23 विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी | 23 Unknown Facts Of Virat Kohli

विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी | 23 unknown facts of virat kohli – क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला विराट कोहली, क्रिकेट जगतातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्याच्या अद्वितीय प्रतिभा, अप्रतिम क्रिकेट शैली, मैदानावर आणि मैदानाबाहेर उल्लेखनीय नेतृत्व यासाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहलीने त्याच्या आक्रमक फलंदाजीची शैली, त्यातील सातत्य आणि यशाची भूक यामुळे आपला क्रिकेट जगतात एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्याची वेगवेगळी रेकॉर्डस आणि त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सांगण्यास पुरेशी आहे.

त्याच्या क्रिकेट क्षमतेच्या पलीकडे, कोहलीचे व्यक्तिमत्व आणि फिटनेस यामुळे असंख्य तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. एक कर्णधार म्हणून, त्याने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व कणखरपणे केले आहे, आपल्या सहकाऱ्यांना आणखि प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले आहे. याचा नवोदित खेळाडू ते जागतिक क्रिकेट स्टार हा प्रवास केवळ त्याचे जबरदस्त क्रिकेट कौशल्य, चिकाटी आणि दृढनिश्चय दर्शवतात .

आजच्या लेखातून आपण जाणून घेऊया विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या 23 गोष्टी.

विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी | 23 unknown facts of virat kohli

23 unknown facts of virat kohli

1. विराट कोहली पूर्ण शाकाहारी आहे आणि VEGAN असल्यामुळे तो दुग्धजन्य पदार्थ किंवा मांसाहारापासून मुक्त आहार घेतो. त्याला कुत्रे खूप आवडतात – तो श्वानप्रेमी आहे आणि तो PETA सारख्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांशी जोडलेला आहे.

2. टी-20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न टाकता, म्हणजेच शून्य चेंडूवर विकेट घेणारा विराट हा एकमेव गोलंदाज आहे. 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या T20 सामन्या मध्य, त्याने केविन पीटरसनला वाइड बॉल टाकला होता. हा बॉल क्रीजमधून बाहेर गेला आणि विकेटकीपर एमएस धोनीने स्टंप केला. फलंदाजीच्या विक्रमांव्यतिरिक्त, गोलंदाजीतील हा विलक्षण विक्रम क्रिकेटमध्ये अपवादात्मक असू शकतो.

3. विराटचे क्रिकेटसाठीचे प्रेम आणि समर्पण अद्वितीय आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले त्या दिवशी त्याने दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजी केली होती. त्या दिवशी त्याने दिल्लीकडून ९० धावा केल्या होत्या.

23 unknown facts of virat kohli

4. WROGN हा प्रसिद्ध ब्रँड युनिक कपडे आणि अॅक्सेसरीजसाठी ओळखला जातो, हा ब्रॅंड विराट च्या मालकीचा आहे. त्यासोबतच त्याच्याकडे एफसी गोवा आणि बेंगळुरू योद्धा यांचा मालकी हक्क सुद्धा आहे.

5.५० षटकाच्या सामन्यांच्या विश्वचषक पदार्पणातच, शतक झळकावणारा विराट हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. कोहलीने 2011 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध ही जबरदस्त कामगिरी केली होती.

6. विराट कोहलीने VKF फाउंडेशन ही संस्था स्थापन केलेले आहे. ही समाजसेवी संस्था मुंबईतील वंचित मुलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. तसेच अनाथ, वंचित, आणि गरीब ही संस्था मुलांना शिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत करते.

23 unknown facts of virat kohli

7. विराटच्या यादीत असलेले एक प्रभावी रेकॉर्ड म्हणजे कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 7 द्विशतके झळकावली आहेत. हा शानदार टप्पा गाठणारा तो कसोटीतील एकमेव कर्णधार आहे.

8. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (International Cricket Council)ने त्याला 2013 वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू घोषित केले होते आणि 23 व्या वर्षी ही कामगिरी करणारा तो अजूनपर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

9. एकदिवसीय 50 षटकाच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2012 च्या आशिया चषक स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध एकूण 183 धावा केल्या होत्या.

anushka and virat kohli

10. आज विराट कोहलीला चिकू या टोपण नावाने ओळखतात. दिल्ली रणजी संघाचे माजी प्रशिक्षक अजित चौधरी यांनी विराटला चीकू हे प्रसिद्ध टोपणनाव दिले. आपणही धोनीला निवृत्तीपूर्वी अनेकदा स्टंप माइकवर या नावाने हाक मारताना ऐकले असेलच.

11. इंडियन प्रीमियर लीगमध्ये फक्त एकाच फ्रँचायझीचे कायम प्रतिनिधित्व करणारा कोहली हा एकमेव खेळाडू आहे. 2008 मध्ये आयपीएल हंगामाचे जेव्हा उद्घाटन झाले तेव्हापासून तो (ROYAL CHALLENGERS BENGALURU) आरसीबीचा अविभाज्य भाग आहे.

12. वनडेमध्ये सलग तीन शतके झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही शतके ठोकली होती.

virat kohli

13. विराट कोहली हा सोशल मीडिया ईन्लूएंसर सुद्धा आहे आणि आपल्या इंस्टाग्रामवर प्रायोजित पोस्ट द्वारे तो जवळपास ₹5 कोटींपेक्षा जास्त कमावतो.

14. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये क्रिकेटचा धडाकेबाज खेळाडू, विराट कोहलीचा कधीही लिलाव झालेला नाही. त्याला 2008 मध्ये आरसीबीने आपला खेळाडू म्हणून निवडले होते आणि प्रत्येक हंगामात त्याला कायम ठेवण्यात आले आहे.

15.क्रिकेटमधील उपलब्धी –

  • PLAYER OF THE YEAR – 2012, 2017 आणि 2018.
  • ICC क्रिकेटर ऑफ द इयर- 2017 आणि 2018.
  • ICC प्लेअर ऑफ द डिकेड- 2010 (2011-2020).
  • विस्डेनचा वर्षातील आघाडीचा क्रिकेटर पुरस्कार- 2016, 2017 आणि 2018.

16. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट 2013 मध्ये क्लियर शॅम्पूच्या जाहिरात शूटमध्ये झाली. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि या जोडप्याने 2017 मध्ये लग्न केले आणि आता त्यांना वामिका नावाची मुलगी सुद्धा आहे.

anushka and virat kohli

17. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी, त्यांनी काही प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत- अर्जुन पुरस्कार (2013), पद्मश्री (2017), आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (2018).

18. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी विकेट कीपिंग सुद्धा केली आहे. एमएस धोनीने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध जेव्हा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा विराट ने कीपिंग सांभाळले होते.

19. विराट कोहलीला टॅटू आवडतात आणि त्याच्या शरीरावर जवळपास 10 पेक्षा जास्त आहेत.

20. विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत-

  • सर्वात जलद 8000, 9000, 10000, 11000 आणि 12000 एकदिवसीय धावा करणारा फलंदाज.
  • ODI मधील सर्वाधिक शतके (43) – दुसरे स्थान.
  • 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक शतके (3).
virat kohli

21. 2012 मध्ये विराट कोहलीचा जगातील 10 सर्वोत्तम ड्रेस्ड मॅनमध्ये समावेश करण्यात आला होता. या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश आहे.

22. कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक न करता सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने एकूण 97 टी-20 सामन्यांमध्ये 3,296 धावा केल्या आहेत.

23. 2008 मध्ये त्याने अंडर-19 संघाचे नेतृत्व केले आणि विश्वचषक ट्रॉफी जिंकली. ही कोहलीची आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील पहिलीच अभूतपूर्व कामगिरी आहे.

👉 कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी

मित्रहो,

आम्ही या लेखाद्वारे विराट कोहली बद्दल अनोख्या 23 गोष्टींची यादी दिली आहे. आपल्याला सुद्धा आणखी काही अश्याच रोमांचक गोष्टी माहीत असल्यास कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद .

Leave a comment