Shravan Somwar 2023 : आज श्रावण सोमवार, महादेवाच्या कृपेसाठी आवर्जून करा हे उपाय

Shravan Somwar 2023 : श्रावण सोमवार 2023 – या वेळी अधिक मास असल्याने श्रावण महिन्यामध्ये एकूण 8 सोमवार आले आहेत. आज 21 ऑगस्ट 2023 हा पंचांगाप्रमाणे श्रावण सोमवार आहे. यानंतर 28 ऑगस्ट रोजी पुढचा श्रावण सोमवार आहे.

श्रावणाच्या सोमवारी उपवास करून भगवान शंकराची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते, असे मानले जाते. यासोबतच विवाहायोग्य मुला-मुलींना लग्नाचे स्थळ लवकर येते. यावेळी हा श्रावण सोमवार खूप खास आहे, कारण नागपंचमीही याच दिवशी आहे.

24 वर्षांनंतर श्रावण सोमवार नागपंचमी

श्रावण सोमवार

21 ऑगस्ट 2023 रोजी, श्रावण महिन्याच्या सोमवारी, नागपंचमी देखील साजरी केली जाईल. यासोबतच या दिवशी अनेक शुभ योग आहेत. 21 ऑगस्टला शुभ योग तयार होऊन चित्रा नक्षत्रही असेल. अधिक महिन्यानंतर येणारा नागपंचमीचा सण आणि सोमवारी श्रावण. 24 वर्षांनंतर असा योग महत्वाचा मानला जातो.

या दिवशी शिवाची पूजा केल्याने तुम्हाला नागदेवतेचाही आशीर्वाद मिळेल. चला तर मग जाणून घेऊया श्रावण सोमवार मुहूर्त, भगवान शंकराची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व…

21 ऑगस्ट 2023 साठी पंचांग

श्रावण सोमवार

राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. पंचमी तिथी अर्धरात्रौ २ वाजून १ मिनिटापर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. चित्रा नक्षत्र सकाळी सूर्योदय ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ. शुभ योग रात्री १० वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ. बव करण दुपारी १ वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र सायं ५ वाजून ३० मिनिटापर्यंत कन्या राशीत राहील त्यानंतर तूळ राशीत संचार करेल.

नाग पंचमी पूजा विधि 2023 | नागपंचमीला नागदेवतेची पूजा कशी करावी ? योग्य पद्धत काय आहे ? ते जाणून घ्या

आजची तिथी – श्रावण शुक्ल पक्ष पंचमी
आजचे नक्षत्र – चित्रा
आजचा योग – शुभ
आजचा पक्ष – शुक्ल
आजचा वार – सोमवार
आजची दिशा – पूर्व

सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्त वेळा

श्रावण सोमवार

सूर्योदय – 06:17:00 AM
सूर्यास्त – संध्याकाळी 07:07:00
चंद्रोदय – ०९:५६:५९
चंद्रास्त – 21:37:00
चंद्र राशी – कन्या

हिंदू महिना आणि वर्ष

श्रावण सोमवार

शक संवत – 1945 शुभ
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 13:01:57
महिना – श्रावण महिना
महिना पौर्णिमा – श्रावण
शुभ वेळ – 11:58:03 ते 12:50:10 पर्यंत

श्रावण सोमवार व नागपंचमीला शुभ योग व पूजेचा काळ

श्रावण सोमवार

शुभ योग: 20 ऑगस्ट 2023 रात्री 09:59 ते 21 ऑगस्ट 2023 रात्री 10:21 पर्यंत
शुक्ल योग: 21 ऑगस्ट 2023 रात्री 10:21 ते 22 ऑगस्ट 2023 रात्री 10:18 वाजता
पूजा मुहूर्त: 21 ऑगस्ट 2023 06:21 ते 08:53 पर्यंत
सर्वोत्तम वेळ: 21 ऑगस्ट 2023 सकाळी 09:31 ते सकाळी 11:06 पर्यंत
प्रदोष काल मुहूर्त: 21 ऑगस्ट 2023 05:27 ते 08:27 पर्यंत

श्रावण सोमवार पूजा सामग्री

फुले, पाच फळे, पाच पाने, सुट्टे पैसे, पूजेची भांडी, दही, शुद्ध देशी तूप, मध, पवित्र पाणी, पंचामृत, नारळ, सुपारी, विडा, कापूर, हळद, पिंजर, बुक्का, अत्तर, गंध, जानवे, पाच मिठाई, बेल, धतुरा, मंदार फूल, तुलसी,गाईचे कच्चे दूध, कापूर, धूप, दिवा, कापूस, वस्त्र,चंदन, शिव आणि माता पार्वतीच्या श्रृंगाराचे साहित्य.

श्रावण सोमवारची पूजा पद्धत -Shravan Somwar 2023

श्रावण सोमवार

श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर भगवान शंकराचा जलाभिषेक करावा.
तसेच देवी पार्वती आणि नंदीला गंगाजल किंवा दूध अर्पण करा.
पंचामृताने रुद्राभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे.
शिवलिंगावर धतुरा, पांढरे वस्त्र, चंदन, तांदूळ अर्पण करा. यानंतर शिवजींसह माता पार्वती आणि गणेशजींना टिळक लावा.
भगवान शंकराला प्रसाद म्हणून तूप-साखर अर्पण करा.
शेवटी उदबत्त्या आणि दिव्याने भगवान भोलेनाथाची आरती करा आणि दिवसभर फळे खाऊन भगवान शंकराचे स्मरण करा.

या मंत्राचा जप करा

श्रावण सोमवार

भगवान शिवाचा ‘ओम नमः शिवाय’ हा मंत्र खूप चमत्कारिक मानला जातो. या मंत्राचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतो. त्यामुळे दर सोमवारी या मंत्राचा जप करावा.

ओम नमो भगवते रुद्राय नमः

भगवान शिवाच्या या मंत्राला रुद्र मंत्र म्हणतात. असे मानले जाते की या मंत्राने तुमच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर भगवान शंकरापर्यंत पोहोचतात.

श्रावण महिन्यात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारी उपवास करणे सर्वात फलदायी मानले जाते. आजच्या दिवशी विशेष योग तयार होतो. नोकरीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या इच्छित जोडीदाराशी लग्न करण्याच्या इच्छेसाठी, महिन्याच्या या सोमवारी काही खास उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतात असे जाणकारांचे मात आहे .

Disclaimer

येथे प्रदान केलेली माहिती पूर्णपणे धार्मिक विश्वासवर आधारलेली आहे आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की marathizatka.com कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही. कोणतीही माहिती किंवा विश्वास लागू करण्यापूर्वी, संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a comment