माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 संपूर्ण माहिती : Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 । माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 _ केंद्र सरकारने सुद्धा “बेटी बचाव बेटी पढाव” ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत, ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांना, ही योजना लागू करून, या योजनेसाठी भारत देशातील शंभर जिल्ह्यांची खासकरून निवड करण्यात आली होती. याच्या पाठोपाठ सुकन्या योजनेचा लाभ कायमस्वरूपी ठेवून, “माझी कन्या भाग्यश्री योजना” ही योजना दिनांक १ ऑगस्ट २०१६ पासून राबविण्यात आली आहे.

Table of Contents

महाराष्ट्र राज्य माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 | Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023

या लेखाद्वारे आम्ही आपणास, “माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३” च्या बाबतीत संपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच, या योजनेसाठी कसा अर्ज करावा ? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?  सरकारने कोणता निर्णय घेतला आहे ? पात्रता ? या योजनेचे उद्दिष्ट काय? याबाबतची माहिती दिलेली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

प्रस्तावना MKBY Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 ही योजना सुकन्या योजनेत बदल करून, १ एप्रिल २०१६ पासून महाराष्ट्र राज्यत सुरू केली. महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील रहिवाशांसाठी, विविध प्रकारच्या उपयुक्त योजना तथा सेवा राबवीत असते. या योजना अंतर्गत, राज्यातील मुलींसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य शासनाने “माझी कन्या भाग्यश्री योजना” सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत, महाराष्ट्र राज्यांमधील मुलींच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या आरोग्याबाबत, सुधारणा करण्यासाठी, मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था आणि समाजामध्ये असलेल्या मुलींच्या जन्माविषयीच्या नकारात्मक विचारांमध्ये सुधारणा आणून, मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी, त्याचप्रमाणे बालविवाह ही प्रथा रोखण्यासाठी व मुलांइतकच मुलींना सुद्धा सन्मान देण्यासाठी, त्यांचा जन्मदर वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने राज्यात २०१४  साली सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या सुकन्या योजनेत बदल करून, १ एप्रिल २०१६ पासून, “माझी कन्या भाग्यश्री योजना” राज्यामध्ये राबवण्यास सुरुवात केली.

महाराष्ट्र राज्य माझी कन्या भाग्यश्री योजना ध्येय्य

महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, व त्याचबरोबर शिक्षणाची हमी देण्यासाठी, मुलींच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी, १ एप्रिल २०१६ पासून, “माझी कन्या भाग्यश्री योजना” राज्यामध्ये राबवण्यास सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखाली येणाऱ्या कुटुंबात, जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे.

दोन मुलींसाठी योजना – मुलगा व्हावा हा हट्ट सोडून मुलींचेही पालन पोषण आणि शिक्षण चांगले व्हावे, यासाठी शासनाने ही माझी कन्या भाग्यश्री दोन मुलींसाठी योजना सुरू केली आहे

त्याचप्रमाणे दारिद्र्यरेषेवरील “एपीएल” कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा लाभ, भारत सरकारने दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने १ एप्रिल २०१६ लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजना मध्ये बदल करून, सरकारच्या नियमानुसार, राबविण्यात आलेली “माझी कन्या भाग्यश्री योजना” ही सुधारित करून, १ ऑगस्ट २०१७ पासून, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे साडेसात लाख रुपयांपर्यंत असेल, अशा राज्यातील सर्व रहिवाशांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना” या योजनेअंतर्गत माता पित्याने एका मुलीच्या जन्मानंतर, लगेचच एका वर्षाच्या आत मध्ये परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलींच्या नावावर सरकार बँक मध्ये पन्नास हजार रुपये जमा करेल, तसेच या योजनेच्या माध्यमाने, माता-पित्याने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले असेल, तर त्या परिवार नियोजन केलेल्या दोन्ही मुलींच्या नावावर सरकारकडून २५-२५ हजार रुपये बँक मध्ये देण्यात येतील.

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ ची मुख्य उद्दिष्टे

  • राज्य सरकारने “माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३” सुरू करण्याचा मुख्य उद्देश, हा मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये नकारात्मक विचार दूर करून, सकारात्मक विचार निर्माण करणे हा आहे.
  • मुलींना समाजामध्ये शिक्षणासाठी योग्य ते प्रोत्साहन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत, मुलींना शिक्षणासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत, लिंग निवडणेस प्रतिबंध करणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • समाजामध्ये वाढलेल्या नकारात्मक विचारांमुळे, मुलीच्या जन्माला प्रतिबंध आणल्याने मुलींचे जन्मदर कमी झाले आहे. या योजनेअंतर्गत, मुलींना समाजामध्ये योग्य वागणूक मिळावी, व त्यांचा जन्मदर वाढवावा. हा या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अजून एक मुख्य उद्देश आहे.
  • मुलांप्रमाणे, मुलींना सुद्धा समाजामध्ये समान दर्जा व शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा उद्देश या योजनेचा आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना मुख्य वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्यात 13 फेब्रुवारी 2014 पासून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या सुकन्या योजनेचा लाभ एक जानेवारी 2020 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी देह राहणार आहे. भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड 2011 च्या मुलींच्या जन्माबाबत जनगणनेनुसार करण्यात आली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर हा मुलांच्या जन्मदर पेक्षा कमी आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रप्रमुख सुकन्या समृद्धी योजना आहे.

महाराष्ट्रामध्ये पूर्वी चालू असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेचे विलीनीकरण करून, माझी कन्या भाग्यश्री नावाने नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत बेटी बचाव बेटी पढाव या धर्तीवर महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करणे, बालविवाह प्रतिबंध करणे, स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे, त्याचबरोबर मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे या सर्व उद्दिष्टांना नजरेसमोर ठेवून माझी कन्या भाग्यश्री या योजनेची वैशिष्ट्ये आणि अटी ठरवण्यात आलेल्या आहेत.

MKBY 2022 Highlights

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
राज्य सरकार महाराष्ट्र सरकार
कधीपासून सुरु1 एप्रिल 2016
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्यातील मुलगी
उद्दिष्ट्यलिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, बालविवाह प्रतिबंध

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप

2016 पासून महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील मुलींचे शिक्षण प्रमाण सुधारण्यासाठी त्याचबरोबर मुलींच्या जीवनात स्थैर्य देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एक वर्षे मदतीच्या आत नसबंदी करणे अत्यावश्यक आहे एका मुलीनंतर नसबंदी केली असता जवळपास 50 हजार रुपये सरकार पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा करेल.

ही योजना पहा 👉विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023

त्याचबरोबर जर दुसरी मुलगी जन्मल्यानंतर सहा महिन्याच्या आत नसबंदी केल्यास या योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये बक्षीस अनुदान म्हणून देण्यात येतील.

पूर्वी दारिद्र्यरेषेखातील अशी कुटुंबे यांचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत होते. ते या योजनेसाठी पात्र होते मात्र सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे या योजनेतील पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयावरून 7.5 लाख रुपये करण्यात आलेले आहे

त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपये पर्यंत आहे ते सर्व पालक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात.

या योजनेत प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील एका जोडप्याच्या दोन मुलींनाच या योजनेचा फायदा होऊ शकतो.

माझी कन्या भाग्यश्री योजना व्हिडिओ

माझी कन्या भाग्यश्री योजना शासन निर्णय bhagyashree yojana maharashtra 2023

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे या उद्दिष्टांसाठी केंद्र शासन निर्णयान्वये सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत बँकेतर्फे आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम देण्यात येईल, अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली होती.

ही योजना पहा 👉नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 

महाराष्ट्र शासन तर्फे माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करण्यात आलेली असून माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात, सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आहे.

सुकन्या योजनेचे फायदे कायम ठेवून  बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत खालील तक्ता क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे लाभ आहेत.

दारिद्र रेषेखालील एपीएल रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीसाठी तक्ता क्रमांक दोन मधील एक लाभ प्रदान करण्यात येणार आहेत.

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 -
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 -
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 -
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 -

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना लाभार्थी पात्रता

  • अर्जदार पालक हे महाराष्ट्राचे कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार पालक हे दारिद्र रेषेखालील बीपीएल/ एपीएल रेशन कार्ड धारक असावे.
  • एकुलती एक मुलगी असेल आणि मातेने कुटुंब नियोजन केले असेल तर ती मुलगी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असते.
  • दोन मुली असतील आणि मातेचे कुटुंब नियोजन झालेले असेल तर माता योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र असते.
  • तिसरे अपत्य झाले तर पूर्वीच्या दोन्ही मुलींना असलेला लाभ बंद करण्यात येईल.
  • दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्र क्रिया प्रमाणपत्र नसल्यास अशा परिस्थितीत लाभ देय राहणार नाही

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चे लाभ कोणते?

  • या योजनेनुसार, राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
  • या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) शस्त्रक्रिया केली तर 50 हजार रुपये राज्य सरकारकडून बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.
  • राज्य शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 50,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येईल.
  • बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 50,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल ज्यावेळी तिच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात होईल .
  • ही मुद्दल रुपये 50,000/- मुदत ठेवीत गुंतवणूक करून पुढील सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
  • त्यांनंतर पुढे पुन्हा 50,000/- रुपये मुदत राष्ट्रीयकृत बँकमध्ये ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही एकत्र रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
  • जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले. तर अश्या परिस्थितीत सरकारकडून दोन्ही मुलींना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जातील.
  • राज्य शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 25,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येईल.
  • बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 25,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या साहव्या वर्षी काढता येईल.
  • पुढे पुन्हा मुद्दल 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
  • त्यांनंतर पुढे पुन्हा 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल
  • महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून वाढवून 7.5 लाख रुपये केली आहे.
  • या योजनेअंतर्गत, मुलींच्या पालकांना एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल.
  • महाराष्ट्र राज्य माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल. ज्यामध्ये दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना सामाजिक लाभ काय आहेत?

१. मुलीच्या जन्माच्या वेळी

महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा केला जातो. मुलीच्या जन्माच्या वेळी साजरा केला जात नाही. म्हणूनच मुलीच्या जन्माचे कौतुक करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून मुलीच्या जन्मास प्रोत्साहन मिळेल आणि समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यास मदत होईल.

२. मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत दर वर्षाच्या शेवटी

दारिद्र रेषेखालील कुटुंबाकडे उत्पन्नाचे मर्यादित असल्यामुळे त्या स्त्रोतांचा उपयोग करताना मुलींच्या पालन पोषण याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सरकारतर्फे आर्थिक मदत केल्यामुळे मुलीच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यास, त्यासोबतच मुलीचे लसीकरण आणि इतर खर्च भागवण्यास कुटुंबाला मदत होते

३. मुलीला पहिली ते पाचवी व ६ वी ते १२ वीत आर्थिक मदत

इयत्ता पहिली पासून मुलीच्या शिक्षणाचा अतिरिक्त बोजा पालकांवर पडू नये, त्यासोबतच मुलींचे शिक्षण होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत मुलींना भरघोस मदत केली जाते त्यामुळे स्त्रियांचीपुढील पिढी ही आरोग्य संपन्न आणि सुशिक्षित बनवू शकण्यास मदत होते.

४. वयाच्या १८व्या वर्षी आर्थिक मदत

वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलगी प्रौढ मानली जाते. त्यावेळी मुलीला स्वयंपूर्ण व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत मिळते यामुळे मुलीच्या व्यवसायासाठी किंवा त्यासोबतच तिच्या लग्नासाठी पालकांना मदत मिळते.

५. मुलीच्या जन्मानंतर आजी-आजोबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार

बऱ्याच कुटुंबात अजूनही ज्येष्ठ लोक म्हणजे सासू-सासरे यांच्याकडून मुलांसाठी सुनेवर दबाव टाकला जातो. हे लक्षात घेऊन मुलीच्या जन्मानंतर त्याचे आनंदाने स्वागत करणाऱ्या सासू-सासऱ्यांना एक सोन्याचे नाणे रुपये 5000 मर्यादेपर्यंत आणि प्रमाणपत्र देऊन महिला आणि बालविकास मंत्री यांच्यातर्फे सत्कार केला जातो. त्यासोबतच सावित्रीबाई फुले जयंती. राजमाता जिजाऊ जन्मदिवस किंवा राष्ट्रीय बालक दिन, महिला दिन अशा प्रसंगी त्यांचा सत्कार केला जातो. जेणेकरून समाजात त्यांच्याप्रती आदर वाढेल.

६. गावाचा गौरव

या योजनेनुसार ज्या गावांमध्ये मुला मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पेक्षा जास्त असेल अशा गावात महिला व बालविकास केंद्र यांच्यातर्फे पाच लाख रुपये पारितोषिक दिले जाते. संबंधित ग्रामपंचायतीने मिळालेली रक्कम ही गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आणि अनिवार्य आहे

मुली साठी योजना – माझी कन्या भाग्यश्री योजना तक्ता

योजनामाझी कन्या भाग्यश्री योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात1 एप्रिल 2016
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in
लाभार्थीराज्याच्या मुली
उद्देशमुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
विभागमहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे MKBY Application Form

  • मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • अर्जदार पालक हे महाराष्ट्राचे कायम रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तसेच त्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे अत्यावश्यक आहे.
  • आई-वडील दोघांचेही आधार कार्ड गरजेचे आहे.
  • आई-वडील दोघांचेही पॅन कार्ड
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मिळकत प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • BPL श्रेणी रेशनकार्ड
  • आई किंवा वडिलांचे बँक खाते असावे मुलीचे बँक खाते काढून ते आईच्या बँका तशी संलग्न केले जाते
  • लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
  • योजनेसाठी अर्ज कारणाना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

दोन मुलींसाठी योजना – जर एखाद्या जोडप्याला दोन मुले असतील तर त्यांना माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत लाभ मिळू शकतो. दोन मुलींच्या जन्मानंतर तिसरे मूल जन्माला आल्यास पूर्वीच्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकच मुलगी असेल तर अनुदानाचे प्रमाण जास्त असते.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित योजनेची कार्यपद्धती 

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा मुलीच्या जन्मानंतर पात्रता लाभ मिळवण्यासाठी पात्र बालिकेच्या पालकांनी आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका अथवा महानगरपालिकेमध्ये जाऊन मुलीच्या जन्माची नोंद करणे बंधनकारक आहे.

मुलीच्या जन्माचे नोंद केल्यानंतर पालकांनी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्याकडे अ-प्रपत्र किंवा ब- प्रपत्रामध्ये अर्ज लिहून द्यावा आणि अर्जासोबत योजनेची संबंधित असलेले सगळी कागदपत्रे जोडावीत. या कागदपत्रांसाठी अंगणवाडी सेविका आपल्याला मदत करू शकते.

ही योजना पहा 👉गाय गोठा अनुदान योजना 2023

या योजनेला लागणारी सर्व कागदपत्रे आशा सेविका, महिला बालविकास अधिकारी, नागरी बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद जिल्हा महिला व बाल विकास केंद्र आणि विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतात.

अंगणवाडी सेविका आपले अर्ज मुख्य सेविका यांच्याकडे सादर करते आणि आवश्यक त्या चुका दुरुस्त करून महिला नागरी व ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करतात.

तसेच मुली जर अनाथ असतील तर जिल्हा महिला किंवा बालविकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करतात. अनाथ मुलींना लाभ मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित बालकल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्यास बाबतचे प्रमाणपत्र संस्थेकडून घेऊन अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे.

पालकांनी पूर्ण भरून दिलेले माहिती अर्ज सोबत असलेल्या सर्व कागदपत्रांसह मुलीच्या जन्मानंतर, एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केलेल्या पालकांच्या बाबतीत एका वर्षाच्या आत आणि दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांच्या बाबतीत सहा महिन्यात कुटुंब नियोजन केल्याचा दाखला संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेऊन जोडून द्यावा.

जर अर्ज पूर्ण भरला नाही तर किंवा सर्व प्रमाणपत्रांसोबत सादर केला नाही तर अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अर्जदारास लेखि कळविण्यात येते आणि एक महिन्याची वाढीव मुदत देण्यात येते.

कोणताही अर्ज दोन महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित ठेवता येत नाही.

प्रधानमंत्री जनधन योजना बँक बचत खाते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिची माता या दोघांच्या नावाने संयुक्त बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात येते. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या मातेला एक लाख रुपये अपघात विमा आणि पाच लाख रुपये ओवर ड्राफ्ट व इतर लाभ देण्यात येतात. जनधन खाते उघडण्यासाठी अर्ज धारकाने अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका तसेच बँक कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज करण्याची प्रक्रिया -majhi kanya bhagyashree yojana registration

महाराज राज्यातील रहिवासी असलेल्या ज्या पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, त्यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर भेट द्यावी आणि या योजनेचा पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती म्हणजेच मुलीचे नाव, पालकांचा मोबाईल नंबर, मुलीची जन्मतारीख, जन्म प्रमाणपत्र वगैरे सर्व माहिती संपूर्ण प्रतापशीलवार भरून द्यावी. त्यासोबत अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून संबंधित अर्ज हा अंगणवाडी सेविका किंवा महिला बाल विकास कार्यालयात जाऊन द्यावा. त्याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

ऑफिशियल वेबसाईटइथे क्लिक करा
MKBY योजना PDFइथे क्लिक करा
योजना अर्ज PDFइथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजनाइथे क्लिक करा 

FAQ

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

मुलींच्या संख्या प्रमाण दरामध्ये सुधार करणे, स्त्री भ्रूणहत्या थांबविणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि मुलींना पुढील जीवनात स्वावलंबी बनविणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरणाऱ्या पालकांनी महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन फॉर्म PDF डाऊनलोड करून किंवा योजनेच्या सबंधित कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घेऊन, आपल्या विभागातील अंगणवाडी सेविकेच्या मदतीने संपूर्ण अर्ज तपशीलवार भरून, अर्जाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून योजनेच्या सबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा. 

माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये मिळणारी धनराशी मुलीला केव्हा मिळते ?

या योजनेंतर्गत सरकार तर्फे ठराविक रक्कम मुलींच्या नावे आई आणि मुलीच्या संयुक्त खात्यात बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवली जाते आणि सुरवातीला मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी, त्यानंतर बाराव्या वर्षी गुंतविल्या रकमेवरचे फक्त व्याज आणि नंतर मुलगी अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम व्याजासह मुलीला देण्यात येते.

 माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरु झाली ?

महाराष्ट्र राज्यात सुरवातीला केंद्र सरकार प्रणीत सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली होती आणि नंतर त्या योजनेमध्ये संपूर्ण बदल करून अधिक लाभासहित माझी कन्या भाग्यश्री ही सुधारीत योजना 1 ऑगस्ट 2017 पासुन सम्पूर्ण राज्यात राबविली जात आहे.

निष्कर्ष

आम्ही आमच्या माझी कन्या भाग्यश्री योजना या लेखामध्ये या योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही आपल्याला याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असल्यास या योजनेची संबंधित असलेल्या कार्यालयात जाऊन, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून जास्त माहिती घेऊ शकता.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील तळागाळातील मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी सर्व पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यासोबतच आपण बरोबरच्या इतर पालकांना सुद्धा जागरूक करावे.

धन्यवाद

Leave a comment