भारताचे पहिले क्रांतिकारक म्हणून प्रसिद्धीस आलेले, मंगल पांडे यांना भारत देशाचे सर्वप्रथम स्वातंत्र्य क्रांतिकारी म्हणून संबोधले जाते. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे व हेच बंड संपूर्ण देशामध्ये वणव्यासारखे पसरवणारे, मंगल पांडे. इंग्रजांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करू नही स्वातंत्र्याची आग देशांमधील प्रत्येक जनतेच्या मनात भडकली.
यामुळेच १९४७ मध्ये आपला देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. मंगल पांडे हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शिपाई होते. त्यांनी एकट्यांनीच मिळून एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर, समोरून जाऊन हल्ला करून, त्याला मारले. त्यामुळे मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी, मंगल पांडे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिका बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मंगल पांडे माहिती मराठी Mangal Pandey Information In Marathi
नाव | मंगल पांडे |
जन्म तारीख | दि. १९ जुलै १८२७ |
जन्म स्थळ | उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात |
आईचे नाव | राणी पांडे |
वडिलांचे नाव | दिवाकर पांडे |
प्रसिद्धी | पहिला स्वातंत्र्यसैनिक |
क्रांती | १८५७ राष्ट्रीय उठाव |
मृत्यू | १० एप्रिल १८५७ |
मंगल पांडे यांचा जन्म व प्रारंभिक जीवन
- मंगल पांडे यांचा जन्म दि. १९ जुलै १८२७ मध्ये नागवा गावामध्ये, बलिया जिल्ह्यात झाला. जे आज ललितपुर, उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थित आहे.

- मंगल पांडे यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. पांडेजी ना हिंदुत्वावर प्रचंड विश्वास होता. पांडेजी च्या मते, हिंदू धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे व या धर्माची तुलना इतर कोणत्याही धर्मासोबत होऊ शकत नाही, असे त्यांचे मत होते.
- १८४९ मध्ये मंगल पांडेजी यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये भरती केली. लष्कराच्या ब्रिगेडच्या सांगण्यावरून, त्यांना या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये सामील करण्यात आले. यानंतर मंगल पांडे यांना या लष्करी सैन्यांमध्ये पायदळात शिपाई बनवण्यात आले.
- मंगल पांडे हे अतिशय उत्साहित व चांगले सैनिक होते. त्यानंतर त्यांचा चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री मध्ये समावेश करण्यात आला. ब्राह्मणांचा मोठ्या प्रमाणात या इन्फंट्री मध्ये समावेश होता. मंगल पांडे हे प्रचंड महत्वकांक्षी होते. त्यांनी आपले संपूर्ण काम अतिशय निष्ठेने व मनोभावे केले.
- लहानपणापासूनच त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण व गुण प्राप्त झाले, त्यांचे सुरुवातीचे आयुष्य इतर मुलांप्रमाणेच होते. बालपणापासूनच त्यांना खेळण्याची प्रचंड आवड, यासोबतच लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये आपल्या भारत मातेविषयी अतोनात प्रेम होते.
- मंगल पांडे हे बालपणापासूनच इंग्रज अधिकाऱ्यांना गरीब व निरपराध लोकांवर अत्याचार व जुलूम करताना पाहत असत, त्यामुळे त्यांच्या मनात ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रचंड द्वेष भरला होता.
- त्यांनी त्यावेळी अशी भावना व्यक्त केली की, एक दिवस इंग्रजी राजवटीतूने भारताला नक्कीच मुक्त करेन याच्या कारणास्तव मंगल पांडे अवघे २२ वर्षाचे होते, त्यावेळी त्यांनी ब्रिटिश इंडिया कंपनी बी.एन.आय च्या बटालियनमध्ये पायदळ सैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
- कारण त्यांना आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या जुलामीपासून, मुक्त करायचे होते. याचे मुख्य कारण असे की, ब्रिटिश सरकारच्या सैन्यांमध्ये राहूनच मी माझ्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी, काहीतरी करू शकेल.
- अशी त्यांची विचारधारणा होती. त्यामुळे त्यांनी नेहमी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रचंड कार्य केले.
मंगल पांडे यांचे कुटुंब
मंगल पांडे यांचे कुटुंब अतिशय लहान कुटुंब होते. वडील दिवाकर पांडे हे व्यवसायाने शेतकरी व आई राणी पांडे या गृहिणी होत्या. मंगल पांडे यांना आई-वडिलांकडून बालपणापासूनच अतिशय चांगले संस्कार प्राप्त झाले होते.
नक्की वाचा –
- सरोजिनी नायडू माहिती मराठी
- वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी
- गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी
- विनोबा भावे माहिती मराठी
मंगल पांडे यांचे क्रांतिकारक जीवन
मंगल पांडे यांना क्रांतिकारी मंगल या नावाने संबोधले जात असे. ते देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी एका शूर माणसाप्रमाणे, ब्रिटिश सरकारविरुद्ध एकट्याने आवाज उठवून, आपल्या प्राणाची आहुती दिली.

त्यांच्या या बलिदानाला, त्यांच्या या प्रयत्नांना, १९४७ पूर्णतः प्राप्त झाली. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी मधून दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.
मंगल पांडे यांचे क्रांतीत आगमन
मंगल पांडे हे लहानपणापासूनच अतिशय हुशार व निडर होते. त्यांच्या मनामध्येच लहानपणापासूनच क्रांतीची ज्योत पेटत होती . इंग्रजी अधिकारांविरुद्ध, लहानपणापासूनच मंगल पांडे यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला होता. कारण ब्रिटिश सरकार हे जनतेचे शोषण करत होते.
या कारणास्तव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्य दलामध्ये मंगल पांडे यांनी जाण्याचे ठरवले, जेणेकरून या कंपनीच्या सैन्यात राहून त्यांना आपला देश स्वतंत्र करता येईल. मंगल पांडे हे एक महान देशभक्त असल्यामुळे, त्यांना परेड कशी चालवायची, ही अगदी चांगल्या रीतीनेच माहीत होती.

एके दिवशी ते परेड करत असताना, एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना पाहिले अधिकाऱ्याने पांडे यांना विचारले की, तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सामील व्हायचे आहे का ? यावर मंगल पांडे यांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारून ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मंगल पांडे यांनी देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी प्रवेश केला.
मंगल पांडे यांचे क्रांतिकारी उपक्रम
मंगल पांडे संपूर्ण भारतातील जनतेसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या हक्कासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी, नेहमीच आवाज उठवला व ब्रिटिश सरकारला देशामध्ये सळो की पळो करून सोडले.
मंगल पांडे यांच्या प्रेरणास्त्रोताने व प्रभावाने महात्मा गांधी, भगतसिंग, यांसारख्या थोर क्रांतिकार वीरांनी १९४७ मध्ये आपला भारत देश इंग्रज अधिकाऱ्यांच्या तावडीतून मुक्त केला व भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले.
१८५७ च्या क्रांतीचा मंगल पांडे यांच्या जीवनावर काय परिणाम झाला ?
- १८५७ च्या राष्ट्रीय उठावांमध्ये, अनेक क्रांतिकारक यांनी भाग घेतला होता. अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या, याच क्रांतिकारकापैकी मंगल पांडे हे महान व पहिले स्वातंत्र क्रांतिकारी होते.
- दि.२९ मार्च १८५७ चा दिवस बंगाल सेनेच्या ३४ व्या रेजिमेंट मधील क्रमांक १४४६ चा ब्राह्मण शिपाई मंगल पांडे एका दिवशी सकाळी प्राप्तविधी, उरकून आपला तांब्याजवळच्या तळ्यावर घासून धुवून त्यात पाणी भरून, आपल्या छावणीकडे निघाला होता.
- तेवढ्यात एक मेहकर भंगी समोरून आला व त्या शिपायला म्हणाला, भाईसाहब पानी पिने के लीये जरा अपना लोटा दीजिए, ते ऐकून मंगल पांडे खवळून म्हणाला, तुझे लोटा दिया तो अपवित्र हो जायेगा और मेरा धर्मवीर भ्रष्ट हो जायेगा, त्यावर तो म्हणाला पहेलेसे हि तुम्हारा धर्म तो भ्रष्ट हो चुका है | अंग्रेज सरकार तुम्हारे नयी बंदुकों के लिए जो काडतुसे बना रही है, उनके उपर गाय और सुअर की चरबी लगायी है | उसका कव्हर तुम्हे अपने दातो से काटने पडेंगे, तब तुम्हारे धर्म का क्या होगा ? हे ऐकल्यावर मंगल पांडेला धक्का बसला होतो. तो फक्त म्हणाला ऐ आणि आपल्या छावणीकडे धावला.
- त्याने छावणीतील सगळ्या हिंदू मुसलमान सैनिकांना ती बातमी सांगितली. म्हणाला ये बदमाश हमारा धर्म भ्रष्ट करने जा रहे है , हमे बगावत करने ही होगी | त्याचे ते बोलणे एकूण सारे सैनिक खवळले. मंगल पांडे तर आपली बंदूक सरसावून मैदानात आला व सगळ्या सैनिकांना आवाहन करू लागला, अंग्रेज को हमे मारना ही चाहिये, चलो अपने अपने बंदुके संभालो | मंगल पांडेचे इंग्रज अधिकाऱ्यांना आव्हानच होते, त्याचे ते आवाहन ऐकून सर्जन मेजर हुसेन त्याच्याकडे पिस्तूल घेऊन धावला, तो समोर येताच मंगल पांडेने आपल्या बंदुकीने अचूक नेम धरून त्याच्यावर गोळी झाडली.
- मेजर हुसेनला गोळी लागली व तो धाडकन कोसळून तडफडू लागला. ते पाहून लेफ्टनंट बॉबी घोड्यावरून, त्याच्याकडे पिस्तूल रोखून धावला. पांडेने गोळी झाडली पण ती त्याच्या घोड्याला लागली व घोडा कोसळला.
- बॉबी खाली पडला व आपली तलवार उपसून पांडेवर वार करण्यासाठी धावला, तो पांडेवर वार करणार तोच पांडेने आपल्या तलवारीने त्याचा हात छाटून टाकला. तो धाडकन कोसळून, तडपडू लागला.
- बाकीचे अनेक लांब उभे राहून हा सारा खेळ बघत होते, त्यांनी पांडेलाही साथ दिली नाही की, त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीलाही ते धावले नाहीत.
- एका इंग्रज सैनिकाने ते कृत्य पाहिले व त्याने कर्नल व्हीलरला सांगितले. कर्नल व्हीलर घोड्यावरून पळत आला व त्याने उभ्या असलेल्या सैनिकांना पांडेला गिरफ्तार करण्यास सांगितले, पण त्याचा हुकूम कोणीही मानला नाही.
- म्हणून जनरल कर्नल हियरअस कडे गेला. व त्याने सारी हकीकत त्यांना सांगितली. जनरल हियरअस आपल्या हाताखालील अधिकारी व काही गोरे सैनिक घेऊन, त्या ठिकाणी आला.
- पांडेला पकडण्याचा हुकूम तुम्ही का नाही दिला, असे त्याने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले शिपाई आमचा हुकूम ऐकत नाही. ते ऐकताच तो शिपायाकडे पाहून गरजला. कहना नही मानते, मेरी बात सुनो, जो पांडे को पकडने आगे नही बडेगा, उसे मे गोली से उडा दूंगा. चलो आगे बढो, जनरलचा हुकूम ऐकून ते शिपाई पांडेकडे जाऊ लागले.
- पांडेला त्या आपल्या साथीदारांना तर मारायचे नव्हते, आता पकडले जाण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असा विचार करून, बंदुकीची नळी आपल्या छातीकडे वळवली व तिचा घोडा दाबला. गोळी त्याच्या शरीरात शिरली व तो धाडकन खाली पडला.
- पण मरण पावला नाही, त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. हे सारे कृत्य २९ मार्च १८५७ रोजी घडले. दवाखान्यात पांडे बरा झाल्यावर, त्याच्यावर खटला भरण्यात आला. सैनिक न्यायालयाने, त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
- इंग्रज सैनिक अधिकाऱ्यांचा, आपल्या हिंदी सैनिकांवरील विश्वास, या घटनेने उडाला. पांडेला फाशी देण्यासाठी, कलकत्त्याहून जेल बराकुराला आणण्यात आले व १० एप्रिल १८५७ रोजी त्याला फासावर लटकवण्यात आले.
- मंगल पांडेच्या बलिदानाची हकीकत भारत भरच्या इंग्रजी छावण्यात पसरली. सारे हिंदी सैनिक आधीच इंग्रजांच्या अन्याय वागणुकीने संतुष्ट होते, ते अधिकच संतप्त झाले.
- १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी मंगल पांडेच्या बलिदाराने तयार झाली. तेव्हापासून इंग्रज अधिकारी प्रत्येक बंडखोराला पांडे असे संबोधू लागले.
दहा दिवसांपूर्वी मंगल पांडेला का फाशी देण्यात आली ?
- मंगल पांडे यांचे कार्य, अतिशय अद्वितीय व अविश्वासनीय आहे. त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी प्रचंड महत्त्वाची कार्य केली.
- ज्यावेळी मंगल पांड्यांना अटक केले व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यावेळी त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता, त्यांनी स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले.
- ही बंडखोरी केवळ मीच केली असून, त्यात माझ्या कोणत्याही मित्रांची प्रमुख भूमिका नाही, असे त्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले.
- ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड केल्याचा एकच परिणाम असतो, तो म्हणजे फाशी दिली जाते. म्हणून, त्याने सर्व दोष स्वतःवर घेतले व आपल्या साथीदारांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या या शिक्षेपासून वाचवले.
- त्यानंतर दि. १८ एप्रिल १८५७ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु मंगल पांडे यांच्या फाशीची बातमी समजतात, बाहेरचे सर्वजण बंड करून ब्रिटिश सरकारवर धावून आले.
- इतर राज्यातूनही ब्रिटिश सरकार विरुद्ध बंडाच्या बातम्या येऊ लागल्या, त्यामुळे ब्रिटिश सरकार या बंडाला घाबरून, दि १८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडेला फाशी देण्याऐवजी, दहा दिवस आधीच मंगल पांडे यांना फाशी दिली.
- मंगल पांडे यांना १० एप्रिल १८५७ रोजी पहाटे ०५ वाजून २५ मिनिटांनी फाशी देण्यात आली. ब्रिटीशांच्या मनात भीती होती की, ही बंडखोरी वाढून, त्यांच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. या कारणास्तव ब्रिटिश सरकारने मंगल पांडे यांना फाशी दिली.
आधुनिक युगातील मंगल पांडे
- मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट व नाटके प्रदर्शित झाली असून, त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तके सुद्धा लिहिण्यात आली आहेत. २००५ मध्ये प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांचा मंगल पांडे द रायझिंग हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
- या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता यांनी केले होते. २००५ मध्येच द रोटी रिबेलियन नावाचं नाटक ही मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित रंगले होते. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुप्रिया करुणाकरण यांनी केले होते.
- अठराशे सत्तावनच्या बंडा नंतर पांडे हा शब्द ब्रिटिशांमध्ये खूप लोकप्रिय झाला. ज्याचा अर्थ देशद्रोही किंवा बंडखोर असा होतो.
- जेडी स्मिथच्या पहिल्या वाईट या कादंबरीमध्ये, सुद्धा मंगल पांडे यांचा उल्लेख आवर्जून केलेला दिसून येतो.
मंगल पांडे यांचा मृत्यू
दि १८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडेला फाशी देण्याऐवजी, दहा दिवस आधीच मंगल पांडे यांना फाशी दिली. मंगल पांडे यांना १० एप्रिल १८५७ रोजी पहाटे ०५ वाजून २५ मिनिटांनी फाशी देण्यात आली. ब्रिटिश सरकारने मंगल पांडे यांची प्रतिमा व प्रसिद्धी डागाळण्याचा प्रयत्न भरपूर वेळा केला.
परंतु १८५७ मध्ये मंगल पांडे यांना बंडखोर म्हणून सर्वांसमोर आणण्यास आले. पण आपल्या शहीद क्रांतिकारकाचे बलिदान भारतातील जनतेला चांगले समजल्या कारणाने, ब्रिटिश सरकारच्या खोटेपणाला भारतातील जनता बळी पडली नाही.
मंगल पांडे यांनी ज्या गोष्टीची सुरुवात केली होती, ती गोष्ट भारतातील इतर स्वातंत्र्य सैनिकांनी पूर्णत्वास आणली व दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला व भारताला स्वातंत्रता प्राप्त झाली.
१९८४ मध्ये मंगल पांडे यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी केले गेले.
१९८४ मध्ये भारत सरकारने मंगल पांडे यांच्या स्मरणार्थ पांडेंची प्रतिमा असलेली टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला.
मंगल पांडे यांच्यावर आधारित चित्रपट
मंगल पांडेचे जीवन द रोटी रिबेलियन या सुप्रिया करुणाकरन लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचा विषय होता. हे नाटक स्पर्श या थिएटर ग्रुपने आयोजित केले होते आणि जून २००५ मध्ये हैदराबादमधील आंध्र सरस्वती परिषदेच्या द मुव्हिंग थिएटरमध्ये मध्ये सादर केले होते
आमीर खानचा मंगल पांडे: द राइजिंग हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमीर खान, राणी मुखर्जी या कलाकारांनी मुख्य पात्रांची भूमिका पार पाडली.
मंगल पांडे यांच्या बद्दल थोडक्यात सारांश
- भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे, शेकडो क्रांतीकारकांचे लक्ष. अवघी देशभक्तांची शौर्यगाथा. १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या कालखंडाचा हा इतिहास.
- यामध्ये यज्ञ कुंड आहेत, लक्षामध्ये स्वातंत्र्य प्रेमींचा श्वासोच्छ्वास आहे, धूमस्ते निखारे आहेत, अनेक क्रांतिकारकांचे बलिदान, आत्महर्पण आणि हाल अपेक्षा, ज्यांना सोसावं लागलं आणि भोगाव लागल्या, अशा देशभक्तांची ही जीवनगाथा.
- स्वातंत्र्यसंग्रामाचा रणशिंग पुंकणारा क्रांतिकारक, मंगल पांडे २३ जून १७५७ चा दिवस बंगालमध्ये प्लासीच्या लढाईत कपट पणाने विजय मिळवून, इंग्रजांनी भारताच्या भूमीवर आपले पाय घट्ट रोवले होते. सन १८५७ च्या सुमारास या घटनेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा इंग्रजांनी ठरवलं.
- पण अशातच एका व्यक्तीने त्यांना असा धक्का दिला की, या धक्क्याने इंग्रजांचे सत्ता भारतातून नष्ट होते की काय, असं त्यांना वाटू लागलं. हा धक्का ज्याने दिला त्यांचा नाव होतं, मंगल पांडे.
- १८५७ च्या उठावाची रणशिंगा फुंकणारा हा क्रांतिकारी गंगा किनारी असणाऱ्या नागमा या गावी १९ जुलै १८२७ रोजी जन्मला. वयाच्या १८ व्या वर्षी पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून इंग्रजी सैन्यात दाखल झालेला, मंगल पांडे हा कडवा धर्माभिमानी होता. देशभक्त होता.
- त्या काळात हिंदू समाजात जात-पात मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. तो जणू एक हिंदू धर्माला मिळालेला शापच होता, डम डम येथील दारू गोळ्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या, एका हलक्या जातीच्या मजुराला पाणी द्यायला, नकार दिल्यावर तो म्हणाला, आता जातीचा अभिमान करतात आणि बंदुकिला लावलेल्या गाई डुकरांच्या चरब्याची खुशाल चव घेता. ही त्याने दिलेली बातमी हा हा म्हणता कंपनीच्या सैन्यात पसरली आणि वातावरण तापले.
- २९ मार्च १८५७ चा तो रविवारचा दिवस उजाडला. बरा पुढच्या फलटणमध्ये एक देशी सैनिक भयंकर संतापला ही बातमी इंग्रजांना कळाली
- त्यावर मेजर ट्युशन आणि बाकी आले. ते गोरे कातडे, पाहून मंगल पांडेचे पित्त खवळले, तो आपल्या साथीदारांना म्हणाला अरे भेगडांनो आपला देश आणि धर्मगिळायची वेळ आली आहे, तरी तुम्ही गप्प कसे. असं म्हणून त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्यांना जखमी केलं.
- त्यानंतर ब्रिगेडियर ब्रँड आणि जनरल इयर्स असे एकापेक्षा एक मोठ्या अधिकारी असूनही, त्यांना मंगल पांडेला पकडाची हिम्मत झाली नाही. अखेर इयर्स आणि इंग्रज अधिकाऱ्यांना ईश्वरी पांडे या जमाधारास मंगल पांडेला पकडायची आज्ञा केली.
- आज्ञा मोडल्यास तुला गोळी घालेल, हे ऐकल्यावर आपल्यामुळे आपल्या माणसांचे प्राण जाण्यापेक्षा, आपण आत्मबलिदान करावे. असा विचार करून, मंगल पांडे याने स्वतःच्या छातीवर गोळी झाडली पुढे उपचार नंतर तो वाचला.
- पण त्यांची कोर्ट मार्शल पुढे चौकशी होऊन त्यांना फाशीची शिक्षा १८ एप्रिल १८५७ सुनावली. परंतु इंग्रज अधिकाऱ्यांनी मंगल पांडे यांना १० दिवस पाहिलेचे फाशीची शिक्षा दिली. तो दिवस होता १० एप्रिल १८५७ आणि तेव्हा मंगल पांडेचे वय होते, केवळ बावीस वर्षे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना मनाचा मुजरा.
मंगल पांडे यांच्या बद्दल १० ओळी
- जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची चर्चा होते, तेव्हा मंगल पांडेंचा उल्लेख नक्कीच होतो.
- मंगल पांडे यांनी २९ मार्च १८५७ रोजी देशातील स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात केली व देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
- मंगल पांडे यांनी सुरू केलेला हा लढा १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत असाच होता.
- मंगल पांडे यांचा जन्म १९ जुलै १८२७ झाला. १८४९ मध्ये मंगल पांडेजी यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये भरती केली.
- मंगल पांडे यांच्या आईचे नाव राणी पांडे व वडिलांचे नाव दिवाकर पांडे असे होते.
- मंगल पांडे यांचे वडील व्यवसायाने शेतकरी व आई गृहिणी होती.
- मंगल पांडे यांना दि. १० एप्रिल १८५७ रोजी पहाटे ०५ वाजून २५ मिनिटांनी फाशी देण्यात आली.
- वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी मंगल पांडे यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.
- मंगल पांडे हे भारत देशाचे पहिले स्वातंत्र सैनिक आहे.
- मंगल पांडे हे महान व शूर स्वातंत्र क्रांतिकारी होते.
FAQ
१. मंगल पांडे यांचा मृत्यू कसा झाला?
मंगल पांडे यांना दि. १० एप्रिल १८५७ रोजी पहाटे ०५ वाजून २५ मिनिटांनी फाशी देण्यात आली.
२. मंगल पांडे कोण होते? 1857 च्या घटनांमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करा?
१८५७ च्या राष्ट्रीय उठावांमध्ये, अनेक क्रांतिकारक यांनी भाग घेतला होता. अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या, याच क्रांतिकारकापैकी मंगल पांडे हे महान व पहिले स्वातंत्र क्रांतिकारी होते. मंगल पांडे यांनी २९ मार्च १८५७ रोजी देशातील स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात केली व देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
३. मंगल पांडे यांचा जन्म कधी झाला ?
मंगल पांडे यांचा जन्म दि. १९ जुलै १८२७ मध्ये नागवा गावामध्ये, बलिया जिल्ह्यात झाला. जे आज ललितपुर, उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. मंगल पांडे यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता.
४. मंगल पांडेला फाशीची शिक्षा का देण्यात आली?
ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड केल्याचा एकच परिणाम असतो, तो म्हणजे फाशी दिली जाते. म्हणून, त्याने सर्व दोष स्वतःवर घेतले व आपल्या साथीदारांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या या शिक्षेपासून वाचवले.त्यानंतर दि. १८ एप्रिल १८५७ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी देण्याचा निर्णय जाहीर केला.
५. मंगल पांडेने भारतासाठी काय केले?
जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची चर्चा होते, तेव्हा मंगल पांडेंचा उल्लेख नक्कीच होतो.मंगल पांडे यांनी २९ मार्च १८५७ रोजी देशातील स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात केली व देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.मंगल पांडे यांनी सुरू केलेला हा लढा १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत असाच होता.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेख द्वारे आम्ही आपणस पहिले स्वातंत्र क्रांतिकारी मंगल पांडे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.