श्रीवर्धन संपूर्ण माहिती मराठी : SHRIVARDHAN INFORMATION IN MARATHI LANGUAGE – रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे श्रीवर्धन हे सुट्टी घालवण्यासाठी एक आदर्श व उत्तम ठिकाण आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीवर्धनचा बीच, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे घर या सर्व गोष्टींमुळे सुप्रसिद्ध आहे.
श्रीवर्धन संपूर्ण माहिती मराठी : SHRIVARDHAN INFORMATION IN MARATHI LANGUAGE
सुट्टीच्या दिवशी तुम्ही शांत, सुंदर व प्रेक्षणीय स्थळाच्या शोधात असाल, तर श्रीवर्धन हे एक उत्तम स्थळ आहे. श्रीवर्धन या शहराला लाभलेला स्वच्छ, सुंदर व भव्य समुद्रकिनारा येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे व संध्याकाळच्या सूर्यास्तामुळे बघण्यासारखं असतो.
प्रस्तावना
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही बोटीने राईड करू शकता व विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करू शकता. तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रपरिवारांसोबत छोट्या-मोठ्या सहलीसाठी कॅम्पिंग, ट्रेकिंग व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी श्रीवर्धन सर्वोत्तम आहे. तुम्ही देखील नक्की श्रीवर्धन या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यावी.
ठिकाण | श्रीवर्धन |
जिल्हा | रायगड |
राज्य | महाराष्ट्र |
पर्यटन | समुद्र किनारा , किल्ला |
आकर्षण | श्रीवर्धन बीच, राजमाची किल्ला |
श्रीवर्धन नकाशा
मुख्य शहर ते श्रीवर्धन अंतर
- मुंबई – मुंबई ते श्रीवर्धन हे अंतर साधारणतः १८९ किलोमीटर आहे व प्रवासासाठी ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.
- पुणे – पुणे ते श्रीवर्धन हे अंतर साधारणतः १५९ किलोमीटर आहे. व त्यासाठी ३ ते ४ एवढा आवश्यक कालावधी लागू शकतो.
श्रीवर्धन पर्यटनासाठी आवश्यक कालावधी/ दिवस
श्रीवर्धन व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.
आमचा हा लेख देखील नक्की वाचा .👇
श्रीवर्धन जवळील प्रेक्षणीय स्थळे
श्रीवर्धन हे अतिशय सुंदर व निसर्गरम्य, छोटे शहर असून या शहराला अनेक समुद्रकिनारी लाभले आहेत. समुद्रकिनाऱ्यामुळे या ठिकाणी प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सीफूड बघायला मिळेल. कोलंबी, खेकडे, विविध प्रकारची मच्छी इत्यादी. या सर्व रेस्टॉरंट मध्ये सीफूडचा आनंद घेऊ शकता. श्रीवर्धन जवळील प्रेक्षणीय स्थळांचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. श्रीवर्धनमधील अशाच काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती खालील प्रमाणे –
हरिहरेश्वर बीच
हरिहरेश्वर हे देवाचे घर म्हणून ओळखले जाते. हरिहरेश्वरला लाभलेला सुंदर, स्वच्छ, निळा समुद्र मन मोहून टाकतो. तुम्ही एखाद्या शांततेच्या व आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक उत्तम जागा शोधत असाल, तर हरिहरेश्वर बीच हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
या बीचच्या जवळ तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्य ते रिसॉर्ट, खाण्याची सुविधा, निवासाची सुविधा उपलब्ध आहे. महाशिवरात्र, कालभैरव जयंती, इत्यादी प्रसिद्ध उत्सव हरिहरेश्वर मंदिरामध्ये साजरे केले जातात.
- स्थान – हरिहरेश्वर
- भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना – ऑक्टोबर ते मे
कालभैरव मंदिर
श्रीवर्धन जवळील असणारे कालभैरव मंदिर, हे एक प्राचीन शिवशंभू यांना समर्पित असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या अजून काही प्राचीन मंदिरांच देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता. मंदिराची शिल्पकला अतिशय सुंदर आहे. भरपूर प्रमाणात भक्तगण कालभैरव मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. या मंदिराची असणारी एक वेगळी रचना व बांधकाम मंदिराला अजून अलौकिक सौंदर्य प्राप्त करून देते.
- स्थान – कालभैरव मंदिर, श्रीवर्धन जवळ
- सर्वोत्तम काळ – तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये कालभैरव मंदिराला भेट देऊ शकता.
गणेश गल्ली
श्रीवर्धन जवळील प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असणारी गणेश गल्ली हा एक धार्मिक स्पॉट असून, गणेश गल्ली ही एक आगळावेगळे भेट देण्यासारखे ठिकाण आहे. या गल्लीला साधारणतः शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत. ही एक अरुंद गल्ली असून, ती दोन टेकड्यांच्या मधून जाते. गणेश गल्लीच्या पायऱ्या उतरून ज्यावेळी तुम्ही पायथ्याशी जाता, त्या ठिकाणी तुम्हाला प्रभू गणपती यांची तीस फूट पाण्याखाली असणारी मूर्ती दिसते.
- स्थान – गणेश गल्ली, श्रीवर्धन जवळ
- वेळ – सकाळच्या कालावधीमध्ये तुम्ही गणेश गल्लीला भेट देऊ शकता.
दिवेआगर बीच
दिवेआगर बीच हा एक सर्वोत्तम शांतता देणारा बीच आहे. निसर्गरम्य व शांत असणारा असा दिवेआगर बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन जवळ स्थित आहे. हा बीच मुंबईपासून साधारणतः १७० किलोमीटर अंतरावर आहे. निळा समुद्र, आजूबाजूला असणारी हिरवाई व पांढरी शुभ्र वाळू यामुळे या बीचचे सौंदर्य अजून खुलून निघते.
दिवेआगर बीच हा सपाट पृष्ठभाग नसलेला, समुद्रकिनारा असून, हे या समुद्रकिनाऱ्याचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. दिव्यागर समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज करू शकता, व तुमच्या सुट्टीचा क्षण निवांत घालू शकता. या बीचवर तुम्ही सूर्यास्त व सूर्योदयाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
- स्थान – दिवेआगर बीच श्रीवर्धन जवळ
- वेळ – सेप्टेंबर ते मे
बागमांडला
श्रीवर्धन जवळ असणाऱ्या हरिहरेश्वर पासून बागमांडला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हे एक प्रसिद्ध स्थळ असून, पेशव्यांचे घर म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये तुम्हाला जुना बाणकोट किल्ला, पेशवे सदनामध्ये भूतकाळाचे प्रतिबिंब बघायला मिळते.
- स्थान – बागमांडला, श्रीवर्धन जवळ
- वेळ – बागमांडला या गावाला भेट देण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळी जाऊ शकता.
श्रीवर्धन बीच
श्रीवर्धन बीच हरिहरेश्वर पासून साधारणतः २० किलोमीटर अंतरावर असलेले पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या बीचची असलेली खासियत म्हणजे या बीचला लाभलेली काळी वाळू. ज्यावेळी समुद्राच्या लाटा काळया वाळूवर येऊन आढळतात, त्यावेळी दिसणारा नयनरम्य नजारा अद्भुतच असतो. श्रीवर्धन बीचवर तुम्ही पॅराग्लीडिंग, बोटराईड आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करू शकता.
- स्थान – श्रीवर्धन
- वेळ – सेप्टेंबर ते मे
सोमजादेवी मंदिर
सोमजादेवी मंदिर हे एक प्राचीन मंदिर असून, हे मंदिर खूप सुंदर व मनमोहक आहे. तुम्ही देखील या मंदिराला नक्कीच भेट देऊन आपली श्रद्धा देवीला अर्पण करू शकता.
- स्थान – सोमजादेवी मंदिर
- वेळ – कोणत्याही वेळी तुम्ही समजा माता मंदिराला भेट देऊ शकता
कोंडीवली बीच
पर्यटकांच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध असलेला अजून एक बीच म्हणजे कोंडीवली बीच. हा बीच मुख्यतः इथे असलेल्या वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज मुळे चर्चेत असतो. तुम्ही वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी उत्सुक असाल व एखादे उत्तम ठिकाण शोधत असाल, तर कोंडीवली बीच हा तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. हा बीच कुटुंबासमवेत किंवा मित्र परिवारांसमवेत वेळ घालविण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
- स्थान – कोंडीवली बीच
- वेळ – सेप्टेंबर ते मे
शंकर मंदिर
सोमजामाता मंदिरच्या बाजूला असणारे शंकर मंदिर हे देखील एक प्रसिद्ध व प्राचीन मंदिर असून, शिव व माता पार्वती यांना हे मंदिर समर्पित आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे हे पवित्र स्थान असून, श्रीवर्धन शहरातील हे एक प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या समोरच प्रवेश करतेवेळी शंकरांचे वाहन नंदी यांची मूर्ती आहे. श्रीवर्धन मधील प्रेक्षणीय स्थळांपैकी शंकर मंदिर देखील एक प्रेक्षणीय स्थळ व अध्यात्मिक दृष्ट्या प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे.
- स्थान – शंकर मंदिर श्रीवर्धन जवळ
- वेळ – कोणत्याही वेळी तुम्ही शंकर मंदिराला भेट देऊ शकता.
कुशमेश्वर मंदिर
कुशमेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या जवळच स्थित असून, हे मंदिर कुशमेश्वर टेकड्या यांनी वेढलेले आहे. कुशमेश्वर मंदिराचे अनोखे दगडी कोरीव काम् पाहण्यासारखे आहे. या मंदिराजवळ जिवनेश्वर आणि भैरवनाथ मंदिर देखील आहे.
- स्थान – कुशमेश्वर मंदिर, श्रीवर्धन जवळ
- वेळ – कोणत्याही वेळी तुम्ही शंकर मंदिराला भेट देऊ शकता.
श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती : RAJMACHI FORT INFORMATION IN MARATHI
प्रसिद्ध असणारा श्रीवर्धन किल्ला हा राजमाची किल्ला बनवणाऱ्या मनरंजन आणि श्रीवर्धन या दोन किल्ल्यापैकी एक आहे.हे दोन बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन हा किल्ला राजमाची या गावाजवळ स्थित असून, हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगे मध्ये सुमारे ९०० मीटर इतक्या उंचीवर आहे. लोणावळा-खंडाळा मधील श्रीवर्धन राजमाची किल्ला हे एक मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू असून, वैदिक काळापासून हा किल्ला ओळखला जातो.
श्रीवर्धन राजमाची हा किल्ला पायथ्यापासून ९०० मीटर उंच इतका असून, समुद्रसपाटीपासून याची उंची ही २७१० फुट आहे. लोणावळा शहरापासून जवळ असलेला, श्रीवर्धन राजमाची किल्ला, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून ट्रेकिंग साठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
किल्ल्याचे नाव | श्रीवर्धन राजमाची किल्ला |
---|---|
केव्हा बांधला | अकराव्या शतकामध्ये |
काळ | सातवाहनांचा काळ |
ठिकाण | कर्जत जवळ |
उंची | ९०० मीटर |
वापर | टेहळणी बुरुज |
मुंबईपासून अंतर | १८९ किलोमीटर |
पुण्यापासून अंतर | १५९ किलोमीटर |
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याचा इतिहास
श्रीवर्धन राजमाची किल्ला वैदिक काळापासून नावाजलेला किल्ला असून, या किल्लाचा वापर “टेहाळणी बुरुज” म्हणून केला जात असे. या किल्ल्याचा उल्लेख हा अकरावा शतकामधला आहे. हा किल्ला सातवाहनाच्या काळामध्ये बांधला गेल्याचे देखील म्हटले जाते.
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याचे बांधकाम
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याच्या सीमेभोवती एक प्रचंड मजबूत भिंत असून, अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. या किल्ल्यावर बौद्ध काळातील लेणी, देखील आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर पूर्वीच्या काळी चिखलांच्या संरचनेच्या खुणा, देखील आढळून आलेल्या होत्या. बारामाही पाण्याचे दोन स्त्रोत किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात.
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ
या किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी किल्ल्याला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी असणारा निसर्गरम्य व हिरवागार निसर्ग व विहंगम दृश्यांचा आनंद घेण्यासाठी उत्तम काळ हा नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्यानचा आहे.
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याला भेट देण्यापूर्वी महत्त्वाच्या टिप्स
- हा किल्ला सकाळी ६.00 ते संध्याकाळी ६.३० पर्यंत खुला असतो.
- श्रीवर्धन राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.
- किल्ल्याचे ट्रेकिंग हे सोपे आहे.
- किल्ल्याला वर्षभरामध्ये कोणत्याही काळात तुम्ही भेट देऊ शकता. परंतु नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्याने निसर्गाने नटून गेलेला श्रीवर्धन राजमाची किल्ला पाहू शकता.
श्रीवर्धनला कसे जाल ?
महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील, श्रीवर्धन हे निसर्गरम्य एक छोटे शहर असून, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले एक प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही खालील तीन पर्यायांचा वापर करून भेट देऊ शकता. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग.
रस्ते मार्ग –मुख्य शहरांना श्रीवर्धन हे शहर कनेक्टेड असून, तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने किंवा स्वतःच्या गाडीने श्रीवर्धनला भेट देऊ शकता.
रेल्वे मार्ग – श्रीवर्धन मध्ये कोणतेही रेल्वे स्थानक नाही. परंतु माणगाव हे श्रीवर्धन जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे साधारणतः ४५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बस किंवा टॅक्सीच्या पर्यायाने माणगाव ते श्रीवर्धन पर्यंत प्रवास करू शकता.
हवाई मार्ग – श्रीवर्धन मध्ये कोणतेही विमानतळ उपलब्ध नाही. पुण्यावरून येण्यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचप्रमाणे मुंबईवरून येण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहे
श्रीवर्धनमध्ये राहण्याची सोय
श्रीवर्धनमध्ये तुम्हाला तुमच्या बजेट नुसार उत्तम राहण्याची सोय केली जाते. त्याच बरोबर तुम्ही श्रीवर्धनला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे तुम्ही विविध सीफूडचा आनंद घेऊ शकता.
श्रीवर्धन बीचला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ
- श्रीवर्धन बीचला तसेच श्रीवर्धन जवळील प्रेक्षणीय स्थळे यांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा हिवाळा आहे. या काळामध्ये हवामान हे थंड असून, निसर्गाचा मनसोक्त आनंद तुम्ही घेऊ शकता.
- उन्हाळ्याच्या काळात श्रीवर्धन बीचला भेट देण्यात एक वेगळाच आनंद आहे. परंतु दुपारच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. कारण यावेळी असणाऱ्या अति प्रखर उन्हामुळे त्रास होतो.
बोलल्या जाणाऱ्या भाषा
- मराठी
- हिंदी
FAQ
श्रीवर्धन बीचला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता?
श्रीवर्धन बीचला तसेच श्रीवर्धन जवळील प्रेक्षणीय स्थळे यांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ हा हिवाळा आहे. या काळामध्ये हवामान हे थंड असून, निसर्गाचा मनसोक्त आनंद तुम्ही घेऊ शकता.
उन्हाळ्याच्या काळात श्रीवर्धन बीचला भेट देण्यात एक वेगळाच आनंद आहे. परंतु दुपारच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. कारण यावेळी असणाऱ्या अतिप्रखर उन्हामुळे त्रास होतो.
मुंबई ते श्रीवर्धन हे अंतर किती किलोमीटर आहे व त्यासाठी लागणारा आवश्यक कालावधी किती?
मुंबई ते श्रीवर्धन हे अंतर साधारणतः १८९ किलोमीटर आहे. व प्रवासासाठी ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.
श्रीवर्धन राजमाची किल्ला कोणी बांधला ? व त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे?
श्रीवर्धन राजमाची किल्ला सातवाहनाच्या काळामध्ये बांधला गेल्याचे देखील म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून याची उंची ही २७१० फुट आहे.
श्रीवर्धन जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी किती दिवस लागू शकतात?
श्रीवर्धन व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणता तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.
श्रीवर्धन या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी तुम्ही रेल्वेने कसे जाल?
श्रीवर्धन मध्ये कोणतेही रेल्वे स्थानक नाही. परंतु माणगाव हे श्रीवर्धन जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे साधारणतः ४५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही बस किंवा टॅक्सीच्या पर्यायाने माणगाव ते श्रीवर्धनपर्यंत प्रवास करू शकता.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या SHRIVARDHAN INFORMATION IN MARATHI LANGUAGE लेखाद्वारे आम्ही आपणास श्रीवर्धन या प्रेक्षणीय स्थळाबद्दल माहिती दिली आहे.हा लेख श्रीवर्धन संपूर्ण माहिती मराठी तुम्ही नक्की वाचा. लेख श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व लेख आवडल्यास शेयर करा.
धन्यवाद.