सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती : Savitribai Phule Information in Marathi

Savitribai Phule Information in Marathi | सावित्रीबाई फुले माहिती मराठी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे, तर त्या एक उत्तम कवियीत्री, शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटले जाते. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यात खूप मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्रीया आणि शुद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला आणि त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका देखील होत्या.

भारताच्या इतिहासातील अशी ही स्त्री म्हणजे या राष्ट्राच्या पहिल्या स्त्री -शिक्षिका, भारतातील सत्रीमुक्तीच्या आद्य स्त्री-प्रणेत्या ‘सावित्रीबाई फुले’ यांचे कार्य खरेच अतुलनीय आहे. समाजधुरीण म्हणून सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तीत्व आणि कार्य आज इतिहासात सर्वश्रुत असले तरी मराठी साहित्याला आद्य काव्यरचनेचे अभिजात लेणेही त्यांनी बहाल केले आहे.

म्हणूनच सावित्रीबाईंना “क्रांतीज्योती” म्हणूनही ओळखले जाते

Table of Contents

सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र : Savitribai Phule Information in Marathi

मूळ नाव सावित्रीबाई जोतीराव फुले
जनतेने दिलेले नाव क्रांतीज्योती
ज्ञानज्योती
जन्म तारीख ३ जानेवारी, इ.स. १८३१
जन्मस्थळ नायगाव, सातारा, महाराष्ट्र
वडिलांचे नाव खंडोजी नेवसे (पाटील)
आईचे नाव सत्यवती नेवसे
पतीचे नाव जोतीराव फुले
मुले यशवंत फुले (दत्तक)
स्थापन केलेली संघटना सत्यशोधक समाज, बलहत्या प्रतिबंधक गृह, महिला सेवा मंडळ
कार्य मुलींची पहिली शाळा, महिला सशक्तीकरण, समाज सुधारणा चळवळ
धर्महिंदू
पुरस्कारक्रांतीज्योती
प्रमुख स्मारकजन्मभूमी नायगाव
मृत्यू मार्च १०, इ.स. १८९७
मृत्यूस्थळ पुणे, महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले म्हणजेच स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारतातील पहिल्या शिक्षिका. महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाची दशा आणि दिशा सावित्रीबाईंना समजावून दिली. तर स्त्रियांना गुलामगिरीच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी, या दांपत्याने आयुष्यभर प्रयत्न केले. सावित्रीबाईंच्या प्रयत्नांमुळेच आज शिक्षणाची गंगा खेडयापाड्यातील महिलांपर्यंत पोहोचली. आणि म्हणूनच सावित्रीच्या लेकी अभिमानाने उभ्या आहेत. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती आणि त्यांचे कार्य आजच्या लेखाद्वारे आपण पाहणार आहोत. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा.

Savitribai Phule Information in Marathi

सावित्रीबाईंचे सुरुवातीचे आयुष्य आणि बालपण

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी निमसे पाटील होते. १८४० साली  महात्मा ज्योतिराव फुले या थोर समाजसुधारकांसोबत, सावित्रीबाईचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय नऊ वर्ष तर, ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाज सुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.

फुले दांपत्यापूर्वीची परिस्थिती

सावित्रीबाईंच्या काळात शूद्रांची आणि स्त्रियांची अवस्था अतिशय वाईट असायची. स्पृश्य – अस्पृश्यता याचे स्तोम सर्वत्र वाढले होते. त्याचप्रमाणे स्त्रियांवर वेगवेगळी बंधने लादण्यात आली होती. मुला मुलींची लग्न पाळण्यात लावली जायची. एखादी स्त्री विधवा झाली तर तिला केस कापून विद्रूप बनुन जीवन काढावे लागे. त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षण देणे हे धर्माच्या विरुद्ध मानले जात होते. अशावेळी या सर्व प्रथांच्या विरुद्ध सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आवाज उठवला.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण (Savitribai Phule Education in Marathi)

महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत सावित्रीबाईचे लग्न झालं आणि लग्नानंतर सावित्रीबाईंना त्यांचा उदार दृष्टिकोन माहिती पडला. स्त्रियांनी शिकावं हा जोतिबा फुले यांचा मानस होता. आणि ज्योतिबा फुले यांनी या सुरुवात आपल्या पत्नीपासूनच केली. हीच मनोमनी सावित्रीबाईंची सुद्धा इच्छा होती.

आपल्या शिक्षणाची इच्छा पूर्ण होण्याची संधीच जणू चालत आली. शेत नांगरताना झाडाखाली बसून काळ्या मातीत सावित्रीबाई शिकू लागल्या. स्वतःमध्ये प्रगती झाल्यावर, नंतर मिसेस मिचलने त्यांची परीक्षा घेतली. त्या परिक्षेत पास झाल्या. त्याना तिसऱ्या वर्गात प्रवेश मिळाला. जिद्दीने अभ्यास करून अध्यापिकेची पदवी संपादन केली. शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेऊन, पुढचं शिक्षण सुरू ठेवलं.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य (Work Of Savitribai Phule)

Savitribai Phule Information in Marathi

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य

सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या, लग्नानंतर जोतिबांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले. त्यावेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती, त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. अहमदनगर येथे इंग्रज महिला मिस फॅरार हिने गोऱ्या लोकांच्या मुलींसाठी शाळा चालवित होती. तेथे जाऊन जोतिरावांनी शाळा कार्यप्रणालीचा अभ्यास केला आणि अशीच शाळा पुण्यात काढण्याचे ठरविले.

पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने जोतिरावांनी गंज पेठेतील जागेत मुलीची शाळा ०१ जानेवारी १८४८ रोजी सुरू केली. भारतात मुलींसाठी सुरू होणारी ही पहिली शाळा होती. हा दिवस भारतातील लोकांसाठी शिक्षणाचा क्रांतिकारी दिवस ठरला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र

सावित्रीबाई या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या. पहिल्याच दिवशी चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर अशा सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला.पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली.

भिडे वाड्यातल्या शाळेनंतर, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या. पुण्यातील हे शिक्षण पाहून १८५२ मध्ये इंग्रज सरकारने, पुढे दंपत्याचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केलं.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यात सुद्धा सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाजातील वेगवेगळ्या जुनाट परंपरा मोडीत काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे

२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाच्या सर्व कार्यांमध्ये सावित्रीबाई या जोतिबांच्या बरोबरीने सहभागी होत्या

मिशनरी पद्धतीने सावित्रीबाईंनी स्त्रियांची सेवा केली. विरोधकांचा विरोध सहन करून जिद्दीने कार्य चालू ठेवले. त्या मागे हटल्या नाहीत.

जोती-सावित्रीनी शेतकरी आणि त्यांच्या बायकांसाठी प्रौढांची रात्रीची शाळा सुरू केली. या शाळेत जोतीराव व सावित्रीबाई रोज रात्री दोन तास मोफत शिकवित असत.

पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बायांना दूष्टांच्या तावडीतून सोडवून, त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून, पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

२८ जानेवारी १८५३ रोजी सावित्रीमाता आणि जोतीरावांनी पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

परित्यक्त्या महिलांच्या सेवेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. प्रसंगी समाजाशी संघर्ष सुद्धा पत्करला. त्यांनी “बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रमाची” निर्मिती केली होती. 

गोरगरिब मुला-मुलींसाठी आपल्या घरातच वसतिगृह सुरू केले. त्यांच्या लागणाऱ्या खर्चासाठी जोतीरावांनी खिश्चन मिशनच्या शाळेत अर्धवेळ नोकरी स्वीकारली.

अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला. सावित्रीमाता व महात्मा जोतीराव फुलेंनी आता पूर्वजांनी सांगितलेला परंतु सनातनी लोकामुळे लोप पावलेला “सत्य धर्म” लोकांना सांगितला. फुले दांपत्यांनी जीवनभर मेहनत घेऊन प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने विषमतेच्या वैयक्तिक वैदिक धर्माला पर्याय म्हणून सार्वजनिक सत्यधर्माचे पुनर्जिवन केले आणि सत्यशोधक समाज संस्थेमार्फत प्रसार-प्रचार केला. हा “सत्यधर्म” शूद्र- अतिशूद्रांसाठी वरदान ठरला.

१८९६ मधील दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला लोकसेवेचा आदर्श घालून दिला.

स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणात सावित्रीबाई फुले यांची भूमिका

स्वतः सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत. पण हे इतके सोपे नव्हते. त्यांना लोकांच्या कडक विरोधाला सामोरे जावे लागले, त्यांनी लोकांकडून होणारा अपमान सहन केला. सावित्रीबाई शाळेत जात असताना, स्त्री शिक्षणाचे विरोधी, कचरा, शेण, चिखल, दगड, इत्यादी त्यांना फेकून मारत. त्यामुळे त्यांचे कपडे घाण व्हायचे, म्हणून ते आपल्याबरोबर आणखी एक साडी आणायच्या, आणि शाळेत आल्यावर साडी बदलायच्या.

एवढा विरोध आणि संकटे असूनही, त्यांनी हार मानली नाही. माघार घेतली नाही. आणि महिलांचे शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले, स्त्री शिक्षणासह अनेक क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचे आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले.

बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवाश्रमाची स्थापना

सावित्रीबाईं व ज्योतिरावांनी महिलांची आणि विधवा स्त्रियांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. कारण विधवा गरोदर असल्या तर त्या आत्महत्या करत, कारण जन्माला येणाऱ्या मुलाला, यातनाशिवाय दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. हे त्यांना माहीत होते. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह समर्थपणे चालवले, फसलेल्या किंवा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करायच्या.

बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. सावित्रीबाई यांनी ज्योतिरावांना स्वतःचे मूल नव्हते, त्यामुळे याच बालहत्या प्रतिबंधक गृहात जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

महिला सेवा मंडळाची स्थापना

स्त्रियांच्या सुधारण्यासाठी ज्योतिरावांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी सुरू केलेली महिला सेवा मंडळ ही भारतातील महिलांसाठी कार्य करणारी पहिलीच संस्था होती. या संस्थेचे अध्यक्ष पुण्याचे कलेक्टर जोन्स यांच्या पत्नी मिसेस जोन्स होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा समाजाशी संघर्ष

सावित्रीबाईंचे समाज सुधारणेचे आणि स्त्री शिक्षणाचे कार्य थांबवण्यासाठी समाजाकडून अतोनात प्रयत्न झाले. प्रसंगी त्यांच्यावर दगड, शेण, माती फेकणे हेही प्रकार झाले. या सर्वांना सावित्रीबाई धीरोदत्तपणे सामोऱ्या गेल्या.

एकदा त्यांच्या घराकडे मारेकरी पाठवून सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्यावर हल्ला सुद्धा करवण्यात आला. धर्माचे ठेकेदार असणाऱ्या लोकांनी सावित्रीबाईंचे कार्य धर्मविरोधी आहे, असे सांगून त्यांना खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला.

सावित्रीबाई फुले आणि न्हाव्यांचा संप

 विधवा झाली की तिच्या बांगड्या फोडीत, कुंकू पुसले जाई, तिचे अंगावरील अलंकार काढून घेत. एवढ्यावरच न थांबता न्हाव्याला बोलावून त्याच्यापुढं बसवत व वस्ताऱ्याने संपूर्ण केस काढून विद्रूप बनवित. मगच त्या नवऱ्याची अंत्ययात्रा काढीत.

हा प्रकार थांबविणीसाठी त्यांनी सर्व नाभिकांना संघटित केले. सर्व न्हाव्यांनी विधवा स्त्रियाच्या केसाला वस्तारा न लावण्याची प्रतिज्ञा केली. अशा पद्धतीने न्हाव्यांचा संप घडवून आणण्यात सावित्रीमाता व जोतीराव यशस्वी झाले.

सावित्रीबाई फुले यांचा विधवा पुनर्विवाहासाठी संघर्ष

कमी वयाच्या मुलींचे वृद्ध माणसासोबत विवाह करण्याच्या प्रथेमुळे अनेक मुली १२-१३ व्या वर्षी विधवा होत. ब्राह्मण समाजात, विधवा पुनर्विवाहाला अजिबात मान्यता नव्हती. पतीच्या मृत्यूनंतर, अशा विधवांना सती जावे लागायचे, तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जायचे किंवा ती स्वतःच चितेवर उडी मारून आत्मदहन करत असे. तसेच त्यांचे केशवपन करून, त्यांना कुरूप बनवले जायचे, अशी भयानक अवस्था होती. महिलांची आणि विधवा स्त्रियांसाठी, ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

केशवपन म्हणजे स्त्रियांचे डोक्यावरील सर्व केस कापून टाकण्याची पद्धत, ही प्रथा बंद करण्यासाठी न्हावी समाजातील लोकांचे प्रबोधन करणे, पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.

सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाज (Savitribai Phule Satyashodhak Samaj)

जोतीरावांनी २४ सप्टेबर १८७३ रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत “सत्यशोधक समाज” नावाची संस्था भारतीय शूद्राच्या उन्नतीसाठी निर्माण केली. या सत्यशोधक समाज संस्थेमार्फत भारतीय इतिहासच सत्यशोधन करून मानव कल्याणासाठी “सत्यधर्माची” निर्मिती केली.

पहिल्यांदा शूद्राच्या मुक्तीसाठी जोतीराव फुलेंनी सत्यशोधक समाज संस्थेची निर्मिती करून सर्वांना ‘सत्यधर्म’ शिकविले. जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी यशवंत मुलाला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनविले होते. ४ फेब्रुवारी १८८९ साली यशवंत आणि राधाबाई यांचा आंतरजातीय विवाह घडवून आणला.

जोतीरावांच्या मृत्युनंतर सन १८९३ मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषविले. 

सावित्रीबाई फुले यांचे लेखन (Savitribai Phule Books)

महात्मा फुले यांच्या निधनानंतर, सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरावाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला.

 • काव्यफुले (काव्यसंग्रह)
 • सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
 • सुबोध रत्नाकर
 • बावनकशी
 • जोतिबांची भाषणे (संपादिका : सावित्रीबाई फुले १८५६)

कवयित्री सावित्रीबाई फुले

सावित्री उत्तम स्त्री शिक्षिका सोबत एक उत्तम कवयित्री सुद्धा होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या‍ समग्र काव्यारचनेचा आढावा घेता सध्या उपलब्ध असणाऱ्या त्यांच्या साहित्यात दोन काव्यसंग्रह आढळतात. यापैकी

 • १) ‘काव्यफुले’ हा ४१ स्फुट कवितांनी सिद्ध आहे.
 • २) ‘बावन्नकशी सुबोधरत्नाकर’ हा दीर्घ काव्यरचनेचा काव्यसंग्रह जोतीरावांचे काव्यमय चरित्रच आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी

सावित्रीबाई फुले यांच्या कविता

‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहातील रचनांच्या आधारे वर्गीकरण 
 • अ) निसर्गविषयक :- १)पिवळा चाफा, २) जाईचे फुल, ३) जाईची कळी,४)गुलाबाचे फुल, ५) फुलपाखरू आणि फुलाची कळी, ६) मानव सृष्टी, ७) मातीची ओवी.
 • आ) सामाजिक :- १) शिकणेसाठी जागे व्हा , २) मनु म्हणे, ३) ब्रम्हवंती शेती, ४) शूद्रांचे दुखणे, ५) इंग्रजी माऊली, ६) शूद्र शब्दांचा अर्थ, ७) बळीस्तोत्र, ८) शूद्रांचे परावलंबन, ९)तयास मानव म्हणावे का? १०) अज्ञान ११) सावित्री व जोतीबा संवाद.
 • इ) प्रार्थनापर :- १) प्रास्ताविका, २) अर्पणिका, ३) शिवप्रार्थना, ४)शिवस्तोत्र,५) स्वागतपर पद्य, ६) ईशस्तवन.
 • ई) आत्म‍पर :- १) जोतिबांना नमस्काद, २) जोतीबांचा बोध, ३)आमची आऊ, ४) माझी जन्म भूमी, ५) संसाराची वाट.
 • उ)काव्यविषयक कविता :- १) द्रष्टा कवी, २) खुळे काव्य.
 • ऊ)बोधपर कविता :- १) तेच संत, २) श्रेष्ठ धन, ३) बाळास उपदेश, ४) नवस,५) बोलकी बाहुली, ६) इंग्रजी शिका, ७) सामुदायिक संवाद.
 • ए) ऐतिहासिक कविता :- १)छत्रपती शिवाजी, २)राणी छत्रपती ताराबाई.

‘काव्यफुले’ हा कविता संग्रह सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिभेचा पहिला आविष्कार असून त्याचे स्वरूप जनप्रवर्तनक्षम आहे.

सावित्रीबाई फुले यांचे विचार (Thoughts Of Savitribai Phule)

विधवा स्त्री जर पुनर्विवाह करीत नसेल तर तिने सन्मानाने जीवन जगण्यासाठी पती निधनानंतरही कुंकू लावावे, चांगले वस्त्र नेसावे आणि प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे.

मागासवर्गीय मुलांचा शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याच समाजातील शिक्षक पाहिजेत.

या जोडप्यांनी अंधश्रद्धेचा अज्ञान, अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावूनच नष्ट केला जाईल.

स्त्री शिकली तर कुटुंब आणि त्यायोगे समाज सुशिक्षित होईल.

सावित्रीबाई फुले यांचा सत्कार

जोतीराव फुले आणि सावित्रीमाता यांचे कार्य पाहून सत्यशोधक कार्यकर्त्यांनी या महान जोडप्याचा सन्मान करण्याचे ठरविले. त्यानुसार ११ मे १८८८ रोजी मुंबई येथील मांडवी भागातील कोळीवाडा सभागृहात भव्य कार्यक्रम घडवून आणला आणि फुले दांपत्याचा सत्कार केला. टाळ्यांच्या गजरात जोतीरावांना बहुमानाची “महात्मा” ही पदवी अर्पण केली.

बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात परमानंद यांनी या जोडप्याच्या ऐतिहासिक कार्याची नोंद केली आहे.

सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक सन्मान

सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.

सावित्रीबाई फुले यांचा वारसा

आधुनिक समाजात सावित्रीमाता यांचा वारसा फार मोठा आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत आदरणीय मानले जाते.

 • ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या मागासवर्गीयांसाठी एक आयकॉन बनल्या आहेत. मानवी हक्क अभियानच्या स्थानिक शाखांमधील महिला त्यांच्या जयंतीलामिरवणुका काढतात.
 • पुणे महानगरपालिकेने १९८३ मध्ये त्यांचे स्मारक बांधले.
 • १० मार्च १९९८ रोजी फुले यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
 • ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
 • २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
 • ३ जानेवारी २०१७ रोजी, सर्च इंजिन गूगलने ने गूगल डूडलद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
 • पुण्यातील सावित्रीबाई फुले यांची अर्ध-प्रतिमा आहे.
 • पुणे सिटी कॉर्पोरेशनने 1983 मध्ये तिच्यासाठी एक स्मारक तयार केले.
 • 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण त्यांच्या सन्मानार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
 • 10 मार्च 1998 रोजी फुले यांच्या सन्मानार्थ इंडिया पोस्टद्वारे एक मुद्रांक प्रसिद्ध करण्यात आले.
 • 3 जानेवारी 2019 रोजी, शोध इंजिन गूगलने डूडलसह सावित्रीबाई फुले यांच्या जन्माच्या 188 व्या वर्धापनदिन चिन्हांकित केले.
 • फुले बद्दल 2018 मध्ये कन्नड बायोपिक चित्रपट बनला होता.

सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून, ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकारे सावित्रीबाई क्रांतीज्योती बनल्या. स्त्री जीवनात क्रांती घडविणाऱ्या, ज्ञानज्योत प्रज्वलित करणाऱ्या, सावित्रीबाई या समाजापुढे आदर्श होत्या. स्त्री पुरुष समानतेचा पाया घालणाऱ्या, दलित बांधवांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या क्रांतीज्योतीला शतशः प्रणाम.

सावित्रीबाई फुले यांचे निधन

१९९६-९७  मध्ये पुण्यात भयानक प्लेगची साथ पसरली. हा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला. रुग्णांची सेवा करताना, सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. आणि १० मार्च १९९७ रोजी त्यांचे निधन झाले. स्वतःच्या प्रकृतीची परवा न करता, त्यांनी प्लेगची लागण झालेल्या, रोग्यांची सेवा केली. शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा केली. आणि शेवटी विश्रांती घेतली.

FAQ

सावित्रीबाई फुले यांचा जन्म गावाचे नाव काय?

सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ. स. १८३१ रोजी झाला

सावित्रीबाई फुले यांच्या कवितासंग्रहाचे नाव काय?

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे, तर त्या एक उत्तम कवियीत्री, शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ साली, तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण किती झाले होते?

सावित्रीबाई फुले अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर मिसेस मिचलने त्यांची परीक्षा घेतली. त्या परिक्षेत पास झाल्या. त्याना तिसऱ्या वर्गात प्रवेश मिळाला. जिद्दीने अभ्यास करून अध्यापिकेची पदवी संपादन केली. शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. इस १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.

सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्यामागील प्रेरणा काय आहे?

ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने 1948 साली पुण्यातील भिडे वाड्यात पहिली भारतीय मुलींची स्थापना शाळा स्थापन केली. त्याचबरोबर शिक्षणासाठी असलेला भेदभाव नष्ट करण्याचे काम केले. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी अतोनात संघर्ष केला. केशवपन प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप सुद्धा घडवून आणला. परित्यक्त्या महिलांच्या सेवेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. प्रसंगी समाजाशी संघर्ष सुद्धा पत्करला. बालहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रमाची स्थापना केली. स्त्री सक्षमीकरणासाठी मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली.

भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

सावित्रीबाई फुले – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे, तर त्या एक उत्तम कवियीत्री, शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटले जाते. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यात खूप मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्रीया आणि शुद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला आणि त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका देखील होत्या

सावित्रीबाई फुले यांची सामाजिक सुधारणेत काय भूमिका आहे?

ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने 1948 साली पुण्यातील भिडे वाड्यात पहिली भारतीय मुलींची स्थापना शाळा स्थापन केली. त्याचबरोबर शिक्षणासाठी असलेला भेदभाव नष्ट करण्याचे काम केले. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी अतोनात संघर्ष केला. केशवपन प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप सुद्धा घडवून आणला. परित्यक्त्या महिलांच्या सेवेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. प्रसंगी समाजाशी संघर्ष सुद्धा पत्करला. बालहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रमाची स्थापना केली. स्त्री सक्षमीकरणासाठी मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली.

मुलींच्या शिक्षणासाठी प्रथम कोण लढले?

सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे समाजातील मुलींसाठी तसेच बहिष्कृत आणि अस्पृश्य घटकांसाठी शिक्षण देण्यात अग्रेसर होते. भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा स्थापन केली.

सावित्रीबाई फुले माहिती मराठी या लेखाचा निष्कर्ष

मित्रहो, आजच्या सावित्रीबाई फुले ह्या लेखाद्वारे आम्ही आपणास सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले यांचे कार्य हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Leave a comment