पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून हिजबुल दहशतवादी मुदस्सीर हुसैन आणि जावेद मट्टू यांच्या घरावर फडकला तिरंगा, पहा व्हायरल व्हिडिओ

मी मनापासून तिरंगा फडकवत आहे, माझ्यावर कोणतेही दडपण नाही. सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तानहमारा, हम बुलबुला हैं इसकी, ये गुलसिंता हमारा. येथे विकास होत आहे –रईस मट्टू

स्वतंत्र भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. अगदी छोट्या खेडोपाड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत हर घर तिरंगा ची धूम आहे आणि त्यात काश्मीरमधील कलम 375 सुद्धा रद्दबातल झाले आहे.

हर घर तिरंगा

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टूचा भाऊ रईस मट्टू त्याच्या घराच्या बाल्कनीतून तिरंगा फडकवताना दिसत आहे. रईसने जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील आपल्या घरी तिरंगा फडकावला. त्याचप्रमाणे किश्तवाडमधील आणखी एक हिजबुल दहशतवादी मुदस्सीर हुसैनचे कुटुंबीयही ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग बनले आहेत.

हर घर तिरंगा

जावेद मट्टू हा हिजबुलचा सक्रिय दहशतवादी आहे. भारताच्या दृष्टीने तो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानात मुक्कामाला आहे. त्याचा भाऊ रईस मट्टूने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्याने मनापासून तिरंगा ध्वज फडकवला. हे त्यांने स्वतःच्या इच्छेने केले आहे. यासाठी त्याच्यावर कोणताही दबाव नव्हता. रईस म्हणाले की, मी संपूर्ण देशाला संदेश देतो की त्यांनी काश्मीर खोऱ्यात यावे. इथे खरोखरच स्वर्ग आहे.

रईस मट्टू म्हणाले

“मी माझ्या मनापासून तिरंगा फडकवत आहे, माझ्यावर कोणतेही दडपण नाही. सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा, हम बुलबुला हैं इंसे, ये गुलिस्तान हमारा. येथे विकास होत आहे. 14 ऑगस्टला मी माझ्या दुकानात पहिल्यांदा बसलोय, पण पहिले 2-3 दिवस सगळं बंद होतं. पूर्वी सत्तेत असलेले पक्ष केवळ खेळ खेळायचे. माझा भाऊ 2009 मध्ये त्यांच्यापैकी एक (दहशतवादी) बनला. तेव्हापासून तो कसा आहे, कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. जर तो जिवंत असेल तर मी त्याला परत येण्याचे आवाहन करतो. आता गोष्टी बदलल्या आहेत. पाकिस्तान काहीही करू शकत नाही. आम्ही भारतीय होतो, आहोत आणि राहू.

दहशतवादी मुदस्सीर हुसेनच्या कुटुंबीयांनी आवाहन केले –

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी मुदस्सीर हुसैनच्या कुटुंबीयांनी किश्तवाड येथील त्यांच्या घरी तिरंगा फडकावला. हुसैनचे वडील तारिक म्हणाले की, “आम्ही आमच्या घरावर राष्ट्रध्वज फडकावला आणि प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे.” हुसैनच्या आईने सांगितले की, “आम्ही त्याचा पत्ता शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही. सैन्याने त्याला आमच्यासाठी शोधले पाहिजे, कारण आम्हाला तो परत हवा आहे.” हुसैन हा खोऱ्यातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक असून त्याच्यावर २० लाखांचे बक्षीस आहे.

Leave a comment