KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE : कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी

KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE : कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने जाताना पनवेल पासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर लक्ष वेधून घेणाऱ्या, अंगठ्याच्या आकारासारखा गगनाला भिडलेला सुळका म्हणजे कर्नाळा किल्ला. कर्नाळा हा रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक किल्ला, पनवेल शहरापासून साधारणतः ११ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कर्नाळा इथे असलेल्या पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

आम्ही आमच्या – कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी या आजच्या लेखातून कर्नाळा किल्ला, कर्नाळा ट्रेक, कर्नाळा पक्षी अभयारण्य याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. तरी हा लेख तुम्ही नक्की वाचा.

KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

Table of Contents

KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE : कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी

किल्ल्याचे नाव कर्नाळा किल्ला
तालुका पनवेल
जिल्हा रायगड
पनवेल पासून अंतर 12 किलोमीटर
बांधकाम 1400 वर्षापूर्वी
कोणी बांधला देवगिरी यादव (1248–1318) आणि तुघलक शासक (1318–1347)
प्रकार गिरीदुर्ग
जवळचे गावशिरढोण
डोंगररांगसह्याद्री

कर्नाळा किल्ल्याचा नकाशा

कर्नाळा किल्ल्याची रचना

कर्नाळा हे सलग पठार नसून दोन-तीन टेकड्या मध्ये असलेला, दुरूनही लक्ष वेधून घेणार अंगठ्यासारखा सुळका आहे. याच्याभोवती आधारभिंती बांधून हा किल्ला उभारला गेला. या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी अनेक राजघराण्यांमध्ये झालेल्या लढाया, पुरंदरचा तह आणि त्यानंतर मराठ्यांचा पराक्रम अशा अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ला होय. सोबत आणि सुंदर घनदाट जंगल. त्याच्यामध्ये साधारणतः दीडशेच्या आसपास स्थानिक पक्षी आहेत. स्थानिक पक्षी आणि वेगवेगळ्या ऋतूत स्थलांतर करणारे पक्षी या सर्वांनी मिळून बनलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ला हा प्राचीन कालखंडापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. यादव काळात सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. इसवीसन १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये आणला. पुढे पुरंदराच्या तहानंतर हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. परत पुन्हा हा किल्ला १६७० मध्ये मराठा साम्राज्यामध्ये मराठ्यांनी आणला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांच्या आजोबांनी कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी सांभाळली होती.

KARNALA FORT INFORMATION
कर्नाळा किल्ला संपूर्ण माहिती मराठी

पुरंदरचा तह आणि कर्नाळा किल्ला युद्ध

छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजा जयसिंग यांच्यामध्ये इसवी सन १६६५ मध्ये एक तह झाला होता. तो तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार शिवाजीराजांनी स्वराज्यातील २३ किल्ले मोघलांना दिले होते. शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या कैदेतून यशस्वी पलायन केल्यानंतर १-१.५ वर्षांनंतर पुरंदरचा तह मोडून मुघलांकडे गेलेले २३ किल्ले परत घेण्याचा सपाटा लावला. या मोहिमेचा श्री गणेशा म्हणून स्वतःचे प्राण देऊन तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला होता.

शिवाजी राजांचे जिगरबाज मावळे एकेक किल्ला स्वराज्यात आणत होते. शिवाजीराजांनी आपल्या मावळ्यांना किल्ले कर्नाळा जिंकून घेण्याचा आदेश दिला. रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळचा किल्ले कर्नाळा घेण्यासाठी मराठी निघाले. दिवस पावसाचे होते. ऐन कोकणातला मुसळधार कोसळणारा पाऊस आणि अशा पावसात एखादा किल्ला चढाई करून जिंकणे किंवा वेढा घालून कर्नाळा किल्ला जिंकणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. राजांनी आज्ञा करावी आणि आपण उडी घ्यावी ही एकच गोष्ट मावळ्यांना ठाऊक होती.

कर्नाळा किल्ला हा घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने तो सहज जिंकता येणारा नव्हता. गडाच्या सर्व वाटा मराठ्यांनी रोखल्या. मोर्चे लावले, गडाची उत्तम प्रकारे नाकेबंदी केली. मराठ्यांनी गडाला वेढा टाकल्याची खबर मुघल किल्लेदाराला लागली, तो किल्लेदार तरीही निर्धास्त होता . कारण ह्या भयंकर कोसळणाऱ्या पावसात मराठ्यांचा वेढा जास्त दिवस टिकणार नाही, याची त्याला खात्री होती. जर समजा चुकून मराठे वर आलेच, तर त्यांच्याशी लढण्यासाठी आवश्यक ती तयारी तो करून होता. गडाच्या पायथ्याशी मराठा पावसाचे येणारे लोंढे आणि गडावरून होणाऱ्या बंदुकीचा मारा चुकवण्यासाठी काय करावे या विचारात होते.

विचार करत असताना मावळ्यांना एक अफलातून युक्ती सुचली. पाऊस पडत असल्याने चिखलाला तोटा नव्हता. लाकडी फळ्या व चिखलांच्या भिंती उभ्या करून त्याचा संरक्षक ढालीसारखा वापर करत मराठे हळूहळू वर सरकू लागले. गडावर चढताना, गडावरून बंदुकीच्या गोळ्यांचा मारा मराठ्यांवर सुरू झाला. पण लाकडी फळ्या व चिखलांच्या भिंती मावळ्यांना वाचवत होत्या. आपले काम चोख पार पाडत होत्या. या जीवघेण्या कसरती करत मावळ्यांनी ताटावरून आत, गडात प्रवेश केला.

 हर हर महादेव अशा गर्जना करत ते मोघलांवर तुटून पडले. काही मावळ्यांनी गडाचा दरवाजा आतून उघडला, आणि त्या दरवाजांनी आणखी काही मावळे आत घुसले. मावळ्यांचा जोश आणि आवेश एवढा होता की ह्या मावळ्यांना रोखणे किल्लेदाराला शक्य नव्हते. त्या साऱ्या मुघल सैनिकांनी मावळ्यांपुढे नांगी टाकली. मावळ्यांपुढे किल्लेदाराने सपशेल शरणागती पत्करून गडाचा ताबा मावळ्यांकडे दिला. दिनांक २२ जून १६७० रोजी कर्नाळा किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकला.

KARNALA FORT INFORMATION
KARNALA FORT INFORMATION IN MARATHI

मुख्य शहर ते कर्नाळा अंतर

 • मुंबई ते कर्नाळा अंतर आणि लागणारा कालावधी –

मुंबई ते कर्नाळा हे साधारणतः ६० किलोमीटर एवढे अंतर असून प्रवासासाठी १.५ तास लागू शकता.

 • पुणे ते मुख्य शहर अंतर आणि लागणारा कालावधी –

पुणे ते कर्नाळा हे अंतर साधारणतः ११९ किलोमीटर एवढे असून प्रवासासाठी २ तास लागू शकतात.

कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी कालावधी

कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला व कर्नाळा जवळील इतर प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात.

आमचा हे लेख देखील नक्की वाचा.👇

कर्नाळा जवळील १५ प्रेक्षणीय स्थळे (15 places to visit near karnala fort)

०१) कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील प्रमुख डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावर आपण ट्रेकिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. कर्नाळा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग जरी सोपा असला तरी त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तब्बल २ तास इतका वेळ लागतो. या किल्ल्यावर आपल्याला किल्ल्याच्या भिंती दरवाजावरील पार्शियन, मराठी आणि मुघल काळातील सुंदर शिलालेख पाहायला मिळतील. कर्नाळा हा किल्ला महाराष्ट्राचा रायगड या जिल्ह्यातील पनवेल शहरापासून मात्र १२ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

०२) आपटा धबधबा

मुख्य ठिकाणापासून ०९ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा पावसाळी दिवसात पर्यटकांची पसंत ठरत आहे.

०३) राणसाई धरण

कर्नाळा वरून या ठिकाणी जाण्यासाठी साधारणपणे एक एकोणीस किलोमीटरचे अंतर असून जवळपास ३० मिनिटांचा कालावधी लागतो. मित्र किंवा कुटुंबियांसोबत इथे संध्याकाळ घालवणे छान वाटते

०४) राणसाई धबधबा

कर्नाळा वरून या जागी जाण्यास अर्ध तास लागू शकतो. हो छोटासा धबधबा असून याचे पाणी हंगामी असते

०५) आडई धबधबा

हा मुख्य गावाच्या जवळच असलेला लहान धबधबा असून याचे पाणी पावसाळ्यातच असते.

०६) सांगुरली धबधबा

सांगुरली वॉटरफॉल हा कर्नाळापासून जवळपास ११ किलोमीटरच्या अंतरावर असून हा सुद्धा एक छोटा जलप्रपात आहे

०७) अक्कादेवी धरण

कर्नाळा वरून या ठिकाणी जाण्यासाठी साधारणपणे १४ किलोमीटरचे अंतर असून अर्ध्या तासाचा कालावधी लागतो.

०८) मोरबे धरण

हे धरण गावापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे. पावसात तुडुंब भरलेल्या धरणाला नक्कीच भेट द्या

 शिवगंगा वाटर पार्क

०९) शिवगंगा वाटर पार्क

शिवगंगा वाटर पार्क मुंबई उपनगरातील एक सुंदर ठिकाण आहे. हे कर्नाळापासून काही अंतरावर स्थित आहे. या वाटर पार्कमध्ये आपण टिप्स लाईट्स, फॅमिली स्लाइट्स आणि रेन डान्स यासारखे विविध मनोरंजनक्रिया कल्पनांचा आनंद घेऊ शकतो. त्याचबरोबर या पार्कमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची जागाही उपलब्ध आहे.

१०) श्री स्वामी समर्थ मठ

श्री स्वामी समर्थ मठ हे कर्नाळा जवळील एक धार्मिक ठिकाण आहे. या मठांमध्ये असणारे शांत आणि सुंदर वातावरण पाहून मन अगदी शत होऊन जाते. श्री स्वामी समर्थ मठ शांततापूर्ण ठिकाण आहे. महाराष्ट्रातील बरेच भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या मठाची स्थापना ही इसवी सन १९७८ मध्ये झाली.

११) माथेरान हिल स्टेशन

माथेरान हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे. जे समुद्रसपाटीपासून साधारण २६०० फुट  इतक्या उंचीवर वसलेले आहे. विकेंडला मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.

१२) विसावा एडवेंचर पार्क

विसावा एडवेंचर पार्क उन्हाळ्यात कुटुंबासमवेत आणि मित्रांबरोबर भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. निसर्ग सौंदर्याने भरून गेलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळ हे सुंदर ठिकाण वसलेले आहे. या पार्कमध्ये आपण वॉटर स्लाइड्स, रोमांचकारी साहसी खेळांचा आनंद घेऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी राहण्यासाठी रो हाऊस, लाकडी कॉटेज, आणि व्हीलांची सुविधाही उपलब्ध आहे.

 १३) गाडेश्वर तलाव

गाडेश्वर तलाव एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. माथेरानच्या लोकप्रिय पॉइंटवरून हा तलाव आपल्याला नजरेस पडतो. गाडेश्वर या धरणावर जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही. परंतु दुसऱ्या बाजूने आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छ आणि सुंदर खडकावर बसून आपण येथील आकर्षक वातावरणाचा आनंद घेऊ शकतो.

१४) प्रबळगड किल्ला

प्रबळगड किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक किल्ला आहे. जो माथेरान आणि पनवेल दरम्यान २३०० फूट इतक्या उंचीवर वसलेला आहे. माथेरान जवळील एका खडकाळ पठाराच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. या किल्ल्याला कलावंतीणदुर्ग असेही म्हटले जाते. ट्रेकर्सच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी हा किल्ला कठीण स्वरूपाचा समजला जातो. ट्रेकिंग साठी बरेच पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात.

१५) बल्लाळेश्वर मंदिर

बल्लाळेश्वर मंदिर हिंदूंचे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे. ज्याचे नाव त्यांचा भक्त बल्लाळेश्वरच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या मंदिरामध्ये त्यांची मूर्ती देखील आहे. बल्लाळेश्वर या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. दररोज उगवणारी सूर्याची पहिली किरणे मूर्तीच्या थेट मुखावर पडतात. त्याचबरोबर मंदिराच्या जवळच एक सुंदर आणि आकर्षक तलाव आहे. त्या ठिकाणी आपण चालत जाऊ शकतो. होळी, श्रावण महिन्यात या मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते.

कर्नाळा पक्षी अभयारण्य माहिती मराठी KARNALA BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

 KARNALA BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
कर्नाळा पक्षी अभयारण्य

कर्नाळा पक्षी अभयारण्य (karnala bird sanctuary) हे पनवेल शहरात जवळील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. हे अभयारण्य मुंबई पुणे या महामार्गाच्या अगदी जवळ आहे. वनस्पती, प्राणी आणि पक्षांची जैवविविधता या अभयारण्याला लाभलेली आहे. सुरुवातीला हे अभयारण्य ४.४५ चौरस किलोमीटर परिसरात होते. नंतर २००३ मध्ये याचे क्षेत्र वाढवून १२.११ चौरस किलोमीटर करण्यात आले. या अभयारण्यामध्ये आपण मलबार, सनबर्ड असे अनेक प्रकारचे सुंदर पक्षी पाहू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरवळ असल्याने शहरातील इतर भागाच्या तुलनेत या ठिकाणी कमी तापमान आढळते.

कर्नाळा किल्ल्या जवळून दिसणारी प्रेक्षणीय किल्ले

 • प्रबळगड किल्ला
 • माणिकगड
 • हाजी मलंग
 • चंदेरी किल्ला
 • माथेरान
 • साक्षी किल्ला
 • द्रोणागिरी किल्ला
 • राजमाची किल्ला

कर्नाळामध्ये करण्यासारख्या गोष्टी

कर्नाळा हे ठिकाण एक प्रसिद्ध लोकप्रिय ट्रेकिंग तसेच अभयारण्यासाठी प्रसिद्ध असल्याकारणाने या ठिकाणी तुम्ही विविध ऍक्टिव्हिटीज करू शकता –

 • १. कर्नाळा किल्ला ट्रेक
 • २. पक्षी निरीक्षण
 • ३.  मित्रपरिवार/फॅमिली पिकनिक
 • ४. निसर्गरम्य वातावरणामध्ये फोटोशूट किंवा प्री-वेडिंग शूट
 • ५. दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण
 • ६. मजेशीर व साहसी ऍक्टिव्हिटीज
 • ७. धबधब्यांना व्हिजिट

कर्नाळा किल्ला ट्रेक

कर्नाळा हा किल्ला पनवेल मध्ये असून, मुंबई गोवा हायवे या मार्गावर स्थित आहे. मुंबईपासून या किल्ल्याला येण्यासाठी साधारणतः तुम्हाला ६० किलोमीटर अंतर पार करावे लागते. आजच्या काळात हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ तसेच हायकिंग/ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बरेच पर्यटक कर्नाळा किल्ला ट्रेक साठी येतात. या किल्ल्याची अंदाजे उंची ही १६०० फूट इतकी असून, ट्रेक प्रथमच करणाऱ्या ट्रेकर प्रेमींसाठी हा ट्रेक सोपा आहे.

तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा फॅमिली सोबत सुद्धा हिरवागार व निसर्गाच्या सानिध्यात वेढलेल्या कर्नाळा किल्ला ट्रेक करू शकता. व या ठिकाणी कर्नाळा पक्षी अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी जागोजागी फलक लावल्यामुळे तुम्हाला ट्रेक करताना चुकण्याची भीती नाही.

KARNALA BIRD SANCTUARY
KARNALA BIRD SANCTUARY

कर्नाळा किल्ला ट्रेकसाठी सर्वोत्तम महिना

 • कर्नाळा हे एक सुंदर पक्षी अभयारण्य असल्यामुळे या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी सर्वात उत्तम महिना असेल तर तो म्हणजे मान्सून महिना. अर्थात पावसाळ्याच्या काळात यावेळी तुम्हाला पॅराडाईज फ्लायकॅचर, रॉबिन आणि मलबार स्टर्लिंग बर्ड इत्यादी वेगवेगळ्या जमातीचे पक्षी पाहायला मिळतील. आजूबाजूच्या हिरवळीमुळे व आल्हादायक वातावरणामुळे तुमचा ट्रेक अगदी सुखकर व अविस्मरणीय होईल.
 • मित्रहो जर तुम्हाला मायग्रेटरी बर्ड्स म्हणजेच स्थलांतरीत पक्षी पहायचे असल्यास हंगामाच्या वेळी या किल्ल्यातील अभयारण्यामध्ये तुम्ही पाहू शकता. यासाठी सर्वोत्तम हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च हा आहे.

कर्नाळा किल्ला ट्रेकची पूर्व माहिती

 • कर्नाळा गडाच्या पायथ्यापासून कर्नाळा गडाच्या माथापर्यंत जाण्यासाठी साधारणतः तुम्हाला दोन तासाचा ट्रेक करावा लागतो.
 • कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये प्रवेश करता त्या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे मार्ग दिसतात. एक मार्ग हा कर्नाळा जंगलामध्ये तर दुसरा मार्ग हा कर्नाळा किल्ल्याच्या टेकड्यांपर्यंत जातो. कर्नाळा किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी जंगलामधून सरळ व योग्य फलक लावलेला रस्ता जातो. त्या रस्त्यावरुन तुम्ही कर्नाळा किल्ल्याचा ट्रेक हा अगदी सोप्या रीतीने पूर्ण करू शकता.
 • प्रत्यक्षात पहायला गेले तर कर्नाळा हा किल्ला २ किल्ल्यांमध्ये विभागला असून, एक जास्त उंचीचा किल्ला व एक कमी उंचीचा किल्ला यामध्ये विभागणी केलेली आहे. उंच असणाऱ्या किल्ल्याची उंची ही साधारणतः १२५ फूट एवढी असून याला पांडूचा टॉवर म्हणून ओळखले जाते. या टॉवरची रचना ही किल्ल्याची टेहाळणी करण्यासाठी केली होती.
 • किल्ल्यावर सुंदर पाण्याची टाकी आहे व किल्ल्याच्या पायथ्याशी कर्नाळा देवीचे छोटे मंदिर देखील आहे.

कर्नाळा किल्ला ट्रेकसाठी टिप्स

 • स्वतःसोबत खाण्यापिण्याची व्यवस्था असावी.
 • ट्रेकिंग करतेवेळी योग्य त्या व पकड मजबूत असणाऱ्या बुटांचा वापर करावा.
 • हवामानाचा अंदाज घेत ट्रेकिंग साठी जावे.
 • ट्रेकिंग करताना कधीही एकट्याने ट्रेकिंग करू नये.
 • सोबत ओळखीचा पुरावा तसेच, एक शिट्टी ठेवावी. जेणेकरून तुम्ही ट्रेकिंग करताना हरवल्यास तुमच्या इतर साथीदारांना तुमच्यापर्यंत बोलवण्यास मदत होईल.
 • ट्रेकिंग करतेवेळी योग्यत्या कपड्यांचा वापर करावा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.
 • प्राथमिक उपचारासाठी सोबत फर्स्ट एड किट्स ठेवावे.

कर्नाळा ट्रेक करतेवेळी सोबत घ्यावयाच्या वस्तू

 • चार ते पाच लिटर पाणी स्वतःसोबत ठेवावे.
 • चांगली टॉर्च व ज्यादा बॅटरी सोबत ठेवावी.
 • काजू,बदाम इत्यादी ड्रायफ्रूट्स व सुका नाष्टा सोबत ठेवावा.
 • ज्यादा बुटांचे तसेच, कपड्यांचे जोड सोबत ठेवावे.
 • साखर, ओआरएस, एनर्जी लिक्विड सोबत ठेवावे.
 • सनस्क्रीन ठेवावे.
 • सूर्यप्रकाशापासून बचावासाठी टोपीचा वापर करावा.
 • स्वतःच्या ओळखीचा पुरावा सोबत ठेवावा.
 • स्वतःच्या काही वैयक्तिक मेडिसिन चालू असतील, तर त्यासोबत ठेवाव्यात .

कर्नाळा किल्ला ट्रेक मार्ग व त्याची अडचण पातळी

 • कर्नाळा किल्ला ट्रेक हा तितकासा कठीण नाही. कारण ट्रेकिंगच्या पायवाटा योग्य त्या रित्या चिन्हांकित केलेल्या आहेत.
 • उन्हाळ्याच्या काळात जर तुम्ही ट्रेकिंगचा विचार करत असाल तर थोड्याफार प्रमाणात थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या काळात ट्रेकिंग करणे सर्वोत्तम राहील.
 • कर्नाळा किल्ला ट्रेकसाठी पायथ्यापासून दोन वाटा जातात. ज्यामधली जी दुसरी वाट आहे ती थोडी अवघड असून, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे चिन्हांकित मार्ग नाही. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेली नियमित चिन्हांकित वाटच निवडावी.

कर्नाळा ट्रेक व ट्रेल्स नियम

 • स्वतःच्या ओळखीचा एकतरी पुरावा तुमच्या संपूर्ण पत्ता सोबत स्वतः सोबत ठेवावा.
 • किल्ल्यावरील कोणत्याही प्रकारच्या ऐतिहासिक नैसर्गिक वस्तूंची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • प्लास्टिक बॉटल्स तसेच कचरा व खाल्लेल्या वस्तूंचे रॅपर्स पर्यावरणात टाकू नये.
 • गावातील स्थानिक लोक किल्ल्यातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करत असल्याकारणाने किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत अथवा तलावामध्ये पोहण्यास परवानगी नाही.
 • ट्रेकिंग करतेवेळी जास्त किमतीच्या वस्तू व ज्वेलरीचा वापर करू नये.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

निसर्गाचं वरहस्त लाभलेलं घनदाट वनराजाने नटलेल्या या सुंदर परिसराला, शासनाने १९६८ मध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं. या अभयारण्यामध्ये आपल्याला दोन प्रकारची वने आढळतात एक म्हणजे दमट मिश्र पानझडी वने व सदाहरित नदीकाठची वने. या वनांमध्ये विविध प्रकारचे वृक्ष प्रजाती, वेली औषधी व दुर्मिळ प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य माहिती मराठी
कर्नाळा पक्षी अभयारण्य माहिती मराठी

कर्नाळा दीडशेहून अधिक पक्षांची संख्या असलेले ठिकाण आहे. सुंदर निसर्गरम्य हिरव्या पायवाटा, पक्षांचे किलबिलाट करणारे आवाज, अधून मधून मन मोहून टाकणारे धबधबे व बरेच काही एक्सप्लोर करण्यासारखे स्थळ, जे पृथ्वीवरील एक स्वर्गीय नंदनवनच आहे. हे अभयारण्य सध्या वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे संरक्षित आहे. या ठिकाणी सर्वात सुंदर व दुर्मिळ स्थलांतरित पक्षी तसे दुर्मिळ स्वदेशी पक्षांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे.

या अभयारण्याचे क्षेत्रफळ हे साधारणतः १२ ते १३ चौरस किलोमीटर एवढे विशाल असून, या ठिकाणी तुम्हाला पक्षी निरीक्षणाचा एक वेगळाच अनुभव घेता येईल. अभयारण्यामध्ये बायसन, हरिण, हत्ती, फेरेट्स, कोल्हे, ससे, असे बरेच वन्य प्राण्यांच्या व्यतिरिक्त १५० पक्ष्यांच्या निरनिराळ्या प्रजाती आढळतात. पावसाच्या काळात तर या ठिकाणी वातावरण हे अल्हादायक व पक्षांच्या किलबिलाटाने गुंजून गेलेले असते. कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये ऋतूप्रमाणे पक्षांचा किलबिलाट व पक्ष्यांचे प्रकार पाहायला मिळतात.

कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी योग्य ऋतु

 • पावसाळा –पावसाच्या काळात या ठिकाणी पॅराडाईज फ्लायकॅचर, मोर किंवा मॅप रॉबिन आणि मलबार विसलिंग बर्ड हे सर्वात मधुर पक्षी आढळतात .
 • हिवाळा –हिवाळ्याच्या काळात स्थलांतरित पक्षी या अभयारण्यामध्ये आढळून येतात यामध्ये ब्ल्यू हेडेड रॉक थ्रस्ट्, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर, कोकीळ व इतर बऱ्याच अनेक पक्षांचा समावेश आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य बद्दल पूर्व माहिती

 • अभयारण्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर योग्यत्या अधिकाऱ्याकडून परवानगी घ्यावी.
 • मोठा आवाजाने किंवा पक्षांना व वन्य जीवांना हानी होणार नाही, या गोष्टीचे पालन करून वन्यजीव न्याहाळताना शांतता ठेवावी.
 • पक्षी अभयारण्यामधून कर्नाळा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी साधारणतः दोन तास लागू शकतात, त्यामुळे स्वतः सोबत मुबलक पाण्याची सोय व खाद्यपदार्थ ठेवावे.
 • पक्षी निरीक्षण करतेवेळी व त्या पक्षांबद्दल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर सोबत डायरी व दुर्बीण ठेवावी जेणेकरून पक्षी तुम्ही जवळून न्याहाळू शकता.
 • अभयारण्य व त्या ठिकाणी मालमत्तेचा योग्य तो वापर करून त्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • अभयारण्यामध्ये स्वच्छता ठेवावी. कचरा प्लास्टिकच्या बॉटल्स अभयारण्यामध्ये टाकू नये.
 • निर्धारित केलेल्या वेळेनुसार संध्याकाळच्या वेळेअगोदर अभयारण्यातून परत निघावे.
 • जेवढी वेळ निर्धारित केलेली आहे. त्या वेळेच्या अगोदर अभयारण्यामध्ये प्रवेश करण्यास परवानगी नाही. व ठरलेल्या वेळेनंतर अभयारण्यामध्ये थांबण्यास देखील परवानगी नाही.
 • ज्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे त्या ठिकाणी अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये.
 • अभयारण्यामध्ये आपल्याला एखादा मधाचा पोळा दिसल्यास त्या पोळ्यावर दगड मारू नये किंवा हात लावू नये यामुळे मधमाशा हल्ला करू शकतात.
 • अभयारण्य फिरतेवेळी स्वतःसोबत कोणताही पाळीव प्राणी किंवा ब्लूटूथ स्पीकर व इतर संगीत साधने सोबत ठेवू नका. जेणेकरून अभयारण्यातील पक्षी व वन्यजीवांना त्यांचा त्रास होईल.
 • पक्षांच्या अंड्यांना किंवा घरट्यांना हात लावू नका.
 • अभयारण्यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही जसे की अन्न शिजवणे किंवा सिगारेट पिणे इत्यादी गोष्टी करू नका यामुळे हानी होण्याची शक्यता असते.

कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी

कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीची स्थापना विवेक पाटील व त्यांच्या टीमने केली असून, याचा प्रवास हा साधारणता एक दशकाहून जास्तच आहे. यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कर्नाळा प्रमुख क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.

अकॅडमी मध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, पोहणे, कुस्ती, जिम्नॅस्टिक्स इत्यादी अनेक खेळांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. हे ठिकाण महामार्गांशी चांगले जोडलेले आहे आणि बरेच लोक येथे दररोज येतातइथे रेस्टॉरंट, बँकवेट हॉल, पुल साईड कॅफे,  फुटबॉल, क्रेझी गोल्फ, ३ स्टार एक्झिक्युटिव्ह रूम आहेत. साहसी क्रीडा प्रकारांसाठी karnala sport academy हे एक उत्तम ठिकाण असून, या ठिकाणी सर्वात मोठा ऑलिंपिक आकाराचा स्विमिंग पूल देखील आहे.

कर्नाळ्यामधील सोयी सुविधा

१.राहण्याची सोय – हा परिसर सोयीसुविधांनी परिपूर्ण असून आजूबाजूला लॉज, हॉटेल, रिसॉर्ट इत्यादी राहण्याच्या सोयी उपलब्ध आहेत .👉जवळपास राहण्याची सोय

२. दवाखाने – अत्यावश्यक काळात प्राथमिक दवाखाने गावात उपलब्ध आहेत.

३. पोलीस स्टेशन – कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक कामासाठी करणाऱ्या जवळच्या पनवेल या शहरामध्ये पोलीस स्टेशन उपलब्ध आहे.

बोलल्या जाणाऱ्या भाषा – आगरी, मराठी, हिन्दी

कर्नाळा येथे कसे जाल?

 • रेल्वे मार्ग – कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य -भेट देण्यासाठी पनवेल हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बसने किंवा कॅब, ऑटो बुक करून कर्नाळा या अभयारण्याला व किल्ल्याला भेट देऊ शकता.
 • रस्ते मार्ग – कर्नाळा ते मुख्य शहरापासून तुम्ही रस्ते मार्गाचा देखील वापर करू शकता. कॅब,ऑटो किंवा तुमच्या पर्सनल गाडीने कर्नाळा किल्ल्याला किंवा तिकडच्या निसर्गरम्य परिसरात तुम्ही भेट देऊ शकता.
 • हवाई मार्ग – कर्नाळा या ठिकाणी कोणतेही विमानतळ उपलब्ध नसल्यामुळे जर तुम्ही पुण्याहून कर्नाळ्याला भेट देण्यासाठी येत असाल, तर पुणे विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. तिथून उतरून तुम्ही पनवेल पर्यंत येऊन तिथून एसट- बसने कर्नाळाला भेट देऊ शकता. मुंबईकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ आहे तिथून तुम्ही पनवेल या रेल्वे स्टेशन वरून तिथून कॅब, ऑटो किंवा बसने कर्नाळ्याला भेट देऊ शकता.

कर्नाळा येथील हवामान

कर्नाळा या ठिकाणी हवामान हे साधारणतः समशीतोष्ण असते.

 • पावसाळा – पावसाळ्याच्या काळात कर्नाळामध्ये साधारणतः २५०० मिलिमीटर ते ५००० मिलिमीटर पर्जन्य होते. व यावेळी वातावरण हे दमट असून ३० डिग्री सेल्सियस असते.
 • उन्हाळा – उन्हाळ्याच्या काळात या ठिकाणी वातावरण हे उष्ण व अतिप्रखर असते. यावेळी टेंपरेचर हे साधारणतः ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचते.
 • हिवाळा – इतर दोन्ही ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्याच्या काळात या ठिकाणी वातावरण हे थंड व मध्यम असते. व तापमान हे साधारणतः २८ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते.

कर्नाळा किल्ला एक्सप्लोर कसा करू शकता ?

कर्नाळा किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी उद्यानामध्ये कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. किल्ल्यांच्या पायथ्याशी जाईपर्यंत गाडी नेता येते. इथून तुम्हाला अभयारण्यामधून पायी मार्गाने जावे लागते. या ठिकाणी पार्किंग एरियाची सुविधा उपलब्ध आहे. पार्किंग साठी तुम्हाला २५ पासून १०० रुपयांपर्यंत चार्ज द्यावे लागतात.

FAQ

कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळील रेल्वे स्थानक कोणते ?

पनवेल हे कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळील रेल्वे स्थानक आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्याला व किल्ल्याला तुम्ही रेल्वेने कसे जाल ?

कर्नाळा जवळील पनवेल या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही तिथून कॅब किंवा बसने कर्नाळा पक्षी अभयारण्य व किल्ल्याला भेट देऊ शकता.

भारत सरकारने कर्नाळा परिसराला कोणत्या साली कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले?

भारत सरकारने कर्नाळा परिसराला १९६८ मध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले गेले.

मुंबई ते कर्नाळा हे अंतर किती व किती कालावधी लागतो?

मुंबई ते कर्नाळा हे साधारणतः ६० किलोमीटर एवढे अंतर असून प्रवासासाठी १.५ तास लागू शकतात.

निष्कर्ष

मित्रहो,

आजच्या आमच्या कर्नाळा या लेखातून आम्ही आपणस karnala bird sanctuary, karnala fort trek, karnala fort बद्दल माहिती दिली आहे. हा KARNALA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE लेख तुम्ही नक्की वाचा व कसा वाटला, हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment