अॅमेझॉन प्राइम वरील बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज : Top 15 Best Romantic Hindi Web Series On Amazon Prime

Best Romantic Indian Web Series On Amazon Prime | बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज – आपल्याला जर हिन्दी रोमँटिक वेब सीरीज आवडत असतील आणितुम्ही चांगल्या सिरीज शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. बऱ्याच वेळा Amazon Prime वापरताना आपल्या आवडीची मालिका शोधणे कठीण जाते. कारण इथे बऱ्यापैकी कन्टेन्ट उपलब्ध असून, आपल्याला नक्की जे पाहायचे आहे, त्या प्रकारच्या वेब सिरीज कुठे आहेत, ते शोधताना मात्र दमछाक होते. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत, Amazon Prime वरील 15 अप्रतिम रोमँटिक वेब सिरीजची यादी.

येथे आम्ही आपल्यासाठी Amazon Prime वरील सर्वोत्कृष्ट 15 हिन्दी रोमँटिक वेब सीरीजची यादी तयार केली आहे, जी आपण आपल्या प्रियजनांसोबत पाहिली पाहिजे.

अॅमेझॉन प्राइम बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज : Best Romantic Hindi Web Series On Amazon Prime

#1. Flames (2018)
#2. Bandish Bandits (2020)
#3. ImMATURE (2019)
#4. Hiccups and Hookups (2021)
#5. Date Gone Wrong (2018)
#6. Hostel Daze (2019)
#7. Made In Heaven (2019)
#8. Panchayat (2020)
#9. Modern Love Mumbai (2022)
#10. Aisa Waisa Pyaar (2021)
#11. A Viral Wedding (2020)
#12. Modern Love Chennai (2023)
#12. Four More Shots Please! (2019)
#13. Pushpavalli (2017)
#14. Rasbhari (2020)
#15. Mind The Malhotras (2019)

#1. Flames (2018)

  • रेटिंग: 8.9/10
  • सीझन: 4
  • भाग: 20
  • शैली: प्रणय, ड्रामा, कॉमेडी
  • दिग्दर्शक: अपूर्व सिंग कार्की, दिव्यांशू मल्होत्रा
  • लेखक: जासदीप सिंग, कुणाल अनेजा
  • कलाकार: सुनक्षी ग्रोवर, शिवम काकर, ऋत्विक साहोरे, तान्या माणिकतला, दीपेश सुमित्रा जगदीश

फ्लेम्स वेब सिरीज इशिता आणि रजतची प्रेमकहाणी आहे. रजत इशिताला ट्यूशनमध्ये पाहतो आणि लगेचच तिच्या प्रेमात पडतो. दुसरीकडे, रजतचा जिवलग मित्र पांडे आणि अनुषा हे पण रिलेशन मध्ये आहेत. ही सिरिज नुकत्याच तरुण्यात पदार्पण केलेल्या मुला मुलींच्या भाव विश्वात आपल्याला नेते आणि आपणही स्वतःला त्यात पाहू लागतो. ही सिरिज तुम्हाला कॉलेजच्या दिवसात घेऊन जाते. वेब सिरीजचे चार सीझन आहेत आणि प्रत्येक सीझनमध्ये पाच एपिसोड आहेत.

#2. Bandish Bandits (2020)

  • रेटिंग: 8.6/10
  • सीझन: 1
  • भाग: 10
  • शैली: संगीत, प्रणय, नाट्य
  • दिग्दर्शक: आनंद तिवारी
  • लेखक: लारा चांदनी, कविराज सिंग, श्रुती मदन, अधीर भट, अमृतापाल सिंग बिंद्रा.
  • कलाकार: नसीरुद्दीन शाह, राजेश तैलंग, ऋत्विक भौमिक, शीबा चड्ढा, श्रेया चौधरी.

बंदिश बँडिट्स ही Amazon प्राइम इंडियाची एक संगीतमय रोमान्स वेब सिरीज असून या मालिकेत शास्त्रीय गायकी शिकणारा एक मुलगा त्याच बरोबर पॉपस्टार बनण्याची महत्वकांक्षा बाळगणारी मुलगी यांच्या प्रेम संबंधवर आधारित आहे. अतुल कुलकर्णी, नसीरुद्दीन शाह यांनी अप्रतिम भूमिका साकारलेल्या आहेत. या वेब सिरीज मध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताचा नैसर्गिक बाज अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर गुरु शिष्य परंपरा, स्वाभिमानाची लढाई, प्रेम अशा विविध अंगी भावना या वेबसाईट मध्ये पाहायला मिळतात

#3. ImMATURE (2019)

  • रेटिंग: 8.7/10
  • सीझन: 2
  • भाग: 10
  • शैली: संगीत, प्रणय, नाट्य
  • दिग्दर्शक: प्रेम मिस्त्री
  • लेखक: आनंदेश्वर द्विवेदी, चिराग रत्न सिंग, अभिषेक यादव, निशाद जवेरी, सुप्रित कुंदर
  • कलाकार: ओंकार कुलकर्णी, रश्मी आगडेकर, चिन्मय चंद्रानुषुष, विषेश तिवारी, कन्निका कापू

ध्रुव, छवी, कबीर आणि सुसू या कॉलेज मधील मुलांची ही हळुवार प्रेम कथा आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे कुटुंब, मित्र-मैत्रिणींचे नातेसंबंध, कॉलेजमध्ये युवकांचे राग रुसवे, समस्या या गोष्टींवर ही वेब सिरीज आधारलेली आहे. या वेब सिरीज मधले एपिसोड्स पाहताना आपल्याला सुद्धा आपल्या कॉलेज जीवनाची आठवण नक्कीच येईल

#4. Hiccups and Hookups (2021)

  • रेटिंग: 8.5/10
  • सीझन: 1
  • भाग: 8
  • शैली: नाट्य, प्रणय, विनोद
  • दिग्दर्शक: कुणाल कोहली
  • लेखक: दिव्यांशु मल्होत्रा, इंदिरा बिस्त
  • कलाकार: प्रतीक बाबर, शिनोवा, लारा दत्ता, मेयांग चांग, ​​मीरा चोप्रा.

सिंगल मदर आणि तिच्या सोबत असणारी तिची नवतरुण मुलगी त्याच बरोबर भीत्रा छोटा भाऊ या कुटुंबाचे चित्रीकरण या वेबसाईट मध्ये केलेले आहे. डेटिंग, प्रेम संबंध, कौटुंबिक नातेसंबंध आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी यांचा मागवा घेण्याचा प्रयत्न या वेब सिरीज मध्ये केला आहे. तीन जणांच्या ह्या कुटुंबाची सुंदर कथा चित्रित केली आह. Hiccups and Hookups ही Amazon Prime India वरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक वेब सिरीज आहे.

#5. Date Gone Wrong (2018)

  • रेटिंग: 8.5/10
  • सीझन: 1
  • भाग: 10
  • शैली: नाट्य, प्रणय, विनोद
  • दिग्दर्शक: शरद दास गुप्ता, एकलव्य सकपाळ
  • लेखक: तत्सा पांडे, पलक शाह
  • कलाकार: अद्वित कोट्टरी, दीक्षा जुनेजा, विकास रावत.

पहिल्या भेटीमध्ये काय काय गोंधळ होऊ शकतो आणि एखादी डेट नाट्यमय रीत्या कुठपर्यंत जाऊ शकते याचे अप्रतिम चित्रण या वेब सिरीज मध्ये केलेले आहे. तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्ती बरोबर ही वेब सिरीज नक्की पहा. डेट गॉन राँग ही Amazon प्राइम इंडियावरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक वेब सीरिज १९ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज झाली होती.

#6. Hostel Daze (2019)

  • रेटिंग: 8.5/10
  • सीझन: 2
  • भाग: 9
  • शैली: विनोदी, नाटक, प्रणय
  • दिग्दर्शक: संग्राम नाईकसाटम, अमीर मुसन्ना, राघव सुब्बू.
  • लेखक: अभिषेक यादव, सुप्रित कुंदर, सौरभ खन्ना, हरीश पेडिंती,
  • कलाकार: साहिल वर्मा, आदर्श गौरव, शुभम गौर, लव विसपुते, आयुषी गुप्ता, निखिल विजय, अहसास चन्ना .

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना हॉस्टेलमध्ये राहणे, त्याचबरोबर हॉस्टेलमध्ये राहताना होणारा संघर्ष, पालक, मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्याशी असणारे संबंध, हॉस्टेल लाईफ मधील प्रेम संबंध, त्यातील गोड क्षण या सर्वांचे वास्तविक चित्रण होस्टेल डेज मध्ये केलेले आहे. जर आपण कधी होस्टेलला राहिला असाल तर ही मालिका आपल्याला नक्कीच रिलेट करेल.Hostel Daze ही Amazon Prime India वरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक वेब सिरीजपैकी एक आहे.

#7. Made In Heaven (2019)

  • रेटिंग: 8.3/10
  • सीझन: 1
  • भाग: 9
  • शैली: विनोदी, नाटक, प्रणय
  • दिग्दर्शन: झोया अख्तर, नित्या मेहरा, अलंकृता श्रीवास्तव, प्रशनी नायर.
  • लेखक: रीमा कागती, झोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव
  • कलाकार: अर्जुन माथूर, जिम सरभ, नताशा सिंग, शिवानी रघुवंशी, कल्की कोचलिन.

मेड इन हेवन ही Amazon प्राइम इंडियावरील रोमँटिक मालिका असून दिल्लीमधील मध्यमवर्गीय श्रीमंत वर्गात मोडणाऱ्या एका कपलची ही कथा आहे. यात रोहन आणि गायत्री हे दोघेही व्यावसायिक असून त्यांच्या आयुष्यातील प्रेम, संघर्ष, कौटुंबिक नातेसंबंध आणि समस्या यावर ही मालिका प्रकाश टाकते. आयुष्यात येणारे छोटे छोटे प्रश्न आणि त्यावरील नाट्यमय प्रसंग या मालिकेची चित्रित केले आहेत.

#8. Panchayat (2020)

  • रेटिंग: 8.8/10
  • सीझन: 1
  • भाग: 16
  • शैली: विनोदी, नाट्य, प्रणय
  • दिग्दर्शन: दीपक कुमार मिश्रा
  • लेखक: चंदन कुमार
  • कलाकार: जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, पूजा सिंग

पंचायत ही एक रोमँटिक कॉमेडी वेब सिरीज असून यामध्ये अभिषेक नावाचा बेरोजगार इंजिनियर चांगली नोकरी नसल्यामुळे फुलेरा या उत्तर प्रदेशातील गावात ग्रामपंचायत सचिव म्हणून कामकाज स्वीकारतो. तेथील महिला सरपंच, तिचा नवरा, त्यांची मुलगी, सोबतचे सहकारी यांच्या संबंधावर त्याचबरोबर गावातील छोट्या मोठ्या समस्यांवर ही वेब सिरीज आधारलेली आहे. ही स्लो चालणारी वेब सिरीज असून त्यातील ह्युमर अतिशय सुंदर चित्रित केला आहे.

#9. Modern Love Mumbai (2022)

  • रेटिंग: 10
  • सीझन: 1
  • भाग: 6
  • शैली: विनोदी, नाट्य, प्रणय
  • दिग्दर्शक: शोनाली बोस, विशाल भारद्वाज, हंसल मेहता, अलंकृता श्रीवास्तव, ध्रुव सहगल, नुपूर अस्थाना
  • लेखक: विशाल भारद्वाज, अलंकृता श्रीवास्तव, हंसल मेहता, कश्यप कपूर, ध्रुव सहगल, अंकुर पाठक, नीलेश मणियार, राघव राज कक्कर, ज्योत्स्ना हरिहरन, देविका भगत, जॉन बेलेंजर
  • कलाकार: फातिमा सना शेख, प्रतीक गांधी, भूपेंद्र जदावत, रणवीर ब्रार, तनुजा, मीयांग चांग, नसीरुद्दीन शाह, सारिका, दानेश रझवी, मसाबा गुप्ता, ऋत्विक भौमिक, चित्रांगदा सिंग, अर्शद वारसी

मॉडर्न लव्ह मुंबई ही एक भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक वेब सिरीज असून यामध्ये सहा छोट्या छोट्या कथा चित्रित केल्या आहेत. मुंबईत राहणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कपल्स च्या या कथा असून त्यात सर्व प्रकारचे नातेसंबंध चित्रीत करण्यात आलेले आहेत.

#10. Aisa Waisa Pyaar (2021)

  • रेटिंग: 7.7/10
  • सीझन: 1
  • भाग: 4
  • शैली: नाट्य, प्रणय
  • दिग्दर्शक : आशिष पाटील
  • लेखक: आशीष पाटील
  • कलाकार: अहसास चन्ना , अदा शर्मा, शीबा चड्ढा, निधी सिंग.

वेगवेगळ्या वयोगटातील चार अप्रतिम कथा या वेब सिरीज मध्ये आहेत. नातेसंबंध, प्रेम संबंध, समस्या या वेबसिरिज मध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. ही मालिका २७ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसारित झाली. ही Amazon Prime India वरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक मालिकांपैकी एक आहे.

#11. A Viral Wedding (2020)

  • रेटिंग: 10
  • सीझन: 1
  • भाग: 8
  • शैली: नाट्य, प्रणय
  • दिग्दर्शक: श्रेया धनवंतरी
  • लेखक: श्रेया धनवंतरी
  • कलाकार: शरीब हश्मी, सनी हिंदुजा, मोहित रैना, श्रेया धनवंतरी

निशा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं लग्न धुमधडाक्यात करायचे ठरले असून त्यावेळी अचानक लागलेल्या लॉकडाऊन मुळे लग्न रद्द होण्याची वेळ येते. अशावेळी ऑनलाईन लग्न करावे का ? आणि त्यातून होणाऱ्या गमती जमती या वेबसाईटमध्ये चित्रित केल्या आहेत. ही नाट्यमय रित्या पुढे जाणारी लव्ह स्टोरी आपण नक्की पहा.

#12. Modern Love Chennai (2023)

  • रेटिंग: 7.3/10
  • सीझन: 1
  • भाग: 06
  • शैली: प्रणय, ड्रामा
  • दिग्दर्शक: भारतीराजा, राजू मुरुगन, कृष्णकुमार रामकुमार, बालाजी शक्तीवेल, अक्षय सुंधेर
  • लेखक: बालाजी थरानीधरन, रेश्मा घाटाला, राजू मुरुगन, प्रदीपकुमार एस.
  • कलाकार: किशोर कुमार जी., रितू वर्मा, अशोक सेलवन, रम्या नंबीशन, वसुंधरा कश्यप

बालाजी थरानीधरन, राजुमुरुगन, रेश्मा घाटाला, प्रदीप कुमार एस आणि त्यागराजन कुमारराजा यांनी लिहिलेल्या सहा शॉर्ट्स, चेन्नईच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या विविध वयोगटातील आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील व्यक्तींच्या प्रेमकथांचे वर्णन करतात.

#12. Four More Shots Please! (2019)

  • रेटिंग: 6.9/10
  • सीझन: 1
  • भाग: 20
  • शैली: विनोदी, नाट्य, प्रणय
  • दिग्दर्शन: नुपूर अस्थाना, अनु मेनन
  • लेखक: इशिता मोईत्रा, रंगिता प्रितिश नंदी, देविका भगत
  • कलाकार: प्रतीक बब्बर, गुरबानी, सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, मानवी गाग्रू.

फोर मोअर शॉट्स प्लीज ही कथा उमंग, सिद्धी, अंजना आणि डी या चार मैत्रिणीभोवती फिरते. वेगवेगळ्या समाजाच्या स्तरांमधून आलेल्या ह्या चार मैत्रिणी, त्यांचे कौटुंबिक संबंध, प्रेम संबंध त्यातील समस्या यावर ही वेब सिरीज प्रकाश टाकते. या चारही मैत्रिणींच्या कथा वेगवेगळ्या असल्या तरी त्या सुंदरतेने मनाचा ठाव घेतात.

#13. Pushpavalli (2017)

  • रेटिंग: 7.4/10
  • सीझन: 1
  • भाग: 20
  • शैली: कॉमेडी, थ्रिलर, प्रणय
  • दिग्दर्शित: डेबी राव
  • लेखक: कुमार शिवम, नवीन रिचर्ड, सुमिरा शेख, सुमुखी सुरेश, राहुल होता .
  • कलाकार: नवीन रिचर्ड, मनीष आनंद, उरूज असफाक सुमुखी सुरेश, सुमिरा शेख.

नेटफ्लिक्स वरील 13 बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज

पुष्पवल्ली ही छोट्या शहरातील एका मुलीच्या आयुष्यावरील कथा आहे. या मुलीला आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यासाठी ती घरातल्या स्त्रियांचा विरोध पत्करते. पुढे ती निखिल राव नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि आयुष्याला एक वेगळे वळण लागते. ही वेब सिरीज आपण नक्की पहा, ही मालिका 15 डिसेंबर 2017 रोजी प्रसारित झाली.

#14. Rasbhari (2020)

  • रेटिंग: 4.2/10
  • सीझन: 1
  • भाग: 8
  • शैली: नाट्य, प्रणय
  • दिग्दर्शन: निखिल भट
  • लेखक: शंतनू श्रीवास्तव
  • कलाकार: स्वरा भास्कर, आयुष्मान सक्सेना, नीलू कोहली, रश्मी आगडेकर.

Amazon Prime India वरील पुढील देसी रोमान्स वेब सिरीज आहे रासभरी जी 25 जून 2020 रोजी रिलीज झाली होती. मेरठमधील शानू या शिक्षिकेची कथा आहे. या रोमँटिक हॉट कॉमेडी वेब सिरीजमध्ये या शिक्षिकेच्या वैयक्तिक जीवनाचे अप्रतिम चित्रण केलेले आहे. थोडीशी प्रौढ वर्गाने जाणारी ही मालिका नक्की पहा

#15. Mind The Malhotras (2019)

  • रेटिंग: 5.9/10
  • सीझन: १
  • भाग: 19
  • शैली: कॉमेडी, प्रणय
  • दिग्दर्शन: ओहद पेराच, अजय भुयान, साहिल संघा,
  • लेखक: रण डोव्रत, करण श्रीकांत शर्मा, साहिल संघा, अवी बेल्कीन,
  • कलाकार: जेसन डिसोझा, सायरस साहुकर, डेन्झिल स्मिथ, सायरस साहुकर, मिनी माथूर.

माइंड द मल्होत्रास या वेब सिरीज मध्ये ऋषभ मल्होत्रा आणि आणि शेफाली या जोडप्याचे चित्रण केले आहे. आपल्या कौटुंबिक जीवनातील संकटांचा सामना करता करता आपला घटस्फोट टाळण्यासाठी आणि लग्न वाचवण्यासाठी ही दोघे कौन्सिलरची मदत घेतात आणि आपले वैवाहिक जीवन टिकवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये तयार होणारा विनोद आपल्याला या मालीकेशी बांधून ठेवतो.

रोमँटिक वेब सिरीज निष्कर्ष : Conclusion

मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला Amazon Prime वरील 15 सर्वोत्तम love webseries बद्दल माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती, हा लेख कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या देखील आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू.

पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

1 thought on “अॅमेझॉन प्राइम वरील बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज : Top 15 Best Romantic Hindi Web Series On Amazon Prime”

Leave a comment