पाचगणी संपूर्ण माहिती मराठी | Panchgani Information In Marathi

पाचगणी संपूर्ण माहिती मराठी | Panchgani Information In Marathi – मित्रांनो महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील स्थळांमध्ये महाबळेश्वर या थंड हवेच्या पर्यटन स्थळाचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते. हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल, परंतु महाबळेश्वरच्या जवळ असणारे ठिकाण महाबळेश्वर इतकेच प्रसिद्ध आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट देणारे कित्येक पर्यटक हे पाचगणी या पर्यटन स्थळालाही भेट देत असतात. हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आणि लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर पासून पाचगणी हे ठिकाण मात्र १८  ते २० किलोमीटर एवढे अंतरावर आहे. आजच्या लेखातून आम्ही आपणास पंचगणी मधील प्रेक्षणीय स्थळे, व इतर बऱ्याच मुद्यांन बद्दल माहिती देणार आहोत.तर हा लेख नक्की वाचा.

Table of Contents

पाचगणी संपूर्ण माहिती मराठी | Panchgani Information In Marathi

सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या पाच डोंगरांना पंचगणी हे नाव देण्यात आलेले आहे. पंचगणी मधील टेबल लँड आशिया खंडातील सर्वात उंचवरील पठार म्हणूनही ओळख जाते. ही दोन ठिकाणी एकमेकांना पूरक आहे, असे  म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदी चित्रपट सृष्टीला या ठिकाणाचे विशेष आकर्षण आहे. या नयनरम्य वातावरण असलेल्या भागात चित्रीकरणासाठी लोकेशनची कमतरता भासत नाही.

वर्षभर कोणत्या ना कोणत्या चित्रपटाची शूटिंग या ठिकाणी चालू असते. या ठिकाणी मोरया मार्ग हे सेंटर आहे. देश विदेशातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. पाचगणी मध्ये पारशी आणि ब्रिटिश लोकांचे बंगले ही खूपच आकर्षक आहेत. याचाही आनंद आपण येथे घेऊ शकतो. लाल आणि रसाळ स्ट्रॉबेरी ही पंचगणीची प्रमुख आकर्षण आहे. स्ट्रॉबेरी कार्ड ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लुसलुशीत झालेले असते.

Panchgani Information In Marathi

पाचगणी भौगोलिक रचना | Panchgani Hill Station Information In Marathi

समुद्रसपाटीपासून साधारणतः ४२४२ फुट उंच आहे. पंचगणी हे सह्याद्री पर्वतरांगेंच्या कुशीमध्ये वसलेले असून, याच्या आसपास पाच गावे आहेत. धांडेघर, खिनगर, गोडावली, अंबरल, ताम्हिणीघाट इत्यादी.

ठिकाण पाचगणी
जवळचे स्थान महाबळेश्वर
वैशिष्ट्य थंड हवेचे ठिकाण
जिल्हासातारा
राज्यमहाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून ऊंची ४२४२ फुट
चढाई १,२९३ मीटर
डोंगररांग सह्याद्री पर्वतरांग
आसपासची गावे धांडेघर, खिनगर, गोडावली, अंबरल, ताम्हिणीघाट

पाचगणी नकाशा

पाचगणीचे मुख्य शहरापासून अंतर व आवश्यक कालावधी

 • पंचगणी ते मुंबई अंतर व आवश्यक कालावधी

पंचगणी ते मुंबई हे अंतर साधारणतः २४४ किलोमीटर एवढे असून यासाठी ५ तास एवढा कालावधी लागू शकतो.

 • पुणे ते पंचगणी अंतर व आवश्यक कालावधी

पुणे ते पंचगणी हे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असून यासाठी तुम्हाला २.५ तास लागू शकतात.

पाचगणी पर्यटनासाठी कालावधी/दिवस

हे पर्यटन स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवस लागू शकतात.

पाचगणी बोर्डिंग स्कूल्स

हे ठिकाण बोर्डिंग स्कूल साठी देखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोरया मार्ग हे सेंटर आहे. देश विदेशातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. १९ शतकाच्या उत्तराधार्थपासून स्थापन झालेल्या बोर्डिंग स्कूलसाठी पंचगणी हे थंड हवेचे ठिकाण लोकप्रिय आहे.हे ठिकाण मुंबई तसेच पुण्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेतच्या माध्यमातून आकर्षित करत असते. पंचगणी येथे विविध शाळा देखील आहेत त्या खालील प्रमाणे-

 • बिल्लीमोरिया स्कूल
 • न्यू इरा हायस्कूल
 • पंचगणी इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज
 • संजीवन विद्यालय

पाचगणीमधील पर्यटन स्थळे | Places To Visit Panchgani

elephant head point

पाचगणी मधील प्रेक्षणीय स्थळे सुद्धा एकदम भन्नाट असून या ठिकाणी दिसणारे विहंगम असे दृश्य, बाजूला असणारी धरणे, दूरवर पसरलेली गडकिल्ल्यांची रांग व अविस्मरणीय असे पॉईंट्स अचंबित करून टाकतात. त्या पैकी काही प्रेक्षणीय स्थळे खालील प्रमाणे

मॅप्रो गार्डन

मधील मॅप्रो गार्डन हे ठिकाण पंचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.हि अशी जागा आहेत जी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनच स्थळांपैकी एक आहे. या गार्डनचे कॅम्पस हे साधारणतः २ एकर इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे. मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

मॅप्रो गार्डन

राजापुरी लेणी

राजापुरी लेणी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. राजापुरी लेण्या या लोकांमध्ये त्यांच्या धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध आहेत. या लेण्या अनेक पाण्याच्या तलावांनी घडलेल्या आहेत. या ठिकाणी चार गुहा असून त्यांच्या भोवती अनेक जलकुंड पाहायला मिळतात. येथे असणाऱ्या चार गुहांपैकी एक गुहा ही इतरांपेक्षा वेगळी आहे. याच ठिकाणी भगवान कार्तिकेची जुनी प्रतिमा पाहायला मिळते. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात साजरा होणारा उत्सव हा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. पाचगणी पासून राजापुरी लेण्या ह्या साधारणतः ७ किलोमीटर इतके अंतरावर आहेत.

 देवराई कला व्हिलेज

देवराई कला व्हिलेज ठिकाण दुर्गम आदिवासी भाग आणि शहरी राहणीमान यांच्यातील एक दुवाच आहे. असे जरी म्हटले तरी वावग ठरणार नाही. या ठिकाणी आपल्याला स्वदेशी कला आणि हस्तकला टिकून ठेवलेल्या पाहायला मिळतात. आधुनिक डिझाईनची संवेदनशीलता, पारंपारिक कला, हस्तकलेतून परावर्तित होते जी खूपच दर्जेदार कलाकृती मानली जाते. खरोखरच देवराई व्हिलेज हे एक आकर्षण ठिकाण आहे. पंचगणी पासून हे गाव मात्र ३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

 कमळगड किल्ला

कमळगड किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मोहिमेच्या अगोदर हा किल्ला स्वराज्यात सामील केला होता. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. पंचगणी पासून कमळगड हा किल्ला साधारणतः ४० किलोमीटर अंतरावर आहे.

 धोम धरण

धोम धरण हे पंचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हे धरण सातारा जिल्ह्यातील धोम या गावाजवळ आहे. हे धरण पंचगणीचा भाग म्हणून भेट देणाऱ्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. एक दिवसाची सहल म्हणून भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्गरम्य परिसर आणि उपकरणामुळे धोम धरण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असते. पाण्यातील उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी धरणाच्या जवळ सह्याद्री बोट क्लब आहे. या बोट क्लबमधून वॉटर स्कूटर, स्पीड बोट राईड अशा अनेक खेळांचा मनमुराद आनंद घेता येतो. बोट क्लब पर्यटकांसाठी घोडेस्वारी आणि कॅम्पिंगची सुविधा देते.

 पारसी पॉईंट

पारसी पॉइंट हे ठिकाण पंचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेले एक सुंदर स्थळ आहे. पारसी पॉईंट या ठिकाणाहून पर्वत, कृष्णा दरी आणि धोम धरणाचे धरणाच्या बॅक वॉटरची विहिंगम दृश्ये पाहायला मिळतील. हे ठिकाण पूर्वीच्या काळात पारशी समुदायाचे आवडते स्थळ असल्याने, याला पारसी पॉईंट हे नाव देण्यात आले.

या ठिकाणी येणारे बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. पंचगणी पासून हे ठिकाण मात्र २ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पारसी पॉइंटची सुंदरता ही अतिशय अचंबित करणारी आहे. या ठिकाणहून दिसणारे विहंगम दृश्य बाजूलाच असणारे धरण व आजूबाजूला पसरलेली सुंदर डोंगररांग, यामध्ये वसलेले हे पारसी पॉईंट अतिशय सुंदर व मन मोहून टाकणारे आहे.

सिडनी पॉइंट

सिडनी पॉईंट हे एक रमणीय आणि लोकप्रिय ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या समोर असलेल्या टेकडीवर हा सिडनी पॉईंट आहे. सिडनी पॉईंट वरून आपल्याला कृष्णा खोरे, धोम धरण, कमळगड किल्ला आणि वाई शहराचे मनमोहक दृश्य पाहता येते. त्याचबरोबर या ठिकाणावरून पांडवगड आणि मांढरदेवच्या डोंगराचे सुंदर दृश्य दिसते. पंचगणी पासून सिडनी पॉइंट हे ठिकाण साधारणतः २.३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

कास पठार

कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कास पठार हे एक विशाल ज्वालामुखी पठार आहे. फुलांचे पठार म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण महाराष्ट्राबरोबर भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळा संपल्यानंतर निसर्गप्रेमीमध्ये हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे पठार  साधारणतः १०००  हेक्टर इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे.

कास पठार हे ठिकाण अनेक पर्यटन, शास्त्रज्ञ, आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करत असते. साताऱ्यापासून हे ठिकाण २४ किलोमीटर, महाबळेश्वर पासून ३७ किलोमीटर आणि पंचगणी पासून ५० किलोमीटर इतके अंतरावर आहे.

महाबळेश्वर  

महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वर हे हिल स्टेशन असून याला महाराष्ट्रातील हिल स्टेशनची राणी म्हणून संबोधले जाते. हे हिल स्टेशन साधारणतः १३५३ मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे. येथील सुंदर वातावरण हे महाबळेश्वरला येण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करत असते.

महाबळेश्वर या ठिकाणी किल्ले, मंदिरे, तलाव आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी प्रतापगड किल्ला, वेण्णा तलाव, महाबळेश्वर मंदिर, लिंगमळा धबधबा व पंचगणी अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. पंचगणी पासून महाबळेश्वर हे ठिकाण मात्र १९ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

 टेबल लँड

टेबल लँड पॉइंट हे ठिकाण पंचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हे सर्वात उंच ठिकाण आहे. जे समुद्र सपाटीपासून साधारणतः ४५५० फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे. टेबल लँड हा पॉईंट डोंगरांनी भेद्लेला एक खडकाचा विस्तार विभाग आहे. या ठिकाणाहून आपल्याला पंचगणी आणि जवळपासच्या खोऱ्याचा मनसोक्त आनंद घेता येईल.

टेबल लँड या ठिकाणी घोडेस्वारी, मेरीगो राऊंड, मिनी ट्रेन फुड स्टॉल आणि गेम काउंटर यासारखे अनेक उपक्रम आहेत. बॉलिवूडचे लोकप्रिय शूटिंग स्पॉट म्हणूनही या ठिकाणाला ओळखले जाते. राजा हिंदुस्तानी, मेला, हम तुम्हारे है सनम यासारख्या अनेक चित्रपटांची चित्रीकरण या ठिकाणी केलेले आहे. पंचगणी पासून हे ठिकाण मात्र २ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

लक्ष्मीनारायण मंदिर

हे चिखली गावातील लक्ष्मीनारायण मंदिर आहे जे अतिशय सुंदर व पांढऱ्या रंगाचे आहे. हे मंदिर एवढे देखणे आहे की या मंदिरामध्ये भरपूर चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. जसे बेटा चित्रपट, रबने बनादी जोडी, पिके या चित्रपटांची शूटिंग झाली आहे.

पॅराग्लायडिंग पॉईंट

या पॉईंटपासून पॅराग्लाइडिंगची सुरुवात होते.

स्वच्छ भारत गार्डन

पाचगणी मधील स्वच्छ भारत गार्डन हे एक उत्तम व विकसित असलेले गार्डन आहे. या स्वच्छ भारत गार्डनच्या जवळूनच पांडवगड, कमळगड, राजगड किल्ला आपण पाहू शकतो.

टायगर गुफा पॉईंट

टायगर गुफा पॉईंट हे देखील पंचगणी मधील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. या गुहेमध्ये जाण्यासाठी दहा रुपये इतका प्रवेश शुल्क आकारला जातो. या  गुहेच्या आत एक छोटे कॅफे आहे. त्यामध्ये तुम्ही चहा, नाश्ता व कॉफी घेऊ शकता.

 पंचगणीमध्ये करण्यासारख्या गोष्टी

कॅम्पिंग

पाचगणी मध्ये तुम्ही टेकड्यांच्या माथ्यावरती कॅम्पिंग करून आजूबाजूच्या परिसराचा विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

 फोटोशूट

पाचगणी या ठिकाणी अतिशय अचंबित करणारी दृश्ये आहेत व पावसाच्या काळात या ठिकाणी वातावरण व निसर्ग हा स्वर्गापेक्षा कमी भासत नाही. यावेळी तुम्ही या ठिकाणी जाऊन सुंदर फोटोशूट, प्री-वेडिंग शूट करू शकता. या ठिकाणी सुंदर निसर्गाचा व विहंगमदृश्यांचे नजारे तुम्ही तुमच्या कॅमेरा मध्ये व डोळ्यांमध्ये टिपून घेऊ शकता.

पॅराग्लायडिंग

पंचगणी या ठिकाणी पॅराग्लाइडिंग पॉइंट असून या ठिकाणाहून पॅराग्लाइडिंग केली जाते. तुम्ही सुद्धा येऊन या ठिकाणी पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता.

मॅप्रो गार्डन भेट

एक सुंदर गार्डन असून या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे फोटोशूट साठी पॉईंट मिळून जातील. या गार्डनमध्ये विविध उत्पादनाची फॅक्टरी असून, मँगो ज्यूस, जाम, सिरप, स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी पासून बनवलेले विविध उत्पादने इत्यादी गोष्टी खरेदी करू शकता.

घोडे स्वारी

पाचगणी मध्ये आशियातील दुसऱ्या क्रमांकावर असणारे सर्वात लांब टेबल लँड पठार आहे. या पठारावरती तुम्हाला घोडेस्वारी करता येते व संपूर्ण पठार न्याहाळता येतो.

एडवेंचर्सर ऍक्टिव्हिटीज

पंचगणी मध्ये येऊन तुम्ही विविध प्रकारची एडवेंचर्स ऍक्टिव्हिटीज करू शकता. जसे ट्रेकिंग, कॅम्पिंग बोटिंग, पॅराग्लायडिंग वगैरे.

व्ह्यू पॉईंट

पंचगणी या ठिकाणी विविध व्ह्यू पॉइंट आहे. ज्या ठिकाणी तुम्ही निसर्गाचे अद्भुत व अचंबित करणारे दृश्य पाहू शकता. मान्सूनच्या काळात पंचगाणी हे हिल स्टेशन धरतीवरील एक स्वर्गच भासते.

टेबल लँड व्ह्यू पॉईंट

पंचगणी मधील टेबल लँड आशिया खंडातील सर्वात उंचवरील पठार म्हणूनही ओळख जाते. ही दोन ठिकाणी एकमेकांना पूरक आहेत, असे  म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या ठिकाणी तुम्ही एक सुंदर घोडास्वारी घेऊ शकता.

 • सर्वोत्तम वेळ – दिवसाच्या वेळी भेट देऊ शकता.
 • भेट देण्याचा कालावधी – एक ते दोन तास आवश्यक आहेत.
 • प्रवेश शुल्क – कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.

पारसी पॉइंट

पारसी पॉईंट हा असा एक पॉईंट आहे, ज्या ठिकाणावरून तुम्ही सुंदर निसर्गाचे अचंबित करणारे दृश्य पाहू शकता. उंच उंच टेकड्या, पर्वतरांगांची छायाचित्रे तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये टिपून ठेऊ शकता.

 • सर्वोत्तम वेळ – पारसी पॉइंटला भेट देण्यासाठी तुम्ही सकाळच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी भेट देऊ शकता.
 • आवश्यक कालावधी – पारसी पॉइंट हे प्रेक्षणीय स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी अंदाजे तुम्हाला एक तास लागू शकतो.
 • प्रवेश शुल्क – या ठिकाणी तुम्हाला कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

धोम धरण

धोम धरणात तुम्ही बोटीतून फिरून पूर्ण धरण एक्सप्लोर करण्याचा आनंद घेऊ शकता.

 • सर्वोत्तम वेळ – धरण एक्सप्लोर करण्यासाठी सकाळचा वेळ किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही भेट देऊ शकता.
 • आवश्यक कालावधी – धोम धरण एक्सप्लोर करण्यासाठी व त्याची सुंदरता पाहण्यासाठी साधारणतः तुम्हाला एक ते दोन तास लागू शकतात.
 • प्रवेश शुल्क – धोम धरण एक्सप्लोर करण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही.

देवराई कला गाव

देवराई कला गावा मध्ये हस्तकला पासून बनवलेल्या विविध सुंदर वस्तू यांची तुम्ही खरेदी करू शकता.

 • सर्वोत्तम वेळ – देवराई कला गावाला भेट देण्यासाठी सकाळचा वेळ हा सर्वोत्तम आहे.
 • आवश्यक कालावधी – देवराई कला गाव पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी व त्या ठिकाणी हस्तकलेपासून बनवलेल्या वस्तू पाहण्यासाठी साधारणतः तुम्हाला एक तास लागू शकतो.
 • प्रवेश शुल्क – या गावामध्ये फिरण्यासाठी व त्या ठिकाणी वस्तू एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही.

सिडनी पॉइंट

या ठिकाणी तुम्ही सुंदर टेरेस फॉर्मची छायाचित्रे घेऊ शकता, स्ट्रॉबेरीचे सुंदर गार्डन एक्सप्लोर करू शकता.

 • सर्वोत्तम वेळ – सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणी भेट देणे हे उत्तम राहील.
 • भेट देण्यासाठी लागणारा कालावधी – साधारणतः तुम्हाला एक तास आवश्यक आहे.
 • प्रवेश शुल्क – या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रवेश शुल्क लागत नाही.

केट्स पॉईंट

केट्स पॉईंट अतिशय सुंदर पॉईंट असून, या ठिकाणी तुम्ही व्हॅली, पेनोरामा व्ह्यू इत्यादी नयनरम्य गोष्टींची छायाचित्रे घेऊ शकता. या ठिकाणाला पंचगणीचे सनसेट पॉईंट म्हणून देखील ओळखले जाते.

 • सर्वोत्तम वेळ – या ठिकाणी तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी भेट देऊ शकता.
 • आवश्यक कालावधी – केट्स पॉईंट एक्सप्लोर करण्यासाठी अंदाजे तुम्हाला एक तास किंवा त्यापेक्षा कमी कालावधी लागू शकतो.
 • प्रवेश शुल्क – या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

पाचगणीचे हवामान

पाचगणीचे हवामान हे मध्यम ते उष्ण असते. येथील तापमान १९ ते ३३ डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाते.

उन्हाळा – एप्रिल ते मे या उन्हाळ्याच्या काळात येथील तापमान हे अतिप्रखर उष्ण व ४२ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते.

हिवाळा – हिवाळ्यामध्ये वातावरण हे थंड व कोरडे असून येथील तापमान रात्री १० डिग्री सेल्सिअस तर  सकाळी २६ डिग्री सेल्सियस असते.

पावसाळा – पंचगणी हिल स्टेशन मध्ये वार्षिक पर्जन्य साधारणतः ७६३ मिलिमीटर असते.

पाचगणी येथे कसे जायचे?

पाचगणी येथील पर्यटन स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक गाडीचा किंवा बाईकचा वापर केला तर सर्वोत्तम आहे. कारण या ठिकाणी बाईक किंवा स्कुटी भाड्याने मिळत नाही. तुम्ही स्वतःच्या बाईकने किंवा स्वतःच्या कारने पंचगाणी मधील प्रेक्षणीय स्थळांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. पाचगणीला जाण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता ते पर्याय खालील प्रमाणे

रस्ते मार्ग

मुंबई, पुणे, सातारा, महाबळेश्वर आणि महाड या राज्यांद्वारे विविध एसटी बस सेवा पंचगणीला जातात. या बसेसच्या माध्यमातून किंवा बाईकने वैयक्तिक गाडी बुक करून तुम्ही पंचगाणीचा प्रवास करू शकता. या ठिकाणी रस्ते हे सुस्थितीत असल्यामुळे ड्राईव्ह करताना तुम्हीं सुरक्षितरित्या पंचगणीला पोहोचू शकता. हे शहर भारतातील मुख्य शहरांशी उत्तम रस्त्यांनी जोडलेले आहे. पुणे, कुल्लू, हैदराबाद, मुंबई या शहरांमधून पाचगणीला जाण्यासाठी नियमित बस सेवा देखील उपलब्ध आहे.

रेल्वे मार्ग 

सातारा हे रेल्वे स्टेशन पंचगणी या हिल स्टेशन पासून जवळचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्टेशनवर उतरून तुम्ही टॅक्सीने किंवा ऑटो बुक करून पंचगणीला जाऊ शकता. पाचगणीला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वेमार्ग पुणे आहे, सुमारे ९५ किमी अंतरावर आहे. हे भारतातील मुख्य शहरांशी रेल्वेने चांगले जोडलेले आहे. पुण्याहून पाचगणीला जाण्यासाठी टॅक्सी आणि बसेसही नाममात्र दरात उपलब्ध आहेत.

हवाई मार्ग

पंचगणीला जाण्यासाठी जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर लोहेगाव मधील विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. व मुंबईवरून तुम्ही जर पंचगणी भेट देत असाल, तर मुंबई विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.पाचगणीला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे, सुमारे ५५ मैल अंतरावर आहे. या शहराच्या जवळ असलेले मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे भारत आणि परदेशातील मुख्य शहरांशी चांगले जोडलेले आहे.

पाचगणी ते महाबळेश्वर अंतर १९ किलोमीटर असून साधारणपणे ४५ मिनिटांचा वेळ लागतो.

पंचगणीमधील आजूबाजूला असलेल्या स्थळांची माहिती

कमळगड किल्ला

कमळगड किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मोहिमेच्या अगोदर हा किल्ला सामील केला होता. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. पंचगणी पासून कमळगड हा किल्ला साधारणतः ४० किलोमीटर अंतरावर आहे.

धोम धरण

धोम धरण हे पंचगणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हे धरण सातारा जिल्ह्यातील धोम या गावाजवळ आहे. हे धरण पंचगणीचा भाग म्हणून भेट देणाऱ्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. एक दिवसाची सहल म्हणून भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्गरम्य परिसर आणि उपकरणामुळे धोम धरण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असते. पाण्यातील उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी धरणाच्या जवळ सह्याद्री बोट क्लब आहे. या बोट क्लबमधून वॉटर स्कूटर, स्पीड बोर्ड राईट अशा अनेक खेळांचा मनमुराद आनंद घेता येतो. बोट क्लब पर्यटकांसाठी घोडेस्वारी आणि कॅम्पिंगची सुविधा देते.

 पारसी पॉईंट

पारसी पॉइंट हे ठिकाण पंचगणीमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेले एक सुंदर स्थळ आहे. पारसी पॉईंट या ठिकाणाहून पर्वत, कृष्णा दरी आणि धोम धरणाचे धरणाच्या बॅक वॉटरची विहिंगम दृश पाहायला मिळतील. हे ठिकाण पूर्वीच्या काळात पारशी समुदायाचे आवडते स्थळ असल्याने, याला पारसी पॉईंट हे नाव देण्यात आले. पंचगणी या ठिकाणी येणारे बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. पंचगणी पासून हे ठिकाण मात्र २ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पारसी पॉइंटची सुंदरता ही अतिशय अचंबित करणारी आहे या ठिकाणहून दिसणारे विहंगम दृश्य बाजूलाच असणारे धरण व आजूबाजूला पसरलेली सुंदर डोंगररांगा यामध्ये वसलेले हे पारसी पॉईंट अतिशय सुंदर व मन मोहून टाकणारे आहे.

सिडनी पॉइंट

सिडनी पॉईंट हे एक रमणीय आणि लोकप्रिय ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या समोर असलेल्या टेकडीवर हा सिडनी पॉईंट आहे. सिडनी पॉईंट वरून आपल्याला कृष्णा खोरे, धोम धरण, कमळगड किल्ला आणि वाई शहराचे मनमोहक दृश्य पाहता येते. त्याचबरोबर या ठिकाणावरून पांडवगड आणि मांढरदेवच्या डोंगराचे सुंदर दृश्य दिसते. पंचगणी पासून सिडनी पॉइंट हे ठिकाण साधारणतः २.३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

कास पठार

कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कास पठार हे एक विशाल ज्वालामुखी पठार आहे. फुलांचे पठार म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण महाराष्ट्राबरोबर भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळा संपल्यानंतर निसर्गप्रेमीमध्ये हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

पाचगणी हिल स्टेशन येथील सोयी सुविधा

पाचगणी हे शहर विविध सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे.

ATM सुविधा – पंचगणी शहरामध्ये तुम्हाला एटीएमची सुविधा उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे रोख कॅश उपलब्ध नसेल, ATM सुविधा उपलब्ध आहे.

पेट्रोल पंप – मार्केटमध्ये पेट्रोल पंपची सुविधा देखील उपलब्ध आहे.

ऑनलाइन पेमेंट – मित्रहो तुमच्याकडे रोख रक्कम नसेल व तुम्हाला कोणत्या वस्तू जर खरेदी करायच्या असतील  तर छोट्या दुकानांपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत ऑनलाइन पेमेंटची सुविधा प्रत्येक दुकानात उपलब्ध आहे. गुगलपे, फोनपे, पेटीएम इत्यादि.

राहण्याची व खाण्याची सोय -पाचगणीमध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार हॉटेल्स रिसॉर्ट ची सुविधा उपलब्ध आहे.

दवाखाने – पंचगणी पासून साधारणता थोड्या अंतरावर दवाखाने देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.

पोलीस स्टेशन – अत्यावश्यक कामासाठी पंचगणीपासून जवळच पोलीस स्टेशन देखील उपलब्ध आहे.

बाजारपेठ – पंचगणी बाजारपेठ ही विविध वस्तू, गृह सजावटीसाठी लागणारे सामान, जीवनशैली, फॅशन इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या बाजारपेठेमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी, लिची ,विविध ज्यूस, सिरप, जाम इत्यादींची देखील खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त पंचगणी बाजारपेठ कोल्हापुरी चप्पलांसाठी देखील प्रसिद्ध आहे तुम्ही त्या खरेदी करू शकता.

पाचगणी येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

 • या ठिकाणी महाराष्ट्रीयन पाककृती खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रिसॉर्ट व हॉटेलमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार व्हेज थाळी किंवा नॉनव्हेज थाळी मिळून जाईल.
 • पंचगणीमध्ये महाराष्ट्रीयन पाककृतीमध्ये खास करून वडापाव, मिसळपाव, ग्रील चीज सॅंडविज, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, बर्गर्स रोल्स, गुजराती थाळी इत्यादींचा समावेश होतो.
 • पंचगाणी या ठिकाणी जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरी फळाचे उत्पन्न घेतले जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मलबेरीज, रसबेरीज, ब्ल्यूबेरीजचे देखील उत्पादन घेतले जाते.

पाचगणी येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना/वेळ

पंचगणीला या ठिकाणी तुम्ही वर्षाच्या बाराही महिने भेट देऊ शकता. परंतु भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना हा हिवाळ्याचा आहे. यावेळी तुम्ही सोयीस्कर रित्या पंचगणीतील प्रसिद्ध स्थळे साईटसिंइग, बघू शकता. यासाठी तुम्ही सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात भेट देऊ शकता.

टिप्स – अति पावसामध्ये ट्रेकिंग करणे किंवा धबधब्यांना भेट देणे टाळावे.

पाचगणीमध्ये राहण्याची सोय

पंचगणी मध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार योग्य ते हॉटेल किंवा रिसॉर्ट बुक करून संपूर्ण पंचगणी एक्सप्लोर करू शकता. त्यापैकी काही रिसॉर्टची माहिती.

ब्लीझर्ड रिसॉर्ट

पारसी पॉइंट पासून हे रिसॉर्ट साधारणतः ३.६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंग, एक मिनी बार, स्विमिंग पूल व खाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 शरयू हॉलिडेज व्हॅली व्ह्यू

हे रिसॉर्ट पारसी पॉइंट पासून साधारणतः ०.६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सुविधा, विनामूल्य वायफाय, तसेच नाश्ता व जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.

 मॅस्टिक स्टे रिसॉर्ट

हे रिसॉर्ट मॅप्रो गार्डन पासून साधारणतः ५.७ किलोमीटर इतक्या अंतरावर असून, या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंग, मिनी बार, स्विमिंग पूल व जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.

 वनेला रेजन्सी

ही रेजन्सी टेबल लँड पासून साधारणतः १.१ किलोमीटर इतक्या अंतरावर असून. या ठिकाणी विनामूल्य पार्किंग वायफायची सुविधा. मिनी बार. स्विमिंग पूल. नाष्ट्याची तसेच खाण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

 मीराया हॉटेल

हे हॉटेल पारसी पॉईंट पासून साधारणतः ०.७ किलोमीटर इतक्या अंतरावर असून, या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सुविधा वायफायची सुविधा, जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.

FQA

पंचगणी नाव कसे पडले ?

असे म्हटले जाते की पंचगणी हे हिल स्टेशन सह्याद्री डोंगर रांगांच्या पाच समूहावर विकसित झाले आहे, पाचगणी हे नाव खऱ्या अर्थाने ‘पाच टेकड्या’ असे आहे. यामुळे यास पंचगणी असे नाव पडले. हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबईच्या आग्नेयेकडील हिल स्टेशन आहे.

पंचगणी का लोकप्रिय आहे ?

पंचगणी हे एक सुंदर थंड हवेचे ठिकाण असून याच्या बाजूला असलेल्या इतर प्रेक्षणीय स्थळांमुळे हे ठिकाण अजूनच निसर्गरम्य व अचंबित करणारे आहे यामुळे या ठिकाणी पर्यटकांची ओढ ही जास्तच असते.
समुद्रासपाटीपासून ४२४२ फूट उंचीवर असलेले एक भव्य हिल स्टेशन, पाचगणी हे पर्यटकांना भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

पाचगणीला भेट देण्यासारखे आहे का?

नैसर्गिक विविधता, फेसळणारे धबधबे, दऱ्या आणि तलाव यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खरोखरच आनंददायी आहे. शांत आणि प्रसन्न कृष्णा नदी तुमच्या सुट्टीचा मूड आणखी समृद्ध करेल.म्हणून एकदा पंचगणीला भेट द्यायला पाहिजे

निष्कर्ष

आजच्या पंचगणी या लेखातून आम्ही आपणस panchgani hill station बद्दल माहिती दिली आहे, त्याचप्रमणे प्रेक्षणीय स्थळे, पंचगणी बोर्डिंग शाळा व बरेच मुद्दे दिले आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा व कसा वाटला हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment