स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती मराठी : Swami Vivekanand Information In Marathi

Swami Vivekanand Information In Marathi | स्वामी विवेकानंद माहिती मराठी – आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्या महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार आपल्याला खूप काही शिकवतात. त्यांचे विचार सामान्य व्यक्तीलाही ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करणारे आहेत. महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शन करत असतात. यापैकी एक महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद एक तरुण तपस्वी म्हणून प्रसिद्ध आहेत.

परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारे, स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे प्रचंड विद्वान होते. स्वामी विवेकानंदांनी “योग, राजयोग आणि ज्ञानयोग” असे ग्रंथ तयार करून, तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे. ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची गाथा सांगते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची गाथा दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचवा.

Table of Contents

स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी : Swami Vivekanand Information In Marathi

मूळ नाव नरेंद्र दास दत्त
ओळख स्वामी विवेकानंद
वडील विश्वनाथ दत्त
आई भुवनेश्वरी देवी
जन्म १२ जानेवारी १८६३
जन्मस्थळ कलकत्ता
प्रसिद्धी आध्यामिक गुरु
कार्य हिंदू तत्त्वज्ञानाच्या तत्त्वांचा युनायटेड स्टेट्स, इंग्लंड आणि युरोपमध्ये प्रसार
गुरु रामकृष्ण परमहंस
मृत्यू ४ जुलै १९०२

स्वामी विवेकानंद यांचा संक्षिप्त जीवनपट

स्वामी अशा विचारसरणीच्या व्यक्तिमत्व होते, ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक, ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धत शिकवली. ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. ध्येय साध्य होईपर्यंत, आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्वामी विवेकानंदांचे मत होते. तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते.

जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तरी यश निश्चितच प्राप्त होते. एवढेच नाही तर, विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या अध्यात्मिक विचारांनी सुद्धा प्रेरित केले. त्यातील एक विचार खालील प्रमाणे आहेत – “उठो, जागो और तब तक नही रुको, जब तक लक्ष प्राप्त हो.” १८८४ चे वर्ष स्वामी विवेकानंदांसाठी फारच वाईट वर्षे होते. यावर्षी त्यांनी आपल्या वडिलांना गमावले. वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांच्यावर त्यांच्या नउ भावंडांची जबाबदारी आली. पण ते घाबरून न जाता, त्यांनीही जबाबदारी खूप चांगल्या रीतीने पार पाडली.

स्वामी विवेकानंद यांचा संक्षिप्त जीवनपट

स्वामी विवेकानंद यांचे बालपण

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ साली कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त. आईचे नाव भुवनेश्वर देवी. स्वामी विवेकानंद यांना प्रेमाने नरेंद्र म्हणून म्हटले जात असे. स्वामी विवेकानंद यांच्या वडिल त्यावेळी कोलकत्ता उच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित व यशस्वी वकील होते. त्यांची इंग्रजी व फारशी भाषेवर प्रभुत्व होते आणि ते उत्तम इंग्रजी आणि पार्शियन बोलत असत.

आई भुवनेश्वर देवी धार्मिक विचारांची स्त्री होती. ती रामायण आणि महाभारत अशा धार्मिक ग्रंथांचेही उत्तम ज्ञान असलेली, अतिशय प्रतिभावान अशी महिला होती. त्यांना इंग्रजी भाषेची चांगली जाण होती. स्वामी विवेकानंदांच्या आई आणि वडिलांचा चांगल्या मूल्यामुळे आणि त्यांच्या पालनपोषणामुळे स्वामीजींच्या जीवनाला चांगला आकार मिळाला आणि ते उच्च गुणवत्तेचे धनी झाले. त्यांच्या गुरूंचे नाव रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद यांनी १८८४ मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण केलेली होती आणि “रामकृष्ण मठ” आणि “रामकृष्ण मिशन” यांचे ते संस्थापक होते.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण

१८७१ मध्ये नरेंद्रनाथ यांचे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रो पॉलिटन संस्थेमध्ये ऍडमिशन करण्यात आले. १८७७ मध्ये जेव्हा मुलगा नरेंद्र तिसऱ्या वर्गात होता, तेव्हाच त्याच्या कुटुंबाला काही कारणास्तव अचानक रायपूरला जावं लागलं. त्यामुळे त्यांचा अभ्यास खंडित झाला होता.

१८७९ मध्ये त्यांचे कुटुंब कलकत्त्यात परतल्यानंतर, प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक घेणारे नरेंद्रनाथ पहिले विद्यार्थी ठरले. ते तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक, विज्ञान, कला, आणि साहित्य अशा विविध विषयाचे वाचन करत असत. वेद, उपनिषद, भगवत, गीता, रामायण, महाभारत, आणि पुराण अशा हिंदू धर्मग्रंथांमध्ये त्यांना खूप रस होता.

नरेंद्र भारतीय पारंपारिक संगीतात पारंगत होते. आणि शारीरिक, योग, क्रीडा, आणि सर्व कामांमध्ये ते नेहमीच सहभाग घेत होते. १८८१ मध्ये त्यांनी ललित कला परीक्षा उत्तीर्ण केली. तर १८८४ मध्ये त्यांनी कला विषयाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १८८४ मध्ये बीएची परीक्षा चांगल्या पात्रतेसह उत्तीर्ण केली. आणि त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास देखील केला.

हे पण वाचा 👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान

विवेकानंद यांनी जनरल असेंबली संस्थेत युरोपियन इतिहासाचा अभ्यास सुद्धा केला होता. स्वामी नरेंद्र यांना बंगाली भाषेची चांगली जाण होती. त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचे बंगाली भाषेमध्ये भाषांतर केले. विवेकानंद यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सरच्या पुस्तकाचा खूप प्रभाव होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असताना, त्यांनी संस्कृत ग्रंथ आणि बंगाली साहित्यही वाचले. लहानपणापासूनच विवेकानंदांच्या प्रतिभेची चर्चा होती. लहानपणापासूनच त्यांचे गुरुजी त्यांचे कौतुक करत, म्हणूनच त्यांना “श्रुतीधारा” असेही म्हणतात.

आपल्या विद्यार्थी जीवनात बालक नरेंद्र यांच्यावर  डेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट,हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्वि यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांनी त्यांच्या विचारांवर खोलवर अभ्यास केला. याच काळात विवेकानंदजी ब्रह्मो समाजाकडे झुकले. सत्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे ते ब्रह्मो समाजाचे नेते महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्याही संपर्कात आले.

स्वामी विवेकानंद कथा – स्वामी विवेकानंद गोष्टी मराठी

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस

एकदा महर्षी देवेंद्रनाथ यांना विवेकानंदानी विचारले की, तुम्ही भगवान पाहिले आहेत का ? बालक नरेंद्र यांच्या या प्रश्नाने महर्ष आश्चर्यचकित झाले, नरेंद्रांची उत्सुकता शांत करण्यासाठी, त्यांनी त्यांना  रामकृष्ण परमहंसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांना आपले गुरु स्वीकारले. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहिले.

१८८५ मध्ये रामकृष्ण परमहंस कर्करोग यांनी ग्रस्त होते. तेव्हा विवेकानंदजींनी आपल्या गुरूंची खूप सेवा केली, अशा प्रकारे गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंध अधिक दृढ झाला. यानंतर रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. यानंतर नरेंद्र यांनी रामकृष्ण संघ स्थापन केला. तथापि नंतर त्याचे नाव रामकृष्ण मठ असे ठेवले गेले. रामकृष्ण मठ स्थापनेनंतर, नरेंद्रनाथांनी ब्रह्मचर्य व संन्यास घेण्याचे व्रत घेतले. आणि ते स्वामी विवेकानंद झाले.

स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक कार्य

स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जी आजही भारतात यशस्वीरित्या चालू आहे. शिकागो वर्ड रिलीजन कॉन्फरन्स मध्ये हिंदू धर्माच्या परिचय करून देताना त्यांनी उच्चारलेले म्हटले “माझे बंधू आणि भगिनीनो” हे शब्द आजही प्रसिद्ध आहेत.

विवेकानंदाना तरुणपणापासूनच अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये रस होता. ते शिव, राम आणि सीतेसारख्या देवांच्या चित्रासमोर ध्यान करीत असत. संत आणि तपस्वी यांचे बोलणे नेहमीच त्यांना प्रेरणा देत असे. आणि हेच नरेंद्रनाथ पुढे जाऊन जगभरातील ध्यान अध्यात्म, राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि संस्कृतीचे वाहक बनले आणि स्वामी विवेकानंद नावाने प्रसिद्ध झाले.

स्वामी विवेकानंद यांचे भारतभ्रमण

वयाच्या पंचविसाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भगवे वस्त्र परिधान केले आणि त्यानंतर ते संपूर्ण भारतभ्रमणासाठी निघाले. त्यांच्या पायी यात्रेदरम्यान त्यांनी आयोध्या, वाराणसी, आग्रा, वृंदावन, अलवर यासह अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या प्रवासादरम्यान ते राजांच्या राजवाड्यात आणि गरीब लोकांच्या झोपडीतही राहिले. त्यांच्या यात्रेदरम्यान त्यांनी विविध क्षेत्र आणि तेथील लोक याबद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांना जातीभेद यासारख्या प्रथे बद्दल माहिती मिळाली त्यांनी पुढे अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न केला.

२३ डिसेंबर १८९२ साली विवेकानंद कन्याकुमारीला पोहोचले. आणि तेथे ते तीन दिवस गंभीर समाधीत राहिले, तिथून परत आल्यावर त्यांनी राजस्थानमधील अब्रोड येथे आपले गुरु भाई स्वामी ब्रह्मानंद आणि स्वामी दुरियानंद यांची भेट घेतली. ज्यामुळे त्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान अनुभवलेले दारिद्र्य आणि दुःख यांची त्यांना माहिती दिली. त्यानंतर या सर्वांपासून मुक्तीसाठी त्यांनी अमेरिकेत जाण्याचे ठरवले.

स्वामी विवेकानंद

शिकागो येथील सर्वधर्म परिषद आणि जगभरात धर्मप्रसार

विवेकानंदांच्या अमेरिका भेटीनंतर त्यांचा भारताविषयी विचारांमध्ये एक मोठा बदल घडला. १८९३ मध्ये विवेकानंद शिकागो येथे दाखल झाले आणि तेथे त्यांनी जागतिक धर्म परिषद सहभाग घेतला. यावेळी अनेक धर्मगुरूंनी त्यांची पुस्तके ठेवली होती. तर भारताच्या धर्माचे वर्णन करण्यासाठी श्रीमद्भगवद्गीता ठेवली होती. ज्यांची खूप थट्टा केली गेली. परंतु जेव्हा विवेकानंदांनी अध्यात्म आणि ज्ञानाने आपले भाषण सुरू केले, तेव्हा सर्व सभागृहाने त्यांचे कौतुक केले, तसेच जगात शांततेने जगण्याचा संदेशही होता.

भाषणात स्वामीजींनी कट्टरतावाद आणि जातीयवादावर हल्ला केला. यावेळी त्यांनी भारताची एक नवीन प्रतिमा पूर्ण जगाला प्रदान केली. नंतर पुढील तीन वर्ष विवेकानंद यांनी अमेरिकेत वेदांच्या प्रचार आणि प्रसाराचे काम केले. अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन ‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले. ‘न्यू यॉर्क क्रिटिक’ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की “ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत.”

१८९४ मध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली. १८९५ मध्ये त्यांच्या व्यस्ततेचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी व्याख्यान देण्याऐवजी योगासंदर्भातील वर्ग घेण्याचे ठरवले. त्याचवेळी भगिनी निवेदिता ही त्यांच्या संपर्कात आली आणि ती त्यांची शिष्य झाली. १८९६ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मॅक्समुलरची भेट घेतली. त्यांनी स्वामीजींचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र लिहिले होते.

त्यानंतर स्वामी विवेकानंद १५ जानेवारी १८९७ रोजी अमेरिकेतून श्रीलंकेत दाखल झाले. तेथे त्यांचे खूप चांगले स्वागत झाले. आणि यावेळी ते खूप लोकप्रिय झाले होते. लोक त्यांच्या प्रतिभेमुळे प्रेरित होत. त्यानंतर स्वामी रामेश्वरम येथे पोहोचले आणि त्यानंतर ते कोलकत्ता येथे गेले. येथे त्यांना ऐकण्यासाठी दूर दूर मोठ्या संख्येने लोक येत असत.

विवेकानंद नेहमीच आपल्या भाषणामध्ये विकासाचा उल्लेख करत. १ मे १८९७ रोजी स्वामी विवेकानंद कोलकत्ता येथे परतले आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचे मुख्य उद्दिष्ट रुग्णालय, शाळा, महाविद्यालय आणि नवीन भारत घडवण्यासाठी स्वच्छता क्षेत्रात प्रवेश करणे हे होते. साहित्य, तत्त्वज्ञान, आणि इतिहासाच्या अभ्यासक असलेल्या विवेकानंद यांच्या प्रतिभेमुळे लोक प्रेरित होत आणि आता ते तरुणांसाठी एक आदर्श बनले होते.

आमचे हे लेख सुद्धा वाचा

स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार

 1. शिक्षण हे माणसामध्ये आधीपासूनच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे.
 2. सर्व शक्ती तुमच्यात आहे; आपण काहीही आणि सर्वकाही करू शकता.
 3. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.
 4. जीवनाचे रहस्य आनंद नाही तर अनुभवातून मिळालेले शिक्षण आहे.
 5. तुम्हीच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात.
 6. संपूर्ण जीवन शिक्षणाचा एकच उद्देश आहे.
 7. आपण पुस्तके वाचू शकतो, व्याख्याने ऐकू शकतो आणि मैलभर बोलतो, परंतु अनुभव हा एक शिक्षक, एकच डोळे उघडणारा आहे. ते जसे आहे तसे सर्वोत्तम आहे. आपण शिकतो, हसून आणि अश्रूंमधून आपण शिकतो.
 8. सध्याची शिक्षणपद्धती चुकीची आहे. विचार कसा करायचा हे कळण्याआधीच मन वस्तुस्थितींनी भरलेले असते.
 9. आमच्या लोकांना शिक्षित करा, जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवू शकतील. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत या सर्व आदर्श सुधारणा केवळ आदर्शच राहतील
 10. आपल्याला हवे असलेले सर्वांगीण मानवनिर्मितीचे शिक्षण आहे.
 11. पुस्तके अगणित आहेत आणि वेळ कमी आहे; म्हणून जे आवश्यक आहे ते घेणे हे ज्ञानाचे रहस्य आहे. ते घ्या आणि ते जगण्याचा प्रयत्न करा.
 12. मनाची एकाग्रता हे शिक्षणाचे मूलतत्त्व आहे.
 13. पूर्ण संयम महान बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्ती देते.
 14. कोणीही खरोखर दुसऱ्याने शिकवले नाही; आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला शिकवले पाहिजे. बाह्य शिक्षक केवळ सूचना देतात जे अंतर्गत शिक्षकांना गोष्टी समजून घेण्यासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करतात.
 15. शिक्षण म्हणजे काय? हे पुस्तकी शिक्षण आहे का? नाही. हे वैविध्यपूर्ण ज्ञान आहे का? तेही नाही. ज्या प्रशिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती नियंत्रणात आणली जाते आणि फलदायी बनते त्याला शिक्षण म्हणतात.

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू

१९९३ मध्ये स्वामीजींनी बेलूर मठची स्थापना केली. त्यांनी भारतीय जीवनाच्या तत्त्वज्ञानाला एक नवीन परिमाण दिले. याशिवाय स्वामी विवेकानंद आणि आणखीन दोन मठाची स्थापना केली. स्वामी विवेकानंद दुसऱ्या प्रदेश दौऱ्यावर २० जून १८९९ रोजी अमेरिकेला रवाना झाले. या प्रवासात त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये शांती आश्रम आणि स्कूल आणि न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली. जुलै १९०० मध्ये स्वामीजी पॅरिसला गेले आणि तेथे त्यांनी काँग्रेस अध्यक्ष रिलीजन्स मध्ये प्रवेश केला. पॅरिस मध्ये तीन महिन्याच्या मुक्कामा दरम्यान त्यांच्या शिष्य भगिनी निवेदिता आणि स्वामी तारी आनंद यांच्यासोबत ते होते. त्यानंतर १९७४ ते भारतात परतले आणि यानंतरही त्यांचा प्रवास सुरूच होता.

१९०१ मध्ये त्यांनी बुद्धगयाची यात्रा केली. यावेळी त्यांची तब्येत सातत्याने खालावत होती. त्यांना दमा आणि मधुमेह सारख्या आजारांनी ग्रासले होते. विवेकानंद यांचे वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी ०४ जुलै १९९२ रोजी निधन झाले. चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ जगणार नाही अश्या भविष्यवाणीला त्यांनी खरे केले. अशा या महान माणसाचा अंत्यसंस्कार गंगा, नदीच्या काठावर करण्यात आला.

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे योगदान – धार्मिक वास्तू आणि आश्रम

स्वामी विवेकानंदानी न्यूयॉर्कमधील कॅलिफोर्नियातील “शांती आश्रम” आणि भारतातील “अद्वित्त आश्रम” यांची स्थापना केली. विवेकानंद एक महान व्यक्ती होते. ज्यांचे उच्च विचार, आध्यात्मिक ज्ञान, सांस्कृतिक अनुभवाचा, प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो. विवेकानंदानी प्रत्येकावर एक अनोखी छाप पाडलेली आहे. त्यांचे जीवन प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा भरते. आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. ते वेदांचे पूर्ण ज्ञान असणारे, एक अलौकिक प्रतिभावान व्यक्ती होते. विवेकानंद हे दूरदृष्टी विचारसरणीचे, मनुष्य होते. त्यांनी केवळ भारताच्या विकासासाठीच कार्य केले नाही तर, लोकांना जगण्याची कला देखील शिकवली.

स्वामी विवेकानंद आयुष्य सार

विवेकानंद एक दयाळू व्यक्ती होते. जे केवळ मानवावरच नव्हे, तर प्राणीमात्रावर सुद्धा प्रेम करायचे. त्यांनी नेहमीच प्रेम शिकवले. आणि त्यांचा  असा विश्वास होता की, प्रेम, बंधुता, याने जीवन सहजतेने पूर्ण केले जाऊ शकते, आणि जीवनातील प्रत्येक संघर्षाला सहजपणे आपण सामोरे जाऊ शकतो. ते खूप स्वाभिमानी व्यक्ती होते.

त्यांचा असा विश्वास होता की, “जबतक स्वयंपर विश्वास नही करते, आपपर भगवान विश्वास नही कर सकते.” स्वामी विवेकानंदांच्या अनमोल विचारांनी त्यांना एक महान मनुष्य बनवले. त्यांच्या अध्यात्मिक ज्ञान, धर्म, ऊर्जा, समाज, संस्कृती, देशप्रेम, परोपकार, पुण्य, स्वाभिमानाचे समन्वय खूप मजबूत होते. अशा गुणांचे धनी असलेले व्यक्ती क्वचितच पाहायला मिळतात.

स्वामी विवेकानंद विचार मराठी

 • ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा करता, त्याचवेळी ते काम पूर्ण केले पाहिजे. नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होतो.
 • अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिकत रहा. धैर्य, दृढता, आणि पवित्रता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
 • दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्ती सोबत बैठक गमवाल.
 • शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे, असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे.
 • जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही.
 • असं कधीच म्हणू नका की, मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
 • स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा, लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचे गुणगान करतील.
 • जी लोकं नशिबावर विश्वास ठेवतात, ती लोक भित्री असतात. जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
 • महान कार्यासाठी नेहमी महान त्याग करावा लागतो. सत्यासाठी काहीही सोडून द्यावं, पण कोणासाठी ही सत्य सोडू नये.
 • उठा, जागे व्हा, आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका. संघर्ष करणे जितके कठीण असेल, तितकेच तुमच्या यश शानदार असेल.
 • स्वतःला कमजोर समजले हे सर्वात मोठे पाप आहे. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. यशाचा हाच मार्ग आहे.
 • जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल, आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता, तेव्हा सगळे सोपे वाटते. पण जेव्हा तुम्ही आळशी असतात, तेव्हा काही सोपे वाटत नाही.
 • मोठ्या योजनांना पूर्ण करण्यासाठी, कधीच मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.
 • ज्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीही समस्या नसेल, तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.
 • एका वेळेस एकच काम करा, ते करताना त्यामध्ये पूर्ण आत्मा टाका आणि बाकी सर्व विसरून जा.
 • जसा तुम्ही विचार करता, तुम्ही तसेच बनता. स्वतःला कमजोर म्हणाल, तर कमजोर बनाल आणि स्वतःला सक्षम म्हणाल तर सक्षम बनाल.
 • कोणाचीही निंदा करू नका, जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल, तर नक्की करा जर ते शक्य नसेल, तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद घ्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
 • जर धन, पैसा व दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल, तर त्याचे मूल्य आहे. नाहीतर ते फक्त निरुपयोगी आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल, तितके चांगले आहे. हजार वेळा कळा लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होते. जो अग्नी आपल्याला उब देतो, उष्णता देतो, तो कधीही आपल्याला नष्ट ही करू शकतो. पण हा त्या अग्नीचा दोष नाही, तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचा चांगलं कराल, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि त्या शुद्ध मनात ईश्वर राहील.
स्वामी विवेकानंद

मराठी सुविचार स्वामी विवेकानंद

 • जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते, ती महानात्मक असते. तसं नसेल तर ती दुरात्मक आहे. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात, तुमची निंदा करतात, तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या असा विचार करा. की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढून, तुमची मदत करत आहेत.
 • मन आणि मेंदूच्या युद्धात नेहमी मनाच्या एका स्वतंत्र होण्याचे धाडस करा, जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत, तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा. आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचे धाडस करा.
 • ब्रम्हांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे.
 • चिंतन करा. चिंता नाही. नव्या विचारांना जन्म द्या. मनुष्य सेवा हीच खरी देवाची सेवा आहे. धन्य आहे ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी, आपला आयुष्य खर्च करतात.
 • जर तुम्ही मला पसंत करत असाल, तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
 • स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो. ना कोणत्याही अध्यात्म तुम्हाला घडू शकतो. कोणीही दुसऱ्या शिक्षक नाही, उलट तुमचा आत्मा तुमचा शिक्षक आहे.
 • जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यांना पाहू शकत नाही, तर आपण त्याला कोठे शोधू शकत नाही. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील. आणि सोबतच आदर्शाला जितका शक्य आहे तितका सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही, जी व्यक्ती सत्य कर्म करते, ती धार्मिक असते. आपण तेच आहोत, जे आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे. त्यामुळे तुम्ही काय विचार करता त्याची काळजी घ्या. शब्द राहत नाहीत, विचार राहतात.

राष्ट्रीय युवक दिवस / स्वामी विवेकानंद जयंती

स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसाच्या म्हणजेच १२ जानेवारी या दिवशी भारतामध्ये “राष्ट्रीय युवक दिवस” साजरा केला जातो. तसेच संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले होते. त्यानुसार या गोष्टीचे महत्त्व जाणून घेऊन, भारत सरकारने सुद्धा १९८४ पासून १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणून, स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद हे सर्व युवकांना प्रेरित करत असत. भारतातील युवाशक्ती धर्म देश अध्यात्म व अशा उद्दात्त दिशेने प्रवाहित होण्यासाठी, स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येतो.

प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके

विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-

 • अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)
 • मानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)
 • राष्टद्रष्टे विवेकानंंद : (वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)
 • शोध स्वामी विवेकानंदांचा (दत्तप्रसाद दाभोळकर)
 • संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक – चंद्रकांत खोत))
 • स्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)
 • स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)
 • स्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)
 • युगनायक ( स्वर्णलता भिशीकर, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग )

आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती

 • १.कर्मयोग—कर्मयोग पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य  दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
 • २.भक्तियोग— भक्तियोग सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
 • ३.राजयोग—राजयोग मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.
 • ४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.

FAQ

१. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे?

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र दास दत्त असे आहे. विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला.

२. स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते?

एकदा महर्षी देवेंद्रनाथ यांना विवेकानंदानी विचारले की, तुम्ही भगवान पाहिले आहेत का ? बालक नरेंद्र यांच्या या प्रश्नाने महर्ष आश्चर्यचकित झाले, नरेंद्रांची उत्सुकता शांत करण्यासाठी, त्यांनी त्यांना  रामकृष्ण परमहंसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांना आपले गुरु स्वीकारले.

३. रामकृष्ण परमहंस यांचे प्रसिद्ध शिष्य कोण होते?

१८८५ मध्ये रामकृष्ण परमहंस कर्करोग यांनी ग्रस्त होते. तेव्हा विवेकानंदजींनी आपल्या गुरूंची खूप सेवा केली, अशा प्रकारे गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंध अधिक दृढ झाला. यानंतर रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. यानंतर नरेंद्र यांनी वराहा नगरात रामकृष्ण संघ स्थापन केला.

४. लहानपणी विवेकानंदांचा स्वभाव कसा होता?

स्वामी विवेकानंद एक दयाळू व्यक्ती होते. जे केवळ मानवावरच नव्हे, तर प्राणीमात्रावर सुद्धा प्रेम करायचे. त्यांनी नेहमीच प्रेम शिकवले. आणि त्यांचा  असा विश्वास होता की, प्रेम, बंधुता, याने जीवन सहजतेने पूर्ण केले जाऊ शकते, आणि जीवनातील प्रत्येक संघर्षाला सहजपणे आपण सामोरे जाऊ शकतो.

स्वामी विवेकानंद माहिती मराठी निष्कर्ष

मित्रहो,आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती दिली आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवा व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवरांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment