MARLESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE | मार्लेश्वर मंदिर माहिती मराठी – आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या मार्लेश्वर या शिवमंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. हे मंदिर नेमके कुठे आहे? या मंदिराचा इतिहास काय आहे? या मंदिरामध्ये कोणते उत्सव होतात? ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेलच. चला तर मग वेळ न घालवता पाहूया मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा रत्नागिरी माहिती .
मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा माहिती : MARLESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE
प्रस्तावना
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावात देवस्थान MARLESHWAR TEMPLE आहे. देवदर्शनाबरोबर निसर्ग सानिध्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येथे येत असतात. मुंबई – गोवा महामार्गावरील संगमेश्वर पासून हे ठिकाण ३५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मारळ या गावातील डोंगरावर असलेले अतिशय जागृत देवस्थान म्हणून श्री मार्लेश्वर ओळखले जाते. रत्नागिरीतील हे शिव शंकराचे हे पुरातन मंदिर चहुबाजूने घनदाट झाडी आणि डोंगरांनी वेढलेले आहे.
मार्लेश्वर मंदिराचा इतिहास (marleshwar temple history in marathi)
इसवी सन अठराशेच्या सुमारास आंगवलीचे सरदार अणेराव साळुंखे एका शिकारीचा पाठलाग करीत घनघोर अरण्यात गेले. ते छोटेसे वापर एका गुहेच्या आत मध्ये गेले आणि तेवढ्यातच वरून दगड पडून गुहेचे दार बंद झाले. सरदार अणेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगड माती बाजूला करून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता श्री शंभू महादेवांचे दर्शन त्यांना झाले हाच तो मार्लेश्वर. तो दिवस होता मकर संक्रांत. भगवान परशुरामने मारळ या ठिकाणी मार्लेश्वराची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते.
मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा रत्नागिरी
हे मंदिर एका गुहेमध्ये आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी साधारणपणे ४०० ते ४५० पायऱ्या वर चढून जावे लागते. या मंदिराच्या उजव्या बाजूला काही पायऱ्या खाली उतरून गेल्या असता समोरच धारेश्वर नावाचा धबधबा दिसून येतो. मंदिरामध्ये दोन पिंडी आहेत, एक म्हणजे मार्लेश्वर आणि दुसरा म्हणजे त्याचा भाऊ मल्लिकार्जुन असे सांगितले जाते. या मंदिरामध्ये नित्यनेमाने पूजा केली जाते.
हे मंदिर गुहेमध्ये असल्यामुळे या गुहांच्या छिद्रांमध्ये सापांचे अस्तित्व आहे परंतु हे साप येणाऱ्या भाविकांना आजपर्यंत कधीही चावलेले नाही असे देखील सांगितले जाते. येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी सापांचे जर दर्शन झाले तर त्यांना परमेश्वरचा आशीर्वाद मिळाला. असा तेथील लोकांचा समज आहे. या मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वरचा विवाह सोहळा संपन्न केला जातो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, महाशिवरात्र, श्रावणी सोमवारी देखील या ठिकाणी यात्रा भरवल्या जातात.
मार्लेश्वर मंदिर भूगोल
नाव – | श्री. मार्लेश्वर |
जिल्हा – | रत्नागिरी |
तालुका – | संगमेश्वर |
गाव – | मारळ |
स्थान – | भगवान शंकर |
पंथ – | शैव पंथ |
स्थापना – | परशुराम |
उत्सव – | मकर संक्रांत,महाशिवरात्री, कोजागिरी पौर्णिमा, श्रावणी सोमवार |
मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या – | ४५० |
जवळील स्थळ – | धारेश्वर धबधबा |
धारेश्वर धबधब्याची उंची – | २०० फूट |
मार्लेश्वर मंदिराचा नकाशा
मार्लेश्वर नावाचा अर्थ
हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ बसलेले आहे. इथे एका निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे आहे.म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले असावे असे सांगितले जाते.
मार्लेश्वर मंदिराचे वर्णन
हे शिव मंदिर आहे. स्थानिक लोकांच्या मते, हे भगवान परशुराम यांनी स्थापन केले आहे. भगवान विष्णूंचा तो एक अवतार आहे. मंदिराचा गाभारा गुहेत असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच एक छोटीशी देवळी आहे. या देवळीमध्ये गणेशाची मूर्ती आहे. येथे येणारे भावीक प्रथम या गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन मग मार्लेश्वर चे दर्शन घेतात अशी प्रथा आहे या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन शिवपिंडी दिसून येतात एक मार्लेश्वर ची तर दुसरी मल्लिकार्जुन ची. मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते.
त्या मंदिराच्या आजूबाजूला कुठेही वीज वापरली जात नाही. प्रकाशासाठी ते समई आणि तेलाचे दिवे वापरतात. या मंद उजेडामुळे तेथील संपूर्ण परिसर, वातावरण सोनेरी पिवळे दिसून येते. या ठिकाणी इतर कोणतेही दिवे लावण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. खरोखर हा एक आगळा वेगळा अनुभव पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी या मंदिराला एकदा तरी भेट देणे निश्चितच फायद्याची ठरते.
मार्लेश्वर मंदिरातील साप
हे मंदिर एका गुहेमध्ये आहे. या गुहेमध्ये बऱ्याच प्रमाणात छोटी छोटी छिद्रे दिसून येतात. या छिद्रांमध्ये तसेच तेथील मंदिरात बरेच छोटे मोठे साप आहेत. येणाऱ्या भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेताना साप पाहिले तर त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो असा तेथील लोकांचा विश्वास आहे. आणखी एक आश्चर्य म्हणजे या मंदिराजवळ असणाऱ्या सापांनी आजपर्यंत कोणालाही कधीच इजा केलेली नाही.
मार्लेश्वर मंदिर परिसर
हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे या मंदिराकडे जाण्यासाठी साधारणपणे ४०० ते ४५० पायऱ्या चढून वर जावे लागते. या पायऱ्या चढून वर जात असताना आजूबाजूला अनेक दुकानांची रेलचेल दिसून येते. आपल्याला शीतपेय, खाण्याच्या वस्तू आणि इतर सामान या ठिकाणी मिळते. काही ठिकाणी पत्र्याच्या शेड उभारलेल्या असल्यामुळे आपल्याला उन्हापासून तसेच पावसाळ्यात पावसाळ्यापासून रक्षण होते. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपल्याला गुहेमध्ये श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घडते.
या मंदिरासमोर दीप माळावर तुळशी वृंदावन आहे. या ठिकाणी असणाऱ्या धारेश्वर नावाच्या धबधब्याच्या आवाजामुळे तेथील निरव शांततेमुळे आपले मन प्रसन्न होऊन जाते.तिथूनच पुढे काही पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर हा धबधबा आपल्याला दिसून येतो.
मार्लेश्वर मंदिर रत्नागिरीचे वर्णन (Marleshwar Mandir Ratnagiri)
गुहेच्या प्रवेशद्वाराशी गणेश मूर्ती व एक कुंड आहे. गुहेत समोरच थोड्या उंचीवर महादेवाची पिंडी असून सभोवती चांदीचा नाग आहे. पिंडीवर अभिषेकाची संततधार सुरू असते. बाजूलाच आणखी एक शिवलिंग आहे. या गुहेत बिळांमध्ये नेहमी सापांचे वास्तव्य असते.
मार्लेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये
मंदिरातील साप (MARLESHWAR TEMPLE SNAKES)
हे मंदिर डोंगराळ भागात एका गुहेमध्ये आहे. या गुहेमध्ये आजपर्यंत कोणत्याही प्रकारची वीज उपलब्ध झालेली नाही. म्हणजेच तेथे चालतही नाही. त्या ठिकाणी समई आणि निरांजने लावण्यात येतात. या गुहेमध्ये असलेल्या छिद्रांमध्ये सापांचे अस्तित्व दिसून येते. परंतु येणाऱ्या भाविकांना आजपर्यंत हे साप कधीही चावलेले नाहीत, असे त्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर पायऱ्या (Shri Kshetra Marleshwar Temple Steps)
श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर हे डोंगर टेकडीवर असून या मंदिरा पर्यन्त पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास ५० पायऱ्या चढून वर जावे लागते.
मार्लेश्वर मंदिराची व्यवस्था
मंदिर परिसर हा घनदाट जंगलात असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने करावयाच्या सोयींसाठी थोडेसे बाजूलाच राहिलेले आहे. पण येथील पर्यटकांचा वाढता ओघ यामुळे थोडा थोडा विकास होत आहे. लांजा येथील सहजीवन चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री दिलीपराव तुकाराम बाईंग यांनी अलीकडेच शौचालय यांची व्यवस्था करून दिली आहे.
गुहेपर्यंतच्या चढणीच्या वाटेवर गुहागर या ठिकाणचे साखरी गावचे भक्त श्री चंद्रकांत राव, आत्माराम पवार यांनी दगडी बाकांचे विसावे निर्माण केले. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी जो मार्लेश्वराचा विवाह सोहळा आणि यात्रा संपन्न केली जाते, त्यासाठी येणाऱ्या भाविकांना मार्लेश्वर सेवा संघाच्या वतीने औषध पाणी यांची व्यवस्था केली जाते. अंगीवलीचे श्री शशिकांत राव यांच्या पुढाकाराने विनामूल्य अन्नछत्र चालवले जाते.
मार्लेश्वर मंदिरातील पूजापाठ
मंदिराची दैनंदिन नित्य पूजा केली जाते. महादेवाला आवडणाऱ्या पांढऱ्या फुलांनी शिवपिंडी सजवल्या जातात. तसेच समई आणि निरांजने लावण्यात येतात. शिवपिंडीवर अभिषेकाची संततधार सुरू असते. या ठिकाणी इतर कोणत्याही प्रकारची वीज चालत नाही. प्रत्येक श्रावणी सोमवार कोजागिरी पौर्णिमा महाशिवरात्र आणि मकर संक्रांत, या दिवशी या ठिकाणी यात्राही भरलेल्या असतात.
मार्लेश्वर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क
मंदिरात जाण्यासाठी तुम्ही वर्षभरामध्ये कधीही जाऊ शकता, हे मंदिर वर्षभर चालू असते. त्याचप्रमाणे हे मंदिर सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात जाण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही, विनामूल्य प्रवेश दिला जातो.
मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा माहिती (MARLESHWAR WATERFALL INFORMATION IN MARATHI)
मंदिराजवळ आल्यानंतर थोडे खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आढळून येते. या ठिकाणी ओढ्याच्या पात्रातील मोठमोठ्या शिळावरून उड्या मारत आपल्याला या धबधब्याच्या जवळ जाता येते. सहस्त्र धारांनी खाली येणारा असा हा अद्भुत जलप्रवाह आहे. या जलप्रवाह, धबधब्यास “धारेश्वर” असे नाव आहे. जवळजवळ दोनशे फूट उंचीवरून पडणारा असा हा धबधबा आहे. या धबधब्याला मार्लेश्वर धबधबा असेही म्हणतात.
याच्या खाली असणाऱ्या डोहास “करंबेली डोह” असे म्हणतात. या डोहापलीकडे गेल्यानंतर आपण या प्रपाताखाली जाऊ शकतो. हा धबधबा पुढे बाव नदीला जाऊन मिळतो माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे खूप पवित्र समजले जाते. पावसाळ्यात येथे पाण्याला ओढ असल्याने हा धबधबा दुरूनच पहावा लागतो. पावसाळ्यात आजूबाजूला छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याने येथील असे हे मनोहरी दृश्य आपणास पहावयास मिळते. येथील हे मनोहरी दृश्य पाहिले की असे वाटते की शंकराच्या जटेतून गंगाच जणू कोसळत आहे.
धारेश्वर धबधबा येथे कधी जावे?
पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यात म्हणजेच जून आणि जुलै मध्ये या धबधब्याला भरपूर पाणी असते. त्यामुळे धबधब्याजवळ जाण्यास मनाई असते. ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसारल्यानंतर आपण तिथे जाऊ शकतो.
धारेश्वर धबधबा वैशिष्ट्ये
हिवाळ्यात प्रवाहाचा जोर कमी झाला की मग पायथ्याच्या डोहाच्या कडेने किंवा डोहातून पोहून धबधब्याच्या खाली जाऊन भिजण्याचा आनंद घेता येतो. आजूबाजूचे उंच कडे धबधब्याचा घन गंभीर आवाज व सूर्यकिरणामुळे पाण्याच्या तुषारावर दिसणारे इंद्रवज्र पाहून आपण जगाचे अस्तित्व विसरून जातो. बारमाही पाणी असणारा हा धबधबा पावसाळ्यात अतिशय वेगाने वाहतो. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध केलेले आहेत. कारण ते खूप धोकादायक आहे.
हा डोह पाण्याच्या जोरामुळे तयार झाला आहे. सततच्या या पाण्याच्या जोरामुळे दगड खणून खोल जागा तयार झाली असावी. तेथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही जागा इतकी खोल आहे की, आज पर्यंत कोणालाही याची खोली मोजता आलेली नाही.
आमचे हे लेख सुद्धा वाचा. 👇
मार्लेश्वर आणि मकर संक्रांत
मकर संक्रांत म्हणजे मंदिरातील उत्सवाचा दिवस. शिव शंकराच्या मंगल सोहळ्यास अफाट भावीक मार्लेश्वर मंदिराकडे येत असतात. येथे येणारे भावीक धारेश्वर धबधब्याखाली स्नान करून मग शिव चरणी गुहेत नतमस्तक होत असतात. यात्रेच्या दिवशी मात्र नेहमी दिसणारे साप या गुहा मंदिरात क्वचितच दिसून येतात. मकर संक्रांतीला प्रिय शिव शंभूचा विवाह सोहळा असतो. साखरपा गावच्या गिरजादेवीची वधू म्हणून निवड केलेली असते.
अनेक गावाहून देवदेवतांच्या पालख्या येथे येत असतात. आंगवली गावात मार्लेश्वर प्रथम प्रकट झाला म्हणून त्या गावच्या मंदिरातून चांदीचा मुकुट इथे आणला जातो. लांजा येथील रायपाटन चे स्वामी त्यावेळी येथे हजर असतात. मोठ्या थाटात आणि मंत्रांच्या घोषात हा मंगल सोहळा पार पडतो.
मार्लेश्वर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे? (How To Reach Marleshwar Temple)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या ठिकाणी या गावामध्ये हे मंदिर आहे. हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे आणि गावच्या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना खाजगी गाडीने येणे सोयीस्कर ठरते.
- १. विमान – जवळचे विमानतळ म्हणजे रत्नागिरी हे आहे. रत्नागिरी विमानतळापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी साधारणपणे 45 किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी तुम्ही कॅबने किंवा बसने येऊ शकता.
- २. ट्रेन – सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन हे संगमेश्वर आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत साधारण पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे. तेथून तुम्ही ऑटो किंवा कॅबने येऊ शकता.
- ३. बस – सर्वात जवळचे बस स्थानक देवरुख बस स्थानक आहे. देवरुख बस स्थानक पासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे. तसेच संगमेश्वर बस स्थानकापासून २३ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
- ४. खाजगी वाहने- हे मंदिर गावाच्या ठिकाणी तसेच डोंगराळ भागात असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना स्वतःच्या खाजगी गाडीने येणे सगळ्यात सोयीस्कर ठरते.
- पुणे ते मंदिर – २६२ किलोमीटर
- मुंबई ते मंदिर – २४० किलोमीटर
- लांजा ते मंदिर – ३१ किलोमीटर
- संगमेश्वर ते मंदिर – २३ किलोमीटर
- गणपतीपुळे ते मंदिर – ५० किलोमीटर
मार्लेश्वर धबधबा ट्रेक (MARLESHWAR TREK)
- जरी हे ठिकाण शिवशंकराचे धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असले, तरीही हौशी ट्रेकर्स साठी ही जागा म्हणजे जणू स्वर्गच आहे.
- सह्याद्रीच्या हिरवाईने नटलेल्या उंच उंच पर्वत रांगा आणि विलोभनीय असा कोसळणारा धारेश्वर जलप्रपात यांनी वेढलेले हे मंदिर ट्रेकिंग साठी अत्युत्कृष्ट ठिकाण आहे.
- मार्लेश्वर च्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे आणि सुंदर अशा डोंगरपट्ट्यांमुळे निसर्ग प्रेमींसाठी हे आवडीचे ठिकाण आहे
- हा ट्रेक चिपळूण मधून सुरू करता येतो. चिपळूण मधून मार्लेश्वर येथे जाण्यासाठी चिपळूण मधून चांदोली जंगल आणि नंतर मारलेश्वर असा तीन दिवसाचा ट्रेक करता येतो.
- हा एक दिवशी ट्रेक नसल्यामुळे, आपल्याला वेळ काढून ट्रेकिंगला जावे लागते.
- पहिल्या दिवशी रामगड, मग भैरवगड आणि पाथरपंज येथे मुक्काम करू शकतो
- दुसऱ्या दिवशी चांदोलीच्या घनदाट जंगलातून प्रवास करत ट्रेकर्स ना प्रचित गडावर पोहोचता येते.
- तिसऱ्या दिवशीचा ट्रेक हा कुंडी गाव त्यानंतर महिमा गड आणि शेवटचे ठिकाण मार्लेश्वर धबधबा असे करता येते.
- एखाद्या गावात आपल्याला मुक्काम वाढवण्याची वेळ आली, अन्यथा पाऊस किंवा इतर गोष्टीमुळे जर ट्रेकिंग करता आले नाही, तर ट्रेकिंगचे दिवस चार ते पाच सुद्धा होऊ शकतात.
- हौशी पर्यटक हा थरारक ट्रेक अनुभवण्यासाठी येथे हमखास भेट देतात
मार्लेश्वर मंदिर येथे घ्यावयाची काळजी
- या देवस्थानात जाण्यासाठी तेथील रस्ते हे खूपच अरुंद आणि खडबडीत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणे.
- मंदिर हे डोंगराळ भागात असल्यामुळे साधारणपणे साडेपाच सहा वाजेपर्यंत तेथून निघणे योग्य ठरते. कारण या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही.
- देवाचे दर्शन घेण्याआधी आपली राहण्याची व्यवस्था करावी लागते कारण या ठिकाणी कोणतेही हॉटेल्स उपलब्ध नाहीत.
- मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाताना संध्याकाळी योग्य वेळेत परत यावे लागते. कारण हा जंगलाचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही घर किंवा गॅरेज नाही. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तेथून लवकर निघणे सोयीस्कर ठरते.
- हा परिसर डोंगराळ तसेच जंगलाचा असल्यामुळे या ठिकाणी जंगली जनावरांचा तसेच सापाचा (MARLESHWAR TEMPLE SNAKES) प्रादुर्भाव आढळतो. यामुळे तेथे फिरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
मार्लेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे – 15 PLACES TO VISIT NEAR MARLESHWAR
०१) गणपतीपुळे
साधारणतः ७० किलोमीटर अंतरावर असलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि श्री गणेश मंदिर हे पर्यटकांचे आणि भाविकांचे आवडीचे पर्यटन क्षेत्र आहे. दोन-तीन दिवसाच्या मुक्कामात येथे एकदा तरी नक्कीच भेट द्यावी
०२) संगमेश्वर मंदिर
जवळपास ४० किलोमीटर अंतरावर असलेले संगमेश्वर मंदिर हे सुद्धा शिवशंकराचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. आपण याच रस्त्याने जात असेल तर हे मंदिर सुद्धा नक्की पाहून घ्या
०३) रत्नागिरी
रत्नागिरी शहर ६३ किलोमीटरवर असून येथे बऱ्यापैकी पर्यटनासाठी प्रसिद्ध अशी ठिकाणे आहेत.
०४) आरे-वारे बीच
मंदिरापासून जवळपास ७२ किलोमीटर अंतरावर आरे वारे समुद्रकिनारा आहे. सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची अलोट गर्दी असते.
०५) पतीत पावन मंदिर
जवळपास ६५ किलोमीटर अंतरावर श्री सावरकरांचे पतीत पावन मंदिर आहे.
०६) गोवळकोट किल्ला
जवळपास ८८ किलोमीटर अंतरावर असलेला गोवळकोट किल्ला हा चीपळूण येथे आहे. मुंबईहून मारलेश्वर ला येताना मध्ये वाटेत त्या किल्ल्यावर जाता येते.
०७) श्री परशुराम मंदिर
९४ किलोमीटर अंतरावर असलेले हे चिपळूण मधील परशुरामाचे मंदिर महेंद्र पर्वतावर आहे.
०८) देवळे धबधबा
३१ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा हे एक आकर्षण केंद्र आहे.
०९) मालगुंड
मंदिरापासून ५९ किलोमीटर अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा रत्नागिरी चिपळूण जवळील पर्यटकांना आवडीचा आहे.
१०) पावस
समुद्रकिनारी वसलेले पावस हे अतिशय विलोभनीय या गाव जवळपास ५० किलोमीटरवर आहे
११) जयगड किल्ला
इतिहासाची साक्ष देणारा जयगड किल्ला या मंदिरापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे
१२) केरळे धबधबा
साधारणतः अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर, तीस किलोमीटर असलेला केरले धबधबा येथील पर्यटकांसाठी नेहमीच आवडीचा ठरत आहे
१३) सवतसडा धबधबा
हा धबधबा या मंदिरापासून जवळपास ५८ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे
१४) नागेश्वर मंदिर
मंदिराच्या जवळ असलेले शिवशंकराचे आणखी एक ठिकाण – श्री नागेश्वर मंदिर हे २४ किलोमीटर अंतरावर
१५) मनोली धबधबा
मनोली हा अजून एक सुंदर धबधबा जवळपास १६ किलोमीटर अंतरावर आहे
मार्लेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स
हे मंदिर साधारणपणे डोंगराळ भागात असल्यामुळे दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर काही हॉटेल्स उपलब्ध आहेत.
- हॉटेल प्राइड रेसिडेन्सी
- ऑनेस्ट लक्झरी होम्स स्टे
- सनशाईन्स स्टे
- द जंगल रिसॉर्ट
- रिव्हर साईड कंट्री रिसॉर्ट
मार्लेश्वर मंदिराजवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते आणि रत्नागिरी जिल्हा हा कोकणात येतो. कोकण हे जसे स्वच्छ, सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, कौलारू घरे, तसेच मातीचे रस्ते आणि हिरवागार निसर्ग यासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे ते खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोदक भाजणीचे वडे, घावन रस, आंबापोळी, फणसपोळी, कोकम, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, आंब्याचे लोणचे, त्याचप्रमाणे रत्नागिरी हापूस आंबा, फणस, करवंदे यासारखा रानमेवा आणि खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत.
मार्लेश्वर कथा
आकाश दर्शन परमेश्वरा, गिरी दर्शन मार्लेश्वर I
गिरीचे मस्तकी गंगा, मार्लेश्वरी असती गिरी गंगा II
या ठिकाणची दंतकथा थोडी वेगळीच आहे. भगवान श्री परशुरामानेच देवरुखचा वाडेश्वर, संगमेश्वरचा कर्णेश्वर आणि मारळचा मार्लेश्वर यांची स्थापना केली असे मानले जाते. शिलाहारवंशीय राजांच्या राजवटीला उतरती कळा लागली होती. पैसा, धनदौलत, जहागीरी, सरदारकी मिळवताना काहीही करण्याची त्यांची तयारी होती. त्यासाठी रक्ताची नाती विसरून उपकारकर्त्यांचा गळा घोटण्यापर्यंत त्यांची मजली गेली होती. त्यामुळे रागाने हे देऊळ सोडून कडेकपाऱ्यांमध्ये जाऊन राहण्याचा मार्लेश्वर यांनी निश्चय केला.
गावाबाहेर एका झोपडीत आपले काम करीत परंतु परमेश्वराचे नामस्मरण करत असलेला एक चांभार त्याच्या दृष्टीस पडला. त्यांनी आपला दिव्याचा कंदील घेऊन अंधारात ठेचकाळत जाणाऱ्या वाटसरुला वाट दाखवली. मुखी शिवनाम घेत असणाऱ्या चांभाराला मार्लेश्वराने गुहेशी आल्यावर निरोप दिला. रात्री परत तो चांभार घरी येऊन झोपला दुसऱ्या दिवशी देवळातून देव नाहीसा झाल्याचा बोभाटा त्याच्याही कानावर आला.
आपण अत्याचाराला कंटाळून मंदिर सोडून सह्याद्रीत कडे कपारीत गेलो आहोत, अशा प्रकारचे स्वप्न त्या चांभाराला पडले. लोकांनी मार्लेश्वराचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु देव काही सापडला नाही. पुढे या गावावर अनेक संकटे अडचणी कोसळल्या. रोगराई, परक्या जुलमी आक्रमकांची आक्रमणे असे बरेच काही घडून गेले. पुढे स्थानिक लोकांनी एकत्र येऊन येथील आक्रमकांना पळवून लावले.
क्षत्रियांनी आपले काम केले, त्यानंतर ब्राह्मणांनी या उध्वस्त गावांना धार्मिक आचरणाचे धडे दिले. ज्या परिसरात हे युद्ध घडले गेले, त्या जागेला “मारल” हे नाव मिळाले. इसवी सन १८०० च्या सुमारास अंगिवली चे सरदार अणेराव साळुंखे एका शिकारीचा पाठलाग करीत घोर अरण्यात गेले. एका लहान गुहेच्या तोंडातून श्वापद आत मध्ये गेले, तेवढ्यात वरून दगड पडून हे गुहेचे दार बंद झाले. सरदार अणेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील दगड माती बाजूला केली. पुढे जाऊन त्यांना आतमध्ये श्री शंभू महादेवांचे दर्शन झाले. हाच तो आपला मार्लेश्वर हे त्यांनी ओळखले, आणि मार्लेश्वराचा जयजयकार त्यांनी सुरू केला.
तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. पुढे भगवान परशुरामांनी या मार्लेश्वराची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते. महादेवाच्या पुनर्भेटीचा हा सोहळा या भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.
श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे राबवले जाणारे उत्सव
- कोजागिरी पौर्णिमा
- मकर संक्रांत
- महाशिवरात्र
- श्रावणी सोमवार
FAQ
मार्लेश्वर मंदिराला जाण्यासाठी किती पायऱ्या चढाव्या लागतात?
मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे ४०० ते ४५० पायऱ्या चढाव्या लागतात
मार्लेश्वर मंदिर कोठे आहे?
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावात मार्लेश्वर मंदिर आहे.
मार्लेश्वर मंदिराची स्थापना कोणी केली?
मंदिराची स्थापना भगवान परशुराम यांनी केली.
मार्लेश्वर मंदिराच्या जवळ असणारा धबधबा कोणता ?
मार्लेश्वर मंदिराच्या जवळ असणारा धबधबा हा धारेश्वर म्हणून ओळखला जातो. याला MARLESHWAR WATERFALL असेही म्हणतात .
मार्लेश्वर मंदिराच्या जवळ असणारा हा धारेश्वर धबधबा किती उंचीवरून खाली कोसळतो ?
मार्लेश्वर मंदिराच्या जवळ असणारा हा धारेश्वर धबधबा दोनशे फूट अंतरावरून खाली कोसळतो.
मार्लेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे?
मार्लेश्वर मंदिर हे गुहेत असल्यामुळे या गुहेच्या छिद्रांमध्ये सापांचे अस्तित्व आहे. येणाऱ्या भाविकांना हे साप आजपर्यंत कधीही चावलेले नाहीत.
निष्कर्ष
मित्रांनो,
मार्लेश्वर मंदिरा बाबतचा इतिहास आणि याची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आमचा MARLESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही चुका असतील तर त्याही आम्हाला कळवा, आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहिती द्वारे.
नमस्कार.
संदर्भ
मार्लेश्वर मंदिर – एक गूढरम्य तीर्थस्थान