विराट कोहली माहिती मराठी : VIRAT KOHLI INFORMATION IN MARATHI – भारतीय क्रिकेट संघातील सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर भारतीय क्रिकेट संघाला मजबूत करणारा आणि वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट टीमचा सदस्य असून, हा प्रसिद्ध व लोकप्रिय खेळाडू आहे. विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून, तो उजव्या हाताने खेळणाऱ्या क्रिकेटपटून पैकी एक नावाजलेला क्रिकेटपटू आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाचे विराट कर्णधारपद सांभाळत आहे.
त्यासोबत २००३ पासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विराट हा कर्णधार आहे. त्याला भारतीय क्रिकेटचा कणा म्हटले जाते. कारण तो उजव्या हाताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि सर्वात प्रतिभावान आणि आश्वासक खेळाडूंपैकी एक आहे. सध्या विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार तसेच शेकडो तरुणांचा स्टाईल आयकॉन आहे. शेवटी, त्याच्या खेळण्याच्या पद्धती आणि शैलीने अनेकांना त्याच्याकडे आकर्षित केले आणि त्याला वेड लावले.
बालपणापासूनच विराटला क्रिकेटकडे अतिशय ओढ होती. वडिलांनी विराटला क्रिकेट बद्दल योग्य मार्गदर्शन केले व पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळेच विराट आज या पदावर पोहोचला आहे. क्रिकेटमध्ये विराटने दिलेल्या योगदानामुळे व भारताला दिलेल्या सर्वोच्च मानामुळे २०१७ च्या दरम्याने विराटला भारत सरकारने पद्यश्री पुरस्काराने गौरवित केले.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास विराट कोहली बद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख संपूर्ण पाहण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
विराट कोहली माहिती मराठी : VIRAT KOHLI INFORMATION IN MARATHI
पूर्ण नाव | विराट कोहली |
जन्म | ५ नोव्हेंबर १९८८ |
जन्मस्थान | दिल्ली, भारत |
नावाचा अर्थ | प्रचंड |
टोपणनाव | चीकू |
राशी चिन्ह | वृश्चिक |
शाळा | विशाल भारती पब्लिक स्कूल, दिल्ली सेव्हियर कॉन्व्हेंट सीनियर सेकंडरी स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली |
भाषा | हिंदी, इंग्रजी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
बेस्ट फ्रेंड | ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा |
प्रमुख टीम | भारत |
प्रशिक्षक/मार्गदर्शक | राजकुमार शर्मा |
फलंदाजीची शैली | उजव्या हाताचा फलंदाज |
जात | पंजाबी |
विराट कोहली चा जन्म आणि बालपण
विराट कोहली याचा जन्म ०५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये झाला. विराट कोहली हा जातीने पंजाबी असून, विराटच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली असे होते. विराटच्या वडिलांचा वकीली हा पेशा होता. विराटच्या आईचे नाव सरोज कोहली. सरोज कोहली अतिशय साधी व सरळ गृहिणी आहे. विराटच्या कुटुंबामध्ये विराटला एक मोठा भाऊ व एक बहीण देखील आहे.
लहानपणापासून विराटला विराटच्या वडिलांनी क्रिकेट खेळायचे मार्गदर्शन केले. विराट हा अवघ्या तीन वर्षाचा असताना त्याला खेळण्यांमध्ये सर्वात जास्त बॅटची आवडायची. विराटच्या वाढत्या वयाबरोबर त्याचा छंदामध्ये बदल असल्याचे त्यांच्या वडिलांना समजले.
आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी विराटचा रोज त्याचे वडील सराव घेत असत. २००६ मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. विराटच्या वडिलांनी विराटला दिलेली शिकवण त्याने अगदी मनात जोपासून, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे.
- नक्की वाचा 👉👉 23 विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी
- नक्की वाचा 👉👉 क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती मराठी
विराट कोहली याची कौटुंबिक माहिती
वडील | प्रेम कोहली |
आई | सरोज कोहली |
भाऊ | विकास कोहली |
वहिनी | चेतना कोहली |
भाची | आर्या कोहली |
बहीण | भावना कोहली |
मेव्हणा | संजय धिंग्रा |
भाचा | आयुष धिंग्रा |
भाची | मेहक धिंग्रा |
वैवाहिक स्थिती | विवाहित |
बायको | अनुष्का शर्मा |
मुलगी | वामिका |
विराट कोहलीचे शिक्षण व वैयक्तिक माहिती
विराटचे प्राथमिक शालेय शिक्षण दिल्लीच्या विशाल भारती पब्लिक स्कूल मधून झाले. विराट विशेष करून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असे. त्यामुळे वयाच्या अवघ्या आठ,नऊ वर्षाच्या विराटला त्याच्या वडिलांनी क्रिकेट क्लब मध्ये ऍडमिशन घेऊन दिले. जेणेकरून विराट पुढे जाऊन क्रिकेटमध्ये काहीतरी करू शकेल.
ज्या शाळेमध्ये विराटचे प्राथमिक शालेय शिक्षण सुरू होते, त्या शाळेमध्ये केवळ शिक्षणावरच भर होता. त्या शाळेत क्रीडा प्रशिक्षण इत्यादी, गोष्टी विराटला मिळत नव्हत्या. म्हणून, विराटच्या वडिलांनी विराटची शाळा बदलण्याचा विचार केला. विराटच्या वडिलांनी विराटला अशा शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला, ज्या शाळेमध्ये शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींकडे समान बघितले जात होते.
इयत्ता नववीपासून विराटने सेवियर कॉमेंट सीनियर सेकंडरी स्कूल पश्चिम विहार दिल्ली. क्रिकेट अकादमी मध्ये राजकुमार शर्मा यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले व विराटने सुमित डोंगरा नावाच्या अकादमीमध्ये पहिला सामना खेळला.
विराट कोहलीचे वर्णन
रंग | गोरा |
डोळ्यांचा रंग | हलका तपकिरी |
केसांचा रंग | काळा |
उंची | ५ फूट ९ इंच |
वजन | ७२ किलोग्रॅम |
शारीरिक संरचना | छाती: 40 इंच कमर: 30 इंच Biceps: 14 इंच |
आवडते शॉट्स | कवर ड्राइव, फ़्लिक शॉट |
विराट कोहलीची कारकीर्द
करिअरची सुरुवात
- विराट हा भारतीय क्रिकेट संघाचा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. तो फलंदाजी मध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आहे. तसेच विराट उजव्या हाताच्या गोलंदाजी शैलीमध्ये सुद्धा निपुण आहे. २००२ मध्ये विराटने पंधरा वर्षाखाली संघामध्ये त्याच्या उत्तम फलंदाजीचा सामना सगळ्यांसमोर दर्शवला.
- यानंतर २००४ मध्ये विराटने अंडर सेव्हन्टीन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे २००६ साली प्रथम श्रेणीसाठी विराट खेळला आणि २००८ मध्ये विराटची अंडर सेव्हन्टीन मध्ये निवड झाली.
- विराट वयाच्या १९ वर्षाखाली असताना विश्वचषकातील त्याचा पहिला सामना मलेशियामध्ये झाला व त्याने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने हा सामना जिंकून दिला. येथून त्याच्या कारकीर्दीला एक वेगळे वळण मिळाले. यानंतर विराटची उत्कृष्ट कामगिरी बघून त्याची वनडेसाठी निवड करण्यात आली. अवघ्या एकोणिसाव्या वर्षामध्ये विराट श्रीलंकेविरुद्ध वनडेचा सामना खेळला.
- सातत्याने विराटची होणारी प्रगती पाहून २०११ साली त्याला विश्वचषक खेळण्याची संधी साधून आली, व हा विश्वचषक भारताने जिंकला व त्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती.
- २०११ मध्ये कसोटी सामने खेळण्यास सुरुवात झाली. या कसोटी सामन्यांमध्ये विराटने सर्वोत्तम कामगिरी दर्शवून एक वेगळे स्थान प्राप्त केले.
- २०१३ च्या दरम्याने एक दिवसीय सामन्यांमध्ये विराटने शतक झळकावून स्वतःला क्रिकेटच्या विश्वात सिद्ध केले.
- यानंतर त्याने T-20 सामने खेळले, त्यामध्ये सुद्धा तो सातत्याने यश प्राप्त करत होता. त्यानंतर २०१४ ते २०१६ च्या दरम्याने दोनदा सामनावीरचा विराटने किताब पटकावला.
- वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंत विराटने सतत उत्तम, उत्कृष्ट कामगिरी करत क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचे नाव कमवून भारताला विजय प्राप्त करून दिला.
विराट कोहलीची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) कारकीर्द
- २०११ मध्ये कसोटी सामन्यात विराटने स्नान स्थान प्राप्त केले. त्यानंतर त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सहाव्या स्थानावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली. विराटने दोन सामने हरले, परंतु जिद्दी व चिकाटीने पुढच्या सामन्यांमध्ये विराटने ११६ धावाचे शतक झळकावले. विराट भारतासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय २०११ चा कसोटी सामना तर जिंकू शकला नाही, परंतु शतक करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध झाला.
- काही काळाने कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध सात पैकी दोन सामने जिंकले, एक सामना बरोबरीत सुटला आणि चार सामने खेळामध्ये पराभव झाला. परंतु फायनलला पात्र होण्यासाठी अजून एका सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळून जिंकायचे होते यासाठी विराट समोर ३२१ धावांचे लक्ष होते. त्यापैकी विराटने १३३ धावा करून भारताचा विजय हा सुनिश्चित केला. त्यामुळे विराटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विराटने विजेते पदक पटकावले.
- त्याची उत्कृष्ट कामगिरी बघून २०१२ मध्ये आशिया चषकसाठी विराटची उपकर्णधार म्हणून भारतीय टीम मधून निवड करण्यात आली. असेच उत्कृष्ट खेळल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा भारतीय संघाचा विराट हा आता कर्णधार होईल, असे सुनिश्चित करण्यात आले.
- ११ व्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानाविरुद्ध खेळताना विराटने १४८ चेंडू १८० धावा केल्या ज्यामध्ये त्यांनी २२ चौकार आणि एक षटकार मारून, भारताचा ३३० धावांचा विक्रम नोंदवला. विराटला त्याने केलेल्या उत्तम कामगारीमुळे पुन्हा एकदा सामनावीरचा किताब प्राप्त झाला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) विक्रम
बेटिंग | फिल्डिंग | कर्णधारपद | ||||
डाव | २०० | १०६.५ | कॅच | १०० | एकूण सामने | ४९ |
नाबाद | ३५ | १/१५ | सर्वाधिक झेल | ३ | सामने जिंकले | ३८ |
चार धावांचा विक्रम (४से) | ८९३ | ४ | सामने गमावले | १० | ||
सहा धावांचा विक्रम (६s) | १०४ | ६.२२ | नाणेफेक जिंकणे | २१ (४४.९० टक्के) | ||
सर्वाधिक धावा | १८३ | ६४१ | ||||
सरासरी | ५८.११ | |||||
स्कोअरिंग दर | ९२.१५ | |||||
अर्धशतक | ४६ | |||||
शतक | ३५ | |||||
विराट कोहलीची इंडियन प्रीमियर लीग आयपीएल मधील कारकीर्द
- २००८ च्या दरम्याने विराटने आयपीएल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर विराटला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यामध्ये २० लाख रुपये देऊन विकत घेतले गेले. त्यावेळी त्याने तेरा सामन्यांमध्ये १६५ धावा करून, उत्तम प्रदर्शन केले.
- २००९ च्या दरम्याने विराटने त्याचा संघाला अंतिम फेरीमध्ये सुद्धा नेले. त्यानंतर अनिल कुंबळे यांनी विराटच्या खेळाचे मन भरून कौतुक केले. २०१०/११ मध्ये विराटने अतिशय मेहनत घेतली. परंतु त्यामध्ये अपयशी झाला.
- २०१२ च्या दरम्याने विराटने अतिशय मेहनत घेऊन, स्वतःला सर्वोत्कृष्ट म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला. हा त्याच्या कारकरदीचा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर त्याच्या खेळामध्ये बदल होतच गेले.
- २०१३ च्या दरम्याने त्याने १६ सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने ६३५ धावा करून, विक्रम मोडला. २०१४ च्या दरम्याने आयपीएल मधील विराटची कामगिरी निराशाजानक होती. तो केवळ २७ च्या सरासरीने खेळला.
- एम एस धोनीने कसोटी कर्णधार पदावरून निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनीच्या जागी विराटला कसोटी कर्णधार पद देण्यात आले. येथे तो पूर्णपणे बदलून गेला. विराटने २०१५ साली पाचशे धावांचा विक्रम मोडून उत्कृष्ट कामगिरी केली.
- २०१६ पर्यंत तो एक अनुभवी खेळाडू बनून राहिला. त्याने आशिया कप व टी-ट्वेंटी मध्ये भारतासाठी आणि आयपीएलमध्ये आरसीबी साठी खूप उत्कृष्ट सामने खेळले. चार डावात विजयाचा विराटने झेंडा फडकवला.
- २०१७ च्या दरम्याने विराटला झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो काही सामने खेळू शकला नाही. त्यानंतर नुकतेच २०१८ च्या दरम्याने त्याला १८ कोटी रुपयांना आयपीएल मध्ये खरेदी करण्यात आले.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रेकॉर्ड
बेटिंग | गोलंदाजी | फिल्डिंग | कर्णधारपद | ||||
डाव | १५५ | षटके | ४१.५ | कॅच | ६८ | एकूण सामने | ९६ |
नाबाद | २६ | सर्वोत्तम षटके | २/२५ | सर्वाधिक झेल | २ | सामने जिंकले | ४४ |
चार धावांचा विक्रम (४से) | ४३४ | विकेट्स | ४ | सामने गमावले | ४८ | ||
सहा धावांचा विक्रम (६s) | १७७ | इकोनोमिक रेट्स | ८.८० | नाणेफेक जिंकणे | पन्नास टक्के | ||
सर्वाधिक धावा | ११३ | बॉल | २५१ | ||||
सरासरी | ३८.३६ | ||||||
स्कोअरिंग दर | १३०.७६ | ||||||
अर्धशतक | ३४ | ||||||
शतक | ४ | ||||||
खुले सट्टेबाजी | ४८ |
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-20 मधील कारकीर्द
विराटने टी-ट्वेंटी मध्ये एका मागून एक असे उत्कृष्ट विक्रम मोडून काढले, काही सामन्यांमध्ये त्याला प्रतिकूल परिस्थितींचा सुद्धा सामना करावा लागला. वेस्ट इंडिज विरुद्ध सेमीफायनल मध्ये विराटने एकट्याने एकूण ९० धावा करून, भारताला वेस्टइंडीज विरुद्धचा सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हा सामना ते जिंकू शकले नाही, परंतु नंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी विश्वचषकात विराटने स्वतःचे स्थान निर्माण करून उत्तम कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय टी-२० मधील विक्रम
बेटिंग | गोलंदाजी | फिल्डिंग | कर्णधारपद | ||||
डाव | ५८ | षटके | २४.२ | कॅच | 32 | एकूण सामने | १७ |
नाबाद | १५ | सर्वोत्तम षटके | १४६ | सर्वाधिक झेल | ३ | सामने जिंकले | ११ |
चार धावांचा विक्रम (४से) | २१४ | विकेट्स | ४ | सामने गमावले | ६ | ||
सहा धावांचा विक्रम (६s) | ४६ | इकोनोमिक रेट्स | ८.१४ | नाणेफेक जिंकणे | २३.५३ टक्के | ||
सर्वाधिक धावा | ९० | बॉल | १४६ | ||||
सरासरी | ४८.८८ | ||||||
स्कोअरिंग दर | १३६.२३ | ||||||
अर्धशतक | १८ | ||||||
शतक | शून्य | ||||||
खुले सट्टेबाजी | ७ |
टी-२० विश्वचषकाचे विक्रम
बेटिंग | गोलंदाजी | फिल्डिंग | |||
डाव | १६ | षटके | ५.४ | कॅच | ९ |
नाबाद | ७ | सर्वोत्तम षटके | १/१५ | सर्वाधिक झेल | २ |
सर्वाधिक धावा | ८९ | विकेट्स | २ | ||
सरासरी | ८६.३३ | इकोनोमिक रेट्स | ८.१२ | ||
स्कोअरिंग दर | १३३.०५ | बॉल | ३४ | ||
अर्धशतक | ९ | ||||
खुले सट्टेबाजी | शून्य |
कोहलीच्या ट्वेंटी २० सामन्यांतील खेळी
क्रिकेट प्रकार | सामने | धावा | सर्वोच्च | १०० | ५० | सरासरी |
आंतरराष्ट्रीय टी 20 | ४८ | १७०९ | ९०* | ० | १६ | ५३.४० |
आयपीएल | १४९ | ४४१८ | ११३ | ४ | ३० | ३७.४४ |
चॅम्पियन्स लीग | १५ | ४२४ | ८४* | ० | ०२ | ३८.५४ |
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
२०१४ च्या दरम्याने एम.एस धोनीच्या दुखापतीमुळे विराट हा कर्णधार झाला. त्याने पहिल्या डावामध्ये ११५ धावा केल्या. कसोटीमध्ये सलग चार शतके विराटने स्वतःच्या नावावर करून घेतली. व भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला. दुसऱ्या गावामध्ये ३६४ धावांचे लक्ष समोर ठेवत, १९५ धावा केल्या व केवळ ३१५ धावावरच बाद झाले, पण हा सामना अतिशय रोचक होता. या खेळा नंतर विराटला कसोटी सामन्याचे कर्णधार पद सोपवण्यात आले व त्याने त्याची कर्णधार पदाची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पडली.
कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड
बेटिंग | गोलंदाजी | फिल्डिंग | कर्णधारपद | ||||
डाव | ११२ | षटके | २७.१ | कॅच | ६३ | एकूण सामने | ३५ |
नाबाद | ८ | सर्वोत्तम खेळी | शून्य | डावात सर्वाधिक झेल | ३ | सामने जिंकले | २१ |
चार धावांचा विक्रम (४से) | ६१८ | विकेट्स | शून्य | सर्वाधिक झेल | ४ | सामने गमावले | ५ |
सहा धावांचा विक्रम (६s) | १७ | इकोनोमिक रेट्स | २.८० | नाणेफेक | (५१.४३ टक्के) | ||
सर्वाधिक धावा | २४३ | बॉल | १६३ | ||||
सरासरी | ५५५४ | सर्वोत्तम सामना | – | ||||
स्कोअरिंग दर | ५४.४० | ||||||
अर्धशतक | १६ | ||||||
शतक | २१ | ||||||
द्विशतक | ६ | ||||||
तिसरे शतक | – | ||||||
खुले सट्टेबाजी | शून्य |
विराट कोहलीच्या आवडी-निवडी
आवडत्या अभिनेत्री | ऐश्वर्या राय बच्चन , करीना कपूर |
आवडते अभिनेते | आमिर खान , जॉनी डेप, ऋतिक रोशन |
आवडता खाद्यपदार्थ | सॅल्मन, सुशी, लंप चॉप्स |
आवडता विषय | ‘इतिहास’ |
आवडते स्टेडियम | ओवल (ऑस्ट्रेलिया), एडिलेड (ऑस्ट्रेलिया) |
इतर आवडता चित्रपट | बॉलीवुड– बॉर्डर, जो जीता वही सिकंदर, इश्क, 3 इडियट्स हॉलीवुड – रॉकी 4, आयरन मैन, साउथपा |
आवडती कार | एस्टन मार्टिन |
दुसरा आवडता खेळ | फुटबॉल |
आवडते पुस्तक | परमहंस योगानन्द योगी की आत्मकथा |
आवडते क्रिकेटपटू | सचिन तेंडुलकर , ख्रिस गेल |
जर्सी क्रमांक | १८ (भारत) १८ (आयपीएल) |
विराट कोहलीचे विक्रम आणि कामगिरी
कर्णधार विक्रम
- ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार.
- दोन किंवा अधिक द्विशतके करणारा पहिला भारतीय कसोटी कर्णधार.
- कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेट खेळाडू.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा कर्णधार.
- परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.
सर्वात जलद शतक
- भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (५२ चेंडूंत)
कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा
- एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा करणार खेळाडू (९७३).
- २०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०१२ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०१३ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०१२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०१५ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय खेळाडू.
- २०१६ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय खेळाडू.
महत्त्वाचे टप्पे
- सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.
- सर्वात जलद ६००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.
- सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय भारतीय.
- सर्वात जलद २५ एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.
- सर्वात जलद १५ एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.
- सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.
- सर्वात जलद २० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.
- सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.
- सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज.
- सर्वात जलद १० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.
विराट कोहलीचे अफेयर्स
सारा जेन
विराट कोहलीचे सर्वप्रथम नाव हे सारा जेनशी नाव जोडले गेले. सारा जेन ही मिस इंडिया होती व बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून सुद्धा साराने काम केले. सारा सोबत विराटचे बरेच दिवस अफेअर चालू होते. २०११ मध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान विराटचा सामना पाहायला सारा तिथे गेली होती, परंतु काही कारणास्तव त्यांचे नाते हे टिकले नाही.
संजना
संजनाशी विराटचे नाव जोडले गेले. व संजना ही एक मॉडेल होती. परंतु या दोघांबद्दल केवळ अफवा उठवल्या होत्या, ते दोघं चांगले मित्र आहेत, त्यापेक्षा अधिक काही नाही, असे त्या दोघांनी सांगितले.
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया ही एक साउथची अभिनेत्री आहे. दोघांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले. त्यानंतर विराट आणि तमन्नाची मैत्री खूप घट्ट झाली. ते दोघे डेटिंग करत होते, परंतु त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही.
इजाबेल लिटे
ही एक ब्राझिलियन मॉडेल व अभिनेत्री आहे. दोघांची भेट ही एका बिजनेस मीटिंगच्याद्वारे झाली. जेव्हा इजाबेल लिटे भारतामध्ये आली होती, त्यावेळी एक वर्षाहून अधिक काळ भारतामध्ये कामानिमित्त राहील. त्यादरम्यान विराट आणि इजाबेल लिटेची घनिष्ठ मैत्री झाली. परंतु, त्यांचे हे अफेअर जास्त काळ टिकले नाही.
विराट कोहलीची व्यावसायिक गुंतवणूक
विराट कोहलीला क्रिकेट बरोबरच फुटबॉल हा देखील खेळ आवडतो. 2014 मध्ये विराट कोहली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोव्याचा सहमालक झाला होता. भारतामध्ये फुटबॉल हा खेळ वाढीस लागावा यासाठी त्यांनी क्लब मध्ये गुंतवणूक केली असे देखील तो म्हणतो. हा माझ्यासाठी एक व्यवसायिक उपक्रम आहे, ज्याकडे मी भविष्याच्या दृष्टीने पाहत आहे. असे त्याचे म्हणणे आहे.
नोव्हेंबर 2014 मध्ये कोहली आणि अंजना रेड्डी यांनी मिळून WROGN या तरुणांसाठीचा फॅशन ब्रँड ची सुरुवात केली. 2015 मध्ये या ब्रँड ने पुरुषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरुवात केली आणि मिंत्रा तसेच शॉपर्स स्टॉप यांच्याशी हात मिळवणे देखील केली गेली.
2015 मध्ये विराट कोहलीने संपूर्ण देशभरात व्यायाम शाळा आणि स्वास्थ्य केंद्र यांची साखळी सुरू करण्यासाठी जवळपास 90 करोडची गुंतवणूक केली.
विराट कोहली फाउंडेशन
मार्च 2013 मध्ये विराट कोहलीने विराट कोहली फाउंडेशन नावाने गरिबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे, तसेच चारिटी साठी पैसा गोळा करणे, हे या संस्थेचा मूळ उद्देश आहे. विराट कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थांसोबत ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, जागरूकता निर्माण करणे, मदत मिळवणे यासाठी काम करेल.
मे 2014 मध्ये सेव द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाउंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला. आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या आरोग्यासाठी दिला गेला.
विराट कोहलीचे लग्न
अनुष्का शर्मा बॉलीवूड अभिनेत्री आहे. विराट आणि अनुष्काने २०१३ मध्ये एका जाहिरातीसाठी एकत्र काम केले. ती त्यांची पहिली भेट होती. त्यानंतर विराट आणि अनुष्कामध्ये घनिष्ठ मैत्री झाली. अनुष्का स्वतःच्या व्यस्त आयुष्यातून सुद्धा विराटचे सामने पाहायला स्टेडियम मध्ये जायची. विराट अनुष्काचे एकमेकांवर मनापासून प्रेम होते. पण त्यांच्यात काही वाद झाले. पण अनेक वाद होऊन ही ते दोघे एकत्र होते. डिसेंबर २०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्न केले.
विराट कोहली ब्रँड एम्बैसेडर लिस्ट
- ऑडी इंडिया
- फिलिप्स इंडिया
- इंडिया विक्स
- बूस्ट एनर्जी ड्रिंक्स
- रॉयल चॅलेंजर अल्कोहोल
- व्हॉल्वोलिन
- पुमा
- एमआरएफ टायर्स
- उबर इंडिया
- अमेरिकन टूरिस्ट
विराट कोहलीला मिळालेल्या पुरस्कारांची यादी
२०१२ | आवडत्या क्रिकेटरसाठी पीपल्स चॉइस अवॉर्ड |
२०१२ | ICC ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार |
२०१३ | क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार |
२०१७ | CNN-IBN इंडियन ऑफ द इयर |
२०१७ | पद्मश्री पुरस्कार |
२०१८ | सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी |
विराट कोहलीचे अंदाजे उत्पन्न
एक दिवसीय सामन्यातून मिळकत | सुमारे ४ लाख रुपये |
T-20 सामन्यातून मिळकत | सुमारे ३ लाख रुपये |
कसोटी सामन्यातून उत्पन्न | सुमारे १५ लाख रुपये |
आयपीएल कारवाई पासून | सुमारे १७ कोटी |
पुनर्प्रशिक्षण शुल्क | वर्षाला अंदाजे ०७ कोटी रुपये |
विराट कोहलीचे रेकॉर्ड
२०११ च्या विश्वचषकात शतक झळकावले. |
अवघ्या बावीस वर्षात २ एकदिवसीय सामन्यात १०० धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू होता. |
एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०००, ३०००, ४००० आणि ५००० धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता. |
२०१३ मध्ये त्याने जयपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बावन्न धावांमध्ये शतक झळकावले होते. |
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७५०० धावा करणारा तो भारतीय क्रिकेटपटू होता. |
विराट कोहलीच्या आयुष्यातील मनोरंजक तथ्ये
- २००६ मध्ये विराटचे वडील प्रेम कोहली ज्यावेळी गंभीर आजाराने निधन झाले. त्यावेळी विराटने हा सर्व गोष्टी विसरून, रणजीत मालिकेत कर्नाटक विरुद्ध सामना खेळण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्याच्यासाठी प्रचंड कठीण होता. त्यामध्ये त्याने आपल्या संघासाठी ३९ धावा केल्या.
- पूर्ण विश्वामध्ये फक्त आठ क्रिकेटपटूंनी २० एक दिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावले. शतक झळवणारा विराट कोहली हा क्रिकेटपटू आहे. त्याआधी सचिन तेंडुलकरचे नाव त्यामध्ये नोंदवले जाते.
- विराटने सलग एक दिवसीय क्रिकेटमध्ये हजारहून अधिक धावा केल्या. यामध्ये सचिन, सौरभ व एम.एस धोनी नंतर विराटचा चौथा क्रमांक लागतो.
विराट कोहलीचा वाद
मैदानात – बोटाची चुकीची खूण केली
विराट कोहलीने सामन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मैदानात बसलेल्या प्रेक्षकांकडे बोटाची चुकीची खूण केली, हे क्रिकेटच्या मुख्य नियमांच्या विरोधात होते. आणि अपमानास्पद होते. यासाठी विराटला भरपाई द्यावी लागली. विराटने लढलेल्या त्या मॅचच्या ५० टक्के भाग विराटला दंड म्हणून द्यावा लागला.
बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन
विराट अनुष्का शर्माचे अफेअर हे पूर्ण जगभर प्रसिद्ध होते. ज्यामुळे त्याने मॅचदरम्यान तिच्याशी गप्पा मारल्या. जे नियमांच्या विरुद्ध असल्याचे सांगितले जाते, त्यामध्ये त्या दोघांना सल्ला देऊन त्या गोष्टीतून सोडण्यात आले.
पत्रकारांशी गैरवर्तन
२०१५ च्या दरम्याने एका पत्रकाराने पेपरमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती छापली. जी विराटला अजिबात आवडली नाही. व रागाच्या भरामध्ये विराटने त्या पत्रकाराला खूप खरे खोटे ऐकवले. यासाठी विराटने नंतर त्या पत्रकाराची माफी सुद्धा मागितली.
याशिवाय स्मित आणि कोहली मधील वाद गौतम गंभीर सोबतचा वाद असे अनेक वाद याशिवाय त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंत अनेक छोटे-मोठे वाद झाले आहेत.
FAQ
१. विराट कोहली चा जन्म कुठे झाला?
विराट कोहली याचा जन्म ०५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये झाला.
२. विराट कोहलीचा आवडता अभिनेता कोण आहे?
आमिर खान, जॉनी डेप, ऋतिक रोशन हे विराट कोहलीचे आवडते अभिनेते आहेत. .
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास भारताचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहलीबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.