अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक – म्हणाला मनाने आणि नागरिकत्वाने मी भारतीय आहे.

अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक – गृह मंत्रालयाने प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व दिले आहे. खिलाडी कुमारला आता भारताचा पासपोर्ट मिळाला आहे. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय खूप आनंदी आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर, मंगळवारी जाहीर केले की तो पुन्हा एकदा भारतीय नागरिक बनला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांने ट्विटरवर ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत अनेकदा ट्रॉलर्स कडून टीकेला सामोरे जावे लागलेल्या अक्षय कुमारने त्याचे नागरिकत्व प्रमाणपत्र आता ट्विटरवर शेअर केले आहे.

अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक

अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन गृह मंत्रालयाच्या फाइलचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याला नागरिकत्व देण्याशी संबंधित कागदपत्रे आपण पाहू शकतो. अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर लिहिले की, मन आणि नागरिकत्व दोन्ही भारतीय आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा…जय हिंद, भारत.

अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक

अक्षयने एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की, कॅनडाचा पासपोर्ट असण्याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही. मी पूर्णपणे भारतीय आहे.

55 वर्षीय अक्षय कुमारनेही या घोषणेसह एक संदेश पोस्ट केला आहे. भारतीय नागरिकत्व मिळाले:

77 वा स्वातंत्र्यदिन सर्व देशवासियांसाठी तसेच चित्रपट अभिनेता अक्षय कुमारसाठी खूप आनंद घेऊन आला. गृह मंत्रालयाने अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व दिले आहे. खिलाडी कुमारला भारताचा पासपोर्ट मिळाला आहे. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अभिनेता खूप आनंदी आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

हे सुद्धा वाचा 👇

Leave a comment