SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI : श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI – श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी – सुप्रसिद्ध असणारा श्रीवर्धन किल्ला हा राजमाची किल्ला बनवणाऱ्या मनरंजन आणि श्रीवर्धन या दोन किल्ल्यापैकी एक आहे. हे दोन बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन हा किल्ला राजमाची या गावाजवळ स्थित असून, हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगे मध्ये सुमारे ९०० मीटर इतक्या उंचीवर आहे. लोणावळा – खंडाळा मधील श्रीवर्धन राजमाची किल्ला हे एक मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू असून, वैदिक काळापासून हा किल्ला ओळखला जातो. राजमाची किल्ल्याची सविस्तर माहिती rajmachi killa chi mahiti marathiमध्ये आपण या लेखात पुढे वाचू

SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI
SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI : श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

Table of Contents

SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI : श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

किल्ल्याचे नाव श्रीवर्धन राजमाची किल्ला
केव्हा बांधला अकराव्या शतकामध्ये
कालखंड सातवाहनांचा काळ
ठिकाण कर्जत जवळ
ऊंची ९०० मीटर
वापर टेहळणी बुरुज
मुंबईपासून अंतर १८९ किलोमीटर
सद्यस्थिती पडझड झालेली

राजमाची किल्ल्याचा नकाशा

राजमाची किल्ल्याचा इतिहास

शिवकाल पूर्व इतिहास

श्रीवर्धन राजमाची किल्ला वैदिक काळापासून नावाजलेला किल्ला असून, या किल्लाचा वापर टेहाळणी बुरुज म्हणून केला जात असे. या किल्ल्याचा उल्लेख हा अकराव्या शतकामधला आहे. हा किल्ला सातवाहनाच्या काळामध्ये बांधला गेल्याचे देखील म्हटले जाते. राजमाची किल्ला हा कोंढाणा लेणी म्हणून प्रसिद्ध आहे. कारण त्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळाच्या सुरुवातीला खोदलेली असून, उत्कृष्ट दगडांमध्ये कोरलेल्या वास्तुशिल्पाचा एक सुरेख नमुना आहे.

या लेण्यांमध्ये चैत्यगृह, सात विहार यांचा समावेश आहे. राजमाचीवर श्रीवर्धन व मनरंजन हे दोन बालेकिल्ले आहेत. १६५७  नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व कल्याण दरम्यान असलेल्या बोर घाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले.

नक्की वाचा 👉 श्रीवर्धन बीच संपूर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाची किल्ला केव्हा जिंकला?

१६५७ मध्ये कल्याणवर आक्रमण झाले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील विविध प्रकारचे किल्ले, ज्यामध्ये राजमाची किल्ला, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर हे सर्व किल्ले स्वतःच्या स्वराज्यामध्ये आणले.

या सर्वांचा परिणाम असा झाला की, पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेश मराठा साम्राज्यामध्ये सामील झाला. छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत हे सर्व महाराजांनी मिळवलेले किल्ले मराठा साम्राज्यामध्ये राहिले.

Rajmachi Fort History in Marathi
श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

१७१३ मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. त्यानंतर १७३० मध्ये हा किल्ला बाजीराव पेशवे पहिले यांच्याकडे आला. इसवी सन १७७६ मध्ये सदाशिवराव भाऊंचा तोतया, कोकण प्रांत काबीज करत असताना, राजमाची किल्ल्यावर देखील त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

तोतयाचे वर्चस्व व साम्राज्य वाढत असल्यामुळे, पेशव्यांनी त्याच्यावरती आक्रमण करून राजमाची किल्ला व त्याजवळील परिसर स्वतःच्या ताब्यात घेतला. परंतु जास्त काळ हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात राहिला नाही. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात मिळवला.

राजमाची किल्ल्याची भौगोलिक रचना

  • श्रीवर्धन राजमाची हा किल्ला पायथ्यापासून ९०० मीटर उंच इतका असून, समुद्रसपाटीपासून याची उंची ही २७१० फुट आहे. लोणावळा शहरापासून जवळ असलेला, श्रीवर्धन राजमाची किल्ला, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून ट्रेकिंग साठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
  • प्राचीन काळामध्ये कल्याण-नालासोपारा ही मोठ्या प्रमाणात व्यापारी बंदरे म्हणून ओळखली जात. या बंदरांपासून दळणवळण करण्यासाठी बोरघाट मार्ग, पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन आणि व्यापारी मार्ग होता. या मार्गाचा वापर दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असे. या व्यापारी मार्गांचे नियंत्रण ठेवण्यासाठी व टेहाळणीसाठी राजमाची किल्ला महत्त्वाची कामगिरी बजावतो.
  • भौगोलिक दृष्ट्या बघायला गेले तर, राजमाची किल्ल्यावरून, पवना, मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूला पेठ, भीमाशंकर, ढाकरचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व नजारा दृष्टीमध्ये पडतो.
राजमाची किल्ल्याची भौगोलिक रचना
RAJMACHI SHRIVARDHAN FORT INFORMATION IN MARATHI : राजमाची श्रीवर्धन किल्ला माहिती मराठी

राजमाची किल्ल्याचे बांधकाम

  • राजमाची किल्ल्याच्या सीमेभोवती एक प्रचंड मजबूत भिंत असून, अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. या किल्ल्यावर बौद्ध काळातील लेणी, देखील आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर पूर्वीच्या काळी चिखलांच्या संरचनेच्या खुणा देखील आढळून आलेल्या होत्या. बारामाही पाण्याचे दोन स्त्रोत किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात.
  • श्रीवर्धन राजमाची किल्ला हा पारंपारिक बांधकाम कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या ठिकाणी असणारे मनरंजन आणि श्रीवर्धन हे बालकिल्ले, हिरवळीच्या जंगलांनी वेढले असून, या ठिकाणी एकूण १७ बुरुज आहेत. या बुरुजांचा वापर टेहाळणी बुरुज म्हणून केला जायचा.
  • किल्ल्यावर महादरवाजा आहे, ज्याला गडाचे प्रवेशद्वारही म्हणतात. या महाद्वाराची सुंदर रचना केलेली आहे. हे महाद्वार मोठ्या दगडांनी बांधलेले आहे. किल्ल्यामध्ये राजवाडा, मंदिर इत्यादी. गोष्टीचे सुरेख बांधकाम पाहायला मिळते.

राजमाची किल्ल्यामधील विशेष भुयार

राजमाची किल्ल्यावर असणारे भुयार हे एवढे मोठे आहे की, संकट काळामध्ये या ठिकाणी २००० ते ३००० पर्यंत लोक आरामात राहू शकतात . हे भुयार एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही उन्हाळा आहे. कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचते व हिवाळ्यामध्ये गवताचे प्रमाण जास्त असते .

मुख्य शहर ते राजमाची किल्ला अंतर

  • मुंबई ते राजमाची किल्ला हे अंतर साधारणतः ९९  किलोमीटर असून, प्रवासासाठी तीन तास लागू शकतात.
  • पुणे ते राजमाची किल्ला हे अंतर साधारणतः ८५ किलोमीटर असून प्रवासासाठी दोन तास लागू शकतात.

राजमाची किल्ला पाहण्यासाठी कालावधी

राजमाची किल्ला व जवळील प्रेक्षणीय स्थळे फिरण्यासाठी एक ते दोन दिवस लागू शकतात.

आमचा हा लेख देखील नक्की वाचा – किल्ले सिंहगड

SHRIVARDHAN FORT INFORMATION IN MARATHI व्हिडीओ

राजमाची किल्ल्यावरील आकर्षणे

राजमाची किल्ला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून, पर्यटकांना त्याच्या विलोभनीय परिसराने, इतिहासाने व चित्तथरारक सौंदर्याने अचंबित करून टाकतो. राजमाची किल्ल्यावरील आकर्षणे  खालील प्रमाणे –

राजमाची किल्ला

सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्ये

राजमाची किल्ल्यावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्य पहाणे ही एक वेगळीच मजा आहे. पक्षांच्या किलबिलाटाने होणारा सूर्योदय व विहंगम दृश्याचे दर्शन घडवून आणणारा सूर्यास्त हे राजमाची किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.

भैरवनाथ मंदिर

राजमाची किल्ला हा प्रशस्त असून, किल्ल्याच्या मैदानावर भैरवनाथ मंदिर वसलेले आहे. हे मंदिर अतिशय प्रसिद्ध व सुंदर असून, भगवान शिवशंभू यांना समर्पित आहे. या मंदिराची रचना मराठ्यांच्या काळात झाली आहे, असे समजले जाते.

श्रीवर्धन मधील धबधबे

राजमाची किल्ल्याजवळ अनेक धबधबे असून, पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतात. या धबधब्यांपैकी कोंडेश्वर हा एक प्रसिद्ध धबधबा असून, राजमाची किल्ल्यापासून साधारणतः चार किलोमीटर अंतरावर आहे.

श्रीवर्धन मधील वन्यजीवन

माकडे, कटिंदर, कोल्हे व इतर पक्षांच्या प्रजाती, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे वन्यजीव राजमाची किल्ल्यावर मनसोक्त भटकंती करतात. राजमाची किल्ल्याला या वन्यजीवांनी आपले घरच मानले आहे, असे काही भासते. त्यामुळे किल्ल्यावर तुम्ही विविध प्रकारच्या पक्षांना व वन्यजीवांना न्याहाळू शकता.

उदयसागर तलाव

उदयसागर तलाव राजमाची किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. पावसाळ्याच्या काळात हा तलाव ओसंडून वाहतो. त्यावेळी हिरवीगार वनश्री, अगणित धबधबे यामुळे संपूर्ण राजमाची किल्ला विहंगम दृश्यांनी बहरून जातो.

मनरंजन किल्ला

श्रीवर्धनपेक्षा उंचीने लहान असणाऱ्या, दोन बालेकिल्ल्यांपैकी मनरंजन या किल्ल्याची वाट सोपी असून, साधारणतः अर्धा ते एक तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचतो. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी असून कर्नाळा, प्रबळगड, इर्षाळगड, नागफणीचे टोक यांसारखी विविध प्रेक्षणीय स्थळे मनरंजन किल्ल्यावरून दिसतात.

श्रीवर्धन किल्ला

दोन बालेकिल्लांपैकी सर्वात उंच असणारा बालेकिल्ला म्हणजेच श्रीवर्धन किल्ला आहे. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे हे त्या ठिकाणील अवशेषावरून जाणवते. या दरवाजाची कमानी बऱ्यापैकी शाबूत असून दरवाजाच्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर दारूगोळ्याचे कोठार असून पाण्याच्या दोन टाक्या तसेच एक गुहा देखील आहे.

शंकराचे मंदिर

तलावाच्या पश्चिम बाजूला असणारे, कळशीदार शंकराचे मंदिर अतिशय सुंदर व देखणे आहे. मंदिरासमोर गोमुखी असून त्यामधील पाणी समोरच्या टाक्यांमध्ये पडते.

SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI
SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI : श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

श्रीवर्धन किल्ला माहिती मराठी ट्रेक

राजमाची किल्ला एक प्रसिद्ध निसर्ग प्रेमींसाठी व ट्रेकिंग प्रेमींसाठी उत्तम ठिकाण असून, सहसी पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करून घेतो. गडाच्या माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आठ मैलाचा प्रवास पूर्ण करावा लागतो. यासाठी साधारणतः दोन ते तीन तास आवश्यक आहेत. विविध वयांचे लोक हा गड सोप्यारीतीने ट्रेक करू शकतात. अगदी नवशिक्षित सुद्धा हा ट्रेक सोप्या रीतीने चढू शकतात.

राजमाची किल्ला ट्रेक हा कर्जत व लोणावळा या दोन लोकप्रिय हिल स्टेशनच्या मध्यभागी असून, ट्रेकसाठी लोणावळा किंवा कर्जत वरून तुम्ही ट्रेकिंग सुरू करू शकता. मनरंजन किल्ला हा २५१० फुटावर असून हा किल्ला पश्चिममुखी किल्ला आहे. तर श्रीवर्धन किल्ला हा २७१० फूट असून, हा पूर्वमुखी किल्ला आहे.

राजमाची गडावर जाण्याच्या वाटा

लोणावळ्या वरून तुंगाली मार्गे – लोणावळा – तुंगाली मार्गे राजमाची गावात जाता येते. ही वाट साधारणतः १९ किलोमीटर अंतराची आहे. या मार्गे किल्ल्यावर चढण्यास चार ते पाच तास लागतात.

कर्जत वरून कोंदिवडे मार्ग – कर्जत वरून कोंदिवडे या गावात बसने जाता येते. या मार्गे गडावर जाण्यासाठी तीन ते चार तास लागू शकतात.

ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी

  • अति पावसाळ्याच्या काळात ट्रेकिंग करण्यास जाऊ नये. हवामानाचा अंदाज घेतच ट्रेकिंग करावी.
  • योग्य त्या बुटांचा वापर करावा, चप्पल घालू नये.
  • मित्रपरिवारांसोबत किंवा कुटुंबासमवेत ट्रेकिंग करावी. एकट्याने ट्रेकिंग करू नये.
  • आपण ज्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जात आहोत, त्या ठिकाणचा नकाशा आपल्या सोबत ठेवावा.
  • पर्यावरणाला हानी होणार नाही, याची दक्षता घेऊन ट्रेकिंग करावी.

ट्रेकिंग करताना सोबत घ्यावयाच्या वस्तू

  • उत्तम ट्रेकिंग पोल सोबत ठेवावे.
  • ट्रेकिंग करण्यासाठी आवश्यक कालावधी दोन ते तीन तास असू शकतो. यामुळे स्वतःसोबत मुबलक पाण्याचा साठा ठेवावा.
  • ड्रायफ्रूट सोबत ठेवावे. जेणेकरून भूक लागल्यास तुम्ही ते खाऊ शकता.
  • एनर्जी ड्रिंक सोबत ठेवावी.
  • ज्यादा बुटांचे जोड सोबत ठेवावे.
  • स्वतःच्या ओळखीचा पुरावा सोबत ठेवावा.
  • शिट्टी सोबत ठेवावी. जेणेकरून ट्रेकिंग करताना हरवल्यास, इतर साथीदारांना बोलवण्यासाठी त्याची मदत होईल.
 श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी
SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI : श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

श्रीवर्धन राजमाची किल्ला पर्यटकांसाठी वर्षभर चालू असतो. परंतु या किल्ल्याच्या निसर्गरम्य, अलौकिक दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ सर्वोत्तम आहे. या काळामध्ये राजमाची किल्ला हा संपूर्ण हिरवाईने नटलेला असून, वातावरणामध्ये एक वेगळी शांतता असते. त्यामुळे पर्यटक राजमाची किल्ला अगदी जवळून व मनसोक्त बघण्याचा आनंद घेऊ शकतात.

राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी महत्वाची टिप्स

  • हा किल्ला सकाळी ६.00 ते संध्याकाळी ६.३० पर्यंत खुला असतो.
  • श्रीवर्धन राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.
  • किल्ल्याचे ट्रेकिंग हे सोपे आहे.
  • किल्ल्याला वर्षभरामध्ये कोणत्याही काळात तुम्ही भेट देऊ शकता. परंतु नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्याने  निसर्गाने नटून गेलेला श्रीवर्धन राजमाची किल्ला पाहू शकता.

राजमाची किल्ल्याला कसे भेट द्याल ?

रस्ते मार्ग

मुख्य शहरांना श्रीवर्धन राजमाची किल्ला शहरांना चांगल्या प्रकारे कनेक्टेड असून, तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने किंवा स्वतःच्या गाडीने किल्ल्याला भेट देऊ शकता.

रेल्वे मार्ग

श्रीवर्धन राजमाची मध्ये कोणतेही रेल्वे स्थानक नाही. परंतु माणगाव हे श्रीवर्धन राजमाची किल्ल्याजवळील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे साधारणतः ४५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बस किंवा टॅक्सीच्या पर्यायाने माणगाव ते श्रीवर्धन पर्यंत प्रवास करू शकता.

हवाई मार्ग

पुण्यावरून येण्यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचप्रमाणे मुंबईवरून येण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहे.

राजमाची किल्ल्याजवळील हवामान

  • या ठिकाणी वार्षिक सरासरी तापमान १९ ते ३३ अंश सेल्सिअस इतके असते. एप्रिल ते मे अर्थात उन्हाळ्याच्या काळात या ठिकाणी तापमान उष्ण असून ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
  • हिवाळ्यामध्ये या ठिकाणी थंडीचे प्रमाण जास्त असून, रात्री तापमान १० अंश सेल्सिअस कमी असून, दिवसाचे तापमान २६ अंश सेल्सियस असते.
श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी
SHRIVARDHAN RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI : श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी

श्रीवर्धन राजमाची किल्ल्या जवळची प्रेक्षणीय स्थळे

राजमाची किल्ल्या जवळ राहण्याची सोय

श्रीवर्धनमध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार उत्तम राहण्याची सोय केली जाते. त्याचबरोबर तुम्ही श्रीवर्धनला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे तुम्ही विविध सीफूडचा आनंद घेऊ शकता. राजमाची किल्ल्याजवळ उधेवाडी गावात राहण्याची उत्तम सोय केली जाते. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या संस्थेने बांधलेल्या रूम्समध्ये देखील राहण्याची उत्तम सुविधा आहे. त्याचप्रमाणे तुमची जेवणाची देखील उत्तम सोय केली जाते.

  • हॉटेल श्रीवर्धन
  • हॉटेल अतुल
  • पारसी धाबा
  • क्रीम डेला
  • निसर्ग गार्डन फॅमिली रेस्टॉरंट

FAQ

राजमाची ट्रेक अवघड आहे का?

राजमाची ट्रेक ट्रेकिंग साठी सोपा आहे. नवशिक्षित देखील सुद्धा अगदी सोप्या रीतीने हा ट्रेक पूर्ण करू शकतात. कोणत्याही वयोगटासाठी हा ट्रेक तितकासा अवघड नाही.

राजमाची किल्ला चढायला किती वेळ लागतो?

राजमाची किल्ला अतिशय सुंदर, वैभवशाली, हिरवाईने नटलेला असून मनरंजन व श्रीवर्धन हे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले आहेत. राजमाची किल्ला चढण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तास लागू शकतात.

राजमाची पॉईंटवरून आपल्याला काय दिसते?

राजमाची पॉईंट वरून आपल्याला राजमाची किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर, धबधबे, दऱ्या व पवना, मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूला पेठ, भीमाशंकर, ढाकरचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व नजारा दृष्टीमध्ये पडतो.

पुणे ते राजमाची किल्ला अंतर किती ? व त्यासाठी लागणारा कालावधी किती ?

पुणे ते राजमाची किल्ला हे अंतर साधारणतः ८५ किलोमीटर असून प्रवासासाठी साधारणतः दोन तास लागू शकतात.

राजमाची किल्ला पाहण्याची वेळ काय आहे ?

राजमाची किल्ला पर्यटनासाठी सकाळी ६.00 ते संध्याकाळी ६.३० पर्यंत खुला असतो.

निष्कर्ष

मित्रहो, या SHRIVARDHAN FORT INFORMATION IN MARATHI लेखातून आम्ही राजमाची किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती मराठी लेख तुम्ही नक्की वाचा व कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. राजमाची किल्ला माहिती मराठी लेख आवडल्यास नक्की शेयर करा.

धन्यवाद .

Leave a comment