नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 : Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana 2023

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana २०२३ : Announcement, Online Application, Benefits, Eligibility All Information In Marathi – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी दिनांक ९  मार्च २०२३-२४ च्या अर्थसंकल्प मध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना २०२३” चा शुभारंभ करण्याची घोषणा केली असून, ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या, आधारावर सुरू करण्यात आली आहे.

Table of Contents

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 : Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana 2023

आपला भारत देश हा कृषी समृद्ध देश असून, भारत देशामधील बहुतेक लोक शेतीवर अवलंबून आहेत. यापैकी ७५ टक्के लोक भारतात प्रत्यक्ष शेती करून, त्यावर उपजीविका करतात. त्यांचे राहणीमान, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टी शेतीवर अवलंबून असतात. या सर्वांचा विचार करता, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत, एक नवीन योजना अंमलात आणली असून, त्या योजनेचे नाव “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” असे आहे.

प्रस्तावना – Namo Shetkari Samman Yojana

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana 2023

या योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सरकारकडून प्रति वर्षी ६०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ शेतकरी मित्रांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी २०२३- २४ च्या अर्थसंकल्प मध्ये प्रस्तुत केली.

“नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या” (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana 2023) माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील १.५ कोटीहून जास्त शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. आपण देखील या योजनेचा लाभ मिळवू इच्छिता, महाराष्ट्र राज्याचे बळीराजा असाल तर, तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्राप्त करू शकता. ती कशी याबद्दल सर्व माहिती या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचावा.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना २०२३ – Namo Shetkari Mahasanman Yojana 2023

या योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांना प्रति वर्षी ६०००/- रुपयांची अधिक आर्थिक मदत त्यांच्या बचत खात्यामध्ये दिली जाणार असून ही आर्थिक मदत वर्षातील तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

केंद्र सरकारने राबवलेल्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, आता शेतकरी मित्रांना वर्षाला १२०००/-रुपयांची आर्थिक मदत आणि १/- रुपयात या योजनेच्या अंतर्गत पिक विमा योजनेचा लाभ सुद्धा, शेतकरी मित्रांना मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने ६९०० कोटी रुपयांची तजवीज केली असून, महाराष्ट्र राज्यातील १.५ कोटी शेतकरी कुटुंबांना, “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार असून, त्यांच्या राहणीमानामध्ये देखील सुधारणा होईल, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

दि.१ जून राज्य सरकारकडून मिळाली “नमो शेतकरी योजना” ला मंजुरी

आपल्या महाराष्ट्र राज्याचे, मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, यांच्या अध्यक्षपदाखाली मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीत “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला” मंजुरी देण्यात आली असून, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी बोलताना असे म्हणाले की, आजच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आधारे, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/- रुपये दिले जात आहेत, त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा तोच निर्णय अमलात आणला असून, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्यातील बळीराजाला प्रतिवर्षी ६०००/- रुपये तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

 Namo Shetkari Sanman Yojana 2023

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत

“नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या” (Namo Shetkari Yojana In Marathi) माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना, प्रति वर्षी ६०००/- रुपयांची अधिक आर्थिक मदत त्यांच्या बचत खात्यामध्ये दिली जाणार असून केंद्र सरकारने राबवलेल्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकरी मित्रांना वर्षाला ६०००/-रुपयांची आर्थिक मदत आणि १/- रुपयात या योजनेच्या अंतर्गत पिक विमा योजनेचा लाभ सुद्धा, शेतकरी मित्रांना मिळणार आहे. म्हणजेच वर्षाला त्यांच्या बचत खात्यात १२०००/- रुपये सरकारकडून मिळणार आहेत.

त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत सध्या १ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना एका वर्षाला ६०००/- रुपये लाभ मिळणार असून, तब्बल १/- रुपयात या योजनेच्या अंतर्गत पिक विमा योजनेचा लाभ सुद्धा, शेतकरी मित्रांना मिळणार आहे.

या योजनेमुळे शेतकरी हे सुखावले असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून, शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावून, शेतकरी स्वावलंबी बनतील, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती – Namo Shetkari Sanman Yojana 2023

योजनेचे नाव  नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
घोषित केले  मख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा
लाभार्थी  महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्र
उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे
लाभ दिला जाईलमहाराष्ट्र राज्यातील दीड कोटी शेतकरी कुटुंबे
आर्थिक मदत रक्कम 6,000/- रु
राज्य  महाराष्ट्र
वर्ष  2023
अपेक्षित लाभार्थी 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे

नमो शेतकरी सन्मान योजना उद्देश – Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023

 • महाराष्ट्र राज्यामध्ये Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023 सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा, शेतकरी लोकांमधील राहणीमान उंचावून, त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
 • या योजनेचा लाभ शेतकरी मित्रांना मिळून योजनेच्या माध्यमाने शेतकरी मित्र उत्तम उपजीविका उपलब्ध करून, सक्षम व स्वावलंबी बनतील.
 • या व्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारने, शेतकऱ्यांना तब्बल एक रुपयांमध्ये पिक विमा योजना जाहीर केला असून, शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2023 

 • प्रधानमंत्री पीक वीमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून फक्त २ टक्के विम्याचा हप्ता भरून घेतला जाईल, परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याचा फक्त १ टक्के रक्कम, महाराष्ट्र सरकारला भरावी लागणार आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांना आर्थिक मदत करून त्यांना एक उत्तम जीवनशैली प्रदान करणे हे महाराष्ट्र सरकारचे एकमेव ध्येय आहे.
 • महाराष्ट्र राज्यांमधील शेतकऱ्यांना आता त्यांच्या बचत खात्यात मिळणार रु-१२०००/-
 • महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या “Namo Shetkari Sanman Yojana 2023च्या” माध्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकरी मित्रांना ६०००/- रुपये स्वतंत्रपणे, त्यांच्या बचत खात्यात प्रतिवर्षी तीन समान भागांमध्ये दिले जाणार आहे.
 • शेतकऱ्यांना फक्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आर्थिक मदत मिळाली जाणार नसून, नमो शेतकरी महासंघ निधी योजनेतून, देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या द्वारे ६०००/- रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या द्वारे ६०००/- रुपये असे एकूण १२०००/- रुपये शेतकऱ्यांच्या बचत खात्यात दरवर्षी सरकार देणार आहे.
नमो शेतकरी योजना महाराष्ट्र 2023

नमो शेतकरी योजना 2023 ची वैशिष्ट्ये व फायदे – shetkari Maha Samman Nidhi

 • Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 ही केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखीच असून, ही योजना भिन्न नाही.
 • नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत, शेतकरी कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून प्रति वर्षाला ६०००/- रुपये त्यांच्या बचत खात्यामध्ये दरवर्षी तीन समान भागांमध्ये दिले जाणार आहेत.
 • राज्यातील शेतकरी बांधवांना, या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी आता १२०००/- रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून, यामध्ये ५०% रक्कम महाराष्ट्र सरकार, व बाकी ५०% रक्कम ही केंद्र सरकार प्रदान करणार आहे.

 • महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या द्वारे केली जाणारी आर्थिक मदत शेतकरी मित्रांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे.
 • या योजनेच्या माध्यमाने महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना प्रति महिना १००० रुपये आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.
 • याव्यतिरिक्त शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ताही महाराष्ट्र सरकार भरणार आहे.
 • महाराष्ट्र राज्यामधील १.५ कोटी शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजना महाराष्ट्र २०२३ चा लाभ मिळणार आहे.
 • प्रतिवर्षी ६९०० कोटी रुपये सरकार या योजनेसाठी खर्च करणार आहे.
 • या योजनेमुळे शेतकरी मित्र हे स्वावलंबी बनवून आर्थिक सबळ बनतील हा उद्देश आहे.

नमो शेतकरी सन्मान योजना 2023 साठी पात्रता व निकष – Namo Shetkari Yojana Maharashtra

 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्जदाराला अर्ज करतेवेळी महाराष्ट्र मधील मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा असणे गरजेचे आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मुभा आहे.
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज करावयास शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे गरजेचे आहे.
 • लाभार्थी शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्याला लाभ प्राप्त करण्यासाठी बँक मध्ये खाते असणे अनिवार्य आहे.
 • बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी अंतर्गत कोण पात्र नाही – Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023

जे कर भरतात ते या शेतकरी या सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

केंद्रसरकार किंवा राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा घेता येणार नाही.

सरकारी नोकरी मध्ये कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त लोकांनाही या योजनेत पात्र ठेवले जाणार नाही.

ज्या व्यक्तींची पेन्शन रुपये 10 हजारांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही या योजनेपासून वंचित ठेवण्यात येईल.

वकील, चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर, इंजिनीअर, वास्तुविशारदही या योजनेच्या लाभापासून वंचित असतील.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१.उत्पन्न प्रमाण पत्र
२.शेती तपशील
३.पासपोर्ट आकाराचा फोटो
४.मोबाईल नंबर
५.बँक खाते विवरण
६.पत्त्याचा पुरावा
७.आधार कार्ड
८.जमिनीची कागदपत्रे

नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज कसा करावा ? Namo Shetkari Samman Yojana Registration

 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत, शेतकरी बांधवांना अर्ज करण्यासाठी काही काळाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.
 • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी योजना 2023 ची घोषणा केली आहे. याद्वारे दरवर्षी तुम्हाला ६०००/- रुपये तुमच्या बचत खात्यामध्ये दिले जाणार आहे.
 • या योजनेला अर्ज करण्यासाठी, अजूनही अधिकृत वेबसाईट सुरू झालेली नाही.
 • त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी, अर्जासंबंधीची कोणत्याही प्रकारची माहिती महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक केलेली नाही.
 • यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी थोडा कालावधी प्रतीक्षा करावी लागेल.

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र 2023 – FAQ

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येईल आणि ही रक्कम लाभार्थ्यांना एकूण ६००० रुपये असेल.

काय आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रति वर्ष रुपये ६०००/- ची आर्थिक मदत राज्यसरकारतर्फे दिली जाईल. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात २०००/- च्या ३ समान हप्त्यांमध्ये वितरीत केली जाईल

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे काय फायदे आहेत?

महाराष्ट्र राज्य नमो शेतकरी महा समान निधी योजनेंतर्गत १.१५ कोटी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत, त्यांना केंद्राकडून प्रतिवर्ष ६००० रुपये दिले जातात . म्हणजे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने किती बजेट ठेवले आहे?

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ६९०० कोटी रु. चे बजेट निश्चित केले आहे. सुमारे १.१५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्रता काय असावी?

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी
महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.
अर्जदार शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते असणे बंधनकारक आहे
शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.

ही योजना कार्यान्वित करण्याचा उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांना आर्थिक मदत करून त्यांना एक उत्तम जीवनशैली प्रदान करणे हे महाराष्ट्र सरकारचे एकमेव ध्येय आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना कोणाकडून सुरू करण्यात आली आहे?

महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर, शेतकऱ्यांना प्रतिवर्ष रु. ६००० ची आर्थिक मदत दिली जाईल.

निष्कर्ष

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रति वर्ष रुपये ६०००/- ची आर्थिक मदत राज्यसरकारतर्फे दिली जाईल. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात २०००/- च्या ३ समान हप्त्यांमध्ये वितरीत केली जाईल.

आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून रुपये ६०००/- ची आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेद्वारे रुपये ६०००/-अशी एकूण वार्षिक रक्कम रुपये १२०००/- मदत दिली जाईल.

आपल्याला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना : घोषणा, ऑनलाइन अर्ज, फायदे, पात्रता सर्व माहिती ही माहिती उपयोगी असल्यास इतरांनाही शेअर करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी वेबसाइट नक्की फॉलो करा. धन्यवाद.

Leave a comment