गरुड पक्षी माहिती मराठी Eagle In Marathi

हिंदू धर्मात गरुड पक्षी याला उच्च स्थान आहे. पक्ष्यांचा राजा गरुडाला म्हटले जाते. तसेच हिंदूंच्या अठरा पुराणांमध्ये गरुड पुराण देखील आहे. गरुड हा पक्षी भारतासह इतर देशातही आढळून येतो. हिंदू धर्मात गरुड पक्षाला उच्च स्थान आहे. 

या पक्षाचा उडण्याचा वेग खूप जास्त असतो. डोळ्यांची नजर तीक्ष्ण असते. तसेच या पक्षांचे काही वैशिष्ट्ये, प्रकार त्याचा आहार आणि राहणीमान कसे आहे याबाबत माहिती आपल्याला असतेच असे नाही.

चला तर मग, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गरुड पक्षाबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

गरुड पक्षी माहिती मराठी Eagle In Marathi

गरुड पक्षी याचा परिचय

पक्षाचे नाव गरुड
उडण्याचा वेग ताशी २१० किलोमीटर
गरुडाचे वास्तव्य पर्वत आणि जंगलामध्ये
गरुडाचा रंगकाळा, तपकिरी, पांढरा
गरुडाचे वजनसुमारे १० किलो
गरुड पक्षाचा आहारकीटक, लहान प्राणी, लहान पक्षी
गरुडाचे सरासरी आयुष्य40 वर्षे
गरुडाच्या शरीराची लांबी ६० ते ९० सेंटीमीटर

गरुड पक्षांचे वर्णन

गरुड पक्षी हा अतिशय शक्तिशाली आणि शिकारी पक्षी आहे. जो त्याच्या वेगवानपणासाठी ओळखला जातो. गरुड हा अतिशय भव्य, बुद्धिमान, अद्भुत आणि सुंदर पक्षी आहे. त्याची किंकाळी खूपच कडक असते आणि तो जोरात किंचाळतो.

गरुड आकाशात खूप उंच उडतो आणि जमिनीवर असलेल्या भक्षांची शिकार करतो. आकाशात १०,०००  फूट उंचीपर्यंत गरुड उडू शकतो. त्याचा उडण्याचा वेग ताशी २१० किलोमीटर आहे. हा गरुड पक्षी पंख न हलवता बराच काळ उडू शकतो. तो आकाशात गिरट्या घालत राहतो. गरुडाची पाहण्याची क्षमता खूप जास्त आहे.

गरुड पक्षी ५ किलोमीटर अंतरावरूनही आपली शिकार आरामात पाहू शकतो. त्याची दृष्टी तीक्ष्ण आहे, जी त्याला शिकार करण्यास मदत करते. गरुड पर्वत आणि जंगलामध्ये वावरतो, गरुडाला दोन पंजे, दोन मोठे आणि शक्तिशाली पंख, दोन डोळे, वक्र टोकदार चोच आणि नखांमध्ये शक्तिशाली आणि तीक्ष्ण नखे असतात.

गरुड पक्षी माहिती मराठी

हे वाचा –

गरुड पक्ष्याचे विविध प्रकार  

गरुड पक्षी हा जगभर आढळणारा पक्षी आहे. तो भारतातही आढळतो. आतापर्यंत या पक्षाच्या ६० हून अधिक प्रजातींचा शोध लागला आहे.

सोनेरी गरुड, बाल्ड गरुड, पिवळसर गरुड, पांढरे शेपटी गरुड, फिलिपिन्स गरुड, सागरी गरुड, हारपी गरुड, असे काही गरुडाचे विविध प्रकार आहेत. हे गरुड अतिशय सुंदर आहेत. मुख्यतः डोंगराळ आणि वाळवंटी भागात गरुड आढळतो.

गरुड पक्षाची चोच खूप शक्तिशाली असते. ज्यामुळे तो आपल्या भक्षाचे तुकडे करतो. त्याची चोच ९० अंशाच्या कोनात वाकलेली असते.

गरुड पक्षी

गोल्डन ईगल –

डोक्यावर सोनेरी छटा आणि एक प्रभावी पंख तसेच गडद तपकिरी पंख असलेला एक भव्य पक्षी म्हणजे गोल्डन ईगल. ससा, ग्राउंड गिलहरी आणि कोल्ह्यासारखे मोठे सस्तन प्राणी खाणारा बहुमुखी शिकारी आहे. ते पर्वतीय प्रदेश, पठार आणि इतर खडबडीत भूभागात राहतात.

फिलीपाईन गरुड –

फिलीपिन्समध्ये उंच आणि खडबडीत पर्वतांमधील पर्वतीय जंगलांमध्ये आढळून येतात. तपकिरी आणि पांढरा रंग याचा अनोखा मेळ या पक्षात पाहावयास मिळतो. त्याच्या पंखांची उंच शिखरे, भक्कम बिल्ले आणि तीक्ष्ण नखांसाठी तो ओळखला जातो.

बाल्ड ईगल –

हा गरुड पक्षी प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत आढळतो. घरटे बांधण्यासाठी मुबलक अन्न पुरवठा आणि जुन्या वाढीच्या झाडांसह मोकळ्या पाण्याच्या निवासस्थानांना प्राधान्य देतात. मासे हा प्राथमिक आहार असून ते लहान पक्षी आणि कॅरियन देखील खातात. गडद तपकिरी शरीर आणि पंख यांच्या विरुद्ध जोडलेले पांढरे डोके आणि शेपटीसाठी ओळखले जाणारे, हे गरुड युनायटेड स्टेट्सचे प्रतीक आहे.

स्टेप ईगल 

 पूर्व युरोप आणि आशियातील मोकळ्या गवताळ प्रदेशात फिरणारा हा स्थलांतरित गरुड पक्षी आहे.

पांढऱ्या पोटाचा सागरी गरुड

भारत आणि चीनपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत विखुरलेल्या प्रदेशांमध्ये ते आढळून येतात. पांढरा आणि राखाडी रंगाचा हा गरुड एक कुशल मासे शिकारी आहे.

हार्पी ईगल –

मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये तो आढळून येतो. हार्पी गरुड हा सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली पक्षांपैकी एक आहे. ते माकडांची शिकार करतात.

आफ्रिकन फिश ईगल

हा पक्षी उप-सहारा आफ्रिकेतील आहे. टक्कल गरुडासारखा दिसणारा हा पक्षी आहे. मासे पकडण्याच्या पराक्रमासाठी ओळखला जातो.

गरुड पक्ष्याचा रंग

गरुडाचा रंग काळा, तपकिरी, पांढरा असतो. त्याच्या वेगवेगळ्या प्रजातींचा रंगही त्याच्या प्रजातीनुसार वेगवेगळ्या असतो.

Eagle In Marathi

गरुड पक्ष्याचे वजन

प्रौढ गरुडाचे वजन सुमारे १० किलो असते. पाण्यात बुडी मारून माशाची शिकार गरुड अगदी वेगाने करू शकतो. गरुड हा एक अतिशय धोकादायक शिकारी आहे.

गरुड पक्षी जमिनीवर असलेल्या शिखरांवर हल्ला करतो आणि त्याला आपल्या पंजामध्ये पकडतो. गरुडाची गती आणि चपळता दोन्हीही असते.

गरुड पक्ष्याचे निवासस्थान

गरुड उंच खडक आणि झाडांवर घरटी बनवतात. बहुतेक वेळा गरुड दुसऱ्या पक्षांचे घरटे ताब्यात घेतो.

गरुड पक्ष्याची प्रजनन क्षमता

मादी गरुड जास्त अंडी घालत नाही ती एकावेळी फक्त ३ ते ४ अंडी घालते आणि ही अंडी सुमारे ३६ दिवस उबवते, यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात.

नर गरुडाचे काम शिकारी प्राण्यांपासून अंड्यांचे संरक्षण करणे आणि अन्न पुरवणे आहे.

Eagle

गरुड पक्षाचा आहार

गरुड अतिशय हुशार आणि चपळ आहे. तो डावपेच आखून शिकार करतो. गरुड हा मांसाहारी पक्षी आहे. गरुड ससे, उंदीर, साप, अशा लहान प्राण्यांना खातो.

मुख्यतः कीटक, लहान प्राणी, लहान पक्षी, यांची शिकार गरुड करत असतो.

गरुड पक्ष्याचा आयुःकाळ

गरुडाचे सरासरी आयुष्य ७० वर्ष असते. बहुदा गरुड ४० वर्षांनी म्हातारा होतो. ४० वर्षांनी गरुडाचे शरीर सैल होते.

या वयानंतर तो शिकार करण्यास असमर्थ होतो. गरुड म्हातारा झाल्यावर आपले पंजे तोडतो, त्याची चोच खडकावर घासून तोडतो, हळूहळू त्याचे पंख ही तोडतो.

गरुड पक्ष्याची ओळख

हिंदू पौराणिक कथांमध्ये गरुड हे भगवान विष्णूचे वाहन मानले जाते. अरब देशांमध्ये गरुड हा पाळीव पक्षी म्हणून छंदासाठी पाळला जातो.

गरुड हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, जर्मनी, मेक्सिको, अशा अनेक देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो शक्ती सामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

गरुड पक्ष्याची थोडक्यात माहिती

गरुड हा एक शिकारी पक्षी आहे. त्याला पक्षाचा राजा समजले जाते. गरुड राप्टर्स प्रकारात मोडतो. हे पक्षी शिकार करतात. गरुडा पक्षाच्या काही उपजाती आहेत.

सर्व उपजातींचे गरुड साप, इतर छोटे पक्षी, मासे, छोटे-मोठे सस्तन प्राणी, यांचे शिकार करतात. गरुड बऱ्याचशा शिकारी पक्षांपेक्षा आकाराने मोठे असतात.

केवळ गिधाडच गरुडा पेक्षा मोठी असतात. सर्प गरुड खूप लहान असतात, तर फिलिपिन गरुड व हारपी गरुड खूप मोठे असतात. त्यांचे आकारमान साधारण १०० सेंटीमीटर असते व वजन ९ किलो पेक्षा जास्त असते.

जंगलामध्ये राहणाऱ्या गरुडांची पंख छोटी असतात व शेपटी लांब असते, त्यामुळे ते उडताना हवेतल्या हवेत अगदी सहज कलाटणी घेऊ शकतात. अधिक वेगाने झाडाच्या फांद्यामधून भक्षाचा पाठलाग करताना त्यांना छोटे पंख खूप उपयोगी पडतात. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षांची पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते.

त्यामुळे ते वाढत्या वातप्रवाह वर सहजतेने तरंगू शकतात. परंतु याच कारणामुळे त्यांना आकाशात झेपावणे व जमिनीवरून उतरणे तुलने अवघड जाते. गरुडांच्या चोची देखील इतर शिकारी पक्षांसारख्या मोठ्या व बळकट असतात.

त्यांच्या धारधार व बाकदार चोचीमुळे त्यांना मांस फाडणे सोपे जाते. गरुडांचे पाय व पंजे भक्ष पकडण्यासाठी बळकट असतात, कारण त्यांच्या डोक्यांच्या मानाने डोळे खूपच मोठे असतात. त्यामुळे गरुडांची नजर खूपच तीक्ष्ण असते, म्हणजे माणसाच्या चौपट तीक्ष्ण असते.

माणसांच्या डोळ्याच्या पडद्यावर दर चौरस किलोमीटरला दोन लक्ष प्रकाश संवेद्यपेशी असतात, तर गरुडांना एक दशलक्षच म्हणजेच माणसाच्या पाचपट असतात. माणसांना जरी एकच गतीका असली तर गरुडांना त्या दोन असतात, त्यामुळे त्यांना एकाच वेळी समोर व चौबजुना पाहता येते.

गरुडांच्या डोळ्याची बाहुली खूप मोठी असते, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रकाशाचे कमीत कमी विवर्तन होते, यामुळे देखील त्यांची दृष्टी चांगली असते व त्यांना त्यांचे भक्ष खूप दुरूनही दिसतात.

गरुडांची घरटी काट्याकुट्यापासून बनलेली असतात व ती बहुदा उंच कड्यावर किंवा उंच झाडावरती असतात. बरेच गरुड त्यांच्या पूर्वीचे घरट्यामध्ये परततात व काढ्या कांड्याची भर घालत राहतात.

गरुड एका खेपेस एक किंवा दोन अंडी घालतात, पण बऱ्याचदा अगोदर जन्मलेले व मोठे पिल्लू त्यांच्या धाकट भावनांचा जीव घेते व अशावेळी पालक मध्यस्थी करत नाहीत.

गरुड बोधकथा

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच, ह्या जगामध्ये असा कोणीच नाही ज्याला प्रॉब्लेम नाही. त्यात काहीजण आपली वाट काढतात, काहीजण तसेच राहतात, काहीजण  आपला स्वतःचा मार्ग स्वतः बनवतात, प्रकृतीमध्ये सगळ्या प्राण्यांसोबत असं होत असतं आणि ते त्यांचा मार्ग बनवतातच. गरुडाच सुद्धा तसंच आहे.

गरुडाच सरासरी आयुष्य हे ७० वर्षाचा आहे. पण ४० व्या वर्षापर्यंत त्याच्या शरीरात आलेख बदल होतात. त्याचे शरीरातील प्रमुख तीन अंग निकामी होऊ लागतात, त्याचे पंजे मोठे आणि लवचिक होऊ लागतात, त्यामुळे शिखरावरती त्याची पकड ढिली होते, तसेच त्याची चोच पुढे वाकते.

त्यामुळे त्याला काहीही खाता येत नाही, त्याचे पंख खूप जड होतात व ते पंख त्याच्या छातीला चिकटल्यामुळे, त्याला नीट लांब वरती उडता सुद्धा येत नाही, त्यामुळे आपले शिकार शोधणं, ते पकडणं आणि ते खाणे हे सगळेच मुश्किल होऊन जाते.

त्यामुळे या सगळ्या वरती त्याच्याकडे फक्त तीनच पर्याय असतात, एक तर मरून जाणे, दोन गिधाडासारख मृत अंगावर निर्भर राहणे किंवा तिसरा पर्याय स्वतःला परत पहिल्यासारखं बनवणे. आकाशातला राजासारखं बनवणे.

पहिले जे दोन पर्याय आहेत ते खूपच सोपे आहेत, तिसरा पर्याय यासाठी त्याला खूप वेदना सहन कराव्या लागणार असतात. पण गरुड तिसरा पर्याय निवडतो.

वेदना सहन करण्याच कारण त्याला स्वतःला परत आकाशातला राजा व्हायचं असतं, त्यासाठी गरुड एका मोठ्या पर्वतावर जातो व एकांतामध्ये आपलं घरटं बनवतो व आपले सगळी प्रक्रिया सुरू करतो. सगळ्यात पहिले तो आपली चोच दगडावर आपटून आपटून तोडून टाकतो.

आपली स्वतःची चोच अशी दगडावर आपटून आपटून तोडून टाकताना त्याला खूप वेदना होत असतात, पण गरुड ते करतो, मग तो वाट बघतो आपली चोच परत पहिल्यासारखी नव्याने कधी येईल.

आपल्या पंजाना पण  तो दगडावर आपटून तोडून टाकतो, व परत वाट बघतो की परत नवीन पंजे कधी येतील, ते नवीन चोच आणि पंजे परत आल्यानंतर, त्या नवीन चोचीने आणि पंजाने आपले जड पंख टोचून टोचून काढून टाकतो.

मग तो वाट बघतो की, आपले नवीन पंख कधी येतात याची, १५० दिवसानंतर त्याचे पंख हळूहळू पुन्हा नव्याने उगवतात, त्याला खूप वेदना झालेल्या असतात, पण पंख परत आल्यानंतर तो पुन्हा आकाशात उंच भरारी घेतो. या सगळ्या प्रक्रियेमुळे त्याला आपली ताकद, सन्मान, परत मिळालेला असतो व तो पुन्हा नव्याने तीस वर्षे जगतो.

तुम्हीही ऐकलेच असेल, देव त्याचीच मदत करतो, तो स्वतःची मदत करतो. गरुड १५० दिवस वेदना सहन करतो, आपली शारीरिक रचना परत आणण्यासाठी.

माणसाचा आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती दुर्बल होऊ लागतात, तेव्हा गरुडासारखा निर्णय घ्या आणि स्वतःमध्ये बदल घडवणारा दररोज चांगलं काहीतरी ऐकत जा, वाचत जा, तुम्ही एकमेव असे व्यक्ती आहात जे स्वतःला पूर्णपणे ओळखता, तेव्हा स्वतःमध्ये बदल घडवा.

आपल आयुष्य पुन्हा नव्या उमेदीने जगा, रडत बसू नका. स्वतःमध्ये बदल घडवून आणा. थोड्या वेदना सहन कराव्या लागतील, पण त्यानंतरचा आयुष्य सुखकारक आणि सन्मान जनक असेल.

गरुड पक्ष्याबद्दल १० ओळी

  • गरुड हा घारीपेक्षाही आकाराने खूप मोठा आहे.
  • गरुडाच्या शरीराची लांबी ६० ते ९० सेंटीमीटर असते.
  • गरुड आकाशात गिरट्या घालीत ते भक्षाची टेहाळणी करत असतात.
  • गरुड आणि ससाणा यांची दृष्टी सर्व पक्षांपेक्षा तीक्ष्ण असते. गरुड मोठे कीटक व मृत जनावरांचे मांस खातो. त्यामुळे तो परिसर स्वच्छ राखण्याचे काम करतो.
  • गरुड हा पक्षी भक्षांची शिकार फक्त दिवसात करतो. गरुडात लहान कोकरू उचलून नेण्याएवढी शक्ती असते. त्याचे घरटे उंच, झाडाच्या शेंड्यावर कडेकपारी किंवा सुळक्यावर बांधलेले असते.
  • त्याचे अंडे सुमारे ७५ मिमी व्यासाचे पांढरट रंगाचे आणि तपकिरी टिपक्या असलेले असते.
  • गरुडाचा आयुकाल २५ ते ३० वर्ष इतका असतो.
  • गरुड पक्षी आपले घरटे हे उंच डोंगराच्या कड्यावर किंवा उंच असे झाडांवर बांधतात. गरुड पक्षाची घरटे ही वाळलेल्या काट्याकुट्यांपासून बनलेली असतात.
  • आकाशात उंच भरणाऱ्या गरुडांची पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते. जंगलामध्ये राहणाऱ्या गरुड पक्षाची पंख हे खूप छोटी असतात, त्यामुळे ती उंच हवेत अगदी सहजपणे कलाटणी घेतात आणि ते अति वेगाने उडतात.
  • गरुडाची नजर ही माणसाच्या नजरेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. गरुड पक्षाला एक चोच, दोन पाय, दोन पंख व दोन डोळे असतात.

गरुड पक्ष्याबद्दल मनोरंजक तथ्ये

  • सर्व पक्षांमध्ये सामर्थ्यवान समजला जाणाऱ्या पक्षी म्हणजे गरुड पक्षी होय.
  • गरुड पक्षी हा पक्षांचा राजा आहे.
  • गरुड पक्षी हा शिकारी पक्षी आहे, त्याची नजर खूप तीक्ष्ण असते.
  • गरुड पक्षी खूप उंचावरून आपल्या शिकारीवर हल्ला करतो आणि संधी मिळतच आपल्या शिकारीवर झडप घालतो.
  • गरुड पक्षी हा खूप चांगला आणि चपळ आहे. हा पक्षी अनेक पक्षांच्या तुलनेत आकाराने मोठा पक्षी आहे.
  • गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो.
  • गरुड पक्षी साप, छोटे-मोठे सस्तन, प्राणी, मासे, अशा प्रकारचे अन्न खातो.
  • गरुडाचे डोके हे इतर पक्षांच्या तुलनेत मोठे असते. कोणत्याही प्राण्यांपेक्षा वेगवान असतो.
  • गरुडाच्या डोळ्याची बाहुली खूप मोठी असल्यामुळे, समोरून येणारा प्रकाश सहज त्याच्या डोळ्यांना स्पर्श करू शकत नाही, त्यामुळे त्याला त्याची भक्ष दुरून सहजपणे दिसते.
  • बहुतेक गरुड प्रजाती एकच वेळी फक्त दोन अंडी देतात.
  • पांढरी शेपटीचा गरुड, काळा गरुड, समुद्र गरुड, सोनेरी गरुड, हरपी गरुड, तुरेवाला सर्प गरुड, आफ्रिकी मत्स्य गरुड, नेपाळी गरुड, पहाडी गरुड, टकला गरुड, कीटकांचा पान गरुड, गरुड मत्स्य गरुड, राखी डोक्याचा मत्स्य गरुड इत्यादी. इत्यादी गरुडांचे प्रजाती आहेत.
  • गरुडाची चोच ही शिकारी पक्षांसारखी मजबूत असते. त्याच्या चोचीचा आकार बाकदार असल्यामुळे, त्याला शिकार आपल्या चोचीमध्ये पकडणे सहज सोपे जाते.
  • हिंदू धर्म ग्रंथांमध्ये गरुड पक्षी हे विष्णूचे वाहन आहे. गरुड हा कश्यप व त्याची पत्नी विनता यांचा मुलगा आहे. हिंदू धर्म मध्ये गरुड पुराण नावाचा प्राचीन ग्रंथ सुद्धा आहे.

FAQ

१. गरुड पक्ष्याचे थोडक्यात वर्णन करा.

गरुड हा अतिशय शक्तिशाली आणि शिकारी पक्षी आहे. जो त्याच्या वेगवानपानासाठी ओळखला जातो. गरुड हा अतिशय भव्य, बुद्धिमान, अद्भुत आणि सुंदर पक्षी आहे. त्याची किंकाळी खूपच कडक असते आणि तो जोरात किंचाळतो. गरुड आकाशात खूप उंच उडतो आणि जमिनीवर असलेल्या भक्षांची शिकार करतो. आकाशात १०,०००  फूट उंचीपर्यंत गरुड उडू शकतो.
त्याचा उडण्याचा वेग ताशी २१० किलोमीटर आहे. हा पक्षी पंख न हलवता बराच काळ उडू शकतो. तो आकाशात गिरट्या घालत राहतो. गरुडाची पाहण्याची क्षमता खूप जास्त आहे. गरुड ५ किलोमीटर अंतरावरूनही आपली शिकार आरामात पाहू शकतो. त्याची दृष्टी तीक्ष्ण आहे, जी त्याला शिकार करण्यास मदत करते. गरुड पर्वत आणि जंगलामध्ये वावरतो, गरुडाला दोन पंजे, दोन मोठे आणि शक्तिशाली पंख, दोन डोळे, वक्र टोकदार चोच आणि नखांमध्ये शक्तिशाली आणि तीक्ष्ण नखे असतात.

२. गरुड पक्ष्याचे विविध प्रकार कोणते आहेत ?

गरुड हा जगभर आढळणारा पक्षी आहे. तो भारतातही आढळतो. आतापर्यंत या पक्षाच्या ६० हून अधिक प्रजातींचा शोध लागला आहे. सोनेरी गरुड, बाल्ड गरुड, पिवळसर गरुड, पांढरे शेपटी गरुड, फिलिपिन्स गरुड, सागरी गरुड, हारपी गरुड, असे काही गरुडाचे विविध प्रकार आहेत. हे गरुड अतिशय सुंदर आहेत. मुख्यतः डोंगराळ आणि वाळवंटी भागात गरुड आढळतो.

३. गरुड पक्ष्याबद्दल ५ ओळी लिहा.

सर्व पक्षांमध्ये सामर्थ्यवान समजला जाणाऱ्या पक्षी म्हणजे गरुड पक्षी होय.
गरुड पक्षी हा पक्षांचा राजा आहे.
गरुड पक्षी हा शिकारी पक्षी आहे, त्याची नजर खूप तीक्ष्ण असते.
गरुड पक्षी खूप उंचावरून आपल्या शिकारीवर हल्ला करतो आणि संधी मिळतच आपल्या शिकारीवर झडप घालतो.
गरुड पक्षी हा खूप चांगला आणि चपळ आहे. हा पक्षी अनेक पक्षांच्या तुलनेत आकाराने मोठा पक्षी आहे.
गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो.

४. गरुड पक्षाचा आहार काय आहे ?

गरुड अतिशय हुशार आणि चपळ आहे. तो डावपेच आखून शिकार करतो. गरुड हा मांसाहारी पक्षी आहे. गरुड ससे, उंदीर, साप, अशा लहान प्राण्यांना खातो. मुख्यतः कीटक, लहान प्राणी, लहान पक्षी, यांची शिकार गरुड करत असतो.

५. गरुड पक्ष्याचा आयुःकाळ काय असतो ?

गरुडाचे सरासरी आयुष्य ७० वर्ष असते. बहुदा गरुड ४० वर्षांनी म्हातारा होतो. ४० वर्षांनी गरुडाचे शरीर सैल होते. या वयानंतर तो शिकार करण्यास असमर्थ होतो. गरुड म्हातारा झाल्यावर आपले पंजे तोडतो, त्याची चोच खडकावर घासून तोडतो, हळूहळू त्याचे पंख ही तोडतो.

६. गरुडाची प्रजनन क्षमता किती असते ?

मादी गरुड जास्त अंडी घालत नाही ती एकावेळी फक्त ३ ते ४ अंडी घालते आणि ही अंडी सुमारे ३६ दिवस उबवते, यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. नर गरुडाचे काम शिकारी प्राण्यांपासून अंड्यांचे संरक्षण करणे आणि अन्न पुरवणे आहे.

निष्कर्ष

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गरुड पक्ष्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment