डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate – आजच्या धकाधकीच्या काळात, शरीरात प्रतिकारशक्ती बनवून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारात फळांचा समावेश करणे आवश्यक आहे.
प्रत्येक फळाप्रमाणेच डाळिंबातही अनेक गुणकारी घटकांचा समावेश असतो. लोह, फायबर, प्रथिन, जीवनसत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच अँटि ऑक्सिडंट, फोलिक ऍसिड आणि रायबोप्लेविनचा समावेश डाळींबमध्ये असतो.
आजच्या लेखद्वारे आम्ही आपणास डाळिंब खाण्याचे फायदे दिले आहे. हे फायदे जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate – लालबुंद रसरशीत असं फळ डाळिंब. याबद्दल आपल्या सर्वांना माहीतच आहे. ते त्रिदोषनाशक, बलदायक आणि पचनशक्ती वाढवणार आहे. आज आपण डाळिंबाबद्दल, माहिती घेणार आहोत.
हे वाचा –
- गाजर खाण्याचे फायदे
- बद्धकोष्ठता म्हणजे काय
- मधुमेह लक्षणे व उपचार
- दही खाण्याचे फायदे
- व्यायामाचे महत्त्व
- शतावरी चे फायदे मराठी
- शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे
- काकडी खाण्याचे फायदे
- जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय
- करवंद
डाळिंब खाण्याचे फायदे
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate –
- शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास, डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. मधुमेहांसाठी डाळिंबाचा रस गुणकारी असतो.
- डाळिंबाचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
- डाळिंबाचा रस सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
- शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी रोखण्यासाठी, डाळिंबा अतिशय फायदेशीर आहे.
- गर्भवती महिलांनी डाळिंबाचे सेवन केल्यास, त्याचा त्यांना भरपूर फायदा होतो.
- डाळिंबात मोठ्या प्रमाणात प्रथिन, जीवनसत्व असल्यामुळे, गर्भवती महिलांनी डाळिंब खाणे फायदेशीर आहे.
- डाळिंबाचे सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास होत नाही.
डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate –
अनेक आजारांपासून आणि इन्फेक्शन पासून शरीराच रक्षण
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतं. यात अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे, अनेक आजारांपासून आणि इन्फेक्शन पासून ते आपल्या शरीराच रक्षण करतं.
जुलाबावर खूपच उपयुक्त
डाळिंब जुलाबावर खूपच उपयुक्त ठरतं. जर कुठल्याही कारणामुळे जुलाब होत असतील किंवा आव पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचा चूर्ण, लवंग, जायफळ आणि सुंठीचा चूर्ण हे एकत्र करून मधाबरोबर घेतल्याने, जुलाब तर थांबतातच, त्याचबरोबर जर रक्त पडत असेल तर, तेही थांबतं. डाळिंबाचा रस देखील घेतल्याने जुलाबावर फायदा होतो.
कोलाईटस वर उपयुक्त
कोलाईटस वर सुद्धा डाळिंबाचा रस खूपच उपयुक्त ठरतं. जर पोटात जंत झाले असतील तर, डाळिंबाच्या ताज्या सालीचा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्याने, कुठल्याही प्रकारचे जंत असतील तर, ते पूर्णपणे नष्ट होऊन जातील.
किडनी स्टोनवर फायदेशीर
जर किडनी स्टोन झाले असतील तर, डाळिंबाच्या बियांची चमचाभर पूड आणि काबुली चण्याचे पीठ हे पाण्यात एकत्र करून, चांगलं उकळून घेतल्याने, किडनी स्टोन सुद्धा विरघळतात.
लघवीच्या त्रासावर फायदेशीर
जर वारंवार लघवीचा त्रास होत असेल, सारखी तहान लागत असेल तर, अर्धा चमचा डाळिंबाच्या सालीचा चूर्ण पाण्याबरोबर दिवसातून दोन वेळा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने, आराम मिळतो.
शरीरातून उष्णता कमी करते
डाळिंब शरीरातून उष्णता कमी करते. त्यामुळे तापावर किंवा पित्ताच्या विकारांवर किंवा उष्णतेच्या विकारांवर डाळिंब खूपच उपयुक्त ठरते. डाळिंबाच्या रसात पिठीसाखर घालून घेतल्याने, आराम मिळतो.
हिमोग्लोबिनच प्रमाण वाढतं
डाळिंब खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनच प्रमाण वाढतं. त्यामुळे अनेमिया झाला असेल तर, त्यावर ते खूपच उपयुक्त ठरतं.
खोकल्यावर आराम मिळतो
जर घसा बसला असेल तर, पिकलेल डाळिंब खाल्ल्याने घसा साफ होतो. जर खोकला झाला असेल तर, डाळिंबाची साल तोंडात चोखण्याने सुद्धा आराम मिळतो. लहान मुलांना जर जुलाब किंवा खोकला होत असेल तर डाळिंबाची साल उगाळून द्यावी. त्याने त्यांना आराम मिळतो.
दातांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर
डाळिंब दातासाठी देखील खूपच फायदेशीर ठरतं. डाळिंबाच्या सुकलेल्या सालीचा चूर्ण करून, त्यात काळामिरी पावडर आणि मीठ घालून दंतमंजनासारखं जर आपण रोज हिरड्यांना आणि दातांना लावलं तर, हिरड्या मजबूत होतील. त्यातून रक्त येणे थांबेल आणि दात सुद्धा स्वच्छ आणि मजबूत होतील.
विविध आजारांवर फायदेशीर
डाळिंब हृदयविकार, कॅन्सर आणि डायबिटीस यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरतं. डाळिंब खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढवण्यास देखील मदत होते. डाळिंब आपली रोगप्रतिकारक्षमता वाढवून, अनेक आजारांपासून आपलं रक्षण करते. त्यामुळे नियमित डाळिंबाचा समावेश आपल्या आहारात करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.
डाळिंबाचे सौदार्यवर्धक फेस पॅक
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate – तुम्ही डाळिंबाचा फेस पॅक कधी वापरलाय का ? किंवा ट्राय करून पाहिले का ? डाळिंबाचा फेस पॅक बनवायचा कसा हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल माहित तर, अजिबात काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, डाळिंबाचा तुम्ही फेस पॅक कसा बनवू शकता आणि त्याचे फायदे कोणकोणते आहेत.
डाळिंबाचा फेस पॅक केवळ मुरुमांसाठीच नाही तर, त्वचेमध्ये साचलेली घाण आणि मृत त्वचा ही दूर करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. घरच्या घरी तुम्हाला डाळिंबाचे वेगवेगळे फेस पॅक तयार करता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबाचे दाणे आणि त्याची साल. हे दोन्ही त्वचेसाठी उत्तम ठरतात.
या फेस पॅक मध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी या घरातच इझीली तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. म्हणून जास्त काही खर्च तुम्हाला करायला लागणार नाही आहे. याच्या नियमित वापराने, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग असतील किंवा खूप सारे पिंपल्स येत असतील, तर त्यांचा नायनाट करून, पुन्हा एकदा चमकदार त्वचा नक्कीच मिळू शकतात.
डाळिंब आणि दह्याचा फेस पॅक
मुरुमांपासून सुटका हवी असेल तर, तुम्ही घरच्या घरी डाळिंब आणि दह्याचा हा फेस पॅक वापरून पाहू शकता. हे तुम्हाला फक्त ताजेपणा देणार नाही तर, चेहऱ्यावरील मुरुम आणि मुरुमांमुळे जे डाग तयार होतात, त्याच्या समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
आता हा फेस पॅक बनवायचा कसा ?
- डाळिंबाचे दाणे आधी काढून घ्या.
- डाळिंबाचे दाणे आणि दही मिक्स करून, त्याची पेस्ट बनवून घ्या.
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण १५ मिनिट तसेच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.
- याचा नियमित वापर केल्यास, मुरूम अजिबात चेहऱ्यावर राहणार नाही. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे ट्राय करू शकता.
डाळिंबाच्या सालांचा फेस पॅक
चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी, डाळिंबाच्या सालांचा देखील उपयोग करून घेता येतो. डाळिंबाच साल हि आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं.
आता हे बनवायचं कसं ?
- तर डाळिंबाच साल आधी काढून घ्या.
- एका भांड्यात पाणी घेऊन, त्याचे साल टाका आणि ते उकळवा.
- उकळल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि नंतर मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या.
- ब्लेंड झाल्यावर त्यात गुलाब पाणी मिक्स करा.
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण दहा मिनिटे तसच ठेवा. मुरूम लवकर जायला हवे असतील तर, फेस पॅक लावल्यावर दोन मिनिटांसाठी तुम्ही चेहऱ्यावर वाफही घेऊ शकता.
- काही वेळानंतर थंड पाण्याने तुम्ही चेहरा साफ करून घ्या. हा उपाय किंवा तर हा जो फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन दिवस नक्कीच ट्राय करू शकता.
डाळिंब आणि लिंबाचा फेस पॅक
तेलकट चेहरा असणाऱ्यांना सर्वात जास्त पिंपल यायचा जो त्रास आहे, तो होत असतो. अशा परिस्थितीत डाळिंब आणि लिंबाच्या रसाचा फायदा इथे करून घेता येतो. हे केवळ मुरुमांपासून सुटका मिळवून देत नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर काही डाग असतील, काही निशाण राहिले असतील तर, ते काढून टाकण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. डाळिंबा मध्ये असणारे अँटि ऑक्सिडंटचे जे गुणधर्म आहेत,ते पौर्स उघडतात आणि त्वचेला स्वच्छ करतात. निरोगी त्वचा मिळवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग करून घेता येतो.
आता हा फेस पॅक बनवायचा कसा ?
- तर लिंबाचा रस आणि डाळिंबाचा रस हे सम प्रमाणात घ्या.
- हा रस त्वचेवर लावा आणि दहा मिनिटे तसेच राहू द्या.
- नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. याने स्किन एकदम क्लीन होऊन जाते.
- आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे नक्कीच युज करू शकता.
डाळींबाच्या सालीचा वापर
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate – डाळिंबाचे दाणे अनेक जण खूप आवडीने खात असतात. डाळिंब खाण्याचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे देखील होतात. शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी, त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी, डाळिंब खाल्ले जाते. मात्र एवढेच नाही तर डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे डाळिंबाची साल देखील आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
डाळिंबाच्या सालीचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये डाळिंबाच्या सालीचा वापर एका औषधाप्रमाणे देखील केला जातो. डाळिंबाची साल सुकवून तिची पावडर तयार केली जाते. या पावडरचे सेवन केल्यामुळे जुलाब, उलटी, यासारख्या समस्यांवर लवकर आराम मिळतो. एवढेच नाही तर डाळिंबाच्या सालीचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील होतो.
डाळिंबाच्या सालीचे त्वचेवरती काय फायदे होतात ?
डाळिंबाच्या सालीमध्ये अँटि बॅक्टरियल गुण आहेत. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील डाग, व्रण यापासून ते त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यापर्यंत देखील डाळिंबाच्या सालीचा खूपच फायदा होतो.
चिरतरुण त्वचा दिसण्यासाठी मदत
डाळिंबाच्या साली या त्वचेला इन्फेक्शन पासून दूर ठेवतात. याशिवायत यांच्यामधील अँटि ऑक्सिडंट हे त्वचेची छिद्रे घट्ट करून, त्वचेला आलेला सैलपणा देखील कमी करतात ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या देखील पडत नाही आणि त्वचा ही चिरतरुण दिसू लागते.
त्वचा मऊ आणि मुलायम होते
जर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाली असेल, तर यावर उपाय म्हणून डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेली पेस्ट तुम्ही फेस पॅक प्रमाणे वापरू शकता. या फेस पॅक मुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.
सूर्य किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते
तसेच डाळिंबाच्या सालींची पेस्ट ही सनस्क्रीन प्रमाणे देखील काम करते. कारण त्वचेला प्रखर सूर्य किरणांपासून वाचवण्याची क्षमता, या डाळिंबाच्या सालीमध्ये असते. त्यामुळे साहजिकच सन बर्न अजिबात होत नाही. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल देखील निघून जाते आणि त्यामुळेच त्वचेवर पिंपल्स वगैरे देखील येत नाही.
गरोदर स्त्रियांनी डाळिंब खाण्याचे फायदे
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate – गरोदरपणामध्ये स्त्रियांना, स्वतःच्या आरोग्यासोबत गर्भाची काळजी घेणं गरजेचं असतं. स्त्रियांच्या आहारावर गर्भाची वाढ आणि विकास अवलंबून असतो. म्हणूनच आहारात काही पदार्थांचा समावेश करणा हितकारक आहे. गरोदरपणाच्या डाळिंब खाणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे गरोदर स्त्रियांच्या सोबतीने गर्भाच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते
गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या शरीरात मुबलक प्रमाणात रक्त असणे आवश्यक आहे, डाळिंबामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते अनिमियाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.
पोटांच्या समस्यांपासून सुटका
गरोदरपणाच्या काळात अनेक पोटाचे विकार बळवण्याची शक्यता ही अधिक असते. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, पोट बिघडणे, पचनसंस्थेचे त्रास बळवतात. त्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.
नॉर्मल डिलिव्हरी होण्यासही मदत
गर्भाच्या हाडांना मजबुती देण्यासाठी, गरोदर स्त्रियांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे मांस पेशींना देखील मजबुती मिळते. गरोदरपणाच्या काळात रक्त कमी असल्यास, प्रस्तुतीच्या वेळेस त्रास होऊ शकतो. डाळिंबामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच नॉर्मल डिलिव्हरी होण्यासही मदत होते.
डाळिंब खाण्याचे लाभदायी फायदे
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate –
लाल रक्त पेशी वाढवते
डाळिंब शरीरातील लाल रक्त पेशी वाढवते. ज्यामुळे अशक्तपणा आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
संधिवात सूज यावर फायदेशीर
डाळिंबाचा रस सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवात सूज यावर फायदेशीर आहे.
त्वचेसाठी ही खूप फायदेशीर
डाळिंब त्वचेसाठी ही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचा मुलायम होते. त्याच्या नियमित वापराने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही.
शरीरातील जळजळ कमी होते
डाळिंबाचा रस प्यायल्याने, शरीरातील जळजळ होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
शरीरातील उष्णता कमी होते
ताप आल्यानंतर, जर रुग्णाला डाळींबाचा ज्यूस दिला तर, शरीरातील उष्णता कमी होते आणि ताप लवकर उतरतो.
मुख शुद्धी करते
तोंडाला दुर्गंधी येत असेल तर, डाळिंबाचे दाणे चावून चावून खावे. यामुळे दुर्गंधी तर दूर होते. शिवाय दातामध्ये बॅक्टेरिया मरतात.
पचनशक्ती सुधारते
अनेक जणांचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात, अपचन झाल्यासारखं वाटतं, अशावेळी डाळिंब फार गुणकारी ठरतो.
जुलाबावर फायदेशीर
डाळिंब खाण्याने डिसेंटरी म्हणजेच जुलाब लगेच थांबतात. विशेषतः लहान मुलांना असा त्रास होत असेल तर, त्यांच्यासाठी डाळिंबाचा ज्यूस फार गुणकारी ठरतो.
रक्ताची कमतरता भरून काढते
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास, डाळिंब खाणे फायदेशीर ठरतो.
ॲनिमियाचा धोका राहत नाही
रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक असल्यामुळे, ॲनिमिया होण्याची भीती राहत नाही.
गरोदरपणात फायदेशीर
डाळिंबात मुबलक प्रमाणात फोलिक ऍसिड असतं. त्यामुळे गर्भवतीला दररोज डाळिंबाचा ज्यूस दिला तर पोटातल्या बाळाची व्यवस्थित वाढ होत असते.
हृदयविकारावर फायदेशीर
डाळिंबाचा रस हृदयविकारावर फायदेशीर आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, डाळिंबाच्या रसाचे सेवन करण्यास सांगितले जाते.
डाळिंबाच्या रसाचे अद्भुत फायदे
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate –
प्रजनन क्षमता वाढते
डाळिंबाच्या रसाने शरीराची प्रजनन क्षमता वाढते. मानवी शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोन आणि शुक्राणूंची संख्या वाढते.
अशक्तपणा दूर होतो
डाळिंबाच्या रसात विटामिन आणि अँटि ऑक्सिडंट खनिजे आहे. जे माणसांच्या शरीरातील अशक्तपणा दूर करतात.
रक्ताचा अभाव कमी होतो
डाळिंबाचा रस नियमित घेतल्यास शरीराच्या रक्तात आयर्न व फॉलिक ऍसिड प्रमाण घटत नाही. त्यांनी आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन सतत वाढते.
कर्करोगापासून बचाव
डाळिंबाच्या रसात पॉली फेनोल नावाच्या पेशी असतात. या पेशींमुळे कर्करोगाच्या पेशींचा विकास होणे थांबते आणि आपला बचाव होतो.
हार्ट अटॅक टाळण्यासाठी
डाळिंबाच्या रसाने अँटि ऑक्सिडंट रक्त प्रवाह सुरळीत चालू ठेवण्यास मदत करतात आणि हृदयाचे रोग होऊ देत नाहीत.
ब्लड प्रेशर सामान्य राहतं
बीपी व हायपर टेन्शन यांसारख्या रोगांपासून बचाव होतो.
लठ्ठपणा
वजन वाढविण्यापासून मुक्ती मिळते. कारण डाळिंबाच्या रसात शरीरातील चरबी कमी करण्यासाठी व वाढत्या मेदावर प्रतिबंध घालण्याची क्षमता असते.
लिव्हर यकृत
पिल्हा वाढवणे, लिव्हर सिरोसिस, कावीळ हे सर्व आजार डाळिंबाच्या सेवनाने आटोक्यात येतात. कारण डाळिंबाचा रस जंतूंचा नाश करतो आणि चांगल्या पेशींची निर्मिती करण्यास मदत करतो.
मजबूत हाडे
मानवी शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत होते. डाळिंबाच्या रसात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
मधुमेहावर नियंत्रण
मधुमेह देखील आटोक्यात येतो. कारण या रसात पाईन ऍसिड आहे आणि ते इन्सुलिन सारखं काम करतं.
उलटीचा त्रास दूर होतो
गर्भवती स्त्रियांना उलटीचा त्रास होत असेल तर याच्या सेवनाने तो नाहीसा होतो अशक्तपणा दूर होतो.
डोळ्यांची जळजळ थांबते
डाळिंबाच्या रसाने डोळ्यांची जळजळ व लाली शांत होते. नाकातून रक्त येत असेल तर थांबते.
ओज, वीर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करतो
डाळिंबाचा रस शरीरातील ओज, वीर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करतो.
अतिप्रमाणात डाळिंबाचे सेवन करण्याचे तोटे
डाळिंब खाण्याचे फायदे Benefits Of Pomegranate – जसे डाळिंबाचे फायदे आहेत, तसे काही तोटे देखील आहेत. तर आज आपण पाहूयात, डाळिंबाचे काय तोटे आहेत.
- डाळिंबामध्ये गोडाचे प्रमाण आहे. त्यामुळे डाळिंबाचे अति सेवन केल्याने, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
- ज्या लोकांना खोकल्याची समस्या आहे. त्यांनी डाळिंब अजिबात खाऊ नये.
- जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर, तुम्ही डाळिंबाचे सेवन करणे टाळावे. याचे कारण असे की, डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला लाल पुरळ, एलर्जी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डाळिंबाचे सेवन करू नका. डाळिंबाचे सेवन कमी रक्तदाबांमध्ये हानिकारक ठरू शकते.
- जे लोक विशेष आजाराने ग्रस्त आहेत, औषधे चालू आहेत. अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळिंबाचे सेवन करा. कारण त्यांच्या शरीरावर याचे हानिकारक परिणाम होऊ शकतात.
- डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न खाण्याचा सल्ला दिला जातो.
FAQ
१. डाळींबाची साल औषधी आहे का ?
डाळिंबाचे दाणे अनेक जण खूप आवडीने खात असता.त डाळिंब खाण्याचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे देखील होतात. शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी, त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी, डाळिंब खाल्ले जाते. मात्र एवढेच नाही तर डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे डाळिंबाची साल देखील आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
डाळिंबाच्या सालीचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये डाळिंबाच्या सालीचा वापर एका औषधाप्रमाणे देखील केला जातो. डाळिंबाची साल सुकवून तिची पावडर तयार केली जाते. या पावडरचे सेवन केल्यामुळे जुलाब, उलटी, यासारख्या समस्यांवर लवकर आराम मिळतो. एवढेच नाही तर डाळिंबाच्या सालीचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील होतो.
२. डाळिंबाचे अति सेवन केल्याने काय तोटे होतात ?
डाळिंबामध्ये गोडाचे प्रमाण आहे. त्यामुळे डाळिंबाचे अति सेवन केल्याने, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
ज्या लोकांना खोकल्याची समस्या आहे. त्यांनी डाळिंब अजिबात खाऊ नये.
जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर, तुम्ही डाळिंबाचे सेवन करणे टाळावे. याचे कारण असे की, डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला लाल पुरळ, एलर्जी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डाळिंबाचे सेवन करू नका. डाळिंबाचे सेवन कमी रक्तदाबांमध्ये हानिकारक ठरू शकते.
जे लोक विशेष आजाराने ग्रस्त आहेत, औषधे चालू आहेत. अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळिंबाचे सेवन करा. कारण त्यांच्या शरीरावर याचे हानिकारक परिणाम होऊ शकतात.
डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न खाण्याचा सल्ला दिला जातो.
३. डाळिंब खाण्याचे काय फायदे आहेत ?
शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास, डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. मधुमेहांसाठी डाळिंबाचा रस गुणकारी असतो.
डाळिंबाचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
डाळिंबाचा रस सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी रोखण्यासाठी, डाळिंबा अतिशय फायदेशीर आहे.
गर्भवती महिलांनी डाळिंबाचे सेवन केल्यास, त्याचा त्यांना भरपूर फायदा होतो.
डाळिंबात मोठ्या प्रमाणात प्रथिन, जीवनसत्व असल्यामुळे, गर्भवती महिलांनी डाळिंब खाणे फायदेशीर आहे.
डाळिंबाचे सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास होत नाही.
४. डाळिंबाचा फेस पॅक चेहऱ्यासाठी कसा फायदेशीर ठरतो?
डाळिंबाचा फेस पॅक केवळ मुरुमांसाठीच नाही तर, त्वचेमध्ये साचलेली घाण आणि मृत त्वचा ही दूर करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. घरच्या घरी तुम्हाला डाळिंबाचे वेगवेगळे फेस पॅक तयार करता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबाचे दाणे आणि त्याची साल. हे दोन्ही त्वचेसाठी उत्तम ठरतात.
या फेस पॅक मध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी या घरातच इझीली तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. म्हणून जास्त काही खर्च तुम्हाला करायला लागणार नाही आहे. याच्या नियमित वापराने, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग असतील किंवा खूप सारे पिंपल्स येत असतील, तर त्यांचा नायनाट करून, पुन्हा एकदा चमकदार त्वचा नक्कीच मिळू शकतात.
५. डाळिंबाचे आरोग्यदायी काय फायदे आहेत ?
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतं.
डाळिंब जुलाबावर खूपच उपयुक्त ठरतं.
कोलाईटस वर सुद्धा डाळिंबाचा रस खूपच उपयुक्त ठरतं.
बीपी व हायपर टेन्शन यांसारख्या रोगांपासून बचाव होतो.
डाळिंबाच्या रसाने अँटि ऑक्सिडंट रक्त प्रवाह सुरळीत चालू ठेवण्यास मदत करतात आणि हृदयाचे रोग होऊ देत नाहीत.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डाळिंब खाण्याचे फायदे या बद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुम्ही देखील तुमच्या आहारात डाळींबाचा समावेश करा, आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवा.
तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.