मल्लिकार्जुन मंदिर माहिती मराठी : Mallikarjun Temple Information In Marathi

मल्लिकार्जुन मंदिर माहिती मराठी : Mallikarjun Temple Information In Marathi – आंध्र प्रदेश राज्यातील, कुर्नुल जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी, श्रीशैलम पर्वतावर, भारताच्या प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असे असणारे दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच “मल्लिकार्जुन” स्थित आहे. श्रीशैलम पर्वतावर असणाऱ्या या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला “श्रीशैलम मल्लिकार्जुन” (shrishail mallikarjun) म्हणूनही ओळखले जाते.

या मंदिराचा इतिहास, या मंदिराची वास्तुकला, तसेच पौराणिक कथा काय आहे? याची आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला माहिती देणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग.

मल्लिकार्जुन मंदिर माहिती मराठी : Mallikarjun Temple Information In Marathi
Mallikarjun Temple Information In Marathi : मल्लिकार्जुन मंदिर माहिती मराठी

Table of Contents

मल्लिकार्जुन मंदिर माहिती मराठी | Mallikarjun Temple Information In Marathi

आंध्र प्रदेश राज्यातील, कन्नूर जिल्ह्यामध्ये, कृष्णा नदीच्या काठी, श्रीशैलम पर्वतावर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. याला “दक्षिणेचा कैलास” असेही म्हटले जाते. असे मानले जाते की, या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व संकटे दूर होतात. श्रीशैलम पर्वत हा नल्ला मल्ल नावाच्या जंगलाच्या मध्यभागी आहे. म्हणजे याचा अर्थ सुंदर आणि उदात्त असा होतो. या पर्वताच्या शिखरावर भगवान शंकर मल्लिकार्जुन लिंगाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती (मलिका) आणि भगवान शंकर (अर्जुन) आहेत. उत्कृष्ट वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी हे मंदिर ओळखले जाते. या मंदिरात इतर हिंदू देवी देवतांना समर्पित अशी लहान मंदिरे देखील आहे.

या मंदिरा व्यतिरिक्त श्रीशैलम वन्यजीव अभयारण्य देखील आहे. यामध्ये बिबट्या, वाघ, हरणांच्या अनेक प्रजातींसह विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची घरे देखील आहेत. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे अभयारण्य एक केंद्रबिंदू ठरले आहे.

मल्लिकार्जुन नावाचा अर्थ

मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे स्थान आहे. भगवान शंकर म्हणजेच अर्जुन आणि माता-पार्वती म्हणजेच मलिका असे समजले जाते. म्हणूनच या मंदिराला “मल्लिकार्जुन” असे म्हणतात.

मल्लिकार्जुन मंदिर माहिती

नाव –श्री. मल्लिकार्जुन
स्थान –भगवान शंकर, माता पार्वती
दुसरे नाव –श्रीशैलम
ज्योतिर्लिंग –दुसरे
कुठे आहे –आंध्र प्रदेश राज्यामध्ये कर्नुल जिल्ह्यात
नदी –कृष्णा
पर्वत –श्रीशैलम
उंची –समुद्रसपाटीपासून ४७६ मिटर
स्थापना –विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर

मल्लिकार्जुन मंदिर अधिकृत वेबसाइट

मल्लिकार्जुन मंदिराचा इतिहास

पौराणिक कथेनुसार मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा इतिहास सातवाहन वंशाच्या शिलालेखांवरून दिसून येतो.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे दुसऱ्या शतकापासूनच अस्तित्वात असल्याने सांगितले जाते.

विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर याने या सुंदर मंदिराला आधुनिकतेने सर्वप्रथम जोडले असे सांगितले जाते आणि तसा पुरावा देखील उपलब्ध आहे.

या ज्योतिर्लिंगाच्या उभारणीमध्ये अनेक मोठमोठ्या राजे सम्राटांचे योगदान आहे. पल्लव, चालुक्य, काकतीय, रेड्डी आदी राजांनी या मंदिराची विकास कामे करून घेतली असे सांगितले जाते.

मंदिराचा मुख्य मंडप आणि दक्षिण गोपुरम हे विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर यांनी बांधले.

विजयनगरच्या राजांनी या ठिकाणी गोपूर बांधले होते. त्याचे शिखर सोन्याचे होते. तसेच या ठिकाणी तलाव, मंदिर देखील बांधले.

सन १६६७ मध्ये कर्नाटक स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी मंदिराच्या उजव्या बाजूला एक गोपूर बांधले व त्या ठिकाणी अन्नछत्र देखील सुरू केले होते.

Mallikarjun Temple Information In Marathi
Mallikarjun Temple Information In Marathi

मल्लिकार्जुन मंदिराचे स्थान

मल्लिकार्जुन मंदिर परिसर

या ज्योतिर्लिंगाचा मंदिर परिसर हा साधारणपणे अडीच एकर क्षेत्रात पसरलेला आहे. या परिसरामध्ये अनेक मंदिरे आणि मंडप आहेत. मंदिराच्या मुख्य मंदिरात जे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे ते काळ्या ग्रॅनाईटचे लिंग आहे. असे म्हणतात की, हे लिंग स्वयं प्रकट झाले आहे. आणि भगवान शंकरांच्या सर्वात शक्तिशाली लिंगांपैकी एक असे मानले जाते.

mallikarjun temple

सहस्रलिंग तीर्थ

हे एक अद्वितीय मंदिर आहे. ज्यामध्ये विविध आकारांची १००० शिवलिंगे आढळून येतात. तेथे असणारे भ्रमरंबा मंदिर हे देवी पार्वतीला समर्पित आहे.या मंदिराच्या परिसरामध्ये मुखमंडप, अर्थ मंडप, आणि गरुड मंडपा सह अनेक मंडप आहेत. मुखमंडप हा एक खांब असलेला सभामंडप आहे. ज्यामध्ये अनेक देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अर्थमंडप हा कल्याण मंडप सह एक लहान हॉल आहे, जो विवाह समारंभ वगैरे पार पाडण्यासाठी वापरला जातो. गरुड मंडप हा एक असा मंडप आहे ज्यामध्ये गरुड पक्षाची मूर्ती आहे. हा मंडप मुख्य मंदिराच्या बाहेर आहे आणि तो सर्वात सुंदर मंडपांपैकी एक असा मानला जातो.

Mallikarjun Temple

मल्लिकार्जुन मंदिराचे वैशिष्ट्य (Key Features Of Mallikarjun Temple)

कर्नुल पासून जवळपास १८० किलोमीटर अंतरावर असलेले हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा परिसर हा जवळपास २ हेक्टर मध्ये पसरलेला आहे. हा मंदिर परिसर २८ फूट लांब आणि ६०० फूट उंच भिंतींनी वेढलेला असा आहे. ज्यामध्ये श्रीमल्लिकार्जुन आणि माता भ्रमरंबा यांची मुख्य मंदिरे आहेत. विजयनगरच्या स्थापत्य कलेच्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक असलेल्या या मंदिराला प्रशस्त अंगण आणि उंच खांब द्रविड शैलीत बांधले गेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर अनेक शिल्पकला दिसून येतात. अर्धनारीश्वर, सहस्रलिंगेश्वर, उमा महेश्वर, वृद्ध मल्लिकार्जुन आणि ब्रम्हा मंदिर यांच्यासारखे अनेक मंदिरेही या परिसरात दिसून येतात.

श्री रामेश्वरम मंदिर माहिती

मल्लिकार्जुन मंदिराची वास्तूकला (Architecture Of Shrishail Mallikarjun Temple)

मंदिर परिसर एकूण ०२ हेक्टरमध्ये व्यापलेला आहे आणि गोपुरम म्हणून ओळखले जाणारे चार गेटवे टॉवर आहेत . मंदिरात असंख्य तीर्थस्थाने असून त्यात मल्लिकार्जुन आणि भ्रमरंबा सर्वात प्रमुख आहेत. मंदिर संकुलात अनेक सभागृहे आहेत. त्यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे विजयनगर काळात बांधलेला मुखमंडप.

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मध्यवर्ती मंडपममध्ये अनेक खांब आहेत, ज्यामध्ये नाडीकेश्वराची मोठी मूर्ती आहे. मंदिर १८३ मीटर बाय १५२ मीटर आणि८.५ मीटर उंच भिंतींनी वेढलेले आहे. हद्दीत अनेक शिल्पे आहेत. मुखमंडप, गाभाऱ्याकडे जाणारा सभामंडप इथे अत्यंत क्लिष्टपणे कोरीव काम केलेले खांब आहेत. मल्लिकार्जुन मंदिर सर्वात जुने मानले जाते, ते ७ व्या शतकातील आहे.

मल्लिकार्जुन मंदिराची रचना

जवळपास २ हेक्टर मध्ये पसरलेला मंदिराचा हा परिसर आहे. यामध्ये ४ गेटवे टॉवर्स आहेत. ज्यांना आपण “गोपुरम” असे म्हणतो. या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक मंदिरे बांधली गेली आहेत. ज्यामध्ये मल्लिकार्जुन आणि भ्रमरंबा ही सर्वात महत्त्वाची मंदिरे आहेत. विजयनगर काळात बांधलेला हा गोपूर अतिशय उत्कृष्ट आणि पाहण्यासारखा आहे. ज्याचा शिखर त्यावेळी सोन्याचा बनवला गेला होता. मंदिराच्या मध्यभागी अनेक मंडपम खांब आहेत आणि यामध्ये नाडीकेश्वराची एक विशाल अशी मूर्ती आहे.

मल्लिकार्जुन मंदिराकडे जाताना

या मंदिरापर्यंत जाण्यासाठी घनदाट जंगलातून जावे लागते जवळपास ४० किलोमीटर आत मध्ये हा मार्ग जातो. त्यामुळे संध्याकाळी ६ नंतर या ठिकाणी जाण्यासाठी मनाई केलेली आहे. आणि सकाळी ६ नंतरच मंदिराचे दरवाजे उघडले जातात. जंगलाचा रस्ता ओलांडून पुढे गेल्यावर काही किलोमीटर च्या अंतरावर शैल धरणाचा २०० जवळपास २०९० मीटर उंचीवरून खाली कोसळणारा जोरदार प्रवाह दिसून येतो. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी दिसून येते.

Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन उपासनेचे महत्त्व

या मंदिरामध्ये भगवान शंकर आपल्या निराकार लिंग (Mallikarjun Shivling) स्वरूपात स्थित झाले आहेत. या मंदिरामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांचे दिवे विराजमान आहेत. श्रीशैल पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केल्यामुळे अश्वमेध यज्ञ करण्यासारखेच फळ मिळते. या पर्वताच्या शिखराच्या दर्शनाने भक्तांची सर्व प्रकारची दुःखी दूर होऊन त्यांना सुख प्राप्त होते. तसेच ज्या व्यक्ती या लिंगाचे दर्शन घेतात त्यांची सर्व पापापासून मुक्तता होते आणि त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. असा येथे येणाऱ्या भाविकांचा समज आहे.

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती 

मल्लिका देवी मंदिर (Mallika Devi Temple)

मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागे पार्वतीचे मंदिर आहे, ज्याला मल्लिका देवी असे म्हटले जाते. तेथे असलेल्या कृष्णा नदीमध्ये येणारी भाविक स्नान करतात आणि तेच पाणी या लिंगाला अर्पण करतात. या नदीमध्ये दोन प्रवाह एकत्र येतात,त्याला जल त्रिवेणी असे म्हणतात. जवळच एक गुहा आहे जिथे भैरवडी आणि शिवलिंग आहेत.

मल्लिकार्जुन मंदिरापासून जवळपास ६ किलोमीटर अंतरावर शिखरेश्वर आणि हटकेश्वर मंदिरे आहेत. तिथून ६ किलोमीटर अंतरावर एकम्मा देवीचे मंदिर देखील आहे. ही सर्व मंदिरे घनदाट जंगलाच्या मध्यभागी स्थित आहेत. या ठिकाणी गेल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शंकर आणि माता पार्वतीची आशीर्वाद आपल्याला मिळतो असे समजले जाते.

भ्रमरंबा मंदिर (Bhramaramba Devi Temple)

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगा मध्ये भ्रमरंबा देवीचे मंदिर आहे. हे एक पार्वतीचे रूप आहे या देवीच्या मूर्तीला आठ हात असून तिने रेशमी साडी नेसलेली आहे. याठिकाणी श्री यंत्र आहे.

भ्रमरंबा या शब्दाचा अर्थ “मधमाशांची आई” असा होतो. आणि कथेनुसार देवी भ्रमरंबाने अरुणासुर राक्षसाचा वध करण्यासाठी सहा पाय असलेल्या हजारो मधमाशा सोडल्या होत्या. अरुणासूर हा ब्रह्मदेवांचा भक्त होता. त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवांनी त्याला कोणत्याही दोन किंवा चार पायांच्या सजीवांकडून मारता येणार नाही असे वरदान मिळवले होते.

या वरदानामुळे अरुणासुराने देवांना आणि संतांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याच्या या अफाट सामर्थ्यामुळे देव त्याला पराभूत करू शकले नाहीत. त्यामुळे ते देवी दुर्गेकडे गेले. आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी देवीला प्रसन्न केले. प्रसन्न होऊन देवी दुर्गेने भ्रमरंभिकाचे रूप धारण केले आणि हजारो सहा पायांच्या मधमाशा निर्माण केल्या ज्यांनी राक्षसाला मारले. त्यानंतर देवी श्रीशैलम मध्ये भ्रमरंभाच्या स्वरूपात परत आली असे सांगितले जाते.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार देवी सतीचे वडील राजा दक्ष यांनी यज्ञ आयोजित केला होता परंतु भगवान शंकर आणि सती देवी यांना त्यांनी आमंत्रित केले नव्हते. असे असताना देखील देवी सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञा ला उपस्थित राहण्याचे ठरवले. या यज्ञांमध्ये तिला आणि भगवान शंकरांना अपमानित करण्यात आले. त्यामुळे दु:खी होऊन तिने पवित्र चितेमध्ये उडी मारली.

यामुळे क्रोधीत झालेल्या भगवान शंकरांनी राजा दक्षाचा वध करून संपूर्ण यज्ञाचा नाश केला आणि त्यानंतर देवी सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली.भगवान विष्णुंनी आपल्या दैवी सुदर्शन चक्रद्वारे देवीचे प्रेत कापले. यामुळे शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. देवीचा भाग ज्या ठिकाणी पडला, त्या ठिकाणाला शक्तीपीठ असे मानले जाते. श्रीशैलम या ठिकाणी देवीची मान पडली होती असे सांगितले जाते. हे क्षेत्र १८ शक्ति पीठांपैकी एक असे मानले जाते.

Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन शक्ती पीठ (Shakti Peeth Mallikarjun)

शक्ती पीठ म्हणजे देवी सतीचे अवशेष ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण. पौराणिक कथेनुसार राजा दक्ष म्हणजेच देवी सतीचे पिता यांनी भगवान शंकरांचा केलेला अपमान देवी सतीला सहन न झाल्याने देवी सतीने आत्मदहन केले होते. त्यानंतर भगवान शंकरांनी हे देवीचे जळणारे शरीर उचलून तांडव नृत्य केले होते. यावेळी तिच्या शरीराचे अवयव ज्या ठिकाणी पडले ते स्थान शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.

श्री महाकालेश्वर मंदिर माहिती

मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जाण्याचा वेळ आणि प्रवेश शुल्क

मल्लिकार्जुन मंदिराला वर्षांमध्ये कधीही भेट देऊ शकतात. पण इथे भेट देण्याचा उत्तम काळ हा नोव्हेंबर पासून साधारणपणे फेब्रुवारी पर्यंतचा मानला जातो. या ठिकाणी तीर्थयात्रेसाठी तसेच येणाऱ्या भाविकांसाठी ही योग्य वेळ समजली जाते. या ठिकाणचे तापमान हे १५ अंश ते ३२ अंश सेल्सिअस असते.

या मंदिरामध्ये जाण्यापूर्वी मंदिरातील काउंटरवर प्रवेश पत्र काढावे लागतात जर तुम्हाला झटपट दर्शन घ्यायचे असेल तर व्हीआयपी पास मिळतो प्रत्येक व्यक्तीला त्यासाठी दीडशे रुपये आकारले जातात. या व्हीआयपी पासमुळे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शन अर्ध्या ते एका तासात होते. तर दुसरे कार्ड हे विनामूल्य असते. सामान्य रांगेमध्ये उभे राहून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ते करू शकता मात्र श्रावण महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्री सारख्या सणांमध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे दर्शनासाठी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो.

Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन मंदिरातील दर्शनाची वेळ (Mallikarjun Temple timings)

हे मंदिर पहाटे ४.३० वाजता उघडते. दुपारी ३.३० वाजता बंद होते. पुन्हा संध्याकाळी ४.३० वाजता उघडते ते रात्री १० पर्यंत बंद होते.

  • पहाटे ४.३० – ५.०० मंगल वाद्यम
  • पहाटे ५.०० – ५.१५ सुप्रभातम
  • पहाटे ५.१५ – सकाळी ६.३० सकाळची पूजा,मंगल आरती
  • सकाळी ६.३० – दुपारी १.०० दर्शन,अभिषेक,अर्चना
  • दुपारी १.०० – ३.३० अलंकार दर्शन
  • संध्याकाळी ४.३० – ४.५० मंगल वाद्यम
  • संध्याकाळी ४.५० – ५.२० प्रदोषकाल पूजा
  • संध्याकाळी ५.२० – ६.०० सुसंध्याम,मंगल आरती
  • संध्याकाळी ५.५० – ६.२० भांब्रादेवी राजोपचार
  • संध्याकाळी ६.२० – रात्री ९.०० दर्शन,अभिषेक,अर्चना
  • रात्री ९.०० – १०.०० सर्व दर्शन
  • रात्री १०.०० मंदिर बंद
  • रात्री ९.३० – १०.०० एकांत सेवा

सणांच्या दिवशी या वेळेमध्ये बदल होऊ शकतो.

दर्शनाचा प्रकारवेळतिकीटव्यक्ती मर्यादा
शीघ्र दर्शन सकाळी ६.३० – दुपारी १.००
संध्याकाळी ६.३० – रात्री ९.००
रु. १००/-१ किंवा २
विशेष दर्शनसकाळी ६.३० – दुपारी १.००
संध्याकाळी ६.३० – रात्री ९.००
रु. ५०/-१ किंवा २
निशुल्क दर्शनसकाळी ६.०० – दुपारी ३.३०
संध्याकाळी ६.०० – रात्री १०.००
——————

सोमवारची मल्लिकार्जुन पूजा

  • पहाटे ५.३० ते ५.३० महामंगल आरती
  • पहाटे ५.३० ते दुपारी १.00 दर्शन अभिषेक अर्चना
Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन मंदिरातील पूजाविधी (Pooja Of Mallikarjun Shivling)

  • अभिषेक
  • गणपती होम
  • रुद्र होम
  • गणपती अभिषेक
  • गोपूजा
  • मृत्युंजय होम
  • नवग्रह होम
  • सर्पदोष निवारण पूजा
  • महामृत्युंजय अभिषेक
  • अन्नप्राशन
  • नामकरण
  • शिव सहस्त्रनाम

मल्लिकार्जुन मंदिर कुठे आहे? आणि कसे जायचे? (How To Reach Mallikarjun Temple)

आंध्र प्रदेश राज्यामध्ये, कुर्नुल जिल्ह्यामध्ये, कृष्णा नदीकाठी, श्रीशैलम पर्वतावर हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी तुम्ही विमान, ट्रेन किंवा बसने प्रवास करू शकता.

विमान – बेगम पेठ हैदराबाद, तेलंगणा हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. या ठिकाणाहून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ला पर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे २३२ किलोमीटरचे म्हणजेच ५ तासाचे अंतर आहे. तेथून तुम्ही बस किंवा कॅबने मंदिरापर्यंत पोहोचू शकता.

ट्रेन – आंध्र प्रदेश मधील मार्कापूर रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणाहून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे ८० किलोमीटरच्या अंतर असून २ तासाचा वेळ लागतो. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कॅब किंवा बस ने येऊ शकता.

बस – हैदराबाद पासून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे २३५ किलोमीटरचे अंतर असून ५ तासांचा वेळ लागतो. या ठिकाणी तुम्ही बस ने आरामात पोहचू शकता.

  • पुणे ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग रस्त्याने अंतर ६९३ किलोमीटर
  • मुंबई ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग रस्त्याने अंतर ८४३ किलोमीटर
  • हैदराबाद ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग रस्त्याने अंतर २१५ किलोमीटर
  • कुर्नुल ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग रस्त्याने अंतर ४५ किलोमीटर
Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड

या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना आपल्याला शोभतील असे व्यवस्थित कपडे घालून जाणेआवश्यक आहे. या ठिकाणी कोणताही ड्रेस कोड नाही.
आपल्यास त्या ठिकाणी अभिषेक वगैरे करावयाचा असल्यास पुरुषांनी धोतर आणि स्त्रियांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस घालणे आवश्यक आहे.

मल्लिकार्जुन मंदिरातील नियम

  • मंदिरात असणाऱ्या शिवलिंगाला येणारे भाविक हात लावू शकतात.
  • मंदिरामध्ये मोबाईल, कॅमेरा, बॅग यासारख्या वस्तू मिळण्यास मनाई केलेली आहे.
  • मंदिराच्या काउंटर जवळ शूज किंवा चपलांसाठी देखील एक मोफत काउंटर केलेला आहे त्या ठिकाणी ते काढून ठेवणे आवश्यक आहे.
  • मंदिरामध्ये शांतता राखणे तसेच कोणाचाही अनादर न करणे आवश्यक आहे.

मल्लिकार्जुन मंदिरातील सण उत्सव (Festivals At Mallikarjun Mandir)

हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून बारा ज्योतिर्लिंग पैकी दुसरे ज्योतीलिंग असल्यामुळे या ठिकाणी वर्षभर भावीक भेट देत असतात. दरवर्षी या मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्री हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव या मंदिरामध्ये साजरा केला जातो. मंदिरामध्ये नवरात्री, दसरा, दिवाळी हे देखील साजरे करतात.

Mallikarjun jyotirlinga Temple

महाशिवरात्री

उत्सवा दरम्यान हे मंदिर दिवे आणि फुलांनी सजवले जाते. तसेच लिंग आणि इतर पवित्र स्थानांना स्नान घातले जाते. या ठिकाणी भावीक रात्रभर जागरण करतात आणि भगवान शंकराची स्तुती, ध्यानधारणा करत असतात. भगवान शंकराची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणून हा महाशिवरात्री मानला जातो.

कार्तिक पौर्णिमा

हिंदू मराठी वर्षाचा कार्तिक महिना हा शुभ महिन्यातील एक असा मानला जातो. या पौर्णिमेच्या दिवशी हजारो दिव्यांनी हे मंदिर सजवले जाते.

श्रावण महिना

संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भक्त आणि येणारे भावीक २४ तास भजन, कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो.

उगादी (तेलुगु नवीन वर्ष)

हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. हा उत्सव तेलुगु नवीन वर्षापासून तीन दिवस आधी सुरू होतो. जो मार्चच्या दरम्यान असतो. या दिवशी रथयात्रा, देवीचे अलंकार, देवीची वाहन सेवा यासारखे विधी पार पाडले जातात.

Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन मंदिरातील रहस्य

  • श्रीशैल पर्वतावर शंकराची पूजा केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ केल्यास केल्याचे फळ मिळते. नुसते दर्शन घेतले तर भक्तांचे सर्व संकटे दूर होतात असे समजले जाते.
  • या ठिकाणी भगवान शंकराची मल्लिकार्जुन रुपात पूजा केली जाते. या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरूपात ते प्रकट झाले.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरासोबत माता पार्वती देखील या ठिकाणी समर्पित आहे.
  • या मंदिरामध्ये असणाऱ्या भगवान शंकर म्हणजे (अर्जुन) आणि माता-पार्वती म्हणजे मलिका) यावरून या मंदिराला मल्लिकार्जुन हे नाव पडले असे समजले जाते.

मल्लिकार्जुन मंदिराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (Places To Visit Near Mallikarjun Temple)

या मंदिराच्या आजूबाजूला भेट देण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहे. मल्लिकार्जुन लिंगाच्या यात्रेदरम्यान प्रमुख पर्यटन स्थळांनाही भेट देऊ शकता ती खालील प्रमाणे –

१. अक्क महादेवी लेणी

श्रीशैलम पासून साधारणपणे १० किलोमीटरच्या अंतरावर अक्क महादेव लेणी हे एक अतिशय पाहण्यासारखे असे प्राचीन पर्यटन स्थळ बारमाही कृष्णा नदी जवळ वसलेले आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर बनवलेल्या नैसर्गिक कमानीसाठी हे अधिक ओळखले जाते.

. भ्रमरंभा मल्लिकार्जुन स्वामी मंदिर

कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी मंदिर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे ऐतिहासिक मंदिर ६ व्या शतकातील असून विजयनगरचा राजा हरिहर यांनी हे बांधले होते असल्याचे सांगितले जाते.

३. श्रीशैलम पाताळगंगा

कृष्णा नदी ही टेकड्यांमधून वाहते. या नदीलाच पातळगंगा असे देखील म्हटले जाते. या नदीमध्ये तुम्ही पोहू शकता, स्नान करू शकता. असे मानले जाते की, या नदीच्या पाण्यामध्ये स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना याठिकाणी रोपवे राइडचा आनंद घेता येतो. तसेच या राईड दरम्यान या कृष्णा नदीची भव्यता आणि आजूबाजूचा हिरवा गार निसर्ग तसेच घनदाट जंगलाचे दृश्य सुद्धा पाहता येते. मल्लिकार्जुन मंदिराकडून या नदीकडे जाण्यासाठी जवळपास ५०० पायऱ्या उतरून जावे लागते.

५. श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

३५६८ एकरावर हा श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. श्रीशैलम धरण आणि नागार्जुन सागर धरण याच्या राखीव क्षेत्रामध्ये ही बांधले आहे. या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जाती पाहावयास मिळतात. या भागामध्ये मगर, भारतीय अजगर, किंग कोब्रा, मोर यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो.

६. श्रीशैलम धरण

श्रीशैलम धरण हे भारतातील १२ सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा एक भाग आहे. हे धरण सध्याच्या तेलंगणाचा एक भाग बनलेला आहे. कृष्णा नदीमध्ये नल्लामल्ल डोंगराच्या सुंदर हिरवाई मध्ये हे बांधले गेले आहे. पर्यटकांसाठी एक वेगळा पिकनिक स्पॉट म्हणून देखील या ठिकाणाला ओळखले जाते.

७. शिखरेश्वर मंदिर

श्रीशैलम च्या सर्वोच्च बिंदूवर वसलेले हे शिखरेश्वर मंदिर सिखाराम म्हणून देखील ओळखले जाते. हे मंदिर शिखरेश्वर स्वामींना समर्पित आहे. हे कृष्णा नदी जवळ असून भगवान शंकराचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते. सन १३९८ मध्ये तयार झालेले हे प्राचीन मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे

८. लिंगाला गट्टू

भगवान शंकराच्या भक्तीसाठी ओळखले जाणारे हे श्रीशैल मधील कृष्णा नदीच्या काठासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान शंकरांची प्रतिमा पहावयास मिळते. त्यामुळे या नदीच्या काठाला लिंगाला गट्टू हे नाव पडले आहे.

९. हेमा रेड्डी मल्लम्मा मंदिर

हे मंदिर प्रसिद्ध मंदिर मल्लिकार्जुन स्वामी मंदिराजवळ आहे. या निसर्गरम्य मंदिरात आश्रम ही बांधला गेला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे हे प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहे.

१०. साक्षी गणपती मंदिर

साक्षी गणपती मंदिर मल्लिकार्जुन जवळपास ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्रीशैलम मधील धार्मिक स्थळांमधील हे एक महत्त्वाचे असे मंदिर आहे.

११. चेंचू लक्ष्मी जनजातीय संग्रहालय

श्रीशैलम च्या जवळच हे चेंचू लक्ष्मी जनजातीय संग्रहालय आहे. जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनाची एक झलक या ठिकाणी दाखवली गेली आहे. यांची हत्यारे, त्यांच्या कलाकृती, दैनंदिन वापरात येणाऱ्या त्यांच्या वस्तू, संगीत वाद्य, यासारख्या अनेक वस्तू या संग्रहालय संग्रहालयामध्ये आढळून येतात. या संग्रहालयामध्ये माता चेंचू लक्ष्मी ची मूर्ती देखील आहे.

१२. पालधारा पंचधारा

श्रीशैलम पासून जवळपास ४ किलोमीटर अंतरावर पालधारा पंचधारा हे एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. हे स्थळ एका डोंगरावर असून या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास १६० पायऱ्या चढून जावे लागते. या ठिकाणी भगवान आदि शंकराचार्यांनी तपस्या करून प्रसिद्ध “शिवानंदलाहारी” या ग्रंथाची रचना केली होती. या ठिकाणी संपूर्ण वर्षभर डोंगरावरून पाणी पडत असते. हे पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते.

१३. हटकेश्वर मंदिर

श्रीशैलम पासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर असलेले हे हटकेश्वर मंदिर श्रीशैलम मध्ये धार्मिक स्थळांमधील एक प्रसिद्ध असे स्थळ आहे. याचा अर्थ सोने असा होतो. या मंदिरामध्ये सोन्याचे शिवलिंग स्थापन केलेले आहे. हे मंदिर एका तलावाजवळ आहे त्यामुळे याला “हातकेश्वर तीर्थ” असेही म्हटले जाते.

१४. मल्लेला तीर्थ धबधबा

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापासून जवळपास ५८ किलोमीटरच्या अंतरावर हा धबधबा आढळून येतो. हा धबधबा नल्लामल्ल या ठिकाणी घनदाट जंगलामध्ये आहे. निसर्ग प्रेमींसाठी हा पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे.

मल्लिकार्जुन मंदिराबाबत मनोरंजक गोष्टी (Interesting Things At Mallikarjun Jyotirlinga)

  • मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (Mallikarjun Jyotirlinga) हे श्रीशैल पर्वतावर असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला श्रीशैलम या नावाने देखील प्रसिद्धी मिळाली आहे.
  • या मंदिरातील प्रमुख देवतेची चमेली या फुलांनी पूजा करण्यात येते.
  • या मंदिराच्या ठिकाणी स्थापित केलेली पाच शिवलिंगे ही पांडवानी स्थापित केल्याचे सांगितले जाते.
  • या मंदिरामध्ये वृद्ध मल्लिकार्जुन स्वामींच्या रूपात भगवान शंकराची पूजा केली जाते.
mallikarjun jyotirling

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कथा (Mallikarjun Story)

शिवपुराणातील कथेनुसार एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती चा पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्यात पहिले लग्न कोण करणार वरून भांडण झाले. वाद मिटवण्यासाठी भगवान शंकर म्हणाले, जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आधी पूर्ण करेल, त्याचे पहिले लग्न होईल. कार्तिकेय पृथ्वीच्या प्रदर्शनासाठी निघाला. परंतु गणेशाने आपल्या चतुर बुद्धिमत्तेचा उपयोग करून भगवान शंकर आणि माता पार्वती यांनाच आपले संपूर्ण जग मानून त्यांना प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली आणि ती पूर्ण केली. ठरल्याप्रमाणे गणेशजींचे लग्न आधी झाले. कार्तिकेय प्रदक्षिणा घालून आल्यानंतर त्याला समजले की, गणेशाचे लग्न झाले आहे. त्यामुळे तो आई-वडिलांवर रागावला

कार्तिकेय क्रोधित होऊन क्रोंध पर्वतावर गेला. देविदेवतांनी त्यांना परत येण्याचा आग्रह केला परंतु तो मान्य झाला नाही. भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्या मुलाच्या वियोगाने दुःखी होते. जेव्हा दोघेही कार्तिकेय यायला भेटण्यासाठी क्रोंध पर्वतावर पोहोचले. तेव्हा त्यांना पाहून कार्तिकेय दूर गेला शेवटी पुत्राच्या दर्शनाच्या आकांक्षेने भगवान शंकर ज्योतीचे रूप धारण करून येथे विराजमान झाले. तेव्हापासून हे शिवधाम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध झाले. प्रत्येक अमावस्येला भगवान शंकर आणि पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वती या ठिकाणी येतात अशी श्रद्धा आहे.

Mallikarjun jyotirlinga Temple

मल्लिकार्जुन मंत्र

श्रीशैलश्रृंगे विबुधातिसंगे
तुलाद्रितुंगेपि मुदा वसंतम् ।
तामार्जुन मल्लिक पूर्वमेकम
नमामि संसार समुद्र सेतुम् ॥
जय मल्लिकार्जुन, जय मल्लिकार्जुन.

अर्थ –
श्रीशैलेच्या शिखरावर आनंदाने वास करणार्‍या , आदर्श पर्वतांपेक्षाही उंच,
जिथे देवांचा सहवास भरपूर आहे आणि जो विश्व-सागर पार करण्यासाठी सेतूसारखा आहे, अशा एकमेव भगवान मल्लिकार्जुनाला मी प्रणाम करतो.

मल्लिकार्जुन मंदिराजवळील हॉटेल्स

मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळ श्रीशैलम विश्राम गृह देखील आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सोय केली जाते. मंदिराजवळील काही चांगली हॉटेल्स खालील प्रमाणे –

  • हॉटेल श्री शैल नेस्ट
  • हॉटेल आर रेसिडेन्सी
  • मल्लिकार्जुन सदन
  • काकतीय अन्ना सत्रसंगम
  • हॉटेल राहुल रेसिडेन्सी
  • गंगासदन
  • नीलम संजीव रेडी भवन
  • गोकुळ हॉटेल

मल्लिकार्जुन मंदिराजवळचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे श्रीशैलम या ठिकाणी असल्यामुळे या भागांमध्ये संपूर्ण शाकाहारी जेवण मिळते. तसेच हे मंदिर ज्या राज्यांमध्ये येते ते आंध्र प्रदेश राज्य मसालेदार भोजनासाठी ओळखले जाते. याठिकाणी मिळणारे काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ खालीलप्रमाणे –

  • बिर्याणी
  • हैदराबादी हलीम
  • भगरा
  • बैगन
  • खिमा
  • अवकैय्या कैरीचे लोणचं
  • गौग्युरा पानाचे लोणचेयासारखे बरेच शाकाहारी मांसाहारी पदार्थ प्रसिद्ध आहेत.

FAQ

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कोठे आहे?

आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नुल जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दुसरे नाव काय आहे?

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दुसरे नाव श्रीशैलम आहे.

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंग पैकी कितवे ज्योतिर्लिंग आहे?

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंग पैकी दुसरे ज्योतिर्लिंग आहे.

निष्कर्ष

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगा बाबतचा इतिहास, त्याची पौराणिक कथा आम्ही या लेखातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम आपण हा लेख वाचल्याबद्दल आपले आभार. आमचा हा लेख वाचून तुम्हाला कसा वाटला? आणि काही सुधारणा आवश्यक असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार🙏🙏

2 thoughts on “मल्लिकार्जुन मंदिर माहिती मराठी : Mallikarjun Temple Information In Marathi”

  1. Please add Chhatrapati Shivaji Maharaj Spoorti Kendra in Places to visit section with details. Dhanyawad 🙏🏼

    Reply

Leave a comment