संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी | Sant Eknath Information In Marathi

sant eknath information in marathi language | संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी – महाराष्ट्रातीच्या वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत एकनाथ महाराज यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे एका ऋग्वेदी देशस्थ ब्राम्हण, श्री भानुदास यांच्या घरात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव श्री सूर्यनारायण होते. लहानपणीच त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेल्यामुळे त्यांचे पालनपोषण, त्यांचे आजोबा श्रीचक्रपाणीजी यांनी केले. संतपदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाज सुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, अशा अनेक गुण विशेषणांनी साऱ्या महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच संत एकनाथ महाराज. आदर्श गुरु, मायमराठीचे सुपुत्र, गाढे पंडित, दयेचा सागर या शब्दातही त्यांचे वर्णन करता येईल.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत एकनाथांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख आपण पूर्ण वाचवा.

Table of Contents

संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी : sant eknath information in marathi language

पूर्ण नाव संत एकनाथ महाराज
जन्मई.स १५३३
जन्मस्थळ पैठण
आईचे नाव रुक्मिणी 
वडिलांचे नाव सूर्यनारायण 
पत्नीचे नाव गिरिजाबाई
अपत्य गंगा, गोदावरी, हरी
गुरु जनार्दन स्वामी
मृत्यू इ.स १५९९
sant eknath information in marathi

संत एकनाथ महाराजांचा जन्म आणि बालपण

संत एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचा मानले जाते. संत एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना आपले गुरु मानले, त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत योग, भक्तीयोग, यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदात घालवला. गुरु बरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर, त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.

गिरीजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथांचे मूळ पुरुष भास्कर पंत कुलकर्णी, हे पैठण नगरीत राहणारे, संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते. ते सूर्याची उपासना करत, श्री संत एकनाथांच्या वडिलांचे पूर्ण नाव सूर्यनारायण कुलकर्णी होते. आईचे नाव रुक्मिणी होते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी व आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होते.

समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी

एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी, हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते. ते मूळचे चाळीसगावचे रहिवासी होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सदगुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन गुरु मानले होते.

एकनाथ महाराजांचे चरित्र (संत एकनाथ कोण होते ?)

जनार्दन पंत हे विद्वान व सत्सल आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरु सेवा केली आणि साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात. आत्मबोध, गुरुकृपा, यामुळे भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यामुळे, एकनाथांचे जीवन धन्य धन्य झाले. एकनाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. संत एकनाथ यांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला, ही मुलगी पैठण जवळच्या वैजापूरची होती. संत एकनाथ आणि गिरीजाबाई यांनी गोदावरी व गंगा या दोन मुली व हरि नावाचा मुलगा याला जन्म दिला.

त्यांचा हा मुलगा हरी पंडित या नावाने प्रख्यात झाला. त्याला परंपरेचा अतिशय अभिमान होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले, एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर, हरी पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडील नातू होते.

संत एकनाथ महाराजांची कथा (information about sant eknath in marathi)

एके दिवशी संत एकनाथ गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी निघाले होते, दुपारची वेळ होती, ऊन  रखरखत होते. गोदावरी नदी पात्रातील वाळू तापली होती. त्याच वाळवंटात एक छोटे मूल रडत बसले होते. हे मूल दलित कुळातील होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला, त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का ? यासाठी इकडे तिकडे पाहिले, जवळ कोणी दिसत नाही, हे बघून नाथ त्या मुलाजवळ धावत गेले, त्या मुलाला उचलून कडेवर घेतले, आपल्या खांद्यावरील कापडाने त्याचे डोळे तोंड पुसले, व त्याच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून ते कापड त्याच्या डोक्यावर पांगरले.

नंतर त्याच्या आई वडिलांचा शोध करून, त्यांनी त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या वागण्यातून, एकनाथांनी समानतेची व ममतेची मायेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली, तसेच संत एकनाथांनी लोकांना स्वधर्म रक्षणाच्या गोष्टींचाही उपदेश केला.

एकनाथ महाराजांचे लेखन

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे, लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ, यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च, नीच, भेदभाव मानू नका, असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला. गोरगरिबांना समाजातील जे मागासलेले लोक होते, जे सर्व सुखांपासून दूर होते, अशा लोकांना संत एकनाथांनी जवळ केले. इतकीच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही त्यांनी उपदेश केला. संत एकनाथ फक्त उपदेश करत नसत तर, जसे बोलत तसे ते स्वतः वागत.

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी

एकनाथ महाराजांचे भारुड मराठी sant eknath bharud in marathi

भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. महाराष्ट्रातील संतांनी याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आपल्या अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही.

संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत. भारुडाची सुरुवात म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारुडाचा प्रधान हेतु हाच होता. ‘बहुरूढ’ या शब्दाचा अपभ्रंश ‘भारूड’ झाला असेही काहींचे मत आहे.

एकनाथ महाराजांचा अभंग मराठी sant eknath abhang in marathi

अभंग हा प्राचीन महाराष्ट्राच्या मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हे एक अक्षरवृत्त किंवा छंदाचा प्रकार आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे.
छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

भावार्थ रामायण एकनाथ महाराज sant eknath bhavarth dipika in marathi

भावार्थ रामायण हा एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून हा त्यांचा अप्रतिम ग्रंथ आहे. वाल्मिकी रामायणावरील हा प्राकृत ओवीबद्ध मराठी टीकाग्रंथ आहे. त्याची रचना इ.स. १५९५ ते इ.स. १५९९ या काळात झाली. या ग्रंथाचे त्यांनी ४४ अध्याय लिहिले. एकनाथांच्या मृत्यू नंतर त्यांचा शिष्य गायबा यांनी राहिलेले अध्याय पूर्ण केले.
‘भावार्थ रामायण ‘ हा क्रांतदर्शी ,प्रेरणादायी अपूर्व ग्रंथ निर्माण केला. मराठी भाषेच्या आरंभ काळापासून निर्माण झालेल्या श्रीविठ्ठलाच्या भक्तिसंप्रदायात महत्वाचे कार्य करणाऱ्या संत एकनाथांनी ती परिपाठी सोडून मराठी भाषेत प्रथमच संपूर्ण रामकथा लिहिली.

एकनाथ महाराज हरिपाठ sant eknath maharaj haripath

हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी अभंग रचना होय. वारकरी संप्रदायात हरिपाठाला स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचले आहेत. स्थान मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.

हरिचिया दासा हरी दाही दिशा ।
भावे जैसा तैसा हरी एक ॥१॥
हरी मुखी गातां हरपली चिंता ।
त्या नाही मागुता जन्म घेणे ॥धृ.२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।
तेचि झालीं अंगे हरिरुप ॥३॥
हरिरुप झालें जाणणे हरपले ।
नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥४॥
हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं ।
एका जनार्दनी हरी बोला ॥५॥

संत एकनाथ महाराजांचे कीर्तन

संत एकनाथांनी संसारात राहून परमार्थ करता येतो हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दाखवून दिले. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन केले. अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय.

नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते.

संत एकनाथ महाराज व्हिडिओ – sant eknath maharaj information in marathi

संत एकनाथ यांचे कार्य – sant eknath mahiti marathi

मराठी भाषेचे पहिले संपादक

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो. एकनाथी भागवतातील १८ हजार ८०० ओव्यांच्या माध्यमातून श्रीमद् भागवत पुराणाच्या स्कंदावर त्यांनी भाष्य केले. भागवत पुराणातील मूळ श्लोकांची संख्या १३६७ आहे. संत एकनाथ महाराजांना नाथ म्हणूनही संबोधले जाते.

जातीयतेला विरोध करणारे कृतीशील संत

संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते, असे म्हटले जाते. त्यांनी भारुडे, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले. डोळस आणि कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले.

आधी आचरण, मग उपदेश

आधी आचरण, मग उपदेश, हीच उक्ती त्यांनी नेहमी प्रत्ययाला आणून दिली. गाढवाला पाणी पाजणे, तत्कालीन जातीभेद नष्ट करण्यासाठी रंजल्या-गांजल्यांच्या घरी जाऊन भोजन करणे, लोकसेवा करणे, मानवात देव पाहण्याची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून देणे, असे अनेक प्रसंग आजही स्मरणात आहेत. तत्कालीन जातीव्यवस्था नष्ट करून लोकोद्धारासाठी एकनाथ आयुष्यभर प्रयत्नशील राहिले.

संत एकनाथांचे सामाजिक कार्य

एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतेच्या सुरुवातीच्या सुधारकांपैकी एक होते, ते मध्ययुगाच्या उत्तरार्धात कार्यरत होते. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.

एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली. समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली. 

एकनाथ महाराज यांचे साहित्य

एकनाथी अभंग गाथा
चिरंजीवपद
रुक्मिणीस्वयंवर
शुकाष्टक टीका
स्वात्मबोध
आनंदलहरी
हस्तमालक टीका
चतुःश्लोकी भागवत
मुद्राविलास
लघुगीता
अनुभवानंद
ब्रिदावळी
एकनाथी भागवत : भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
भावार्थ रामायण : (एकनाथी ओवीबद्ध मराठी)
संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ – एकूण २५ अभंग
समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.
ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण
ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात नित्य पूजेची व्यवस्था लावून आळंदीची समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली.

एकनाथ महाराजांची समाधी

नाथ हे महापुरुष होते. दत्तभक्त होते. देवी भक्त होते. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. षष्ठी शके १५२१ म्हणजेच २५ फेब्रुवारी इसवी सन १६०० या दिवशी संत एकनाथांनी आपला देह गोदावरी काठी ठेवला. फाल्गुन षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. हाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ समाधी उत्सव सोहळा म्हणून साजरा केला जातो.

संत एकनाथ आणि ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, यवनांचे राज्य होते, याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता, स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य, याविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटवल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. हे अंबे दार उघड असे म्हणत, एकनाथांनी भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ, यांच्या सहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संत कवी, पंत कवी, व समाजसुधारक होते.

रंजन व प्रबोधन करत पतीत, समाजाला त्यांनी सद्मार्गावर आणले. महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागवला. एकनाथ एका जनार्दनी म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाम मुद्रा  आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुटलेखन त्यांनी केले.

“एकनाथी भागवत” हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. मुळात १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. सार्थ एकनाथी भागवत हा एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून वारकरीपंथास आधारभूत आहे. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. सत्ताविसाव्या अध्यायात पूजाविधी आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते.

नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणी स्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरती ही प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल, वांग्मय निर्माण करून, महाराष्ट्राची मराठी भाषा समृद्ध केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य संत एकनाथांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी

एकनाथ महाराजांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामे केली. त्यामधील महत्त्वाचे कार्य म्हणजे, एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत बनवली. एके दिवशी एकनाथ महाराजांचा घसा हा फार दुखू लागला, त्यावेळी त्यांनी त्याच्यासाठी औषध उपचार केले, परंतु त्यांना त्या औषधोपचारापासून गुण येत नव्हता. त्यावेळी तिसऱ्या दिवशी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानदेव महाराज आले, व ते त्यांना म्हणाले हा माझ्या मानेस अजान वृक्षाच्या मुळीचा गळफास बसलेला आहे, तू स्वतः त्या ठिकाणी जाऊन काढून टाक, म्हणजे तुझा घसा पूर्णपणे बरा होईल. म्हणून, स्वतः सोबत लोकांना घेऊन एकनाथ महाराज किर्तन करीत १५०५ मध्ये आळंदीला ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. याविषयी एकनाथ महाराजांनी अभंग लिहिला तो अभंग प्रसिद्ध आहे तो खालील प्रमाणे –

श्रीज्ञानदेवें स्वप्नात आले.
आईला मजला सांगितले.
दिव्य प्रकाश: पुंज मदनाचा पुतळा.
तुम्ही फक्त परब्रह्माचेच बोलता.
अज्ञात झाडाच्या मुळाचा त्याच्या मानेला स्पर्श झाला.
येउनि आळंदी कधि वेगें ॥3॥
असे स्वप्न असती अलंकापुरी ।
मग नदी माझरी दिसली फाटक ।
एका जनार्दनीं त्याचें पूर्वीचें गुण पूर्ण केलें ।
श्रीगुरुंना ज्ञानाचा स्वामी भेटला.

संत एकनाथांच्या उपदेशातील सात महत्त्वाच्या गोष्टी

  • १.संत एकनाथ महाराजांनी सेवा कार्य कशा पद्धतीने करावे, याच्या विविध उपाय योजना दिलेल्या आहेत. सेवा केल्याने आपण समाजामध्ये एक महत्त्वपूर्ण व सक्रिय भाग बनू शकतो.
  • २. नेहमी सत्य बोलावे. व सत्याची मर्यादा राखून स्वतःच्या जीवनामध्ये स्थिरता ठेवावी. कधीही खोटे बोलू नये.
  • ३. प्रेम हे मनुष्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रेमाच्या मदतीने आपण सर्वांना प्रेम करणे, व त्यांच्या मनात आपल्याबद्दल आनंद निर्माण करणे, व त्यातून स्वतःला समाधान प्राप्त करता येते.
  • ४. देवा वरती श्रद्धा ठेवणे, व देवाची मनापासून उपासना करणे, हीच खरी भक्ती असते. देवाच्या भक्तीतून आयुष्यामध्ये आपल्याला शांतता व आनंद मिळते.
  • ५. साधना केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये शांतता व आनंद मिळते. साधनाही आत्मनिर्माणाची एक महत्त्वाची उपासना आहे.
  • ६. स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून, नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा योग्य विचार करणे गरजेचे आहे.
  • ७. श्रद्धा आपल्या मधील असणारी महत्त्वाची गुणवत्ता आहे. श्रद्धेमुळे माणसाला सुखप्राप्ती होते.
sant eknath chi mahiti marathi

FAQ

इतिहासात संत एकनाथ कोण होते ?

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इसवीसन पंधराशे तेहतीस मध्ये पैठण येथे झाला. संतपदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाज सुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, अशा अनेक गुण विशेषणांनी साऱ्या महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच संत एकनाथ महाराज. आदर्श गुरु, मायमराठीचे सुपुत्र, गाढे पंडित, दयेचा सागर या शब्दातही त्यांचे वर्णन करता येईल.

संत एकनाथांनी काय सल्ला दिला होता ?

१. संत एकनाथ महाराजांनी सेवा कार्य कशा पद्धतीने करावे, याच्या विविध उपाय योजना दिलेल्या आहेत. सेवा केल्याने आपण समाजामध्ये एक महत्त्वपूर्ण व सक्रिय भाग बनू शकतो.
२. नेहमी सत्य बोलावे. व सत्याची मर्यादा राखून स्वतःच्या जीवनामध्ये स्थिरता ठेवावी. कधीही खोटे बोलू नये.
३. प्रेम हे मनुष्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रेमाच्या मदतीने आपण सर्वांना प्रेम करणे, व त्यांच्या मनात आपल्याबद्दल आनंद निर्माण करणे, व त्यातून स्वतःला समाधान प्राप्त करता येते.
४. देवा वरती श्रद्धा ठेवणे, व देवाची मनापासून उपासना करणे, हीच खरी भक्ती असते. देवाच्या भक्तीतून आयुष्यामध्ये आपल्याला शांतता व आनंद मिळते.

संत एकनाथ महाराजांचे आडनाव काय होते?

संत एकनाथांचे मूळ पुरुष भास्कर पंथ कुलकर्णी, हे पैठण नगरीत राहणारे, संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते. मुळचे चाळीसगावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते.

संत एकनाथांनी कोणत्या पुस्तकात सर्वसामान्यांच्या जीवनाचे चित्रण केले आहे?

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे थोर संत होते. त्यांच्या रचना अनेक आणि वैविध्यपूर्ण आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे, लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ, यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च, नीच, भेदभाव मानू नका, असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला.

संत एकनाथांच्या साहित्यात कोणत्या प्रकारची रचना आढळते?

संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे, लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ, यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च, नीच, भेदभाव मानू नका, असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला.

संत एकनाथांनी कोणते काम केले?

एकनाथ महाराजांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामे केली. त्यामधील महत्त्वाचे कार्य म्हणजे, एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत बनवली. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे, लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ, यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च, नीच, भेदभाव मानू नका, असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या संत एकनाथ या लेखाद्वारे आम्ही आपणास एकनाथांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

हा लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment