बलिप्रतिपदा संपूर्ण माहिती मराठी | Balipratipada Information In Marathi

दिवाळी हा भारतातील सगळ्यात मोठा सण म्हणून समजला जातो. या सणाला घरात तसेच घराबाहेर तेलाचे लहान लहान दिवे, पणत्या लावल्या जातात. घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात. व्यावसायिक दृष्टीने देखील दिवाळीला फार महत्त्व आहे. दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.

या दिवशी दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त समजला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. लोककल्याणकारी राजा बळीच्या पूजनाचा हा दिवस आहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने देखील व्यापारी लोक ही नववर्षाची सुरुवात मानतात.

या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. या दिवसापासून विक्रमसंवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापार्‍यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते. मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात. दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे.  

येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू जी वामन बटूचा अवतार घेऊन उदारमतवादी बळीराजांना जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन भगवान विष्णूंनी त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम हाती घेतले, अशी पौराणिक कथा आहे.

Table of Contents

बलिप्रतिपदा मराठी माहिती | Balipratipada Information In Marathi

सणाचे नावबलिप्रतिपदा
कोणत्या देवाशी संबंधितबळीराजा
कधी साजरी करतातकार्तिक शुद्ध प्रतिपदा
यावर्षी 2023 मध्ये कधी आहेमंगळवार, 14 नोव्हेंबर 2023
मुहूर्तसकाळी 06:43 ते सकाळी 08:52
कोण साजरे करतातसंपूर्ण भारतातील हिंदू लोक

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

बलिप्रतिपदा हा सण कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून देखील आपण साजरा करतो. या दिवशी बळीराजाचे रांगोळीच्या सहाय्याने चित्र काढून त्याची पूजा केली जाते. बळीराज्याचे राज्य येऊ असे म्हटले जाते.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दिवाळी पाडवा या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शेणाचा बळीराजा करण्याची प्रथा देखील काही ठिकाणी अस्तित्वात आहे.’ दिवाळी सणाचा हा तिसरा दिवस असतो.’ या दिवशी विष्णू ने वामन बटू चा अवतार घेऊन अनाठाई उदारपणा दाखवणाऱ्या उदार बळीराजाचा कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाळून बळीराजाला पातळाचे राज्य देऊन भगवान विष्णूंनी त्याच्या राज्याची द्वारपालाचे काम सांभाळले.’

बळी हा दुष्ट असुर राजा होता. त्याला विष्णूच्या वामन अवताराने मारले होते. भगवान श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम आणि बळी या दोन शब्दांमध्ये ल आणि ळ याचा खूप फरक आहे. बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधित्व करतो. तर शेतकऱ्यांची नांगर, मुसळ ही हत्यारे आहेत. म्हणूनच इडा पिडा टळु बळीचे राज्य येवो, अशी म्हण प्रचलित झाली आहे.

महाराष्ट्रात दिवाळी पाडवा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. पाटाभोवती रांगोळी काढून पती ला पत्नी औक्षण करते. आणि त्यानंतर पती आपल्या पत्नीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट वस्तू देत असतो.

उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. श्रीकृष्णाच्या किंवा भगवान विष्णूंच्या देवळात ही पूजा केली जाते. या दिवशी अनेक पक्वान्न यांचा मिठाईचा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. या सणाला अन्नकूट असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते.

या दिवशी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोकांसाठी नवी वर्षाची सुरुवात असते. लक्ष्मीपूजन या दिवशी व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. परंतु जमाखर्चाच्या नवीन वह्या या दिवशीपासून सुरू केल्या जातात. या दिवशी या वयांना हळदीकुंकू दक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते.

मथुरेकडील लोक या दिवशी गोवर्धन पर्वताची देखील पूजा करतात. ज्यांना ते शक्य नसते, ते लोक गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजेच गोवर्धनाची पूजा होय.

Balipratipada Information In Marathi

बलिप्रतिपदा मराठी इतिहास

बलिप्रतिपदा हा एक प्राचीन सण आहे. बलीच्या कथेचा प्राचीन भारतातील नाटक आणि काव्यात उल्लेख केल्याचा सर्वात जुना उल्लेख इसवी सन पाणीनीच्या अष्टधायी 3.1.26 वरील पतंजलीचे महाभाषेमध्ये आढळतो.

बलिप्रतिपदा ही महाबली पृथ्वीवरील पुनरागमन आणि वामनाच्या विजयाचे स्मरण करते. विष्णूच्या अनेक सर्जनशील अवतारापैकी एक आणि दशावतार मधील पाचवा अवतार हे त्रिविक्रमात त्यांच्या रूपांतराद्वारे महाबली आणि सर्व असूरांवर विष्णूचे विजय दर्शवते.

Balipratipada

बलीप्रतिपदा मुहूर्त

मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 बली पूजा

 • प्रातः काळ मुहूर्त – सकाळी 06:43 ते सकाळी 08:52
 • कालावधी – 02 तास 09 मि
 • गोवर्धन पूजा चालू
 • मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023
 • प्रतिपदा तिथीची सुरुवात – १३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२:५६
 • प्रतिपदा तिथी समाप्त – 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:36 वाजता

बलिप्रतिपदा या सणाचे महत्त्व

राक्षस कुळात जन्म घेऊ नये, त्याच्या पुण्याईने त्याच्यावर देवांची कृपा झाली आणि या देवाच्या कृपेमुळे जनतेची सेवा केली गेली. प्रत्येक माणूस हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून काही ना काही वाईट कृत्य घडत असतात.

परंतु ज्ञान आणि देवाच्या कृपेमुळे तो देवत्वाला पोचू शकतो, हे या सणाप्रित्यर्थ आपल्याला दिसून येते. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते. मनातील वाईट भावना, दुसऱ्याविषयी वाईट कृत्य करण्याची भावना, ही केवळ अज्ञानामुळे होते. आणि देवाच्या कृपेमुळे यावर बंधने येऊन मनातील वाईट विचार नष्ट होतात. हे या सणाच्या निमित्ताने आपल्याला कळून येते.

श्रीकृष्णाने या दिवशी गोवर्धन पूजेची सुरुवात केली होती. म्हणजेच निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही सुरुवात समजली जाते. आपल्याला निसर्ग दररोज काही ना काही तरी देत असतो. त्यांनी या निमित्ताने त्याचे आभार मानणे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण बलिप्रतिपदा हा सण साजरा करतो.

बलिप्रतिपदा सण कसा साजरा करतात ?

या दिवशी लोक नवीन वस्त्रे नेसून दिवस आनंदाने घालवतात. या दिवशी खेळ खेळले जातात. म्हणूनच बलिप्रतिपदेला जीवतप्रतिपदा असे देखील नाव मिळाले आहे. या दिवशीची आणखी एक आख्यायिका अशी आहे की, एकदा बलिप्रतिपदेच्या दिवशी शंकराने पार्वतीला दयूत खेळण्यास प्रारंभ केला होता.

भगवान शंकर या खेळात हरले आणि वल्कले प्रधान करून ते गंगागिरी जाण्यासाठी बाहेर पडले. कार्तिकेय याला हे समजले आणि त्यांनी त्याच्या पित्याकडून शिकून घेतले आणि पार्वती बरोबर घेऊन शंकराने हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या. आणि त्या त्यांनी शंकराला नेऊन दिल्या. त्यानंतर भगवान गणेशाने शंकर व कार्तिकेय यांच्याबरोबर दयूत खेळून त्या वस्तू पुन्हा जिंकल्यावर त्या गाईला नेऊन दिल्या.

अशा प्रकारे पूर्ण सर्वस्व हरल्यावर भगवान शंकर हरिद्वार या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या सूचनेवरून तीन भाषांची विद्या, त्यातील भाषांपैकी एका भाषेचे भगवान विष्णूनी रूप धारण केले होते. ही नवीन दयूतविद्या घेऊन भगवान शंकर पुन्हा घरी आले. आणि त्यांनी पार्वतीला खेळायला सांगितले. शिवपार्वतीच्या या खेळाची आठवण म्हणून या दिवशी दयूत खेळण्याची प्रथा पडली. अशा प्रकारे आपण हा दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा दिवस साजरा करण्याची पद्धत

 • हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. यामुळे या दिवशी कोणताही नवीन उद्योग धंदा, व्यवसाय, उपक्रम सुरू करणे शुभ समजले जाते.
 • या दिवशी व्यापारी लोक नवीन वर्षाची सुरुवात म्हणून त्यांच्या हिशोबांच्या वह्यांची पूजा करून सुरुवात करतात.
 • या दिवशी सवाशिण स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात.
 • या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्ण, इंद्र, गाई, वासरांची पूजा केली जाते.
 • या दिवशी गायीवासरांना सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो.

गोवर्धन पूजा

या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. ज्यांना गोवर्धन पर्वतापर्यंत जाण्यास शक्य नाही, ते लोक शेणापासून गोवर्धन पर्वत तयार करतात. आणि या पर्वतावर फुले अर्पण करतात.

जवळच भगवान श्रीकृष्ण, इंद्र, गाई, वासरे, राधा यांची देखील पूजा करून प्रसाद बनवला जातो. ही पूजा मुख्यत्वे उत्तर भारतात केली जाते.

बळीचे राज्य येवो…

या दिवशी बळीचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. दुःखातून सुखाचे राज्य येऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना या दिवशी केली जाते. तसेच दिवे, पणत्या लावले जातात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

बलिप्रतिपदा हे व्यापार्‍यांसाठी नवीन वर्ष आहे

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. हा दिवस आर्थिक दृष्ट्या व्यावसायिकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात समजली जाते. व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या हिशोबाच्या वह्या यांची वगैरे पूजा करतात.

या दिवशी हिशोबाच्या वह्यांची पूजा करून नवीन वह्यांची सुरुवात केली जाते. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण केला जातो. या सणाला उत्तर भारतात अन्नकुट असेही म्हणतात.

दिवाळी पाडवा

पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.

व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द, खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. 

बली प्रतिपदा कधी साजरी केली जाते?

इंग्रजी महिन्याप्रमाणे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये हा बलिप्रतिपदेचा सण साजरा केले जातो. हिंदू दिनदर्शिका कॅलेंडर प्रमाणे कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते.

पश्चिम भारतामध्ये विक्रम संवंत वर्ष पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो तर गुजरात मध्ये हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते त्याचप्रमाणे नवीन विक्रम संवत वर्ष या दिवसापासून सुरू होते.

बली प्रतिपदा पूजा तिथी14 नोव्हेंबर 2023
बली प्रतिप्रदा पूजा पहाटे मुहूर्त06:43 ते 08:52 पर्यंत (2 तास 9 मिनिटे)

बली प्रतिपदा साजरी करण्याची पद्धत

 • या दिवशी सर्वप्रथम कुटुंबातील सगळे लवकर उठतात स्नान करतात. असे म्हटले जाते की, असे केल्याने शरीराच्या बाह्य अशुद्धतेशिवाय मन शुद्ध होते. यानंतर नवीन कपडे परिधान केले जातात.
 • घरातील स्त्रिया आणि मुली अंगणात आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढतात.
 • बलिप्रतिपदा हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवाळीच्या उत्सवात हिंदू लोक एकमेकांच्या घरी जाऊन भेट वस्तूंची देवाणघेवाण करतात. मिठाई फराळ यांची देखील दिवाण-घेवाण केली जाते. असे केल्याने बळी आणि देवदेवता प्रसन्न होतात, असे समजले जाते.
 • राजा बली आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांची देखील या दिवशी प्रतिकात्मक पुतळ्यांची स्थापना करून पूजा केली जाते.
 • संध्याकाळच्या वेळी ठिकठिकाणी आकाश कंदील, तेलाचे दिवे, पणत्या लावल्या जातात.
 • काही ठिकाणी मंदिरांमध्ये देखील विशेष कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे मंदिरे देखील दिवे आणि पणत्यांनी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्सनी सजवली जातात.
 • राजा बळीची पूजा करून देवाला प्रार्थना केली जाते की, राजा बळीचे राज्य लवकरात लवकर पृथ्वीवर यावे.
 • उत्तर भारतामध्ये या दिवशी दयूत खेळण्याचा एक वेगळा प्रकार आहे. याला एका पौराणिक कथा जोडलेली आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीने या खेळास प्रारंभ केला होता.
 • महाराष्ट्रामध्ये या दिवसाला पाडवा देखील म्हटले जाते. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. आणि एकमेकांना भेटवस्तू प्रदान करतात.
 • तामिळनाडू आणि कर्नाटक मधील शेतकरी समुदाय हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवशी गौ पुजा, गौरी पूजा प्रथम केले जाते. तसेच गायीची पूजा करण्यापूर्वी गोठ्याची स्वच्छता देखील केली जाते.

बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन का करावे?

या दिवशी बलीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात.

त्यानंतर वर्षभर बलीराजाने आपल्या काळ्या शक्तीच्या बळावर म्हणजेच जमिनीद्वारे पृथ्वीवरील जिवांना त्रास न देता इतर वाईट शक्तींना शांत, म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दिलेल्या पाताळाच्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे, हा त्याच्या प्रतिमेच्या पूजेमागील भाव असतो.

बलिप्रतिपदेच्या सण साजरा करण्याची परंपरा

बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात.

या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले वाहतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

बलिप्रतिपदाची विशिष्ट नावे

 • बडी पाडवा (महाराष्ट्र)
 • बाली पद्यमी (कर्नाटक)
 • बलराज (हिमाचल प्रदेश)
 • राजा बली (जम्मू)
 • बेस्टू वरस (गुजराती)
बलिप्रतिपदा

बलिप्रतिपदा कथा

असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचन नावाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजा दक्ष राजा होता. हा राजा दानशूरतेमध्ये अग्रेसर होता. आणि देव विष्णूच्या समर्थनासाठी तसेच भक्तीसाठी प्रसिद्ध होता.

त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की, त्याने सर्व देवांचाही पराभव केला. देवी लक्ष्मीला दासी केले. त्यामुळे सर्व देवांचे स्वातंत्र्य हरवले. मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूची निवड करण्यात आली. एकदा त्याने जाहीर केले की तो यज्ञ , होम हवन करेल आणि यज्ञ दरम्यान कोणालाही हवे ते भेट देईल. 

प्राचीन काळी बळी नावाचा एक फार मोठा बलाढ्य राजा होता. त्यांनी सर्व पृथ्वी जिंकली आणि लक्ष्मी सह सर्व देवांना त्यांनी टाकले होते. त्यानंतर भगवान विष्णू नी वामन अवतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे आपली तीन पावले मावतील एवढी जमीन देण्याची याचना केली.

बळीने त्रिपात भूमी वामनाला दिली. वामच्या दोन पावलामध्ये तर पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू? असे विचारताच बळीने आपले मस्तक नमून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले आणि सर्व देवी देवतांना लक्ष्मी सह त्याच्या बंदीवासातून सोडवले.

हे सर्व अश्विनवद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांमध्ये घडले. लक्ष्मीची सुटका झाल्यावर ती कायम प्रसन्न राहावी, म्हणून तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. असे सांगितले जाते की, अश्विन महिन्याच्या अमावास्येच्या रात्री लक्ष्मीदेवी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासाची योग्य जागा शोधत असते.

ज्या ठिकाणी स्वच्छता रसिकता पवित्रता असेल, त्या ठिकाणी ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्रवान, कर्तव्यनिष्ठ, धर्मनिष्ठ, देवभक्त, क्षमाक्षर पुरुष आणि गुणवंती पतीव्रता स्त्रिया असतील, अशा घरी वास्तव्य करणे, लक्ष्मी देवीला आवडते. वामन अवतार घेतलेल्या भगवान विष्णूने ज्यावेळी तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले होते.

त्यावेळी बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी त्याने असा वर दिला होता की, तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पृथ्वीतलावरील लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतिल. भगवान विष्णूंनी बळीराजाला आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळी सणाला जोडून बलिप्रतिपदा हा दिवस आपण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

बलिप्रतिपदा संपूर्ण माहिती मराठी व्हिडिओ

प्रश्न

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात गाडल्याचा हा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ) ही तिथी श्रीविष्णूने बळीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.

बलिप्रतिपदा 2023 मध्ये कधी आहे?

बलिप्रतिपदा 2023 मध्ये मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 रोजी असते.

बलिप्रतिपदा कोणत्या नावांनी ओळखली जाते?

बडी पाडवा (महाराष्ट्र), बेस्टू वरस (गुजराती), बलराज (हिमाचल प्रदेश),
बाली पद्यमी (कर्नाटक), राजा बली (जम्मू) नावांनी बलिप्रतिपदा ओळखली जाते.

बलिप्रतिपदा या दिवशी कोणता सण साजरा करतात?

बलिप्रतिपदा या दिवशी दिवाळी पाडवा हा सण साजरा करतात.

बलिप्रतिपदा का साजरी करतात?

या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. म्हणून हा सण साजरा केला जातो.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे बलिप्रतिपदा संपूर्ण माहिती मराठी या सणाबद्दल माहिती, महत्व आणि पूजा  विधि, याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment