व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर, AI स्टिकर्समुळे चॅटिंग होईल मजेदार

व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर (Whatsapp New AI Feature) : व्हॉट्सअॅप वापर कर्त्यांना एक आनंदाची बातमी व्हॉट्सअॅपने दिली असून आतापासून या अॅपमध्ये नवीन एक नवीन फीचर आले आहे.

या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते चॅटिंग मजेदार करण्यासाठी Al Srickers तयार आणि शेअर करू शकतात. WABetaInfo ने व्हॉट्सअॅपमधील या नवीन फीचरची माहिती दिली. या फीचरमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.

Whatsapp New AI Feature

व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्ससह वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारत असते. या नवीन फीचर्स च्या यादीत आता व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर दाखल करण्यात आले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते चॅटिंग मजेदार करण्यासाठी Al Srickers तयार आणि शेअर करू शकतात.

WABetaInfo ने व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरबद्दल माहिती दिली.

WABetaInfo नुसार, वापरकर्त्यांचे AI स्टिकर्सवर पूर्ण नियंत्रण असेल. आपल्याला जे एखादा स्टिकर अनुचित किंवा आक्षेपार्ह वाटत असल्यास, आपण त्याची Meta ला तक्रार देखील करू शकतो.

व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरची झलक आपल्याला शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पाहायला मिळेल. या स्टीकर्स च्या पर्यायमध्ये नवीन तयार करा बटण आहे. कंपनी कीबोर्डमध्ये दिलेल्या स्टिकर्स टॅबमध्ये नवीन बटण दिलेले आहे.

हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणत्या प्रकारचे स्टिकर हवे आहेत, हे स्पष्ट करावे लागेल. यानंतर, व्हॉट्सअॅप तुमच्या वर्णनावर आधारित एआय स्टिकर्सचा संच दाखवेल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे स्टिकर्स निवडून शेअर करू शकता. हे AI स्टिकर्स Meta च्या सुरक्षित तंत्रज्ञानाने तयार केले आहेत.

या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर

लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअॅपमधील हे नवीन फीचर पूर्णपणे ऐच्छिक आहे. याचा अर्थ आपण ते तुम्हाला हवे तसे वापरू शकतो आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो.

नवीन फीचरची खास गोष्ट म्हणजे रिसीव्हर AI पासून बनवलेले स्टिकर्स सहज ओळखू शकतो. Meta ने नुकतेच हे वैशिष्ट्य काही ठराविक बीटा व्हर्जन साठी आणले आहे. जर तुम्ही बीटा वापरकर्ता असाल तर तुम्ही हे फीचर Android 2.23.17.14 अपडेटसाठी बीटामध्ये वापरू शकता.

Leave a comment