अक्षयचा WELCOME 3 येतोय : ‘OMG 2’ नंतर, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वाचा सविस्तर

WELCOME 3 RELEASE DATE – अनीस बज्मी दिग्दर्शित वेलकम आणि वेलकम 2 या चित्रपटांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या लोकप्रिय चित्रपट सिरिज मधील पुढच्या फिल्मची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. रिलीजच्या तारखेसोबतच चित्रपटाच्या शीर्षकाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वेलकम 3 ची ही घोषणा चाहत्यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही.

Welcome 3 : वेलकम टू द जंगल ‘या’ दिवशी होणार रिलीज | ‘हे’ कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

WELCOME 3 RELEASE DATE
  • ‘वेलकम’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाचे नाव ‘वेलकम टू द जंगल’ आहे.
  • फिरोज ए नाडियादवाला यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.
  • अक्षय कुमार, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

अलीकडे या चित्रपटातील Feamle Actress ची चर्चा होती.

निर्मात्यांनी अधिकृतपणे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि शीर्षक जाहीर केले आहे.

वेलकम 3 रिलीजची तारीख: अनेक दिवसांपासून लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘वेलकम’च्या तिसऱ्या भागाविषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत. मात्र, आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजची तारीख आणि शीर्षकाची अधिकृत घोषणा केली आहे.

अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक – म्हणाला मनाने आणि नागरिकत्वाने मी भारतीय आहे.

वेलकम 3 ‘ चे शीर्षक ‘ वेलकम टू द जंगल ‘ .

या चित्रपटाचे पहिले दोन भाग अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केले होते. त्याच वेळी, अहमद खानच्या नेतृत्वाखाली तिसरा भाग बनवण्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. अहमद खान यांनी यापूर्वी ‘बागी 2’ आणि ‘बागी 3’ सारखे चित्रपट बनवले होते. आता ‘वेलकम 3’चे निर्माते फिरोज. ए. नाडियादवाला आहेत आणि त्यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची पुष्टी केली आहे. हा चित्रपट ख्रिसमस 2024 मध्ये प्रदर्शीत होईल.

अक्षय कुमार सोबत ‘मुन्ना भाई’ आणि ‘सर्किट’ची कॉमेडी दिसणार आहे

‘वेलकम ३’च्या आधी फिरोज. ए. नाडियादवाला यांनी ‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’ची निर्मितीही केली होती. ‘वेलकम’ हा बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी हिट फ्रेंचायझी चित्रपटांपैकी एक आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता . तिसऱ्या चित्रपटामध्ये पुन्हा अक्षय मुख्य भूमिकेत असून त्याचे सहकलाकर बदलले आहेत.

अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटासाठी संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची नावे चित्रपटातील पुरुष कलाकारांसाठी फायनल करण्यात आली आहेत . म्हणजेच खूप वर्षानंतर मुन्ना भाई आणि सर्किटची कॉमेडी खिलाडी अक्षयसोबत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. याशिवाय हास्याची फोडणी देण्यासाठी परेश रावलसुद्धा या फिल्म मध्ये आहे.

ही आहेत स्त्री कलाकारांची नावे

चित्रपटातील महिला कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटासाठी दिशा पटनी आणि जॅकलिन फर्नांडिस यांची नावे आता चर्चेत आहेत. मात्र, मुख्य नायिकेसाठी अद्याप कोणाचेही नाव अधिकृत करण्यात आलेले नाही.

हे सुद्धा वाचा 👇

Leave a comment