ऑक्साना मलाया : कुत्र्यांनी वाढवलेली मुलगी– सन 1994 मध्ये, युक्रेनमधील नोव्हा ब्लागोविश्चेन्का (Nova Blagovishchenka) गावात एका अनोळखी फोनवरून माहिती मिळल्याप्रमाणे पोलिसांनी जंगलात शोधले असता कुत्र्यांमध्ये राहणारी एक 7 ते 8 वर्षाची जंगली मुलगी आढळून आली . स्थानिक पोलिसांनी जंगली माणसांशी यापूर्वी कधीही व्यवहार केला नव्हता आणि त्यांना या मुलीला कुत्र्यांपासून विलग करण्यासाठी मांस टाकून कुत्र्यांचे लक्ष विचलीत करावे लागले.
कोण होती ही मुलगी ? आणि ती शिकारी कुत्र्यांच्या टोळीत कशी आली ?
सात वर्षांच्या मुलीची ओळख शेवटी ऑक्साना मलाया म्हणून झाली, ती एक स्थानिक मुलगी होती. तिचे पालक व्यसनी आणि मद्यपी होते. तिच्या पालकांनी तिला जवळपास 2 वर्षाची असताना घराबाहेर सोडून दिले होते.
ऑक्साना मलायाचे बालपण
ऑक्साना ओलेक्सांद्रिव्हना मलाया, जीला ओक्साना मलाया या नावाने ओळखले जाते, हीचा जन्म 4 नोव्हेंबर 1983 रोजी झाला. जन्माच्या वेळी ती एक सर्वसाधारण मुलगी होती. तिचे पालक व्यसनी आणि मद्यपी असल्याने ती 3 वर्षांची असताना त्यांनी तिला घराबाहेर सोडून दिले आणि नंतर तिची काळजी करणे सुद्धा सोडून दिले. त्या नंतर ही मुलगी तिच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या भटक्या कुत्र्यांसोबत राहू लागली. का कोण जाणे पण त्या भटक्या आणि जंगली कुत्र्यांनी तिला आपल्या टोळीत सामावून घेतले.
पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिला पुन्हा समाजात सामावून घेणे अवघड होते. तिला जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा तिचे वय अवघे सात वर्षे आणि काही महिने होते. आजूबाजूला चौकशी केली असता, गेली चार-पाच वर्षे ही मुलगी गावात दिसत नसल्याचे लोक म्हणाले आणि तिचे नाव ऑक्साना आहे असे पोलिसांना समजले.
कुत्र्यांच्या सहवासाचा परिणाम
तिचे कुत्र्यांशी बंधन इतके घट्ट झाले की ती दोन पायावर चालणे, हाताने खाणे शिकलीच नाही. तिला बोलता सुद्धा येत नव्हते. तिने त्यांच्या वागण्याशी जुळवून घेतले, चारही बाजूने धावणे, भुंकणे, जमिनीवर झोपणे आणि अगदी कुत्र्यासारखे खाणे आणि तिच्या स्वच्छतेची काळजी घेणे या सर्व गोष्टी ती कुत्र्यांप्रमाणे करायची.
अधिक तपासणी केले असता असे लक्षात आले, की तिची मानसिक वाढ पूर्णपणे खुंटली आहे. त्याचबरोबर ती कुजके, नासके अन्न तसेच कच्चे मांस पचवू शकते. चार पायावर चालत असल्यामुळे तिला दोन पायावर चालणे शक्य नव्हते.
वैद्यकीय उपचार आणि थेरपी
कुत्र्यांच्या टोळीशी तिचे बंधन इतके घट्ट होते की त्यावर मात करणे पोलिसांना अवघड होते, परंतु मलायाला समाजात सामावून घेणे आणि तिला पुन्हा माणसासारखे कसे वागायचे हे शिकवणे आणखी आव्हानात्मक ठरले .
काही दिवस तीला हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर मानसोपचार तज्ञ यांच्या संस्थेमध्ये ठेवण्यात आले. तिथे तिला दोन पायावर चालणे, हातांचा वापर करणे, बोलणे, कपडे घालणे ह्या गोष्टी शिकवण्यात आल्या. मलायाला मनोरुग्ण संस्था आणि ग्रुप होममध्ये देखील दाखल करण्यात आले.
हे पण वाचा 👉विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी
एका अनाथाश्रमाच्या शाळेत, मलायाला अधिक विस्तृत शब्दसंग्रह यशस्वीरित्या शिकवण्यात आला. तिने पुन्हा सरळ कसे चालायचे आणि इतर माणसांसारखे संवाद साधायचे हे देखील शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ऑक्सानाचे पुन्हा माणसांत वास्तव्य
तिला मानसिकदृष्ट्या अपंग मुलांसाठी असलेल्या उपचारगृहात हलवण्यात आले जेथे तिने अनेक वर्षे विशेष थेरपी घेतली. तिच्या वर्तणुकीशी संबंधित, सामाजिक आणि शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तिने अनेक वर्षे विशेष उपचार आणि शिक्षण घेतले. प्रौढ झाल्यावर तिला समाजात वावरणे शिकवले गेले. ती हळहळू अस्खलितपणे आणि समजूतदारपणे बोलायला शिकली आणि गायींचे दूध देणाऱ्या शेतात काम करते, परंतु ती काहीशी बौद्धिकदृष्ट्या दुर्बल आहे.
डॉक्युमेंटरी आणि प्रसिद्धी
ओक्सानाच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे आणि प्रेसमध्ये तिच्याबद्दल असंख्य लेख लिहिले गेले आहेत. चॅनल 4 डॉक्युमेंटरीमध्ये आणि पोर्तुगीज SIC चॅनल डॉक्युमेंटरीमध्ये, तिच्या डॉक्टरांनी सांगितले की तिचे “सामान्य” समाजात पूर्णपणे पुनर्वसन होण्याची शक्यता नाही.
2001 मध्ये, रशियन टीव्ही चॅनेल “NTV” ने तिच्या जीवनावर एक माहितीपट बनवला. ओक्साना मलायाने 2013 मध्ये एक मुलाखत दिली आणि कबूल केले की तिला सामान्य माणसासारखे वागायचे आहे. 2013 मध्ये, मलायाने युक्रेनियन राष्ट्रीय टीव्हीवर, गोव्होरिट युक्रेना या टॉक-शोमध्ये एक मुलाखत दिली , जिथे ती स्वतःबद्दल बोलली आणि प्रश्नांची उत्तरे दिली.
शो दरम्यान, मलाया म्हणाली की तिला सामान्य माणसाप्रमाणे वागायचे आहे आणि जेव्हा इतर लोक तिला “डॉग -गर्ल” म्हणतात तेव्हा ती नाराज होते.
ऑक्सानाची सध्याची स्थिती
गंमत म्हणजे, आता मोठी झाल्यावर ती तिच्या स्वतःच्या पाळीव कुत्र्यासोबत जास्त वेळ घालवत नाही.
ऑक्साना मलाया आता जवळजवळ 40 वर्षांची आहे आणि ती मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी असलेल्या घरात राहते. ती गाईंच्या डेयरी मध्ये काम करते. ती शेतातील प्राण्यांकडे लक्ष देते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती तिच्या स्वतःच्या पाळीव कुत्र्यासोबत जास्त वेळ घालवत नाही.
मलाया आता चाळीशीत असली तरी, तिला अद्याप तिच्यावर देखरेख आवश्यक आहे आणि कदाचित ती कधीही पूर्णपणे स्वतंत्र होणार नाही. तिच्या वागण्या बोलण्यात भावनांची कमतरता जाणवते. तिचे बोलणे सपाट आणि भावनाशून्य आहे आणि ती बोलते तेव्हा लय नसते.
तिने सांगितले की तिच्या भावांनी तिला अधिक वेळा भेटावे अशी तिची इच्छा आहे आणि तिच्या आयुष्यातील मुख्य स्वप्न म्हणजे तिची आई शोधणे.
ऑक्सानाबद्दल मानसोपचार तज्ञांचे मत
मलायाची लहान वयात तपासणी केली असता सहा वर्षांच्या मुलाची मानसिक क्षमता असल्याचे आढळून आले. तिच्या कथेवरुन मानसोपचार तज्ञांचे असे मत आहे की निसर्गाच्या तुलनेत योग्य पालन पोषण ही मनुष्याच्या वागणुकीत मोठी भूमिका बजावते. ऑक्साना मलायाची कथा हे स्पष्टपणे दर्शवते की निसर्गापेक्षा पोषण ही मोठी भूमिका बजावते.