Gay Gotha Anudan Yojana 2024 | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 – मित्रहो, आपले महाराष्ट्र सरकार राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, विविध योजना राबवत असतात. व या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.
या मध्ये महाराष्ट्र सरकारने अजून एका योजनेची भर केली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना गाय, म्हैस यांच्या गोठ्याकरिता २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या लेखाद्वारे, आम्ही आपणास हे अनुदान प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा ? याची सविस्तर माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 : Gay Gotha Anudan Yojana 2024
योजनेचे नाव | गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024 |
योजनेचे दुसरे नाव | शरद पवार ग्राम समृद्धी योजना |
योजनेची सुरुवात | 3 फेब्रुवारी 2021 |
विभाग | कृषी विभाग – महाराष्ट्र शासन |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी |
योजनेचा लाभ | गोठा बांधण्यासाठी अनुदान |
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024 माहिती | Gay Gotha Yojana Information
आलेल्या नवीन सरकारने अर्थात शिंदे सरकारने, शेतकरी मित्रांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनवण्यासाठी विविध प्रकारच्या नवनवीन योजना राबवून, शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनवले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी लोक सुखावले असून, त्यांना सरकारच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. तसेच गाय म्हैस यांच्या गोठयाकरिता, सरकारने २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची मंजुरी दिलेली आहे.
या योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकरी लोकांना चांगली मदत होणार आहे. या योजनेची पूर्तता करण्यासाठी, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो, ऑनलाइन अर्ज केल्यानंतर रक्कम शासनाकडून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते. पशुसंवर्धन विभागाकडून सुरू केलेल्या, विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेअंतर्गत, दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्यामधील खेडे गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणे चालतो, व या व्यवसायाला अजून मोठ्या स्तरावर चालना देण्यासाठी, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यस्तरावर नाविन्यपूर्ण विविध योजना राबवल्या जातात. या योजनेचा लाभ सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच जिल्हास्तरावरील योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात उपाययोजना केल्या जातात.
गाय म्हैस गोठा योजनेचा उद्देश | Gai Gotha Anudan Yojana Motive
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 च्या माध्यमातून, सरकार शेतकऱ्यांच्या जनावरांचे होणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती पासून, संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे.
- त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन, शेतकऱ्याचे राहणीमान सुधारावे हा या योजनेचा एक प्रमुख उद्देश आहे.
- शेतकरी हे तितकेसे आर्थिक दृष्ट्या सबळ नसल्यामुळे, त्यांच्याजवळ जनावरांसाठी योग्य निवारा बांधण्यासाठी आर्थिक टंचाई उद्भवते. यामुळे सरकार शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करते.
- आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनवण्यासाठी, व त्यांचे राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात केली आहे.
- शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करून, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे, हा गाय गोठा योजनेचा उद्देश आहे.
- लोकांमध्ये पशुसंवर्धना बद्दल प्रेरणा निर्माण करून, त्यांना पशुसंवर्धनासाठी प्रोत्साहित करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे.
- या गाय म्हैस गोठा योजनेच्या अंतर्गत, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे. हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
गाय पालन योजना वैशिष्ट्ये व फायदे – Gai Gotha Yojana Benifits
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजनांपैकी ही एक महत्त्वाची योजना म्हणून नोंदवली गेली आहे.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेअंतर्गत, अर्ज करण्याची पद्धत ही सरकारने सोपी ठेवली असून, अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारत बसण्याची गरज नाही. शेतकरी त्याचा वेळ व पैसा बचत करून, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- राज्य सरकार द्वारे गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात, ही शेतकऱ्यांच्या सशक्तिकरणासाठी व आर्थिक सहाय्यासाठी केली गेली आहे.
- या योजनेच्या माध्यमाने, महाराष्ट्र राज्यांमधील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या पशुसंवर्धनासाठी गोठा बांधून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने अनुदान स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजना ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवून, त्यांचा आर्थिक विकास करणे हे या गाय व गोठा अनुदानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून, दिला जाणाऱ्या अनुदानाची किंमत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे.
गाय म्हैस गोठा योजना अनुदान – Gotha Shed Yojana Subsidy
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या गाई म्हशींच्या गोठ्यांच्या निर्मितीसाठी, २ लाख ५० हजार रुपये अनुदानात लाभार्थ्याला, दोन दुधाळ देशी, दोन संकरित गाई, दोन म्हशींचा एक गट, वाटप करण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली असून, ह्या योजनेचा महाराष्ट्र राज्यामध्ये २०२३-२४ च्या आर्थिक वर्षापासून शुभारंभ करण्यात येणार आहे.
दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, नवीन दुधाळ जनावरे गटवाटप योजनेत वाटप करावयाच्या आहेत. यामध्ये प्रतिगाईची किंमत ही ७० हजार रुपये व प्रत्येक म्हशीची किंमत ही ८० हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय दिला आहे.
लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास, खालील गोष्टी आवश्यक आहेत
- गाय म्हैस गोठा अनुदान 2024 या योजनेअंतर्गत, लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास लाभार्थ्याला त्याने केलेल्या कामाचे फोटो लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.
- काम सुरू करण्यापूर्वीचा फोटोकाम सुरू असतानाचा फोटोकाम पूर्ण झालेला चा फोटो व लाभार्थी सह फोटो.
- हे तीन फोटो अंतिम प्रस्तावासोबत सात दिवसाच्या आत शासनासमोर सादर करणे बंधनकारक आहे.
शरद पवार गाय गोठा योजना लाभार्थी – Sharad Pawar Gotha Yojana Beneficiaries
आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील जे शेतकरी मित्र गाय-म्हैस यांचे पालन करू इच्छित असतील आणि आर्थिक दृष्ट्या मागास असतील, असे शेतकरी गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्र असतील.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत मिळणारा लाभ
- या योजनेच्या माध्यमातून, लाभार्थी शेळीपालनासाठी शेड बांधून देण्यात येते, तसेच लाभार्थ्याला या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालनासाठी सुद्धा शेड बांधून देण्यात येते.
- गाय म्हैस गोठा योजनेच्या माध्यमातून, लाभार्थीला गाय व म्हैस यांच्याकरिता उत्तम व पक्का गोठा बांधून देण्यासाठी, सरकारतर्फे अनुदान त्याच्या बँक खात्यामध्ये दिले जाते.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेच्या मदतीने, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हे आत्मनिर्भर व सशक्त बनण्यास मदत होते.
- या योजनेच्या अंतर्गत, शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होऊन, शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावते व शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होते.
- महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना ह्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- गाय म्हैस गोठा योजनेअंतर्गत, या योजनेचा लाभ शेतकऱ्या सोबत महिला शेतकरी सुद्धा घेऊ शकता.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी गाय, म्हैस, शेळी, कुक्कुटपालन, यांसारख्या पालनासाठी शेड तसेच गोठा बांधण्यासाठी पैशांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.
गाय गोठा बांधणी अनुदान 2024 साठी आवश्यक पात्रता व निकष
- गाय म्हैस गोठा अनुदान प्राप्त करण्यासाठी, अर्जदार महाराष्ट्राचा मूळरहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजना प्राप्त करण्यासाठी, शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन तसेच त्या जमिनीची कागदपत्र असणे बंधनकारक आहे.
- शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असणाऱ्या पशूंचे tagging करणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असणाऱ्या जमिनीचे जीपीएस tagging करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी, लाभार्थ्याला स्वतंत्र अर्ज करणे गरजेचे आहे.
- तसेच गाय म्हैस गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाने फक्त शेतकऱ्यांना दिलेली आहे.
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येईल.
- एका कुटुंबातून फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
- आर्थिक दृष्ट्या अविकसित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतकऱ्यांनी जर याआधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या, कोणत्याही एका योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी, साठी शेड बांधणी करून घेतली असेल, तर त्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
गाय म्हैस गोठा अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- आदिवासी प्रमाणपत्र
- जन्माचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- रेशन कार्ड
- या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
- 15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक
- ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र / ना हरकत प्रमाणपत्र
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक
- अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
- अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक
- अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे
गाय म्हैस गोठा / शेड ची वैशिष्ट्ये – Gai Gotha Yojana 2024
- या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करावे लागेल..
- या योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल यासाठी शासनातर्फे ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाईल.
- ६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधल्यास त्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
- १२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधल्यास त्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
- गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी मानण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी. अशी ठरवण्यात आली आहे.
- गव्हाण बांधकाम ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाक्या बंधाव्या लागतील.
- जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधावी लागेल.
- सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.
Sharad Pawar Gram Samridhhi Yojana व्हिडीओ
गाय म्हैस गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
- गाय म्हैस गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराने, तुमच्या जवळील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन, गाय, म्हैस गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावा.
- अर्ज सादर केल्यावर त्या अर्जाची पोचपावती सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावी, अशा प्रकारे तुमची गाय म्हैस गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजना 2024
गाय म्हैस अनुदान योजनेमध्ये, प्रत्येक दिवशी १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या एचएफ, जर्सी, या संकरित गाई प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध देणाऱ्या गिर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, व प्रतिदिन ५ ते ७ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळऊ, व डांगी गाय, त्याचप्रमाणे मुन्ना व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येणार आहेत.
वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही साधारणतः एक ते दोन महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या-तिसऱ्या वेतातील असावीत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत अर्ज कशा पद्धतीने भरावा ?
गाई गोठा योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- या योजनेचा अर्ज करतेवेळी सरपंच, ग्रामसेवक, किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कोणत्याही नावापुढे बरोबरची खूण करावी.
- त्याखाली तुम्हाला ग्रामपंचायतीचे नाव, तुमचा तालुका, व जिल्ह्याची माहिती भरावी.
- अर्जदाराने स्वतःचे नाव, स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा व मोबाईल क्रमांक योग्य भरावा.
- अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे, त्या प्रकारासमोर बरोबर खूण करावी.
- अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती योग्यरीत्या भरून, ज्या प्रकारासाठी अर्ज निवडला आहे, त्या प्रकारासंबंधी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावित.
- अर्जदाराच्या नावावर जमीन असल्यास हो लिहावे.
- ७/१२ व ८ अ व ग्रामपंचायत नमुना ९ जोडावा.
- अर्जदाराला गावचा रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या प्रकारचे काम निवडले आहे, ते तुमच्या रहिवाशी ग्रामपंचायत मध्ये येते आहे का ते अर्जामध्ये लिहावे.
- त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. ठरावासोबत सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचे एक शिफारस पत्र द्यावे.
- त्यामध्ये अर्जदार दिलेल्या योजनेसाठी पात्र असल्यास त्याला तसे सांगितले जाते.
- त्यानंतर लाभार्थ्याने अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या सही शिकत्यानुसार पोचपावती दिली जाते.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2024
गुरांचा गोठा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची खूण करावी.
- त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
- अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
- अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
- अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
- लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
- लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
- तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
- त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.
गाय म्हैस गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज
गाय म्हैस पालन योजना 2024 योजना शासन निर्णय
गाय गोठा सबसिडी योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराजवळ गाय उपलब्ध नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराकडे पक्क्या स्वरूपाचा गोठा उपलब्ध असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- एकाचवेळी 2 अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार शेतकरी हा ग्रामीण भागातील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळवले असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत शेळी पालन शेड
शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्पउत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजिवीकेचे पारंपरिक आणि महत्वाचे साधन असल्यामुळे शेळीला गरीबाची गाय समजली जाते. अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता शासनातर्फे मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
ग्रामीण भागातील शेळी, मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटुंबे आपल्या आर्थिक परिस्थिति मुळे शेळया-मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत. या कारणामुळे शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे संसर्गजन्य, जंतजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो. आशा रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया-मेंढयाचे कळप शेतकार्यांतर्फे पाळले जातात. म्हणून शासनातर्फे मागणी केलेल्या प्रत्येक कुटूंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करुन देण्यात येते.
ग्रामीण भागामध्ये शेळया-मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार होणा-या उत्कृष्ठ दर्जाचे सेंद्रीय खत तयार केले जाऊ शकते. परंतु पक्क्या स्वरुपाचे व चांगले गोठे नसल्याने त्याचा नाश होतो. शेळया-मेंढयाकरिता चांगल्या प्रतीची शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल,मूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येईल.यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकेल.
गावातील अल्प उत्पादक शेतकऱ्याकडे २ ते ३ शेळ्या असतात परंतु त्या २ ते २ शेळ्यांसाठी शेतकऱ्याला स्व-खर्चातून शेड बांधणे परवडण्यासारखे नसते म्हणूनच या गोष्टीचा विचार करून शासनाने २ ते ३ शेळ्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन शेळ्या घेणे तसेच शेड बंधने यासाठी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे.
या योजनेअंतर्गत
- १० शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी ४९२८४/– रुपये अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत - २० शेळ्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते.
- शेड सिमेंट व विटा लोखंडे सळ्यांच्या आधाराने बांधण्यात येते.
- एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरीता 3 पट अनुदान मंजूर करण्यात येते.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत कुक्कुट पालन शेड
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश अल्प उत्पादक शेतकरी शेती सोबत कुकूटपालनासारखा जोड व्यवसाय सुरु करतात. कुक्कुट पालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना अंडी उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक मांसाचा पुरवठा होतो. खेडेगावामध्ये कुक्कूटपक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते.
कुक्कूटपक्ष्यांचे उन,पाऊस, परभक्षी जनावरे व वारंवार येणा-या आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. चांगल्या निवा-यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे व अंडयाचे परभक्षी प्राण्यांपासून सरंक्षण होण्यास मदत होईल.
सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन,
वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.
तसेच भूमिहीन कुटूंबाना प्राधान्य देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत
- १०० पक्ष्यांकरिता ७.५० चौ.मी.शेड बांधण्यात येईल तसेच त्याची लांबी ३.७५ मी. आणि रुंदी २.० मी.असेल.
- लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच व २० सेमी जाडीची, विटांची जोत्यापर्यंत भिंत बांधण्यात येईल
- छतापर्यंत कुक्कूट जाळी ३० सेमी X ३० सेमीच्या खांबानी आधार दिलेली असेल.
आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी २.२० मीटर उंचीची भिंत असेल. - छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात येईल.
छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरण्यात येतील. - पायासाठी मुरुमाची भर घालण्यात येईल त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा १ : ६ प्रमाण असलेला मजबूत थर असेल.
- पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यासाठी शेळयांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात येईल छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे/सिमेंटचे पत्रे वापरण्यात येतील. .
- या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने १०० पक्षांकरिता शेड बांधण्यासाठी रुपये ४९७७०/- अनुदान देण्याचे ठरविले आहे.
- जर लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास शेडसाठी दुप्पट अनुदान देण्यात येईल.
- जर एखाद्याकडे १०० पक्षी उपलब्ध नसल्यास त्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर २ जमीनदारांसह शेडची मागणी करायची आहे.
- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० पक्षी आणणे लाभार्थ्यास बंधनकारक राहील.
FAQ
गाय गोठा अनुदान योजना कोणासाठी आहे?
गाय गोठा अनुदान योजना ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी आहे.
कुकुट पालन शेडसाठी किती अनुदान दिले मिळते ?
राज्य शासनातर्फे कुकुट पालन शेड साठी १०० पक्षासाठी ४९७७०/- रुपये अनुदान दिले जाते. तसेच १५० पक्षांसाठी दुप्पट अनुदान दिले जाते.
शेळी पालन पक्की शेड बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाते?
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत १० शेळ्यांसाठी ४९२८४/- रुपये अनुदान राज्य शासनातर्फे दिले जाते.२० शेळ्यांसाठी या योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान दिले जाते तसेच 30 शेळ्यांसाठी या योजनेअंतर्गत तिप्पट अनुदान दिले जाते.
गाय गोठा बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाते?
या अनुदान योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी जो गोठा बांधला जातो त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाते.
१२ गुरांसाठी या योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान दिले जाते.
१८ गुरांसाठी या योजनेअंतर्गत तिप्पट अनुदान दिले जाते.
गाय पालन योजना निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखात आम्ही आपणास गाय म्हैस गोठा अनुदान योजना बद्दल माहिती दिली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांना गाय म्हैस करिता गोठा बांधण्यासाठी सरकारकडून २ लाख ५० हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. या साठी अर्ज कसा करावा ? ह्या बद्दल माहिती दिली आहे.
हा लेख गाय गोठा अनुदान योजना 2024 तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.