मुळशी धरण माहिती मराठी : MULSHI DAM INFORMATION IN MARATHI – पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचबरोबर वसुंधरेची देखील पुण्यावर अपार कृपा राहिली आहे. पुणे हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून, देशातील काय तर विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये असणारे मुळशी धरण, पुणे जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. नैसर्गिक सौंदर्याचे उत्तम ठिकाण म्हणजे मुळशी धरण, पुणे. या ठिकाणी तुम्ही बाईकने किंवा तुमच्या स्थानिक गाडीने पोहोचू शकता. हे ठिकाण कुटुंबासमवेत किंवा मित्र परिवारांसोबत फिरण्यास, एक आदर्श ठिकाण आहे. या ठिकाणी असणारे छान वारे, मुळशी तलावाचे विहंगम दृश्य व जवळच्या टेकड्या या मुळशी धरणाचे मुख्य आकर्षण आहेत.
पावसाळ्यात हे ठिकाण अतिशय आकर्षक बनते. परंतु अतिमुसळधार पावसामुळे हे तितकेच धोकादायकही असू शकते. आजच्या लेखातून आपण मुळशी धरणाबद्दल तसेच बद्दल जाणून घेणार आहोत. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

मुळशी धरण माहिती मराठी : MULSHI DAM INFORMATION IN MARATHI
स्थान | मुळशी धरण, पुणे |
जिल्हा | पुणे |
स्थापना | ई. स. 1927 |
ऊंची | 49 मीटर |
अडवलेली नदी | मुळा नदी |
धरणाचा उद्देश | जल सिंचन |
मुळशी पुणे नकाशा

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण मुळा नदीवर बांधण्यात आले आहे. हे धरण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये आहे. हा पूर्ण प्रदेश हिरव्यागार वनराईने अतिशय नयनरम्य वाटतो. या धरणाचे बांधकाम १९२७ साली टाटांनी केले. हे धरण टाटा पॉवर कंपनी अंतर्गत असून, वीज निर्मितीच्या उद्देशाने हे धरण बांधले होते. या धरणाचा हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट फिरा या ठिकाणी आहे.
या धरणापासून तयार होणारी ऊर्जा मुंबई शहराला पुरवली जाते. या धरणातील पाणी जलसिंचनासाठी वापरले जाते. या धरणाची उंची ४८.८ मीटर म्हणजेच १६० फूट, तर लांबी १५३३.३८ मीटर म्हणजे ५०३० फूट इतकी आहे. या धरणाला सात दरवाजे आहेत. या धरणापासून तीनशे मेगावॅट इतकी वीजनिर्मिती केली जाते.
धरणाच्या जलाशयाला मुळशी तलाव असे म्हणतात. मुळशी तलाव हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या ठिकाणचे रिसॉर्ट आणि हॉटेल पर्यटकांच्या राहण्याची, खाण्यापिण्याचे सोय करतात. हे धरण सुट्टीसाठी शहरापासूनचे जवळचे स्थळ आहे. सह्याद्रीची भ्रमंती करणाऱ्यांसाठी या धरण परिसरामध्ये कोरीगड हा महत्त्वाचा किल्ला आहे.
मुख्य शहर ते मुळशी अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी
- मुंबई ते धरण – हे अंतर साधारणतः १३० किलोमीटर असून, प्रवासासाठी अंदाजे तीन तास लागू शकतात.
- पुणे ते मुळशी – हे अंतर साधारणतः ७९ किलोमीटर असून, प्रवासासाठी अंदाजे दोन तास लागू शकतात.
- कालावधी/दिवस – धरण व त्याजवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन दिवस लागू शकतात.
मुळशी धरण व मुळशी तलावाची वैशिष्ट्ये

- मुळशी हे इकोफ्रेंडली पर्यटन स्थळ आहे. मुळशी धरण हे सह्याद्री रांगांमध्ये वेढलेले असून, आजूबाजूला सुंदर जंगल, ट्रेकिंग, फोटोग्राफीसाठी, निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम स्थळ आहे.
- मुळशी धरणा जवळील घनगड व कोरीगड हे किल्ले ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत.
- पावसाळ्याच्या काळात धबधबे, हिरवा निसर्ग, यामुळे मुळशी धरण अतिशय सुंदर व आल्हादायक दिसते.
- मुळशी हे परफेक्ट वीकएंड डेस्टिनेशन असून, या ठिकाणी तुम्ही कुटुंबासमवेत पिकनिक, मित्र परिवारासोबत आउटिंग, फिशिंग, पक्षी निरीक्षण इत्यादी गोष्टी करू शकता.
- मुळशी धरणतील पाणी हे जलपुरवठ्याचे काम करते. या पाण्याचा वापर मुंबई तसेच इतर शहरांना पाणीपुरवठासाठी केला जातो.
धरण आणि मुळशी तलाव माहिती
- स्थान – हे धरण मुळा नदीच्या काठावर वसलेले असून, मुळशी तालुक्यामध्ये आहे.
- दळणवळण – मुळशी पुणे, मुंबई आदी मुख्य शहरांना कनेक्टेड आहे.
- मेडिकल सुविधा – धरणाजवळ कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक मेडिकल सुविधा उपलब्ध नाही. यासाठी तुम्हाला मुख्य शहरांमध्ये जावे लागते. मेडिकल अत्यावश्यसाठी स्थानिक भागात, प्राथमिक केंद्र उपलब्ध आहे.
- नेटवर्क कनेक्टिव्हिटी – धरणाजवळ पुरेसे नेटवर्क उपलब्ध नाही. मुळशी शहराच्या मुख्य भागांमध्ये तुम्हाला नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
- वेळ – मुळशीला भेट देण्यासाठी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत भेट देऊ शकता.
मुळशी व्हिडीओ
मुळशी धरणाजवळील प्रेक्षणीय स्थळे
धरणाच्या जवळपास ४० किलोमीटर अंतरामध्ये असलेल्या इतर काही पर्यटन स्थळांची यादी आम्ही देत आहोत. तुम्ही जर दोन दिवस मुक्काम करत असाल तर या विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता.

मुळशी तलाव माहिती
मुळशी नदीच्या मागील पाण्याने तयार होणारा मुळशी तलाव धरणाजवळील प्रेक्षणीय स्थळ आहे. नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी व निसर्गाच्या शांततेमध्ये, दगदगीच्या आयुष्यातून विरंगुळा म्हणून, मुळशी तलावाजवळील कॅम्पिंग हा एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही क्रिकेट, मासेमारी, खेकडे पकडणे, बैलगाडीची सवारी इत्यादींसारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता
ताम्हिणी घाट
मुंबई आणि पुणे येथील पर्यटकांना आकर्षित करणारा ताम्हिणी घाट हा भव्य, पर्वतीय खिंड आहे. हा घाट त्याच्या दळणावळणांच्या रस्त्यासाठी प्रसिद्ध असून, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अनेक छोटे-मोठे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात. ताम्हिणी घाट हे गुळगुळीत रस्ते व चित्तथरारक दृश्यांसाठी लोकप्रिय असून, वाहणारे धबधबे, घनदाट झाडी यामुळे एक सुंदर पिकनिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
अंधारबन ट्रेल पॉइंट
अंधारबन ट्रेल पॉइंट हे ठिकाण सर्वात लोकप्रिय व्हिंटेज पॉइंट पैकी एक आहे. या ठिकाणी तुम्ही कोसलत्या धबधब्यात हायकिंग करू शकता. पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध “हायकिंग ट्रेल” म्हणून, मुळशी जवळील अंधारबन ट्रेल पॉईंट एक लोकप्रिय ठिकाण असून मित्र व परिवारासोबत साहसी वेळ घालवण्यासाठी हे परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे.
टेमघर धरण
टेमघर धरण हे मुठा नदीच्या काठावर वसलेले असून, या ठिकाणी तुम्हाला विहंगम दृश्यांनी मंत्रमुग्ध करणारे नजारे अनुभवता येतात. या ठिकाणी स्वादिष्ट स्नॅक्स, तसेच विविध प्रकारच्या चवदार गोष्टींचा स्वाद घेण्यास अजिबात विसरू नका.
कैलासगड किल्ला
कैलासगड किल्ला अतिशय सुंदर व प्रेक्षणीय स्थळ असून, पावसाळ्यात मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये कैलासगड किल्ला अतिशय सुंदर व हिरव्यागार झाडांनी नटून गेलेला असतो. आजूबाजूला असणारे लहान धबधबे यामुळे हा परिसर अतिशय उजळून गेलेला असतो.
जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वे
रेल्वे यंत्रणा आणि तीची कार्यशैली जाणून घ्यायची असेल, तर जोशींच्या लघु रेल्वे संग्रहालयाला नक्कीच भेट द्यावी लागेल. भाऊसाहेब जोशी यांनी या संकल्पनेची सुरुवात केली. जोशी यांनी ट्रेन्सचे कार्यरत मॉडेल्स गोळा करण्याच्या छंदाला आणि त्यांच्या स्वप्नांना आकार दिला. संपूर्ण संग्रहालयाच्या मांडणीमध्ये कुंपण, उड्डाणपूल, लॅम्प पोस्ट, सिग्नल इत्यादींचा समावेश केलेला आहे. हे कार्यरत मॉडेल्स मॅन्युअली तसेच संगणकाद्वारे नियंत्रित केले जातात. लहान मुले स्टीम इंजिन, बुलेट ट्रेन, मिनी स्काय ट्रेन इत्यादी पाहू शकतात.धरणापासून अंतर – ३६ किलोमीटर
हे सुद्धा पहा 👉 अप्रतिम देवकुंड धबधबा
पाषाण तलाव
राम नदी ओलांडून बांधलेल्या धरणामुळे पाषाण तलाव तयार झालेला मानवनिर्मित जलाशय आहे. हा तलाव पुण्याच्या पाषाण उपनगरात आहे. या तलावाचे पाणी अनेक स्थलांतरित पक्ष्यांना तलावाकडे आकरशून घेते. स्थलांतरित हंगामात पक्षी निरीक्षकांना इथे पर्वणीच प्राप्त होते. धरणापासून अंतर – ३३ किलोमीटर
शनिवार वाडा
थोरले बाजीराव पेशवे यांनी १७३० मध्ये बांधलेला हा एक प्रभावी राजवाडा आणि मैदान आहे, पेशव्यांच्या सत्तेचे आसन त्याच्या ऐश्वर्यातून दिसून येते. शनिवार वाडा सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुला असतो. प्रवेश विनामूल्य आहे.धरणापासून अंतर – ४० किलोमीटर
वेताळ हिल
२६०० फूट उंच असलेली वेताळ टेकडी ही पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच टेकडीआहे. टेकडीच्या शिखरावर वेताळ देवीला समर्पित असलेले मंदिर आहे. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी योग्य आहे. तथापि, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भूभाग निसरडा आणि धुके असल्यामुळे ट्रेकिंग करणे कठीण होते. वेताळ टेकडी हे भारतीय वनीकरण विभागाद्वारे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य वनविभाग आणि पुणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर इथे वनीकरण केले आहे, त्यामुळे वनस्पतींच्या अनेक प्रजातींना वाढीस प्रोत्साहन मिळाले आहे. धरणापासून अंतर – ३९ किलोमीटर
महात्मा फुले संग्रहालय
भूगर्भशास्त्र, वनीकरण, कुटीर उद्योग, शस्त्रागार, खनिजे इत्यादींशी संबंधित वस्तू असलेले १८७५ मध्ये स्थापन झालेले महात्मा फुले संग्रहालय महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे आहे. यामुघल आणि मराठा राज्यांची शस्त्रे आणि शस्त्रे अतिशय सुंदर आहेत. भारतीय जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पांचे लघु मॉडेल फारच आकर्षक आहेत. संग्रहालय परिसरात वाचनालयसुद्धा आहे. धरणापासून अंतर – ३९ किलोमीटर
तुळशीबाग
तुळशीबाग हे पुण्यातील प्रसिद्ध शॉपिंग एरिया आहे. सौंदर्यप्रसाधने आणि दागिन्यांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तु इथे खरेदी करता येतात. मुख्यतः हे पुण्यातील महिलांचे आवडते शॉपिंग डेस्टीनेशन आहे. धरणापासून अंतर – ३९ किलोमीटर
लाल महाल
शहाजी भोंसले यांनी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी यांच्यासाठी १६३० मध्ये लाल महाल बांधला. उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहराची पुनर्रचना करण्याच्या उद्देशातून मूळ लाल महाल बांधण्यात आला होता. तोरणा हा पहिला किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराज १६४५ पर्यंत येथे राहिले. १७ व्या शतकाच्या अखेरीस विविध हल्ल्यांमुळे लाल महाल उद्ध्वस्त झाला. सध्याचा लाल महाल हा पुणे महानगरपालिकेने शहराच्या मध्यभागी बांधलेला पुनर्बांधणीचा आहे.
आपल्या आईसह शिवाजी महाराजांचे चित्रमय प्रदर्शन लाल महालाच्या राजवाड्यात आहे. जिजाबाईंचा पुतळा हे आणखी एक आकर्षण आहे. इथे शिवाजी राजांनी शाईस्ताखान किल्ल्यावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची बोटे कापली होती म्हणून सुद्धा महाल सुद्धा प्रसिद्ध आहे. धरणापासून अंतर – ४० किलोमीटर
पुणे राजा दिनकर केळकर संग्रहालय
राजा दिनकर केळकर संग्रहालय हे संगीत आणि संस्कृतीचे अलौकिक स्थान आहे. हे संग्रहालय काका केळकर यांना समर्पित असून त्यांनी भारत भ्रमण करून जमविलेल्या वस्तू आणि नोट्स आणि कवितांद्वारे त्यांनी हे संग्रहालय स्थापन केले. ही वस्तु कल्पकतेला वाव देणारी आहे. धरणापासून अंतर – ३९ किलोमीटर
मुळशी धरणाजवळ करण्यासारख्या गोष्टी

घनगड ते कोरीगड किल्ला ट्रेक
घनगड ते कोरीगड किल्ला ट्रेक हा अतिशय सुंदर व चित्तथरारक असून, या किल्ल्यांच्या विहंगम दृश्यामुळे या किल्ल्यावरील पर्यटकांचे प्रमाण हे वाढत चालले आहे. घनगड ते कोरीगड किल्ल्याचा ट्रेक हा मध्यम पातळीचा हा अतिशय रोमांचक, सुंदर असून, आपल्याला ट्रेकिंगची आवड असल्यास हा नक्की ट्राय करा.
ताम्हिणी घाट
ताम्हिणी घाट हा सुंदर धबधब्यांसाठी, स्वच्छ तलावासाठी व घनदाट झाडीसाठी प्रसिद्ध असलेला घाट असून, हा घाट मुळशी व ताम्हिणी या दोन टेकड्यांच्या मधून जातो. या ठिकाणी तुम्ही निसर्गरम्य परिसर व धबधबे एक्सप्लोर करू शकता.
मुळशी तलाव कॅम्पिंग (MULSHI LAKE CAMPING)
मुळशी धरणावरील कॅम्पिंग पर्यटकांना आकर्षित करते. निसर्गरम्य व हिरवाईचा अनुभव घेत, मुळशी धरणावरील कॅम्पिंग तुम्हाला सुखद अनुभव देऊन जाते.
मुळशी तलाव बोटिंग
मुळशी तलावावरील बोटिंग ही एक इंटरेस्टिंग वॉटर ऍक्टिव्हिटी असून फोटोग्राफीचा तसेच स्वच्छ पाण्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
मुळशी धरणाजवळ खाण्याची ठिकाणे
चिंगारी – या ठिकाणी असणारी जेवणामधील रुची, आजूबाजूचे वातावरण व अतिथींचे स्वागत हे सर्व कौतुकास्पदच आहे. या ठिकाणी तुम्हाला शाकाहारी जेवण उपलब्ध होते.
मेजवानी – राजा बहादुर मिल रोडवर भारतीय, चायनीज तसेच युरोपियन पदार्थाचे फ्लेवर्स उपलब्ध आहेत.
मुळशी धरणाला भेट देण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
- नैसर्गिक सौंदर्य, धरणाच्या परिसराचे अचंबित करणारे दृश्य पाहण्यासाठी धरणाला तुम्ही पावसाळ्यात नक्कीच भेट द्यावी.
- कोणत्याही अत्यावश्यक कामासाठी स्थानिक लोकांची मदत घेऊ शकता.
- पावसाळ्यात धरणाला भेट देते वेळी चप्पलचा वापर करू नये. बुटांचा वापर करावा.
- धरणाला सकाळच्या वेळेस भेट द्यावी. रात्रीच्या वेळेस भेट देऊ नये.
- धरणाला भेट देतेवेळी रस्त्याच्या बाजूला ढाबा उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार स्वादिष्ट जेवण उपलब्ध करून दिले जाते.
मुळशी धरणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना
पावसाळ्याच्या काळात धरण हे अतिशय सुंदर व निसर्गसृष्टीने बहरून गेलेले असते. त्यामुळे मुळशी धरणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना हा जुलै ते सप्टेंबर च्या दरम्यान आहे.
मुळशी धरणाला कसे जाल?
धरणाला जाण्यासाठी तुम्ही रस्ते मार्ग रेल्वे मार्ग किंवा हवाई मार्गाने जाऊ शकता.
रस्ते मार्ग – धरण हे पुण्याहून साधारणतः ७९ किलोमीटर तर मुंबईवरून १३० किलोमीटर आहे. तुम्ही मुळशी धरणाला जाण्यासाठी बसने किंवा तुमच्या वैयक्तिक गाडीने जाऊ शकता.
रेल्वे मार्ग – कामशेत रेल्वे स्थानक हे मुळशी धरणाजवळील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बसने, ऑटो किंवा कॅब बुक करून धरणाला भेट देऊ शकता.
हवाई मार्ग – मुळशी धरणाजवळ कोणतेही विमानतळ नाही. पुण्यावरून येण्यासाठी तुम्ही पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा मुंबईवरून येण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून धरणाला भेट देऊ शकता.
मुळशी धरणाजवळ राहण्याची सोय
मुळशी धरणाजवळ तुमच्या बजेटनुसार योग्य राहण्याची व खाण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. त्यापैकीच काही कॉटेजेस आणि हॉटेल्स आपण दिलेल्या लिंक्सवर चेक करू शकता –
FAQ
मुळशी धरणाचे मालक कोण?
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण, हे मुळा नदीवर बांधण्यात आले असून, या धरणाचा उपयोग टाटा पॉवर कंपनी अंतर्गत असून, वीज निर्मितीच्या उद्देशाने या धरणाचे बांधकाम करण्यात आले. १९२७ साली टाटांनी या धरणाचे बांधकाम केले.
मुळशी धरण का प्रसिद्ध आहे?
मुळशी धरण हे ठिकाण इको टुरिझम हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध असून, हे एक नैसर्गिकरित्या संपन्न असलेले व देवाने दिलेले पृथ्वीवरचे एक वरदानच समजले तरी वावगे ठरणार नाही. मुळाशी धरण या ठिकाणी असणारी शांतता, विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज, आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे यामुळे प्रसिद्धीस आले. मुळशी धरण मुख्य शहरांना वेल कनेक्टेड आहे.
मुळशी धरणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता?
मुळशी धरणाला तुम्ही केव्हाही भेट देऊ शकता. परंतु मुळशी धरणाच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर व शांतता अनुभवायची असल्यास आणि मुळशी धरण तलावाचे सुंदर मनमोहक व नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण स्वरूप बघायचे असल्यास, पावसाळा हा उत्तम काळ आहे.
मुळशी धरण पुणे शहरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे ?
मुळशी धरण हे पुण्यापासून साधारणतः ७९ किलोमीटर अंतरावर असून, प्रवासासाठी, तुम्हाला दोन तास लागू शकतात.
मुळशी धरण ते ताम्हिणी घाट हे अंतर किती किलोमीटर आहे?
मुळशी धरण ते ताम्हिणी घाट हे अंतर २२ किलोमीटर असून, प्रवासासाठी अंदाजे ४१ मिनिटे लागू शकतात.
निष्कर्ष
मित्रहो, MULSHI DAM INFORMATION IN MARATHI या आजच्या लेखातून आम्ही आपणास मुळशी धरण, मुळशी तलाव माहिती, मुळशी धरणाजवळील प्रेक्षणीय स्थळे, मुळशी धरणाची वैशिष्ट्ये, भेट देण्यासाठी उत्तम महिना, mulshi dam camping याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. MULSHI LAKE AND DAM IN MAHARASHTRA हा लेख आवडल्यास नक्की शेयर करा.
धन्यवाद.
Gallery



