पसायदान PDF : PASAYDAN PDF DOWNLOAD : PASAYDAN MARATHI PDF

PASAYDAN PDF DOWNLOAD
pasaydan pdf download – pasaydan marathi pdf download

पसायदान मराठी pdf : PASAYDAN PDF DOWNLOAD – एका भक्ताने निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, हात जोडून प्रत्यक्ष परमेश्वराकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. मनात कोणतेही किल्मीष न ठेवता आणि यत्किंचितही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान. आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती, समृद्धी, ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नंदावे, यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. या पसायदानाची पीडीएफ – आपल्यासाठी देत आहोत.

Table of Contents

PASAYDAN PDF DOWNLOAD 👇

पसायदान सारांश : MORAL OF PASAYDAN

ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रातील संत कवी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत सामान्यजनांना समजेल अशी ओघवत्या शैलीत रचलेली श्रीमद भागवत गीतेची भावार्थ रचना आहे. खरे तर हे अद्वितीय प्रवचन आहे जे संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरून दिले होते. भगवद्गीतेचे मूळ एकूण ७०० श्लोक आहेत. तीच भगवद्मगीता मराठी भाषेत ९०००ओव्यांमध्ये अनुवादित आहेत.

श्री ज्ञानेश्वरांनी मूळ भगवद्गीतेतील अध्याय अतिशय सुंदरपणे आणि समर्पकपणे आपल्या ९०० ओव्यां मध्ये स्पष्ट केले आहेत, प्रत्यक्षात ती भगवद्गीतेची भावार्थ दीपिकाच आहे. संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाच्या शेवटच्या ओळी म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायाचा समारोप पासयदानाने केला आहे.  त्याच पसायदानाचा अर्थ प्रसाद आहे.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी ज्या स्वरूपाचे वर्णन केले आहे आणि ते स्वस्वरूपात वास करत आहे, शेवटी ज्ञानेश्वर त्याच विश्वव्यापी जगातून अद्वितीय ईश्वराला बोलावून पसायदान म्हणजेच प्रसाद मागतात. ज्ञानेश्वरी स्वतः रचली. हे प्रभो, माझ्या या वाग्यज्ञावर प्रसन्न होऊन मला प्रसाद दे.

मित्रहो आम्ही आमच्या अल्पमतीने आपल्यासाठी हा लेख लिहिलेला आहे. काही चुका झाल्या असल्यास त्याबद्दल क्षमस्व. आमच्या कडून काही सुधारणा हवी असल्यास कमेंट करून नक्की कळवा .

धन्यवाद .

Leave a comment