श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी : SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी : SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE – जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंगे आहेत. पण या सर्वांमध्ये भारतातील बारा ज्योतिर्लिंगे ही प्रमुख ज्योतिर्लिंगे असून गुजरात राज्यातील, द्वारकाधाम या शहरापासून जवळपास १७ किलोमीटरच्या अंतरावर गुजरात मधील दुसरे आणि संपूर्ण भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे असणारे ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात होय. या श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग चा इतिहास, या मंदिराची पौराणिक कथा काय आहे? आज आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे नागेश्वर मंदिर माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. पाहूया श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी

SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

Table of Contents

SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE । श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

नावश्री नागेश्वर
स्थान भगवान शंकर
दुसरे नावश्री नागनाथ, नागेश्वर महादेव
ठिकाण द्वारकाधाम
राज्य गुजरात
कितवे ज्योतिर्लिंग दहावे
स्थापनापांडवकालीन
जीर्णोद्धार१९९६ गुलशन कुमार
शिवमुर्तीची उंची१२५ फूट उंच आणि २५ फूट रुंद

नागेश्वर मंदिराचा इतिहास

नागेश्वर मंदिराच्या इतिहासाविषयी असे म्हटले जाते की, हे मंदिर द्वापार युगात पांडव बांधवांनी बांधले होते. परंतु या मंदिराचा जिर्णोद्धार आणि सध्याच्या स्वरूपातील बांधकाम टी सिरीजचे मालक दिवंगत श्री गुलशन कुमार यांनी सन १९९६ मध्ये सुरू केले होते पण या बांधकामाच्या दरम्यान त्यांच्या अकाली निधनानंतर या मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी त्यांचे सुपुत्र भूषण कुमार यांनी पाहिली.

नागेश्वर ज्योतिर्लिंग नकाशा

नागेश्वर मंदिर माहिती

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे गुजरात मधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर गोमती द्वारका आणि बेट द्वारका यांच्या दरम्यानच्या मार्गावर हे नागेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला नागनाथ मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

इतर नागेश्वर मंदिराप्रमाणे या ठिकाणचे लिंग दक्षिणेकडे आहे. नागेश्वर मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्या परिसरातील भगवान शंकराची ८० फूट उंचीची विशाल मूर्ती. हिंदू वास्तूकलेचे एक वैशिष्ट्यपूर्ण असे हे मंदिर आहे. नागेश्वराचे शिवलिंग हे दगडाचे बनवलेले आहे. ज्याला द्वारकाशीला म्हणून ही ओळखले जाते. त्यावर लहान चक्रे आहेत. हे तीन मुखी रुद्राक्षाच्या आकारात आहे.

🙏श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – उज्जैन 🙏

नागेश्वर नावाचा अर्थ

भगवान शंकरांच्या हजारो नावांमध्ये एक नाव नागेश्वर देखील आहे. नागांचा देव म्हणजेच “नागेश्वर” होय. भगवान शंकरांच्या गळ्यात नागदेवता नेहमीच वास करत असते. म्हणून या ठिकाणच्या मंदिराला नागेश्वर हे नाव पडले असावे असे समजले जाते.

श्री नागेश्वर मंत्र

याम्ये सदङ्गे नगरेऽतिरम्ये
विभूषिताङ्गं विविधैश्च भोगैः ।
सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकं
श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये ॥

श्री नागेश्वर मंत्राचा अर्थ – जे देशाच्या दक्षिणेकडील भागात किंवा अतिशय सुंदर आणि नानाविध भोगांनी संपन्न, सुंदर अलंकारांनी सजलेल्या अश्या शहरामध्ये स्थायिक झाले आहेत. त्या धार्मिकता आणि तारणहार अश्या भगवान श्रीनागनाथाच्या आश्रयाला मी जातो.

नागेश्वर मंदिर कोठे आहे? आणि कसे जायचे?

गुजरात राज्यातील द्वारका नगरी पासून जवळपास १७ किलोमीटरच्या अंतरावर हे श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. गुजरात राज्य हे विकसित राज्यांपैकी एक असे असणारे शहर असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय महामार्गांनी गुजरात जोडला गेला आहे. त्यामुळे विमान, ट्रेन, बस याद्वारे आपण सहज या ठिकाणी पोहोचू शकतो.

🙏चौथे ज्योतिर्लिंग : श्री ओंकारेश्वर 🙏

विमान

नागेश्वर मंदिराजवळचे सर्वात जवळचे विमानतळ हे पोरबंदर असून या ठिकाणाहून जवळपास १२५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथून मंदिरापर्यंत तुम्ही टॅक्सी किंवा कॅबद्वारा थेट नागेश्वर ज्योतिर्लिंग पर्यंत पोहोचू शकता. जामनगर विमानतळ हे नागेश्वर मंदिरापासून जवळपास १३१ किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुमच्या शहरापासून विमानतळावर उड्डाण नसेल तर तुम्ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊ शकता. या ठिकाणी नियमित उड्डाणे उपलब्ध आहेत.

ट्रेन

नागेश्वर या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही. नागेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी द्वारका किंवा ओखा या रेल्वे स्थानकावर उतरावे लागते. तुमच्या ठिकाणाहून द्वारका किंवा ओखाला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध नसतील तर तुम्ही राजकोट, जामनगर किंवा अहमदाबाद या ठिकाणाहून देखील येऊ शकता. कारण या ठिकाणाहून रेल्वे मार्ग संपूर्ण देशभर पसरलेले आहेत. द्वारका रेल्वे स्टेशन वरून नागेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत घेण्यासाठी साधारणपणे १५ किलोमीटरचे अंतर असून जवळपास २० मिनिटांचा वेळ लागतो. तसेच आणखी जवळ असणारे दुसरे ओखा रेल्वे स्टेशन पासून नागेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी जवळपास २० किलोमीटरचे अंतर असून ३७ मिनिटांचा वेळ लागतो.

बस

द्वारका आणि जवळपासच्या शहरांमधून अनेक सरकारी आणि खाजगी एसी नॉन एसी बस सेवा या ठिकाणी येण्यासाठी उपलब्ध आहेत. द्वारका बस स्टेशन वरून मंदिरापर्यंत येण्यासाठी जवळपास १७ किलोमीटरचे अंतर असून २१ मिनिटांचा वेळ लागतो या ठिकाणी तुम्ही कॅब किंवा ऑटो ने येऊ शकता.

मुख्य शहर ते नागेश्वर मंदिर अंतर

  • पुणे ते नागेश्वर मंदिर अंतर १०६३ किलोमीटर
  • जामनगर ते नागेश्वर मंदिर अंतर १३१ किलोमीटर
  • अहमदाबाद ते नागेश्वर मंदिर अंतर ४४० किलोमीटर
  • द्वारका ते नागेश्वर मंदिर अंतर १७ किलोमीटर
  • ओखा ते नागेश्वर मंदिर अंतर २० किलोमीटर
  • मुंबई ते नागेश्वर मंदिर अंतर ९३४ किलोमीटर
SHRI NAGESHWAR TEMPLE
SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI । श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी

नागेश्वर मंदिरात राबवले जाणारे उत्सव

भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरामध्ये बऱ्यापैकी सण उत्सव साजरे केले जातात. या मंदिरामध्ये साजरे केले जाणारे काही सण खालील प्रमाणे –

श्रावण महिना

हिंदू कॅलेंडरच्या पाचव्या महिन्यात मध्ये हा श्रावण महिना येतो. म्हणजेच जुलै- ऑगस्टच्या दरम्याने हा श्रावण महिना चालू असतो. या महिन्यामध्ये संपूर्ण मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई केली जाते. तसेच रुद्र मंत्रांचा जप अभिषेक पूजाअर्चा केली जाते.

महाशिवरात्री

फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च च्या सुरुवातीला ही महाशिवरात्री येते. भगवान शंकराने माता-पार्वतीशी या दिवशी विवाह केला होता असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस कठोर पूजा, भजन, अभिषेक तसेच कडक उपवास करून रात्र जागवून केला जातो. या दिवशी येणारे भावीक लिंगाला फुलांनी सजवतात तसेच दुधाचा अभिषेक देखील या ठिकाणी केला जातो.

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी

🙏पाचवे ज्योतिर्लिंग : श्री परळी वैजनाथ 🙏

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचे वेळापत्रक

हे मंदिर सकाळी सहा वाजता उघडते आणि रात्री नऊ वाजता बंद होते. या ठिकाणी होणारे विधी आणि आरती साठी तेथील भक्तगण आणि येणारे भाविक सहभागी होऊ शकतात.

  • सकाळी – ६.०० ते रात्री ९.०० दर्शन
  • शृंगार दर्शन – संध्याकाळी ४.०० ते संध्याकाळी ४.३०
  • शयन आरती – संध्याकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.३०
  • रात्रीची आरती – रात्री ८.३० ते रात्री ९.००

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग पूजा विधि

लघु रुद्र पूजा

आरोग्य आणि धन दौलताच्या समस्यांच्या निराकरणासाठी हा अभिषेक आणि पूजा केली जाते. तसेच पत्रिकेतील ग्रहांचे नकारात्मक प्रभावही या अभिषेक पूजेमुळे दूर होतात.

रुद्राभिषेक

हा अभिषेक पंचामृत अर्पण करून तसेच काही मंत्र, श्लोक यांचा जप करून केला जातो. असे म्हटले जाते की, जेव्हा भगवान शंकर रुद्रावतारात असतात तेव्हा ही पूजा करतात. अभिषेक पात्रामधून पडल्या जाणाऱ्या पाण्याने येथील शिवलिंग धुतले जाते.

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देण्याचा वेळ आणि प्रवेश शुल्क

नागेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च यादरम्यानचा काळ हा उत्तम समजला जातो. या महिन्यांमध्ये हवामान देखील आल्हाददायक असते. तसेच भक्तांच्या गर्दीमुळे या काळात त्रास होत नाही. एप्रिल मे च्या काळामध्ये या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण खूप असते तसेच जून पासून जवळपास पावसाचे सरासरी प्रमाण सुद्धा अधिक असते. म्हणून ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी योग्य समजला जातो.

या मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. ज्या भाविकांना अभिषेक करायचा असेल त्या भाविकांना साधारणपणे दीडशे ते अडीजशे पर्यंतची पावती करावी लागते.

नागेश्वर मंदिराचे वैभव

द्वारका नगरीच्या सीमेवर असलेले अतिशय प्राचीन असे हे नागेश्वराचे शिवमंदिर आहे. नागेश्वर म्हणजे सापांचा देव. तसेच अनेक दोषापासून मुक्ती करून देणारा देव म्हणूनही ओळखले जाते. रुद्र संहितेत भगवान शंकराचे वर्णन हे दारूकावन नागेश्वर असे केलेले आहे. हे पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. नागेश्वर या गुजरातमधील ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त इतर प्रार्थना स्थळे देखील आहेत. जागेश्वर अल्मोडा, उत्तराखंड आणि औंध, महाराष्ट्र या ठिकाणी नागेश्वराची प्रार्थना स्थळे आढळून येतात.

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर

मंदिर परिसरामध्ये भगवान शंकराची ध्यानस्थ मुद्रेतील जवळपास १२५ फूट उंच आणि २५ फूट रुंद अशी विशाल मूर्ती पद्मासनात बनवण्यात आलेली आहे. तेथे गेल्यानंतर छोटी छोटी दुकाने दिसून येतात. या ठिकाणी तुम्ही पूजेचे साहित्य फुले, बेलपत्र, प्रसाद इत्यादी घेऊ शकता. पुढे गेल्यानंतर एक सभागृह तो येथे गर्भगृह सभा मंडपापेक्षा खालच्या स्तरावर आहे. तेथून पुढे तळघर सारख्या गर्भगृहांमध्ये श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपल्याला घडते. नागेश्वर शिवलिंगाची स्थापना ही गोल आणि काळ्या पाषाणापासून बनवलेल्या त्रिमूर्ती रुद्राक्षाच्या स्वरूपात आपल्याला दिसून येते. या शिवलिंगावर चांदीचे आवरण घालून चांदीची नागाची मूर्ती बनवलेली आहे. या शिवलिंगाच्या पाठीमागे पार्वतीची सुंदर मूर्ती बनवली आहे.

श्री नागेश्वर मंदिराचे महत्त्व

भक्तांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणी भगवान शंकराची प्रार्थना केल्यावर ते विषापासून म्हणजे नकारात्मक गोष्टींपासून मुक्त होतात. या मंदिराचे लिंग हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण ते द्वारका शिला म्हणून ओळखले जाणाऱ्या दगडापासून बनवलेली आहे. याचे शिवलिंग हे दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे तोंड करतात. याची एक कथा देखील सांगितली जाते. नामदेव हे भगवान शंकरांच्या भक्तांपैकी एक असे होते.

एके दिवशी त्यांच्या पुतळ्यासमोर ते भजन गात होते. जेव्हा त्यांनी इतर भक्तांना बाजूला होण्यास सांगितले आणि परमेश्वराचे दर्शन रोखू नका तसेच त्यांनी अशी दिशा मागितली ज्या ठिकाणी भगवान शंकर नाही. यामुळे संतप्त झालेल्या आजूबाजूच्या भक्तांनी त्याला रागाच्या भरात दक्षिण दिशेला सोडले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवलिंग अचानक दक्षिणेकडे सरकले तर गोमूगम पूर्वेकडे झाले.

श्री नागेश्वर मंदिराचे बांधकाम

भगवान शंकराच्या या दहाव्या ज्योतिर्लिंगाचे बांधकाम अप्रतिम पद्धतीने करण्यात आले आहे. नागेश्वर मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या खालच्या भागावर भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या ज्योतिर्लिंगाच्यावर भगवान शंकराचा एक मोठा चांदीचा नाग बसवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या अप्रतिम ज्योतिर्लिंगा मागे माता-पार्वतीची ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे आधुनिक पद्धतीने अप्रतिम सौंदर्याने बांधले गेलेले आहे.

🙏सहावे ज्योतिर्लिंग : श्री भीमाशंकर 🙏

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराबाबत काही मनोरंजक गोष्टी

वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करून पाश्चात्यशैलीमध्ये बांधले गेलेले या ज्योतिर्लिंगाची योजना ही मानवी शरीराच्या झोपण्याच्या अवस्थेमध्ये केली आहे. हे मंदिर पाच भागांमध्ये विभागले जाते.

  • महाद्वार – मंदिराच्या मुख्य दरवाजांमधून पायऱ्यांमधून भाविक प्रवेश करतात.
  • प्रवेशद्वार – या प्रवेशद्वारावर भगवान हनुमान आणि भगवान गणेशाच्या दोन पवित्र मूर्ती आहेत.
  • सभामंडप – या ठिकाणी असणारे हे सभामंडप मुख्य प्रार्थना गृहाचे प्रतीक मानले जाते.
  • अंतराळ – या ठिकाणी भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे पूजा स्थान आहे.
  • गर्भगृह – मंदिराचे मुख्य शिवलिंगाचे निवासस्थान या ठिकाणी आहे.

हे मंदिर दक्षिणेकडे तर गोमूखाचे तोंड पूर्वेकडे आहे.

श्री नागेश्वर मंदिराबाबत काही महत्वाच्या गोष्टी

  • हे ज्योतिर्लिंग द्वारका शहरापासून १७ किलोमीटर अंतरावर आहे.
  • या मंदिरामध्ये दलाल किंवा लोभी पंडित दिसून येत नाही.
  • या मंदिरामध्ये दर्शनासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो.
  • दर्शनासाठी ड्रेस कोड नाही जर तुमचा अभिषेक करायचा असेल तरच पुरुषांना धोतर नेसावे लागते ते चेंजिंग रूममध्ये मंदिरा मार्फत उपलब्ध करून दिले जाते आणि ते मोफत असते.
  • दर्शनाला दुरूनच परवानगी असते परंतु अभिषेकासाठी तुम्हाला आतील भागांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाते.
  • या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकरांची एक मोठी पद्मासन अवस्थेतील मूर्ती दिसून येते. पाच-सहा किलोमीटरच्या अंतरावरून सुद्धा तुम्हाला ही मूर्ती दिसून येते.

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील नियम

  • मंदिरामध्ये अभिषेक करताना पांढरे वस्त्र परिधान करावे लागते.
  • अभिषेकच्या वेळीच मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाण्यासाठी परवानगी दिली जाते.
  • मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांनी आपल्या चपला, शूज बाहेर काढून ठेवावे.
  • मंदिरामध्ये शांतता राखावी तसेच कोणत्याही प्रकारचा अनादर करू नये.
  • मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई केलेली आहे.

ड्रेसकोड :-

या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ड्रेस कोड नाही. भाविकांनी आपल्याला शोभतील असे कपडे घालून घेणे आवश्यक आहे.मंदिरामध्ये अभिषेक करावयाचा असल्यास पुरुषांनी पांढरे धोतर किंवा लुंगी आणि महिलांनी साडी नेसणे आवश्यक आहे. अभिषेक करताना लागणारे धोतर हे मंदिरा मार्फत देखील मोफत दिले जाते. तसेच अभिषेक हा गंगेच्या पाण्याने या ठिकाणी केला जातो ते पाणी देखील मंदिरा मार्फत देण्यात येते.

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग

श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळील पर्यटन स्थळे

नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ भेट देण्यासाठी संपूर्ण वर्षभरात जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. या मंदिराच्या आजूबाजूला देखील अनेक पर्यटन स्थळे आहे. ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता ती खालील प्रमाणे –

१. द्वारका बेट

द्वारकेच्या मुख्य शहरापासून जवळपास 30 किलोमीटरच्या अंतरावर हे एक लहान बेट आहे. काही मंदिरे पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा आणि प्रवाळ खडकांनी वेढलेला असे हे बेट आहे. हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये समुद्र सहल, कॅम्पिंग, पिकनिक, सागरी जीवन यासाठी देखील लोकप्रिय आहे या ठिकाणी तुम्ही वॉटर स्पोर्ट्स चा ही आनंद घेऊ शकता.

२. द्वारकाधीश मंदिर

द्वारकाधीश मंदिराला जगत मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित असे चालुक्य स्थापत्यशैलीमध्ये बनवलेले मंदिर आहे. या मंदिराची इमारत ही पाच मजली असून चुनखडी आणि वाळुने हे संपूर्ण मंदिर अप्रतिम अशा पद्धतीने बांधले गेले आहे. या मंदिरामध्ये सुभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुक्मिणी आणि इतर अनेक देवतांना समर्पित आहेत. इतर दिवशी आहे या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी येणारे भाविक गोमती नदीमध्ये स्नान करतात. जन्माष्टमीच्या पूर्व संध्येला या कृष्ण मंदिरामध्ये खास पूजाअर्चा, प्रार्थना केली जाते.

🙏श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग 🙏

३. दीपगृह

या मंदिराजवळ असणाऱ्या या दीपगृहाचे १५ जुलै १९६२ रोजी उद्घाटन करण्यात आले. या लाईट हाऊसची उंची जवळपास ४३ किलोमीटर इतकी आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक सूर्यास्ताच्या विहंगमदृश्याचा या ठिकाणी आनंद घेऊ शकतात.

४. द्वारका बीच

द्वारका बीच हे शहराच्या मुख्य मंदिराच्या अगदी जवळ आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असणारा हा द्वारकाधीश एखादी संध्याकाळ घालवण्यासाठी असे छानसे ठिकाण तेथील स्थानिक आणि पर्यटकांसाठी लोकप्रिय आहे.

५. रुक्मिणी देवी मंदिर

द्वारका शहरातील एक अतिशय महत्त्वाचे असे हे रुक्मिणी मंदिर आहे. जे भगवान कृष्णाची प्रिय पत्नी रुक्मिणी देवी यांना समर्पित आहे. या मंदिराच्या भिंतीवरील चित्रे, गुंतागुंतीची कोरीव कामे आपल्याला पहावयास मिळतात.

६. गोमती घाट

धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की, गंगेनंतर गोमती अशी एक नदी आहे, जी थेट स्वर्गातून खाली येते. ही नदी महासागराला मिळत असल्यामुळे या नदीचे पाणी खारट असले तरी येणारे पर्यटक या ठिकाणी स्नान करतात.

७. गोपी तलाव

जवळपास २० किलोमीटर लांबीचा हाताला पिवळ्या रंगाच्या वाळूने वेढलेला आहे. असे समजले जाते की, कृष्ण आपल्या तरुणपणाने आणि प्रेमळ स्वभावाने या ठिकाणच्या गोपींना आकर्षित करीत असे. म्हणून या तलावाला गोपी तलाव असे म्हणतात.

८. सुदामा सेतू

हा सेतू गोमती नदीवर बांधण्यात आलेला आहे. भगवान कृष्ण यांच्या बालपणीच्या मित्राच्या, सुदामाच्या नावावरून या पूलाला नाव देण्यात आले होते. नदी आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य या पूल सेतूवरून आपल्यास पहावयास मिळते.

९. भडकेश्वर महादेव मंदिर

अंदाजे पाच हजार वर्षे जुने असलेले हे प्राचीन मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी हे मंदिर समुद्रामध्ये बुडते तेथील भाविकांचा असा समज आहे की, निसर्गाच्या अभिषेकाची धार्मिक प्रक्रिया, म्हणून हे मंदिर बुडते.

१०. गीता मंदिर

अतिशय भव्य अशी रचना असलेल्या आणि पांढऱ्या संगमरवराचा वापर केलेल्या या मंदिराला १९७० मध्ये बिर्ला उद्योगपतीच्या कुटुंबाने बांधले. या मंदिराच्या भिंतीवर भगवद्गीतेतील अवतरणे कोरली गेली आहेत.

११. डनी पॉईंट

समुद्र आणि प्रवाळनी वेढलेला असा हा द्वारका. या ठिकाणी असलेला पॉईंट इको टुरिझम म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पोहणे, सूर्य स्नान करणे तसेच डॉल्फिन, मासे, कासव पाहण्यासाठी, पक्षी निरीक्षणासाठी तसेच पतंग उडवणे यासाठी प्रसिद्ध आहे.

१२. इस्कॉन मंदिर

महाविष्णू गोस्वामी महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली.

१३. स्वामीनारायण मंदिर

द्वारकाधीश मंदिराच्या जवळ असलेले हे भगवान विष्णूंच्या अवतारांचे भगवान स्वामीनारायण यांना समर्पित असे हे तीर्थक्षेत्र आहे. येथील भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते. तसेच या मंदिरामध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती देखील आहे.

nageshwar jyotirlinga official website

नागेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स

प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे असणारे हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.त्यामुळे संपूर्ण जगभरातून असंख्य भाविक याठिकाणी येत असतात. त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी त्या ठिकाणी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स बांधली गेली आहेत. त्यातील काही हॉटेल्स खालील प्रमाणे –

  • लेमन ट्री प्रीमियर द्वारका
  • बापू रिसॉर्ट
  • द्वारिका हॉटेल
  • जिंजर द्वारका
  • मधुवन सुट्स बाय ब्लू हॉटेल्स
  • हॉटेल रामा क्रिस्तो
  • क्लब महिंद्रा द्वारका

स्थानिक खाद्यपदार्थ

गुजरात राज्याला ऐतिहासिक दृष्ट्या जसे महत्त्व आहे, तसेच धार्मिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच अंशी शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्त आढळून येते. द्वारकेमध्ये खाद्यपदार्थांची विविधता आढळून आली नाही किंवा या ठिकाणी जास्त रेस्टॉरंट नसले तरीही गुजराती जेवणाची थाळी या ठिकाणी नक्की मिळते. गुजराती थाळीमध्ये रोटी, डाळ, करी, भात, भाज्या यांची चव अतिशय उत्कृष्ट असते. या ठिकाणची खिचडी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय खमण ढोकळा, खांडवी, ठेपला, खाकरा, हळदळ, ताक, लस्सी यासारखे इतर गुजराती पदार्थ आणि स्नॅक्स यांची चव आपण नक्कीच चाखून बघायला हवी.

नागेश्वर ज्योतिर्लिंग कथा (Nageshwar Temple Story)

पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा एक व्यापारी भगवान शंकराचा निस्सीम असा भक्त होता. तो सद्गगुणी आणि खूप धार्मिक असा होता. एकदा सुप्रिय नावेत बसून एका ठिकाणी जात असताना अचानक दारूक नावाच्या राक्षसाने त्या नावेतील सर्व लोकांना बंदी बनवले. कारागृहात असताना देखील सुप्रिय महादेवाची भक्ती करण्यात लीन होता. दारूकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने सुप्रियला महादेवाची भक्ती न करण्याकरता सांगितले. परंतु सुप्रियने त्याचे काहीही ऐकले नाही. यामुळे क्रोधित झालेल्या दारूकाने आपल्या सेवकांना सुप्रियचा वध करण्यास सांगितले. तरीही सुप्रिय त्यांना न घाबरता महादेवाच्या भक्ती मध्ये लीन राहिला.

दारुकचे सेवक कारागृहात पोहोचल्यावर एका उंच ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले. आणि त्यांनी सुप्रियला पशुपतास्र दिले. या अस्त्राने दारूक राक्षस आणि त्यांच्या सर्व सेवकांचा सुप्रियने वध केला. मृत्यूपूर्वी दारूक मुक्तीसाठी महादेव पार्वतीकडे प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना मान्य करून महादेवाने त्याला मुक्ती दिली. आणि हे ठिकाण त्याच्या नावाने प्रसिद्ध होईल असे वरदान दिले. नंतर सुप्रियने महादेवाकडे ते कायमस्वरूपी याठिकाणी वास्तव्य करण्याची विनंती केली. यानंतर भगवान शंकर या ठिकाणी नागेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थायिक झाले.

FAQ

नागेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे?

गुजरात राज्यामध्ये द्वारका शहरामध्ये हे ज्योतिर्लिंग आहे.

नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी कितवे ज्योतिर्लिंग आहे?

नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग आहे.

नागेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये दर्शनासाठी किती प्रवेश शुल्क आकारले जाते?

नागेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये दर्शनासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो.

नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार कोणी केला?

नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा जिर्णोद्धार गुलशन कुमार यांनी केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचा सुपुत्र भूषण कुमार यांनी केला.

नागेश्वरचा अर्थ काय आहे?

नागेश्वरचा अर्थ नागांचा देव, नागांचा ईश्वर असा होतो.

निष्कर्ष

SHRI NAGESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE या लेखाद्वारे श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. हा लेख आपल्याला कसा वाटला? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.🙏🙏

Leave a comment