मदर टेरेसा माहिती मराठी : Mother Teresa Information In Marathi

Mother Teresa Information In Marathi | मदर टेरेसा माहिती मराठी – मदर टेरेसा यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची सेवा केली. त्यांच्यात दया, प्रेम आणि सेवाभाव होता. त्यांनी निस्वार्थपणे गरीब, आजारी, असाहाय्य आणि गरजू लोकांची मदत केली. त्या स्वतः करिता नव्हे तर इतरांक रिता जगत होत्या. मदर टेरेसा या मुळात भारतीय वंशाच्या नव्हत्या. मदर टेरेसा १९२९ मध्ये भारतात आल्या. कलकत्ता येथील संत मेरी स्कूल मध्ये गरीब मुलांना शिकवत असत.

दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत होते. हे पाहून त्यांनी गरीब व आजारी लोकांची सेवा करण्याचे ठरवले. गरजू लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी मिशनरी ऑफ चारिटी ही संस्था स्थापन केली.

या व्यतिरिक्त मदर टेरेसा यांनी “निर्मल हृदय” आणि “निर्मला शिशुभवन” नावाचे आश्रम देखील सुरू केले. तेथे गरीब व आजारी रुग्णांवर उपचार केले जात. आणि अनाथ व बेगर मुलांची मदत केली जात असे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस मदर तेरेसा यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा.

Table of Contents

मदर तेरेसा माहिती मराठी : mother Teresa Information In Marathi

मदर टेरेसा जीवन परिचय

मूळ नाव ऍग्नेस गोंजा बोयाजीजू
जन्मतारीख २६ ऑगस्ट १९१०
जन्मस्थळ स्कॉपियन
वडिलांचे नाव निकोला
आईचे नाव ड्रेना
धर्म कॅथोलिक
प्रमुख संस्था मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना
पुरस्कार भारतरत्न , नोबेल, पद्मश्री पुरस्कार, मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार
मृत्यू ५ सप्टेंबर १९९७ 

मदर टेरेसा यांचा जन्म आणि बालपण

मदर टेरेसाचा जन्म २६ ऑगस्ट १९१० मध्ये एका छोट्या शहरात स्कॉपियन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव निकोला आणि आईचं नाव ड्रेना होतं.मदार तेरेसाच खर नाव आग्नेसा होते. मदर टेरेसाचे कुटुंब लोकांना अन्न आणि वस्त्र देऊन मदत करायचे. मदर टेरेसा लहान असताना तिचे वडील आजारी पडले आणि मृत्यू पावले. कुटुंबाची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. बऱ्याच अडचणी असून सुद्धा तिने तिच्या तिन्ही मुलांना चांगल्या शाळेत शिकवले. तिने तिघांना धार्मिक ज्ञान शिकवायल.

मदर टेरेसा यांचे शिक्षण

मदर टेरेसाचाच्या आईने त्यांना आध्यामिक गोष्टीचे ज्ञान दिले. शिक्षणासाठी सेकंड हार्ट चर्चमध्ये पाठवलं. आग्नेसने खूप कमी वयात धार्मिक गोष्टी शिकण्यात रस दाखवला. शाळेचे सदस्य, धार्मिक गोष्टींचा प्रचार करण्यासाठी बाहेरगावी जायचे, वयाच्या बाराव्या वर्षी तिला वाटलं आपण गरीब लोकांना मदत केली पाहिजे.

मदर तेरेसा

वयाच्या सतराव्या वर्षी आग्नेसने नन्स व्हायचं ठरवलं. सुरुवातीला आग्नेसा बंगालमधील हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या . नंतर एक शिक्षिका म्हणून सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिकवू लागल्या.आग्नेसा आपलं जेवण गरीब मुलांसोबत वाटून खायच्या. सगळी मुलं त्यांच्यावर प्रेम करायची. एकदा विमानाने दार्जीलिंगला प्रवास करताना त्यांना त्यांच्या आयुष्याचा ध्येय लक्षात आलं. त्यांना त्यांच्या अंतर्मनातून आवाज ऐकू आला. आणि तिथून त्यांचा आयुष्यच बदललं.

त्यांना त्याचं पूर्ण आयुष्य गरीब व गरजू लोकांना मदत करण्यात घालवायचा आहे,अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तेरेसनी आरोग्य सेवेचे ट्रेनिंग घेतलं, आणि त्या गरीब लोकांचा उपचार करू लागले. तेही मोफत. लोक त्यांचे हे काम पाहून प्रभावित झाले. म्हणून ते सुद्धा पैसे, अन्न, औषध, मदत करू लागले.

मदर टेरेसा यांचे भारतात आगमन

नन ची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मदर तेरेसा आपल्या इन्स्टिट्यूटमधील इतर नन त्यांच्यासोबत आयलँडहून ६ जानेवारी १९२९ रोजी भारतामध्ये आल्या म्हणजेच कोलकत्ता मधील लोरेटो कॉन्व्हेंटमध्ये पोहोचल्या. भारतातील दार्जिलिंग या ठिकाणी त्यांनी प्रथमता नन या रूपात त्यांनी धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मदर तेरेसा यांना दार्जिलिंग येथून कोलकत्ता येथे शिक्षिका म्हणून पाठवण्यात आले. कोलकत्ता या ठिकाणी डबलिन च्या सिस्टर लोरेंटो संत मेरी स्कूलची स्थापना केली होती.

त्या एक शिस्तबद्ध शिक्षिका होत्या आणि तसेच विद्यार्थ्यांवर त्यांचे खूप प्रेम होते. मदर टेरेसा १९४४ मध्ये मुख्याध्यापिका बनल्या. याचठिकाणी मदर तेरेसा आणि गरीब आणि असाह्य मुलांना शिकवण्यात सुरुवात केली. त्यांचे मन शिक्षणामध्ये पूर्णपणे गुंतलेले होते परंतु आस-पासची गरीबी, दारिद्र्य आणि लाचारी यामुळे त्या नेहमी अस्वस्थ असायचा. मदर तेरेसा यांना हिंदी आणि बंगाली भाषेचे ज्ञान आत्मसात केले होते. सुरुवातीपासूनच मदर तेरेसा या अत्यंत मेहनती होत्या आणि त्यांनी शिक्षकाची हे नोकरी अत्यंत निष्ठावानपणे पार पाडली. या स्कूलमध्ये शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत प्रिय शिक्षिका बनल्या.

यादरम्यानच मदर तेरेसा यांचे लक्ष आजूबाजूला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी आणि अज्ञानावर गेले. ते सर्व पाहून मदर तेरेसा यांना अत्यंत दुःख वाटले. या काळामध्ये चा कोलकत्ता या शहरांमध्ये दुष्काळाने अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती. ते सर्व पाहून मदर तेरेसा यांनी गरीब, लाचार आणि अज्ञानी लोकांचे मदत करण्याचा निश्‍चय केला.

मदर तेरेसा

मदर टेरेसा धर्मादाय मिशनरी

मदर टेरेसा यांना त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ७ ऑक्टोबर १९५० रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी बनण्याची परवानगी मिळाली. या संस्थेतील स्वयंसेवक सेंट मेरी स्कूलचे शिक्षक होते ज्यांना संस्थेबद्दल कर्तव्याची तीव्र जाणीव होती. मुळात, या सुविधेत फक्त १२ नन्स काम करत होत्या; 1990 च्या दशकापर्यंत 133 देशांमध्ये 4,000 बहिणी काम करत होत्या. संस्थेने अनाथाश्रम, नर्सिंग सुविधा आणि वृद्धाश्रम स्थापन केले.

मिशनरीज ऑफ चॅरिटीचे प्रमुख उद्दिष्ट ज्यांच्याकडे वळण्यासाठी दुसरे कोणी नव्हते त्यांना मदत करणे हे होते. मदर टेरेसा आणि त्यांचा गट स्वतः अशा रुग्णांची सेवा करत असे, रुग्णांच्या जखमा स्वच्छ करणे आणि मलम लावणे अशा वेळी कलकत्त्यात प्लेग आणि कुष्ठरोग विशेषत: सामान्य होते.

त्या काळात कलकत्त्यातही अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर पसरली होती, असहाय्य गरिबांना समाजाने टाळले होते. या सर्व लोकांसाठी मदर टेरेसा मसिहा म्हणून उदयास आल्या होत्या. नग्नावस्थेतील गरीब, भुकेल्या लोकांना ती खाऊ घालायची. मदर तेरेसा यांचे मिशनरीज ऑफ चॅरिटीसोबतचे कार्य सामाजिक स्थिती, वंश किंवा धर्माची पर्वा न करता प्रत्येक मानवी जीवनाच्या पावित्र्यावर विश्वास ठेवून मार्गदर्शन केले.

मदर टेरेसा यांनी १९६५ मध्ये रोमच्या पोप जॉन पॉल ६ कडून त्यांचे मिशनरी कार्य इतर देशांमध्ये विस्तारित करण्यासाठी अधिकृततेची विनंती केली. रक्ताने, मी अल्बेनियन आहे. नागरिकत्वाने, एक भारतीय. विश्वासाने, मी एक कॅथोलिक नन आहे. माझ्या बोलण्यानुसार, मी जगाशी संबंधित आहे. माझ्या हृदयाबद्दल, मी पूर्णपणे येशूच्या हृदयाशी संबंधित आहे. .”असे त्या म्हणायच्या.

भारताबाहेर, व्हेनेझुएलामध्ये प्रथम मिशनरी ऑफ चॅरिटी संस्थेची स्थापना करण्यात आली आणि आता १०० हून अधिक देशांमध्ये मिशनरी ऑफ चॅरिटी संस्था आहेत. मदर टेरेसा यांचे कार्य कोणापासून लपलेले नव्हते; भारतातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी तिच्या निस्वार्थीपणावर बारकाईने लक्ष ठेवले आणि सर्वांनी तिचे कौतुक केले.

लहानपणापासून इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा

त्यांना लहानपणापासूनच इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती. तरुण वयातच त्यांनी रोमन कॅथलिक होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १८ व्या वर्षी ती कॅथलिक झाली आणि त्यानंतर ती तिच्या घरी परतली नाही. ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना शोधण्यासाठी ते रस्त्यावर उतरायचे आणि त्यांना त्यांच्या घरी परत आणायचे, ज्याला ते “कालीघाट होम फॉर द डायिंग” म्हणतात. इटलीमध्ये जन्मलेल्या परंतु भारतात वाढलेल्या मदर टेरेसा यांनी १९५० मध्ये कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. ते आजारी आणि मरणाऱ्यांना अन्न, वस्त्र आणि वैद्यकीय सेवा पुरवतील. ज्यांच्याकडे वळण्यासाठी दुसरे कोणी नव्हते त्यांना त्यांनी आध्यात्मिक सांत्वन आणि सहवासही दिला.

मदर तेरेसा आणि त्यांच्या मदतनीसांनी कलकत्ता येथे अनाथ मुलांसाठी घरे, कुष्ठरोग्यांसाठी नर्सिंग होम आणि दुर्धर आजारींसाठी धर्मशाळा बांधल्या. गरीब, आजारी आणि अनाथांची सेवा करणे ही धर्मादाय संस्था तयार करण्याची तिची प्रेरणा होती. समाजाने दूर ठेवलेल्या कुष्ठरुग्णांसाठीही त्यांनी सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करून दिले. क्षयरुग्णांनाही त्यांनी मोठी मदत केली होती.

मदर तेरेसा

मदर टेरेसा यांचे सामजिक कार्य

 • फेब्रुवारी १९४९ मध्ये टेरेसाची विद्यार्थी सुभाषिनी तिला भेटायला आली, ती बंगालमधील एका श्रीमंत घरातली मुलगी होती. तिने देखील आपली गरीब व गरजू लोकांना मदत करायची होती इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे एका मागोमाग एक बरेच जण टेरेसासोबत जोडले. वर्षाच्या शेवटी तिच्या संघात १० नोंद होत्या. सगळ्यांच्याच एक उद्देश होता, गरीब व गरजूंना मदत करणे. त्यांच्यापैकी कोणालाच त्या कामाचा पगार नव्हता, त्यांची जमापुंजी म्हणजे दोन साड्या, काही गरजेच्या वस्तू आणि एक प्रार्थनेचे पुस्तक. ते खूप साध आयुष्य जगायचे. ते प्रार्थनेसाठी लवकर उठायचे नाश्त्यामध्ये चहा आणि चपाती खायचे रोज ते त्या गरीब घरांमध्ये जायचे आणि गरजूंना मदत करायचे.
 • टेरेसा आता “मदर टेरेसा” म्हणून ओळखू जाऊ लागल्या. आणि त्यांची संस्था मिशनरीज ऑफ चारिटी म्हणून प्रसिद्ध झाली. सभासदांनी दारिद्र्य, पवित्रता, आणि अज्ञाधारकपणाची शपथ घेतली. त्यात त्यांनी एक चौथी शपथ जोडली, ती म्हणजे गरीब व गरजूंना मदत करणे. त्यांच्या संस्थेला खूप प्रसिद्धी मिळाली. मदर टेरेसाने ह्या प्रसिद्धीचा उपयोग लोकांसाठी केला.
 • १९५७ मध्ये त्यांनी लिब्रेसीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची मदत केली. हळूहळू त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कामात वाढ करून, कोलकातामध्ये शाळा सुरू केल्या. त्यांनी अनाथ मुलांसाठी आश्रम पण सुरू केले. लवकरच त्यांची संस्था भारतातल्या बावीस शहरांमध्ये पसरली होती. त्यांनी इतर देशांमध्येही आपल्या संस्थेचा प्रचार केला. जसा की श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, तानजानिया, वेनि झुला, आणि इटली.
 • एक दिवस मदर टेरेसांना पोपला भेटण्याचं आमंत्रण देण्यात आलं, त्या पोपच नाव होतं. मदर टेरेसाना सुद्धा  त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. ती बातमी ऐकून त्या खूप खुश झाल्या, पोप मदर टेरेसाना म्हणाले लोकांमध्ये तुम्ही खूप प्रसिद्ध आहात.तेव्हा मदार टेरेसा म्हणाल्या- हो लोकांना माझं काम आवडतं आणि मी फक्त माझं काम करते. तेव्हा पोप बोललेले – मी आशा करतो, सगळेच लोक जर तुमच्यासारखा विचार करून काम करतील, तर जग सुंदर होईल.
 • ५ सप्टेंबर 1997 रोजी मदर टेरेसा आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या सेवेची दखल घेता, भारतीय सरकारने त्यांना सन्मान दिला. त्यांच्या मृत्यूच्या वेळी मिशनरीज ऑफ चारिटी मध्ये ४००० च्या वर सिस्टर होत्या. सोबत तीनशे बंधू सभासद व १२३ देशांमध्ये ६१० संकल्प होते. मदर टेरेसांचं संपूर्ण आयुष्य जगासाठी प्रेरणादायक आहे.
 • मदर तेरेसनी सेंट मेरीज हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून काम सुरू केले, त्या मुख्याध्यापिका बनल्या. परंतु ज्ञानदानाच्या कामापेक्षा प्रत्यक्ष सेवाकार्यात त्यांना अधिकृत होता.
 • कलकत्त्याच्या मोतीझील बकाल वस्तीत १९४८ मध्ये त्यांनी गरीब मुलांसाठी पहिली “आरोग्य शाळा” सुरू केली. त्यासाठी मिशनरी जॉब चारिटी या संस्थेची स्थापना केली. अवघ्या पाच मुलांवर ही शाळा सुरू केली.
 • पुढे १९५२ मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी निर्मल हृदय ही संस्था सुरू केली. अनाथ निराधार यांना औषध उपचारांची खरोखरच गरज आहे, कलकत्ता शहर व परिसरात त्यांच्या या कार्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या.

मदर टेरेसा यांची मिशनरीज ऑफ चारिटी संस्था

मदर टेरेसांच्या अथक प्रयत्नाने व समाजसेवेने ७ ऑक्टोबर १९५० रोजी मदर टेरेसांना “मिशनरी ऑफ चारिटी” ही संस्था बनण्याची परवानगी दिली गेली. या संस्थेच्या अंतर्गत सेंट मेरी शाळेचे शिक्षक वॉलेटल हे होते. व या संस्थेची त्या सेवाभावानेने जोडल्या गेल्या होत्या. सुरुवातीच्या काळाला मशिनरीज ऑफ चारिटीस मध्ये फक्त दहा लोकं काम करत असत. आज या चारिटी मध्ये ४००० हून अधिक नन्स काम करत आहेत.

या संस्थेच्या अंतर्गत नर्सिंग होम, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, बांधले गेले. ज्यामध्ये गरीब मुलांच्या, वृद्ध व्यक्तींच्या, जीवनाचा विचार करत या गोष्टी मदर टेरेसा यांच्या चारिटी तर्फे बांधल्या गेल्या. मिशनरीज ऑफ चारिटीचा मुख्य उद्देश हा गरीब लोकांना मदत करणे होता. त्या काळामध्ये कलकत्त्यात प्लेग व कुष्ठरोगांचा आजार पसरला. या भयानक आजारामध्ये मदर टेरेसा आणि रुग्णांची सेवा करून त्यांची काळजी घेतली.

भारतात १९६५ मध्ये “शांतीसागर” ही कुष्ठरोग्यांची वसाहत उभी केली. तरी १९७६ मध्ये “आशा दान” या संस्थेची स्थापना केली. पुढील काळात त्यांनी अनाथ बालके, अपंग, अंध, वृद्ध व निराधार कुष्ठरोगी आणि समाजातील दुबळ्या व उपेक्षित घटकांसाठी हजारो केंद्र सुरू केली.

मदर तेरेसा यांचा मृत्यू

मदर तेरेसा यांच्या वाढत्या वयामुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडायला लागले. त्यांना किडनीची समस्या निर्माण झाली. ७३ वर्षाच्या वयात त्यांना पहिल्यांदा हृदय विकाराच्या झटका आला. या नंतर०५ सप्टेंबर १९९७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूच्या 6 महिन्याआधीच त्यांनी मिशनरीचे अध्यक्षपद सोडून दिले.  जगातील विविध देशांत यांच्या सेवाकार्याची व्याप्ती वाढली. त्यांच्या सेवा कार्यामुळे जगातील महान व्यक्तींमध्ये त्यांच्या समावेश झाला. आज मदर तेरेसा यांची ‘मिशनरी ऑफ चारिटी’ मध्ये 4000 पेक्षा जास्त सिस्टर आणि 300 अन्य सहयोगी आहेत. जगातील 123 पेक्षा जास्तीच्या देशांमध्ये त्यांचे सेवा कार्य सुरू आहे.

मदर टेरेसा यांच्याबद्दल वाद

मदर टेरेसा ह्या एक महान समाजसेविका असून, देखील मदर टेरेस आजीवन व कार्यवादाच्या जिवंत चक्रामध्ये अडकल्या होत्या. असे म्हटले जाते की, जिथे यश मिळते त्या ठिकाणी वाद हे होतातच. मदर टेरेसा यांच्या निस्वार्थ समाजसेवेचा, दयाळूपणाचा, प्रेमाचा लोकांना गैरसमज होऊ लागला व त्यांनी धर्मांतराच्या उद्देशाने भारतातील लोकांची सेवा केली, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. समाजाने मदर टेरेसांना एक चांगले मनुष्य समजण्याऐवजी, ख्रिश्चन धर्माचा प्रसारक समजले. या सर्व वादांवर मदर टेरेसांनी लक्ष न देता, त्यांनी स्वतःच्या कामावरती जास्त लक्ष दिले. व लोकांची सेवा करत राहिल्या.

मदर टेरेसा यांना मिळालेले पुरस्कार

मदर टेरेसा ह्या महान समाज सुधारक असून, त्यांनी आपले संपूर्ण जीवन गरीब व गरजू लोकांच्या सहाय्यतेसाठी समर्पित केले. आयुष्य दुसऱ्यांसाठी जगावे व दुसऱ्यांना मदत करावी ही त्यांची शिकवण होती. येशू ख्रिस्ते यांच्या विचारांचा प्रभाव मदर टेरेसांवरती होता. मदर टेरेसा ह्या ख्रिश्चन धर्माच्या असून सुद्धा इतर धर्माच्या लोकांची मदत करताना, त्यांनी त्यांचा धर्म बघितला नाही. त्यांनी फक्त मानव सेवा केली. महान कामे केल्यामुळे मदर टेरेसा या अतिशय प्रसिद्ध समाजसेविका झाल्या. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कार देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले.

मदर टेरेसा यांना पद्मश्री पुरस्कार

मदर तेरेसांच्या समाजसेवेचा बिडा पाहून भारत सरकारने मदर टेरेसांना भारतात द्वितीय सर्वोच्च मानला जाणारा “पद्मश्री पुरस्कार” देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार मदर टेरेसांना १९६२ रोजी देण्यात आला.

मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्कार

काही दिवसांनी देशातील सर्वोच्च सर्वात श्रेष्ठ व उच्च मानला जाणारा “भारतरत्न पुरस्कार” सुद्धा मदर टेरेसांना देऊन, त्यांना गौरविण्यात आले.

मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार

१९७९ मध्ये समाज सुधारक कामगिरी पाहून, मदर टेरेसांना “नोबेल पुरस्कार” देण्यात आला व यासोबत १ लाख ९२ हजार डॉलर्स रक्कम दिली गेली व त्यांनी त्या रकमेचा वापर, गरीब लोकांच्या मदतीसाठी केला.

मदर टेरेसा यांना मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार

मदर टेरेसांना १९८५ मध्ये “मेडल ऑफ फ्रीडम” पुरस्कार सुद्धा देण्यात आला.

द ग्रेटेस्ट इंडियन आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या.

मदर टेरेसा

मदर टेरेसा यांचे प्रेरणादायी विचार

 • जर तुम्ही लोकांना जज करत असाल तर, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे वेळच उरणार नाही. आपण सर्वच महान गोष्टी करू शकत नाही, परंतु आपण लहान गोष्टी मोठ्या प्रेमाने करू शकतो.
 • शांततेची सुरुवात हसण्याने होते, स्वर्ग नेमके कसे असेल ? हे मला माहिती नाही. परंतु मला हे माहिती आहे, की जेव्हा आपण मरू आणि देवाला आपल्या नाही करण्याची वेळ येईल. तेव्हा तो हे विचारणार नाही की, तुमच्या आयुष्यात तुम्ही किती चांगल्या गोष्टी केल्या, त्याऐवजी तो हे विचारेल की तुम्ही जे केले त्यात तुम्ही किती प्रेम टाकले.
 • कालचा दिवस गेला, उद्याचा दिवस अजून आला नाही. आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. सुरुवात करा.
 • प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याकडे बघून हसता. तेव्हा ती एक प्रेमाची कृती असते. त्या व्यक्तीसाठी एक भेट असते. गिफ्ट असते. असे विचार करू नका की, प्रेम खरे असण्यासाठी ते असामान्य असावे लागते, आणि फक्त प्रेम करण्याची आपल्याला गरज आहे.
 • छोट्या गोष्टींवर विश्वास ठेवा. कारण, त्यातच तुमची शक्ती आहे. द्यायचे शब्द छोटे आणि बोलायला सोपे असू शकतात. परंतु त्यांचा प्रतिध्वनी खरंच अनंत आहे.
 • सर्वात भयानक दारिद्र्य म्हणजे एकटेपणा आणि प्रेम न मिळाल्याची भावना हे आहे. जर तुम्हाला शांती मिळत नसेल, तर त्याचे कारण हे की आपण एकमेकांचे आहोत, हे आपण विसरलो आहोत.
 • आपण किती देतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण किती प्रेमाने देतो हे महत्त्वाचे आहेत.
 • आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपण किती डिप्लोमा केले ? किती पैसे कमावले ? किंवा किती महान काम केले ? यावरून जज केले जाणार नाही तर, आपण भुकेलांना किती वेळा जीव घातले, उघड्यांना कपडे दिले, किंवा घर नसलेल्यांना आपल्या घरात आसरे दिला, यावरून आपल्याला जज केले जाईल.
 • तुम्ही १०० लोकांना जेवू शकत नसाल तर तुम्ही किमान एका गरीबाला खायला द्यावे.
 • मी एकटी जग बदलू शकत नाही, परंतु मी पाण्यावर अनेक तरंग निर्माण करण्यासाठी दगड नक्कीच फेकू शकतो. आपण यशस्वी व्हावे अशी देवाची इच्छा नाही तर, आपण प्रयत्न केले पाहिजे अशी देवाची इच्छा आहे.
 • आपण औषधाने शारीरिक रोग बरे करू शकतो, परंतु एकटेपणा नैराश्य आणि निराशेचा एक मात्र इलाज म्हणजे प्रेम.
 • जगात अनेक लोक आहेत जे भाकरीच्या तुकड्यासाठी मरत आहेत. परंतु जगात असेही अनेक लोक आहेत जे थोड्याशा प्रेमापोटी मरत आहेत. फक्त एकटेपणाचे दारिद्र्य नाही तर, अध्यात्माचे दारिद्र्य आहे. जशी देवाची भूक आहे, तशीच प्रेमाची ही भूक आहे.
 • खालील मार्गाने आपण नम्रतेचा सराव करू शकतो. स्वतःबद्दल जेवढ्या शक्य असेल तेवढे कमी बोलणे, स्वतःचे काम करणे, दुसऱ्या लोकांच्या कामाचे व्यवस्थापन करण्याची इच्छा नाही ठेवणे, जिज्ञासूपणा टाळणे, आनंदाने विरोध आणि दुरुस्ती स्वीकारणे, इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, अपमान आणि इजा स्वीकारणे, थोडेसे विसरले जाणे आणि नापसंत केले जाणे याचा स्वीकार करणे, त्रासातही दयाळू आणि सध्या राहणे कोणाचाही अपमान न करणे, आणि नेहमी कठीण निवडणे भाकरीच्या भुकेपेक्षा प्रेमाची भूक दूर करणे, अधिक कठीण आहे.
 • मी देवाच्या हातातील एक छोटीशी पेन्सिल आहे. जो जगाला प्रेम पत्र लिहीत आहे. साधेपणाने जगा जेणेकरून इतर लोक सहजपणे जगू शकतील.
 • प्रार्थना म्हणजे मागणी नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःला देवाच्या हातात त्याच्या स्वभावात सोपवणे. आणि आपल्या हृदयाच्या खोलीत त्याचा आवाज ऐकणे.
 • जर तुम्ही नम्र असाल, तर तुम्हाला काही स्पर्श करू शकणार नाही. स्तुतीही नाही आणि अपमानही नाही. कारण तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कोण आहात. आपल्याला हे देखील चांगले माहिती आहे की आपण जे करत आहोत ते महासागराच्या थेंबा शिवाय दुसरे काहीच नाही, परंतु जर थेंब नसला तरी महासागरात काहीतरी कमी होईल.
 • मी त्या गोष्टी करू शकत, जर तुम्ही करू शकत नाही. तुम्ही अशा गोष्टी करू शकता, ज्या मी करू शकत नाही. परंतु एकत्र आपण महान गोष्टी करू शकतो.
 • शांतता प्रार्थना आहे. प्रार्थना विश्वास आहे. विश्वास प्रेम आहे. प्रेम सेवा आहे. सेवेचे फळ शांती आहे.
 • नेत्यांची वाट पाहू नका, एकट्यानेच करा.
 • मानवाच्या आनंदासाठी देवाने जगाची निर्मिती केली, आपण त्याचे चांगुलपणा सर्वत्र बघू शकतो. आपल्याबद्दल त्याची चिंता आपल्या गरजांची जाणीव, आपण वाट बघितलेला फोन, आपल्याला मिळालेली राईड मेल बॉक्स मधील पत्र, सर्व छोट्या गोष्टी जातो. दिवसभर आपल्यासाठी करतो, जेव्हा आपण त्याच्या आपल्यावरील प्रेम लक्षात घेतो, तेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करतो. कारण तो आपल्या तितका व्यस्त आहे की, आपण त्याला नाकारू शकत नाही.
 • माझा विश्वास आहे की, आयुष्यात नशीब नावाची गोष्ट नाही. ते देवाचे प्रेम आहे. दुसऱ्यांसाठी न जगलेले जीवन हे जीवनच नसते.
 • प्रेमाशिवाय काम करणे हे गुलामगिरीच आहे. एखाद्या मुलाचा मृत्यू करण्याचे ठरवणे, जेणेकरून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जगू शकाल. हे दारिद्र्य आहे.
 • बलिदान खरे ठरण्यासाठी, त्याची किंमत मोजावीच लागते. त्रास सहन करावा लागतो. आणि स्वतःला रिकामे करावे लागते. स्वतःला पूर्णपणे ईश्वराला समर्पित करा. तुम्ही तुमच्या कमजोरीपेक्षा, त्याच्यात प्रेमावर जास्त विश्वास ठेवता. या अटीवर तो तुमचा वापर महान कार्य साध्य करून घेण्यासाठी करेल.
 • जेव्हा हसणे अवघड असेल, तेव्हाही आपण एकमेकांना हसून भेटायचे असे ठरवा. आपल्या कुटुंबात एकमेकांना वेळ द्या.
 • संख्येबद्दल कधीही चिंता करू नका, एका वेळी एका व्यक्तीला मदत करा. आणि नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तीपासून सुरुवात करा.
 • जो माणूस हास्य देईल, तो सर्वश्रेष्ठ आहे. कारण देवाला आनंदाने देणारे आवडतात. जर आपण प्रार्थना केली तर आपण विश्वास करू. जर आपण विश्वास केला, तर आपण प्रेम करू. जर आपण प्रेम केले, तर आपण सेवा करू.
 • सुंदर लोक नेहमीच चांगले नसतात, पण चांगले लोक नेहमी सुंदर असतात. फक्त पैसे देऊन समाधानी होऊ नका, पैसे देणे पुरेसे नाही, ते मिळू शकतात. परंतु त्यांना आपल्या प्रेमाची आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही जिथे जाल तिथे सर्वांना आपले प्रेम द्या.
 • मी यशासाठी प्रार्थना करीत नाही, मी सत्यासाठी प्रार्थना करतो. जगात प्रेम पसरवण्यासाठी, आपण काय करू शकतो, घरी जा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा. प्रेमाची सुरुवात जवळच्या लोकांची नातेवाईकांची काळजी आणि जबाबदारी पासून होते. जे आपल्या घरातील जवळचे नाते असते.
 • झाडे, फुले आणि वनस्पती शांततेने वाढतात. तारे, सूर्य आणि चंद्र शांततेत फिरतात. शांतता आपल्याला नवीन शक्यता देते. काही लोक आपल्या आयुष्यात आशीर्वाद घेऊन येतात, तर काही लोक धडा देऊन जातात.
 • सर्वात मोठा आजार म्हणजे, कोणाबद्दलही काहीही भावना नसणे. आपण बऱ्याच वर्षाची तयार केले ते रात्रीतून नष्ट होऊ शकते. परंतु तरीही ते बनवणे सुरू ठेवा.
 • जर तुम्ही शंभर लोकांना खायला देऊ शकत नाही, तर फक्त एकाला का होईना, पण खायला द्या.
 • आपल्या आयुष्यातून देवाचे प्रेम पसरवा. परंतु, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा शब्द वापरा.
 • जेव्हा तुमच्याकडे काहीच नसेल, तेव्हा तुमच्याकडे सर्वच असेल.
 • जीवन एक खेळ आहे. त्याला खेळा. प्रेम हे फक्त दिले जाते, मोजले जात नाही.
 • दुसऱ्यांचा विचारही न करणे इतके व्यस्त होऊ नका.

मदर तेरेसा यांच्यावरील पुस्तके

 • भारतरत्न मदर तेरेसा (रमेश तिरूखे)
 • मदर तेरेसा : प्रतिमेच्या पलीकडे – १९१०-१९९७ (ॲन सेबा)
 • मदर तेरेसा (आशा कर्दळे)
 • (दीन दुःखितांची विश्वमाता) मदर तेरेसा (शंकर कऱ्हाडे)
 • (माणुसकीचा नंदादीप) मदर तेरेसा (शांताराम विसपुते)
 • (विश्वमाता) मदर तेरेसा (सु.बा. भोसले)

मदर टेरेसा बद्दल १०ओळी

१. मदर टेरेसाचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी तुर्क साम्राज्य मध्ये झाला.
२. मदर टेरेसा महान महिला होत्या.
३. मदर टेरेसांचे खरे नाव अग्नेस बोजा स्किहू असे होते.
४. मदर टेरेसा लहानपणापासूनच धार्मिक गोष्टींमध्ये रमत होत्या.
५. इसवी सन १९२९ रोजी मदर टेरेसा भारतामध्ये आल्या.
६. मदर टेरेसांनी एक वर्ष भारतामध्ये राहिल्यानंतर भारताची नागरिकत्वता प्राप्त केली.
७. मदर टेरेसा यांनी स्वतःचे पूर्ण जीवन गरीब लोकांच्या मदतीसाठी समर्पित केले.
८. मदर टेरेसांना समाजसेवेसाठी नोबेल पुरस्कार दिला गेला.
९. मदर टेरेसा मानवताचे सगळ्यात मोठे प्रतीक होते.
१०. दिनांक पाच सप्टेंबर 1997 रोजी मदर टेरेसा जग सोडून गेल्या.

मदर टेरेसा तथ्य – Facts about Mother Teresa in Marathi

 • मदर टेरेसा यांचे खरे नाव अग्नेस गोंझा बोयाजीजू हे होते.
 • लहानपणापासूनच निराधारांना बघून त्यांना खूप मानसिक त्रास व्हायचा.
 • मदर तेरेसा यांनी 1950 मध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली, ही धार्मिक मंडळी गरीबांना मदत करण्यासाठी समर्पित होती.
 • मदर तेरेसा वयाच्या १८ व्या वर्षी सिस्टर्स ऑफ लोरेटो या आयरिश नन समुदायामध्ये सामील झाल्या, ज्यामध्ये भारतातील एक मिशन आहे.
 • मदर टेरेसा यांचे प्रेरणादायी वक्तव्य आजही जगभर गाजत आहे.
 • पाच मुलांच्या कुटुंबात ऍग्नेस सर्वात लहान होती. ती लहानपणापासून नेहमीच विद्यार्थी आणि मेहनती कार्यकर्ता होती.
 • मदर तेरेसा यांना त्यांच्या हयातीत 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले.
 • एग्नेस लहानपणापासूनच दुःखी होती. ती लहान असताना तिच्या वडिलांनी त्यांना सोडून दिले होते.
 • म्हणून मदर टेरेसा संत यांनी आपल्या मुलांमध्ये गरीब आणि दीनदुबळ्यांना मदत करण्याची इच्छा निर्माण केली.
 • मदर तेरेसा यांचे 5 सप्टेंबर 1997 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. कॅथोलिक चर्चने 4 सप्टेंबर 2016 रोजी त्यांना संत म्हणून मान्यता दिली.

FAQ

१. मदर तेरेसा चे पूर्ण नाव काय? mother teresa full name

मदर टेरेसाचा जन्म २६ ऑगस्ट १९१० मध्ये एका छोट्या शहरात स्कॉपियन येथे झाला.त्यांचे पूर्ण नाव ऍग्नेस गोंजा बोयाजीजू असे होते.

२. मदर तेरेसा यांना नोबेल का मिळाले?

मदर तेरेसा यांच्या सेवा कार्यामुळे जगातील महान व्यक्तींमध्ये त्यांच्या समावेश झाला. या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने प्रथम पदमश्री हा किताब दिला. १९७१ मध्ये शांतता पारितोषिक मिळाले. १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाले. १९८० मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान देऊन त्यांच्या कार्याच्या महान गौरव केला.

३. मदर तेरेसांचा मृत्यू कधी झाला ?

मदर तेरेसांचा मृत्यू ०५ सप्टेंबर १९९७ मध्ये कलकत्ता येथे झाला.

मदर तेरेसा यांनी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या?

इटलीमध्ये जन्मलेल्या परंतु भारतात वाढलेल्या मदर टेरेसा यांनी १९५० मध्ये कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. ते आजारी आणि मरणाऱ्यांना अन्न, वस्त्र आणि वैद्यकीय सेवा पुरवतील. ज्यांच्याकडे वळण्यासाठी दुसरे कोणी नव्हते त्यांना त्यांनी आध्यात्मिक सांत्वन आणि सहवासही दिला. कलकत्ता येथे अनाथ मुलांसाठी घरे, कुष्ठरोग्यांसाठी नर्सिंग होम आणि दुर्धर आजारींसाठी धर्मशाळा बांधल्या. गरीब, आजारी आणि अनाथांची सेवा करणे ही धर्मादाय संस्था तयार करण्याची तिची प्रेरणा होती. समाजाने दूर ठेवलेल्या कुष्ठरुग्णांसाठीही त्यांनी सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करून दिले. क्षयरुग्णांनाही त्यांनी मोठी मदत केली होती.

मिशनरीज ऑफ चॅरिटी म्हणजे काय?

मिशनरीज ऑफ चॅरिटी ही एक कॅथोलिक केंद्रीकृत धार्मिक संस्था आहे ज्याची स्थापना मदर तेरेसा यांनी 1950 मध्ये स्थापन केलेल्या महिलांसाठी पवित्र जीवनाची आहे , ज्याला आता कॅथोलिक चर्चमध्ये कलकत्त्याच्या सेंट तेरेसा म्हणून ओळखले जाते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मदर तेरेसा यांच्या बद्दल महिती दिली आहे. हा लेखतुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. मदर टेरेसा याचे प्रेरणादायी विचार आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment