लोणावळा व खंडाळा संपूर्ण माहिती मराठी : Lonavala and Khandala Information In Marathi

लोणावळा व खंडाळा संपूर्ण माहिती मराठी : Lonavala and Khandala Information In Marathi – मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील ही दोन्ही ठिकाणे थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत. या दोहोत केवळ पाच कि.मी. इतकेच अंतर आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते.

हिवाळयात तर धुकं लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळयात जांभूळ आणि करवंदीची लयलूट असते. आम्ही आमच्या मराठी झटका या वेबपेजच्या माध्यमातून विविध विषयावर लेख घेऊन येत असतो. आम्ही आमच्या लेखातून लोणावळा व खंडाळा या प्रसिद्ध हिल स्टेशन बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही हा लेख नक्की वाचा.

 Lonavala and Khandala Information In Marathi

Table of Contents

लोणावळा व खंडाळा संपूर्ण माहिती मराठी : Lonavala and Khandala Information In Marathi

गाव लोणावळा व खंडाळा
तालुका मावळ
जिल्हा पुणे
महत्व पर्यटन स्थळ
प्रसिद्ध का आहे हिल स्टेशन
प्रसिद्ध पदार्थ चिक्की

खंडाळा महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम घाटात खंडाळा हे पर्यटन स्थळे प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ठिकाण लोणावळा या पर्यटन स्थळापासून खंडाळा हे ठिकाण साधारणतः तीन किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

खंडाळा आणि लोणावळा ही पर्यटन स्थळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन म्हणून ही यांची ओळख आहे. मुंबई पुण्याबरोबरच देशातून बरेच पर्यटक या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी वर्षातून एक वेळेस तरी लोणावळा व खंडाळा या दोन पर्यटन स्थळांना भेट द्यायला पाहिजे.

बोरघाट जिथे संपतो, ते ठिकाण म्हणजे खंडाळा. सह्याद्री पर्वताच्या उंच टेकडीवर खंडाळा हे गाव वसलेले आहे. रोजच्या तणाव मुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी व मन शांत करण्यासाठी खंडाळा हे हिल स्टेशन अतिशय मोहक पर्यटन स्थळ आहे. एकदा वेळेस वेळ काढून नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या, खंडाळा या गावाच्या जवळूनच मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व भारतीय रेल्वे मार्ग जातो. मुंबई पुणे व खंडाळा जवळच्या भागातील बरेच तरुण पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येऊन, पिकनिकचा आनंद घेत असतात.

लोणावळा आणि खंडाळा नकाशा

लोणावळा आणि खंडाळा ही महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दोन वेगळी पण जवळची हिल स्टेशन्स आहेत. जरी ते भिन्न शहरे आहेत, परंतु त्यांच्या निकटतेमुळे आणि सामायिक वैशिष्ट्यांमुळे त्यांना सहसा एकत्र म्हटले जाते.

भौगोलिकदृष्ट्या लोणावळा आणि खंडाळा

लोणावळा आणि खंडाळा ही शहरे एकाच प्रदेशात काही किलोमीटर अंतरावर आहेत. ही शहरे पश्चिम घाटात असून भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर जाणारी पर्वत रांगेत आहेत. लोणावळा जवळपास 622 मीटर (2,041 फूट) उंचीवर आहे, तर खंडाळा अंदाजे 550 मीटर (1,804 फूट) उंचीवर आहे.

पर्यटनदृष्ट्या लोणावळा आणि खंडाळा

प्रसिद्ध का आहे – ही दोन्ही शहरे गेल्या काही वर्षांत लोकप्रिय पर्यटन स्थळे म्हणून विकसित झाली आहेत. या ठिकाणी लक्झरी रिसॉर्ट्स, बजेट हॉटेल्स आणि होमस्टेसह विविध प्रकारच्या निवासांची सोय आपल्याला दिसून येते. विविध प्राधान्ये आणि बजेटची पूर्तता या ठिकाणी करण्यात येते. शहरांमध्ये चैतन्यमय वातावरण असते, विशेषत: आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या काळात जेव्हा पर्यटक आनंददायी हवामान आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात.

वाहतूकदृष्ट्या लोणावळा आणि खंडाळा

लोणावळा आणि खंडाळा ही शहरे रस्ते आणि रेल्वेने चांगले जोडलेली आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, एक प्रमुख महामार्ग, दोन्ही शहरांमधून जातो, ज्यामुळे त्यांना मुंबई आणि पुण्यातून सहज प्रवेश करता येतो. याव्यतिरिक्त, लोणावळा रेल्वे स्थानक हे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील एक प्रमुख थांबा आहे, ज्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी आणखी वाढते.

लोणावळा – पर्यटनस्थळ

लोणावळा आणि खंडाळा ही दोन्ही ठिकाणे त्यांच्या निसर्गसौंदर्यासाठी, हिरवीगार निसर्गदृश्ये, धुक्याच्या टेकड्या आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहेत. तेथील आश्चर्यकारक दृश्ये, धबधबे, तलाव आणि ट्रेकिंगचे ट्रेल्स देतात. ही शहरे जवळ जवळ असल्यामुळे, एका शहरातील अनेक आकर्षणे दुसऱ्या शहरातून सहज उपलब्ध आहेत. येणारे पर्यटक अनेकदा त्यांच्या सहलीदरम्यान लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही गोष्टी शोधतात.

 खंडाळ्याचा इतिहास

पहिल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी यांनी खंडाळ्याच्या आसपासच्या प्रदेशावर राज्य केले.   पुढे, राज्य मराठ्यांच्या दुसऱ्या साम्राज्याचे संस्थापक असलेल्या पेशव्यांच्या हाती गेले. शेवटी इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव करून खंडाळा ताब्यात घेतला.

लोणावळा इतिहास

लोणावळ्याचा इतिहास प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो जेव्हा तो यादव वंशाचा एक भाग होता. या प्रदेशात सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांसह अनेक शासक राजवंशांचा उदय आणि पतन झाला. यादवांच्या कारकिर्दीतच लोणावळ्याला त्याच्या फायदेशीर स्थानामुळे व्यापारी केंद्र आणि एक सामरिक लष्करी चौकी म्हणून महत्त्व प्राप्त झाले.

लोणावळा हे नाव संस्कृत शब्द “लोणावली” वरून आले आहे, ज्याचा अनुवाद “गुहांचा समूह” असा होतो. हे नाव योग्य आहे कारण या प्रदेशात अनेक प्राचीन लेणी आहेत या लेणी परिसराच्या समृद्ध सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशाचा पुरावा आहेत.

लोणावळा व खंडाळा भुगोल

खंडाळा हे बोरघाटाच्या वरच्या टोकाला स्थित आहे, जो दख्खनचे पठार आणि कोकण मैदान यांच्यातील रस्त्याच्या दुव्यावर एक प्रमुख घाट (म्हणजे मराठीत दरी) आहे. घाटातून मोठ्या प्रमाणात रस्ते आणि रेल्वे वाहतूक होते.

लोणावळा आणि लगतच्या खंडाळा ही समुद्रसपाटीपासून 622 मीटर (2,041 फूट) उंचीवर असलेली दुहेरी हिल स्टेशन्स आहेत, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये जी दख्खनचे पठार आणि कोकण किनारपट्टीचे सीमांकन करतात. हिल स्टेशन्स अंदाजे 38 चौरस किलोमीटर (15 चौरस मैल) क्षेत्रफळात पसरलेली आहेत. पावसाळ्यात पर्यटन शिखरावर असते.

लोणावळा व खंडाळा
लोणावळा व खंडाळा

मुख्य शहर ते लोणावळा, खंडाळा, अंतर

खंडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटातील एक हिल स्टेशन आहे, लोणावळ्यापासून सुमारे 3 किलोमीटर (1.9 मैल), खोपोलीपासून 12 किलोमीटर आणि कर्जतपासून 33.4 किलोमीटर (20.8 मैल) अंतरावर आहे.

 • pune to lonavala distance – १ ता १४ मि (६७.२ किमी)
 • mumbai to lonavala distance२ ता २ मि (८३.० किमी) मुंबई – पुणे राजमार्ग द्वारे
 • mumbai to khandala distance १ ता ५५ मि (७८.३ किमी) मुंबई – पुणे राजमार्गआणिNH 48 द्वारे
 • pune to khandala distance १ ता १९ मि (७१.१ किमी) मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग/मुंबई – पुणे राजमार्गआणिNH 48 द्वारे

लोणावळा खंडाळा मधील प्रेक्षणीय स्थळे – places to visit in lonavala and khandala

बऱ्याचदा लोक ज्यावेळी मुंबईवरून लोणावळ्याला जातात त्यावेळी खंडाळ्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टींना स्किप करतात कारण खंडाळा हा लोणावळ्या पेक्षा छोटा हिल स्टेशन आहे. मित्रहो लोणावळ्यांसोबत खंडाळ्यांमधील जे काही महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत ते तुम्ही एका दिवसामध्ये कव्हर करू शकता चला तर मग पाहूया लोणावळा व खंडाळा मधील  प्रेक्षणीय स्थळे

लोणावळा व खंडाळा

जुना खंडाळा घाट

मित्रहो खंडाळ्याला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक एक्सप्रेस रस्ता व दुसरा हा जुना खंडाळा घाट. ज्यावेळी तुम्ही एक्सप्रेस रस्ता निवडता त्यावेळी तुम्ही खंडाळ्यातील बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांना स्किप करता. आणि हा जो जुना खंडाळा घाट आहे हा प्रत्यक्षात तुम्हाला खंडाळा एन्जॉय करण्यासाठी मदत करतो.

पर्यटन स्थळे व प्रेक्षणीय स्थळे तुम्हाला या जुन्या खंडाळा घाटावरतीच पाहायला मिळते, खंडाळ्याला येण्यासाठी तुम्ही जुन्या खंडाळा घाटावरून बाईक किंवा कारने प्रवास करू शकता. पण जर तुम्ही एक्सप्रेस रस्त्याने प्रवास करत असाल तर तिकडे फक्त तुम्ही कारने प्रवास करू शकता. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये सूर्यास्त किंवा सूर्योदयाचे दर्शन घ्यायचे असेल व विलोभनीय दृश्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही नक्कीच जुन्या खंडाळा रस्त्याने प्रवास करावा.

Turning Point

या टर्निंग पॉईंट ला तुम्हाला एक्सप्रेस रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांची वळणे दिसतात व त्यासमोरील असणाऱ्या हिरवळ निसर्गमय दृश्याचा तुम्ही या पॉईंटच्या इथे थांबून आनंद घेऊ शकता. तुमची ट्रीप सुखद व स्मरणीय बनवण्याचा हा एक पॉईंट आहे.

टायगर पॉईंट

टायगर लीप किंवा टायगर पॉईंट या नावाने ओळखले जाणारे खंडाळ्यातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आंबेवाली कडे जाणाऱ्या रोडवर कुरवंडे नावाच्या ठिकाणी हे पर्यटन स्थळ आहे. वाघांनी ज्याला वाघदारी म्हणून ही ओळखले जाते. जी पर्यटकांच्या मनाला भुरळ पडते या दरीमध्ये तीक्ष्ण नजरेने पाहिले तर एखादा वाघ जणू काय दरीमध्ये उडी मारतोय असाच भास होतो.

टायगर पॉईंट ही एक टेकडी आहे जी संपूर्णपणे जंगलाने वेडलेली आहे. या ठिकाणी आपल्याला सुंदर धबधबे, पर्वत, हिरवीगार निसर्ग सौंदर्य आणि तलाव या सर्वांचा आनंद घेता येईल. खंडाळापासून साधारणता 13 किलोमीटर एवढे अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे.

आंबिवली

हे पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्यातील खंडाळापासून 25 किलोमीटर एवढे अंतरावर असलेले एक सुंदर ठिकाण आहे. आंबिवली हे ठिकाण सहारा परिवाराने विकसित केलेले आहे. हे ठिकाण जवळजवळ दहा एकर परिसरामध्ये आहे. खंडाळा या पर्यटन स्थळाला भेट देणारे पर्यटक हे आंबिवली या ही ठिकाणाला भेट देत असतात.

भुशी धरण

Bhushi Dam (भुशी धरण)
Bhushi Dam (भुशी धरण)

भुशी धरण हे ठिकाण खंडाळा मधील इंद्रायणी नदीवर असलेला चीनाई धरण आहे. भुशी धरण या पर्यटन स्थळी पावसाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक भेट देत असतात. भारतीय रेल्वेने भुशी धरणला खाजगी क्षेत्राच्या सहभागाने पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. खंडाळा या पर्यटन स्थळापासून भुशी धरण हा साधारणता आठ किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

पवना तलाव

खंडाळा मधील आकर्षक पर्यटन स्थळ पैकी पवना तलाव एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हा तलाव कृत्रिम प्रकाराचा तलाव आहे. जो खंडाळाच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये येतो. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक हिरवळीमुळे हे ठिकाण एक पिकनिक स्पॉट बनलेले आहे. साधारणतः खंडाळापासून 15 किलोमीटर एवढे अंतरावर असणारा पवना हा तलाव पर्यटकांना आकर्षित करत असतो.

 सुनील वॅक्स म्युझियम

म्युझियम लोणावळा मधील सुनील लिब्रिटी वॅक्स म्युझियम हे पर्यटन स्थळ पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या म्युझियममध्ये आपल्याला जगातील प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, अभिनेते आणि राजकारणी यांचे हुबेहूब मेणाचे पुतळे बनवलेले आहेत. म्युझियम मध्ये प्रतिव्यक्ती 150 रुपये एवढी फी आकारण्यात येते. तसेच हे म्युझियम सकाळी नऊ ते संध्याकाळी दहापर्यंत चालू असते. खंडाळापासून सुनील वॅक्स म्युझियम हे पर्यटन स्थळ 4  किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

लोणावळा खंडाळा मध्ये आजूबाजूस नजर फिरवली असताना डोंगरदर्‍यातून वाहणारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. उंच अशा डोंगरदर्‍यावरून पडणारे पाणी आपल्याला एक विलक्षण आनंद देऊन जाते. असाच येथे एक कुणे धबधबा आहे. जो त्याच्या उंचीमुळे पर्यटकांना आकर्षित करत असतो.

कुणे धबधबा

कुणे धबधबा हा भारतातील 14 क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. व या धबधब्याची उंची ही 1000 मीटर एवढी आहे. कुणे धबधबा हा अतिशय सुंदर धबधबा असून, पावसाळ्यात पर्यटकांना तो आकर्षित करत असतो. हा धबधबा पुणे मुंबई महामार्गापासून अगदी जवळ असून लोणावळापासून साधारणता 8 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

 इमॅजिका थीम पार्क

लोणावळा मधील इमॅजिका थीम पार्क हे पर्यटन स्थळ लहान मुलांबरोबर प्रौढ व्यक्तींसाठी देखील करमणुकीचे ठिकाण आहे. इमॅजिका पार्क महाराष्ट्रातील प्रमुख पार्कमधील एक पार्क आहे. या पार्कमध्ये असणारे वॉटर पार्क आणि थीम पार्क या सर्व गोष्टींचा पर्यटक मनमुराद आनंद घेत असतात. इमॅजिका वॉटर पार्क मधील वॉटर ऍक्टिव्हिटी खूपच विशेष आहेत. हा पार्क साधारणता लोणावळापासून 27 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

लायन्स पॉईंट

 लोणावळ्यातील लाइन्स पॉईंट हा लोणावळा पासून १२ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. हा पॉईंट भुशी धरण आणि आंबेवालीच्या मध्ये आहे. लाइन्स पॉईंट वरून दिसणारा नजर हा आपल्या मनाला एक वेगळीच शांती देऊन जातो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी डोंगरावर वाहणारे छोटे छोटे धबधबे, खळखळ वाहणारे नाले आणि तेथील निसर्गसौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करत असते. बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असतात.

राजमाची पॉईंट

राजमाची पॉईंट हे ठिकाण लोणावळापासून जवळच खंडाळाच्या घाटामध्ये आहे. राजमाची हे लोणावळा येथील मुख्य टुरिस्ट आकर्षण आहे. राजमाची हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावरूनच याला राजमाची पॉईंट असे नाव देण्यात आलेले आहे.

या ठिकाणावरूनच आपल्याला मावळ मधील राजमाची किल्ला पावसाळ्यात धबधबे हिरवेगार असे डोंगर झाडे हे आपल्या डोळ्यांचे पारणे पडत असतात. तसेच या ठिकाणावरून आपल्याला उत्कृष्ट अशा फोटोग्राफीचाही आनंद घेता येतो. राजमाची पॉईंटच्या जवळच गार्डन देखील आहे, तेथे देखील बरेच पर्यटक आपल्याला वेळ घालवत असताना दिसतात.

 कार्ला लेणी

कार्ला हे ठिकाण लोणावळापासून १२ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. डोंगरांमध्ये खडक खोदून निर्माण केलेल्या लेण्यांमध्ये ही एक प्रसिद्ध अशी लेणी आहे. या ठिकाणी एकवीरा देवीचे मंदिर देखील आहे. कठीण असा बेसाल्ट खडक फोडून अतिशय सुंदर असे नक्षीकाम आपल्याला येथे बघायला मिळेल. अखंड दगडात कोरलेला विजयस्तंभ, चित्त राजाबाहेर भिंतीवर हत्ती, स्त्री पुरुषाची मूर्ती, अशा प्रकारची भिंतीवरील नक्षीकाम बघत असताना मन अगदीच प्रसन्न होऊन जाईल. कार्ला लेण्या पाहण्यासाठी 30 रुपये एवढी फी आकारली जाते.

Dukes Nose

खंडाळ्याच्या जवळच Dukes Nose हे एक डोंगर शिखर आहे, ज्या ठिकाणाहून पर्यटक खंडाळा आणि बोरघाटाच्या नैसर्गिक सृष्टीचा सौंदर्याचा आनंद घेत असतात. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी येथे येणारे पर्यटक यासाठी भेट देतातच. खंडाळा हे ठिकाण मनाला मोहनी घालणारे पर्यटन स्थळ आहे.

 लोणावळ्यामधील कार्ला लेणी व आई एकविरा

लोणावळ्यामधील कार्ला लेणी व आई एकविरा
एकविरा आई

महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणजे आई एकवीरा देवी लोणावळा शहर हे तेथील निसर्गसौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे पण तितकेच लोणावळ्यापासून अवघ्या 10 किलोमीटरवरती असणाऱ्या आई एकवीरा देवीचे मंदिर आणि सर्वात प्राचीन बौद्ध लेणी म्हणजेच कार्ला लेणी यामुळे देखील लोणावळ्याची विशेष ओळख आहे.

एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी हे आई एकवीरा देवीचं गाणं तर सर्वश्रुतच आहे. एकविरा देवीचे महात्मेही खूप मोठा आहे, या देवीचे महत्व जितक मुंबई ठाणे रायगड आणि कोकण भागातल्या कोळी आगरी लोकांमध्ये आहे, तितकच महाराष्ट्रातल्या इतरही समाजात आहेत. कोळी समाजाबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातल्या लोकांकडून विशेषतः सीकेपी म्हणजेच चंद्रसेन्य, कायस्थ, प्रभू आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते.

तसेच काही कुणबी समाजाच्या लोकांची ही ती कुलदैवत आहे. याशिवाय सोनार, पाठारे, चौकशी पाचकळशी अशा अनेक समाजाची एकविरा आई कुलस्वामिनी देवी असल्यास सांगितले जातात. एकविरा देवी ही जलदेवता म्हणूनही प्रसिद्ध आहे. ज्या लोकांचा पाण्याची जास्त संबंध येतो म्हणजे कोळी, आगरी या समाजातल्या लोकांचा व्यवसाय हा संपूर्णपणे पाण्याची संबंधित असतो, आणि त्यामुळे त्या समाजाने आई एकविरेला कुलदैवत मानल आहे.

आई एकविरा क्षत्रिय, वैश्यक, शूद्र समाजाची कुलदेवता असल्याकारणाने ती अति प्राचीन देवता असावी असे इतिहास संशोधकांचे मत आहे. आई एकविरा मातेची कहाणीस कंदपुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण, यामधून सांगितली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला याचे वेगवेगळे संदर्भही मिळतात.

एकविरा देवीची काही प्रसिद्ध मंदिर आहेत जसं की अमरावतीचे एकविरा देवी मंदिर आहे. नागपूर जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. आणि यात विशेष उल्लेख असतो तो म्हणजे पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कार्ल्याजवळ असणाऱ्या एकवीरा देवीच्या मंदिराचा. हे मंदिर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि फक्त प्रसिद्धच नाही तर या मंदिराचा इतिहास सुद्धा फार प्राचीन आहे. इतिहासकारांसाठी हे मंदिर एक गूढ सुद्धा मानले जाते.  

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरात विहीर गाव कार्ला नावाने प्रसिद्ध असा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातला सर्वात प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान मानलं जातं एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा दोन मूर्ती या मंदिरात आहे. ननंद आणि भाऊजय असे दोघींचं नात आहे. जोगेश्वरी ही काळभैरवनाथाची बायको आहे म्हणजेच काळभैरवनाथ हे एकविरा आईचे भाऊ असल्याचे मान्यता आहे.

पुणे मुंबई महामार्गावरून लोणावळा शहरापासून जवळच कार्ल्याची ऐतिहासिक लेणी सुद्धा आहे पुण्याहून जाताना लोणावळ्याच्या अगोदर कार्ला फाटा लागतो, तिथून साधारण तीन किलोमीटर अंतरावर हे एकवीरा देवीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. देवीला एकवीरा देवी आणि एकविरा आई अशा दोन्ही प्रकारे संबोधले जातात.

एकविरा देवी बाबत आख्यायिका

एकविरा देवी बाबत काही आख्यायिका नेहमी एकायला मिळतात. त्यातली एक आख्यायिका ही महाभारत अशी संबंधित आहे. असं म्हणता पांडूराजाला पाचपुत्र होते, धर्मराज भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, अशी त्यांची नावे होती. त्यांना पाच पांडव या नावाने ही ओळखले जाई. ते वनवासाला निघाले होते ते वनात भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले, त्यावेळी त्यांच्यासमोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली. देवीने त्यांना या ठिकाणी माझं मंदिर बांधा असा दृष्टांत दिला, पण एका रात्रीतच मंदिर बांधायला हवं अशी त्यांना अटही घातली गेली होती.

या अटीचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीचे मंदिर बांधून पूर्ण केलं. आणि देवी प्रसन्न झाली या आख्यायिकेमुळे लोणावळा जवळच्या या एकवीरा देवीच्या मंदिराला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झाला आहे. हे आपल्या लक्षात येत अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर पूर्वी हेमाडपंती होतात या अति प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितलं जातं.

शिंग्रोबा धनगर आणि मुंबई पुणे राष्ट्रीय रेल्वे महामार्गाची उत्पत्ती

जगातल्या सगळ्यात रोमँटिक रस्त्यांमध्ये मुंबई पुणे या प्रवासाचा समावेश होतो हे नक्की. आणि यातही सगळ्यात विशेष आकर्षण असतं ते म्हणजे, खंडाळ्याचा बोरघाट पश्चिम महाराष्ट्राचा प्रवेशद्वारसह बाजूनी धबधबे वाहतात आणि सह्याद्रीचा ताटकपणा यातून वाट काढत मुंबई पुणे हा महामार्ग रेल्वे मार्ग जातो. अशा या रोमँटिक खंडाळ्याच्या घाटाच्या निर्माणास आज मात्र एका स्वातंत्र्यसैनिकाचे बलिदान कारणीभूत ठरले. शिंग्रोबा धनगर त्यांचं नाव.

 1850 च्या दरम्यान सकळ भारतावर इंग्रजांची पकड मजबूत झाली होती. या देशाची लूट करायची झाली तर आधी इथला व्यापार मजबूत करायचा आणि त्यासाठी रस्ते लोहमार्ग उभे करायचे हे ब्रिटिशांचे धोरण होतं. मुंबई ही ब्रिटिशांची आर्थिक राजधानी, तिला देशभरातून जोडायचं काम त्यांनी सुरू केले. त्या काळात मुंबईहून पुण्याला जायचं झालं तर तब्बल 18 तास लागायचे. या दोन्ही शहरांमध्ये रौद्ररूपी सह्याद्रीची पहाट रांग उभी होती. पण जिद्दी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ठरवलं या डोंगर रांगेतून घाट रस्ता तयार करायचा.

साधारण 1853 साली भारतातील पहिली रेल्वे मुंबई ठाण्याच्या दरम्यान धावली. तिला पुण्यापर्यंत नेण्याची महत्त्वाची योजना आखण्यात आली. खंडाळ्याच्या घाटाचा आव्हान कसं पार पाडायचं हा महत्त्वाचा प्रश्न होता, त्यासाठी एक खास कमिटी नेमण्यात आली. आणि तरुण तडफदार इंग्रज अधिकारी घाटाचा मार्ग शोधण्याच्या मोहिमेवर निघाली. खंडाळा पळस दरी इथल्या डोंगरदऱ्या तुडवत ही इंग्रजांची कमिटी मार्ग मार्ग शोधू लागली.

अनेक दिवस उलटले प्रचंड मेहनत घेऊन अनेक खस्ता खाऊन सुद्धा, त्यांना काही केल्या योग्य रस्ता सापडत नव्हता. जिद्दी अधिकाऱ्यांनी सुद्धा हात टेकले अखेर निराश होऊन ते काम अर्धवट सोडून जाण्याचा विचार त्यांनी पक्का केला, त्यांचेही चर्चा चालू होती तेव्हा तिथे एक साधासुधा धनगर आपल्या शेळ्या मेंढ्या चालत उभा होता, इथे काहीतरी शोधताय ते त्याच्या लक्षात आल, या डोंगराच्या कड्या कोपऱ्यातला खडा खडा ठाऊक होता.

त्यांनी सहज म्हणून त्या अधिकाऱ्यांना विचारलं मी तुम्हाला या परिसरात बऱ्याच दिवसांपासून बघतोय, तुम्ही काय करताय, मी काही मदत करू शकतो का, त्यावेळी इंग्रज म्हणाले आम्हाला मुंबई ते ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायचे आणि या रेल्वेचे जाळे पूर्ण भारतभर पसरवायचे, त्यासाठी आम्ही योग्य मार्ग शोधतोय पण काही केल्या रस्ता सापडत नाहीये. म्हणून हे काम अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार करतो.

त्यावेळी शिंग्रोबा म्हणाले एवढेच होय चला मी दाखवतो रस्ता तुम्ही फक्त माझ्या मागण या, इंग्रजांना नवल वाटलं त्यांनी शिंग्रोबांना विचारलं तू दाखवतोच रस्ता, खूप रस्ता काढत काढत पुढे चालू लागले त्यांच्या मेंढ्या आणि मेंढ्यांच्या मागे इंग्रज आल्या वाटेवर खुणा करत चालू लागले. असं करता करता अख्खा डोंगर पार झाला आणि शिंग्रोबांनी घाट पार करायला इंग्रजांना सोपा मार्ग दाखवला. मार्ग सापडल्याचा इंग्रज कमिटीला प्रचंड आनंद झाला म्हणाले आम्ही तुझ्यावर जाम खुश आहे. तुला काय पाहिजे असेल ते आम्ही तुला देऊ .

शिंग्रोबां म्हणाले मी धनाने धनगर तुम्हाला मला जर काही द्यायचं असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. स्वातंत्र्य द्या असे शब्द कानी पडतात क्रूर इंग्रजांनी बंदुकीची गोळी घालून शिंग्रोबां मारल .हे बलिदान व्यर्थ गेलं नाही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर खंडाळ्याचा बोरघाट उभा राहिला. मुंबईला इतर महाराष्ट्राशी जोडण्यात या घाटाने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. रोज हजारो वाहन, रेल्वे गाड्या, भोर घाटातूनच प्रवास करतात आणि याचा सगळं श्रेय शिंग्रोबा धनगरांना जात.

ज्या जागेवर इंग्रजांनी धोकाधडी करून शिंग्रोबांना ठार मारलं त्या जागेवर घाटात वीर शिंग्रोबांच्या स्मरणार्थ आज एक छोटुकले देऊळ बांधल.  घाटातून प्रवास करणारे ड्रायव्हर, प्रवासी आपली वाहन क्षणभर थांबून शिंग्रोबाला वंदन करूनच पुढे जातात. आणि आजही ही प्रथा पाळली जाते.

लोणावळा व खंडाळा येथे कसे जाल ?

Lonavala and Khandala

येथे जाण्यासाठी विमानसेवा, रेल्वे सेवा आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने जाता येते.

 विमानसेवा – विमानसेवीचा विचार केल्यास विमान सेवा ही फक्त पुणे या शहरापर्यंतच आहे.

रेल्वे सेवा – रेल्वेने लोणावळा रेल्वे स्टेशन साठी रेल्वे उपलब्ध आहे. लोणावळा रेल्वे स्थानक खंडाळ्याच्या सर्वात जवळ आहे. हे रेल्वे स्थानक नियमित गाड्यांद्वारे मुंबई आणि पुण्याच्या रेल्वेशी जोडलेले आहे ज्यामुळे रेल्वेने खंडाळ्याला पोहोचणे सोपे होते. गंतव्यस्थानावर जाण्यासाठी बस आणि टॅक्सी आहेत.

बससेवा – जर तुम्ही बाय रोड जाणार असाल तर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने जावे लागेल.

लोणावळा व खंडाळा येथील हवामान

खंडाळा येथील सरासरी वार्षिक तापमान २४.४ °C आहे.

  लोणावळा व खंडाळा येथे जाण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?

लोणावळा व खंडाळा

खंडाळ्याला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मे दरम्यान आहे. खंडाळ्याचे तापमान हिवाळ्यात 15 अंशांपर्यंत घसरते. या वेळी हिल स्टेशन धुके आणि धुक्याने झाकलेले असते आणि एक जादुई अनुभव देते.

लोणावळा व खंडाळा येथे राहण्याची सोय

 • 1) ड्यूक्स रिट्रीट 
 • 2) रिट्झ हेरिटेज 
 • 3) एम्पायरियन स्टे  
 • 4) वेल्वेट काउंटी रिसॉर्ट आणि स्पा  
 • 5) हॉटेल ललित इन

खंडाळ्यात भेट देण्यासारखी प्रमुख आकर्षणे आहेत – places to visit in Khandala

 • लोहगड किल्ला
 • पावना तलाव
 • भाजा लेणी
 • वाघाची झेप
 • कुणे धबधबा

लोणावळा आणि खंडाळ्याच्या आसपासच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी 2 दिवस पुरेसे आहेत.

FAQ

खंडाळा मुंबईपासून किती अंतरावर आहे?

खंडाळा मुंबईपासून ८२ किमी अंतरावर आहे.

खंडाळ्यात भेट देण्यासारखी प्रमुख आकर्षणे कोणती आहेत?

लोहगड किल्ला
पवना तलाव
भाजा लेणी
वाघाची झेप
कुणे धबधबा

कार्ला लेणी लोणावळ्या पासून किती अंतरावर आहे ?

कार्ला लेणी लोणावळ्यापासून 18 km अंतरावर आहे.

खंडाळ्यात कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते?

खंडाळ्यात मुंबई गॉडफादर (2005) या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.

लोणावळा व खंडाळा हवामान कसे आहे?

लोणावळा व खंडाळा सरासरी वार्षिक तापमान २४.४ °C आहे.

खंडाळ्यात काय खरेदीसाठी प्रसिद्ध आहे?

 खंडाळ्यात असताना चिक्की सारखा खजिना, तसेच जाम आणि फराळासाठी हा परिसर ओळखला जातो. कूपर्स फज आणि चिक्की, मगनलाल अँड सन्स, आहेर बॅग आणि अब्बास खान गारमेंट्स ही खंडाळ्यात खरेदीसाठी उत्तम ठिकाणे आहेत.

निष्कर्ष

आम्ही आमच्या आजच्या लेखातून खंडाळा आणि लोणावळा या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कमेंट करून आम्हास नक्की कळवा .

धन्यवाद .

लोणावळा व खंडाळा

Leave a comment