क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती मराठी Cricket Information In Marathi

क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती मराठी | Cricket Information In Marathi – लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित आहे. हा खेळ प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाला. हा मैदानी खेळ असून एक लोकप्रिय खेळ आहे. तसेच जगभरातील लाखो चाहत्यांनी आनंद घेतला आहे. 16 व्या शतकात इंग्लंडमध्ये उगम पावलेला, क्रिकेट हा एक खेळ म्हणून विकसित झाला आहे, ज्यामध्ये धोरण, कौशल्य, आणि सांघिक कामगिरी या घटकांचा समावेश आहे. आज आपण या लेखात क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

हा प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. एका वेळी एक संघ, फलंदाजी करून धावा करण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा संघ क्षेत्ररक्षण करून गोलंदाजी करतो आणि विरुद्ध संघाच्या जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर खेळाडू बाद करण्याचा आणि धावा रोखण्याचा प्रयत्न करतो.

आजकाल बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट हा खेळ पुरुष आणि महिला हे दोन्ही सुद्धा खेळू शकतात. या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये क्रिकेट विश्वचषक ही लोकप्रिय स्पर्धा भरवली जाते. हि स्पर्धा महिलांचा संघ सुद्धा खेळतात. या खेळासाठी २ संघाची आवश्यकता असून २ संघामध्ये प्रत्येकी ११ – ११ खेळाडू खेळवतात. क्रिकेट हा खेळ इंग्लडचा राष्ट्रीय खेळ असला तरी तो खेळ आता संपूर्ण जगात प्रसिद्ध असून खेळला जातो.

Table of Contents

क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती मराठी Cricket Information In Marathi

क्रिकेट म्हणजे काय? (What is Cricket in Marathi?)

क्रिकेटमध्ये बॅट, बॉल आणि स्टंप हे मुख्य घटक असतात ज्याशिवाय क्रिकेट खेळता येत नाही. या खेळामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंना दोन संघांमध्ये खेळवले जाते. 16 व्या शतकात या खेळाची सुरवात इंग्लंडमध्ये झाली. आणि त्यानंतर हा संपूर्ण जगभरात लोकप्रिय खेळ बनला.

Cricket Information In Marathi

क्रिकेट हा खेळ मोठ्या अंडाकृती आकाराच्या मैदानावर खेळला जातो. खेळपट्टी सामान्यतः लाल आणि काळ्या मातीत बनलेली असते आणि सुमारे 22 यार्ड लांब असते. खेळपट्टीच्या प्रत्येक टोकाला विकेटचे दोन संच असतात, ज्यामध्ये तीन लाकडी स्टंप आणि वर दोन बेल्स असतात. क्रिकेट २ डावात खेळला जातो, प्रत्येक संघ प्रत्येक डावात फलंदाजी करतो आणि दुसरा संघ गोलंदाजी करतो आणि मैदानाचे रक्षण करतो.

फलंदाजी करणारा संघ आपल्या बॅटने चेंडू मारून धावा काढण्याचा प्रयत्न करतो आणि विकेटच्या दोन खेळपट्टीवर मागे-पुढे धावतो. क्षेत्ररक्षण करणारा संघातील खेळाडू चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडू पकडत किंवा चेंडूने विकेट्स मारून फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करतो.फलंदाजी करणार्‍या संघाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे धावा करणे हे असते आणि गोलंदाजी संघाचा मुख्य उद्देश फलंदाजाला बाद करणे आणि धावा रोखणे.

या खेळाचे तीन मुख्य प्रकार आहेत. कसोटी क्रिकेट, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI), आणि ट्वेंटी20 (T20) क्रिकेट. कसोटी क्रिकेट हे सर्वात मोठे स्वरूप आहे आणि ते पाच दिवसांपर्यंत चालु शकते, तर एकदिवसीय सामना प्रति संघ 50 षटकांपर्यंत खेळू शकतो आणि T20 क्रिकेट सामना प्रति संघ 20 षटकांपर्यंत खेळू शकतो. यष्टिरक्षक हा असा खेळाडू आहे जो विकेटच्या मागे उभा राहतो आणि फलंदाज चुकल्यास त्याला बाद करण्याच्या प्रयत्नात असतो.

खेळाचे नावक्रिकेट
खेळाचा प्रकारमैदानी खेळ
सामन्याचे प्रकारकसोटी, एकदिवसीय, 20-20
खेळाडूंची संख्याप्रत्येक संघात एकूण ११ (अकरा) खेळाडू असतात
मैदानाची लांबी60 यार्ड – 75 यार्ड
खेळपट्टीची लांबी22 यार्ड
बॅटची  लांबी38 इंच
स्टम्पची उंची आणि रुंदी28 इंच आणि 9 इंच
क्रिकेटची सुरुवात16 व्या शतकात
बॉलचे वजन155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम

हे वाचा – 23 विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

क्रिकेटचा इतिहास काय आहे? 

इंग्लंडमधील एका छोट्याशा गावात शेकडो वर्षांपूर्वी क्रिकेटची सुरुवात झाली, जो आजच्या काळात फुटबॉलनंतरचा दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट हा खेळ भारतात ही प्रचंड लोकप्रिय आहे. आज क्रिकेट म्हटल्यावर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, कपिल देव ही नावे आपल्या समोर येतात. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात कोणताही भेदभाव केला जात नाही, इथे रंग, आकार, उंची, शरीर पाहून कोणाची निवड केली जात नाही, इथे फक्त क्रिकेटपटूला क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा आणि कौशल्य दाखवावे लागते, म्हणूनच या खेळाला जेंटलमन गेम्स म्हणतात.

क्रिकेट खेळात या सर्वानी अतुलनीय काम केले आहे. ग्रेट ब्रिटन हे क्रिकेटचे जन्मस्थान मानले जाते, परंतु सुरुवातीच्या काळात ते खेळण्यासाठी कोणतेही नियम आणि कायदे नव्हते, नंतर ज्यावेळी क्रिकेटला लोकप्रियता मिळाली त्यानंतर त्याचे नियम ठरवले गेले. क्रिकेट हा खेळ भारतात ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच आणला. व्यापार करण्यासाठी म्हणून भारतात दाखल झालेले ब्रिटिश आपल्यावर नंतर राज्य करू लागले. ते येथे क्रिकेट हा खेळ ही घेऊन आले. फुटबॉल या खेळानंतर जगभर प्रसिद्ध असलेला क्रिकेट दुसऱ्या क्रमांकावरील लोकप्रिय खेळ आहे. १३ व्या शतकापासून या खेळाला सुरुवात झाली असे काही जणांचे मत आहे. पण त्याच्या तशा थोड्याफार नोंदी आढळून आल्या आहेत. पण त्यात विश्वसनीयता दिसून येत नाही. मात्र अगदी खात्रीशीरपणे १६ व्या शतकात ह्या खेळाला सुरुवात झाली अशा नोंदी आहेत.

Cricket ground details

इंग्लडमध्ये १६ व्या शतकात ह्या खेळाला सुरुवात झाली. सुरुवातीला इंग्लंडमधील अगदी खेड्यापाड्यात हा खेळ खेळला जात होता. खरे तर मेंढपाळांची बहुतेक मुले शेळ्या-मेंढ्या चरताना हा खेळ खेळत असत. सुरुवातीला ते हा खेळ लाकडी चेंडू आणि काही शेतीच्या साधनाने खेळत असत, जे ते फक्त स्वतःच्या मनोरंजनासाठी खेळायचे. या खेळात, फलंदाज चेंडू थांबवायचा. बलाने लक्ष्यावर मारायचा. तो मेंढीच्या कुरणात किंवा त्याच्या जवळ खेळला जायचा.

या खेळात लाकडी चेंडू किंवा मेंढीच्या लोकरीचे गोळे आणि एक काठी किंवा इतर शेतीचे साधन बॅट म्हणून वापरले जाते. ही मुले विकेट म्हणून स्टूल किंवा बांबू वापरत असत. खासकरून लहान मुले हा खेळ खेळात असत. त्यामुळे क्रिकेट खेळताना कोणतेही नियम त्यावेळी नव्हते. त्यानंतर हळूहळू तरुण वर्गात देखील क्रिकेट खेळासाठी रुची दिसून आली आणि १७ व्या शतकात हळूहळू तरुण वर्गात देखील क्रिकेट हा खेळ लोकप्रिय झाला.

केंब्रिज विद्यापीठात १७१० च्या दरम्यान क्रिकेट खेळ खेळला जाऊ लागला.  त्यानंतर या खेळाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आणि त्यासाठी काही नियम बनवण्यात आले. सन १७४४ मध्ये सर्वात प्रथम क्रिकेटचे नियम बनवण्यात आले अशी नोंद आहे. तसेच सन १७८७ मध्ये एम.सी.सी म्हणजेच मेरीलीबोन क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली. १९७४ मध्ये प्रथमच LBW लागू करण्यात आला जेणेकरून गोलंदाजांनाही प्राधान्य मिळू शकेल आणि फलंदाजांना अनुचित फायदा घेता येणार नाही, तथापि १९८० मध्ये पुन्हा नव्या पद्धतीने अंमलात आणला गेला आणि प्रथमच पंचांची निवड करण्यात आली होती.

हळूहळू ह्या क्रिकेटचा प्रसार वाढत गेला. हळूहळू ब्रिटिश अधिकारी ज्या ज्या खंडात पोहचले तिथे तिथे हा खेळ लोकप्रिय झाला. आज जगभरात एकूण २० देशात हा खेळ खेळला जातो. यामध्ये द. आफ्रिका, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क यासारख्या देशांचा समावेश आहे. पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा १८४४ मध्ये अमेरिका आणि कॅनडा ह्या देशात खेळला गेला. हा सामना न्यूयॉर्क मधील St George’s Cricket Club येथे खेळला गेला. क्रिकेटची लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तसतसे क्रिकेटमध्ये काळानुरूप बदल आणि सुधारणा होत राहिल्या. 

क्रिकेट खेळाचे मैदान माहिती

क्रिकेट खेळण्यासाठी एका समांतर मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या मधोमध माती पासुन कठोर पिच बनवली जाते. या पिच वर गवत नसते. बाकी मैदानावर आकाराने लहान गवत उगवलेले असते. हे सामान्यतः अंडाकृती आकाराचे असले तरी, त्यात विविधतांची विस्तृत श्रेणी आहे. काही फील्ड जवळजवळ परिपूर्ण वर्तुळे असतात, तर काही लांबलचक अंडाकृती अनियमित आकारांचे रूप घेतात. 

क्रिकेटचे मैदान आकाराने गोलाकार अथवा अंडाकृती असते. क्रिकेट मैदानासाठी काही ठराविक माप नाही, पण सामान्यतः याचा व्यास पुरुष क्रिकेटसाठी 450 फूट (137 मीटर) ते 500 फूट (100 मीटर) एवढा असतो. आणि महिला क्रिकेटसाठी 360 फूट (110 मीटर) आणि 420 फूट (130 मीटर) दरम्यान असतो. सीमेच्या आत, मध्यभागी शक्य तितक्या जवळ स्थित, चौरस असतो.

क्रिकेटचे मैदान अंडाकृती असते. आणि त्या अंडाकृती मैदान च्या मधी आयताकृती क्षेत्र असते. त्या क्षेत्राला क्रिकेट खेळपट्टी (Cricket Pitch) असे म्हणतात. त्या खेळपट्टी वरूनच खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करतात.मैदानाच्या पिच वर दोन्ही बाजूस 3-3 स्टंप लावलेले असतात. मैदानाच्या पिचची लांबी 22 मीटर व रुंदी 10 मीटर असते. मैदानाची एक सीमा अथवा बाऊंड्री असते. या बाऊंड्रीपुढे मैदान संपते. 

क्रिकेट खेळपट्टी 

क्रिकेट खेळपट्टीचे साधारणतः लांबी अंतर ६६ यार्ड (२०.१२ मीटर) असते आणि क्रिकेट खेळपट्टीची रुंदी १० फूट किंवा मीटरमध्ये मोजली असता ३.०५ मीटर असते. क्रिकेट खेळपट्टीची रुंदी जास्त असली तरी प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्यातील फक्त १० फूटच वापरला जातो. क्रिकेट खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला स्टंप (stumps) असतात. एक बाजूला खेळाडू फलंदाजी आणि एक बाजूला गोलंदाजी करतात. स्टंपपासून १.२२ मीटर अंतरावर एक रेष असते. त्याच्या आतून खेळाडूने फलंदाजी करायची असते. तसेच दुसऱ्या बाजूला तश्याच रेषेच्या आतून खेळाडूने गोलंदाजी करायची असते.

क्रिकेट चे साहित्य

क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू, बँट, हॅन्ड ग्लोज, स्टंप, पॅड इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.

क्रिकेट बॅट

बॅटची लांबी ३८ इंचांपेक्षा (९६.५ सें.मी.) अधिक नसावी. आणि बॅटची रुंदी ४.५ इंचांपेक्षा (१०.८ सें.मी.) अधिक नसावी. बॅट लाकडीच असावी.

क्रिकेट चेंडू

खेळ बंद झाल्यानंतर म्हणजे विश्रांतीसाठी, नाश्त्यासाठी, चहा पाणी पिण्यासाठी किंवा खेळ सुरू असताना काही अपरिहार्य व्यत्यय आल्यास या दरम्यानच्या कालावधीत चेंडू हा पंचांच्याच ताब्यात ठेवला जातो. चेंडूचे वजन १५५.९ ग्रॅमपेक्षा कमी नसावे आणि १६३ ग्रॅमपेक्षा अधिक नसावे. चेंडूचा परीघ २२.४ सें.मी. पेक्षा कमी नसावा व २२.९ सें.मी. पेक्षा अधिक नसावा. डाव बदलताना गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार नवीन चेंडू घेऊ शकतो.

सामन्याच्या नवीन डावाच्या (Innings) सुरुवातीस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कप्तानाला नवीन चेंडू घेता येतो. सामन्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या चेंडूला सामन्यापूर्वी दोनही संघाचे कर्णधार व पंच यांची मान्यता लागते. खेळ सुरू असताना चेंडू हरवला अथवा खराब झाल्यास साधारणपणे पंचांच्या परवानगीने दुसरा चेंडू घेण्यात येतो, मात्र हा चेंडू देखील तेवढाच वापरलेला असावा व त्याची कल्पना फलंदाज करणाऱ्या खेळाडूस दिली जावी. 

क्रिकेट पोशाख

पॅंट, शर्ट, पांढरे शूज, स्वेटर, हातमोजे, हेल्मेट, पॅड. संघातील खेळाडू समान विशिष्ट रंगाचा गणवेश परिधान करतात.

क्रिकेटचे खेळाडू

क्रिकेटचा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. क्रिकेट च्या एका टीम मधील खेळाडुंची संख्या 11 असते. अश्या पद्धतीने दोन्ही संघाचे एकूण 22 खेळाडू असतात. यामध्ये काही खेळाडू बॉलर, काही बँट्समन, एक कॅप्टन, एक उप कॅप्टन आणि एक विकेट कीपर असतो.

क्रिकेट टीम 2019

क्रिकेटचे तीन प्रकार 

क्रिकेटचे मुख्य तिने प्रकार आहे. ते खालीलप्रमाणे –

एकदिवसीय क्रिकेट

वनडे मध्ये एकूण ५० ओव्हर्स असतात. हा खेळ खेळण्यासाठी संपूर्ण एक दिवस लागतो, म्हणून या प्रकाराला वनडे क्रिकेट असे म्हणतात. ५० ओव्हर्सच्या खेळात कमीत कमी ५ गोलंदाज गोलंदाजी करू शकतात. प्रत्येक संघाला फलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी 50 षटके मिळतात. सामने साधारणपणे 8 तास चालतात. सामन्याच्या शेवटी सर्वाधिक धावा करणारा संघ जिंकतो. वनडे क्रिकेटमध्ये २ पॉवरप्ले असतात. एक गोलंदाज हा वनडे क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त १० ओव्हर्स टाकू शकतो. फलंदाजी करणाऱ्या संघाचे उद्दिष्ट धावा काढणे हे असते. तर गोलंदाजी संघाचे उद्दिष्ट फलंदाजांना बाद करणे आणि विरोधी संघाच्या धावसंख्येवर मर्यादा घालणे होय. वनडेचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झाला होता.

कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट हा क्रिकेट मधील एक प्रकार असून हा खेळ ५ दिवस चालतो. आणि यात एकूण ४ इनिंग्स असून एक संघाला २ इनिंग्स मिळतात. आणि एका इंनिंग्स मध्ये १० खेळाडू बाद होईपर्यंत कसोटी क्रिकेट खेळले जाते. कसोटी सामने (Test Match) हे क्रिकेटचे शिखर मानले जातात, त्यात धोरणात्मक खेळ, सहनशक्ती आणि कौशल्य यावर भर दिला जातो. एकूण ४५० ओव्हर्सचा सामना असतो आणि एका दिवसात ९० ओव्हर्स टाकले जातात.

T२० सामना

क्रिकेट मधील जलद तसेच लहान प्रकार असलेला T२० सामना हा प्रथमतः २००४ मध्ये खेळण्यात आला. आणि पहिला सामना हा महिलांचा झाला होता. हा २० ओव्हर्स चा सामना असतो. आणि सध्याच्या काळात T२० सामन्याला खूप महत्व दिले जाते. अनेकदा आक्रमक फलंदाजी आणि नाविन्यपूर्ण शॉट खेळले जातात.

क्रिकेट खेळ कसा खेळला जातो?

क्रिकेट हा मैदानी खेळ असून सांघिक खेळ आहे. यात २ संघ असतात. यामध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात. हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. क्रिकेट ह्या खेळात चेंडू, बॅट, स्टंप, हॅन्डग्लोव्हस एवढ्या साहित्याची आवश्यकता असते. हा खेळ ठराविक ओव्हर्समध्ये खेळला जातो. ह्यासाठी सपाट मैदानाची आवश्यकता असते. या खेळाच्या एका ओव्हरमध्ये सहा चेंडू असतात. अशा ५, १०, २० आणि ५० ओव्हरमध्ये सामने खेळले जातात. यामध्ये टॉस करून, टॉस जिंकलेला संघ प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो. व त्याप्रमाने खेळाला सुरवात होते. बॉल ज्याठिकाणी पडतो, ज्या अंतरावर पडतो त्यावरून चौकार किंवा षटकार ठरवला जातो. निर्णय देण्यासाठी पंचाची नियुक्ती केलेली असते. 

एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात फेमस लीग 

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक (Oneday Cricket World cup) ही एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील सर्वात प्रसिद्ध लीग आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रोलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि पाकिस्तान असे भरपूर संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतात. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ पर्यंत एकदिवसिय विश्वचषक स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे.

सचिन तेंडुलकर

T-20 क्रिकेट मधील सर्वात फेमस लीग

भारतामध्ये जगातील सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध २० षटकाची स्पर्धा खेळली जाते. त्याला IPL (Indian Premier League) असे म्हणतात. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जाईन्ट्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, सनराईज हैदराबाद, कोलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे IPL मध्ये भारतातील संघ आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्वचषक खेळाला जातो, त्याचप्रमाणे T२० चा सुद्धा विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये सुद्धा जगातील अनेक नावाजलेले संघ भाग घेतात. भारताने २००७ विश्वचषक मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून दिला.

कसोटी क्रिकेट मधील सर्वात फेमस लीग 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

क्रिकेटचे मूलभूत नियम (Basic Rules of Cricket in Marathi)

  • मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाज किती षटके टाकू शकतो यावर निर्बंध असतात. वनडेत एक गोलंदाज जास्तीत जास्त दहा षटके, तर टी-२०मध्ये जास्तीत जास्त चार षटके टाकू शकतो.
  • क्रिकेट बॉलचा घेर ९ इंच असतो.
  • एका ओव्हरमध्ये एकाच गोलंदाजाने टाकलेल्या सहा चेंडूंचा समावेश होतो.
  • क्रिकेटमध्ये एकूण ११ खेळाडू असतात आणि ५ खेळाडू हे राखीव असतात.
  • फलंदाजाला संरक्षणासाठी हेल्मेट, हातमोजे आणि पॅड घालणे अनिवार्य आहे.
  • जर एखादा चेंडू बॅटवर आदळला आणि फलंदाजाच्या पायाला लागला तर त्याला लेग बाय असे म्हणतात.
  • जेव्हा दोन फलंदाज बॉल ला हिट करून एकमेकांच्या क्रीज च्या दुसऱ्या टोकाला धावतात तेव्हा रन्स केले जातात. एक बॉल हिट वर अनेक धावा केल्या जाऊ शकतात.
  • एक गोलंदाज सलग दोन षटके टाकू शकत नाही.
  • वनडे क्रिकेट मध्ये एकूण ५० षटके खेळली जातात. ५० षटके खेळल्यानंतर धावांचे लक्ष विरोधी संघाला दिले जाते.
  • मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकांच्या नियुक्तीवरही निर्बंध असतात. वनडे किंवा टी-२० सामन्याच्या पहिल्या दहा षटकांत ३० यार्डच्या वर्तुळाबाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षकांना परवानगी असते.
  • मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांदरम्यान पावसाचा व्यत्यय आल्यास दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाचे लक्ष्य मोजण्यासाठी डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर केला जातो.
  • एखादा चेंडू हा फलंदाजांवर फेकला किंवा चुकीच्या पद्धतीने चेंडू टाकला, क्षेत्ररक्षक चुकीच्या जागी उभा राहिला अश्या स्थितीत चेंडूला नो-बॉल देतात.
  • क्रिकेटमध्ये नो बॉल, वाइड, क्षेत्ररक्षण अशा विविध फाऊल्स असतात.
  • सामन्यादरम्यान निर्णय घेण्याची जबाबदारी अंपायरची असते. चेंडू कायदेशीर आहे की नाही, फलंदाज आऊट आहे की नाही हे ते ठरवतात आणि खेळादरम्यान खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवतात.
  • जर दुसरा फलंदाज विकेट दरम्यान तीन मिनिटांत मैदानावर पोहोचला नाही, तर त्याला टाइम आऊट मानले जाते.
  • चेंडू जेव्हा क्रिजच्या पलीकडे टाकला जातो व फलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा त्याला वाईड बॉल म्हणतात.

क्रिकेट खेळ मधील धावा | Cricket Runs

षटकार

फलंदाजाकडून मारला गेलेला चेंडू रेषेच्या बाहेर गेला तर त्याला षटकार असे म्हणतात. असे झाल्यास धाव संख्यात एकदम सहा धावांची भर पडते.

चौकार

फलंदाजाकडून मारला गेलेला चेंडू थेट बाहेर न जाता तो चेंडू मैदानावरती टप्पा पडून जातो, त्यावेळी चार धावा घेतल्या जातात.

अतिरिक्त धावा

क्रिकेट नियमानुसार अतिरिक्त धावा सुद्धा असतात. ज्यावेळेस बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडतो किंवा बॉल फलंदाजाच्या कमरेच्यावरती बॉल आल्यास त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला एक बॉल जास्त आणि एक धाव सुद्धा जास्त दिली जाते.

क्रिकेट मधील विकेटचे प्रकार | Wicket Mahiti

क्रिकेट नियमानुसार फलंदाज बाद होण्याचे काही नियम आणि कारणे खाली दिली आहेत. फलंदाज वेगवेगळ्या प्रकारे बाद होऊ शकतो.

धाव बाद Run out

ज्यावेळी दोन्ही फलंदाज बॉलला मारल्यानंतर एक धाव घेण्यासाठी जेव्हा धावतात त्यावेळी जर विरुद्ध संघाने त्यांना स्टंपच्या जवळ येण्याआधी स्टंपला बॉल मारला तर त्यातील एक खेळाडू धावबाद (Run out) होतो.

झेल बाद Catch out

फलंदाजाने मारलेला चेंडू जर सरळ हवेमध्ये उडवला आणि तो विरुद्ध संघाच्या खेळाडूने जमीनीला स्पर्श होण्याआधी तो झेलला तर तो फलंदाज झेल बाद (Catch out) झाला असे मानले जाते.

स्टंप बाद  Stumped out

खेळाडू फलंदाजी करताना जर बॉल स्टंप वर जाऊन आदळला तर तो खेळाडू स्टंप बाद (Stumped out) होतो.

Time out

खेळाडू काही वेळासाठी फलंदाजी मधून बाहेर जाऊ शकतात. या नियमाला Time Out नियम असते म्हणतात.

Hit wicket

जर खेळाडूने फलंदाजी करताना थेट स्टंपला बॅट मारली असता त्याला हिट विकेट आऊट (Hit wicket) दिले जाते.

Retired wicket

खेळाडू च्या शारीरिक दुखापतीमुळे किंवा काही कारणामुळे जर खेळाडूला बाहेर जायचं असेल तर तो खेळाडू रिटायर्ड होऊ शकतो. पण एकदा खेळाडू रिटायर्ड होऊन जर मैदानाच्या बाहेर गेला, तर त्याला त्या सामन्यांमध्ये परत खेळण्याची संधी दिली जात नाही. अश्या प्रकारे जर खेळाडू बाद होत असेल तर त्याला असे Retired wicket  समजले जाते.

क्रिकेट खेळातील चेंडूचे प्रकार

नो बॉल

  • गोलंदाजाकडून नियमाविरूद्ध गोलंदाजी करणे.
  • गोलंदाजाचा पाय क्रीझच्या बाहेर असणे.
  • हात चुकीच्या पद्धतीने वापरणे.
  • क्षेत्ररक्षक चुकीच्या जागेवर असणे.
  • चेंडूची उंची फलंदाजाच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असते.

याला नो बॉल म्हणतात. त्यासाठी पुढच्या संघाला अतिरिक्त धावा दिल्या जातात आणि त्या चेंडूवर धावण्याशिवाय कोणतीही धावचीत वैध नसते. फ्रि हिट म्हणजे फलंदाजाला जास्तीचा बॉल दिला जातो, ज्यावर धावबादशिवाय तो बाद होऊ शकत नाही.

वाईड बॉल

जेव्हा चेंडू फलंदाजापासून खूप दूर असतो, ज्याला फलंदाज कोणत्याही परिस्थितीत खेळू शकत नाही, तर तो गोलंदाजाचा दोष मानला जाऊन फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त धावा दिल्या जातात.

लेग बाय

जेव्हा गोलंदाजाने टाकलेला बॉल फलंदाजाच्या अंगाला लागून निघून जातो, तेव्हा फलंदाजाला धाव घेण्याची संधी मिळते, त्याला लेग बाय म्हणतात.

बाय

जेव्हा गोलंदाजाने टाकलेला बॉल बॅटला स्पर्श करत नाही आणि विकेटकीपरच्या हातून देखील सुटतो, त्यावेळी फलंदाजांना धाव घेण्यासाठी वेळ मिळतो, त्याला बाय-बॉल म्हणतात.

क्रिकेट खेळात आउटचे प्रकार (Types of outs in the game of cricket in Marathi)

धावचीत 

धावांसाठी खेळणारा फलंदाज धावपट्टीवरून धावत असतो त्यावेळी विरुद्ध संघातील एखादा क्षेत्ररक्षक मारला गेलेल्या चेंडू लगेच पकडून फलंदाज विकेटपर्यन्त पोचण्यापूर्वी स्टम्पवर मारून फलंदाजाला धावबाद करू शकतो.

हिट विकेट

फलंदाजाच्या चुकीने जेव्हा एखादी विकेट पडते, त्यावेळी त्याला हिट विकेट म्हणतात.

झेल 

फलंदाजाने चेंडू जर हवेत फटकावला आणि टप्पा न पडता क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने तो चेंडू पकडला तर, त्याला झेलबाद असे म्हणतात.

बोल्ड

फलंदाज खेळत असताना गोलंदाजाचा चेंडू स्टंपवर लागून स्टंपवरील बेल्स पडतात, त्यावेळी फलंदाज बोल्ड होतो. परंतु बेल्सला बॉल लागून पण बेल्स नाही पडले तर फलंदाज बाद दिला जात नाही.

लेग बिफोर विकेट

गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागला नाही आणि तो सरळ त्याच्या शरीरावर किंवा पॅडवर लागला आणि त्यावेळ स्टंपच्या समोर त्याचा पाय असेल, तर त्याला एलबीडब्ल्यू आऊट लेग बिफोर विकेट मानले जाते. कारण फलंदाज त्याठिकाणी आडवा नसता तर तो बोल्ड झाला असता.

एक बॉल दोन वेळा मारणे

फलंदाजाला फक्त एकदाच चेंडू खेळण्याची सवलत दिली जाते म्हणजे असा नियम आहे. आऊट होण्याच्या भीतीने जर फलंदाजाने चेंडूला पुन्हा स्पर्श केला तर त्याला आऊट दिले जाते.

स्टंप आउट

जेव्हा गोलंदाज बॉल टाकतो आणि फलंदाज बॅटला चेंडूला स्पर्श न करत यष्टीरक्षकाच्या हातात जातो आणि फलंदाज धावा करण्यासाठी किंवा बॉल मारण्यासाटी क्रिझ माधेऊन बाहेर जातो तेव्हा यष्टीरक्षकाने चेंडू विकेटकडे फेकल्यास बेल्स पडले तर फलंदाज बाद असतो, तेव्हा त्याला धावबाद म्हणतात.

बॉल पकडणे 

जर फलंदाजाने चेंडू हाताने पकडले किंवा हाताला स्पर्श केला तर त्याला आऊट दिले जाते.

टाइम आउट 

एक बॅट्समन आऊट झाल्यानंतर जर दुसरा बॅट्समन ३ मिनटात खेळायला नाही आला तर याला टाइम आउट म्हणतात.

व्यत्यय 

जेव्हा फलंदाज दुसर्‍या संघाला अपशब्द बोलतो किंवा बॉल पकडताना त्यांच्या समोर येतो, त्यावेळी त्याला बाद दिले जाऊ शकते.

क्रिकेटचे नियम

कसोटी क्रिकेटचे नियम (Cricket Information In Marathi)

  • एक कसोटी सामना पाच दिवस खेळला जातो, प्रत्येक दिवसासाठी सहा तासांचा खेळ असतो.
  • कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करण्यास कोणतेही बंधन नाही, ज्यामध्ये संघ आपल्या इच्छेनुसार अनेक हद्दीवर आणि आपल्या आवडीच्या ३० यार्डांच्या आत सीमेवर जास्तीत जास्त खेळाडू लावू शकतो.
  • कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावरील दोन पंच असतात, जे खेळाशी संबंधित सर्व मैदानावरील निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतात.
  • कसोटी क्रिकेट सामन्यात १ दिवसाचा खेळ ९० षटकांकरिता खेळला जातो आणि त्यानुसार संपूर्ण ५ दिवसांत ४५० षटके असतात आणि या सामन्यात गोलंदाज एकदिवसीय सामन्याइतकी षटके ठेवू शकतो याला मर्यादा नाही.
  • प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने त्यांच्या पहिल्या डावात विरोधी संघापेक्षा 200 धावा जास्त केल्या, तर ते फॉलोऑन लागू करू शकतात, याचा अर्थ विरोधी संघाने लगेच पुन्हा फलंदाजी करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक संघाला दोनदा फलंदाजी करण्याची आणि दोनदा गोलंदाजी करण्याची संधी मिळते.
  • दोन संघांदरम्यान खेळलेला कसोटी क्रिकेट सामना सलग ५ दिवस खेळला जातो आणि त्या ५ दिवसांत सामन्याचा निर्णय झाला नाही तर सामना अनिर्णित म्हणून घोषित केला जातो आणि कोणताही संघ जिंकत नाही.
  • कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचे कोणतेही निर्बंध नाहीत आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ त्यांच्या खेळाडूंना मैदानावर कुठेही ठेवू शकतो.
  • एखादा चेंडू फलंदाजाच्या मागच्या बाजूस गेला तर त्याला वाइड बॉल म्हटले जात नाही.
  • कसोटी सामन्यात सर्व खेळाडूंना दोनदा संधी मिळते.
  • एका दिवसात बहुतेक ९० षटके खेळली जातात आणि ती तीन सत्रांमध्ये विभागली जातात.
  • खेळाडू खेळताना पांढरी जर्सी घालतात.

एकदिवसीय क्रिकेटचे नियम (Rules of ODI Cricket in Marathi)

  • सर्वप्रथम दोन्ही संघाचे कर्णधार येऊन नाणेफेक करून आपली बाजू निवडतात. 
  • हा सामना ५० षटकांचा असतो.
  • प्रथम फलंदाजी करून तो संघ एक धावसंख्या निश्चित करतात आणि दुसऱ्या संघासाठी धावांचे लक्ष देतात.
  • जास्त धावा करणार संघ विजयी ठरतो.
  • एखादा खेळाडू आउट, दुखापतग्रस्त असेल तर येणार्‍या दुसऱ्या फलंदाजाने काही मिनिटांच्या आत क्रीजवर यावे अन्यथा तो खेळाडू बाद ठरवले जाते.
  • पॉवरप्ले नसलेल्या षटकांमध्ये, 30-यार्ड वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त पाच क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
  • एखादा खेळाडू फलंदाजी करताना चेंडू हाताने रोखतो, तर अशावेळी त्या खेळाडूला बाद ठरवले जाते.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये, वाइड बॉलमुळे फलंदाजी करणार्‍या संघाला अतिरिक्त धाव मिळते, परंतु अतिरिक्त चेंडू नाही.
  • एखादा खेळाडू एलबीडब्ल्यू बाहेर असेल तर अशावेळी खेळाडूंनी अपील करणे आवश्यक आहे, अन्यथा त्या खेळाडूला बाद केले जाणार नाही.
  • प्रत्येक संघ जास्तीत जास्त ५० षटकांचा एकच डाव खेळतो.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन मैदानी पंच असतात, जे खेळाशी संबंधित सर्व मैदानी निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतात.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये, नो-बॉलमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त चेंडू मिळतात.
  • डावाच्या पहिल्या दहा षटकांना पॉवरप्ले म्हणतात, ज्या दरम्यान 30 यार्ड वर्तुळाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षकांना परवानगी असते.

T२० क्रिकेटचे नियम (Rules of T20 Cricket) 

  •  प्रत्येक संघ जास्तीत जास्त 20 षटकांचा एकच डाव खेळतो.
  • कोणत्याही वेळी गोलंदाजीने पॉम्पिंग क्रीज ओलांडल्यास नो-बॉल देण्यात येईल आणि फलंदाजी संघाला 1 धावा दिली जाईल.
  • डावाच्या पहिल्या सहा षटकांना पॉवरप्ले म्हणतात, ज्या दरम्यान 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षकांना परवानगी असते.
  • टी -20 क्रिकेट सामन्यात प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त एक लहान खेळपट्टी फेकण्याची परवानगी आहे.
  • फलंदाजीचा मुख्य उद्देश धावा काढणे आहे. जो संघ त्यांच्या डावात सर्वाधिक धावा करतो तो सामना जिंकतो.
  • T20 क्रिकेटमध्ये वेळ अंतर २० मिनिटांचा असतो, जर काही कारणास्तव सामन्यांची षटके कमी असतील तर वेळ मध्यांतर 10 मिनिटे होईल.
  • पॉवरप्ले नसलेल्या षटकांमध्ये, 30-यार्ड वर्तुळाबाहेर जास्तीत जास्त पाच क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
  • जर दोन्ही संघ सामन्यादरम्यान 5 किंवा अधिक षटके खेळत असतील तर अशा परिस्थितीत तो सामना रद्द होणार नाही.
  • जर एखाद्या गोलंदाजाने नो-बॉल टाकला, तर पुढील चेंडूला फ्री-हिट म्हणतात, ज्या दरम्यान फलंदाज धावबाद वगळता कोणत्याही प्रकारे बाद होऊ शकत नाही.
  • खेळादरम्यान एम्पायरला जर असे वाटले की कोणत्याही संघामुळे कारणास्तव वेळ वाया जातो, तर अशा परिस्थितीत त्या वेळेचे 5 धावा वजा केले जातील.
  • T20 क्रिकेटमध्ये दोन मैदानी पंच असतात, जे खेळाशी संबंधित सर्व मैदानी निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतात.

क्रिकेट खेळाडूंसाठी नियम

  • समोरचा माणूस यष्टीचीत झाल्यास, क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी अपील केले पाहिजे, अन्यथा फलंदाजी करणाऱ्या संघाला बाद घोषित केले जाणार नाही.
  • खेळाडूंनी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणाने आणि खिलाडूवृत्तीने खेळला पाहिजे.
  • जर एखादा खेळाडू फलंदाजी करत असेल आणि तो बाद झाल्यानंतर दूसरा खेळाडू तीन मिनिटांत मैदानात परतला नाही, तर तो खेळाडू बाद समजला जातो.
  • फलंदाजासाठी खेळत असताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तो खेळताना बॅटशिवाय दुसऱ्या हाताने चेंडूला स्पर्श करत नाही.
  • सामना सुरू होण्यापूर्वी, संघाच्या कर्णधाराने सामनाधिकाऱ्याला खेळात सहभागी होणाऱ्या 11 खेळाडूंची यादी प्रदान करणे आवश्यक आहे.
  • एक खेळाडू दुसऱ्या संघातील दुसऱ्या खेळाडूशी गैरवर्तन करणार नाही किंवा त्याच्याबद्दल कोणतीही अनुचित टिप्पणी करणार नाही.
  • खेळाडूंसाठी पहिले मार्गदर्शक तत्व म्हणजे त्यांनी त्याशिवाय, काही अतिरिक्त सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत ज्यांची तुम्हाला जाणीव असावी.

गोलंदाजाचे नियम (Bowler’s Rules)

गोलंदाजीची क्रिया ही कला तंत्रज्ञानाच्या स्थितीनुसार मोजली जाते, जेणेकरून गोलंदाज प्रत्यक्षात योग्यरित्या गोलंदाजी करीत आहे की नाही याचा निर्णय घेता येईल.

गोलंदाजाला गोलंदाजी करताना रनअप घेणे आवश्यक आहे, उभे राहून गोलंदाजी करणे चुकीचे मानले जाते.

गोलंदाजीसाठी, सर्वप्रथम कोणत्याही गोलंदाजाने बॉल फेकताना याची काळजी घ्यावी लागते कि बॉलरचा हात 15 डिग्री पर्यंत वळवला पाहिजे.

फलंदाजांचे नियम (Batsmen’s Rules)

फलंदाज खेळत असताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तो खेळताना बॅटशिवाय हाताने चेंडूला स्पर्श करत नाही.

बाद झालेला खेळाडू सामन्यात बाहेर पडल्यानंतर ३ मिनिटांच्या आत नवीन खेळाडू येणे आवश्यक आहे , अन्यथा त्याला बाद केले जाईल.

फलंदाजाने फलंदाजी करताना संपूर्ण पोशाख आणि आवश्यक वस्तू हेल्मेट्स, ग्लोव्ह्ज इत्यादी वस्तु घातल्या पाहिजेत.

सामना खेळत असताना विनाकारण विरुद्ध संघातील कोणत्याही खेळाडूशी बोलू नये याची काळजी घेणे फलंदाजासाठी महत्वाचे आहे.

थर्ड एम्पायर / पंचांसाठी नियम

  • चारही पंचांनी सामन्याच्या आदल्या दिवशी मैदानाला भेट देणे. 
  • तिसर्‍या एम्पायरचे काम ऑन-फील्ड एम्पायरच्या निर्णयावर लक्ष ठेवणे आहे, त्याशिवाय त्याचे कोणतेही विशेष कार्य नाही.
  • सामन्यात वापरण्यात येणाऱ्या चेंडूची तपासणी करणे.
  • तिसर्‍या एम्पायरने क्रिकेट क्षेत्रामध्ये घडणार्‍या काही चुकीच्या घटनांबद्दल मैदानावरील एम्पायरशी बोलणे आणि त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
  • सामन्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तपासणे. 
  • मैदानावरील सोयी-सुविधा तपासणे. 
  • एखाद्या खेळाडूने क्षेत्र एम्पायरच्या निर्णयाला आव्हान दिले असेल तर त्या प्रकरणात तो निर्णय परत तपासणे आणि योग्य निर्णय देणे.

क्रिकेट पॉवर-प्ले नियम (Power-Play Rule)

एकदिवसीय सामन्यातील पॉवर-प्ले नियम
  • पहिला पॉवर-प्ले (पहिले १ ते १० षटक) – २ पेक्षा जास्त खेळाडू ३० यार्डच्या बाहेर ठेवायचे नाहीत.
  • दुसरा पॉवर-प्ले  (पहिले ११ ते ४० षटक) – ४ पेक्षा जास्त खेळाडू ३० यार्डच्या बाहेर ठेवायचे नाहीत.
  • तीसरा पॉवर-प्ले  (४१ ते ५०) – ५ पेक्षा जास्त खेळाडू ३० यार्डच्या बाहेर ठेवायचे नाहीत.
T-20 सामन्यातील पॉवर-प्ले नियम

पहिला पॉवर-प्ले  ( पहिले १ ते ५ षटक) – T-20 सामन्यांमध्ये पहिल्या ५ षटकापर्यंत ३० यार्डच्या बाहेर फक्त २ खेळाडू उभे राहू शकतात.

दुसरा पॉवर-प्ले  (नंतरचे ५ ते २० षटक ) – T-20 सामन्यांमध्ये ५ ओव्हरनंतर ३० यार्डच्या बाहेर खेळाडू राहू शकतात.

Duckworth Lewis Rule (DLS)

हवामान किंवा इतर परिस्थितींमुळे व्यत्यय आलेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात धावांचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य नसताना सामन्याच्या परिस्थितीत Duckworth Lewis Rule (DLS) वापरली जाते.
लक्ष्य स्कोअर सेट करण्याची ही सर्वात अचूक पद्धत म्हणून स्वीकारली जाते.यामुळे अनिर्णित सामन्याचा निर्णय दिला जातो.

क्रिकेटच्या खेळात  प्रामुख्याने वापरले जाणारे चेंडूचे प्रकार | Types of balls mainly used in the game of cricket

(नारिंगी) ऑरेंज बॉल 

काही मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये विशेषत: देशांतर्गत T20 लीगमध्ये ऑरेंज बॉल वापरला जातो. आकाराच्या बाबतीत तो पांढऱ्या चेंडूसारखाच आहे, परंतु फ्लडलाइट्सखाली चेंडू दिसण्यासाठी त्याचा रंग नारिंगी आहे.

पांढरा चेंडू

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पांढरा चेंडू वापरला जातो. बॉल देखील चामड्याचा बनलेला असतो आणि त्याला कॉर्क सेंटर असते. रात्रीच्या सामन्यांमध्ये चेंडू दिसण्यासाठी त्याच्या बाह्य पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचा थर लावलेला असतो. लाल चेंडूपेक्षा पांढरा चेंडू हवेत जास्त स्विंग करतो. आणि मऊ असतो.

गुलाबी चेंडू

आकाराच्या बाबतीत तो लाल चेंडूसारखाच असतो. गुलाबी चेंडू दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जातो. रात्रीच्या सामन्यांमध्ये चेंडू दिसण्यासाठी त्याचा रंग गुलाबी आहे. सामन्याच्या संध्याकाळच्या सत्रात गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा जास्त स्विंग करतो.

लाल चेंडू

लाल चेंडू चामड्याचा बनलेला आहे आणि त्याला कॉर्क सेंटर असते. लाल चेंडूचा वापर कसोटी क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये केला जातो. दिवसाच्या सामन्यांमध्ये लाल रंग खेळाडूंना पटकन दिसतो. लाल चेंडूचे आयुष्य जास्त असते आणि पांढऱ्या चेंडूपेक्षा त्याचा आकार आणि कडकपणा टिकवून ठेवतो.

Roles of Players – खेळाडूंची भूमिका

क्रिकेटमध्ये संघातील प्रत्येक खेळाडूची विशिष्ट भूमिका असते. क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मुख्य भूमिका पुढीलप्रमाणे

गोलंदाज

फिरकी, स्विंग किंवा वेग याचा वापर करून चेंडू अशा प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे फलंदाजाला तो मारणे कठीण जाइल आणि बोल्ड किंवा झेल पकडून फलंदाजाला बाद करण्याचाही ते प्रयत्न करतात. गोलंदाजांवर चेंडू फलंदाजांच्या दिशेने टाकण्याची जबाबदारी असते.

विकेटकीपर

क्षेत्ररक्षकांकडून चुकलेले कोणतेही चेंडू गोळा करण्यासाठी यष्टीरक्षक / विकेटकीपर याला चपळ असावे लागते. विकेटकीपर विकेटच्या मागे उभा राहतो आणि फलंदाज चुकला तर चेंडू पकडतो.

फलंदाज

संघासाठी धावा करण्याची जबाबदारी फलंदाजांवर असते. चेंडू प्रभावीपणे मारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि तंत्र असणे आवश्यक आहे. खेळपट्टीच्या प्रत्येक टोकाला उभे राहतात आणि त्यांच्या दिशेने टाकलेल्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न करून धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतात.

अष्टपैलू 

अष्टपैलू खेळाडू आहेत जे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संघासाठी योगदान देऊ शकतात. ते चांगले क्षेत्ररक्षण देखील करू शकतात.

कर्णधार

कर्णधार फलंदाजी आणि गोलंदाजीचा क्रम ठरवतात, क्षेत्ररक्षणाची जागा ठरवतात आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी इतर धोरणात्मक निर्णय घेतात. संघाचे नेतृत्व करण्याची आणि खेळादरम्यान धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी कर्णधारावर असते.

क्षेत्ररक्षक 

चेंडू थांबवण्याची आणि फलंदाजाला धावा करण्यापासून रोखण्याची जबाबदारी क्षेत्ररक्षकांवर असते. बॉल पकडण्यासाठी त्यांना चपळ आणि चांगले रिफ्लेक्सेस असणे आवश्यक आहे.

या मुख्य भूमिकांव्यतिरिक्त, खेळाच्या स्वरूपावर किंवा संघाच्या विशिष्ट गरजांनुसार इतर विशेष भूमिका असू शकतात. T20 सामन्यांमध्ये, एखादा पिंच हिटर असू शकतो ज्याला जलद धावा करण्यासाठी पाठवले जाते. तसेच एक विशेषज्ञ डेथ बॉलर ज्याला डावाच्या शेवटी गोलंदाजी करण्यासाठी आणले जाते. 

क्रिकेट खेळाचे फायदे मराठीत

हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला तंदुरुस्त आणि मजबूत असणे आवश्यक आहे आणि हात-पाय आणि डोळे यांचा समन्वय आणि चेंडू हाताळण्याचे कौशल्य चांगले असणे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये विकेट्स दरम्यान धावणे आणि चेंडू थांबविण्यासाठी धावणे यासाठी चपळता आवश्यक आहे.

  • समतोल आणि समन्वय साधणे
  • सामाजिक संवाद – नवीन लोकांना भेटण्याचा आणि नवीन मित्र बनवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
  • हात-डोळे यांचा समन्वय सुधारणे
  • शारीरिक तंदुरुस्ती
  • संघ कौशल्य
  • सामाजिक कौशल्ये जसे की सहकार्य, संप्रेषण आणि जिंकणे आणि हरणे कसे सहन करावे हे शिकणे
  • सहनशक्ती आणि तग धरण्याची क्षमता

महिला क्रिकेट संघाची माहिती 

१९ व्या शतकात महिला क्रिकेटला देखील सुरुवात झाली. पहिला महिला क्रिकेट सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशात झाला. हा सामना १९३४-३५ च्या दरम्यान झाला. भारत देशात सन १९७२ -७३ पासून महिला क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. पहिली आंतरराज्य पहिला क्रिकेट स्पर्धा ही पुणे येथे घेण्यात आली. २४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेटपटूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते.

भारतातील महिला क्रिकेट गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने गती मिळवत आहे, वाढत्या संख्येने प्रतिभावान खेळाडू जागतिक मंचावर आपली छाप पाडत आहेत. भारतात १९७३ मध्ये वूमन्स क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला कसोटी सामना १९७६ मध्ये खेळाला. हा सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होता. आज भारतात महिला क्रिकेट संघात मिताली राज, स्म्रिती मानधना, दीप्ती शर्मा, हरमन प्रीत कौर, झुलन गोस्वामी ह्या उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या महिला आहेत. महिला क्रिकेट विश्वातील मिताली राज ही सर्वात जास्त वन डे धावा केलेली खेळाडू आहे.

क्रिकेटबद्दल काही मनोरंजक तथ्ये (Some interesting facts about cricket in Marathi)

  • क्रिकेट खेळण्याची पीच 20 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद असते. 
  • 20-20 मॅचेस क्रिकेट चे नवीन स्वरूप आहे.
  • जगातील प्रसिद्ध खेळांमध्ये सामील असलेल्या क्रिकेट खेळाची सुरुवात सोळाव्या शतकात इंग्लंड मधून झाली होती. 
  • क्रिकेट तीन रूपात खेळले जाते. टेस्ट, वन डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी परंतु या मधून टेस्ट क्रिकेट ला जास्त महत्त्व दिले जाते. 
  • क्रिकेटच्या बॅटची उंची 970 मिलिमीटर आणि रुंदी 108 मिलीमीटर असते.
  • क्रिकेटच्या स्टंप ची उंची 28 इंच असते.
  • टेस्ट क्रिकेट मधील सर्वात मोठी विजय इंग्लंड च्या नावावर आहे. इंग्लंड ने ऑस्ट्रेलियाला 1930 मध्ये 579 रनांनी हरवले होते.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 160 ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो.
  • सचिन तेंडुलकर क्रिकेटचे पहिले खेळाडू आहेत ज्यांना तिसऱ्या अंपायर द्वारे आऊट देण्यात आले होते. 
  • वर्तमानात क्रिकेट खेळ 100 पेक्षा जास्त देशात खेळाला जातो.
  • अठराव्या शतकात क्रिकेटचा मोठ्याप्रमाणात विकास झाला व या खेळाला इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून निवडण्यात आले.
  • क्रिकेट खेळाला शुद्ध मराठी भाषेत चेंडूफळी किंवा ‘लंब दंड गोल पिंड धर पकड प्रतियोगिता’ असेही म्हटले जाते.
  • सुरुवातीला क्रिकेटच्या एका ओव्हर मध्ये 4 बॉल असायचे. परंतु 1889 मध्ये एका ओव्हर मध्ये 4 बॉल चे 5 करण्यात आले. 1922 मध्ये मध्ये 5 चे 8 बॉल करण्यात आले, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर 1947 पासून एका ओव्हर मध्ये 6 बॉल कायम करण्यात आले.
  • 1876-77 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये टेस्ट क्रिकेट मॅच खेळण्यात आले.
  • भारत एकमात्र असा क्रिकेट संघ आहे ज्याने 60 ओव्हर, 50 ओव्हर आणि 20 ओव्हर मधील विश्वचषक जिंकला आहे. 
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त रन बनवण्याच्या खिताब सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे.
  • जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाचे अनेक वेगवेगळे रूप आहेत. ज्यात इनडोअर क्रिकेट, बीच क्रिकेट, फ्रांसीसी क्रिकेट, क्विक क्रिकेट इत्यादी समाविष्ट आहेत.
  • पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीने जेव्हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक लावले होते तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकरच्या बॅटचा वापर केला होता.
  • मुख्यतः क्रिकेटच्या मॅच चे आयोजन दुबई मध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे केले जाते. 
  • सचिन तेंडुलकर यांनी विश्वचषकात सर्वात जास्त 8 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे.

क्रिकेट मधील काही प्रसिद्ध खेळाडू

भारतीय खेळाडू

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कपिल देव, राहुल द्रविड, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, इरफान पठाण, महेंद्रसिंग धोनी, झहीर खान, रोहित शर्मा.

विदेशी खेळाडू

सर डॉन ब्रॅडमन, सर व्हिवियन रिचर्ड्स, ब्रायन लारा, शेन वॉर्न, रिकी पॉन्टिंग, ब्रेट ली, कुमार संघकारा, महेला जयवर्धेने, लसीथ मालिंगा, कायरन पोलार्ड, क्रिस गेल. 

भारतातील सर्वात ५ मोठी मैदाने

क्रमांक मैदानाचे नाव क्षमता
1नरेंद्र मोदी स्टेडियम१,३२,०००
2एडन गार्डन८०,०००
3रायपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम६५,०००
4राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम५५,०००
5ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम५५,०००

FAQ


क्रिकेट ला मराठी मध्ये काय म्हणतात?

क्रिकेट ला मराठी मध्ये चेंडू – फळी असे म्हणतात. तसेच ‘लंब दंड गोल पिंड धर पकड प्रतियोगिता’ असेही म्हटले जाते.

क्रिकेट या मैदानाची लांबी रुंदी किती?

क्रिकेट खेळपट्टी म्हणजे क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी विकेटच्या मधील एक २०.१२ मी (२२ यार्ड) लांब आणि ३.०५ मी (१० फूट रुंद) पट्टी होय.

क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डची का असते?

सतराव्या शतकात, सर्वेक्षणकर्त्यांनी त्यांच्या विश्वसनीय मोजमापाची पद्धत म्हणून साखळीची भौतिक लांबी वापरली. क्रिकेटच्या नव्याने शोधलेल्या खेळासाठी योग्य लांबी असल्याने , खेळपट्टीची व्याख्या एक साखळी किंवा 22 यार्ड अशी करण्यात आली होती.

भारतात क्रिकेटची स्थापना कधी झाली?

१८ व्या शतकात युरोपियन व्यापारी खलाशांनी क्रिकेट भारतात आणले आणि भारतातील पहिला क्रिकेट क्लब १७९२ मध्ये कलकत्ता येथे स्थापन झाला असला, तरी राष्ट्रीय क्रिकेट संघाने २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर पहिला सामना खेळला.

गॉड ऑफ़ क्रिकेट कोणाला म्हटले जाते?

गॉड ऑफ़ क्रिकेट मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला म्हटले जाते

क्रिकेटमध्ये बॅक फूट म्हणजे काय?

सामान्यतः, फलंदाज पूर्ण लांबीच्या चेंडूंसाठी पुढच्या पायाचा शॉट (म्हणजे, फलंदाजाच्या जवळ पिचिंग) आणि कमी लांबीच्या चेंडूंसाठी बॅकफूट शॉट वापरतो.

निष्कर्ष

आम्ही आमच्या आजच्या क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे माहिती, इतिहास सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आपल्याला हा लेख वाचून कसे वाटले ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. काही सुधारणा आवश्यक असतील, तर त्या देखील आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू.

Leave a comment