शिवनेरी किल्ला माहिती मराठी : SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE | शिवनेरी किल्ला माहिती मराठी – शिवनेरी किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. शिवनेरी दुर्ग किंवा शिवनेरी किल्ला हा जुन्नर गावाजवळ असलेला एक महान ऐतिहासिक किल्ला आहे तसेच शिवनेरी हे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थानही आहे . छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे हे विजापूरच्या सुलतान आदिलशाहच्या सैन्यात सेनापती होते. वारंवार होत असलेल्या युद्धामुळे, शहाजी राजेंना आपल्या गर्भवती पत्नी जिजाबाईच्या सुरक्षेची चिंता होती, म्हणून त्याने आपल्या कुटुंबाला शिवनेरीला पाठवले.

शिवनेरी हा चारही बाजूंनी खडकांनी वेढलेला अभेद्य किल्ला होता. हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.

Table of Contents

SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE : शिवनेरी किल्ला माहिती मराठी

नाव शिवनेरी किल्ला
उंची३५०० फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणजिल्हा पुणे, महाराष्ट्र
जवळचे गाव जुन्नर
डोंगररांग नाणेघाट
स्थापना इ.स. ११७०
सद्यस्थिती चांगली

शिवनेरी किल्ला पुणे (Shivneri Killa Information In Marathi)

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण डोंगरी चढाव असल्यामुळे हा किल्ला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे प्रसिध्द मंदिर व जिजाऊ माता व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शिवपिंडीसारखा दिसतो. किल्ला तसा फारसा मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना, सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे, असा उल्लेख केला आहे.

आज आपण या दुर्गाबद्दल जाणून घेऊया, जिथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पडली आणि छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली.

SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

शिवनेरी किल्ल्याचा नकाशा

शिवनेरी ते मुख्य शहर अंतर (Distance From Shivneri to Main City)

  • अहमदनगर पासून साधारण १२० किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे.
  • पुण्यापासून साधारण ९५ किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे.
  • मुंबईपासून साधारण १५५ किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास (Shivneri Fort History in Marathi)

  • जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच आताचे जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती.
  • शिवनेरी किल्ल्याचा इतिहास हा २००० वर्षा पूर्वीचा आहे. या ठिकाणी यादवांनी राज्य प्रस्थापित केले होते व याच काळामध्ये शिवनेरीला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
  • ११४३ मध्ये मलिक उल तुजार याने यादवांचा पराभव करून, किल्ला स्वतःच्या शासनामध्ये घेतला. शक राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शाखांचा नाश केला आणि जुन्नर व तेथील सर्व परिसरावर आपलेच वर्चस्व प्रस्थापित केले.
  • इ.स. १४४३ मध्ये मलिक उल तुजार याने यादवांचा काळात स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून हा किल्ला सर केला आणि हा बहमनी राजवटीखाली आला.
  • इ.स. १४७० मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला.
  • इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला. जिजाबाईंचे वडील श्री जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जीजबाई गरोदर असताना शहाजी राजांनी त्यांना ५०० सैनिक त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले.
  • शके १५५१ शुक्ल नाम संवत्सर, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर श्री शिवाजी राजे यांचा जन्म जाला. ही तारीख म्हणजे १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०.
  • इ.स. १६३२ मध्ये जिजामातांनी शिवाजींनसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
  • इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले.
  • पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.
  • इ.स. १७५५ च्या पेशवे-आंग्रे युद्धानंतर नाना साहेब पेशव्यानीं तुळाजीला शिवनेरीवर कैदत ठेवले होते. 
  • सन १७६५ मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. या मध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला.
  • पुढे सन १७७१ मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले.
  • सन१० मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.

सिंधुदुर्गातील २३ किल्ले

शिवनेरी किल्ल्याचा भुगोल

शिवनेरी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात पुणे शहरापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर प्रांतात आहे. नाणेघाट डोंगररांगा मध्ये वसलेला हा गिरीदुर्ग. त्याची समुद्रपाटीपासून उंची जवळजवळ ३५०० फूट इतकी आहे.

पूर्वी नाणेघाट हा व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग मानला जायचा. त्यावर नियंत्रणासाठी या दुर्गाची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे. या डोंगररांगे मध्ये शिवनेरी, चावंड, जीवदान, हडसर यांसारखे दुर्ग आहेत. किल्ल्यांच्या भिंती मातीच्या आणि खडकाच्या आहेत. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून त्याचे प्रवेशद्वार नैऋत्य बाजूने आहे.

शिवनेरी किल्ल्याचे महत्व आणि इतिहास

शिवाजी महाराजांच्या जन्माची कथा मराठी (Birth Story of Shivaji Maharaj in marathi)

शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजीराजे विजापूरच्या सुलतान आदिलशाहाच्या सेनेमध्ये एक सेनानी होते. सतत होणाऱ्या युद्धांच्या मुळे शहाजीराजे त्यांच्या गर्भवती पत्नी जिजाबाई यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच चिंतित होते. त्यामुळे त्यांनी १६२९ मध्ये जिजाऊ मांसाहेब गरोदर असताना त्यांना ५०० स्वार सोबत देऊन एका रात्रीत शिवनेरीवर पाठवून, सुरक्षेसाठी स्थलांतरित केले.

गडावर आपल्याला शिवाई देवीचे मंदिर बघायला मिळते. या देवीच्या नावावरूनच बाळाचं नाव ठेवायचं असं जिजाऊंनी ठरवलं आणि शके १५५१ शुक्ल नाम सवस्त्रे, फाल्गुन वद्य तृतीयेला सूर्यास्तानंतर संबंध मोघलशाहीचा कर्दनकाळ, अन्यायाचा गर्द अंधारात बुडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी, अंधाराला भेदून सारा जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा सूर्योदय झाला, शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ १९ फेब्रुवारी १६३० रोजी शुक्रवारी सूर्यास्तानंतर गडावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला

शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव कसे पडले? (How did Shivaji Maharaj Get the Name Shivaji )

श्री शिवाई मातेसमोर जिजाऊ मातेने नवस केला होता, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव त्याला ठेवीन. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शुक्रवारी सूर्यास्तानंतर गडावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले.

किल्ले लोहगड

शिवनेरी किल्ला
Shivneri Fort

शिवनेरी किल्ल्याचे वर्णन – गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा

साखळी वाट

साखळी वाटेला चोरवड सुद्धा म्हणतात. या वाटेने गडावर जायचे झाले असेल तर नव्या बस स्टँडच्या समोरच्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे लागते,इथे असलेल्या चौकाच्या डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला असलेल्या मंदिराकडे पोहोचावे. इथे खोदलेल्या पायऱ्यांच्या वाट थोडी अवघड असून, गडावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाजे वाट  

त्यामुळे किल्ला पाहायचा असल्यास पायरीच्या वाटेने जाणं सोयीस्कर ठरेल. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

शिवनेरी किल्ल्यावर असलेली वीर मावळ्यानची उद्याने

तानाजी मालुसरे उद्यान (Tanaji Malusre Garden)

गड आला पण सिंह गेला, असे तानाजी मालुसरे यांच्या नावाने उद्यान शिवनेरीवर आहे .

बाजीप्रभू देशपांडे उद्यान (Bajiprabhu deshpande Garden)

बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावाने उद्यान शिवनेरीवर आहे.

जिवा महाला उद्यान (Jiva Mahal Garden)

जिवा महाला यांच्या नावाने उद्यान शिवनेरीवर आहे.

महादेव कोळी चौथरा (Mahadev Koli Chauthara)

मोगलांनी महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी शिवनेरीला वेढा टाकला व सुमारे १५०० महादेव कोळ्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत.

या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले. यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले

शिवनेरी किल्ल्यावरील सात दरवाजे (Seven Gates At Shivneri Fort)

Seven Gates At Shivneri Fort
  • हा किल्ला पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर एवढा अंतरावर आहे. शिवनेरी किल्ल्याला सात दरवाजे आहेत. हे दरवाजे वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या राजवंशांनी बनवले होते.
  • पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा
  • मुख्य दरवाजा हा दरवाजा पेशव्यांनी बनवला होता. या दरवाजाच्या आजूबाजूचा परिसर हा खूपच सुंदर आहे.
  • महादरवाज्यानंतर दुसरा दरवाजा लागतो तो गणेश दरवाजा.
  • गणेश दरवाजा नंतर तिसरा दरवाजा लागतो. तो म्हणजे पिराचा दरवाजा. हा दरवाजा बहमनी राजाच्या काळामध्ये बनवला गेला होता.
  • पिराच्या दरवाजा नंतर चौथा दरवाजा लागतो तो हत्ती दरवाजा. हा दरवाजा यादवांच्या काळातील शेवटची निशाणी आहे.
  • शिवाय देवी दरवाजाची रचना ही पुण्यातील पेशवा यांनी केली. या देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे शिवाजी असे पडले.
  • मेणा दरवाजा.
  • कुलूप दरवाजा हा शिवनेरी किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा, म्हणजेच सातवा दरवाजा आहे. हा दरवाजा कदाचित निजामशाहीच्या काळामध्ये बांधला गेला असावा.

अभेद्य -मुरुड जंजिरा

शिवनेरी किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे (places to visit on shivneri fort)

अंबरखाना (Ambarkhana)

अंबरखाना म्हणजे धान्य साठवण करून ठेवण्याची जागा. याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात आले होते.

शिवजन्मभूमी (Shivjanmbhumi)

places to visit on shivneri fort

शिवनेरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवजन्मभूमी हे आहे. या ठिकाणी बाळ शिवाजी राजांचा जन्म झाला होता. अंबरखान्यापासून शिवजन्मभूमी पर्यंत जाण्यासाठी साधारणतः एक किलोमीटर अंतर पार करावे लागते.

शिवजन्मभूमी इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. या इमारतीमध्ये महाराजांची मूर्ती व पाळणा आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. तिकडूनच बाहेरील जुन्नर शहराचे अनोखे व विलोभनीय दृश्य पहावयास मिळते.

shivneri fort

गंगा जमुना पाण्याच्या टाक्या (Ganga Jamuna Water Tanks)

गंगा जमुना पाण्याच्या टाक्या ह्या फार प्राचीन काळापासून आहेत.

बदामी तळे (Badami Tale)

बदामी तळ्यामध्ये दोन खोल्या आहेत. या ठिकाणी उन्हाळ्याच्या वेळी बसले जात असे.

कडेलोट टोक (Kadelot Tok)

बदामी तळ्याच्या बाजूने कडेलोट टकाकडे एक रस्ता जातो. ज्या लोकांना मृत्युदंड दिला जाईल, त्या लोकांना त्या कडेलोट टोकावरून ढकलून दिले जात असे. या कडेलोट टोकावरून पूर्ण जुन्नर शहराचे मनमोहक दृश्य डोळ्यात सामावून घेता येते.

हमामखाना (Hamamkhana)

हमामखाना म्हणजे अंघोळ करण्याची जागा. किल्ल्यावर असणारे हमामखाने हे शिवाजी महाराजांच्या जन्मा पूर्वीचे आहेत, या जागेचे बारीक निरीक्षण केल्यास, या हमामखानाना सुंदर रंगरंगोटी केलेली दिसून येते. या ठिकाणी गंगा, जमुना टाक्यांच्या पाण्याची व्यवस्था केली होती, त्यासोबत गरम पाण्याची व्यवस्था देखील उपलब्ध होती.

बाजारपेठ (Market Place)

किल्ल्यावर हमामखान्याच्या बाजूलाच तेल विक्रेते, अत्तर विक्रेते, मालिश करणारे, केस कापणारे व अगरबत्ती विक्रेते यांची दुकाने होती. म्हणजेच या ठिकाणी पूर्ण बाजारपेठ होती.

shivneri fort

कमानी मशीद (Kamani Mashid)

शिवनेरी किल्ल्यावर कमानी मशिद देखील आहे. या मशीदच्या बाजूलाच कमानी टाकी आहे. ही टाकी यादवकाळातील आहे, असे समजले जाते.

शिवाई देवीचे मंदिर (Shivai Devi Temple)

गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे. याच देवीच्या समोर नवस करून जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना जन्म दिला. या देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांना श्री छत्रपती शिवाजी महाराज असे नाव पडले.

आधुनिक काळातील शिवकुंज (Shivkunj in Morden Times)

आधुनिक काळातील शिवकुंज मध्ये बाळ शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांची मूर्ती आहे.

शिवनेरी दुर्ग माहिती मजेशीर गोष्टी (Interesting Facts about Shivneri Fort)

  • शिवनेरी किल्ल्याला सात दरवाजे आहेत. हे दरवाजे वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या राजवंशांनी बनवले होते.
  • इसवी सन १६३२ मध्ये जिजाबाईंनी शिवाजी महाराज वयाच्या दुसऱ्या वर्षी असताना शिवनेरी गड सोडला.
  • शिवनेरीची समुद्रपाटीपासून उंची जवळजवळ ३५०० फूट इतकी आहे.
  • शिवनेरी किल्ल्याचा इतिहास हा २००० वर्ष पूर्वीचा आहे.
  • शिवनेरीच्या पायथ्यापासून वर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे ४०० – ५०० पायऱ्या चढून जावे लागेल. या पायऱ्या पार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास लागतो.
Shivneri Fort Information In marathi
Shivneri Fort Information In marathi

शिवनेरी किल्ल्याला कसे जाल ?(How to Reach Shivneri Fort)

बससेवा (Bus Service)

जुन्नर शहरातून अवघ्या २ km अंतरावर हा शिवनेरी किल्ला आहे. तुम्ही बसने किंवा इतर वैयक्तिक गाड्यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊ शकता .

रेल्वेसेवा (Train Service)

शिवनेरी किल्ल्यापासून साधारण ९४ किमी अंतरावर पुणे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावरून अनेक खाजगी गाड्या उपलब्ध आहेत. जुन्नरला सुमारे ८२ किमी अंतरावर जोडणारे दुसरे रेल्वे स्थानक तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक आहे.

विमानसेवा (Air Service)

पुणे विमानतळ जुन्नरपासून सुमारे ८८ किमी अंतरावर आहे आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई हे शिवनेरी किल्ल्यापासून सुमारे १५६ किमी अंतरावर आहे. पुणे आणि मुंबई विमानतळावरून पर्यटक जुन्नरला जाण्यासाठी कॅब भाड्याने घेऊ शकतात किंवा MSRTC बसने प्रवास करू शकतात.

किल्ल्याला भेट देण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स (Tips For Visit Shivneri Fort)

  • किल्ला फिरण्यास सुमारे ४५ मिनिटे लागतात, सोबत पाणी व इतर फराळ ठेवावा.
  • किल्ल्या फिरण्यासाठी योग्य कपडे परिधान करावे.
  • गरज भासल्यास मार्गदर्शक घ्यावा .
  • कॅमेरा सोबत ठेवावा .

किल्ल्याला भेट देते वेळी घ्यावयाची काळजी (Care to be Taken While Visiting the Fort)

  • किल्ल्या ही एक ऐतिहासिक वास्तू आहे, तर कृपया किल्ल्यावरील कोणत्याही वस्तूची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • किल्ल्यावर ज्या भागात फोटो काढण्यास मनाई असेल, तर जबरदस्ती फोटो काढू नये .
  • किल्ला स्वच्छ ठेवावा .
  • किल्ल्यावर बॉटल, कचरा, कागद टाकून परिसर घाण करू नये .

किल्ल्याला भेट देते वेळी राहायची सोय (Accommodation During Visit to the Fort )

  • हॉटेल गिरीजा
  • मायभूमी रेसोर्ट
  • हॉटेल आर्या रेजेन्सी
  • हॉटेल प्रणव लॉजिंग

किल्ल्या भोवतालची इतर प्रेक्षणीय स्थळे (Places to Visit NearShivneri Fort)

  • जुन्नर गुंफा 
  • गीरीजात्मक मंदिर
  • हडसर किल्ला
  • लेणाद्री गुंफा
  • विघ्नेश्वर मंदिर
  • श्री विघ्नहर गणपती मंदिर
  • पिंपळगाव जोगा धरण
  • निमगिरी किल्ला
  • माणिकडोह धरण
  • हंबर कृषी रिसॉर्ट

शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? (Best Time to Visit Shivneri Fort)

या ठिकाणी सुट्टीचे नियोजन करण्यासाठी ऑक्टोबर आणि मार्च हे महिने उत्तम असतात. हवामान आल्हाददायक आहे आणि पर्यटक आरामात किल्ला पाहू शकतात.

शिवनेरी किल्ल्यावर फिरायला किती वेळ लागेल? (How Much Time Will It Take to Visit Shivneri Fort)

किल्ला फिरायला साधारण २-३ तास ​​लागतील. त्याशिवाय, तुम्हाला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ देखील लक्षात घ्यावा लागेल.

शिवनेरी किल्ल्यातील प्रवेशाची वेळ आणि शुल्क (Entry Fee)

तुम्ही दिवसा कोणत्याही दिवशी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊ शकता. शिवनेरी किल्ला प्रवेशाची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ५ रात्रीच्या वेळी ट्रेकिंग आणि कॅम्पिंगला येथे परवानगी नाही. गडावर सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.

शिवनेरी किल्ला 10 वाक्ये (10 Lines On Shivneri Fort)

शिवनेरी किल्ला शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे, त्याचे कणखर दगड शौर्य आणि स्वाभिमानची युगानुयुगे साक्ष देताहेत.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भव्यपणे उभा असलेला शिवनेरी किल्ला मराठ्यांच्या शौऱ्याच्या गोष्टी बेभान वाऱ्याला सांगत असतो.

राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या नशिबी असलेले अलौकिक रत्न आहे..

काळ अजूनही शिवनेरी किल्ल्याच्या तटबंदीत उभा आहे, जिथे प्रत्येक दगड युद्ध आणि विजयाच्या गाथा सांगतो.

इतिहासप्रेमींसाठी एक तीर्थक्षेत्र, शिवनेरी किल्ला हे एक जिवंत संग्रहालय आहे जे त्याच्या भव्यदिव्य वास्तुकला आणि शौऱ्याच्या तेजाने वीर मराठ्यांची गाथा सांगते.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या, शिवनेरी किल्ल्याची विहंगम दृश्ये पहाणाऱ्यांना इतिहासाला आकार देणार्‍या छत्रपतींच्या कौशल्याची आठवण करून देतात.

शिवनेरी किल्ल्याचे भव्य दरवाजे म्हणजे केवळ दगड नव्हे तर मराठा संस्कृती आणि शौर्याचे हृदय सांभाळणारे शिलेदार आहेत.

जर तुम्ही शिव भक्त असाल तर शिवनेरी किल्‍ल्‍याच्‍या शांत वातावरणात आजही शिवाजी महाराज आणि त्‍यांच्‍या योद्धाच्‍या पावलांचे आवाज नक्कीच ऐकू येतील.

शिवनेरी किल्ल्याचे अवशेष आणि मार्ग त्याच्या त्याच्या अलौकिक कामगीरीचे साक्षीदार आहेत.

त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे, शिवनेरी किल्ला हा कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही.

FAQ

शिवनेरी कशासाठी प्रसिद्ध आहे?

हा भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील १७ व्या शतकातील लष्करी तटबंदी असलेला किल्ला आहे. हिंदवी स्वराज्य/मराठा साम्राज्याचे सम्राट आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान आहे.

शिवनेरी किल्ला का महत्वाचा आहे?

या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे पूर्वी नाणेघाट या मार्गाने व्यापार चालायचा, आणि त्या व्यापारावर नियंत्रण ठेवता यावं, म्हणून शिवनेरी किल्ल्याची, या ठिकाणी बांधणी झाली. नाणेघाटाच्या व्यापाऱ्यावर इथून नियंत्रण ठेवलं जात असे.

शिवनेरी किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला?

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास हा २००० वर्षा पूर्वीचा आहे. या ठिकाणी यादवांनी राज्य प्रस्थापित केले होते व याच काळामध्ये शिवनेरीला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला, पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील, जुन्नरजवळ असलेला हा किल्ला १७ व्या शतकात बांधला गेला.

शिवनेरी किल्ल्यावर किती पायऱ्या आहेत?

पायथ्यापासून वर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे ४००-५०० पायऱ्या चढून जावे लागेल. या पायऱ्या पार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास लागतो.

स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते?

माणकोजी दहातोंडे हे पहिले सरसेनापती, सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील, चांदा आहे.

शिवजन्माच्या वेळी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते?

शिवजन्माच्या वेळी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान हे होते.

शिवनेरी किल्ला कोणी नष्ट केला?

१८२० मध्ये अँग्लो मराठा युद्धानंतर शिवनेरी किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. इतिहासाचा केंद्रबिंदू असलेला शिवनेरी किल्ला अनेक युद्धांचा आणि विनाशाचा साक्षीदार आहे.

शिवाजीराजे व जिजाऊ यांनी गड कधी सोडला ??

इसवी सन १६३२ मध्ये जिजाबाईंनी शिवाजी महाराज दोन वर्ष वयाचे असताना गड सोडला आणि १६३७  मध्ये किल्ला मोघल यांच्या ताब्यात गेला.

निष्कर्ष

आम्ही आमच्या आजच्या SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE या लेखाद्वारे जुन्नर शहरातील शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा व कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद .

Leave a comment