भीमाशंकर ज्योतीर्लिंग मंदिर माहिती मराठी : BHIMASHANKAR TEMPLE INFORMATION IN MARATHI – भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी सहावे ज्योतीर्लिंग आहे. श्रावण महिन्यात शिव उपासना आणि मंदिरांमध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. शिव भक्त या महिन्यात आपल्या सोयीच्या वेळेनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात.
हे मंदिर नक्की आहे तरी कुठे? या मंदिराचा इतिहास काय आहे? या मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत? आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पुण्यापासून १२० किमी अंतरावर असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
भीमाशंकर ज्योतीर्लिंग मंदिर माहिती मराठी : BHIMASHANKAR TEMPLE INFORMATION IN MARATHI
पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर हे भीमाशंकर मंदिर आहे. या मंदिराच्या येथून भीमा नदीचा उगम होतो. हे मंदिर प्राचीन काळापासूनचे आहे आणि महाभारत काळात पांडवांनी बांधले होते असे मानले जाते.
भीमाशंकर माहिती प्रस्तावना
पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील, भोरगिरी गावात उंच डोंगरावर भीमाशंकर मंदिर आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. या ज्योतिर्लिंगाच्या मधून भीमा नदी उगम पावते. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण करून दिलेल्या या परिसरात तसेच प्रचंड अशी घनदाट झाडी, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत हे मंदिर वसलेले आहे.
१८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर हेमांडपंथी आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकृती असलेले नमुने आपल्यास पहावयास मिळतात. भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण असून, या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डोंगरदर्यांनी तसेच घनदाट जंगलाने असा व्यापलेला असल्यामुळे या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
या जवळच कोकणकडा व नागफणी हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या मंदिराचा इतिहास आणि बाकीची माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
भीमाशंकर मंदिराचा इतिहास
१८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे ज्योतिर्लिंग आकाराने खूप मोठे आहे त्यामुळे या मंदिराला “मोटेश्वर महादेव” या नावाने देखील ओळखले जाते. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन खांबांमध्ये एक मोठी घंटा बांधलेली आहे. ही घंटा चिमाजी आप्पांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. या घंटेवर सन १७२९ असे इंग्रजी मध्ये नोंद केलेले आढळून येते.
हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ येऊन गेल्याचे संदर्भ देखील आढळून येतात.
भीमाशंकर मंदिर नकाशा
भीमाशंकर मंदिर माहिती मराठी
मंदिराचे नाव – | भीमाशंकर |
स्थान – | भगवान शंकर |
देवाचे दुसरे नाव – | मोटेश्वर महादेव |
मंदिर कोठे आहे – | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात |
मंदिराची स्थापना – | १८ व्या शतकात |
शैली – | नागरा शैली |
मंदिराची निर्मिती – | नाना फडणवीस |
स्थापना – | अति प्राचीन |
मंदिराच्या पायऱ्या – | २३० पायऱ्या |
मंदिराजवळील नदी – | भीमा नदी |
मंदिराची उंची – | १२३० मीटर |
भीमाशंकर मंदिराचे वर्णन
हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र घनदाट जंगलाने वेढलेले आहे. हेमाड पंथी पद्धतीचे हे मंदिर साधारणपणे १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळून येते. या मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. सभा मंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची लोखंडी घंटा बांधण्यात आली आहे. ही घंटा चिमाजी आप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते.
या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यामुळे मूळ मंदिर आपल्यास बघण्यास मिळत नाही. या मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस डोंगर उतरून खाली आल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ या ठिकाणी दर्शनासाठी येत असत याच्या नोंदी देखील आहेत. शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.सभा मंडपा शेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत.
आता या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत. मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला मोठा टीव्ही लावलेला आहे. यामुळे गाभाऱ्यातील शंकराचे दर्शन या टीव्ही द्वारे आपल्याला घडते.
भीमाशंकर मंदिराची वास्तुकला
मंदिर परिसरामध्ये दोन मोठ्या नंदीच्या मूर्ती आहेत. भीमाशंकर मंदिराचा हा परिसर छोटा आहे. वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती यामध्ये कोरलेल्या आहेत. या मंदिराची वास्तुकला ही नागरा शैली आणि हेमाड पंथी शैलीच्या अनुसार झालेली आहे.
मंदिरामध्ये गर्भगृह, सभा मंडप आणि कुर्ममंडप सुद्धा आहे. भीमाशंकर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेले आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक मोठी घंटा आहे. पहिले बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी ही भेट दिली होती असे संदर्भ आढळतात. मंदिरामध्ये असलेल्या दोन नंदीच्या मूर्ती मधील एक मूर्ती जुनी आहे तर दुसरी नवीन आहे.
भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्या
हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी साधारणपणे 230 पायऱ्या चढाव्या लागतात या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला खाण्याची,पूजेच्या साहित्याची छोटी छोटी दुकाने आहेत.वयस्कर आणि अपंग लोकांना मंदिरामध्ये येण्यासाठी पालखीची सुविधा केलेली आहे.आपल्याला मंदिराच्या सुरुवातीला पालखीची सुविधा उपलब्ध होते.
भीमाशंकर मंदिराचा परिसर
भगवान शंकराचा सुंदर चांदीचा मुखवटा शिवलिंगावर बसविलेला आहे. या मुखवट्याला “पंचमुख” असेही म्हटले जाते.कारण या मुखवट्यावर पाच देवांचे म्हणजेच शिव, ब्रम्हा, विष्णू, सूर्य आणि चंद्र यांचे चेहरे कोरलेले आहेत.म्हणूनच याला पंचमुख असे म्हणतात लिंगाच्या वर पश्चिमेकडे आदिमाया पार्वतीची विलोभनीय अशी मूर्ती दिसून येते.
मंदिर तीन भागांमध्ये विभागलेले आहे. गर्भगृह, कुर्ममंडप आणि सभामंडप. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूने एक छोटीशी पाऊलवाट घनदाट जंगलात जाते. मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुप्तभिमेकडे ही पायवाट आपल्याला घेऊन जाते. या वाटेवरच साक्षी गणेशाचे मंदिर आहे.
मुख्य मंदिराच्या प्रांगणात मंदिरासमोरच छोटेसे शनी मंदिर आहे. या मंदिराला लागून मागच्या बाजूला सुंदर कोरीव काम केलेली दीपमाळ आहे. देवळाजवळ आणखी एक मोठी दीपमाळ आहे जी त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांनी प्रकाशित केली जाते. यामुळे या मंदिराचा परिसर तेजोमय प्रकाशाने उजळून निघतो. शनी मंदिराच्या थोड्या उंच भागावर गोरक्षनाथाचे मंदिर आहे.
भीमाशंकर मंदिराची वैशिष्ट्ये
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरावर असलेले भीमाशंकर हे मंदिर पुण्यापासून साधारण ११० किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे भारतातील ज्योतिर्लिंग पैकी सहावे ज्योतिर्लिंग असे मानले जाते. या मंदिरातील शिवलिंग ३.२५० फूट उंचीवर आहे. मंदिरातील शिवलिंग हे खूप मोठे असल्यामुळे याला मोटेश्वर महादेव असेही ओळखले जाते.
हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसेच ट्रेकिंग करण्यासाठी सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरातील लोक या मंदिराच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी या ठिकाणी येत असतात. या मंदिराजवळ कमळजा मंदिर आहे हे मंदिर म्हणजे पार्वतीचा अवतार असून या मंदिरातही भाविक दर्शनासाठी येत असतात.
भीमाशंकर मंदिराची रचना
भीमाशंकर मंदिर हे नागरा शैलीच्या वास्तुकलेपासून प्राचीन आणि आधुनिक असलेले असे मिश्रण आपल्याला पहावयास मिळते. हे मंदिर पुराण काळापासून रामायण काळापासून असल्याचे सांगितले जाते. परंतु नाना फडणवीस यांनी १८ व्या शतकामध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
भीमा नदी माहिती
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील गावात डोंगराळ भागात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असणारी भीमा नदी या ज्योतिर्लिंगांमधून उगम पावते. या भीमा नदीची उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी? यावर अनेक जणांची मते आहेत.
पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी या ठिकाणी आले असता, तेथे अयोध्येचा भिमक नावाचा राजा तपस्या करीत होता त्याच्या या तपस्येने प्रसन्न होऊन शंकरांनी भिमक राजाला वर मागण्यास सांगितले त्यावेळी या भिमक राजाने भगवान शंकरांच्या घामाच्या धारांची या ठिकाणी नदी होऊ दे असा वर मागितला. त्याच वेळी या भीमेचा उगम झाला असावा आणि भिमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा नदी चे नाव मिळाले असावे असे सांगितले जाते.
दुसरी कथा अशी सांगितली जाते, त्रिपुरासुर नावाच्या दैत्याने या भागामध्ये धुमाकूळ घातला होता या ठिकाणच्या जनतेचे हाल हाल करीत होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे रूप धारण केले. अनेक रात्री चाललेल्या या घनघोर युद्धामध्ये भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. या युद्धाने घामाघुम झालेले भगवान शंकर या शिखरावर येऊन बसले. त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून भीमा नदी उत्पन्न झाली असावी असेही सांगितले जाते.
भीमाशंकर मंदिरातील पूजापाठ
सकाळी ४.०० वाजल्यापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत या भीमाशंकर मंदिरात जाण्यासाठी, येणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी आहे.
- पहाटे – ४.३० काकड आरती
- पहाटे – ५.०० निजरूपदर्शन
- पहाटे – ५.३० पहाटेची आरती
- पहाटे – ५.३० ते दुपारी १२.०० पर्यंत अभिषेकाची वेळ दिलेली आहे या वेळात जे भाविक अभिषेक करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना ही वेळ दिलेली आहे.
- दुपारी – १२.०० नैवेद्य पूजा (यावेळी अभिषेक करण्यासाठी परवानगी दिलेली नाही.)
- दुपारी – १२.३० आरती (यावेळी ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे ते या वेळात अभिषेक करू शकतात.)
- दुपारी – ३.३० मध्यान्ह आरती (यावेळी जवळजवळ ४५ मिनिटे दर्शन बंद केलेले असते.)
- संध्याकाळी – ७.३० आरती
भीमाशंकर मंदिरातील पूजा-अर्चा करण्याची बिदागी
- लघुरुद्र – ३१००/-लघु रुद्र + ११ ब्राह्मण भोजन + नैवेद्य -५१००/-
- रुद्राभिषेक – ३५१/-
- अभिषेक – १५१/-
- पंचमरूठ स्नान रुद्राभिषेक – ५५१/-
- महापूजा + पंचमरूठ रुद्राभिषेक + ब्राह्मण भोजन – २१००/-
- एकादष रुद्राभिषेक – ११००/-
भीमाशंकर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारी पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील हे सहावे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संपूर्ण भारतभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. साधारणपणे ऑगस्ट पासून फेब्रुवारी- मार्च पर्यंत चा कालावधी या मंदिराच्या दर्शनासाठी योग्य समजला जातो.
हे एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही वर्षभरात केव्हाही येऊ शकता हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे जून जुलै महिन्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते तसेच एप्रिल मे महिन्यामध्ये उष्णतेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे सुद्धा त्रास होण्याची शक्यता संभवते.भगवान शंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या मंदिरामध्ये जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.
भीमाशंकर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे
पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यात हे भीमाशंकर चे मंदिर आहे. पुणे हे नाशिक, मुंबई प्रमाणे सुस्थितीत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला असल्यामुळे भीमाशंकरला पोहोचणे खूप सोपे आणि सुलभ जाते.
विमान – भीमाशंकर चे सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे विमानतळ आहे. जे साधारणपणे १२५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही विमानतळावरून कॅब किंवा बस ने प्रवास करू शकता.
ट्रेन – भीमाशंकर मंदिरामध्ये जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे पुणे रेल्वे स्टेशन आहे. जे साधारणपणे १०६ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही बस किंवा कॅबने जाऊ शकता.
बस – पुणे हे मुंबई ,नाशिक सारख्या मोठ्या मोठ्या शहरान्नी राष्ट्रीय महामार्गाद्वारे जोडला गेला असल्यामुळे विविध शहरातील पर्यटकांसाठी बस सेवा उपलब्ध आहेत. भीमाशंकरला पोहोचण्यासाठी पुणे एक्सप्रेस हायवे मार्गे या ठिकाणी येऊ शकता.
खाजगी वाहने – पुणे हा मोठ्या मोठ्या शहरांप्रमाणेच राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही खाजगी गाडीने सुद्धा येऊ शकता. जो तुमच्यासाठी सोयीस्कर आणि सुलभ प्रवास असेल.
मुख्य शहर ते भीमाशंकर मंदिर अंतर
- पुणे ते भीमाशंकर -११० किलोमीटर
- मुंबई ते भीमाशंकर -२२० किलोमीटर
- नाशिक ते भीमाशंकर -२०५ किलोमीटर
- पुणे विमानतळ ते भीमाशंकर -१२५ किलोमीटर
भीमाशंकर मंदिराजवळील १० पर्यटन स्थळे (10 PLACES TO VISIT AT BHIMASHANKAR TEMPLE)
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेले हे भीमाशंकर मंदिर एक तीर्थक्षेत्र म्हणून सिद्ध आहे. तसेच तेथील परिसर, आजूबाजूला असणारे निसर्गसौंदर्य, अभयारण्य यासाठी देखील प्रसिद्ध आहे.
०१) कोकण कडा
भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला हा कोकणकडा आहे साधारणपणे ११०० मीटर इतकी त्याची उंची आहे. या ठिकाणाहून आपल्याला अरबी समुद्र दिसतो. हे दृश्य अतिशय विलोभनीय आहे.
०२) गुप्त भीमाशंकर
भीमाशंकर हे मंदिर डोंगराळ भागात असून या ज्योतिर्लिंगाच्या बाजूने भीमा नदीचा उगम होतो. ही नदी तिथून लुप्त होऊन मंदिरापासून जवळपास १.५ किलोमीटर पर्यंत जंगलात पूर्वेच्या दिशेने पुन्हा प्रकट होते असे मानले जाते. ही जागा म्हणजेच गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
०३) सिताराम बाबा आश्रम
कोकण कड्यापासून जाणारा एक रस्ता या आश्रमाकडे जातो तेथील घनदाट जंगलामध्ये हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणात पोहोचण्यासाठी गाडीने जाऊ शकतो.
०४) नागफणी
सिताराम बाबा आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. या भीमाशंकर अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. जवळपास १२३० मीटर ही समुद्रसपाटीपासूनची उंची आहे. हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते. म्हणून याला नागफणी असे नाव पडले असावे.
०५) भीमाशंकर अभयारण्य (bhimashankar wildlife sanctuary)
हे अभयारण्य साधारणपणे १०० चौरस किलोमीटर आणि भीमाशंकर गावात २१०० फूट ते ३८०० फूट उंचीवर पसरलेले आहे. हे जंगल एवढे घनदाट आहे की पाहणाऱ्याला असे वाटावे की सह्याद्री पर्वत हिरवागार शालू नेसून उभा आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा केली गेली. या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आपल्यास पहावयास मिळतात. बिबट्या, सांबर, रानडुक्कर, रान मांजरे यासारखे प्राणी आणि इथले सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू (उडणारी खार) ही खार याच जंगलात आढळते.
चित्ता, हायना, हरण यासारखे प्राणी तसेच हॉर्नबिल, हिरवे कबूतर, क्वेकर बक यासारखे पक्षी आपल्यास पहावयास मिळतात. या जंगलामध्ये प्राणी, पक्षांप्रमाणेच औषधी वनस्पती देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात
०६) आहुपे धबधबा
भीमाशंकर हे एक तीर्थक्षेत्र आहे.त्याप्रमाणे ट्रॅकर्स साठी आदर्श ठिकाण आहे. या ठिकाणची जंगले, धबधबे, तलाव, मंदिरे आणि अभयारण्य यासारख्यांमुळे अप्रतिम ट्रेकिंगचा अनुभव ट्रेकर्स ना घेता येतो. या भीमाशंकर अभयारण्यातून ट्रेकिंग करत जाताना एक धबधबा लागतो, याला आहुपे धबधबा असे म्हणतात.
०७) हनुमान तलाव
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेले महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून भीमाशंकर या परिसरातील हनुमान तलावाला ओळखले जाते. तेथील निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. या हनुमान तलावामध्ये च्या आजूबाजूला अनेक प्रजातींचे पक्षी आढळून येतात त्यामुळे हे पक्षी निरीक्षणासाठी सुद्धा एक लोकप्रिय ठिकाण म्हणून समजले जाते या ठिकाणी कॅम्पिंग किंवा पिकनिक सुद्धा आयोजित करू शकता.
०८) मुंबई पॉइंट
०९) कोंढवळ धबधबा
भीमाशंकर पासून जवळपास तीन किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा कोंढवळ धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरलेला आहे. भर पावसात संततधार आणि गारव्याचा अनुभव घेत मनसोक्त भिजण्यासाठी हा धबधबा केंद्रबिंदू ठरत आहे
१०) ईको पॉइंट
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या या ईको पॉइंट नजीकचे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. हे ठिकाण उंचीवर असून इथून दिलेल्या सादेचा प्रतिध्वनि ऐकू येतो.
भीमाशंकर ट्रेक
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातून भीमाशंकर ट्रेक कडे जाण्यासाठी वाट आहे. याठिकाणी जाताना विविध प्रकारचे पक्षी, प्राणी त्याचप्रमाणे दुर्मिळ वनस्पतीही आपल्याला आढळून येतात. तेथील हिरव्यागार दृश्यांमुळे या भीमाशंकर ट्रेकचा प्रवास निसर्गप्रेमींना ट्रेकर्सना स्वर्गासारखा वाटतो. भीमाशंकर ट्रेकला जाण्यासाठी पावसाळा हा हंगाम योग्य समजला जातो, कारण आजूबाजूची सृष्टी हिरवाईने नटलेली दिसून येते.
आमचे हे लेख सुद्धा वाचा. 👇
भीमाशंकर मंदिरा बाहेरील १० पर्यटन स्थळे (10 PLACES TO VISIT NEAR BHIMASHANKAR TEMPLE)
पुणे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, तसेच विद्येचे माहेरघर म्हणून जसे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्रसिद्ध आहे. भीमाशंकर मंदिराप्रमाणेच आणखी काही प्रसिद्ध पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
- सिंहगड किल्ला
- शिवनेरी किल्ला
- शनिवार वाडा
- आगाखान पॅलेस
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
- लाल महाल
- राजा दिनकर केळकर म्युझियम
- राजीव गांधी झूलॉजिकल पार्क
- पर्वती हिल
- विश्रामबाग वाडा
भीमाशंकर मंदिराजवळील हॉटेल्स
- नीलम हिल्स रिसॉर्ट
- हॉटेल शिवतीर्थ
- नटराज हॉलिडे रिसॉर्ट
- हॉटेल भीमाशंकर
- एक्वाफोरेस्ट भीमाशंकर
- हॉटेल वैष्णव धाम पोखरकर
वडापाव, मिसळ, मँगो मस्तानी, साबुदाणा वडा, पावभाजी, दाबेली, पिठले भाकरी, मटकी उसळ, अळूवडी, चितळे बंधूंची बाकरवडी, अंजीर बर्फी आणि श्रीखंड यासारख्या बऱ्याच मिठाई आणि खाद्यपदार्थांसाठी पुणे प्रसिद्ध आहे.
भीमाशंकर कथा (BHIMASHANKAR JYOTIRLINGA STORY)
पुराण काळामध्ये भीम नावाचा एक बलशाली राक्षस होऊन गेला. तो रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि कर्कटी राक्षसीचा मुलगा होता.कर्कटी राक्षशी आणि तिचा मुलगा भीम हे एका पर्वतावर राहत होते. एकदा तिच्या मुलाने, भीमाने आपल्या आईला विचारले की आई, माझे वडील कोण आहेत? आणि कुठे राहतात? आपण इथे असे दोघेच का राहत आहोत?
या प्रश्नावर कर्कटी राक्षसी म्हणाली, तुझ्या वडिलांचे नाव कुंभकर्ण आहे. ते रावणाचे छोटे भाऊ आहेत. अगोदर मी विराख नावाच्या राक्षसाची पत्नी होते. त्याला भगवान श्रीरामाने मारले त्यानंतर मी आई-वडिलांसोबत राहायला लागले. एक दिवस जेव्हा माझे आई – वडील अगस्त्य ऋषींच्या आश्रमात एका ऋषींचे भोजन खात होते त्यावेळी ऋषींनी त्यांना शाप देऊन त्यांचे भस्म केले होते. त्यानंतर पुन्हा मी एकटीच राहिले आणि या पर्वतावर येऊन राहिले. याच ठिकाणी कुंभकर्ण ची आणि माझी भेट झाली, आणि त्यानंतर आम्ही विवाह केला.
त्याचवेळी भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करत होते. त्यामुळे तुझ्या वडिलांना त्या ठिकाणी परत जावे लागले. या युद्धामध्ये श्रीरामांनी कुंभकर्णाला ठार मारले. हे सगळे ऐकून कर्कटीचा मुलगा भीम याला देव देवतांचा राग यायला लागला. आणि त्यांने बदला घेण्याचे ठरवले. भीम, भगवान ब्रम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करू लागला. या तपस्येने भगवान ब्रम्हा प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर प्रकट झाले. त्यावेळी भीम म्हणाला, भगवान ब्रह्मा तुम्ही जर माझ्या या तपस्येला प्रसन्न झाला असाल तर मला शक्तिशाली होण्याचा वर द्या. भगवान ब्रम्हा लगेचच त्याला तथास्तु असे म्हणून ते अंतर्धान पावले.
वर प्राप्त झाल्यानंतर आनंदी होऊन भीम आपल्या आईजवळ गेला आणि रामाचा अवतार घेतलेल्या विष्णूंचा मी वध करून बदला घेणार असे सांगून तो तिथून निघून गेला. त्याने सगळ्या देवी देवतांबरोबर घनघोर युद्ध केले. आणि त्यांना हरवून स्वर्गावर आपला अधिकार प्राप्त केला. त्यानंतर कामरूप देशाच्या राजाबरोबर त्याने युद्ध करण्यास सुरुवात केली. कामरूप देशाच्या राजाबरोबर हे युद्ध जिंकून त्याने या राजाला कैद करून ठेवले. आणि त्याच्या संपत्तीवर, त्याच्या राज्यावर आपला अधिकार निर्माण केला.
यामुळे राजा दुःखी झाला आणि त्याने जेलमध्येच शिवलिंग तयार करून शंकराची आराधना करण्यास सुरुवात केली. ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र जपायला सुरुवात केली त्याचवेळी त्या राजाच्या पत्नीने ही शिवलिंगाची आराधना करण्यास सुरुवात केली. इकडे भीम नावाच्या या राक्षसामुळे सगळे देवी देवता भयभीत झाले होते. या देवी देवतांना काय करावे ते कळेना म्हणून ते भगवान शंकराची आराधना करू लागले. त्यांच्या या आराधनाने प्रसन्न होऊन भगवान शंकर त्या ठिकाणी प्रकट झाले.
म्हणाले, हे देवी देवतांनो तुमच्या या आराधनेमुळे मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला जे मागायचे ते मागा. भगवान शंकरांच्या या बोलण्याला आनंदी होऊन ते म्हणाले, की भीम नावाच्या राक्षसाने आम्हा सगळ्या देवी देवतांना दुःख दिले आहे. आपण त्याचा वध करून या दुःखातून आमची मुक्तता करावी. देवी देवतांना त्यांच्या मनाप्रमाणे वर देऊन भगवान शंकर तेथून अंतर्धान झाले. देवी देवता आनंदित होऊन कामरूप देशाच्या राजाला जाऊन म्हणाले, की हे राजा भगवान शंकर या भीम नावाच्या राक्षसाचा नाश करून तुम्हाला या ठिकाणाहून मुक्त करणार आहेत.
दुसरीकडे भीम नावाच्या राक्षसाला कळाले की, राजा जेलमध्ये सुद्धा भगवान शंकराची आराधना करत आहे. त्यामुळे तो रागाने जेलमध्ये जाऊन पोहोचला. भीम राक्षस राजाला म्हणाला की, तू मला मारण्यासाठी ही आराधना करत आहेस. ही आराधना थांबव आणि माझी आराधना करण्यास सुरुवात कर. नाहीतर मी तुझा नाश करीन. परंतु राजाने आपली आराधना थांबविली नाही. त्यामुळे तो रागाने आपल्या तलवारीच्या सहाय्याने शिवलिंगाचे तुकडे करायला निघाला.
त्याच वेळी त्या शिवलिंगातून भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या तलवारीचे दोन तुकडे केले. त्यानंतर भीम आणि भगवान शंकरांमध्ये घनघोर युद्ध झाले. आणि या युद्धात शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या ज्वालेने भीमाला भस्म करून टाकले. या ज्वालेने तेथील आजूबाजूच्या देखील जंगलाला आग लागली, ज्या ठिकाणी औषधी वनस्पती होत्या.
या आगीमध्ये या औषधी वनस्पती नष्ट झाल्या. त्यामुळे सर्व देवी देवतांनी भगवान शंकरांना याच ठिकाणी विराजमान होण्याची प्रार्थना केली. त्यांच्या या प्रार्थनेला मान देऊन भगवान शंकर या ठिकाणी विराजमान झाले. पुढे हे ठिकाण भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध झाले.
भीमाशंकर मंदिरात होणारे उत्सव
भीमाशंकर हे भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर दिवशी भगवान शंकराची पूजाअर्चा केली जाते. भीमाशंकर मंदिरामध्ये महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, कार्तिक पौर्णिमा, गणेश चतुर्थी, दीपावली या सणांचे खूप महत्त्व आहे.
०१) श्रावणी सोमवार
ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच मराठी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भगवान शंकराला आवडणारी बेलपत्र आणि पांढऱ्या फुलांची आरास केली जाते. तसेच निरांजन, समई पेटवून या ठिकाणी श्रावणी सोमवार साजरे केले जातात.
०२) महाशिवरात्री
भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे हे एक प्रतीक म्हणून महाशिवरात्रीच्या वेळी पाच दिवसांची जत्रा भरलेली असते. या दिवशी भगवान शंकराने देवी पार्वती बरोबर विवाह केला होता. म्हणूनच हा दिवस पूजा, भजन तसेच अभिषेकासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतातून हजारो भावीक या ठिकाणी हा सोहळा बघण्यासाठी तसेच देवाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात.
०३) कार्तिक पौर्णिमा
नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्याने ही कार्तिक पौर्णिमा असते. या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्याचे साम्राज्य नष्ट केले होते असे मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शंकरांच्या कार्तिकेय नावाच्या पुत्राचा जन्म झाला होता असेही मानले जाते. म्हणून ही पौर्णिमा साजरी केली जाते.
०४) गणेश चतुर्थी
साधारणपणे ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा पुत्र भगवान गणेश याचा जन्मदिन म्हणून हा सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
०५) दिवाळी
साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्याने दिवाळी हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या मंदिरामध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण मंदिर हे दिव्यांनी सजविले जाते आणि या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते.
FAQ
भीमाशंकर मंदिर कुठे आहे?
हे मंदिर हे पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यामध्ये आहे
भीमाशंकर मंदिराचे दर्शन करण्यासाठी किती वेळ लागतो?
मंदिराचे दर्शन घेण्यासाठी साधारणपणे ४५ मिनिटे ते ५० मिनिटांचा कालावधी लागतो परंतु जास्त गर्दी असेल तर अशावेळी फार वेळ लागू शकतो
भीमाशंकर मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?
हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे म्हणून ते तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे.
भीमाशंकर मंदिरापर्यंत जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत?
मंदिरापर्यंत जाण्यासाठी २३० पायऱ्या आहेत.
भीमाशंकर मंदिरामध्ये प्रवेशद्वाराजवळ जी घंटा आहे ती कोणी भेट दिली होती?
मंदिरामध्ये प्रवेशद्वाराजवळची घंटा आहे ती चिमाजी अप्पांनी भेट दिली होती.
भीमाशंकर मंदिराची निर्मिती कोणी केली?
मंदिराची निर्मिती १८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी केली.
भीमाशंकर हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे?
हे भारतातील बारा ज्योतिर्लिंग पैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे.
भीमाशंकर मंदिराच्या जवळून कोणती नदी वाहते?
मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
निष्कर्ष
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये असणारे हे भीमा शंकराचे मंदिर या मंदिराबाबतची माहिती, इतिहास असणारा हा लेख तुम्ही वाचला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा. या लेखा बाबत काही चुका असल्यास तसेच सुधारणा आवश्यक असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन प्रकारची माहिती आणि नवनवीन विषय घेऊन.
तोपर्यंत नमस्कार.