TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे 

TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 अप्रतीम पर्यटन स्थळे – सिंधुदुर्ग जिल्हा कोकणचा एक महत्त्वपूर्ण भाग समजला जातो. या सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छ समुद्रकिनारे, नयनरम्य प्राचीन मंदिरे व निसर्ग संपन्न पर्यटन स्थळे यामुळे ओळखले जाते. मंडळी कोकण म्हणजे देवभूमी. कोकण म्हणजे निसर्गाचे सर्वांग सुंदर रूप. कोकणातल्या कोणत्याही भागाला आपण भेट दिली तरी प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काही ना काही पाहायला आणि अनुभवायला मिळते.

TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI

Table of Contents

TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 अप्रतीम पर्यटन स्थळे 

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे, निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण. पूर्वेला उत्तुंग सह्याद्री घाट आणि पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र. . तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाने जरा जास्तच प्रेम बहाल केलं. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाच्या बाबतीत अगदी संपन्न आहे. ऐतिहासिक किल्ल्यांपासून, अफाट समुद्रांपर्यंत यांनी निसर्गाची संपत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभली. निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे. कोकणचा स्वर्ग असलेला या सिंधुदुर्ग जिल्ह्याची काही विशेषता व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणकुणकेश्वर मंदिर
तारकर्ली बीच आणि देवबाग बीचविजयदुर्ग किल्ला
भोगवे बीच आणि निवती बीचसावंतवाडी
रेडी गणपती मंदिर, श्री वेतोबा मंदिरआंबोली घाट
वेंगुर्ला बंदर आणि सागरेश्वरवालावल धामापूर

१०) वालावल धामापूर (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG DISTRICT)

WALAWAL DHAMAPUR LAKE

WALAWAL DHAMAPUR LAKE सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये दहाव्या क्रमांकावर आहे वालावल धामापूर. महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पुरातन निसर्ग संपन्न असलेलं वालावल एक असं गाव ज्याच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ प्रभात स्टुडिओ च्या जमान्यापासून आज पर्यंतच्या अनेक सिने निर्मात्यांना पडली. या गावात निसर्गरम्य व ऐतिहासिक अशी प्रेक्षणीय स्थळे तर आहेतच, परंतु अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेलं प्राचीन व जागृत असं श्री लक्ष्मिनारायणाचे मंदिर सुद्धा आहे.

मुंबईहून ५०० किलोमीटरवर, पुणेहून ४०० किलोमीटरवर तर कुडाळवरून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असणारे, वालावल गाव. हे गाव प्रवासासाठी वर्षभर सुखकर व सोयीस्कर असेच आहे. याच गावाला लागून असलेले दाट जंगल तसेच भरगच्च झाडझुडुपांनी वेढलेल्या अश्या डोंगर रांगा. या गावाच्या उत्तरेला बारमाही तुडुंब वाहणारी कर्ली नदी, मानाने  सजलेला चमचमणारा तिचा काठ, त्यातील बेटे, नौकाविहारासाठी मोह घालणारा तिचा शांत असा प्रवाह, सर्व कसे अगदी निसर्गसंपन्न, आणि निसर्गप्रेमींना भुरळ घालणारे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला सुप्रसिद्ध असा धामापूरचा तलाव आणि काठावर वसलेलं भगवती देवीचं सुंदर असं देवालय. हे ठिकाण नेरूरपार- काळसे -धामपूर रोड वरून १२ किलोमीटरवर, तर मालवणहून सुमारे ८ किलोमीटर वर आहे. रस्त्यावरून आपल्याला दिसते ते श्री भगवती देवीचे सुंदर असे मंदिर.

मंदिराच्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडतं. भगवती देवीच्या बाजूलाच सातेरी देवीचे मंदिर आहे. या सुंदर अशा पर्यटन स्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथला तलाव. आनंदाची बाब म्हणजे याच निसर्गरम्य गावात असणाऱ्या धामपूर तलावाचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नामांकन झाले आहे. आजपर्यंतच्या जगातील ७४ हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर्समध्ये या धामापूर  तलावाने जागतिक सन्मान मिळवला आहे. सदैव हिरवीगार वनराई, माडा -पोकळीच्या बागा आणि दोन्ही डोंगरांच्या मधोमध असणारा ऐतिहासिक धामापूर तलाव उत्कृष्ट असं पर्यटन केंद्र आहे .

०९) आंबोली घाट (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG DISTRICT)

amboli ghat
आंबोली घाट

AMBOLI GHAT AND AMBOLI WATERFALL – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये नवव्या क्रमांकावर आहे आंबोली घाट आणि आंबोली धबधबा. आंबोली म्हटलं की समोर येतं ते दाट धुकं, उंचच उंच कड्यावरून कोसळणारे हे धबधबे, आणि धो धो कोसळणारा पाऊस या तिन्हीचं मिलन बघायचं असेल, तर आंबोली सारखं ठिकाण नाही. आंबोलीला प्रती चेरापुंजी म्हणूनही ओळखलं जातं. चेरापुंजीला वर्षाकाठी ५०० इंच पाऊस पडतो, तर आंबोली मध्ये केवळ चार महिन्यात ४०० इंच पाऊस कोसळतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला अंबोलीचा पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पडत असतो आणि त्यामुळेच आंबोलीला निसर्गाने सौंदर्याचे वरदान भरभरून दिले आहे आणि बाराही महिने इथला निसर्ग हिरवा शालू नेसलेला असतो.

 आंबोली गावाची जीवनदायीनी म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजे हिरण्यकेशी. हिरण्य म्हणजे सोनं आणि केशी म्हणजे केस. या नदीकडे बघितल्यानंतर एखादा सोन्याचा केस वाढल्याप्रमाणे आपल्याला भास होतो, म्हणूनच या नदीला हिरण्यकेशी नदी असे संबोधले जाते आंबोली घाटातील वर्षा पर्यटनाचा श्वास असलेल्या आंबोलीच्या मुख्य धबधब्याने आंबोलीला खऱ्या अर्थाने पर्यटन दृष्ट्या जगात नावारूपाला आणलं. या धबधब्याचं पाणी उंच उंच कड्यावरून कोसळतं, आणि मग त्याचे रूपांतर होतं त्या एका विलोभनीय अविश्वसनीय डोळ्याला सुखद अनुभव देणाऱ्या या धबधब्यांमध्ये.

या धबधब्यावर पावसाळ्याचे चारही महिने पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या धबधब्याकडे पर्यटकांचा नेहमीच ओढा राहिलेला असतो. असे आणखीनही धबधबे आपल्याला संपूर्ण घाट रस्त्यावर बघायला मिळतात आणि त्याही धबधब्यांवरती पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

सिंधुदुर्गातील स्वर्ग जर तुम्हाला पाहायचं असेल तर या आंबोली गावात नक्की भेट द्या आणि इथल्या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटा.

०८ ) सावंतवाडी राजवाडा व लाकडी खेळणी (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

SAWANTWADI PALACE AND SAWANTWADI WOODEN TOYS

SAWANTWADI PALACE AND SAWANTWADI WOODEN TOYS – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये आठव्या क्रमांकावर आहे सावंतवाडी राजवाडा आणि सावंतवाडी लाकडी खेळणी. सावंतवाडी मधील जगप्रसिद्ध लाकडी खेळण्याची बाजारपेठ, हे भारतातील लाकडी खेळण्याचे मुख्य मार्केट असे मानले जाते . महाराष्ट्रातील सावंतवाडी तालुक्यातील चितारआळी हे जगप्रसिद्ध लाकडी खेळण्याची मुख्य बाजारपेठ आहे. सावंतवाडी बस डेपो आणि मोती तलाव, राजवाडा इथून हि बाजारपेठ ५ ते १० मिनिटे अंतरावर आहे. आणि इथे पांगारा या लाकडापासून खेळणी बनवली जातात.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेक्षणीय स्थळे –सावंतवाडी संस्थानाला ३५० ते ४०० वर्षाचा इतिहास आहे आणि जवळजवळ तेव्हापासून ही लाकडी खेळणी बनवली जातात. राजवाड्याचे राजे म्हणजे भोसले या घराण्याने नेहमीच कला आणि शिक्षणाला खूप सारे प्रोत्साहन दिले आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे ज्यामुळे सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यासाठी खूप जास्त प्रसिद्धीस आले आहे.

येथील बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लाकडी खेळणी आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण वापरू शकतो, छोट्या-छोट्या गोष्टी, व्यायामाची काही साधने आहेत, तर काही लाकडी गाड्या आहेत, बैलगाड्या आहेत, छोटी छोटी लाकडी फळे आहेत. अश्या वेगवेगळ्या लाकडी वस्तुंची खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सावंतवाडी मधील लाकडी खेळण्याच्या दुकानांना नक्की भेट देऊ शकता.

सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई, पुणे तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे तुम्ही पोहोचू शकता. सावंतवाडी शहरामध्ये असलेला राजवाडा याची निर्मिती सावंत भोसले संस्थांनी केली. याची बांधणी साधारण १७५५ ते १८०३ या काळात करण्यात आली आहे. राजवाड्यातील राजांचे राजवाड्याच्या भिंतीवर बरेचसे जुने फोटो पाहावयास मिळतात.

राजवाड्याच्या प्रवेशद्वाराबद्दल सांगायचे म्हणजे येथील प्रवेशद्वार १८९५ मध्ये बांधण्यात आले. प्रवेशद्वाराचे बांधकाम लाल विटा वापरून करण्यात आले असल्याने ते अजूनच विलोभनीय दिसते. सावंतवाडीची जुनी नाणी किंवा गंजिफाचा खेळ आजही या राजवाड्यात जपून ठेवला आहे. येथील कलाकार आजही तुम्हाला येथे आपली कला सादर करताना दिसून येतील.

०७ ) विजयदुर्ग किल्ला (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

VIJAYDURG FORT

VIJAYDURG FORT – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये सातव्या क्रमांकावर आहे विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग किल्ला जो कायम अभेद्य आणि अजिंक्य राहिला आणि मराठा साम्राज्याचं आरमार ज्या कान्होजी आंग्रे यांनी गाजवलं अशा सर्व गोष्टींचा साक्ष असलेला हा विजयदुर्ग किल्ला. किल्ल्यावर प्राचीन हनुमानाचे मंदिर आहे. विजयदुर्ग किल्ला हा वाघोठे नदी समुद्राला मिळते त्या खाडीच्या एकदम मुखाशी वसलेला आहे.

अतिशय प्राचीन तितकाच अभेद्य असा हा जलदुर्ग किंवा मिश्रदुर्ग, भोज राजा शिलाहार यांच्या राजवटीत सन ११९३ ते १२०६ या काळात उभारल्या गेल्याचे म्हटले जाते. राजा भोजचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. भोजराजाने कोकणामध्ये एकंदर १६ किल्ले बांधले. यामध्येच विजयदुर्गाची उभारणी झाली.महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याच्या सभोवताली चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १७ एकरापर्यंत नेऊन ठेवले.

किल्ल्याच्या रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर तीनही बाजूने समुद्र आणि जमिनीच्या बाजूने कंद अशी एक किल्ल्याची मूळ रचना होती. १८ ऑगस्ट हा दिवस हेलियम डे म्हणून या किल्ल्यावरती साजरा केला जातो. तर अश्या ऐतिहासिक वास्तुस भेट देण्यास व शिवरायांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी तुम्ही नक्कीच विजयदुर्ग किल्ल्यास भेट द्या.

०६) कुणकेश्वर मंदिर व समुद्रकिनारा (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

KUNKESHWAR TEMPLE AND KUNKESHWAR BEACH

KUNKESHWAR TEMPLE AND KUNKESHWAR BEACH – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे कुणकेश्वर मंदिर आणि कुणकेश्वर बीच. सुमारे अकराशेच्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा ठेवाच आहे. मालवण पासून ५४ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय इतरत्र कुठेच नाही असे देखील म्हटले जाते. या मंदिराचा कळस विशेष लक्ष वेधून घेतो ,मंदिराचा कळस बराच उंच असून तो बदामी आकारात बांधलेला आहे. मंदिराचा चौथराच मुळात ३० फूट उंचीचा आहे आणि त्यावर विशाल पाषाणांनी ७० फूट उंचीच्या भव्य मंदिराचे बांधकाम केलेले आहे.

श्री देव कुणकेश्वराच्या मंदिराची बांधणी ही दाक्षिणात्य पद्धतीची आहे. मुख्यद्वारातून प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या परिसरात आणखी काही लहान मंदिरे देखील पाहायला मिळतात

देवस्थानाच्या परिसरात समुद्रकिनारी शिवलिंग पाहायला मिळते. श्री क्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे म्हणतात. काशीचा दर्जा मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ही शिवलिंगे आहेत. काशी येथे शंभर शिवलिंग आहेत आणि कुणकेश्वर येथे ९९ शिवलिंग आहेत असे सांगण्यात येते. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेले आहे, पण जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जिर्णोद्धार शिवकालीन आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुलतानी आक्रमणामुळे असंख्य मंदिरांचे नुकसान व्हायचे मग त्या मंदिरांची पुनर्स्थापना देखील केली जायची. कुणकेश्वर मंदिराचा जिर्णोद्धारही याच काळातला. हा काळ म्हणजे शिवराज्याभिषेकानंतरचा म्हणजे जवळजवळ ३५० वर्षांपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष मंदिरात येऊन गेल्याचे देखील सांगितले जाते. प्राचीन आणि भव्य असे देवालय म्हणून ओळख असलेल्या या मंदिराकडे बघितले की असे वाटते सिंधू सागराने आपल्या सहस्त्र भुजांमध्ये कुणकेश्वर मंदिराला भक्ती भावाने कवटाळलेले आहे.

कोकणातल्या या शिवालयाला स्वतःची एक वेगळीच ओळख जपण्याचे वरदान लाभले. शिवलिंग आणि समुद्रकिनारा एवढ्यावरच कुणकेश्वराचे सौंदर्य मर्यादित नाही तर अनेक दंतकथांच्या मागे दडलेला मूळ इतिहास समजून घेतला की या मंदिराचा प्राचीन ठेवा आणि अर्वाचीन कुणकेश्वर या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहता येतात. आज कुणकेश्वर एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेले आहे, पण हा विकास होत असताना या आधुनिक युगातही मंदिराच्या प्राचीन अवशेषाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता कुणकेश्वरवासिय घेत आहेत. खऱ्या अर्थाने कोकण काशी हे कुणकेश्वराचे मंदिर म्हणजे प्राचीन संस्कृतीचा एक अनमोल ठेवाच आहे.

०५) वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारा व वेंगुर्ला बंदर (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

VENGURLA BANDAR AND SAGARESHWAR BEACH

VENGURLA BANDAR AND SAGARESHWAR BEACH – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे वेंगुर्ला बंदर आणि सागरेश्वर बीच. या बंदरावर येताना समोर हत्ती दृष्टीस पडतो. असं म्हटले जाते की हा समुद्र समृद्धीचे प्रतीक आहे. वेंगुर्ला हे कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरावरून बहुतांश मासेमारी चालते.

सागरेश्वर बीच याठिकाणी आल्यावर तुम्हाला अगदी परदेशात आल्याचा अनुभव होतो.समुद्रकिनाऱ्यावर लाकडी केबिन खूप चांगल्या डिझाईन केल्यात आहेत आणि इथे बसायची पण व्यवस्थित सोय आहे. कमी गर्दीच्या वेळी इथे आले की समुद्र पण अनुभवता येईल.

सागरेश्वर किनारी केवळ सर्वसामान्यच नव्हे तर देवी-देवता पण स्नान करतात. सोमवती अमावस्येला महोदय पर्वणी असते आणि या महोदय पर्वणीला तालुक्यातील, गावातील आणि जिल्ह्यातील काही देवस्थाने येथे येतात आणि देवी देवता येथे स्नान करतात. त्याचा मोठा उत्सव येथे असतो. सागरेश्वर समुद्रकिनारी सुरुच्या झाडाची मोठी गर्दी पाहायला मिळते. तुम्ही नक्कीच येथे भेट देऊ शकता.

०४ ) रेडी गणपती मंदिर आणि वेतोबा मंदिर (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

REDI GANESH MANDIR AND KSHETRAPAL SHRI VETOBA MANDIR

REDI GANESH MANDIR AND KSHETRAPAL SHRI VETOBA MANDIR – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे रेडी गणपती मंदिर आणि क्षेत्रपाल श्री वेतोबा मंदिर . रेडी हे भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, दक्षिण कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. १९७६ मध्ये रेडी बंदराजवळील एका खाणीत गणपतीची मूर्ती सापडली. या मूर्तीची उंची अंदाजे सहा फूट आणि रुंदी चार फूट आहे आणि गणेशमूर्ती ही बसलेल्या स्थितीमध्ये आहे. दोन महिन्यांनी ज्यावेळी अजून उत्खननाचे काम सुरू झाले त्यावेळी उंदराची मूर्ती देखील सापडली.

मित्रहो तुम्ही नक्कीच या मंदिराची भेट घेऊन तिथे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला येऊ शकता. मनाला खूप शांतता लाभते. स्थानिकांच्या मते हा नवसाला पावणारा देव आहे. तुम्हाला काही इच्छा आकांक्षा असतील तर या देवाच्या समोर येऊन तुम्ही नक्कीच साकडं घालू शकता.

वेंगुर्ल्यातून बारा किलोमीटर अंतरावर असलेले श्री वेतोबा देवाचे मंदिर. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजे साधारण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या देवाची जत्रा असते व वैशाख शुद्ध पंचमीला या देवाचा वाढदिवस साजरा केला जातो. ही मूर्ती पंचधातुनी बनवलेली आहे व याची उंची ९ फूट, २ इंच एवढी आहे. प्रसिद्ध मूर्तिकार नारायण लक्ष्मण सोनवडेकर यांनी ही मूर्ती बनवली आहे.

०३) भोगवे बीच व निवती बीच (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

BHOGAVE BEACH AND NIVTI BEACH

BHOGAVE BEACH AND NIVTI BEACH – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे भोगवे बीच आणि निवती बीच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे इथला समुद्रकिनारा खरच विलोभनीय आहे. भोगवे गावाला कर्ली नदी आणि समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेल्या पांढऱ्याशुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माडपोफळीच्या बागा त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य अधिकच देखणे बनले आहे. भव्य परिसरात आलात तर इथे राहण्यासाठी काही छानशी सुंदर हॉटेल्स तुमच्या बजेट नुसार मिळतील.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे – भोगवे समुद्रकिनाऱ्यालगतच एका टेकडीवर ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव आहे निवती किल्ला.  निवती किल्ल्यावरून भोगवेची मनमोहक रम्य चौपाटी अप्रतिम दिसते. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात आणि जवळून डॉल्फिन माशांच्या झुंडी पाहता येतात.

जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या ऑस्कर दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग नामांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांग सुंदर बीचेसची निवड करण्यात आली होती, यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव सर्वांग सुंदर बीच म्हणून सिंधुदुर्गातील भोगवे बीचची निवड करण्यात आली आहे. समुद्री पाण्याचा दर्जा, किनाऱ्यावरील स्वच्छता, कनेक्टिव्हिटी, पर्यटकांची सुरक्षितता,पर्यावरण व्यवस्थापन व योग्य माहितीची देवाण-घेवाण या सर्व निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली आहे.

ब्ल्यू फ्लॅग या नामांकनामुळे भोगवे बीचचे नाव जागतिक स्तरावर पोहोचलेले आहे. निवती मधील लाइटहाऊस, गोल्डन रॉकला पण तुम्ही नक्कीच भेट द्या.

०२) तारकर्ली बीच व देवबाग बीच (TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

TARKARLI BEACH AND DEVBAUG BEACH

TARKARLI BEACH AND DEVBAUG BEACH – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तारकर्ली बीच आणि देवबाग बीच. हे ठिकाण महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या बीचवर आपल्याला अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते. तारकर्ली बीचवर पोहोचताच जणू आपल्याला स्वर्गाचा अनुभव येतो असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या बीचवर असणारी बांबूची व सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाईल.

 तारकर्ली बीच वरील समुद्राचे पाणी इतके स्वच्छ आहे की या पाण्यातील सौंदर्य अगदी सहज आपल्या डोळ्यांनी पाहता येते. या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण स्कूबा डायव्हिंग आणि इतर साहसी खेळ देखील खेळू शकता .

देवबाग बीच मालवण मधील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. या बीचवर असणारी पांढरी वाळू आणि स्वच्छ व सुंदर नजारे पाहून मन अगदी थक्क होऊन जाते. देवबाग बीच हे आराम करण्यासाठी, सीगल आणि इतर जलचर प्राणी पाहण्यासाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण मालवण मधील पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे ठिकाण आहे. देवबाग बीच हा मालवण मधील व्यापारी समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. जो गोल्डन बीच, लांबलचक पट्ट्यासह, कयाकिंग, बंपर आणि बनाना बोट राईडस इतर जल क्रीडा खेळासाठी देखील प्रसिद्ध आहे. देवबाग बीच हा मालवण पासून १२ किलोमीटरच्या अंतरावर आहे.

०१) मालवण पर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला(TOP 10 PLACES TO VISIT IN SINDHUDURG IN MARATHI)

MALVAN BEACH AND SINDHUDURG FORT

MALVAN BEACH AND SINDHUDURG FORT – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण बीच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर हा तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो. एवढेच नव्हे तर ज्यावेळेस सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला त्यावेळी पर्यटन क्षेत्रात मालवण तालुक्याचे ६० टक्के योगदान होते. मालवण हे सिंधुदुर्गातील एक प्रमुख शहर. मालवण समुद्राच्या डाव्या बाजूला आपल्याला समुद्र दिसत असतो तर मध्ये मध्ये उजव्या बाजूला कर्ली नदीचे दर्शन होत असते.

मालवण मध्ये तुम्ही जय गणेश मंदिर तसेच, चीवला बीच व चीवला बीच च्या बाजूलाच असलेल्या रॉक गार्डन ला देखील भेट देऊ शकता. मालवणच्या बाजारपेठेत तुम्ही कोकम, आगळ, मालवणी भाजका मसाला, मासळी मसाला, आंबावडी, फणसवडी, काजू इत्यादी रानमेवा व मसाल्यांची खरेदी करू शकता .

मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला हा मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि साधन संपत्तीचे एक उदाहरण आहे. पराक्रमी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला हा किल्ला सभोवताली असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ही ओळखला जातो. हा किल्ला साधारणता ४८ एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे. इसवी सन १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या आक्रमण परतवून लावण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला होता.

या किल्ल्यावर असणारी तटबंदी आणि आकर्षक प्रवेशद्वारामुळे हा किल्ला इतिहासाचा एक आकर्षक नमुना आहे .महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आणि इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. मालवण बस स्थानकापासून हा किल्ला साधारणतः तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेक्षणीय स्थळे  व्हिडिओ

FAQ

भारतातील फिहले फिश थीम पार्क कुठे आहे

भारतातील फिहले फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देश विदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा का प्रसिद्ध आहे?

सिंधुदुर्ग जिल्हा हा येतील निसर्ग, जैव विविधता, समुद्रकिनारे, रुचकर जेवण आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे यासाठी प्रसिद्ध आहे.

सिंधुदुर्गला भेट देण्यासाठी सर्वोत्तम हंगाम कोणता आहे?

आल्हाददायक दिवस, निरभ्र आकाश आणि थंड रात्री असे वातावरण म्हणजेच भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. या ऋतूमध्ये आपण अप्रतिम निसर्ग, स्वच्छ सामुद्रकिनारे, जलक्रीडा यांचा मनमुराद आनंद घेऊ शकतो.

निष्कर्ष

आम्ही लेखाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १0 प्रेक्षणीय स्थळाची माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे हा लेख तुम्ही नक्की वाचा व तुम्हाला कसा वाटला हे आम्हास कमेंट करून नक्की कळवा. आणि काही मुद्दे वाढवायचे असतील तर तेही नक्की कमेंट करून सांगा .

KUDAL : कुडाळमधील 10 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आणि सविस्तर माहिती

धन्यवाद .

Leave a comment