध आहेत. या रिसॉर्टमध्ये तुम्हाला मिनीबार स्विमिंग पूल, गार्डन इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या हॉटेलची खासियत म्हणजे हे हॉटेल गुजराती आदरतिथ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

३. स्टर्लिंग नेचर ट्रेलस् दाभोसा

या रिसॉर्ट मधून तुम्ही दाभोसा धबधब्याच्या विहिंगम दृश्यांचा नजारा पाहू शकता. या रिसॉर्ट मध्ये तुम्ही घरगुती जेवणाची चव चाखू शकता. त्याचप्रमाणे विविध साहसी अनुभव घेऊ शकता.

४. सिंफोनी लेक व्ह्यू रिसॉर्ट

हे रिसॉर्ट एक योग्य ठिकाण असून या रिसॉर्टमध्ये तुम्ही घरासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला घरगुती जेवणाचा स्वाद चाखता येईल.

५. शांती सरोवर रिसॉर्ट

हे रिसॉर्ट जयसागर धरणाच्या जवळच स्थित आहे. हे ठिकाण विविध सोयी सुविधांनी व लक्झरीयस गोष्टींनी परिपूर्ण आहे.

FAQ

जव्हार ते पुणे अंतर व लागणारा आवश्यक कालावधी किती ?

पुणे ते जव्हार हे अंतर साधारणतः २५० किलोमीटर इतके असून यासाठी तुम्हाला पाच ते सहा तास लागू शकतात.

जव्हार मधील प्रेक्षणीय स्थळे कोणती ?

जयविलास पॅलेस
दाभोसा धबधबा
काळमांडवी धबधबा
खडखड धरण
जयसागर धरण
सनसेट पॉईंट
हनुमान पॉईंट
भूपतगड

जव्हारला भेट देण्यासाठी उत्तम महिना कोणता ?

जर तुम्ही जव्हारमधले धबधबे व पावसाळ्यातील आल्हादायिक क्षण एक्सप्लोर करू इच्छिता, तर त्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा कालावधी सर्वोत्तम ठरू शकतो.

आणि जर तुम्ही हिवाळ्यामध्ये जव्हार हे हिल स्टेशन एक्सप्लोर करू इच्छिता तर नोव्हेंबर ते जानेवारी हा कालावधी सर्वोत्तम आहे.

जव्हारला तुम्ही हवाई मार्गे कसे जाता येते ?

जर तुम्ही हवाई मार्गाने जात असाल, तर नाशिक हे सगळ्यात जवळचे विमानतळ जव्हारपासून साधारणतः ८० किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळाने जव्हार या हिल स्टेशनला भेट देत असाल, तर मुंबई विमानतळ हे जवळील विमानतळ आहे. जे साधारणतः १५० किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्हीही एअरपोर्टवरून टॅक्सी उपलब्ध आहेत.

निष्कर्ष

जव्हार माहिती मराठी या लेखातून आम्ही आपणास जव्हार मधील प्रेक्षणीय स्थळे, राहण्याची सोय, तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता, हे दिले आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कसा वाटला हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा.

धन्यवाद.

फोटो गॅलरी – जव्हार हिल स्टेशन च्या अप्रतीम फोटोंसाठी इथे क्लिक करा.

Leave a comment