पी टी उषा यांची माहिती मराठी | PT Usha Information In Marathi

पी टी उषा यांची माहिती मराठी | PT Usha Information In Marathi – भारतातील नव्हे तर संपूर्ण विश्वामधील प्रसिद्ध ऍथलेटिक्स म्हणजे पी टी उषा. आजसुद्धा सर्वात वेगाने धावणाऱ्या व्यक्तीचे नाव विचारले तर, प्रत्येकाच्या मुखी पी टी उषाचेच नाव येते. पी टी उषा ही जगामधील सर्वात प्रसिद्ध व यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे. जिला तिच्या असामान्य कारकिर्दीमुळे, “क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक” व “पायोली एक्सप्रेस” तसेच “गोल्डन गर्ल” ही पदवी देऊन सन्मानित केले गेले आहे.

जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून तिने नाव मिळवले. तिची हरणीसारखी जलद गती पाहून, इंडोनेशिया प्रेक्षकांनी तिला सुवर्णकन्या म्हणून डोक्यावर घेतले. धावणे सुद्धा एक करिअर होऊ शकते का? असा आपणास प्रश्न पडू शकतो. पण याचे उत्तर आहे, होय. यामध्ये कारकीर्द घडवली ती, पी टी उषा यांनी. एका गरीब कुटुंबात जन्म, दारिद्रयाची नेहमीची ओळख, शिक्षणाचा अभाव, अशा परिस्थितीतून एक मुलगी थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करते, ही केवळ काल्पनिक गोष्ट वाटते. पण या गोष्टीला वास्तव रूप देऊन सत्यात आणणारी, वेगाच्या ध्येयाने झपाटलेली मुलगी आहे. पी टी उषाचे हे स्वप्न कसे सत्यात आले, त्याचा हा थोडक्यात आढावा.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पी टी उषा यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

पीटी उषा माहिती मराठी : PT Usha Information In Marathi

पूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्केपरंबिल उषा
टोपणनाव पायोली एक्सप्रेस, गोल्डन गर्ल
जन्म तारीख २७ जून १९६४
जन्मस्थळ पायोली, केरळ
प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले
राष्ट्रीयत्व भारतीय
उंची ५ फूट ७ इंच
पुरस्कार “पद्यश्री”

कोण आहेत पी टी उषा ?

पी टी उषा हिने जवळपास दोन दशके ऍथलेटिक्स क्षेत्रामध्ये भारताचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे. पी टी उषा यांना कोणत्याही प्रसिद्धीची व परिचयाची गरज नाही. पी टी उषा यांचे पूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्केपरंबिल उषा असे आहे. त्यांनी ऑलम्पिकमध्ये खेळाडूंच्या खेळात, सुवर्णपदक स्वतःच्या नावे करून घेतले. १९७९ पासून पी टी उषा यांनी भारतीय खेळांमध्ये पदार्पण केले.

PT Usha Information In Marathi
PT Usha Information In Marathi

पी टी उषा यांचे प्रारंभिक जीवन

  • पी टी उषा यांचे पूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्केपरंबिल उषा असे आहे. त्यांचा जन्म दि. २७ जून १९६४ मध्ये केरळमधील पायोली या गावांमध्ये झाला.
  • पीटी उषा यांचे वडील ई.पी.एम पैटल व आईचे नाव टी.व्ही. लक्ष्मी आहे.
  • पी टी उषा अगदी लहानपणापासूनच शारीरिक दृष्ट्या कमकुवत होत्या. परंतु हायस्कूलच्या दिवसांमध्ये उषांनी त्यांची तब्येत सुधारली. त्या काळात पी टी उषामध्ये लोकांना एक महान ॲथलेटिक्सची प्रतिमा दिसू लागली.
  • १९७६ मध्ये भारत सरकारने, कुन्नूर, केरळ या ठिकाणी सरकारी ॲथलेटिक्स केंद्र सुरू केले.
  • कुन्नूर मधील ॲथलेटिक सेंटरमध्ये ४० इतर महिलांसोबत पी टी उषा यांनी सुद्धा सहभाग दर्शवला. त्यावेळी पी टी उषांचे वय अवघे बारा वर्षे होते.
  • कुन्नूर मधील ॲथलेटिक सेंटरमध्ये, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, १९९८ मध्ये पी टी उषा यांनी प्रथमच राष्ट्रीय धावपटू स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. त्यामध्ये त्या जिंकल्यासुद्धा. हीच वेळ होती, जेव्हा पी टी उषा यांनी पहिल्यांदा धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून, आपल्या क्षेत्राला सन्मान प्राप्त करून दिला.
  • यानंतर पी टी उषा थांबल्या नाहीत. त्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला व प्रत्येक ठिकाणी भारत देशासाठी सुवर्णपदके जिंकली.
  • पीटी उषा यांना तिच्या ॲथलेटिक कामगिरीमुळे वेगवेगळ्या नावाची सन्मानिते देऊन गौरविण्यात आले.

पीटी उषा यांचे शिक्षण 

पीटी उषाने तिचे प्रारंभिक शिक्षण केरळमधील पायोली याठिकाणच्या प्राथमिक शाळेत घेतले, ज्याठिकाणी तिचा जन्म झाला आणि ती मोठी झाली. पीटी उषाची मानसिकता ऍथलेटिक्सवर अधिक केंद्रित होती त्यामुळे, आईच्या प्रोत्साहनामुळे तिने १९७६ मध्ये सरकार प्रायोजित महिला क्रीडा खेळात भाग घेतला. या शर्यतीत पीटी उषा हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर खेळाडूंमध्ये पीटी उषाची निवड झाली.

पीटी उषा
पीटी उषा

लहानपणापासूनच धावण्याची आवड

पी टी उषा यांना लहानपणापासूनच, धावण्याची प्रचंड आवड होती. असे म्हटले जाते की, पी टी उषा यांचे काका शाळेमध्ये शिक्षक होते. ज्यामुळे त्यांना ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्यासाठी, तिच्या कुटुंबाचे मन वळवणे सोपे गेले. पी टी उषांच्या करिअरमध्ये तिच्या कुटुंबाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे, असे ती म्हणते. पी टी उषांच्या प्रशिक्षणादरम्यान तिच्या पालकांनी पी टी उषांना प्रचंड प्रोत्साहन दिले. पी टी उषा या लहान असताना त्यांच्या वडिलांसोबत, धावण्याच्या सरावासाठी मैदानात जात असत. उषा यांना समुद्रकिनाऱ्यावर जॉगिंग करण्याची प्रचंड आवड होती, म्हणून त्यांचे बहुतांश प्रशिक्षण समुद्रकिनाऱ्यावरच होत असे.

पी टी उषा यांची कौटुंबिक माहिती

नाव पी टी उषा
आईचे नाव टी.व्ही. लक्ष्मी
वडिलांचे नाव ई.पी.एम.पैटल
पतीचे नाव व्ही श्रीनिवासन
प्रशिक्षकाचे नाव ओ. एम. नंबियार
अपत्य मुलगा उज्ज्वल

पी टी उषांचे वैवाहिक जीवन

१९९१ मध्ये व्ही श्रीनिवासन यांच्यासोबत पी टी उषांनी लग्न केले. १९९१ मध्ये श्रीनिवासन यांच्याशी लग्न करण्यापूर्वी पीटी उषाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऍथलीट म्हणून केली होती. लग्नाच्या काही वर्षानंतर पीटी उषाला एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी उज्ज्वल ठेवले.

पी टी उषा – क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक

  • संपूर्ण विश्वात पी टी उषा यांना “क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक” किंवा “गोल्डन गर्ल” म्हणून ओळखले जाते. याशिवाय क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पुरस्काराने पीटी उषा यांना सन्मानित केले गेले आहे.
  • पीटी उषा यांनी भारताला ऑलिम्पिक व इतर खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावून दिले व भारताचा मान संपूर्ण विश्वामध्ये उंचावला.
  • पी टी उषा यांनी १९९७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकून, प्रथम आंतरराष्ट्रीय खेळात स्वतःला पात्र असल्याचे सिद्ध केले.
  • त्यांनी १९८० मध्ये “पाकिस्तान ओपन नॅशनल मीट” मध्ये ॲथलीट्स म्हणून भाग घेऊन, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुद्धा सुरुवात केली.
  • कराची या ठिकाणी भारताला पी टी उषा यांनी सलग चार सुवर्णपदके जिंकून दिली. उषांनी भारताला पाकिस्तान मधील ऍथलीट्स मीट मध्ये चार सुवर्णपदके मिळवून दिली. यानंतर भारतातील लोकप्रिय ऍथलिटस म्हणून पी टी उषा यांच्याकडून पाहिले जाऊ लागले.

पी टी उषा यांचे आंतरराष्ट्रीय करियर

  • पी टी उषा यांनी १९८० मध्ये कराची या ठिकाणी झालेल्या, “पाकिस्तान ओपन नॅशनल मीट” मधून एथलीट्स म्हणून तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
  • उषांनी भारताला चार सुवर्णपदके जिंकून देऊन, आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली.
  • १९८२ मध्ये पी टी उषाने “वर्ल्ड जूनियर निमंत्रण मेळाव्या” मध्ये सहभाग दर्शवला. ज्या ठिकाणी तिने २०० मीटर शर्यती मध्ये सुवर्णपदक आणि १०० मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे नाव उंचावले. याशिवाय एका वर्षानंतर, कुवेत या ठिकाणी झालेल्या “एशियन ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप” मध्ये पीटी उषाने ४०० मीटर शर्यतीमध्ये एक नवा विश्व विक्रम घडवून आणला व सुवर्णपदक पटकावले.
पीटी उषा
पीटी उषा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • त्यानंतर पी टी उषा न घाबरता, न डगमगता, आत्मविश्वासाने स्वतःचे आंतरराष्ट्रीय करिअर घडवू लागल्या.
  • १९८४ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी जोरदार तयारी पीटी उषा यांनी सुरू केली.
  • लॉस एंजलिस येथे झालेल्या १९८४ मधील ऑलम्पिक मध्ये पी टी उषा या उपांत्य फेरीच्या पहिल्या फेरीमध्ये, ४०० मीटर शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करून, अंतिम फेरीमध्ये १/१०० एवढ्या फरकांनी हरल्या व कांस्यपदक मिळवू शकल्या नाही. हा सामना तरीही अतिशय रोमांचक होता. ज्याने १९६० मधील “मिल्खा सिंगच्या” शर्यतीची आठवण करून दिली होती.
  • या सामन्याचे शेवटचे क्षण अतिशय रोमांचक होते. पराभवानंतरही पी टी उषाची कामगिरी खूप मोलाची होती.
  • भारताच्या इतिहासामध्ये, पहिल्यांदाच महिला खेळाडू ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. व ही शर्यत ५५.४२ सेकंदामध्ये पूर्ण केली. जी अजूनसुद्धा भारतीय स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रम आहे.
  • १९८५ मध्ये पी टी उषाने जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी “आशियाई ट्रॅक आणि फिल्ड चॅम्पियनशिप” मध्ये सहभाग दर्शवला. ज्या ठिकाणी तिने ५ सुवर्णपदक व १ कांस्य पदक जिंकले.
  • यानंतर १९८६ दरम्यान सोल येथे झालेल्या, “दहाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये” पी टी उषा यांनी २०० मीटर, ४०० मीटर रिले शर्यतीमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. ज्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये विजयी झाल्या व त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
  • एका स्पर्धेमध्ये एकाच खेळाडूने एवढी पदके जिंकणे, हा एक महान विक्रम होता. जो पीटी उषा यांनी मिळवला.
  • १९८९ मध्ये पी टी उषा यांच्या जबरदस्त कामगिरीने, दिल्ली येथे आयोजित “एशियन ट्रॅक फेडरेशन मीट” मध्ये त्यांनी ४ सुवर्णपदके व २ रौप्य पदके जिंकून, भारताला सर्वोच्च मान प्राप्त करून दिला.
  • पीटी उषा यांनी याच काळात निवृत्ती जाहीर केली. परंतु सगळ्यांनी पी टी उषा यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील, शेवटचा डाव खेळण्याचे निवेदन केले. त्यानंतर पी टी उषा यांनी १९९० मध्ये बीजिंग एशियन गेम्स मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेची संपूर्ण तयारी नसतानाही, पी टी उषा यांनी तीन रौप्य पदके जिंकली.

पी टी उषा यांचे पुनरागमन

  • पी टी उषा यांनी १९९० मध्ये बीजिंग मध्ये खेळल्यानंतर ॲथलेटिक्स मधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर १९९१ मध्ये त्यांनी व्ही श्रीनिवासन यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला.
पीटी उषा
पीटी उषा
  • १९९८ मध्ये पी टी उषा या वयाच्या ३४ व्या वर्षी ॲथलेटिक्स मध्ये पुन्हा परतल्या व जपानमधील फुकोका, या ठिकाणी त्यांनी झालेल्या “एशियन ट्रॅक फेडरेशन मीट” मध्ये सहभागी दर्शवला.
  • या खेळामध्ये पी टी उषांनी २०० मीटर, ४०० मीटर शर्यतीमध्ये, कांस्यपदक पटकावले.
  • वयाच्या ३४ व्या वर्षी पी टी उषांनी २०० मीटर शर्यतीमधील, स्वतःच्या वेळेमध्ये सुधारणा करून, एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला व त्यांनी असे दाखवून दिले की, कोणत्याही गोष्टीला वयाची मर्यादा नसते
  • शेवटी २००० मध्ये पी टी उषा यांनी ऍथलेटिक्स मधून कायमची सेवा निवृत्ती घेतली.

पी टी उषा यांना मिळालेले पुरस्कार

  • १९८४ मध्ये पी टी उषा यांना त्यांनी केलेल्या ॲथलेटिक्स मधील योगदानाबद्दल, भारत सरकारने त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी “अर्जुन पुरस्कार” देऊन त्यांना सन्मानित केले.
  • १९८५ मध्ये पी टी उषांना भारतातील चौथा सर्वोच्च सन्मान “पद्यश्री” पुरस्कार देऊन गौरीविले.
  • पी टी उषा यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने, “स्पोर्ट्स पर्सन ऑफ द सेंचुरी” व “स्पोर्ट्स वुमन ऑफ द मिलेनियम” ही पदवी देऊन गौरीविले.
  • १९८५ मध्ये जकार्ता या ठिकाणी झालेल्या “एशियन ॲथलेटिक्स मिट” मध्ये उषा यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी “सर्वश्रेष्ठ महिला ॲथलिटस” ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
  • पी टी उषा यांना १९८५ ते १९८६ मध्ये “सर्वोत्कृष्ट ऍथलिटससाठी वर्ल्ड ट्रॉफी” देण्यात आली.

पी टी उषा यांचे रेकॉर्डस

  • पी टी उषा यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी म्हणजेच १९७७ मध्ये केरळ राज्यातील “राष्ट्रीय ऍथलेट स्पर्धेमध्ये” राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
  • यानंतर १९८० मध्ये पी टी उषांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी “मॉस्को ऑलिम्पिक” मध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. यानंतर त्या ऑलम्पिक मध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण महिला ठरल्या.
  • ॲथलेटिक स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवून, अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी पी टी उषा ही भारतामधील पहिली महिला खेळाडू ठरली.
  • वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी पी टी उषा यांनी १९९८ मध्ये बीजिंग या ठिकाणी झालेल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, उतार वयात शर्यत जिंकणारी भारतामधील पहिली महिला ठरली.

पी टी उषांची ऑलिम्पिक मधील कामगिरी

  • पी टी उषा यांनी एकूण दोन वेळा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. दोन्ही वेळा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आजही त्यांचा तो खेळ आठवून लोक हादरून जातात. पीटी उषांची ऑलिम्पिक मधील कामगिरी आजही स्मरणात आहे.
  • पीटी उषा यांनी ऑलम्पिकची सुरुवात १९८० मध्ये केली. तेव्हा पी टी उषा या फक्त १६ वर्षाच्या होत्या. एवढ्या लहान वयात, ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पी टी उषांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.
  • मॉस्को ऑलम्पिकमध्ये त्यांनी हर्डल स्पर्धेत सहभाग दर्शवला. हा गेम उषा यांनी ५५.४२ सेकंदामध्ये पूर्ण केला. जो अजूनही भारताचा राष्ट्रीय विक्रम म्हणून संबोधला जातो. या ऑलम्पिक मध्ये पी टी उषा जिंकू शकले नाहीत. परंतु, त्यांचा हा खेळ अतिशय रोमांचक होता. त्यांनी त्यांच्या खेळामध्ये सुधारणा करून, पुन्हा १९८४ मध्ये ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला.

धावपटू स्पर्धेत पी टी उषा यांची कारकीर्द

पी टी उषांनी लग्न केल्यानंतर, खेळामधून निवृत्ती घेतली. परंतु अचानक १९९८ मध्ये वयाच्या अवघ्या ३४ व्या  वर्षी पी टी उषा या पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. उतार वयामध्ये, खेळताना पी टी उषा यांनी सुवर्णपदक जिंकले नाही, परंतु पदक न घेता सुद्धा परतल्या नाहीत. त्यांनी ३ रौप्य पदके स्वतःच्या नावे जिंकून घेतलीत.

पी टी उषा – द गोल्डन गर्ल

  • पी टी उषा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १०२ पदके जिंकली असून, त्यापैकी ४६ सुवर्णपदके आहेत.
  • पी टी उषा या अशा खेळाडू आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहा सुवर्णपदके जिंकली असून, ॲथलेटिक्स क्षेत्रात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा मान सुद्धा पटकावला आहे.
  • याच कारणामुळे पी टी उषा यांना “गोल्डन गर्ल” म्हणून ओळखले जाते.
  • पी टी उषा यांनी केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे, त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. जसे की, “पायोली एक्सप्रेस’, “क्वीन ऑफ द इंडियन ट्रॅक”, “गोल्डन गर्ल” इत्यादी.

पी टी उषा – क्रीडा समित्या आणि संस्थांमधील त्यांची भूमिका

राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्रीडा समित्या आणि संघटनांच्या सदस्या म्हणून पी टी उषा यांनी काम केले आहे आणि त्यामध्ये त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असे आहे ज्यांच्यासोबत त्यांनी काम केले त्यांच्याकडून तिच्या कौशल्याची कदर केली गेली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण SAI

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सदस्या म्हणून पी टी उषा यांनी काम केले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण हे भारतीय खेळाच्या प्रोत्सानासाठी तसेच विकासासाठी काम करते या संस्थेचे सदस्य म्हणून ॲथलेटिक्स ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंमधील प्रतिभा ओळखण्यासाठी पी टी उषा यांनी सक्रिय भूमिका पार पाडली आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे यामध्येही त्यांनी आपला सहभाग दर्शवला आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन IAAF

ॲथलेटिक्स मधील योगदानाची पी टी उषा यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली गेली आहे म्हणूनच IAAF मध्ये ॲथलेटिक्स सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये जागतिक स्तरावर खेळाडूंच्या कौशल्याचे तसेच हिताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे या पदावर करण्यात आलेली त्यांची नियुक्ती ही त्यांनी केलेल्या कामगिरीचा पुरावाच आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA

सन 1985 मध्ये IOA ऍथलीट कमिशनच्या सदस्या म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली होती या पदावर नियुक्त होणारी ती पहिली भारतीय ऍथलीट बनली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती या पदावर युती उषा यांची नियुक्ती ही त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची आणि खेळा प्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचा हा एक पुरावाच होता.

आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशन AAA

आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनच्या ऍथलेट्स कमिशनच्या सदस्या म्हणून पी टी उषा यांनी काम केले आहे. पी टी उषा यांचे कौशल्य आणि ऍथलेट म्हणून अनुभव तसेच आशिया खंडात या खेळाला चालना देण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.

पी टी उषा यांचा राजकीय परिचय

पी टी उषा या राज्यसभेच्या विद्यमान सभापती आहेत. ॲथलेटिक्स मध्ये त्यांच्या मोलाच्या कामगिरीमुळे, त्यांना थेट अध्यक्षांकडून राज्यसभेच्या विद्यमान सभापतीचे पद प्राप्त झाले. अलीकडे झालेल्या एका मीडिया कॉन्फरन्समध्ये, पी टी उषा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भाजप सरकारशी युती करण्यास नकार दिला.

त्यांनी असे सांगितले की, “मला भारतातील सर्व पक्ष आवडतात आणि कोणत्याही एका पक्षा सोबत हातमिळवणी करून, दुसऱ्या पक्षाला नाराज करणे, मला आवडणार नाही. सध्या पी टी उषा कोणत्याही पक्षामध्ये नसून, सरकारने दिलेले राज्यसभेचे पद यशस्वीपणे पार पाडत आहे.

पी टी उषा यांचा वारसा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

एक महान धावपटूच नसून एक समर्पित प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून पी टी उषा यांना ओळखले जाते. सन 2000 मध्ये निवृत्त झाल्यानंतर तरुण प्रतिभावान खेळाडूंना प्रशिक्षण देणे तसेच त्यांचे स्वप्न साध्य करण्यासाठी पी टी उषा यांनी उषा स्कूल ऑफ ऍथलेटिक्स सुरू केले. या स्कूल मधून गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे पी टी उषा यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या काही प्रमुख खेळाडू आणि त्यांची उल्लेखनीय कामगिरी खालील प्रमाणे –

टी जी ओम प्रकाश

तिहेरी उडी मारणारा खेळाडू म्हणून टी जी ओमप्रकाश याला ओळखले जाते, जो पी टी उषा स्कूल ऑफ अथलेटिक्स मध्ये प्रशिक्षण घेत होता. या खेळाडूने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतात भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याने आपल्या देशासाठी अनेक पदे जिंकली आहेत. दिल्ली या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सन 2010 मध्ये त्याने तिहेरी उडी प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते त्याचप्रमाणे सन 2014 मध्ये दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ही त्याने तिहेरी उडी प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावले होते.

एम आर पुवम्मा

पी टी उषा स्कूल ऑफ अथलेटिक्स मध्ये प्रशिक्षण घेणारे एम आर पुवम्मा हे एक धावपटू आहेत. पी टी उषा यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत देशासाठी अनेक पदे जिंकली आहे. दक्षिण कोरियाच्या इंचान या ठिकाणी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सन 2014 मध्ये तिने 400 मीटर या प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले तसेच सन 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जकार्ता, पालेम्बांग, इंडोनेशिया या ठिकाणी झालेल्या 400 मीटर प्रकारामध्ये तिने रौप्य पदक ही जिंकले होते. व म हिच्या मते पी टी उषा यांच्या प्रशिक्षण पद्धतीमुळे तिची सहनशक्ती वाढली तसेच तर तिचे तंत्र सुधारले तिने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले ज्यामुळे तिला तिच्या कामगिरीमध्ये लक्षणीय रित्या सुधारणा होण्यास मदत झाली.

टि के महेश

पिटीस उषा स्कूल ऑफ अथलेटिक्स मध्ये टीके महेश हा उंच उडी मारणारा खेळाडू आहे त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व करत देशासाठी अनेक पदे जिंकली आहेत. दोहा कतार या ठिकाणी झालेल्या सन २००६ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये उंच उडी प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले तसेच सन 2010 मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये उंच उडी स्पर्धेमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले.

टिंटू लुका

पी टी उषा यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणून टिंटू लुका हिला ओळखले जाते. ही उत्तम धावपटू असून 800 मीटर स्पर्धांमध्ये ती तरबेज आहे तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. चीनमधील ग्वांगझु या ठिकाणी झालेल्या सन 2010 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिने 800 मीटर या प्रकारांमध्ये सुवर्णपदक जिंकले तसेच सन 2014 मध्ये ग्लास गो स्कॉटलंड या ठिकाणी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिने 800 मीटर प्रकारांमध्ये रोप्य पदक जिंकले.

टी दामोदरन

पी टी उषा स्कूल ऑफ अथलेटिक्स मध्ये प्रशिक्षण घेणारा दामोदरं हा एक लांब उडी मारणारा खेळाडू असून त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पी टी उषा बद्दल ताज्या बातम्या 2023

पी टी उषा या सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आणि राज्यसभेमध्ये नामनिर्देशित खासदार आहेत. पी टी उषा यांनी हल्लीच दिल्लीमधील जंतर-मंतर या आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूची भेट घेतली. २३ एप्रिल पासून कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना लैंगिक छळ प्रकरणी अटक करावी, या मागणीसाठी विनेश फोगट,, साक्षी मलिक बजरंग पुनिया, असे अनेक पैलवान दिल्ली मधील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत.

पी टी उषा यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना भेट देऊन सांगितले की, “मी तुमच्यासोबत आहे. सर्वप्रथम मी एक खेळाडू आहे, मात्र कुस्तीपटूंनी विरोध सुरू केल्यानंतर, पी टी उषा यांनी आंदोलन करण्यापूर्वी समितीच्या निर्णयाची वाट पहावी असे सांगितले होते.

पी टी उषा यांचे सामाजिक आणि धर्मादाय उपक्रम

सामाजिक आणि सेवाभावी धर्मादायी उपक्रमांमध्ये पी टी उषा यांची आवड लहानपणापासूनच आपल्याला दिसून येते. एका मोठ्या कुटुंबात वाढलेल्या पेटी उषा यांनी मूलभूत सुविधांचा अभाव तसेच दारिद्र्य यांचा संघर्ष पाहिला असल्यामुळे त्यांच्यामध्ये गरजूंना मदत करण्याची इच्छा निर्माण झाली. गेल्या काही वर्षांमध्ये पेटी उषा यांनी अनेक सामाजिक सेवाभावी उपक्रमांमध्ये सामील होत समाजामध्ये सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी काही उल्लेखनीय उपक्रम सुरू केले आहे ते खालील प्रमाणे –

उषा स्कूल ऑफ अथलेटिक्स

केरळ मधील कोयल अंडी या ठिकाणी सन 2002 मध्ये पी टी उषा यांनी उषा स्कूल ऑफ लेटेस्ट ची स्थापना केली. गरजू तरुण खेळाडूंना ओळखून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या शाळेची स्थापना करण्यात आली पाठभर नसलेल्या इच्छुक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे तसेच आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी उपलब्ध करून देणे हे पेटी उषा यांचे ध्येय होते.

या स्कूलमध्ये धावणे उंच उडी लांब उडी यासह विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांना मोफत भोजन निवास तसेच प्रशिक्षण सुविधा देखील मिळतात आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते.

स्वच्छ भारत अभियान

सन 2014 मध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली यामध्ये पी टी उषा यांनी सक्रिय सहभाग दर्शवला या मोहिमेचा उद्देश स्वच्छता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे तसेच सर्व नागरिकांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हा आहे.

स्वच्छता आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अनेक स्वच्छता मोहिमांमध्ये जनजागृती करण्यासाठी पी टी उषा यांनी सहभाग दर्शविला कोझिकोड या ठिकाणी सन 2018 मध्ये भारतीय रेल्वेने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी भाग घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे साफसफाई देखील केली.

उषा फाउंडेशन

सन 1999 मध्ये पी टी उषा यांनी उषा फाउंडेशनची स्थापना केली वंचित मुलांना आधार देणे शिक्षण आणि खेळांना प्रोत्साहन देणे हा या फाउंडेशनचा उद्देश आहे हे फाउंडेशन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत करते तसेच शिष्यवृत्ती प्रदान करते त्याचप्रमाणे तरुण खेळाडूंच्या प्रशिक्षण आणि विकासाला देखील प्रोत्साहन देते.

आपले उपक्रम राबवण्यासाठी उषा फाउंडेशनने अनेक संस्था आणि व्यक्तींसोबत भागीदारी केली आहे. ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना आर्थिक सहाय्य करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सोबत उषा फाउंडेशनने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे सहकार्य केले आहे.

FAQ

१. पीटी उषा यांचे टोपण नाव काय?

पीटी उषा ही जगामधील सर्वात प्रसिद्ध व यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे. जिला तिच्या असामान्य कारकिर्दीमुळे, “क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक” व “पायोली एक्सप्रेस” तसेच “गोल्डन गर्ल” ही पदवी देऊन सन्मानित केले गेले आहे.

२. पीटी उषा यांना अर्जुन पुरस्कार कधी मिळाला?

१९८४ मध्ये पीटी उषा यांना त्यांनी केलेल्या ॲथलेटिक्स मधील योगदानाबद्दल, भारत सरकारने त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी “अर्जुन पुरस्कार” देऊन त्यांना सन्मानित केले.

३. पीटी उषा यांनी त्यांच्या कारकिर्दीला कधी सुरुवात केली?

पीटी उषा यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी म्हणजेच १९७७ मध्ये केरळ राज्यातील “राष्ट्रीय ऍथलेट स्पर्धेमध्ये” राष्ट्रीय विक्रम नोंदवला.

पीटी उषा यांचे पूर्ण नाव काय आहे?

त्यांचे संपूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्कापरंबिल उषा असे आहे.

पीटी उषाला किती पदके मिळाली?

पी.टी. उषाने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य पदके आणि पुरस्कार जिंकले, ज्यात आशियाई खेळांमध्ये 13 सुवर्ण पदके, आशियाई ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिपमध्ये 9 सुवर्ण पदके आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये असंख्य पदके यांचा समावेश आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये देखील भाग घेतला आणि 1984 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक थोडक्यात हुकले आणि चौथ्या स्थानावर राहिली. एकूण, तिने तिच्या कारकिर्दीत 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

पी टी उषा यांची माहिती निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास भारताची प्रसिद्ध धावपटू, गोल्डन गर्ल पी टी उषा यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment