शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms – उन्हाळा आला कि अनेक जणांना हातापायांची आग होणे, तळपायाची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे, अशा तक्रारी होतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात त्रास होतो तो उष्माघाताचा. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की उष्माघाताचा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उष्माघातामुळे मृत्यु झाल्याच्या अनेक घटना उन्हाळ्यात घडत असतात.
तर या मागची लक्षणे कोणती? कारणे कोणती? कोणते घरगुती उपाय करावे या बद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखाद्वारे घेणार आहोत. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms – कधी कधी काही कारणाने, एकदम गरम झाल्यासारखे वाटते, बाहेर एवढा उकाडा नसला तरी, सगळ्यांचे तापमान वाढल्यासारखे वाटते, हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल. यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात.
खरंतर हा अगदी कॉमन त्रास आहे. सामान्यतः आपल्या शरीराचे तापमान 98.6 ft इतके हवे, पण ते कधी कधी जास्त कमी होत असते. आपले शरीर हे बाह्य वातावरणाशी एक्जस्ट करून, हे तापमान राखत असते. परंतु कधीतरी काही कारणाने हे तापमान वाढू शकते. यालाच “हिट स्ट्रोक” असे म्हणतात.
हे वाचा –
- गाजर खाण्याचे फायदे
- बद्धकोष्ठता म्हणजे काय
- शतावरी चे फायदे मराठी
- काकडी खाण्याचे फायदे
- जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय
- करवंद
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे
- हातापायांची आग होणे
- तळपायांना आग होणे
- डोळे जळजळणे
- थकवा येणे
- पोटात आग होणे
- लघवीला गरम होणे
- अशक्तपणा येणे
- चक्कर येणे
- शरीराची लाही लाही होणे
- डीहायड्रेशन होणे
शरीरातील उष्णता वाढण्याची कारणे
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms – वातावरणात उन्हाळा खूप प्रमाणात वाढणे, हे एक कारण आहे. पण ते एकमेव कारण मात्र नाही. तुम्हाला सुद्धा असे अनुभव आलेच असतील. अशा वेळेला या उष्णतेचा त्रास होतो पण त्यामागचे कारण न समजल्या मुळे परत परत हा त्रास होण्याची शक्यता असते.
एखादी समस्या दूर करायची असल्यास, त्या समस्या मागचे कारण मुळापासून नष्ट करणे जरुरीचे आहे. त्या साठी आपण त्याची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.
इन्फेक्शन
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms – शरीराचे तापमान वाढायला कारणीभूत असणारे इन्फेक्शन, हे आपले नेहमीचे कारण आहे. याचा अनुभव सगळ्यांनाच असतो कोणत्याहि इन्फेक्शन मुळे ताप आल्यावर, शरीराचे तापमान वाढते.
पण त्या इन्फेक्शनची दोन हात करण्याची ती आपल्या शरीराची पद्धत असते. इन्फेक्शन दूर झाल्यावर, शरीराचे तापमान परत नॉर्मल होते.
हायपर थायरॉडिझम
हायपर थायरॉडिझमच्या त्रासात शरीरात थायरॉईडचे हे हार्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवले जातात. हा आजार असणाऱ्या व्यक्तींना, हीट स्ट्रेसचा त्रास होण्याची शक्यता असते.
उष्ण आणि दमट वातावरणात अधिक काळ राहणे
उष्ण आणि दमट वातावरणात दीर्घकाळ राहून शारीरिक कामे केल्याने, शरीराचे तापमान तात्पुरते वाढू शकते. असे झाल्यावर थकवा जाणवतो.
घट्ट आणि सिंथेटिक कपडे घालणे
घट्ट आणि सिंथेटिक कपडे घातल्याने शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. हे होण्यामागे दोन कारणे असतात.
एक तर असे कपडे घाम शोषून घेत नाही आणि दुसरे कारण कपडे घट्ट असल्याने, त्यात हवा खेळती राहत नाही. त्यामुळे आपल्याला गरम होते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते.
तिखट आणि मसालेदार पदार्थ
तिखट आणि मसालेदार जेवण झाल्यानंतर, शरीराचे तापमान वाढते. याचबरोबर आहारात जर प्रोटीन जास्त प्रमाणात घेतले, तरी सुद्धा शरीराचे तापमान वाढते.
म्हणूनच तिखट आणि मसालेदार पदार्थ थोडे कमी प्रमाणात घ्यावे.
दारू किंवा कॅफिन
दारू किंवा कॅफिन जास्त प्रमाणात असणाऱ्या पेयाच्या अति सेवनाने शरीराचे तापमान वाढते.
व्यायाम/कष्टाचे काम
व्यायाम किंवा कोणती असे काम ज्यामध्ये शारीरिक कष्ट करावे लागतात, ते केल्यानंतर घाम येऊन शरीराचे तापमान वाढते.
कधीकधी काही आजारांचा परिणाम होऊन, सुद्धा शरीराचे तापमान वाढते.
औषधांचा परिणाम
तसेच काही औषधांमुळे जसे की अँटी बायोटिक्समुळे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते.
पाण्याचे कमी मात्रेत सेवन
पाणी कमी प्रमाणात घेतल्याने, म्हणजेच डीहायड्रेशन झाल्यावर शरीराचे तापमान वाढते.
शरीराचे तापमान अचानक वाढल्याने गर्मी होऊन बेचैन व्हायला होते.
शरीरातली उष्णता का वाढते ?
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms – शरीरातली उष्णता वाढण्याची महत्त्वाचे चार मुद्दे आहेत. ऋतू, आहार, विहार आणि कोणतेही विशिष्ट आजार.
ऋतू
उन्हाळा किंवा ग्रीष्म ऋतू सुरू झाला की, नद्यांमध्ये पाणी आटते, झाडे सुकून जातात, वैशाखामध्ये सर्वत्र रखरखीत पणा येतो, तसाच परिणाम आपल्या शरीरात होतो. शरीरातला ओलसरपणा किंवा द्रव भाग निसर्गाचा उष्णतेमुळे कमी होतो आणि शरीरात आग होऊ लागते.
ग्रीष्म ऋतू मध्ये सूर्य आपल्या अति तीव्र किरणांनी, पृथ्वीचा रस शोषून घेतो. म्हणून कफ कमी होतो आणि वात वाढतो.
आहार
आहार अर्थात शरीरात उष्णता वाढवणारा आहार, हे महत्त्वाचे कारण आहे. म्हणजे कोण कोणता आहार तर, तिखट, खारट आणि आंबट या तीन चवींच्या आहारामुळे, उष्णता वाढते.
खूप तिखट, चमचमीत पदार्थ आवडणाऱ्या लोकांच्या रक्तातली उष्णता वाढते. याशिवाय खूप जास्त प्रमाणात चहा, कॉफी असे पदार्थ शरीरातले पित्त वाढवतात आणि रक्तदृष्टी करतात.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ शरीरातले पित्त वाढवतात त्याशिवाय इतर आवश्यक घटकांचे किंवा न्यूट्रियंटचे शरीरातील शोषण देखील यामुळे मंदावते.
आहारात खूप जास्त प्रमाणात मीठ, साखर आणि तेल असेल तर, शरीरातले पाण्याचे संतुलन बिघडते. कारण हे सर्व हायग्रोस्कॉपिक आहेत. तर शरीरातील पाणी शोषून घेणारे आहेत. त्यामुळे शरीरात कोरडेपणा निर्माण होतो आणि अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
काही लोक पाणीच खूप कमी पितात, अर्थात पाण्याचा अतिरेक करणे आयुर्वेदानुसार अपेक्षित नाही. पण योग्य प्रमाणात तहान लागल्यावर, ऋतू आणि जीवनशैलीला अनुसरून योग्य प्रमाणात पाणीच पिले नाही तर अर्थात शरीरातील उष्णता नक्कीच वाढणार.
कुठल्याही प्रकारचे अल्कोहोल किंवा तत्सम ड्रिंक्स यामुळे देखील शरीरातील उष्णता नक्कीच वाढते. रक्तदृष्टी होते आणि परिणामी शरीरात उष्णता वाढते.
विहार
विहार म्हणजे थोडक्यात आपली जीवनशैली. यातले दोन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आपले दिवसभरातले काम म्हणजे दिनक्रम आणि दुसरा मुद्दा म्हणजे झोप.
ज्या लोकांना दिवसभर उभे राहून काम करावे लागते किंवा ज्यांचे वजन जास्त आहे, पायात दिवसभर वर्किंग शूज किंवा कठीण चप्पल घालावी लागतात, अश्या लोकांना पायाची आग होते.
उष्णते जवळ म्हणजेच भट्टीजवळ काम करणारे कामगार, हॉटेलमध्ये स्वयंपाक घरात काम करणारे आचारी आणि इतर कामगार, यांच्यातही शरीरातील उष्णता आणि कोरडेपणा वाढलेला असतो.
दिवसभर उष्णतेच्या संपर्कात राहिल्यामुळे शरीरातील मृदूपणा कमी होतो आणि कोरडेपणा वाढतो. त्याचा परिणाम म्हणून शरीरात उष्णता जाणवते.
यानंतर व्यवसायामुळे किंवा विनाकारण कोणत्याही वयाच्या लोकांनी अनावश्यक जागरण केले तर, शरीरातला वाद आणि पित्त वाढतो. निद्रा म्हणजेच झोप. याला आयुर्वेदात धात्री म्हणजे शरीराचे किंवा जीवनाचे धारण करणारी असे म्हटले आहे.
आधुनिक दृष्ट्या जेव्हा जैविक घड्याळ आपण जागरण किंवा झोपेच्या अनियमित वेळेमुळे बदलून टाकतो, त्याचा परिणाम शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे होतो.
उन्हाळ्यात किंवा अधिक जेव्हा शरीरातील उष्णता वाढलेली असते, तेव्हा जागरण केले तर त्याचा परिणाम हातापायांवर, डोळ्यांवर, जास्त प्रमाणात होतो.
काही विशिष्ट आजार
यामध्ये सर्वात महत्त्वाचा आजार आहे, मधुमेह. हातापायांची जळजळ होणे, हे मधुमेहाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
दुसरे आहे, हायपोथायरॉइडिजम, तिसरे B12 कॉम्प्लेक्स या विटामिन ची कमतरता निर्माण झाल्यामुळे होणारी हातापायांची आग, हे अगदी सर्रास आढळणारे लक्षण आहे. याशिवाय शरीरात यूरिक ॲसिड वाढले तर, त्यामुळे देखील हातापायांची जळजळ होते.
उष्णता कमी करण्यासाठी उपाय
शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे Body Heat Symptoms – उष्णता कमी करण्यासाठी आहार आणि विहार हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. आहारात काय टाळायचे तर, ज्या कारणांनी ही समस्या निर्माण होते.
चहा, कॉफी, तंबाखू, अल्कोहोल, तेल, साखर, मीठ, यांचा अतिरेक हे सर्व टाळायचे.
कोथिंबीर किंवा धने
आपल्या किचनमध्ये किंवा रोजच्या वापरात असणाऱ्या काही घरगुती औषधांमध्ये देखील या समस्येसाठी उत्तम उपाय सापडतात. जसे कोथिंबीर किंवा धने.
रोज कोथिंबीरीचा रस पोटातून घेणे किंवा लावणे या दोन्हीचा उपयोग होतो किंवा धने एक कप पाण्यात रात्री भिजवावे, सकाळी उकळून ते पाणी प्यावे. असे सकाळी भिजवून रात्री ते पाणी प्यावे.
जिऱ्याचे पाणी
याप्रमाणे जिऱ्याचे पाणी देखील उपयुक्त होतील.
दुर्वा
यानंतर दुर्वा ही महत्त्वाची वनस्पती ही या तक्रारीत खूप छान काम करते.
म्हणजे औषधी तूप पोटातून घेणे किंवा दुर्वांचा रस लावल्यामुळे, देखील उष्णता तत्काळ कमी होते.
कोहळा किंवा कुष्मांड
कोहळा किंवा कुष्मांड हा देखील खूप उत्तम उष्णता शामक आणि रक्तप्रसादक आहे. पित्त आणि उष्णता त्वरित कमी करणारा कोहळा उन्हाळ्यात सर्वांच्या आहारात असायला हवा.
मधुर रसाचा व शीत गुणाचा कोहळा रस किंवा भाजीच्या स्वरूपात आहारात समाविष्ट केल्यास, त्यामुळे उष्णता वाढत नाही आणि वाढलेली उष्णता कमीही होते.
चंदन
आणखी असेच त्वरित उपयुक्त औषध म्हणजे, चंदन. जर खरे अगदी अस्सल चंदनाचे खोड मिळाले तर ते उगाळून त्याचे गंध उपाशीपोटी एक चमचा घेतले, तर अगदी तीन दिवसात पायांची, डोळ्यांची, आग कमी होते.
पण हे मिळणे सध्या फार अवघड आहे. दुकानात चंदनाचा सेंट मारलेल्या काड्या मिळतात, पण त्या अर्थात असल असणे फार अवघड आहे.
कोरफड
सोपी आणि स्वस्त सर्वांना सहज उपलब्ध होणारी आणखी एक वनस्पती म्हणजे, कोरफड. यकृतावर अतिशय उत्तम कारक काम करणारी कुमारी म्हणजेच कोरफड.
सकाळी एक चमचा याचा गर तूप आणि कोमट पाण्याबरोबर घेतला तर, उष्णतेच्या पचनाच्या आणि इतरही अनेक तक्रारी कमी होतात.
हळद
हळद देखील यासाठी अशीच एक महत्त्वाची औषधी आहे.
रक्त शुद्धी करणारी, शरीरात अँटीबॅक्टरियल काम करणारी हळद, त्वचा विकार, त्वचेची आग होणे, खाज येणे, अशा सर्व विकारात उपयुक्त असते.
भाजलेल्या सातूचे पीठ
उष्णता कमी करण्यासाठीचा आणखी एक सोपा उपाय सांगितला आहे, तो म्हणजे भाजलेल्या सातूचे पीठ करून खडीसाखर घालून ते घेतले तर, शरीरातील उष्णता आणि कोरडेपणा दोन्ही लगेच कमी होते.
इतर घटक
याशिवाय आहारात श्रीखंड, ताजे ताक, सरबत, धने जिरे यांचे सरबत किंवा कैरीचे पन्हे, उसाचा रस, ओला नारळ, खजूर यांचा समावेश उष्णता कमी करण्यासाठी करावा. पण फ्रीज मधले पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक हे मात्र टाळावे.
यामध्ये अतिरिक्त साखर जाते. शिवाय कृत्रिम रित्या थंड केलेल्या पदार्थांनी तहान भागत नाही. शरीराचे पोषण होत नाही. म्हणून तात्पुरत्या थंडाव्यासाठी असे पदार्थ घेणे मात्र टाळावे.
मनुका, त्रिफळा चूर्ण
मनुका, त्रिफळा, अशी काही औषधे देखील शरीरातील पित्त हळुवारपणे कमी करतात आणि शरीर घटकांना बळ देण्याचे काम करत असतात.
म्हणून आग होणे किंवा जळजळ होण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. अगदी थोड्या प्रमाणात कधीतरी आग होत असेल तर केवळ मनुका, त्रिफळा चूर्ण, यांचे एक अल्पविरेचन घेतले की या तक्रारी लगेच कमी होतात.
उष्णता कमी करण्यासाठी काही बाह्य उपचार
- दुपारी झोपणे, आयुर्वेदानुसार निषिध आहे. पण ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील कफ दोष कमी झालेला असतो, उष्णता वाढलेली असते, त्यामुळे थकवा येतो. म्हणून दुपारी जेवणानंतर दोन तासाचे अंतर ठेवून, थोडी झोप घेतली, तर या ऋतला थकवा किंवा उष्णता कमी होते. म्हणून जागरण टाळावे आणि दुपारच्या वेळी बाहेर न जातात, थोडी विश्रांती घ्यावी.
- पादाभ्यंग, रोज रात्री औषधी तेल किंवा तूप यांनी तळपायांची मालिश केली तर, त्याचा फायदा केवळ तळपायांना नाही तर, डोळे, डोके आणि इतर अवयवांनाही नक्की होतो. फार सोपा परिणामकारक उपाय आहे. ज्यांना फारच पायांची आग होते, त्यांनी कैलासजीवन, तूप, याने रोज रात्री पादाभ्यंग अवश्य करावा.
- अवघाह, म्हणजे पाय औषधी काड्यांमध्ये बुडवून ठेवणे. त्यासाठी चंदन, वाळा, मंजिष्ठा, यापैकी कुठल्याही वनस्पतीचा काढा वापरता येतो किंवा कडूलिंबाचा रस, कोरफडीचा गर अशा कुठल्याही रसामध्ये पाय दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवले, तर त्यांनी हाता पायांच्या, डोळ्यांच्या आणि शरीरातील एकंदर उष्णता लवकर कमी होण्यास मदत होते.
- लेपन, त्याचबरोबर वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचे लेपन देखील करता येते. यासाठी धने पूड, मुलतानी माती, चंदन, मंजिष्ठा, अशा औषधी द्रव्यांचा हाता पायांना लेप करता येतो.
- ज्यांना पायांची आग होते आणि पायावर सूज येते, अशा लोकांनी रात्री दहा-पंधरा मिनिटे, पाय भिंतीवर किंवा खुर्चीवर ठेवावे, त्यामुळे पायाकडे होणारा रक्तप्रवाह, दिवसभर येणारा ताण कमी होतो आणि पायांची आग वेदना किंवा सूज कमी होते.
- आयुर्वेदानुसार, अनेक व्याधींचे उपलक्षण म्हणून तळपायांची किंवा शरीराची आग होते. व्यक्तीला आतून शरीरात उष्णता वाढली अर्थात याचा अर्थ शरीरातले पित्त, वात हे दोन दोष प्रमाणाबाहेर वाढले आहेत. त्यासाठी मुळापासून उपचार म्हणजे, त्या व्याधीचे औषध घ्यावी लागतात आणि पंचकर्मान पैकी सर्वात महत्त्वाचा आणि परिणामकारक उपचार म्हणजे शास्त्रशुद्ध रीतीने विवेचन घ्यावे.
- ग्रीष्मा आणि शरद या दोन ऋतूत शरीरातली उष्णता नैसर्गिक रित्याच वाढते. म्हणून प्रतिबंधक म्हणजे या ऋतू मधल्या व्याधी किंवा समस्या निर्माण होऊ नये, म्हणून या दोन ऋतूत विवेचन आणि वमन अशा पंचकर्मांचा निर्देश आयुर्वेदाने केला आहे.
शरीरातील उष्णता कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय
- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे शरीरातील पाणी वाढवा. नाहीतर उष्णतेमुळे अनेक त्रास सुरू होतील.
- दररोज प्राणायाम करा, उष्णतेचा त्रास होणार नाही.
- अनुलोम विलोम करा.,शरीराचे तापमान स्थिर राहील.
- उजवी नाकपुडी बंद करून, डावी नाकपुडी जास्त वेळ चालू ठेवा. उजव्या कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी जास्त वेळ चालू राहील. कारण ती चंद्र नाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
- हलका आहार घ्या. पित्त वाढू देऊ नका आणि पोट साफ ठेवा.
- माठातील थंड पाणी खाली बसून, सावकाश घोट घोट प्या. घटाघटा नाही.
- जिरेपूड एक चमचा खडीसाखर एक चमचा, एक ग्लास ताकातून रोज प्या. उष्णता वाढणार नाही.
- प्रत्येक काम घाईघाईत न करता, सावकाश करा.
- बर्फ घालून कोणतेही पेय पिऊ नका. कारण बर्फ गरम आहे.
- आवळा, कोकम, लिंबू, सरबत, मठ्ठा, ताक, जरूर प्या.
- दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खा. कांदा थंड असल्याने, तो शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो.
- सकाळी उठल्या उठल्या एक-दोन ग्लास कोमट पाणी प्या. जेवतेवेळी मध्ये एक दोन वेळा थोडे पाणी प्या.
- उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा.
- ऊन्हातून आल्यावर गूळ पाणी प्या. खडीसाखर सोबतच ठेवून, थोडी थोडी खात राहा. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल, तळपायांना चोळा आणि थोडे बेंबीत टाका. तसेच देशी गायीचे तूप नाकात टाका उष्णता कमी होईल.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
उष्णता वाढली की डोळ्यांची आग होणं, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड, अशा समस्या येऊ लागतात. शिवाय कधी कधी भरपूर घाम देखील येतो, असह्य वाटू लागतं.
यावर काही सोप्या टिप्स आहेत, जे केल्याने लगेच तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. तर आज आपण जाणून घेणार आहोत काही सोपे घरगुती उपाय, ज्यामुळे तुम्हाला शरीरात जर उष्णता असेल तर, ती कमी करण्यासाठी मदत होईल.
कोकम सरबत
जर कधी स्पायसी खाल्लं असेल किंवा जंक फूड खात असाल आणि जास्त मसालेदार पदार्थ खात असाल, तर थोड्यावेळाने तुम्हाला जळजळ होते.
काही जणांना मळमळ चा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे जर तुम्ही असं काही खात असाल तर, एका तासाच्या अंतराने कोकम सरबताचे सेवन करा. त्यामुळे नक्कीच फायदा मिळतो.
काशाच्या वाटेने पाय घासावेत
काही जणांना रोजच्या रोज हाताला पायाला, तळपायाला आग होत असते. तर रोज रात्री तळपाय, हाताला, तेल लावून काशाच्या वाटेने पाय घासावेत.
त्यामुळे झोप देखील शांत लागते. शिवाय हाता पायाची उष्णतेने होणारी जळजळ ही कमी होण्यास मदत मिळते.
जीर
जीर अत्यंत थंड असतं, त्यामुळे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकावे आणि ते भिजत ठेवावे. सकाळी या पाण्याच सेवन करावं.
यामुळे शरीराला थंडावा देखील मिळतो. शिवाय वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पाण्याच जास्तीत जास्त सेवन करणे
भरपूर पाणी प्यावं. माठातील पाण्यावर जास्त भर द्यावा. फ्रिजमधील थंड पाणी पिणे शक्यतो टाळावं. फक्त तहान लागते, तेव्हाच पाणी पिऊ नये.
सब्जा अथवा तुळशीचे बी खावे
रोज शक्य असेल तर दूध, सरबत किंवा तर साध्या पाण्यातून एक चमचा सब्जा अथवा तुळशीचे बी घ्यावेत यासोबत रोज सकाळी गुलकंद खाल्लं तर उत्तमच.
ताक पिण्याची सवय लावा
रोज दुपारी जेवणानंतर ताक पिण्याची सवय लावा. रात्री कधीही ताकाचे सेवन करू नका. आहारात दूध, दही, तूप, याचं सेवन करावं.
तुपाचं गुणधर्म थंड असल्याने, पोटात थंडावा आणि उष्णता कमी होण्यास मदत मिळते. ताक घेताना, त्यात पुदिना, धणे, जिरे पूड, हिंग, घालून घेतल्याने अधिक फायदा होतो.
शरीरातील तापमान बॅलन्स असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे उष्माघाताचा म्हणजेच हिट स्ट्रोक याचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. शिवाय ऋतु नुसार, आपण आपल्या आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं असतं.
FAQ
१. शरीरातील उष्णता कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय काय आहेत ?
उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे शरीरातील पाणी वाढवा. नाहीतर उष्णतेमुळे अनेक त्रास सुरू होतील.
दररोज प्राणायाम करा, उष्णतेचा त्रास होणार नाही.
अनुलोम विलोम करा.,शरीराचे तापमान स्थिर राहील.
उजवी नाकपुडी बंद करून, डावी नाकपुडी जास्त वेळ चालू ठेवा. उजव्या कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी जास्त वेळ चालू राहील. कारण ती चंद्र नाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
हलका आहार घ्या. पित्त वाढू देऊ नका आणि पोट साफ ठेवा.
माठातील थंड पाणी खाली बसून, सावकाश घोट घोट प्या. घटाघटा नाही.
जिरेपूड एक चमचा खडीसाखर एक चमचा, एक ग्लास ताकातून रोज प्या. उष्णता वाढणार नाही.
प्रत्येक काम घाईघाईत न करता, सावकाश करा.
बर्फ घालून कोणतेही पेय पिऊ नका. कारण बर्फ गरम आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे कारणे उपचार या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती व हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.