Best Romantic Indian Web Series On Netflix | बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज – आपण जर NETFLIX वरील वेब सिरीजचे शौकीन असाल आणि तुम्ही मस्त हिंदी रोमँटिक सिरीज शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. बऱ्याच वेळा NETFLIX वापरताना आपल्या आवडीची मालिका शोधणे कठीण जाते. कारण नेटफ्लिक्सवर बऱ्यापैकी कन्टेन्ट उपलब्ध असून, आपल्याला नक्की जे पाहायचे आहे, त्या प्रकारच्या वेब सिरीज कुठे आहेत, ते शोधताना मात्र दमछाक होते. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत, दहा अप्रतिम रोमँटिक वेब सिरीजची यादी.
NETFLIX या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोमँटिक वेब सिरीज शौकिनांसाठी एका पेक्षा एक अतिशय सरस मालिका उपलब्ध आहेत. यात विनोदी, रहस्य, थ्रिलर अश्या रोमँटिक सिरिजही असून त्यातील आज आम्ही आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट दहा वेब सिरीजची यादी देत आहोत. यामध्ये लव्ह स्टोरी, लव्ह मिस्टरी, लव्ह ट्रँगल आणि इतर प्रकारच्या प्रणय मालिका तुम्हाला तासनतास व्यस्त ठेवतील.
नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक भारतीय वेब सिरीजचा विचार केल्यास, आम्ही नेटफ्लिक्सवरील हिंदी रोमँटिक मालिकांची यादी तयार केली आहे.
Best Romantic Hindi Web Series On Netflix | नेटफ्लिक्स बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज
#1. Kota Factory (2019)
#2. College Romance (2018)
#3. Little Things (2016)
#4. Decoupled (2021)
#5. Taj Mahal 1989 (2020)
#6. Yeh Kaali Kaali Ankhein (2022)
#7. Zindagi In Short (2020)
#8. The Fame Game (2022)
#9. Feels Like Ishq (2021)
#10. A Suitable Boy (2020)
#11. Mismatched (2020)
#12. Bhaag Beanie Bhaag (2020)
#13. What The Love (2020)
Best Romantic Indian Web Series On Netflix – बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज नेटफ्लिक्स
1 Kota Factory (2019)
16 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित झालेली कोटा फॅक्टरी ही अप्रतिम वेब सिरीज आहे. ही कथा आयआयटी परीक्षेच्या तयारीसाठी हॉस्टेलला राहणाऱ्या मुलांच्या जीवनावर आहे. या कथेला ब्लॅक अँड व्हाईट लूक देण्यात आला असूनही ही प्रचंड लोकप्रिय झालेली हळुवार लव्ह स्टोरी आहे. यामध्ये कॉलेज कॅम्पस, ट्युशन क्लासेस आणि त्यात फुलणारी अस्पष्टशी लव स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. या कथेत वैभव नायक असून तो JEE आणि NEET स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोटा येथे येतो. त्याने कॅम्पस लाइफ कसे एक्सप्लोर केले, मित्र बनवले आणि IIT मध्ये सामील होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले ते दाखवले आहे आणि त्यासोबत एक हळुवार प्रेमकथा ही आहे.
- रेटिंग: 9.1/10 IMDb
- सीझन: 2
- भाग: 10
- शैली: ड्रामा, कॉमेडी
- दिग्दर्शक: राघव सुब्बू
- लेखक: सौरभ खन्ना, संदीप जैन, अभिषेक यादव, पुनीत बत्रा,मनोज कलवानी.
- कलाकार: मयूर मोरे, आलम खान, रंजन राज, रेवती पिल्लई, जितेंद्र कुमार, उर्वी सिंह.
2 College Romance (2018)
कॉलेज रोमान्स ही नेटफ्लिक्सवरील रोमँटिक भारतीय वेब सिरीज आहे. ही मालिका 1 ऑक्टोबर 2019 रोजी रिलीज झाली. या कथेत तरुण पिढीतील कॉलेज रोमान्सचा समावेश आहे. कॉलेजमध्ये एकत्र शिकताना तीन मित्र प्रेम, हास्य आणि आयुष्यभराच्या आठवणी शोधतात. या वेब सीरिजला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले आहे.
- रेटिंग: 8.4/10 IMDb
- सीझन: 2
- भाग: 15
- शैली: प्रणय, विनोदी, नाटक
- दिग्दर्शन: सिमरप्रीत सिंग, पारिजात जोशी, अपूर्व सिंग कार्की
- लेखक: कुणाल अनेजा, अभिषेक श्रीवास्तव, मनन मदान, पंकज मावची, सिद्धांत मागो, आशुतोष चतुर्वेदी.
- कलाकार: मनजोत सिंग , गगन अरोरा , अपूर्व अरोरा , केशव साधना , श्रेया मेहता, हिरा आशर, शिवा कुमार
3 Little Things (2016)
नेटफ्लिक्स वर असलेली लिटिल थिंग्स ही भारतीय रोमँटिक वेब सिरीज असून याची कथा काव्या आणि ध्रुव या अविवाहित प्रेमीयुगूलावर आधारित आहे. हे दोघेही मुंबईत एकत्र राहतात. लीव्ह इन मध्ये असताना त्यांना येणारे प्रॉब्लेम्स आणि प्रेमकथा याचं अतिशय सुंदर चित्रीकरण या मालिकेत आहे. 25 ऑक्टोबर 2016 रोजी मालिका प्रदर्शीत करण्यात आली
अॅमेझॉन प्राइम वरील बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज
- रेटिंग: 8.2/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 29
- शैली: कॉमेडी, प्रणय
- दिग्दर्शन: सुमित अरोरा, रुचिर अरुण, अजय भुयान, प्रांजल दुआ.
- लेखक: ध्रुव सहगल, नुपूर पै, गरिमा पुरा, गौरव पत्की, अभिनंदन श्रीधर.
- कलाकार: मिथिला पालकर, लवलीन मिश्रा, ध्रुव सहगल, नवनी परिहार.
4 Decoupled (2021)
ही सिरिज 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झाली. अतिशय श्रीमंतीत असताना सुद्धा अभिमान हा एखाद्या जोडप्याला किती त्रासदायक ठरू शकतो आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचू शकते, या भोवती ही कथा फिरते. एका मोठ्या स्टार्टअपचा संस्थापक असलेल्या लेखकाच्या चुकीची आणि त्याच्या पत्नीची गोष्ट दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी सुंदर चित्रित केली आहे.
- रेटिंग: 7.9/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 8
- शैली: नाट्य, विनोदी, प्रणय
- दिग्दर्शक: हार्दिक मेहता
- लेखक: मनू जोसेफ
- कलाकार: सोनिया राठी, माधवन, सुरवीन चावला, दिलनाज इराणी,अतुल कुमार.
5 Taj Mahal 1989 (2020)
ताजमहल 14 फेब्रुवारी 2020 रोजी ओटीटी वर रिलीज झाली. ही कथा नव्वदच्या दशकातील प्रेमकथेवर आधारित आहे. या वेब सिरीजमध्ये अख्तर आणि सरिता यांची कथा, त्याचबरोबर सुधाकर आणि मुमताज यांची कथा आणि रश्मी आम्ही डरहम यांची प्रेमकथा, अशा एकूण तीन कथा आहेत. या तीनही प्रेम कथांच्या समस्या, त्यांची पार्श्वभूमी अतिशय भिन्न असून प्रेक्षकांच्या मनाचा या कथा ठाव घेतात. ही कथा 1989 मध्ये लखनौ विद्यापीठाभोवती फिरते, ज्यामध्ये सर्व वयोगटातील जोडपे लग्नाच्या माध्यमातून त्यांच्या प्रेमाचा शोध घेतात.
- रेटिंग: 7.4/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 7
- शैली: प्रणय, ड्रामा, कॉमेडी,
- दिग्दर्शक : पुष्पेंद्र नाथ मिश्रा
- लेखक: पुष्पेंद्र नाथ मिश्रा
- कलाकार: गीतांजली कुलकर्णी, शीबा चड्ढा, नीरज काबी, अनुद सिंग ढाका, दानिश हुसेन, अंशुल चौहान.
6 Yeh Kaali Kaali Ankhein (2022)
एका प्रथीतयश राजकारण्याच्या मुलीचे एका सामान्य मुलाशी प्रेम जुळते आणि त्यानंतर जो काही संघर्ष होतो तो या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आलेला आहे. थ्रिलर आणि रोमँटिक अशी ही वेब सिरीज सिद्धार्थ सेनगुप्ता, वरूण बडोला यांनी अप्रतिम दिग्दर्शित केली आहे. ये काली काली आंखें ही नेटफ्लिक्स इंडियावरील लव्ह वेब सीरिज आहे आणि 14 जानेवारी 2022 रोजी रिलीज झाली.
- रेटिंग: 7.1/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 8
- शैली: प्रणय, विनोदी, ड्रामा
- दिग्दर्शक: सिद्धार्थ सेनगुप्ता, रोहित जुगराज वरुण बडोला, अंकिता मैथी,
- लेखक: सिद्धार्थ सेनगुप्ता, वरुण बदला, अनाहत मेनन.
- कलाकार: श्वेता त्रिपाठी शर्मा, ताहिर राज भसीन, आंचल सिंग
7 Zindagi In Short (2020)
जिंदगी इन शॉर्ट ही हिंदी रोमँटिक वेब सिरीज आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना एका स्त्रीची होणारी कसरत, त्यामध्ये प्रेम, निरागसपणा, म्हातारपणाचा गोंधळ आणि कुटुंबाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारी स्त्री अशा अनेक पैलूंना उलगडून दाखवणारी ही वेब सिरीज मनाचा ठाव घेते.
- रेटिंग: 7.1/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 7
- शैली: नाट्य, विनोदी, प्रणय
- दिग्दर्शन: विनय छवाल, विजयेता कुमार, राकेश सैन, गौतम गोविंद शर्मा, ताहिरा कश्यप.
- लेखक: गौतम गोविंद शर्मा, चारुदत्त आचार्य.
- कलाकार: ईशा तलवार, निधी सिंग, संजय कपूर, दीपक डोबरियाल, दिव्या दत्ता, नीना गुप्ता, स्वरूप संपत.
8 The Fame Game (2022)
द फेम गेम ही नेटफ्लिक्स वरील सस्पेन्स लव्ह स्टोरी असून त्यामध्ये माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळतो. या वेब सिरीज मध्ये एक प्रसिद्ध असलेली सिनेस्टार अचानक गायब होते आणि तिच्या बेपत्ता होण्यामागचे उत्तर शोधताना काय काय सत्य बाहेर येते हे या सिरिज मध्ये दाखवलेले आहे. ही मालिका २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसारित झाली. या मालिकेची कथा बॉलिवूड उद्योगातील व्यक्तींच्या प्रवासावर आधारित आहे.
- रेटिंग: 7.0/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 8
- प्रकार: नाट्य, रहस्य
- दिग्दर्शक: श्री राव, बेजॉय नांबियार, करिश्मा कोहली
- लेखक: अक्षत घिलडियाल, निशा मेहता, श्री राव, निशा मेहता,
- कलाकार: संजय कपूर, माधुरी दीक्षित.
9 Feels Like Ishq (2021)
इश्क ही नेटफ्लिक्सवरील रोमँटिक हिंदी वेब सिरीज आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला अगदी अनपेक्षितपणे भेटता तेव्हा काय होते? प्रेमात पडण्याची भावना साजरी करण्यासाठी इश्क हा ६ अनोख्या प्रेमकथांचा संग्रह आहे. हा हृदयस्पर्शी गोड ओल्ड-स्कूल प्रणय तुम्हाला एक अस्पष्ट भावना, एक प्रचंड स्मित आणि कदाचित तुमच्या पहिल्या प्रेमाच्या स्मृती मार्गावर एक नॉस्टॅल्जिक ट्रिप देईल. रोहित सराफ, राधिका मदान, तान्या माणिकतला, अमोल पराशर, नीरज माधव, सिमरन जेहानी, काजोल चुघ, संजीता भट्टाचार्य, स्कंद ठाकूर, झेन मेरी खान, सबा आझाद, मिहिर आहुजा यांना फील्स लाइक इश्कमध्ये पहा
- रेटिंग: 6.4/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 6
- शैली: प्रणय, विनोदी, नाट्य
- दिग्दर्शन: जयदीप सरकार, दानिश अस्लम, रुचिर अरुण, आनंद तिवारी, ताहिरा कश्यप.
- लेखक: सुलग्ना चॅटर्जी, दानिश अस्लम, रित्विक जोशी, शुभ्रा चॅटर्जी.
- कलाकार: राधिका मदन, रोहित सराफ, नीरज माधव, कपिल शाह, तान्या माणिकतला.
10 A Suitable Boy (2020)
06 डिसेंबर २० रोजी प्रदर्शीत झालेली ही अतिशय अप्रतिम लव वेब सिरीज आहे. 2020 मध्ये झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये या वेब सिरीजने रायझिंग स्टार अवॉर्ड जिंकला होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ही कथा असून हिंदी साहित्याची विद्यार्थी असलेली लता आणि तिची आई त्यांच्याभोवती ही कथा फिरते. या कथेतील तीन पुरुष या मुलीचे मन जिंकायला प्रयत्न करतात आणि त्यातील गमती जमती या वेब सिरीज मध्ये चित्रित केल्या आहेत. ही Netflix India वरील ऊत्कृष्ट रोमँटिक मालिका आहे.
- रेटिंग: 6.0/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 6
- शैली: प्रणय, नाट्य
- दिग्दर्शन: शिमित अमीन आणि मीरा नायर
- लेखक: विक्रम सेठ, अँड्र्यू डेव्हिस.
- कलाकार: माहिरा कक्कर, तान्या माणिकतला, दानेश रझवी, रसिका दुगल, ईशान खट्टर, विवेक गोंबर.
11 Mismatched (2020)
20 नोव्हेंबर 2020 रोजी रिलीज झालेली मिस मॅच ही netflix वरील रोमँटिक वेब सिरीज आहे. या वेब सिरीजची कथा डिंपल या कादंबरीवर आहे. या कथेमध्ये ऋषी हा एक साधा रोमँटिक मुलगा असतो जो डिंपल नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो डिंपल ही ऑनलाइन गेमर असते आणि या दोघांची लव स्टोरी या वेबसिरिज मध्ये दाखवण्यात आलेली आहे.
- रेटिंग: 5.4/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 6
- शैली: कॉमेडी, प्रणय, नाट्य
- दिग्दर्शन: निपुण धर्माधिकारी आणि आकर्ष खुराना.
- लेखक: गजल धालीवाल, सुनयना कुमारी, अर्ष व्होरा, नेहा हुडा, वैभव एडके,
- कलाकार: प्राजक्ता कोळी, मुस्कान जाफेरी, विहान सामत, तारुक रैना, रोहित सराफ, देवयानी शौरी.
12 Bhaag Beanie Bhaag (2020)
04 डिसेंबर 2020 रोजी नेटफ्लिक्स वर आलेली भाग बिन्नी भाग ही हिंदी रोमांटिक कॉमेडी वेब सिरीज आहे. बिन्नी नावाची तरुण मुलगी आपले नॉर्मल लाईफ सोडून स्टॅंड अप कॉमेडीमध्ये करिअर बनवण्याचा निर्णय घेते. त्यात तिची होणारी दमछाक आणि लव्ह स्टोरी यावर वेब सिरीज आधारलेली आहे. ही मालिका तुम्हाला सर्वात जास्त हसवेल.
- रेटिंग: 4.3/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 6
- शैली: विनोदी
- दिग्दर्शक: डेबी राव, अबी वर्गीस, इशान नायर
- लेखक: नील शाह, रवी पटेल, निशा कालरा, देवश्री शिवडेकर.
- कलाकार: रवी पटेल, वरुण ठाकूर, डॉली सिंग, गिरीश कुलकर्णी, स्वरा भास्कर, मोना आंबेगावकर.
13 What The Love (2020)
Netflix वरील ही आणखी एक रोमँटिक भारतीय वेब सीरिज आहे. 30 जानेवारी 2020 रोजी रिलीज झाली. या मेकओव्हर डेटिंग कार्यक्रमात करण हा लव्ह गुरू आणि सायकोथेरपिस्ट आहे, कॉमेडियन, सादरकर्ते आणि अभिनेते, तसेच स्टायलिस्ट (मनेका हरिसिन्हानी) आणि ब्युटीशियन (शान मुतातील) यांच्यासोबत गप्पा आणि गोष्टी छान आहेत.
- रेटिंग: 3.8/10 IMDb
- सीझन: 1
- भाग: 7
- शैली: प्रणय, माहितीपट.
- दिग्दर्शन: निशांत नायक, ओंकार पोतदार
- कलाकार: करण जोहर, साहिल ब्राउन, समक्ष सुदी, रमीझ रिझवी.
रोमँटिक वेब सिरीज निष्कर्ष : Conclusion
मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला netflix वरील 13 सर्वोत्तम love webseries बद्दल माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती, हा लेख कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या देखील आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू.
पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.