माळशेज घाट संपूर्ण माहिती मराठी : MALSHEJ GHAT INFORMATION IN MARATHI

MALSHEJ GHAT

Table of Contents

प्रस्तावना

माळशेज घाट माहिती मराठी | MALSHEJ GHAT INFORMATION IN MARATHI हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगरदऱ्या, उंच पर्वत रांगा, धुक्यामध्ये लपेटून गेलेले मेघराज, मुक्तपणे खेळाळणारे शुभ्र धबधबे या सर्व निसर्गाच्या वरदानाने संपन्न असलेल्या सौंदर्याला डोळ्यांमध्ये साठवायचे असेल, तर एकदा तरी माळशेज घाट पहायलाच हवा. आम्ही आमच्या माळशेज घाट या लेखातून आपणास घाटाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

माळशेज घाट माहिती मराठी : MALSHEJ GHAT INFORMATION IN MARATHI

नभाला गवसणी घालणारे उत्तुंग असे महाकाय कडे, त्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे, मुसळधार पाऊस, हळुवारपणे पुढे पुढे सरकणारे दाट ढग, आजूबाजूला असणारा निसर्गरम्य व विहंगम दृश्य देणारा माळशेज घाट. घाटातून वळणावळणाने जाणारा रस्ता, वाटेत लागणारे छोटे छोटे बोगदे, कड्यावरून धो धो कोसळणारे पावसाचे पाणी आणि त्यामुळे तयार झालेले फेसाळते जलप्रपात, डाव्या कुशीला असलेले टेकडी खालची छोटी छोटी टुमदार कौलारू घरे हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला आपण एका वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो.

माळशेज घाट कुठे आहे ? (Where Is Malshej Ghat ?)

या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. मुंबई ते अहमदनगर व नाशिक यांच्यामधील महत्त्वपुर्ण आणि प्रेक्षणीय असा घाटरस्ता असलेले स्थळ. या ठिकाणी तुम्ही स्वत:ची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून निसर्गाचा आनंद घेउ शकता.

माळशेज घाट माहिती कोष्टक (Malshej Ghat Information Table)

स्थानपुणे जिल्हा
घाटमाळशेज
घाटाची लांबीपुण्यापासून साधारणतः १३० किलोमीटर
जवळील प्रेक्षणीय स्थळेहरिश्चंद्रगड ,व्ह्यू पॉईंट, धबधबे.

माळशेज घाट नकाशा (Malshej Ghat Map)

माळशेज येथील हवामान

या घाटाचे स्थान पश्चिम घाट डोंगररांगांत असल्याने इथे भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर हिवाळ्यात इथे तापमान ११ अंश ते २७ अंश इतके असते. उन्हाळ्यात मात्र या ठिकाणचे तपमान सरासरी ४० अंश ओलांडू शकते. हिवाळा हंगाम (डिसेंबर ते फेब्रुवारी) देखील भेट देण्यासाठी एक उत्तम वेळ आहे.

उन्हाळा – उन्हाळ्यामध्ये येथील तापमान हे साधारणतः ४0 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असते.

पावसाळा- पावसाळ्यामध्ये घाट अतिशय आल्हाददायक व विलोभनीय असून या ठिकाणी हवामान हे थंड व तजेलदार असते. वार्षिक पर्जन्यमान हे साधारणतः ६४९९ मिलिमीटर एवढे असते.

हिवाळा – हिवाळ्याच्या काळात माळशेज घाटाचे हवामान हे रात्रीच्या वेळी कमी असून साधारणतः ११ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. परंतु सकाळच्या वेळी घाटाचे हवामान हे साधारणतः २७ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते.

माळशेज आणि पावसाळा

वसाळ्याच्या समृद्ध वातावरणामुळे हा घाट अतिशय सुंदर व विहंगम दृश्य यांनी खुलून निघतो. तुम्ही देखील या कालावधीमध्ये ताम्हिणी घाटाची मजा व सुखद अनुभव घेऊ शकता. पावसाळ्यातील गर्द हिरवळ, धुक्यातील डोंगर, आणि धबधबे. या ठिकाणी तुम्ही स्वत:ची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून निसर्गाचा आनंद घेउ शकता. समोरच हरिश्चंद्रगडाची डोंगररांग तुम्हास याच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसी आहे.

माळशेज का प्रसिद्ध आहे?

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये वसलेला माळशेज हा एक सुंदर लोकप्रिय घाट असून, एक उत्तम हिल स्टेशन आहे. या ठिकाणी असणारे धबधबे, पर्वत, हिरवेगार नैसर्गिक वातावरण, विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी, प्राणी या सगळ्यांचे एकत्रीकरण म्हणजे माळशेज घाट.

माळशेज हा त्याला लाभलेल्या विविध नैसर्गिक संपत्तीने जसा संपन्न आहे, त्याचप्रमाणे माळशेज घाट मधील साहसी गोष्टींसाठी सुद्धा पर्यटक आकर्षित होतात. जसे की गिर्यारोह, ट्रेकिंग हे निसर्ग प्रेमींमध्ये एक कुतूहलाचा विषय आहे. शहरी गजबजीपासून थोडं दूर राहून, शांततेचा अनुभव घेण्यासाठी माळशेज हे एक विकेंडला जाण्यासाठी उत्तम व आदर्श ठिकाण आहे.

गुलाबी रंगाने सुंदर दिसणारे फ्लेमिंगो पक्षी परदेशी पक्षी आहेत व हे पक्षी हंगामी काळामध्ये अर्थात जुलै ते सप्टेंबर मध्ये माळशेज घाटाजवळील पिंपळगाव जोगा धरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. माळशेज घाटाजवळील असणारे उंच किल्ले, छोटे-मोठे धबधबे, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, ट्रेकर्स प्रेमींसाठी असणारा हरिश्चंद्रगडचा ट्रेक, आजोबा हिलचा ट्रेक लोकप्रिय आहे.

यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने माळशेज एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते.

माळशेज घाटाचा व्हिडिओ (Malshej Ghat Video)

माळशेज घाट पर्यटन

मुंबई मार्गे मुरबाड पर्यंत आल्यानंतर, तिथून जवळपास ४५ किलोमीटरवर हा घाट लागतो. त्याचप्रमाणे आपण जर पुण्यावरून गेलो तर नारायणगाव – जुन्नर कडून माळशेज घाटात जाता येते. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माळशेज हे परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन आहे. या पर्यटन स्थळावर उंच उंच धबधबे, घाट, हिरवेगार डोंगर त्यासोबतच सोळाव्या शतकातील स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय अशी मंदिरे आणि किल्ले आहेत.

घाट उतरताना एक छोटेसे पठार लागतं या पठारावर महाराष्ट्र पर्यटन खात्याचे रिसॉर्ट आहे. आपण येथे राहून आजूबाजूचा निसर्ग न्याहाळू शकतो. पावसानंतरच्या काळात तिथे छोट्या झुडुपांवर रंगीबेरंगी फुले फुलतात. या फुलांवर छोट्या छोट्या फुलपाखरांची भरपूर गर्दी पाहायला मिळते.

या पठारापासून थोड्याच अंतरावर पिंपळगाव धरण आहे. या धरणाच्या बाजूला असणाऱ्या पाणीसाठ्यात परदेशी फ्लेमिंगो पक्षी राहायला येतात. सायबेरियातून येणारे पक्षी जुलै ते सप्टेंबर मध्ये भारतात येतात. आजूबाजूच्या शेतजमीन आणि पाणथळ प्रदेशात आणि धरणाच्या जागेत हे पक्षी वास्तव्य करून असतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात पक्षीनिरीक्षक आपले कॅमेरे घेऊन या पक्षांचे फोटो टिपण्यासाठी इथे सज्ज असतात.

माळशेज हा मुख्य शहरांना जोडणारा प्रमुख रस्ता असून, या ठिकाणाहून बऱ्याच प्रकारच्या गाड्या पुणे-मुंबईला दळणवळण करत असतात.

माळशेज घाटाच्या बाजूला असलेलाच हरिश्चंद्रगड हे देखील एक प्रसिद्ध व प्रेक्षणीय स्थळ असून, माळशेज घाटाच्या मागे हरिश्चंद्रगडाची गगनभिडी डोंगररांग पसरलेली दिसून येते. माळशेज घाटाच्या तीन धारांमध्ये कोसळणारा धबधबा तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्कीच भेट दिली पाहिजे.

मुख्य शहर ते माळशेज अंतर 

माळशेज पर्यटन कालावधी/दिवस

माळशेज व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी अंदाजे तुम्हाला दोन दिवस लागू शकतात.

MALSHEJ GHAT
माळशेज

माळशेज घाटाचे वर्णन

समोरच हरिश्चंद्रगडाची डोंगररांग तुम्हास या घाटाच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसी आहे. इथून पाहिले असता आद्राईचे जंगल, रोहिदास शिखर, तारामती शिखर, हरिश्चंद्रगड शिखर (बालेकिल्ला), जुन्नर दरवाजा वाट, नवरा-नवरी डोंगर, वर्हाड्याची डोंगररांग, नाणेघाट, सिंधळ्या-उधळ्या, हडसर, घुण्या, निमगिरी, भोजगिरी, दोंड्या व घाटघर आदि पर्वतरांगा नजरेस पडतात. मान्सून सिझन मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यास येतात

मोरोशी गावापासून थोड्याच अंतरावर काळू नावाचा धबधबा आहे. डोंगरावरचे पाणी घेऊन फेसाळत हा कड्यांवरून खाली बरसतो. आजूबाजूला छोटे छोटे ओढे जोराने धावत असतात. आणि ही सगळी निसर्गाची किमया बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

वाटेतच कारवॉश पॉइंट नावाच एक ठिकाण आहे. तिथे तर भर रस्त्यावर धो धो पाणी पडत असते. त्या पाण्याच्या खाली लोक गाडी धुऊन घेतात. आपल्याला इथे प्रवास करताना रस्त्याच्या आजूबाजूला तिकडचे स्थानिक रहिवासी छोटी छोटी दुकान टाकून रानभाज्या, फळे, मक्याची कणसे विकायला घेऊन बसलेले दिसतात.

पावसाळ्यातील ३० अप्रतिम पर्यटन स्थळे – महाराष्ट्र – भाग ०२

MALSHEJ GHAT
MALSHEJ GHAT

माळशेज घाटाजवळील प्रेक्षणीय स्थळे

माळशेज घाटला भेट दिल्यानंतर माळशेज घाटाच्या आजूबाजूच्या परिसराचा देखील तुम्ही मनमुरादपणे आनंद घेऊ शकता. त्यापैकीच काही प्रेक्षणीय स्थळे आम्ही आपणास सुचवत आहोत. या प्रेक्षणीय स्थळांना देखील तुम्ही नक्कीच भेट द्या.

माळशेज धबधबा (Malshej Ghat Waterfall)

खडकाळ व उंच उंच टेकड्या, तसेच हिरव्यागार व पांढऱ्याशुभ्र धुक्याच्या थरामधून कोसळणारा भयानक प्रवाह आणि तयार झालेला एक आगळावेगळा देखावा, म्हणजे माळशेज धबधबा. घाटामधील माळशेज धबधबा हा ट्रिप साठी एक आदर्शाचे, तसेच धावपळीच्या आयुष्यातून एक सुखद अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या धबधब्याचे खरे सौंदर्य अनुभवायचे असल्यास, पावसाळ्यामध्ये माळशेज घाटाला नक्की भेट दिली पाहिजे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – जून ते सप्टेंबर

पिंपळगाव जोगा धरण

घाटापासून साधारणतः १७ ते १८ किलोमीटर इतक्या अंतरावर असणारा पिंपळगाव जोगा धरण हे पुष्पावती नदीवर बांधले आहे. रंगीबेरंगी आकाशाच्या छटा व छायांकित टेकड्यांसह विहंगम दृश्य देणाऱ्या सूर्यास्ताचे छायाचित्र कॅप्चर करण्यासाठी असणारे पिंपळगाव जोगा धरण हा एक उत्तम पर्याय आहे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – जुलै ते सप्टेंबर

महाराष्ट्राचे एवरेस्ट – कळसुबाई शिखर

हरिश्चंद्रगड किल्ला

हरिश्चंद्रगड किल्ला

कलचुरी राजवटीच्या काळामध्ये सहाव्या शतकाच्या कालावधीत बांधलेला, हरिश्चंद्रगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणतः ४६६५ इतका उंचीवर वसलेला, माळशेज घाटातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.

हरिश्चंद्रगडावर जाताना असणाऱ्या जंगलवाटेत आपल्याला घोरपड, मुंगूस, ससे हे प्राणी पाहायला मिळतात. घाटाच्या डाव्या बाजूला ठाण मांडून उभा असणारा पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड. चारही बाजूने दणकट कडे कपाऱ्यांनी सजलेला हा हरिश्चंद्रगड आहे. अग्निपुराणात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आढळतो. इसवी सन १७४८ साली हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून हिसकावून घेतला. नंतर किल्लेदार कृष्णाजी शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता.

या किल्ल्याला तटबंदी नाही. बाराव्या शतकातील शालिवाहन काळातील शिव मंदिर या किल्ल्यावर दिसते. या किल्ल्याची चढाई पातळी कठीण आहे. त्याचप्रमाणे शिव मंदिराच्या बाजूला केदारेश्वराची गुहा सुद्धा आहे. हरिश्चंद्रगडावरील मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा. या किल्ल्यावर प्राचीन काळची लेणी सुद्धा आहेत.

या किल्ल्याचे ट्रेकिंग करणे व तुमच्या कौशल्याची खऱ्या अर्थाने चाचणी घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यातील ३० अप्रतिम पर्यटन स्थळे – महाराष्ट्र – भाग ०१

 • किल्ल्याची ऊंची – ४००० मी
 • प्रकार – गिरीदुर्ग
 • डोंगर रांग – माळशेज
 • जिल्हा – नगर
 • चढाई – मध्यम
 • भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – ऑक्टोंबर ते मार्च

आजोबा हिल फोर्ट

आजोबा हिल फोर्ट

आजोबा हिल फोर्ट अर्थात आजोबा टेकडी किल्ला, घाटातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतांच्या रांगेतील सर्वोच्च शिखरांपैकी एक किल्ला समजला जातो. हा किल्ला भग्नावस्थेत आहे.

या गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रचलित आहे. याच गडावर वाल्मिकी ऋषींनी रामयण लिहिले असे मानले जाते. इथेच सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला असेही मानतात . लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा संबोधत. म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. या गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.

 • किल्ल्याची ऊंची – ४५११ मी
 • प्रकार – गिरीदुर्ग
 • डोंगर रांग – बालघाट
 • जिल्हा – ठाणे
 • चढाई – मध्यम
 • भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – ऑक्टोंबर ते मार्च

कोकण कडा

कोकण कडा

घाटाजवळ प्रेक्षणीय स्थळांपैकी अजून एक सहासीप्रेमी तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी हे एक लोकप्रिय प्रेक्षणीय ठिकाण आहे. हरिश्चंद्रगडाची मुख्य आणि सर्वात सुंदर असणारीबाजू म्हणजे हा कोकणकडा. ३००० पेक्षा जास्त फुटांचा एकाच खंडकात असणार कडा कोकणकडा म्हणून ओळखला जातो.

गिर्यारोही लोक इथे पॅराशूट उडी, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग सारख्या वेगवेगळ्या थरारक कसरती करण्यासाठी येत असतात. हा कडा इंग्रजीअक्षरांमधल्या U आकारासारखा असून काटकोनातनसून बाह्यगोल आकारात आहे. हा कडा समोरून नागाच्या फणी सारखा दिसतो. हे ठिकाण ट्रेकिंग तसेच कॅम्पिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – ऑक्टोंबर ते मार्च

लोणावळा

लोणावळा हे लोकप्रिय हिल स्टेशन आहे. या ठिकाणी असणारा कुणे धबधबा, लोणावळा तलाव, तिकोना किल्ला, राजमाची किल्ला, पवना तलाव इत्यादी प्रेक्षणीय स्थळे,पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करून घेतात. या ठिकाणी तुम्ही रॅपलिंग, कॅम्पिंग, हॅकिंग, ट्रेकिंग, रायडिंग, वॉटर ऍक्टिव्हिटीज इत्यादी गोष्टी करू शकता.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – जुलै ते फेब्रुवारी.

गणेश पहाड/लेण्याद्री गुफा

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेस सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या खडकात कोरलेल्या सुमारे ३० बौद्ध लेण्यांच्या मालिकेला “लेण्याद्री” म्हणून संबोधले जाते.

लेण्याद्री हे गिरिजात्मक गणेशाचे ठिकाण आहे जे अष्टविनायकांपैकी एक आहे. तसेच येथील गुंफा स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम उदाहरण आहे. परदेशी पर्यटक येथे आवर्जून येतात. गणपती बाप्पा येथे अशाच एका मोठ्या गुहेत विराजमान आहेत. येथे जाण्यासाठी आपणास 300 ते 350 पायऱ्या चढून गेल्यावर मग दर्शन करता येते.

माळशेज घाट व्ह्यू पॉईंट (Malshej Ghat view Point)

माळशेज घाट व्ह्यू पॉईंट हा एक प्रसिद्ध पॉईंट असून, या ठिकाणी तुम्हाला घाटामधील छोटे-छोटे धबधबे, हिरव्या निसर्गाचा व डोंगरांचा मनमोहक नजारा तुम्ही घाटामधील व्ह्यू पॉईंट वरून पाहू शकता.

कारवॉश पॉइंट (Malshej Ghat Carwash Point)

माळशेज रस्त्यावर तुम्हाला विविध प्रकारचे धबधबे पाहायला मिळतात. त्यापैकी कार वॉश पॉइंट हा एक धबधबा आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही तुमची गाडी थांबवली की, तुमची गाडी धबधब्याच्या कोसळणाऱ्या पाण्याने धुवून निघते. नक्की तुम्ही देखील या कारवॉश पॉइंट धबधब्याला भेट द्या.

महाराष्ट्राचे चेरापुंजी – आंबोली घाट

शिवनेरी किल्ला

१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.

लाजवंती पॉईंट

हे ठिकाण जाणूनबुजून रायडर्स आणि ड्रायव्हर्ससाठी बनवले गेले आहे जेणेकरुन पर्वतांमध्ये वाइल्ड ड्राईव्ह केल्यानंतर स्वतःला थोडा आराम द्यावा, येथे काही उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी खूप छान दृश्ये आहेत. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्या

थम्ब पॉईंट

या ठिकाणचे लँडस्केप प्रेक्षणीय आहे, पावसाळ्यात या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी, पर्वत हिरवेगार आहेत. ढग पर्वतांच्या मागे येतात. या ठिकाणी असणे हे एक स्वर्ग आहे

थम्ब पॉईंट
MALSHEJ GHAT INFORMATION IN MARATHI

माळशेजजवळ करण्यासारख्या गोष्टी (Things to do near Malshej Ghat Marathi) 

malshej ghats – kalyan monsoon treks maharashtra

डोंगराळ प्रदेशात वसलेला माळशेज हे साहसप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. या हिल स्टेशनच्या घनदाट जंगलातील शिखरे आणि शौर्य किल्ले हे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगद्वारे एक्सप्लोर करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. माळशेजमधील ट्रेकिंगमुळे निसर्गाच्या कुशीत राहण्याची संधी मिळते.डोंगराळ भूगोलाची देणगी लाभलेल्या माळशेजमध्ये अनेक ठिकाणे आहेत, जी ट्रेकिंगसाठी योग्य ठिकाणे आहेत. धाकोबा शिखर (परिसरातील सर्वात उंच पर्वत), आजोबा टेकडीचा किल्ला ट्रेकिंग प्रेमींसाठी आदर्श स्थान आहे. 

नाणे घाट, जीवधन चावंड किल्ला हे देखील ट्रेकिंगच्या आवडीचे हॉट स्पॉट आहेत. जे थोडेसे अध्यात्मिक आहेत ते ओझर आणि लेण्याद्रीच्या मार्गाने जाऊ शकतात, जिथे सर्व भक्तांनी सन्मानित केलेली दोन गणेश मंदिरे आहेत. माळशेजमधील ट्रेकिंगमुळे पवित्र मंदिरांच्या दर्शनाबरोबरच साहसाचा आनंदही मिळतो. माळशेज घाटातील ट्रेकिंगमुळे भव्य सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील उत्कृष्ट निसर्ग पाहण्याची संधी मिळते, त्यामुळे हे हिल स्टेशन इतके लोकप्रिय आहे.

माळशेज घाट धबधबा

माळशेज मध्ये अनेक छोटे-छोटे धबधबे आहेत. या धबधब्यांचा चित्तथरारक आवाज व आजूबाजूंच्या दृश्यांनी मंत्रमुग्ध होण्यासाठी नक्कीच तुम्ही माळशेज घाट मधील धबधब्यांना भेट द्यावी. हे धबधबे अगदी लोकप्रिय व प्रशंसा करण्यासारखे उत्तम ठिकाण आहे.

स्थान – माळशेज धबधबा, माळशेज महाराष्ट्र.

घाटामधील पक्षीनिरीक्षण

पिंपळगाव जोगा धरण या ठिकाणी तुम्ही अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करू शकतात. रोहित पक्षी अर्थात फ्लेमिंगो हा एक परदेशी पक्षी, हंगामाच्या वेळी पिंपळगाव जोगा धरणावर येतो. त्याचप्रमाणे अल्पाइन स्विफ्ट, हिरवे कबूतर, लहान पक्षी, कोकिळा, पाईड किंगफिशर यांसारख्या विविध प्रकारचे पक्षी आपण या ठिकाणी पाहू शकतो.

स्थान – पिंपळगाव जोगा धरण, महाराष्ट्र.

आजोबा हिल ट्रेक

आजोबा हिल ट्रेक हे एक साहसी प्रेमींसाठी व ट्रेकिंग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्याच्या काळात आजूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर नेहाळत तुम्ही आजोबा हिल ट्रेक करू शकता. पण जास्त पावसाच्या काळात ट्रेकिंग करणे टाळावे.

स्थान – आजोबा हिल ट्रेक, महाराष्ट्र.

माळशेज घाट फोटो शूट

पावसाळ्याच्या काळामध्ये माळशेज मधील निसर्ग हा एक वेगळच स्वर्ग सुख देऊन जातो. या ठिकाणी असणारे विहंगम दृश्य नजरेत भरून ठेवण्यासारखे असते. या ठिकाणहून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अचंबित करणारे नजारे पाहता येतात. माळशेज मध्ये तुम्ही फोटोशूट अगदी उत्तम रित्या करू शकता.

स्थान – माळशेज, महाराष्ट्र.

माळशेज घाट
माळशेज

माळशेजला भेट देण्याअगोदर जाणून घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे

 • हवामानाचा अंदाज माळशेज घाटला भेट द्यावी.
 • अधिक पावसामध्ये रात्री प्रवास करू नये.
 • माळशेज हा एक उंच घाट असल्यामुळे, गाडी चालवताना दक्षता घ्यावी.
 • दारूचे सेवन करू नये.
 • घाटावरून गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे.
 • हवेचा दाब, हेडलाईट, रिफ्लेक्टरसाठी वाहनांचे टायर, ब्रेक इत्यादी. तपासून नंतरच माळशेज घाटाला भेट द्यावी.
 • जर तुमचे वाहन ब्रेकडाऊन झाल्यास, जवळील महामार्ग पोलिसांची त्वरित संपर्क साधावा.

माळशेज येथे कसे जाल

माळशेजला भेट देण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग.

रस्ते मार्ग

माळशेजला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे या प्रमुख शहराने तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी जाण्यासाठी पनवेल येथे नियमित राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत.

 • बस : मुंबई – कल्याण – माळशेज घाट , पुणे – जुन्नर – माळशेज घाट
 • पुणे – आळेफाटा मार्गे माळशेज घाट, नाशिक – आळेफाटा मार्गे माळशेज घाट 

रेल्वे मार्ग

माळशेज गावामध्ये कोणतेही रेल्वे स्थानक नाही. कल्याण स्टेशन माळशेज घाट पासून अधिक सोयीचे रेल्वे स्थानक आहे.

हवाई मार्ग

माळशेज मध्ये कोणतेही विमानतळ नाही. मुंबईवरील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच पुण्यावरून नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे.

माळशेज घाटला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

 • माळशेजचे सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये अधिक खुलून येते. त्यामुळे तुम्हाला त्याठिकाणीचे धबधबे, हिरवाईचा आनंद घ्यायचा असेल तर, पावसाळ्याच्या काळामध्ये भेट देऊ शकता.
 • तुम्हाला ट्रेकिंग करायचे असल्यास, ट्रेकिंग मध्ये पावसाळ्यात जाणे योग्य नाही. त्यासाठी तुम्ही ऑक्टोबरचे ते मार्च हा कालावधी ट्रेकिंग प्रेमींसाठी उत्तम आहे.

माळशेज घाट येथील हवामान

घाटावर जास्त उष्णता जाणवत नाही. माळशेज घाटात वार्षिक तापमान हे साधारणतः २७ डिग्री सेल्सिअस ते ३५ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते.

बोलल्या जाणाऱ्या भाषा

 • मराठी
 • हिंदी

माळशेजजवळ राहण्याची सोय (Places to Stay Near Malshej Ghat)

माळशेजमध्ये तुमच्या बजेटनुसार तुम्हाला योग्य ते रूम्स व हॉटेल्स उपलब्ध होतात. यामध्ये तुमची उत्तम जेवणाची व राहण्याची सोय केली जाते. त्यापैकीच काही हॉटेल्स खालील प्रमाणे-

 • दोस्ती लेवूड हिल स्टेशन
 • हॉटेल महाराज
 • कॅम्पसाईट माळशेज
 • ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट माळशेज
 • हॉटेल मुक्ताई

FAQ

माळशेज घाट कुठे आहे ?

ठाणे जिल्ह्यात, कल्याण – नगर रस्त्यावर, मुरबाड पासून ५४ किलोमीटर अंतरावर माळशेज घाट आहे. पुणेमार्गे यायचे असल्यास जुन्नर मार्गे माळशेजला जाता येते.

माळशेज घाटला तुम्ही कसे जाल?

१ पुणे – आळेफाटा मार्गे माळशेज घाट, नाशिक – आळेफाटा मार्गे माळशेज घाट 
२ मुंबई – कल्याण – माळशेज घाट , पुणे – जुन्नर – माळशेज घाट
३ माळशेज गावामध्ये कोणतेही रेल्वे स्थानक नाही. कल्याण स्टेशन माळशेज घाट पासून अधिक सोयीचे रेल्वे स्थानक आहे.
४ मुंबईवरील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच पुण्यावरून नवीन ५ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे

माळशेज घाट व त्या ठिकाणी परिसर एक्सप्लोर करण्यासाठी किती दिवस आवश्यक आहे?

माळशेज घाट व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी अंदाजे, तुम्हाला दोन दिवस लागू शकतात.

माळशेज घाट जवळ असणाऱ्या पिंपळगाव जोगा धरण या ठिकाणी कोणता पक्षी प्रसिद्ध आहे?

माळशेज घाट जवळ असणाऱ्या पिंपळगाव जोगा धरण या ठिकाणी सैबेरिया मधून भारतात येणार स्थलांतरित फ्लेमिंगो हा पक्षी प्रसिद्ध आहे.

माळशेजला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता?

जुलै ते सेप्टेंबर हे महीने माळशेजला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत. माळशेजचे सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये अधिक खुलून येते. त्यामुळे तुम्हाला त्याठिकाणीचे धबधबे, हिरवाईचा आनंद घ्यायचा असेल तर, पावसाळ्याच्या काळामध्ये भेट देऊ शकता.
तुम्हाला ट्रेकिंग करायचे असल्यास, ट्रेकिंग मध्ये पावसाळ्यात जाणे योग्य नाही. त्यासाठी तुम्ही ऑक्टोबरचे ते मार्च हा कालावधी ट्रेकिंग प्रेमींसाठी उत्तम आहे.

माळशेज घाटाची खासियत काय आहे?

मुंबई ते अहमदनगर व नाशिक यांच्यामधील महत्त्वपुर्ण आणि प्रेक्षणीय असा घाटरस्ता असलेले स्थळ. विणीच्या हंगामात येणारे सुंदर फ्लेमिंगो पक्षी, पावसाळ्यातील गर्द हिरवळ, धुक्यातील डोंगर, आणि धबधबे. या ठिकाणी तुम्ही स्वत:ची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून निसर्गाचा आनंद घेउ शकता. समोरच हरिश्चंद्रगडाची डोंगररांग तुम्हास या गडाच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसी आहे.
इथून पाहिले असता आद्राईचे जंगल, रोहिदास शिखर, तारामती शिखर, हरिश्चंद्रगड शिखर (बालेकिल्ला), जुन्नर दरवाजा वाट, नवरा-नवरी डोंगर, वर्हाड्याची डोंगररांग, नाणेघाट, सिंधळ्या-उधळ्या, हडसर, घुण्या, निमगिरी, भोजगिरी, दोंड्या व घाटघर आदि पर्वतरांगा नजरेस पडतात. मान्सून सिझन मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यास येतात.

माळशेज घाट ते मुंबई हे अंतर किती आहे व त्यासाठी लागणारा कालावधी किती?

मुंबई ते माळशेज हे अंतर साधारणतः १२६ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी अंदाजे ४ तास लागू शकतात.

पुणे ते माळशेज घाट अंतर किती व त्यासाठी लागणारा आवश्यक कालावधी किती?

पुणे ते माळशेज हे अंतर अंदाजे १२८ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी साधारणतः ३ तास लागू शकतात.

माळशेज घाट जवळ राहण्याची सोय आहे का?

माळशेजमध्ये तुमच्या बजेटनुसार तुम्हाला योग्य ते रूम्स व हॉटेल्स उपलब्ध होतात. यामध्ये तुमची उत्तम जेवणाची व राहण्याची सोय केली जाते.

माळशेजला भेट देण्यापूर्वी माहित असावे असे मुद्दे कोणते आहे?

हवामानाचा अंदाज माळशेज घाटला भेट द्यावी.
अधिक पावसामध्ये रात्री प्रवास करू नये.
माळशेज हा एक उंच घाट असल्यामुळे, गाडी चालवताना दक्षता घ्यावी.
दारूचे सेवन करू नये.
घाटावरून गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे.
हवेचा दाब, हेडलाईट, रिफ्लेक्टर, वाहनांचे टायर, ब्रेक इत्यादी. तपासून नंतरच माळशेजला भेट द्यावी.
जर तुमचे वाहन ब्रेकडाऊन झाल्यास, जवळील महामार्ग पोलिसांची त्वरित संपर्क साधावा.

माळशेज घाट कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ठाणे जिल्ह्यात, कल्याण – नगर रस्त्यावर, मुरबाड पासून ५४ किलोमीटर अंतरावर माळशेज आहे.

निष्कर्ष

मित्रहो आम्ही आमच्या लेखातून – MALSHEJ GHAT INFORMATION IN MARATHI आपणास माळशेज बद्दल माहिती दिली आहे. या मध्ये आम्ही माळशेज घाट जवळील प्रेक्षणीय स्थळे, भेट देण्यासाठी उत्तम महिना, हवामान, माळशेज घाट का प्रसिद्ध आहे? – माळशेज घाट माहिती मराठी हा लेख तुम्ही नक्की वाचा व कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.व लेख आवडल्यास शेयर नक्की करा.

धन्यवाद.

1 thought on “माळशेज घाट संपूर्ण माहिती मराठी : MALSHEJ GHAT INFORMATION IN MARATHI”

 1. जूना माळशेज घाट पण ट्रेक करू शकता . ऑगस्ट ते सप्टेंबर

  Reply

Leave a comment