नाग पंचमी 2023 पूजा विधि | nag panchami puja vidhi :- पंचांगानुसार नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला साजरी केली जाते. यावर्षी नागपंचमीचा हा शुभ सण इंग्रजी कॅलेंडर नुसार 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे. नागपंचमीला भगवान श्री शंकराच्या पूजेबरोबरच गळ्यात शोभणाऱ्या नागदेवतेची विधिवत पूजा केली जाते. सापाची पूजा केल्याने सर्पदंशाची भीती राहत नाही, असे मानले जाते. यासोबतच या पूजेने गृहकलह, संतती, पित्रदोष वगैरे समस्याही संपतात असे मानले जाते.
या दिवशी नागदेवतेची पूजा (NAG PANCHAMI POOJA) केल्याने भक्तांना शिव शंभुंचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक शास्त्रांमध्ये नागदेवतेच्या पूजेसाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धत सांगण्यात आली आहे. त्या नियमांनुसार नागदेवतेची पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते. नागपंचमीला नागदेवतेची पूजा कोणत्या पद्धतीने करावी ते आपण जाणून घेऊया.
नाग पंचमी पूजा विधि 2023| nag panchami puja vidhi
ऑगस्ट महिन्यामध्ये साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी अधिक महिना आलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणारी ही नागपंचमी कधी आहे? आणि या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? हे जाणून घेऊया.
नाग पंचमी 2023 मुहूर्त (nag panchami 2023 muhurat)
- तारीख – २१ ऑगस्ट २०२३
- मुहूर्त – सकाळी ०६.२१ ते ०८.५३ पर्यंत
- राहुकाल – सकाळी ०७.५६ ते ०९.३१ पर्यंत ( या काळात पूजा करू नये.)
इतर मुहूर्त
- ब्रह्म मुहूर्त – पहाटे ०४.५१ ते ०५.३६ पर्यंत
- अभिजीत मुहूर्त – दुपारी १२.१६ ते ०१.०७ पर्यंत
- विजय मुहूर्त – दुपारी ०२.४८ ते ०३.३९ पर्यंत
- संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी ०७.०२ ते ०७.२५ पर्यंत
- अमृत काळ – संपूर्ण दिवस
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा का करावी?
असे मानले जाते की, नाग विषारी आणि भीतीदायक असा प्राणी आहे. तो डूख धरतो आणि मनुष्याला दंश करतो. परंतु हा समज वैज्ञानिक दृष्ट्या खरा नाही. सापाच्या खूप कमी जाती विषारी असतात आणि ज्यावेळी आपल्याकडून त्याला धोका निर्माण होतो त्याचवेळी आपल्याला हा दंश करतो. सापाला पाहताच तो आपल्याला दंश करू नये म्हणून त्या आधीच आपल्या मनामध्ये त्याला मारण्याची भावना निर्माण होते.
या पूजेद्वारे आपल्या मनातील उगाच असलेली भीती आणि वाईट भावना दूर करण्यासाठी या दिवशी त्याची विधिवत पूजा केली जाते. त्याच्यावर अभिषेक करून त्याला सुगंधी फुले, त्याचप्रमाणे लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी गाणी वगैरे म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
नागपंचमीची पूजा का करावी?
- या दिवशी कृष्णाने कालिया नागाचे मर्दन यमुनेच्या डोहामध्ये करून गावातील लोकांना या कालियापासून सुरक्षित केले होते म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
- ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष आहे त्याच्यावरील कालसर्प दोषाचा प्रभाव निघून जातो असा समज आहे.
- आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे आणि घरामध्ये शांतता नांदावी यासाठी घरातील स्त्रिया ही पूजा करतात.
- नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी
- ही पूजा केल्यामुळे सर्पदोष होत नाही असे देखील सांगितले जाते.
- आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी नागपंचमीची पूजा करतात.
- असे म्हटले जाते की, नाग हा धनाची रक्षा करतो. त्यामुळे घरातील संपत्तीचे धनाचे रक्षण व्हावे यासाठी नागपंचमीची पूजा केली जाते.
- ज्या व्यक्तींच्या स्वप्नामध्ये सारखे साप दिसत असेल त्यांनी ही पूजा केली तर त्यांची नागाबाबतची भीती नाहीशी होते असे म्हटले जाते. म्हणून ही पूजा केली जाते.
- आपल्या भावाच्या उत्तम तब्येतीसाठी, आरोग्यासाठी तसेच त्याच्या सुखशांतीसाठी बहिणी ही पूजा करतात.
नागपंचमी पूजा कशी करावी ?
- या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठावे. संपूर्ण घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे परिधान करावे.
- घरातील देवाची अभिषेक आणि पूजा करावी. घराच्या आजूबाजूला असल्यास कोणत्याही वारुळाची पूजा करावी.
- या दिवशी घरामध्ये नागाचे चित्र काढावे. शहरी भागांमध्ये पाटावर नागाची मातीची मूर्ती आणून त्याची पूजा करावी.
- देवापुढे ठेवलेला प्रसाद हा सगळ्यांना वाटावा.
- ग्रामीण भागातील लोक या दिवशी झाडाला झोके बांधून झोके घेतात. त्याचप्रमाणे पूजा करण्याआधी स्त्रिया हाताला मेंदी लावतात.
- या दिवशी फुगड्या,नाच यांचा फेर धरून गाणी म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवशी मोठ्या जत्रा देखील भरल्या जातात.
नागपंचमी दिवशी काय करावे?
- या दिवशी कडक उपवास करून पूजा आणि अभिषेक केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि आरोग्य लाभते.
- या दिवशी आपण नागाची पूजा केल्यामुळे या रूढी, परंपरा पुढच्या पिढीला समजतात आणि त्या तशाच पुढे चालवल्या जातात.
- या दिवशी सात्विक भोजनाचा आहारामध्ये समावेश करावा.
- या दिवशी मातीची नागाची मूर्ती आणावी आणि त्याची पूजा करावी किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
- या दिवशी यथासांग पूजा करून मंत्राचा जप करावा.
नागपंचमी दिवशी काय करू नये?
- या दिवशी कुऱ्हाड, किंवा धारदार अवजाराने कोणतीही झाडे तोडू नयेत.
- या दिवशी शेतातील जमीन खणण्याचे कोणतेही काम करू नये.
- या दिवशी मांस, मटन तसेच मद्याचा आहरात समावेश करू नये.
- शिवणकामाविषयी कोणतेही काम करू नये.
- लोखंडी भांड्यामध्ये किंवा तव्यामध्ये कोणतेही पदार्थ शिजवू नयेत.
- या दिवशी जेवण करताना विळीवर काहीही चिरू नये, तसेच पदार्थ तळू नयेत.
नागपंचमी पूजा साहित्य
ताम्हण, पळी, पंचपात्रे,घंटा, हळदी कुंकवाचा करंडा, अक्षता, विडा, नारळ, तांदूळ, फुले, बेल, दूध, लाह्या, जानवे जोड, अगरबत्ती, धूप, निरंजन, समई, पाट, गुळ किंवा साखर, चंदन, रांगोळी, कापसाचे वस्त्र इत्यादी
नागपंचमी पूजाविधी (NAG PANCHAMI POOJA)
- सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी.
- त्यानंतर एका पाटावर अक्षता ठेवून मातीच्या नागाच्या मूर्तीची स्थापना करावी.
- पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी.
- उजव्या बाजूला समय पेटवून घ्यावी.
- नंतर एका बाजूला गणेश पूजन करून घ्यावे.
- पाटाजवळ विडा ठेवावा. नागाला जानवे जोड घालावे.
- नंतर नागाला दुधाचा अभिषेक करावा.
- त्यानंतर हळद, चंदन लावून अक्षता वाहून फुले, बेल आणि कापसाची वस्त्रे वहावीत.
- नंतर लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा.
- घंटा वाजवून निरांजन आणि अगरबत्ती ने ओवाळावे.
- नंतर देवाला धूप दाखवून नागदेवतेचा मंत्र म्हणून कथा वाचावी.
- नंतर आरती करून घरातील नैवेद्य दाखवावा.
नागपंचमी पूजेची सांगता – nag panchami 2023
- संध्याकाळी ०५.०० च्या दरम्याने नाग देवाची पुन्हा पूजा करावी.
- त्यानंतर पूजेमध्ये काही राहून गेल्यास तशी क्षमा मागून आशीर्वाद घ्यावा.
- प्रार्थना करावी.
- यानंतर उत्तरपूजेची अक्षता वाहून नाग देवाला विसर्जनसाठी घेऊन जावे.
- जाताना निर्माल्य सुद्धा पाण्यात सोडावे.
- सगळ्यांना प्रसाद वाटप करावे.
FAQ
नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी केली जाते?
नागाची विधिवत पूजा करताना सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी. त्यानंतर एका पाटावर अक्षता ठेवून मातीच्या नागाच्या मूर्तीची स्थापना करावी. पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी. उजव्या बाजूला समय पेटवून घ्यावी. नंतर एका बाजूला गणेश पूजन करून घ्यावे. पाटाजवळ विडा ठेवावा. नागाला जानवे जोड घालावे. नंतर नागाला दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर हळद, चंदन लावून अक्षता वाहून फुले, बेल आणि कापसाची वस्त्रे वहावीत. नंतर लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा. घंटा वाजवून निरांजन आणि अगरबत्ती ने ओवाळावे. नंतर देवाला धूप दाखवून नागदेवतेचा मंत्र म्हणून कथा वाचावी. नंतर आरती करून घरातील नैवेद्य दाखवावा.
नागपंचमीला काय अर्पण करावे?
नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यादवाशी शिवमंदिरात जाऊन नाग देवतेला दूध , धोतरा फुले आणि चंदनापासून बनवलेल्या ७ माळा अर्पण कराव्या. याशिवाय भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अर्क, फुले, धतुरा, फळे आणि दूध अर्पण करून दुधाने रुद्राभिषेक करावा
नागपंचमीला काय करू नये?
या दिवशी कुऱ्हाड, किंवा धारदार अवजाराने कोणतीही झाडे तोडू नयेत. या दिवशी शेतातील जमीन खणण्याचे कोणतेही काम करू नये. या दिवशी मांस, मटन तसेच मद्याचा आहरात समावेश करू नये. शिवणकामाविषयी कोणतेही काम करू नये. लोखंडी भांड्यामध्ये किंवा तव्यामध्ये कोणतेही पदार्थ शिजवू नयेत. या दिवशी जेवण करताना विळीवर काहीही चिरू नये, तसेच पदार्थ तळू नयेत.
नागपंचमीच्या दिवशी काय खाऊ नये?
पालेभाज्यांचे सेवन करणे टाळावे. या दिवशी मांस, मटन तसेच मद्याचा आहरात समावेश करू नये. लोखंडी भांड्यामध्ये किंवा तव्यामध्ये कोणतेही पदार्थ शिजवू नयेत. या दिवशी जेवण करताना विळीवर काहीही चिरू नये, तसेच पदार्थ तळू नयेत. तथापि, आवश्यक असल्यास, ते कापल्याशिवाय शिजवावे. साप किंवा इतर कोणत्याही सजीव प्राण्याला इजा करू नये.
नागपंचमीची पूजा कशी करायची
नागाची विधिवत पूजा करताना सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी. त्यानंतर एका पाटावर अक्षता ठेवून मातीच्या नागाच्या मूर्तीची स्थापना करावी. पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी. उजव्या बाजूला समय पेटवून घ्यावी. नंतर एका बाजूला गणेश पूजन करून घ्यावे. पाटाजवळ विडा ठेवावा. नागाला जानवे जोड घालावे. नंतर नागाला दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर हळद, चंदन लावून अक्षता वाहून फुले, बेल आणि कापसाची वस्त्रे वहावीत. नंतर लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा. घंटा वाजवून निरांजन आणि अगरबत्ती ने ओवाळावे. नंतर देवाला धूप दाखवून नागदेवतेचा मंत्र म्हणून कथा वाचावी. नंतर आरती करून घरातील नैवेद्य दाखवावा.
निष्कर्ष
आजच्या या लेखामध्ये नागपंचमी पूजा काशी करावी याबद्दल माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. या लेखांमध्ये काही चुका आढळल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद