पालक Spinach In Marathi

पालक Spinach In Marathi – मित्रांनो पालकाची भाजी आपल्या सर्वांना मार्केटमध्ये सर्वत्र आढळून येते. ही भाजी आपण घरी आणतो देखील आणि सर्वांना आवडते देखील, परंतु या भाजीचे नेमके कोणकोणते फायदे आहेत ? हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपण नेहमी ही भाजी खातो, परंतु कोणत्या आजारावर ही भाजी उपयुक्त आहे, हे आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यासाठी मित्रांनो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या भाजीविषयी काही आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत, तसेच आज आपण या भाजीविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. हि माहिती व फायदे जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

पालक Spinach In Marathi

पालक Spinach In Marathi – मित्रांनो सर्व गुणसंपन्न अशी ही भाजी आहे. या भाजीमध्ये आपल्याला खूप प्रकारचे जीवनसत्व आढळून येतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, अमिनो ऍसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ असतात.

तसेच अ आणि क हे जीवनसत्व असतात. यामध्ये फॉलिक ऍसिड अतिशय भरपूर प्रमाणात आढळून येते. या सर्व गुणधर्मामुळे ही भाजी बहुतांश आजारांवर उपयुक्त आहे.

पालक

हे वाचा –

पालक मध्ये आढळणारे पोषक घटक कोणते ?

पालक Spinach In Marathi

  • फायबर – 2.2 ग्रॅम
  • प्रोटीन – 2.9 ग्रॅम
  • आयरन – 0.81 ग्रॅम
  • कॅलरी – 23
  • मॅग्निशियम – 24 मिलीग्रॅम
  • फॅट – 0.4 ग्रॅम
  • कार्ब्स – 3.6 ग्रॅम
  • पोटॅशियम – 167 मिलीग्रॅम
  • पाणी – 91%
  • कॅल्शियम – 30 मिलीग्रॅम
  • साखर – 0.4 ग्रॅम
लोहकॅल्शियमफॉस्फरसअमिनो ऍसिडप्रथिनेफॉलिक ऍसिड
खनिजेतंतुमय पदार्थपिष्टमय पदार्थविटामिन अ विटामिन क विटामिन ई

पालकचा गुणधर्म

  • ही भाजी स्वभावाने थंड आहे आणि थंड असल्या कारणाने ते पित्त कमी करते.
  • त्याच प्रमाणे ही भाजी स्वभावतः जड आहे, म्हणजे पचायला हे थोडसं जड जात आणि म्हणून ही भाजी खाण्याचे जे प्रमाण असतं हे त्यांनीच घ्यावं, ज्यांची पचनक्रिया ही अतिशय चांगल्या प्रकारे आहे.
  • ही भाजी वात वाढवणार आहे. जर तुमच्या शरीरामध्ये वात जास्त प्रमाणात आहे, तरी सुद्धा जर कोणाला ही भाजी खायची असेल तर, त्या लोकांनी ही भाजी बनवताना ती तेलामध्ये किंवा तुपामध्ये बनवावी आणि त्यामध्ये काही प्रमाणामध्ये हिंगाची फोडणी द्यावी. जेणेकरून याने वात जर वाढत असेल, तर तो हिंग आणि तेल आणि तुपाने कमी होऊन जाईल.

पालक खाण्याचे फायदे

प्रथिने अधिक प्रमाण मिळतात

मित्रांनो काही व्यक्ती या मांसाहार करत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रथिनांची कमतरता आढळून येते. तर मित्रांनो जे व्यक्ती मांसाहार करत नाहीत, त्यांच्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे.

तर त्या व्यक्तीने नियमित ही भाजी खाल्ली, तर त्यांना जेवढा मांसाहार करण्याऱ्या व्यक्तींना प्रथिने मिळतात, तेवढीच प्रथिने आपण या भाजी पासून मिळू शकतो. त्यामुळे ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत, त्यांनी ही भाजी नक्की खायलाच हवी.

ॲनिमियाचा धोका कमी होतो

ज्या व्यक्तींना ॲनिमिया झाला झालेला आहे. अश्या आजार झालेल्या व्यक्तीने ही भाजी तर अवश्य खाल्ली पाहिजे. यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म आहे.

त्यामुळे शरीरात रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया लगेच सुरु होते. याच्या भाजीमुळे रक्त शुद्ध होते आणि हाडे देखील मजबूत होतात. त्यामुळे ॲनिमिया झाल्या व्यक्तीने, याची भाजी तर नक्कीच खाली पाहिजे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

या भाजीध्ये अ जीवनसत्व आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणत असते. यामध्ये असलेले अ जीवनसत्व डोळ्यांसाठी फार महत्त्वाच आहे.

ज्या व्यक्तींना डोळ्याचे आजार आहेत, रातांधळेपणा आहे, त्या व्यक्तींनी या भाजीचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे. याच्या सेवनामुळे रातांधळेपणात तर दूर होतोच, परंतु डोळ्याची नजर देखील चांगली होते.

एक्झिमा आजारावर गुणकारी

याचे जे देठ असतात ते देठ जर आपण लिंबाच्या रसात वाटून जत एक्झिमा झालेल्या आजारावर लावलं तर एक्झिमा हा आजार कमी होतो.

अतिरिक्त चरबी कमी होते

जर आपण याचा २५ ml रस गाजराच्या ५० ml रसामध्ये मिक्स करून आपण प्यालो तर आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी असते, अनावश्यक चरबी असते ती चरबी हळूहळू कमी होते.

Spinach In Marathi

पायरीया आजारापासून मुक्तता

ही भाजी खाल्ल्याने पायरीया हा रोग होत नाही. सध्या पायरीया हा आजार बहुतेक व्यक्तींमध्ये आढळून येतो.परंतु आपण आपल्या आहारात याचा समावेश केला तर आपल्याला पायरीया हा आजार होणार नाही.

बद्धकोष्ठते पासून आराम मिळतो

ही भाजी, मेथी, चवळी, ह्या भाज्या जर आपण नियमित खाल्ल्या त,र बद्धकोष्ठते पासून आपल्याला आराम मिळतो. व आपले पोट साफ होण्यास मदत होते.

रक्त शुद्ध होण्यास मदत होते

ही भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील रक्त अशुद्ध झाल्यावर, आपल्या शरीराला फोड येतात, जखमा होतात, यासारख्या रक्तदोषांमुळे होणाऱ्या त्वचा विकारावर याची भाजी फायदेमंद आहे.

ही भाजी आपण दररोज खाल्ली, त्याचा रस प्यालो तर आपलं रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

खोकला आणि गळ्याची सूज कमी होते

पालकाचा रस घेऊन त्यांनी जर गुळण्या केल्या तर, खोकला आणि गळ्याला जी सूज असते, ती कमी होते.

पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

या भाजी मध्ये जीवनसत्व अ, ब, क आणि तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि लोह असते. याची भाजी नियमित खाल्ल्याने, शरीरातील रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. चला तर मग जाणून घेऊयात, या भाजीचे आरोग्यदायी फायदे.

Spinach In Marathi

रक्तवर्धक गुणधर्म

या भाजीमध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने, रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनवतात.

यकृताचे विकार, कावीळ, पित्त विकार यामध्ये उपयुक्त

यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ आणि क जीवनसत्व फॉलिक ऍसिड, भरपूर प्रमाणात असते. यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्यामुळे, यकृताचे विकार, कावीळ, पित्त विकार, यामध्ये उपयुक्त आहे.

केसांसाठी उपयुक्त

ही भाजी आरोग्य बरोबरच, केसांसाठीही चांगले असते. केस गळतीमुळे त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात याचा समावेश केला पाहिजे. कारण ही भाजी शरीरात लोहाची कमतरता भरून, केस गळणे कमी करते.

चेहऱ्यासाठी फायदेशीर

दररोज याचा रस प्यायल्याने, चेहरा चमकदार बनतो आणि त्वचाही हायड्रेटड राहते. यात फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते.

दातांसाठी उपयुक्त

ही भाजी दातांसाठी खूप महत्त्वाची आहे. कच्ची भाजी चघळल्याने पायरीया पासून आराम मिळतो. यामध्ये विटामिन क देखील असते. ज्यामुळे हिरड्या मजबूत करण्यास मदत होते.

कॅल्शियमची कमतरता दूर करते

यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, इत्यादीचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे आहारात याचे सेवन केल्याने हाड मजबूत होतात आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करते.

लठ्ठपणा दूर होतो

याच्या रसात गाजराचा रस सेवन केल्यास चरबी कमी होते किंवा रसामध्ये लिंबाचा रस पिल्याने लठ्ठपणा दूर होतो.

लहान मुलांसाठी पालक फायदेशीर

माती खाल्याने मुलांचे पोट वाढत असेल म्हणून, दिवसातून दोन वेळा याचे सुप दिल्याने पोट हलके राहते आणि बाळही तंदुरुस्त राहते.

पालक खाण्याचे लाभदायक फायदे

ही जी भाजी प्रत्येकाच्या घरात खाल्ली जाते आणि प्रत्येकाला ही भरपूर प्रमाणामध्ये आवडते. आता या भाजीचे काय गुणधर्म आहेत ? कोणी घ्यायला पाहिजे ? कोणी टाळायला पाहिजे ? हे आपण खालील माहितीच्या आधारे जाणून घेऊयात.

दाह शामक म्हणून कार्य

ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहेत, त्यांनी याचा समावेश आपल्या आहारात केला, शरीरातील दाह शामक म्हणून ही भाजी काम करते.

शरीराला आलेली सूज कमी करणे

ही भाजी सूज कमी करण्यासाठी सुद्धा वापरले जाते. ही भाजी वाटून, याचा लेप लावल्याने सूज काही वेळात कमी होते.

दम्याच्या त्रासासाठी फायदेशीर

ज्यांना दम्याचा त्रास आहे आणि हा जो दम्याचा त्रास आहे ना तो वात आणि कफामुळे झालेला आहे. तर अशा प्रकारच्या दम्यामध्ये याची भाजी तुम्ही घेऊ शकता किंवा याचं ज्यूस घेऊ शकतो किंवा याचा काढा बनवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

पोटामध्ये जळजळणे, डोकं दुखणे यात पालक फायदेशीर

ज्यांना पोटामध्ये जळजळ होते, डोकं दुखतं, अशांनी याचा वापर केला तर फायदेशीर नक्कीच ठरू शकतो.

Spinach In Marathi

पोट साफ साफ करण्यासाठी फायदेशीर

ज्यांना कडक संडासला होते, म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही, संडासला कडक होतं, त्यांच्यासाठी पोट साफ करण्यासाठी, ही भाजी अतिशय फायदेशीर आहे.

Note :

( ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी ही भाजी खाणे शक्यतो टाळावं आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे आणि कफाचा त्रास आहे, त्यांनी ही भाजी खाल तर त्याचे उत्तम फायदे मिळतील. )

पालक भाजीविषयी माहिती

ही भाजी पालेभाज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ भाजी आहे. ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे, आरोग्यदायी सुद्धा आहे. याची पाने ही फिकट हिरवी, गुळगुळीत आणि पसरट अशी असतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, तसेच प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अ, ब व क जीवनसत्व, फॉलिक ऍसिड, भरपूर प्रमाणात असते.

आयुर्वेदानुसार ही भाजी शीत सारक, वायु कारक, पित्त शामक, रोग वेदन हरी आहे. या सर्व गुणांमुळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मटन, चिकन आणि मासे यांच्या मांसातून जेवढ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढ्याच प्रमाणात याच्या भाजीतून मिळतात. म्हणून मांसाहार न घेणाऱ्यासाठी या भाजीचे सेवन हे वरदानच आहे.

पालक भाजी खाण्याचे औषधी गुणधर्म

  • याच्या भाजीत, लोह व तांब्याचा अंश असल्याने अनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ही भाजी रक्त शुद्ध करते. हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते.
  • यामध्ये असणारे फॉलिक ऍसिड मुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.
  • गर्भवती स्त्रियांनी व माता ने आहारामध्ये याचे सेवन रोज करावे. ही भाजी खाल्ल्याने डोळ्याच्या तक्रारी कमी होतात.
  • याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • यामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे कावीळ, पित्तकारक, यामध्ये उपयुक्त आहे.
  • याचा एक ग्लासभर रस रिकाम्या पोटी नियमितपणे सेवन केल्याने, शौचालय साफ होऊन, पोट स्वच्छ राहते.

पालक खाताना कोणती काळजी घ्यावी ?

  • अति पाणी घालून भाजी शिजवू नये, तसेच भाजी शिजल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नये. त्यामुळे असणारे पोषक घटक वाया जाणार नाही.
  • पावसाळ्यामध्ये याच्या भाजीवर कीड पडते, तसेच ही भाजी वातप्रकोपक असल्याने, सहसा पावसाळ्यात भाजी खाऊ नये.
  • पावसाळ्यामध्ये ही भाजी खाण्याचा मोह आवरला नसेल तर ती प्रथम स्वच्छ दोन-तीन पाण्याने धुवावी नंतर खावी.

पालकाचे सेवन कोणी करू नये?

तुम्ही जर एखाद्या आजारामुळे रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल तर याचे सेवन टाळावे. यामध्ये ऑक्सॅलिक ऍसिडसह प्युरिन देखील भरपूर असते.

ही दोन संयुगे एकत्रितपणे संधिवात उत्तेजित करू शकातात. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन करणे टाळावे.

पालक खाण्यामुळे होणारे नुकसान

यामध्ये प्युरिन आढळते. हे शरीरामध्ये पोहोचल्यावर युरिक अ‍ॅसिड बनते. यामुळे किडनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढू शकते आणि मग याचे रुपांतर स्टोनमध्ये होते.

यामध्ये असलेले प्यूरिनमुळे मेटाबॉलिज्म वाढून जातो. यामुळे शरीरामध्ये यूरिक ऍसिड वाढल्यामुळे संधीवाताचा त्रास असणार्‍या लोकांना खूप त्रासदायक ठरते. 

याच्या अधिक सेवनामुळॆ अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

यामध्ये असलेल्या ऑक्सेलिक अ‍ॅसिडमुळे अनेकदा व्हिटॅमिन आणि मिनरल्स चांगल्या रितीने शरीरामध्ये अ‍ॅब्जॉर्ब नाही होऊ शकत.

पालक पुरुषांसाठी फायदेशीर

यामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असते, जे रक्त प्रवाह वाढवणारे आहे. ही भाजी पौष्टिकतेने युक्त सुपर फूड आहे.ही भाजी प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन आणि मिनरलचा समृद्ध स्रोत आहे. 

रक्तातील फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होणे हे इरेक्टाइल डिसफंक्शनशी जोडलेले आहे. याशिवाय ही भाजी ऊर्जा वाढवणारी आहे.

त्याची पाने त्वचा, केस आणि हाडे मजबूत आणि पोषण करण्यासाठी तसेच लैंगिक इच्छा वाढवण्याचे काम करते. फॉलिक अ‍ॅसिड पुरुषांच्या लैंगिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

आरोग्यदायी पालक सूप कसे बनवावे ?

गरमागरम हेल्दी असं याचे सूप रेसिपी, अगदी साधी, सोपी आणि शिवाय झटपट होणारी आहे. तुम्ही सुद्धा हे सूप बनून त्याचे आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.

पालक सूप बनवण्यासाठी आवश्यक सामग्री

  • पाव किलो पालक ( आधी स्वच्छ धुऊन, नंतर कट करून घ्यायचा )
  • एक कांदा बारीक चिरून घ्यावा.
  • पाव कप दूध,
  • दुधाची साय किंवा मलाई
  • एक टीस्पून बटर
  • एक टीस्पून कॉर्नफ्लॉवर (कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे.)
  • अर्धा टीस्पून मिरीपूड
  • चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे.

कृती

  • गॅसवर एक कढई तापत ठेवा.
  • त्यामध्ये आधी एक चमचा बटर घाला आणि बटर थोडं मेल्ट झालं की, यामध्ये एक तेजपत्ता पण घाला. यामुळे स्वाद छान येतो.
  • तेजपत्ता थोडा परतून झालं की, त्यात चिरलेला कांदा घाला.
  • कांदा पण थोडासा परतून घ्या. कांदा फार ब्राऊन करायचा नाही. कांदा साधारण एक तीन चार मिनिट परता.
  • आता कांदा परतून झाल्यावर यामध्ये ही भाजी घाला.
  • आपल्यास ही भाजी फार शिजवायची नाही. (ही भाजी जास्त शिजवली तर तर याचा रंग बदलतो.)  
  • ही भाजी एक ते दोन मिनिटं परतून घ्या.
  • तर आता ही भाजी एक ते दोन मिनिट परतून घेतल्या नंतर गॅस बंद करा आणि ही भाजी थंड करून घ्या.
  • ही भाजी थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • पेस्ट बनून झाल्यानंतर ती काढून घ्या.
  • यानंतर हि पेस्ट कढईमध्ये घालून घ्या.
  • यानंतर कॉर्नफ्लॉवर मध्ये दूध घालून, याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या आणि ती याच्या प्युरी मध्ये घाला.
  • कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल. नुसतं दूध घातलं तरी चालेल.
  • आता हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • आता याला दोन ते तीन मिनिटं आपण शिजवून घ्या.
  • दोन ते तीन मिनिट मी शिजवून घेतल्यानंतर नीट उकळी आल्यानंतर त्यात मिरपूड घाला.
  • आवश्यकतेनुसार मीठ घाला मिठाचे प्रमाण थोडे कमीच ठेवा. कारण यामध्ये पण थोडंसं मीठ असतं.
  • यानंतर शेवटी यामध्ये दुधावरची साय घालायची आहे. (यात तुम्ही मार्केटची क्रीम घातली तरी चालेल.)
  • आता सर्व मिक्स करून घ्या आणि एक अर्धा ते एक मिनिट आता हे मिश्रण परत शिजवून घ्या.
  • अश्या रीतीने आपलं सूप आता तयार होईल. नंतर नीट गॅस बंद करून घ्या.
  • अशा पद्धतीने केलेले सूप, चवीला खूप अप्रतिम लागतं. एरवी याची भाजी न खाणाऱ्या लहान मुलांना देखील हे सूप खूप आवडलेलं तुम्ही देखील हे सूप घरी बनून बघा आणि याचे औषधी गुणधर्म तुम्ही देखील नक्की अनुभवा.

FAQ

१. पालक भाजी खाण्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ?

याच्या भाजीत, लोह व तांब्याचा अंश असल्याने अनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ही भाजी रक्त शुद्ध करते. हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते.
यामध्ये असणारे फॉलिक ऍसिड मुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.
गर्भवती स्त्रियांनी व माता ने आहारामध्ये याचे सेवन रोज करावे. ही भाजी खाल्ल्याने डोळ्याच्या तक्रारी कमी होतात.
याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो.
यामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे कावीळ, पित्तकारक, यामध्ये उपयुक्त आहे.
याचा एक ग्लासभर रस रिकाम्या पोटी नियमितपणे सेवन केल्याने, शौचालय साफ होऊन, पोट स्वच्छ राहते.

२. पालकविषयी थोडक्यात माहिती लिहा.

ही भाजी पालेभाज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ भाजी आहे. ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे, आरोग्यदायी सुद्धा आहे. याची पाने ही फिकट हिरवी, गुळगुळीत आणि पसरट अशी असतात.
यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, तसेच प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अ, ब व क जीवनसत्व, फॉलिक ऍसिड, भरपूर प्रमाणात असते.
आयुर्वेदानुसार ही भाजी शीत सारक, वायु कारक, पित्त शामक, रोग वेदन हरी आहे. या सर्व गुणांमुळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मटन, चिकन आणि मासे यांच्या मांसातून जेवढ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढ्याच प्रमाणात याच्या भाजीतून मिळतात. म्हणून मांसाहार न घेणाऱ्यासाठी या भाजीचे सेवन हे वरदानच आहे.

३. पालक खाताना कोणती काळजी घ्यावी ?

अति पाणी घालून ही भाजी शिजवू नये, तसेच भाजी शिजल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नये. त्यामुळे असणारे पोषक घटक वाया जाणार नाही.
पावसाळ्यामध्ये याच्या भाजीवर कीड पडते, तसेच ही भाजी वातप्रकोपक असल्याने, सहसा पावसाळ्यातही भाजी खाऊ नये.
पावसाळ्यामध्ये ही भाजी खाण्याचा मोह आवरला नसेल तर ती प्रथम स्वच्छ दोन-तीन पाण्याने धुवावी नंतर खावी.

४. पालक खाण्याचे काय फायदे आहेत ?

ज्यांना कडक संडासला होते, म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही, संडासला कडक होतं, त्यांच्यासाठी पोट साफ करण्यासाठी, ही भाजी अतिशय फायदेशीर आहे.
ज्यांना दम्याचा त्रास आहे आणि हा जो दम्याचा त्रास आहे ना तो वात आणि कफामुळे झालेला आहे. तर अशा प्रकारच्या दम्यामध्ये ही भाजी तुम्ही घेऊ शकता किंवा याचं ज्यूस घेऊ शकतो किंवा याचा काढा बनवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहेत, त्यांनी याचा समावेश आपल्या आहारात केला, शरीरातील दाह शामक म्हणून काम करतो.
यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, इत्यादीचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे आहारात याचे सेवन केल्याने हाड मजबूत होतात आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करते.

५. पालकामध्ये कोणते पोषक घटक आढळतात.

या भाजीमध्ये जीवनसत्व अ, ब, क आणि तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि लोह असते. पालकची भाजी नियमित खाल्ल्याने, शरीरातील रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

६. केसांसाठी पालक कसे उपयुक्त आहे ?

ही भाजी आरोग्य बरोबरच, केसांसाठीही चांगली असते. केस गळतीमुळे त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात याचा समावेश केला पाहिजे. कारण ही भाजी शरीरात लोहाची कमतरता भरून, केस गळणे कमी करते.

७. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालक फायदेशीर आहे का ?

ही भाजी आरोग्य बरोबरच, केसांसाठीही चांगले असते. केस गळतीमुळे त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात पालकचा समावेश केला पाहिजे. कारण पालक शरीरात लोहाची कमतरता भरून, केस गळणे कमी करते.

८. ॲनिमियाचा रुग्णाने पालक का खावा ?

ज्या व्यक्तींना ॲनिमिया झाला झालेला आहे. अश्या आजार झालेल्या व्यक्तीने पालकाची भाजी तर अवश्य खाल्ली पाहिजे. पालकामध्ये रक्त वर्धक गुणधर्म आहे. त्यामुळे शरीरात रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया लगेच सुरु होते. पालकाच्या भाजीमुळे रक्त शुद्ध होते आणि हाडे देखील मजबूत होतात. त्यामुळे ॲनिमिया झाल्या व्यक्तीने, पालकाची भाजी तर नक्कीच खाली पाहिजे.

९. शरीराची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पालकाचा वापर कसा करावा.

जर आपण पालकाचा २५ ml रस गाजराच्या ५० ml रसामध्ये मिक्स करून आपण पियालो तर आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी असते, अनावश्यक चरबी असते ती चरबी हळूहळू कमी होते.

१०. दातांसाठी पालकाचा कसा फायदा होतो ?

पालक दातांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कच्चा पालक चघळल्याने पायरीया पासून आराम मिळतो. पालकमध्ये विटामिन क देखील असते. ज्यामुळे हिरड्या मजबूत करण्यास मदत होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पालक या भाजीविषयी माहिती दिली आहे, तसेच पालक खाण्याचे अगणित फायदे दिले आहेत. तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुम्ही देखील तुमच्या आहारात पालकाचा समावेश करा, आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवा.

लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment