Raksha Bandhan Information In Marathi Language | रक्षाबंधन माहिती मराठी : – भारतातील अनेक भागात श्रावणात साजरा केला रक्षाबंधन, हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे. जगभरात जिथे जिथे हिंदू धर्माचे लोक राहतात तिथे हा सण बंधू-भगिनींमध्ये साजरा केला जातो. या सणाला अध्यात्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे.
रक्षाबंधन माहिती मराठी : Raksha Bandhan Information In Marathi Language
मित्रांनो, भारत देश हा आपल्या धार्मिक संस्कृतीचा देश आहे. या देशात अनेक प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. असाच एक सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी रक्षाबंधन (Rakhi Purnima Marathi) म्हणून साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे हा सण ऑगस्ट महिन्यात येतो. हा सण बहिण भावाच्या अतूट आणि दृढ प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या सणाचा इतिहास, याचे महत्त्व काय आहे आणि Raksha Bandhan muhurat 2024 हे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पाहूया – Raksha Bandhan Chi Mahiti.
रक्षाबंधनचा इतिहास
सर्वप्रथम रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली आणि कुणी केली, याबाबत इतिहासमध्ये ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु इतिहासात डोकावले तर आपल्या लक्षात येते की, रक्षाबंधनाचा इतिहास हा खूप जुना असून यासंबंधी पौराणिक कथा दंतकथांचा उल्लेख केलेला आढळून येतो.
इतिहास कथा 01
एका आख्यायिकेनुसार इसवी सन पूर्व ३२६ मध्ये जेव्हा सिकंदर भारतात आला. त्यावेळी सिकंदरची बायको रोषन हिने राजा पौरसला एक राखी पाठवली होती आणि त्या राखीसोबत तिने राजाकडून एक वचन घेतले होते की, सिकंदरवर राजा कधीही वार करणार नाही आणि राजाने ही या वाचनाचा मान ठेऊन जेव्हा जेव्हा त्या हातात बांधलेले राखीकडे त्याचे लक्ष गेले, त्यावेळी राजाने सिकंदरवर कोणताही वैयक्तिक हमला केला नाही.
इतिहास कथा 02
सन १९०५ मध्ये बंगालमध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने जाती जातीवरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालमधील हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये एकता टिकून राहावी, यासाठी राखीची प्रथा सुरू केली आणि संपूर्ण देशामध्ये या एकतेचा संदेश देऊन या राखी बंधनाची सुरुवात केली.
इतिहास कथा 03
एका ऐतिहासिक कथेनुसार राणी कर्णावती आणि हुमायू यांचीही एक कथा प्रसिद्ध आहे. सन १५३५ मध्ये ज्यावेळी चित्तोडची राणी कर्णावतीला वाटू लागले, त्यांचं हे राज्य गुजरातच्या सुलतान बहादुर शहा पासून वाचू शकणार नाही. त्यावेळी तिने हुमायुला राखी पाठवून बहिणी या नात्याने मदत मागितली होती, आणि हुमायूनही मदत केली होती. असे सांगितले जाते.
वाचा👉 ओल्या नारळाची बर्फी : या रक्षाबंधन – नारळी पौर्णिमेला बनवा खमंग नारळाच्या वड्या, सोपी रेसिपी आत्ताच वाचा
रक्षाबंधनचा अर्थ
रक्षा आणि बंधन या दोन शब्दांनी मिळून रक्षाबंधन हा शब्द तयार होतो. संस्कृत मध्ये याचा अर्थ संरक्षण करणारे बंधन असा होतो. रक्षा म्हणजे संरक्षण प्रदान करणे, आणि बंधन म्हणजे एक गाठ जी रक्षण करते.
हे दोन शब्द म्हणजेच भाऊ आणि बहीण असे सुचवले जाते. हे शब्द फक्त रक्ताचे नाते स्पष्ट करत नाहीत तर एक पवित्र नातेसंबंध दर्शवतात.
रक्षाबंधन सणाची माहिती – Raksha Bandhan Chi Mahiti
भारतातील प्रमुख सणांपैकी रक्षाबंधन या सणाला अतिशय महत्त्व आहे. हा सुंदर सण दरवर्षी श्रावणातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण भावांमधील प्रेमाचे नाते जपण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण, रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
सणाचे नाव – | रक्षाबंधन |
दुसरे नाव – | राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा |
या दिवशी असणारा दुसरा सण – | नारळी पौर्णिमा |
धर्म – | हिंदू |
मराठी महिना – | श्रावण |
इंग्रजी महिना – | ऑगस्ट |
साजरा करणारे – | सर्व भाऊ बहीण |
रक्षाबंधनाचे महत्त्व – Importance Of Raksha Bandhan In Marathi
आपल्या भारत देशामध्ये धार्मिक संस्कृतीला सणांना फार महत्त्व आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने सण साजरे केल्यामुळे, नात्यांमधील प्रेम बंध घट्ट होतात. असाच एक नात्यांना एकत्र आणणारा सण म्हणजे रक्षाबंधन. याला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.
आपल्या देशामध्ये प्रत्येक स्त्रीला आपण आई बहिणीचा दर्जा देत असतो. त्यामुळे या नात्याला अजून घट्ट करण्याचे काम रक्षाबंधन करीत असतो. या दिवशी प्रत्येक भावाची सख्खी बहिणी त्याला राखी बांधतेच, पण त्याचबरोबर आजूबाजूचे नातेसंबंधी, शेजारपाजारी, आपल्या वर्गातील, महाविद्यालयातील मित्र मंडळी यांना देखील भारतीय बहिणी राखी बांधत असतात. यामुळे कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे सामाजिक सलोख्यामध्ये बंधुता एकता निर्माण होत असते. आपलेपणा वाढत असतो म्हणून हा सण खूप महत्त्वाचा आहे.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, आणि भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षणकरणार, असे वचन देतात. त्यानंतर भाऊ बहीण एकमेकांना मिठाई आणि भेट वस्तू देतात.
वाचा👉 नारळी पौर्णिमा सणाची संपूर्ण माहिती
रक्षाबंधन सण का साजरा करतात? – Why We Celebrate Raksha Bandhan
राखी पौर्णिमा सण जवळ आला आहे, हे ऐकून अनेक भाऊ बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद असतो. हे भाऊ बहिणीचे नाते इतकी घट्ट असते, की ज्याचे आपण शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही. हे नाते इतके पवित्र आहे, की त्याचा जगभर आदर केला जातो. या जगातील प्रत्येक बहिण आपला भाऊ आनंदी, निरोगी असावा, तसेच त्याला सगळी सुखे मिळावी, यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो. यासाठी बहिण भावाचे हे नाते रक्ताचे असावे असे नाही. तर कुठलाही भाऊ कुठल्याही बहिणीचे रक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे कुठलीही बहीण आपल्या कुठल्याही भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असते. म्हणून हा सण आपण मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करतो.
हा लेख नक्की वाचा 👇इमेज वर क्लिक करा
रक्षाबंधन कशाप्रकारे साजरा करतात? How To Celebrate Raksha Bandhan In Marathi
सर्वप्रथम बहिण आपल्या भावासाठी बाजारातून राखी विकत घेते. या सणा दिवशी भावाला ओवाळताना ती नवीन कपडे परिधान करते. यासाठी ती नवीन कपडे विकत घेते. त्याचप्रमाणे भाऊ देखील रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतःला घालण्यासाठी नवीन कपड्यांची खरेदी करत असतो. बहिणीला भेटवस्तू खरेदी करत असतो. ज्यावेळी बहीण भावाला ओवाळते, त्यावेळी ती सर्वप्रथम पूजेचे ताट तयार करते. त्यानंतर ती आपल्या भावाच्या कपाळाला टिळा लावून त्याच्या हातावर राखी बांधते. ओवाळून झाल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तू देतो. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो.
रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य – Key Features Of Raksha Bandhan In Marathi
राखी पौर्णिमा हा एक असा सण आहे जो केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला कोणत्याही जाती धर्माचे बंधन असत नाही. म्हणून हा सण किंवा हिंदूच नाही तर सर्व धर्मीय मोठ्या आनंदाने आणि धुमधडाक्यात साजरा करत असतात. यामुळे सामाजिक बंधुता, एकता यामध्ये वाढ होत असते, हे या सणाचे मोठे वैशिष्ट्य आपल्याला पहावयास मिळते.
रक्षाबंधन सणामागील शास्त्र – Spiritual Science Of Raksha Bandhan In Marathi
या सणामध्ये, राखी बांधण्यामागे देखील एक शास्त्र सांगण्यात आलेले आहे. या सणादिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते आणि त्या पुरुषांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होत असतात, असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी शरीरामध्ये चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्याच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा हा पवित्र धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम प्रत्येक बहीण करीत असते. या पवित्र राखीचे बंधन घालून सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहीण करते, असे शास्त्रात सांगितले जाते.
भारतामध्ये इतर राज्यांमधील रक्षाबंधन – Raksha Bandhan Celebration In Other States
१. दक्षिण भारत
दक्षिण भारतामध्ये रक्षाबंधनाला अवनी अबिथम म्हणून ओळखले जाते. या ठिकाणच्या ब्राह्मणांसाठी या सणाला अधिक महत्त्व आहे. कारण या दिवशी ते अंघोळ केल्यावर मंत्र पठणासह त्यांचा पवित्र धागा ज्याला आपण जानवे असे म्हणतो ते बदलतात.
२. गुजरात
गुजरात मधील लोक श्रावण सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करतात. या दिवशी तेथील लोक पंचगव्यामध्ये कापूस भिजवून शिवलिंगाभोवती बांधतात. या पूजेला या ठिकाणी पावितो पन्ना असे म्हणतात.
वाचा👉 महाशिवरात्र सणाची संपूर्ण माहिती
३. पश्चिम घाट –
वरूण देवामुळे या ठिकाणी राखी पौर्णिमा साजरी केली जाते, या दिवशी वरूण देवाला नारळ अर्पण केला जातो. म्हणूनच या राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
४. उत्तर भारत –
रक्षाबंधन हा सण कजरी पौर्णिमा म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. या सणाच्या वेळी गहू आणि इतर धान्य पसरवली जातात. त्या दिवशी माता भगवतीची पूजा केली जाते, आणि चांगल्या पिकाची इच्छा व्यक्त केली जाते.
रक्षाबंधनाची तयारी – Preparation Of Raksha Bandhan In Marathi
या सणाच्या महिनाभर आधी बाजारामध्ये राख्या उपलब्ध होतात. त्यामुळे राख्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते.
रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळताना नवीन कपडे परिधान केले जातात. त्यासाठी कपड्यांची खरेदी केली जाते.
बहिण भाऊ एकमेकांना ओवाळल्यानंतर भेट वस्तू देत असतात. त्यामुळे त्या भेट वस्तू कोणत्या, घ्यायच्या कशा घ्यायच्या, याबाबतीत चर्चा सुरू होऊन नंतर त्याची खरेदी केली जाते.
बाहेरगावी असणाऱ्या भावांसाठी राखी पाठवायची असेल, तर पंधरा दिवस आधी पोस्टामार्फत राखी पाठवली जाते.
रक्षाबंधनच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी – Importance Of Raksha Bandhan In Marathi
१. रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते, त्याचप्रमाणे हा सण मराठी महिन्यात श्रावणामध्ये आल्याने याला श्रावणी असेही म्हणतात.
२. या सणाच्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. समुद्रामध्ये नारळ अर्पण करून पाण्यापासून आपल्या सगळ्यांचे रक्षण होण्यासाठी, त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांच्या रक्षणासाठी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. यानंतर मच्छीमार बांधव मासेमारी करण्यासाठी आपल्या होड्या, बोटी समुद्रामध्ये ढकलतात.
३. बहिण भावातील वितुष्ट दूर करण्यासाठी, प्रेमभावना वाढवण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
४. हा सण साजरा केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदाचे असते.
५. हा असा एकमेव सण आहे ज्याला जाती धर्माचे बंधन नाही.
६. हा सण संपूर्ण जगभर साजरा केला जात असल्यामुळे ,धार्मिक त्याचप्रमाणे जातीय एकोपा वाढतो.
रक्षाबंधन विधी – Rakhi Purnima Marathi
- या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर साफ करून नंतर अंघोळ केली जाते.
- सर्वप्रथम घरातील देवाची पूजा केली जाते.
- घरामध्ये नैवेद्य, गोडधोडाचे पदार्थ केले जातात.
- राखी बांधण्यासाठी राखीची थाळी सजवली जाते.
- राखीच्या थाळीमध्ये निरंजन, अक्षता, चंदन, हळदी, कुंकूचा करंडा, कापूस त्यानंतर मिठाई यांनी ताट सजवले जाते.
- पाट मांडून पाटाभोवती रांगोळी काढली जाते.
- नंतर बहिण आपल्या भावाला पाटावर बसवते.
- प्रथम कपाळावर चंदनाचा कुंकवाचा टिळा लावते त्यानंतर डोक्यावर अक्षता आणि कापूस ठेवते आणि मग निरांजनाने ओवाळते. त्यानंतर ती त्याच्या मनगटावर राखी बांधते, आणि शेवटी मिठाई खाऊ घालते.
- भाऊ मोठा असेल तर बहिण त्याला नमस्कार करते, आणि बहीण मोठी असेल तर भाऊ तिला नमस्कार करतो आणि तिच्या थाळीमध्ये ओवाळणी म्हणून भेट वस्तू देतो.
रक्षाबंधन कधी आहे ? Raksha Bandhan muhurat 2023
मित्रहो यावर्षी हा सण कधी आहे आणि Raksha Bandhan muhurat 2023 काय आहे ते जाणून घेऊ .
- यावर्षी ३० ऑगस्ट २०२३ बुधवार या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.
- पौर्णिमा तिथी आरंभ – सकाळी १०.५८ सुरू
- पौर्णिमा तिथी समाप्त ३१ ऑगस्ट सकाळी ०७.०५ पर्यंत
- या दिवशी भद्रकाल देखील सुरू होत आहे. त्यामुळे या वेळामध्ये राखी बांधता येत नाही.
- भद्रकाल सकाळी १०.५८ सुरू
- भद्रकाल समाप्ती रात्री ०९.१५ पर्यंत.
- भद्रकालामध्ये राखी बांधली जात नाही
धार्मिक शास्त्रामध्ये भद्रकालामध्ये कोणतेही शुभकार्य केले तर ते अशुभ मानले जाते. कारण या भद्रकालामध्ये रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान श्रीरामांनी त्याचा वध करून त्याच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला होता. त्यामुळे या काळामध्ये राखी बांधल्याने भावाच्या आयुष्य कमी होते, असे समजले जाते. म्हणून या काळामध्ये राखी बांधली जात नाही.
रक्षाबंधनाचा विशेष पदार्थ – Special Recipe Of Raksha Bandhan In Marathi
रक्षाबंधन हा दिवस उत्सवाचा तर असतोच, त्याचप्रमाणे मेजवानीचा देखील असतो. या दिवशी अनेक खास पदार्थ केले जातात. काही ठिकाणी लाडू, रसमलाई, गुलाब जामुन, शाही तुकडा, लौकीकी बर्फी, शेवयाची खीर यासारखे पदार्थ केले जातात. या दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते. त्यामुळे विशेष करून महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी नारळी भात केला जातो.
रक्षाबंधन कथा – Raksha Bandhan Story Marathi
रक्षाबंधन कथा 01
एकदा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध सुरू असताना देवांचा पराभव होऊ लागला. त्यावेळी देवांचे गुरु ब्रूहस्पती यांनी श्रावणी पौर्णिमेला इंद्राच्या हातात अपराजिता नावाचे कवच बांधले, आणि त्यामुळे देव लढाई जिंकले. राक्षसांचा राजा बलि याला दत्तगुरु शुक्राचार्यांनी राखी बांधली आणि त्यामुळे देवांशी झालेल्या एका लढाईमध्ये तो जिंकला.
रक्षाबंधन कथा 02
महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की, श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झालेली आणि त्यातून रक्त वाहत होते, त्यावेळी पांडव पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्राव थांबवला होता. तेव्हापासून श्री कृष्णाने आपली बहीण द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि वस्त्रहरण प्रसंगी त्याने दौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.
रक्षाबंधन कथा 03
याबाबत आणखी एका पौराणिक आख्यायिकेनुसार विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात ढकलले. या पापामुळे विष्णूला बळीराजाच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावे लागले. त्याची ही अवस्था पाहून माता लक्ष्मीला फार वाईट वाटले, आणि विष्णूला या सगळ्यातून सोडवण्यासाठी माता लक्ष्मीने नारद मुनिंना एक युक्ती सांगितली. या युक्तीनुसार लक्ष्मी बळीराजाला भेटायला गेली. आपल्या घरी माता लक्ष्मी आलेली पाहून बळीराजाला फार आनंद झाला. त्याने तिचे स्वागत केले आणि विचारले की मी आपली काय सेवा करू ?
त्यावेळी लक्ष्मी म्हणाली की मी आपल्याला राखी बांधायला आले आहे, आणि लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधली. बहिणीला भेट द्यायला हवी म्हणून बळीराजांनी विष्णूला द्वारपाल होण्यापासून मुक्त केले आणि लक्ष्मी आणि विष्णू दोघेही आनंदाने घरी परतले.
Raksha bandhan 2023 FAQ
रक्षाबंधन या सणाचे दुसरे नाव काय?
रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते.
2023 मध्ये राखी पौर्णिमा कोणत्या तारखेला आहे?
2023 मध्ये राखी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट बुधवारी आहे.
रक्षाबंधनचा अर्थ काय आहे?
रक्षाबंधन रक्षण करणे आणि बंधन म्हणजे बांधले जाणे.
रक्षाबंधन हा कोण साजरी करतात?
रक्षाबंधन प्रत्येक भाऊ-बहीण साजरे करतात.
या सणाच्या दिवशी कोणत्या हातावर भावाला राखी बांधली जाते?
या सणा दिवशी भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधली जाते.
rakshabandhan kab hai 2023 ?
2023 मध्ये राखी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट, बुधवारी आहे.
rakshabandhan kitne tarikh ko hai ?
2023 मध्ये राखी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट, बुधवारी आहे.
कोणत्या हाताला राखी बांधायची?
हिंदू धार्मिक शस्त्रांप्रमाणे राखी फक्त उजव्या हाताच्या मनगटावरच बांधली पाहिजे असे नमूद केले आहे. शरीराचा उजवा भाग हा धार्मिक दृष्ट्या शुभ मनाला जातो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो असे मानले जाते. उजव्या बाजुमध्ये मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता जास्त असते; तर डाव्या हाताचा वापर करणे हे प्रत्येक धार्मिक विधीसाठी अशुभ मनाला जातो
पौर्णिमेला राखी बांधता येईल का?
यावर्षी ३० ऑगस्ट २०२३ बुधवार या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.
पौर्णिमा तिथी आरंभ – सकाळी १०.५८ सुरू
पौर्णिमा तिथी समाप्त ३१ ऑगस्ट सकाळी ०७.०५ पर्यंत
या दिवशी भद्रकाल देखील सुरू होत आहे. त्यामुळे या वेळामध्ये राखी बांधता येत नाही.
भद्रकाल सकाळी १०.५८ सुरू
भद्रकाल समाप्ती रात्री ०९.१५ पर्यंत.
भद्रकालामध्ये राखी बांधली जात नाही
निष्कर्ष
आम्ही आमच्या आजच्या रक्षाबंधन माहिती मराठी या लेखद्वारे,रक्षाबंधन या सणाविषयीची माहिती, इतिहास सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आपल्याला हा लेख Raksha Bandhan Information In Marathi Language वाचून कसे वाटले ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. काही सुधारणा आवश्यक असतील, तर त्या देखील आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.
तोपर्यंत नमस्कार